(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गायत्री मंत्र आणि आयुर्वेद

    गायत्री मंत्राचा जप करताना जीभ आणि ओठदेखील न हलवता मनातल्या मनात करायचा आहे असे शास्त्र सांगत असताना बॉलिवूड गाण्याच्या धर्तीवर तो मंत्र लावून आपण काय साध्य करतो बरं?

      January 1, 2018


  • भारत, चीन आणि नेपाळमधील सत्तांतर

    नेपाळ हा भारताचा अगदी निकट शेजारी, जगातील एकमेव हिंदूराष्ट्र म्हणून भारतात त्या देशाबद्दल आपुलकी वाटे, परंतु काही वर्षापूर्वी तेथे आलेल्या माओवादी  राजवटीने ‘हिंदू राष्ट्र’ही नेपाळची प्रतिमा पुसून टाकून हिंदू हा तेथील अधिकृत अथवा राष्ट्रीय धर्म नसल्याचे घोषित केले. गिरीजाप्रसाद कोईरालांसारख्या पुढार्‍याच्या कारकीर्दीत नेपाळबरोबर भारताचे जसे संबंध होते.

      February 21, 2014


  • ट्रम्पची चीन भेट व भारताची तिहेरी घेराबंदी (Triple Encirclement)

    बंगाल ते हिंदी महासागर… विणला जातोय नवा सापळा! ज्यात ईशान्येला ‘ख्रिश्चन-मुस्लिम स्टेट’साठीची डीप स्टेटची उघड झालेली योजना, उत्तरेला चीन आणि पश्चिमेला पाकिस्तान—असा हा मोठा सापळा रचला जात आहे. म्हणूनच भारत बंगालचा उपसागर- विशाखापट्टणम-निकोबार असा एक अलिखित कॉरिडॉर निर्माण करत आहे. जेणेकरून, उत्तर, वायव्य आणि इशान्येकडून होऊ घातलेली ही तिहेरी घेराबंदी समुद्राच्या बाजूने ओपन राहील. पण त्याबाजूने चीनच्या आरमाराला कोणताही वाव राहणार नाही. त्याचप्रमाणे चीनला या पट्ट्यात नाविक व गुप्तहेर हालचालीना फार मोठी स्पर्धा असेल.

      May 28, 2026


  • जय जय अंबे

    जय जय अंबे, जय जय अंबे, जय जय जगदंबे
    महामाये आदिशत्ते* काली रूपे जगदंबे ।। धृ।।

    रूद्र स्वरूपे सौम्यहि रूपे ब्रम्ह रूपिणी आदिशत्ते*।
    ब्रह्या विष्णु शंकर तुजसि स्तवती कैलासावर ते ।।
    घे अवतारा तार जगाला मार शुंभ नि शुंभाला ।
    करी पार्वती संहाराचे रूपही धारण त्या काला ।।1।।
    जय जय अंबे ।।धृ।।

    रूद्र रूप ते प्रचंड भासे कंठी शीरांचे हार ।
    लवलव लवलव जिभही करीते कटी बांधिले करहार ।।
    भु भु:त्कारे कंपे धरणी कंप सुटे गगनावर ।
    वर्ण निळा हा काळा भासे नेत्री विलसे भास्कर ।।2।।
    जय जय अंबे ।।धृ।।

    उग्र रूप रूद्र स्वरूप त्वरीतही तारी भत्त*ांते ।
    असंख्य रूपे धारण केली तारण करण्या भत्त*ांते ।।
    कोधी येता काली म्हणसी शांत स्वरूपी विझाई ।
    भत्त*ा दासा गणेश सुता मुत्त* करी त्वरीत ही आई ।।3।।
    जय जय अंबे ।।धृ।।

    गायक - श्री.गजानन प्रधान.

      October 15, 2015


  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १२

    पशुं वेत्सि चेन्मां तमेवाधिरूढः
    कलंकीति वा मूर्ध्नि धत्से तमेव |
    द्विजिह्वः पुनः सोऽपि ते कंठभूषा
    त्वदंगीकृताः शर्व सर्वेऽपि धन्याः ‖ १२ ‖

    कोणत्याही परिस्थितीत आपण माझा स्वीकार करावा. अशी जणू काही भगवान शंकरांना गळ घालताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज एका वेगळ्याच पद्धतीचा वापर करीत आहेत.
    ते म्हणतात भगवंता कदाचित आपल्याला योग्य वाटत नसेल. पण ज्या ज्या कारणांनी मी योग्य नाही असे वाटते त्या गोष्टींनाही आपण पावन करीत असता. जसे,
    पशुं वेत्सि चेन्मां- आपण मला पशु समजत असाल, अर्थात कोणत्याही प्रकारची साधना, उपासना न करणारा जड जीव समजत असाल, तर
    तमेवाधिरूढः- आपण त्यावर बसता. आपला नंदी असाच पशू नाही का?
    त्या पशूच्या उद्धार केला तसाच माझाही उद्धार करा.
    अन्य अवगुणांचेही असेच साधर्म्य दाखवतांना आचार्य श्री म्हणतात,
    कलंकीति वा - माझ्या पाप कृतींमुळे मी कलंकित आहे असे वाटत असेल तर,
    मूर्ध्नि धत्से तमेव - तसा डाग असणाऱ्या चंद्राला आपणच डोक्यावर धारण करता.
    द्विजिह्वः पुनः- माझ्या बोलण्यात आणि वागण्यात वेगळेपणा आहे म्हणून मी दुतोंड्या आहे असे आपल्याला वाटत असेल तर,
    सोऽपि ते कंठभूषा- तशा दोन जिभा असणारा नागराज आपल्या कंठाचे भूषण आहे.
    त्वदंगीकृताः
    शर्व सर्वेऽपि धन्याः - हे शर्व अर्थात शरणागतांच्या दुःखाची हिंसा करणाऱ्या हे भगवंता, तू अंगीकार केलेली प्रत्येक गोष्ट धन्य होते. अन्य समयी क्षुद्र असणाऱ्या अशा सर्व गोष्टींनाही विश्ववंद्यत्व प्राप्त होते.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 21, 2020


  • खुलासा’ गोंधळ आणि गैरसमज वाढवणार्‍या गोष्टींचा

    पुर्वीची काठी घेऊन साप मारण्याची “पोज” आणि आजची “स्टीक” घेऊन सेल्फी काढण्याची पोज, दोघही सारख्याच वाटतात… फक्त सापाची जागा आपल्या मुखचंद्राने घेतलीये… पुर्णविरामांनी संपणारी आमची वाक्य् आता प्रश्नार्थक चिन्हांनी संपायला लागलीयेत, आयुष्यात पुढे सरकताना विराम कमी होत् असावेत् अन् प्रश्न वाढत् असावेत्…

      August 16, 2017


  • ये कहाँ आ गए हम !

    सक्काळी दार उघडलं आणि अतिथी गृहाच्या दारातील झाड खाली झुकून म्हणालं – ” हाती येतील तेवढी फुले खुशाल खुडून घे. वृथा उड्या बिड्या मारून उंचावरची तोडायचा प्रयत्न करू नकोस. ती राहू दे माझ्या अंगावर ! थोडं फुललेलं झाड छान दिसतं मग दिवसभर ! “

      April 2, 2023


  • प्रतिमाच प्रतिमा !

    बच्चा भी खेले, बच्चेका बाप भी खेले अशी तोंडी जाहिरात करत खेळणी विकणारे अनेक जण चौपाटीवर, उपनगरी गाड्यांमध्ये, इतरत्र आपल्याला भेटत असतात. त्यातली किती खेळणी तशा प्रकारची असतात, हे सांगणं कठिण आहे. पण कॅलिडोस्कोप हे मात्र अशा प्रकारचं खेळणं आहे यात शंका नाही.

      June 24, 2011


  • अर्जुनाची अखेरची कसोटी आणि राजकारण

    पाचूच्या बेटावरील ज्या 11 मानवी सिंहांनी राष्ट्राची पहिलीवहिली कसोटी 1981-82च्या हंगामात इंग्लंडविरुद्ध खेळली त्यांमध्ये 18 वर्षांच्या अर्जुना रणतुंगाचा समावेश होता. श्रीलंका संघाने खेळलेल्या 100व्या कसोटीत अर्जुना होता, त्याचा ‘त्या’ दहामधील कोणताही सहकारी आता मात्र संघात नव्हता.

      August 9, 2010


  • श्री म्हाळसाकांताची आरती

    अनेक कायस्थ कुटुंबात अतिशय भक्तीभावानी गायली जाणारी हि श्री म्हाळसाकांताची आरती आपल्या सर्वांच्या माहितीसाठी .... !!!!

    पिवळे निशाण तुमचे पिवळे शिखर ..पिवळे शिखर !
    पिवळा कांचन पर्वत , पिवळा कांचन पर्वत ...पिवळे नगर
    पिवळी तुमची काया पिवळा शृंगार ....पिवळा शृंगार !
    पिवळे राजे तुम्ही ...पिवळे राजे तुम्ही राणी सुकुमार !
    जयदेव जयदेव जयशिव मैराळा जयशिव मैराळा
    विशाल शंकर ढवळा... विशाल शंकर ढवळा ,त्याहुनी तू पिवळा //१//
    पिवळी बाणा बाई धनगरीण बाळ, धनगरीण बाळ
    पिवळ्या घोड्यावरी बससी मैराळ !
    चारी वाद्ये वाजती देवांच्या सकळा देवांच्या सकळा
    दासी झाल्या मुरळ्या ..दासी झाल्या मुरळ्या
    भोगिसी त्या सकळा !
    जयदेव जयदेव जयशिव मैराळा जयशिव मैराळा ....
    विशाळ शंकर ढवळा , विशाळ शंकर ढवळा , त्याहुनी तू पिवळा //२//
    चंपाषष्ठी चा कुळधर्म केला ...कुळधर्म केला
    पिवळ्या पुरणाची ..पिवळ्या पुरणाची आरती देवाला
    रोग्याने सेवा केली त्यावरी सकळा ...त्यावरी सकळा ,
    त्यावरी कृपा केली... त्यावरी कृपा केली ...पिवळ्या मैराळा
    जयदेव जयदेव ..जयशिव मैराळा ,जयशिव मैराळा
    विशाळ शंकर ढवळा , विशाळ शंकर ढवळा ...त्याहुनी तू पिवळा //४//
    सदानंदाचा येळकोट !!!
    येळकोट येळकोट ...जय मल्हार !!!

    -- चिंतामणी कारखानीस

      February 18, 2016