वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
शीतयुद्धाच्या काळात खतपाणी घातलेला, अफगाणिस्तानच्या भूमीत रुजवलेला दहशतवाद नावाचा भस्मासुर या महासत्तेवरच उलटला. अमेरिकेचे फासे अमेरिकेवरच उलटले.
September 11, 2021
आता तिसऱ्या प्रकारातल्या दोस्त्यांमध्ये मोडणाऱ्या दोस्तांना दोस्त म्हणणं तितकसं सयुक्तिक नसतं. कारण यामधल्या प्रत्येकाचं मनाने एकमेकांशी काहीही देणं घेणं नसतं. दारू, व्यसनं, या एकाच अजेंड्याखाली सगळे एकत्र आलेले असतात.
August 26, 2022
रेल्वेचा इतिहास, रेल्वेचा प्रवास, या प्रवासात भेटलेली वेगवेगळी स्टेशन्स, या गोष्टी रेल्वेप्रेमींच्या आयुष्यातली जागा ‘सुंदर आठवणी’ म्हणून आपसुक व्यापून राहतात. या प्रवासादरम्यान, देशभर, अगदी कानाकोपऱ्यांत पसरलेल्या, रेल्वेच्या महाकाय जाळ्यामागच्या व्यवस्थेविषयीचं कुतूहलही मनात नकळत जागं होतं.
July 9, 2022
अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, कणकवलीचे भालचंद्र महाराज किंवा नागडेबाबा इत्यादी कोणत्याही अवतारांबाबत माझा सखोल असा अभ्यास नसला, तरी एक निरीक्षण आहे आणि ते माझ्यापुरतं खरं आहे हे मला पटलेलं आहे. अर्थात, माझं मत आपल्याला मान्य असायलाच हवं, असा काही माझा आग्रह नाही. मला या अवतारी पुरुषांबद्दल काय वाटतं ते मी या लेखात मांडायचा प्रत्न केला आहे. या लेखातून कोणाच्या भावना दुखावाव्यात असा माझा हेतू नाही.
March 24, 2018
माझी प्रमुख या नात्याने जबाबदारी होती, ती म्हणजे कारखान्याचे आर्थिक व्यवहार सुधारण्याची. मी कामाचा चार्ज घेतल्या नन्तर काही दिवसात माझ्या लक्षात आलं की कारखान्याच्या आवारातून खूप चोऱ्या होतात, ज्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान होत होते. रात्र झाली की आजूबाजूच्या लोकांपैकी काही तारेच्या कुंपणातून आत शिरत आणि ज्याला चांगला विक्री भाव येतो अश्या वस्तूंची चोरी करत. आमच्याच कारखान्यातले काहीजण ह्या चोरी करणाऱ्या लोकांना मदत करत असेही माझ्या कानावर आले होते. आणि त्यांच्याशी कितीही अप्रत्यक्ष संवाद साधला तरीही ती लोकं अशी चोरीला मदत थांबवत नव्हती.
December 29, 2025
पुराणातील काही संदर्भांनुसार, ज्या घरांमध्ये तुळस लावलेली असते आणि नियमित सकाळी तुळसपूजन केले जाते, त्यांच्यावर सदैव लक्ष्मीची कृपा असते, अशी मान्यता आहे. त्या कुटुंबांमध्ये लक्ष्मीचा वास असतो. तुळशी वृदांवनामुळे आजूबाजूचे वातावरण पवित्र राहते. नकारात्मकतेला थारा राहत नाही. तुळशीचा वास असलेल्या कुटुंबात सदस्य कमी आजारी पडतात.
April 26, 2025
एकूणच चित्रपटाची कथा, ही दिग्दर्शकानं आजपासून पन्नास वर्षांपुढील चित्र कसं असेल हे दर्शवलेलं आहे, जर नितीमूल्य, संस्कार किंवा मुलांना “क्वालिटी टाईम” पालकांकडून मिळत नसेल तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात या सर्वांचं सुंदर आलेखन “इनव्हेस्टमेंट” च्या माध्यमातून मांडलेलं दिसतं.
September 25, 2013
आपण आपल्या घरातील टाकाऊ वस्तू, कचरा नेहमीच घराबाहेर फेकून देतो. सोसायटीच्या आवारात, सार्वजनिक रस्त्यांवर, अगदी कुठेही आपण कचरा फेकतो. या कचर्यात इ-कचराही असतो. मात्र त्याबद्दल आपल्याला कोणी प्रश्न विचारत नाही किंवा दंडही करत नाही.
June 18, 2012
अशा स्वरूपात करीत असलेले आपले ही विवेचन कसे शास्त्रशुद्ध आहे? याचे प्रतिपादन करताना, परमपूज्य जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज येथे उपनिषदाचा आधार घेत आहेत. ते म्हणतात,
November 20, 2020
वर्षाचे दिवस, महिने व शेवटी आख्ख वर्षच कधी आलं आणि कधी सरलं हे कळलही नाही एवढा आयुष्याचा वेग वाढलाय..
December 31, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti