वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
१९२९ मध्ये द न्यूयॉर्क वर्ल्डने सुपर कॉम्प्युटर हा शब्द पहिल्यांदा आयबीएमच्या टॅब्युलेटर्ससाठी वापरला होता. त्यानंतर १९६०च्या सुमारास कंट्रोल डेटा कॉर्पोरेशनमध्ये काम करताना सेमूर क्रे यांनी पहिला महासंगणक तयार केला.
October 20, 2023
देशात ३३ लाख स्वयंसेवी संस्था कार्यरत असल्या तरी या संस्थांनी नफा कमावू नये या मूळ उद्देशालाच हरताळ फासलेला दिसून येतो. काही संस्था निःस्पृहपणे काम करत असल्या तरी अनेक संस्था कर वाचवणे, प्रवर्तकांसाठी सुविधा निर्माण करणे,शासनाचा निधी उकळणे अशा कामांसाठीच स्थापन केल्या जातात. या संस्थांनी खरोखरच काम केले तर देशापुढील अनेक समस्या चुटकीसरशी सुटतील.
September 11, 2010
वैज्ञानिक दृष्टिकोन या शब्दप्रयोगातल्या वैज्ञानिक या शब्दामुळं थोडीशी दिशाभूल होते. वैज्ञानिक आपल्या संशोधनकार्यासाठी जी प्रणाली वापरतात ती या शब्दप्रयोगाचा वापर करण्यात अभिप्रेत आहे. वैज्ञानिक आपलं काम कसं करतात? तर ते कोणतंही विधान तसं सहजासहजी किंवा कोणाच्याही दबावाखाली मान्य करत नाहीत.
April 20, 2011
ह्याचे २०-३० फुट उंचीचे भराभर वाढणारे झाड असते.ह्याला शरद ऋतुमध्ये फुले येतात म्हणून ह्याला अगस्त्य ऋषिंच्या नावाने अगस्त्य असे ही म्हणतात.
हि भाजी चवीला कडवट असते व थंड असते त्यामुळे ती शरीरातील कफ व पित्त दोष कमी करते.
हि भाजी जशी स्वयंपाकात वापरतात तसेच ह्याचा उपयोग आपण घरगुती उपचारांमध्ये देखील करू शकतो.
१)जखमेवर हादग्याच्या पानांची चटणी बांधावी म्हणजे जखम लवकर भरत.
२)ठेच लागुन सुज आली असल्यास ठेचाळलेल्या भागावर हाद्ग्याच्या पानांचा रस लावावा.
३)जुना खोकला कमी होत नसल्यास हादग्याच्या पानांचा रस २ चमचे + मध १ चमचा हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्यावे.
४)वारंवार जंत होणे,अंगावर पांढरे डाग उठणे,पोट दुखणे,भुक न लागणे,जुलाब होणे ह्या तक्रारी करीता हादग्याची भाजी जेवणात काही दिवस नियमीत घ्यावी.
५)डांग्या खोकल्यात हाद्ग्याच्या पानांचा रस ४ चमचे+ कांद्याचा रस २ चमचे हे मिश्रण दिवसातून ४ वेळेस १५दिवस घ्यावे.
हि भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्यास संडासला घट्ट होऊ शकते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
October 26, 2016
जर प्रत्येक घरात वडिलधाऱ्या मंडळीना दररोज नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील, तर त्या घराघरात वितंडवाद सहज टाळता येऊ शकतात. असे घर स्वर्ग बनू शकते. मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे कवच आहे की, ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही.
November 28, 2017
अतिशय सुंदर दृश्य. गणरायाची स्वारी अवकाशातून धर्तीकडे यायला निघाली आहे याची प्रत्यक्ष प्रचिती येते या दृश्यातून.
September 3, 2016
इतक्या मोठ्या प्रमाणावर आतंकी कारवाया ज्या ठिकाणी चालत असतील, तेथे स्थानिक प्रशासन, पोलीस यांना याविषयी माहिती कशी मिळत नाही? कि माहिती मिळूनही पोलीस-प्रशासन त्याकडे कानाडोळा करते कि पोलीसही त्यात सामील असतात? तृणमूलच्या नेत्याच्या घरी झालेल्या स्फोटाच्या प्रकरणात पोलिसांनीच पुरावे नष्ट केले आहेत. बंगलादेशची राजधानी ढाका येथे मोठ्या प्रमाणात रक्तपात घडवून आणण्याची हुजी अतिरेक्यांची योजना असल्याची माहिती आहे व काही राजकीय नेत्यांना, नामवंत व्यक्तींनाही ठार मारण्याची हुजीची योजना होती, असे इतके दिवस झोपलेले पश्चिम बंगालचे पोलिस आता सांगत आहेत.
October 29, 2014
लहान असताना रेडिओवर ‘ आवाज के दुनिया के दोस्तो ’ असे बोलून गाण्याचा कार्यक्रम सुरु व्हायचा. खरंच ह्या जगामध्ये आवाजच आवाज आहे. बाह्य जगत आणि अंर्तजगत दोन्ही आवाजांनी भरलेली आहेत. बाह्य जगात ध्वनी प्रदूषण आणि अंतर्जगात विचारांचे प्रदूषण. मनातल्या विचारांना आवाज देणारे आहेत शब्द. विचारांना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे शब्द. विचारांना शब्दांचे रूप कसे द्यायचे हे मात्र प्रत्येकांनी ठरवायचे.
December 26, 2021
मेरीचा जन्म 1 ऑक्टोबर 1903 रोजी आयर्लंड येथे झाला. तिचे सांकेतिक नाव क्लाऔडिन होते. तिने कला शाखेत पदवी घेतली होती. तिला फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन, जर्मन आणि अरेबिक भाषा येत होत्या. युद्ध सुरू झाले तेव्हा ती वोरसाच्या ब्रिटिश एमबसित काम करत होती. नंतर ती लंडन मध्ये हवाई मंत्रालयात ट्रान्सलेटर म्हणून काम करू लागली. 19 सप्टेंबर 1941 रोजी तिने वुमन एअर फोर्स मध्ये इंटलीजन्स क्लार्क म्हणून कामकरू लागली. तिने मार्च 1942 मध्ये वुमन एअर फोर्स सोडले व स्पेशल ऑपरेशन्स एक्सेकयूटीव या ब्रिटनमधील दुसऱ्या महायुद्धात सुरू केलेल्या गुप्तहेर संघटनेत प्रवेश घेतला. 39 व्या वर्षी ती संघटनेची सगळ्यात वयस्क एजंट होती.
एसओईच्या मते ती उंच, सडपातळ होती. तिथे तिला कुरियरचे शिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर ती पाणबुडीतून जिब्राल्टर व तिथून फेलूका येथे पोहोचली. 31 ऑक्टोबर 1942 ला ती फ्रान्सच्या दक्षिण किनाऱ्यावर पोहोचली.तिथून ट्रेनने बोर्डक येथे गेली तिथे तिची भेट एसओईच्या बिसाकशी झाली. त्याचा ग्रुप गुप्तहेर संघटना चालवत असे. फ्रेंच संघटकांसाठी मेरिने ट्रेन व सायकलचा खूप मोठा प्रवास संदेश,कागदपत्र,पैसे, वायरलेस सुटकेस,घेऊन केला.त्यात धोका होता. जून 943 मध्ये जर्मनीने खूप धरपकड केली. मेरीला अटक टाळण्यासाठी इंग्लंडला परतण्याचे आदेश मिळाले.पण ती तिथेच लपून राहिली. 18 फेब्रुवारी 1944 ला तिला अटक करण्यात आली. त्यांना ती बिसाक वाटली.
चौकशीच्या वेळी तिने बिसाकला ओळखत नसल्याचे सांगितले. तुरुंगात तिला 24 तासांची एकांताची कोठडी देण्यात आली. पण इतर त्रास देण्यात आला नाही. तुरुंग स्वछ होता. तिला ईस्टर च्या दिवशी सोडण्यात आले.इंग्लंड मधील ससेक्स प्रांतात तिने फार्म हाऊस घेतले. फ्रांस तर्फे तिला “क्रोक्स द गुरे” अवॉर्ड मिळाले पण इतर एसओई एजंट प्रमाणे तिला कोणतेही अवॉर्ड देण्यात आले नाही. ती 23 जानेवारी 1983 रोजी न्यूमोनियाने वारली.
--रवींद्र शरद वाळिंबे
December 25, 2022
आज ४ तारिख... चार (४) या आकड्याची आणखी गंमत बघा.....
थोडी कडू थोडी गोड पण जिला नाही तोड अशी ही चौपदरी कथा आहे !
चारची खरी बाजू ' चार ' दिशेत
आहे !
' चार ' खांबांशिवाय घर बांधता येत नाही.
' चार ' गोष्टी शिकल्याशिवाय शहाणपणा येत नाही.
' चार ' चौघात जे बोलू नये ते बोलले की गालावर ' चार ' बोटे उमटल्याशिवाय राहत नाहीत.
' चार ' शब्द सणसणीत सुनावणे म्हणजे कानाखाली ' चार ' आवाज काढण्या सारखेच असते.
चौघे म्हणजे जणू ' चार ' वेद आणि यांनी एकमेकास गुणिले की दुप्पट उपनिषदे होतात.
' चार 'चा 'वर्ग' केला की माणूस तरुण होतो अन सोळाव्या वर्षात पाऊल ठेवतो.
"चार"च्या 'वर्गा'स पुन्हा "चार"ने गुणले की जगातल्या सर्वात 'बुद्धि'मान खेळातले चौसष्ट घरांचे 'बळ' मिळते !
यांची टीका ही ' चौफेर ' असते.
यांचे फटके म्हणजे ' चौकार ' असतात !
चारचे सामर्थ्य देवीच्या ' चार ' भुजांसारखे असते अन पावित्र गाईच्या ' चार ' पावलांसारखे असते...
ज्या विहिरींचे पाणी शेतकरी पिकाला पाजतो ती सुद्धा कमीत कमी ' चार ' परस खोल असावीच लागते.
' चार ' वाफे असल्याशिवाय मातीत बांध घालता येत नाहीत.
' चार ' पाकळ्या असल्याशिवाय फुलाला शोभा येत नाही !
जगातल्या ' चौघां 'चेही असेच असते. यांनी ' चार ' शिव्या दिल्या शिवाय जगाला शहाणपण सुचत नाही.
अन ' चार ' गोष्टी हिताच्या सांगितल्याशिवाय सुख दुःखे उमजत नाहीत.
ज्या घरात आपण राहतो तेदेखील ' चौसोपी ' असल्याशिवाय त्याला रुबाब येत नाही !
चौसोपी घराबाहेर ' चारचाकी ' असली की शान अधिक वाढते !
' चार 'चौघांना विचारल्याशिवाय खरे सत्य समजत नसते.
' चार ' लोकांपासून ' चार ' हात लांब राहिले तर खरे मित्रही कळत नाहीत !
युगे देखील " चार "झाली आहेत. कृत, त्रेता, द्वापार आणि कलीयुग ; यावरून ' चौघां 'चा महिमा जाणावा.
स्वर जरी सात असले तरी सामान्यतः बोलताना ' सारेगम ' कळले म्हणजे संगीत आले असं म्हटले जाते !
आपल्या जीवनाचे आधार देखील ' चार 'च आहेत - दोन हात अन दोन पाय !
वर्ण देखील ' चार ' आहेत. ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य नि शूद्र.
लीप वर्ष देखील ' चार ' वर्षानी येते !
जमीन सुद्धा ' चौरस 'च शुभ समजली जाते.
माणूस हुशार झाला की त्याला ' चौकस ' बुद्धीचा समजलं जातं ...
चारोळीत देखील महाकाव्याचा अर्थ लिहिता येतो, चारोळे खाल्ले की तब्येत सुधारते !
' चार ' ढांगा चालले की मातीचा अंदाज येतो.
' चार ' कडवी वाचली की कवितेची गोडी लागते.
' चार ' संवाद ऐकले की नाटके पहावीशी वाटतात.
' चार ' घास खाल्ले की पोट भरल्यासारखे वाटते.
' चार ' घटका लवंडले की आराम मिळाल्या सारखे वाटते.
' चार ' वाती प्रज्वलित केल्या की मनातला अन घरातला अंधार दूर होतो.
' चार ' पुस्तके वाचल्याशिवाय ज्ञानाची ओढ लागत नाही.
मंगलकार्य साजरे करताना सनई बरोबर ' चौ 'घडे वाजल्याशिवाय रंगत कसली ती येत नाही !!
' चार ' वाईट जर एकत्र आले तर मात्र ती चांडाळ 'चौकडी' होते.
' चार ' चांगले लोक एकत्र आले तर मात्र इतिहास बदलतो.
इतकेच कशाला चितेवर ' चार ' लाकडे ठेवल्याशिवाय चिता पूर्ण होत नाही.
' चौघां 'च्या खांद्यावर गेल्याशिवाय जीवनातला प्रवास पूर्ण होत नाही.
आयुष्याच्या अंती मातीत चिरनिद्रा घेताना सुद्धा ' चार ' फुट खोल खांदावेच लागते , त्याशिवाय शीणलेल्या जीवाला खरा आराम मिळत नाही !
सरते शेवटी असं म्हणेन की जीवनात जीवाला जीव लावणारे
' चार ' मित्र असल्याशिवाय जीवनाचा अर्थ उमगणार नाही, उमजणार नाही !!
September 4, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti