वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
‘देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा’ सारखी गावागावातल्या भिंतींवर ‘शोले न पाहिलेली अभागी व्यक्ती कळवा आणि लाख रुपये मिळवा’ अशी जाहिरात दिल्यास जाहिरातीला शून्य प्रतिसाद मिळण्याची शक्यता शेकडा शंभर टक्के आहे.
March 3, 2025
काल वसंत पंचमी होती, सकाळी गल्लीत एके ठिकाणी सरस्वती पूजा होत होती. बर्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आठवली, गाडीतून दिल्लीला परतत होतो. सकाळची वेळ होती. खिडकीतून बाहेर बघत होतो, सर्वत्र दूर दूर पर्यंत शेंतात पिवळ्या फुलांनी नटलेली सरसों दिसत होती. अचानक धुक्याचा परदा चिरत सूर्य नारायणाने दर्शन दिले. सूर्याच्या सोनेरी प्रकाशात, धरती न्हाऊन निघाली. असे वाटले जणू धरतीमातेने सुर्वर्ण गालिचाच पांघरलेला आहे. ते अद्भुतरम्य, अस्मरणीय दृश्य पाहून रात्रभर थंडीने कुडकुडनार्या प्रवासींचे चेहरे ही आनंदाने उजळून निघाले. एक प्रवासी बहुधा शेतकरी असावा, दृश्य पाहून म्हणाला, भाऊ, यालाच म्हणतात स्वर्ग, अशी जमीन कसायला मिळाली पाहिजे...घरी आल्यावर कळले, त्या दिवशी वसंत पंचमी होती. आज रविवार, बर्याच दिवसांनी प्रात:स्मरणीय श्लोक गुणगुणला:
श्वेत कमळावर विराजमान शुभ्रवेशधारी ज्ञान देवता, सरस्वतीची कृपा असेल, तर आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतकरी,शेतांत ही सोन पिकवितो, लक्ष्मी हातात येते.
सरस्वतीच्या कृपेने माया-मोहाचे पाश तुटतात आणि ज्ञानाचा आनंद ही प्राप्त होतो.
खुसरोने ही विचार केला, त्यांचे गुरु उदास आहे, त्यांना ही प्रसन्न केले पहिजे. त्यांनी सरसोंची फुले आपल्या पगडीत लावली, हिदू पुरुषांप्रमाणे पीत वस्त्र धारण केले, फुलांचा शृंगार केला. आपल्या काही सुफी मित्रांना आणि कव्वालाना सोबत घेतले, औलीयाला देण्या साठी, सरसो आणि टेसूच्या गुलदस्ता तैयार केला. वासंतिक गीत गात, नाचत गाजत ते हजरत निजामुद्दीन औलिया समोर आले. त्यांची विचित्र वेशभूषा आणि नाचगाणे पाहून औलीयाला हसू आले, त्यांची उदासी दूर झाली. आपले गुरु आनंदित झाले, हे पाहून देवीचे आभार मानण्यासाठी अमीर खुसरो यांनी आपल्या मित्रांसमवेत देवीच्या चरणी सरसोची फुले अर्पण केली. त्या दिवसापासून निजामुद्दीन औलीयाच्या दर्गाहावर वसंत पंचमीचा उत्सव सुरु झाला. आज ही मुस्लीम बांधव पीतवस्त्र धारण करून, नाचत गाजत अमीर खुसरो यांनी लिहलेली वासंतिक गीत गात निजामुद्दीन औलीयाच्या दरगाह वर जाऊन श्रद्धेने पिवळी फुले त्यांच्या चरणी अर्पण करतात. खरंच ज्ञानाच्या उजेडात मोह-पाश नष्ट होतात आणि भक्ताला आनंदाची प्राप्ति होते.
सगन बिन फूल रही सरसों।
सगन बिन फूल रही सरसों।
अम्बवा फूटे, टेसू फूले, कोयल बोले डार-डार,
और गोरी करत सिंगार,
मलनियाँ गेंदवा ले आईं कर सों,
सगन बिन फूल रही सरसों।
तरह तरह के फूल खिलाए,
ले गेंदवा हाथन में आए।
निजामुदीन के दरवज़्ज़े पर,
आवन कह गए आशिक रंग,
और बीत गए बरसों।
सगन बिन फूल रही सरसों।
January 29, 2015
राज्याच्या शैक्षणिक जडणघडणीत आणि प्रगतीत `बालभारती`ची भूमिका मोलाची आहे. बालभारतीच्या या वैभवशाली इतिहासाचे दस्तऐवजीकरण होणे गरजेचे होतं. ‘बालभारती’च्या सुवर्णमहोत्सवाचे निमित्त साधून संस्थेच्या इतिहासाचा-वाटचालीचा दस्तऐवज (डाॅक्युमेंटेशन) करण्याचं ठरलं. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त साकारलेलं हे पुस्तक बालभारतीच्या तसेच राज्याच्या शैक्षणिक-सामाजिक वाटचालीचा महत्वाचा दस्तऐवज ठरणार आहे.
November 29, 2017
जगातल्या उपलब्ध असणाऱ्या सर्व साहित्यामध्ये, अन्नासंबंधी अथवा भोजनासंबंधीचे सर्वात प्राचीन असे उल्लेख आढळतात ते भारतीय ग्रंथांमध्ये. ऋग्वेद हा जगातला सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो. या ऋग्वेदामध्ये परिपूर्ण आहारासंबंधी अनेक सूक्त आहेत.
November 20, 2023
गेल्या काही दिवसात अध्यात्म याच्याशी संबंधीत आपल्या देशात जी काही प्रकरणे उगड झाली आहेत त्यामुळे अध्यात्म या विषयावर एक प्रश्न चिन्ह निर्माण झालेले आहे. आजही आपल्या देशात स्वतःला अध्यात्मिक गुरू म्ह्णवून घेणार्यां भोंदूंची कमी नाही. सर्वच अध्यात्मिक गुरू भोंदू असतात असं नाही म्ह्णता येणार आणि खर्या अध्यात्मिक गुरूंची समाजाला गरज ही आहेच. फक्त गुरू मंत्र देण्याच्या नावाखाली शिक्षांचा गोतावळा तयार करून आपल्या देशात चहाच्या टपर्यासारखी जी मठे उभारली गेलेली आहेत तेथे दिल्या गेलेल्या मंत्रात किती ताकद असेल ते त्या देवालाच ठावूक ! याच मठांच्या जागेवर अनेक गुन्हे घडल्याचेही कित्येकदा निदर्शनास येत असते. पुर्वी या बाबा, बुवा आणि भोंदू अध्यात्मिक गुरूंच्या नांदी फक्त अशिक्षीत लोकच लागत असत पण आता स्वतःला उच्च शिक्षीत म्ह्णवून घेणारे ही या बाबा – बुवांच्या पायावर पडलेले दिसतात. गरीब श्रीमंतीच स्वप्न पाहत आणि श्रीमंत मोक्षाच स्वप्न पाहत या बाबा-बुवांच्या नादी लागतो. गुरूला साक्षात त्रीदेवांपेक्षा मोठ मानणारी आपली संस्कृती त्यामुळे ही संस्कृती मानणारे आपलं सर्वस्व ही गुरूच्या चरणी अपर्ण करायला मागे पुढे पाहत नाहीत. प्रसंगी आपल्या अध्यात्मिक गुरूंसाठी आपले प्राणही देण्याची शिक्षांची तयारी असते. मागच्या काही वर्षात आपल्या देशात खर्या अध्यात्मिक गुरूंचे दर्शन सर्वसामान्यांना नशिबानेच होते पण त्याउलट भोंदू बाबांची अनेक प्रकरणे एका मागून एक उगडी होत आहेत. सध्याच्या अध्यात्मिक गुरूंकडे असलेल्या संपत्तीचे आकडे पाहिल्यावर देशातीलच नव्हे तर जगभरातील उद्योगपतींनाही घाम आल्यावाचून राहत नसेल. एकीकडे आपला देश मंगळावर जाण्याची तयारी करतोय आणि याच आपल्या देशातील राजकीय मंडळी जर बाबा- बुवांच्या पायावर लोटांगण घालतात अस चित्र भविष्यात दिसल तर ते आपल्या देशाचच दुदैव म्ह्णावं लागेल दुसर काय ?
आपल्या देशातील बहूसंख्य लोक अध्यात्मिक गुरूंच्या मागे लागतात ते मोक्ष प्राप्तीसाठी मुळात मोक्ष ही संकल्पना गृहीत धरावी की नाही याबद्दल ठाम मत व्यक्त करावं की नाही इतकी माहिती उपलब्ध नाही. ढोबळ्मानाने या बाबतीत असेही म्ह्णता येईल की अस्तित्वाच नसलेली गोष्ट मिळविण्यासाठी सार्यांचा अट्टहास सुरू आहे. आपल्या देशातील एखाद्या कुटूंबातील कुटूंब प्रमुखाने गुरू केला की तो आपल्या कुटूंबातील सर्वांनाच त्या गुरूच्या चरणी लोटंगण घालायला भाग पाडतो. पुर्वी फक्त ईश्वर हाच आपला एकमेव संरक्षण कर्ता आहे अशी सर्वसाधारणतः लोकांची समजूत होती पण हल्ली सर्व संकटातून, दुःखातून मुक्ती मिळवून मोक्षाच्या मार्गावर मार्गस्थ होणाचा एक मेव मार्ग म्हणजे गुरूमंत्र आणि तो देणारा अध्यात्मिक गुरू असा गैरसमज समाजात जाणिव पूर्वक पसरविला गेला आहे. आपल्या देशातील वाढ॑ती लोकसंख्या ,मुळभूत गरजांचा अभाव, वाढती बेकारी आणि वाढत्या सामाजिक समस्या यामुळे त्रस्त झालेल्या आजारी पडलेल्या प्रत्येकाला एक मानसिक आधार हवा असतो नेमका तो आधार हे अध्यात्मिक गुरू योग्य वेळी देतात आणि लोकांच्या गळ्यातील ताईत होतात. समाजात संस्कृती, संस्कार आणि नैतिकता टिकून राहावी म्ह्णून समाजाला ईश्वर या संकल्पनेची आणि अध्यात्मिक गुरूंची आवश्यकता आहेच पण ती फक्त खर्या अध्यात्मिक गुरूंची भोंदूंची नाही. आता या भोंदू बाबा, बुवा आणि अध्यात्मिक गुरूंचे पितळ उगडे पाडण्यासाठी खर्या अध्यात्मिक गुरूंनीच पुढाकार घ्यायला हवा. आपल्या देशात अध्यात्माच्या नावावर प्रचंड बाजार मांडलेला दिसतो ज्यात लाखो लोक आपला स्वार्थ साधताना दिसतात. आपल्या देशातील शिक्षणपध्दतीत एक त्रूटी आहे ती म्ह्णजे आध्यात्म या विषयाचा शाळेय शिक्षणात समावेश केला गेला नाही ते होण गरजेचे आहे. आपल्या देशातील स्वतःला स प्रसिध्द म्ह्णवून घेणार्यांचे आपल्या संस्कृती बाबतचे ज्ञान नव्हे अज्ञान किव येण्यासारखे असल्याचे बर्याचदा दिसते. आपल्या देशात अध्यात्माच्या नावावर जमा झालेला बराचचा पैसा लोकहिताच्याच कामी आला असता तर देशाची बर्यापैकी प्रगती झाली असती. सर्वच अध्यात्मिक गारूंचे आर्थिक व्यव्हार अधिक पारदर्शी करण्याबाबत सरकारणे विचार करायला हवा. अध्यात्म हे लोकांना ज्ञानाचा मार्ग दाखविण्यास कारणीभूत ठरायला हवे पण आज अध्यात्माचा बाजार मांडून ते लोकांना लुबाडण्याचा अड्डा होत आहे...हे कोठे तरी थांबायला नको का ?
लेखक – निलेश बामणे
गोरेगांव ( पूर्व ) मुंबई
मो. 9029338268
December 20, 2014

ज्ञानपीठ पुरस्कार सुरू करण्यामागे रमा जैन यांची प्रेरणा होती. रमा जैन आणि त्यांचे पती साहू शांतिप्रसाद जैन यांनी भारतीय साहित्यिकांच्या गौरवार्थ हा पुरस्कार देण्याचे ठरवले.
२२ मे १९६१ या दिवशी साहू जैन यांच्या एक्कावन्नाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी स्वतःच्या कौटुंबिक ट्रस्टमधून ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची घोषणा केली. त्यानुसार भारतीय ज्ञानपीठाच्या संस्थापक अध्यक्षा रमा जैन यांनी १६ सप्टेंबर १९६१ या दिवशी संस्थेच्या बैठकीत ज्ञानपीठ पुरस्काराबाबतचा ठराव मांडला.
या पुरस्काराचे स्वरूप ठरविण्यासाठी २ एप्रिल १९६२ या दिवशी दिल्लीत देशभरातून ३०० विद्वानांना आमंत्रित करण्यात आले. या विद्वानांचे दोन सत्रांत संमेलन झाले. सत्रांचे अध्य्क्षपद डॉ. वी. राघवन आणि डॉ. भगवतीचरण वर्मा यांच्याकडे होते. सूत्रसंचालन डॉ. धर्मवीर भारती यांनी केले. या संमेलनाला काका कालेलकर, हरेकृष्ण मेहताब, निसीम इझिकेल, डॉ. सुनीति कुमार चॅटर्जी, डॉ. मुल्कराज आनंद, सुरेंद्र मोहंती, देवेश दास, सियारामशरण गुप्त, रामधारी सिंह दिनकर, उदयशंकर भट्ट, जगदीशचंद्र माथुर, डॉ. नगेन्द्र, डॉ. बी.आर. बेंद्रे, जैनेन्द्र कुमार, मन्मथनाथ गुप्त, लक्ष्मीचंद्र जैन यांसारखे विद्वान हजर होते. या संमेलनातून तयार झालेली पुरस्काराची संपूर्ण योजना डॉ. राजेंद्रप्रसाद यांना सादर करण्यात आली. त्यांनी ती मान्य केली व निवडसमितीचे प्रमुखपदही स्वीकारले पण १९६३ साली त्यांचे निधन झाले. त्यानंतर ही जबाबदारी काकासाहेब कालेलकर व डॉ. संपूर्णानंद यांच्याकडे आली.
२९ डिसेंबर १९६५ मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम कवी गोविंद शंकर कुरूप यांच्या ओडोक्वुघल (बासरी) या काव्यकृतीला मिळाला. भारताचा कोणताही नागरिक भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणाऱ्या एका नागरिकाला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. प्रकाशित होऊन कमीतकमी पाच वर्षे झालेल्या पुस्तकांचाच पुरस्कारासाठी विचार होतो.
ज्या भाषेसाठी हा पुरस्कार दिला गेला असेल, त्याच्या पुढील तीन वर्षे त्या भाषेचा पुरस्कारासाठी विचार केला जात नाही. सुरुवातीला एक लाख, नंतर दीड लाख, नंतर पाच लाख, सात लाख त्यानंतर आता अकरा लाख रुपये एवढी रक्कम पुरस्कार विजेत्याला दिली जाते. काहीवेळा एका ऐवजी दोन साहित्यिकांची पुरस्कारासाठी निवड होते त्यावेळी ही रक्कम विभागून दिली जाते.
१९६७ साली गुजराती व कानडी, १९७३ साली उडिया व कानडी तसेच २००८ साली कोकणी आणि संस्कृत अशा दोन भाषांना हे पारितोषिक विभागून देण्यात आले होते.
भारतातील विद्यापीठे, त्यांचे भाषाप्रमुख, अन्य शिक्षणसंस्थांचे प्रमुख, विख्यात साहित्यिक, समीक्षक, भाषाशास्त्रज्ञ अशा सर्वांना आपापल्या मातृभाषेतील साहित्यकृतीची शिफारस करण्याची विनंती करण्यात येते. ज्ञानपीठ पुरस्काराच्या पहिल्या निवडसमितीवर सातपेक्षा कमी व अकरापेक्षा जास्त मान्यवर असू नयेत असे धोरण ठरविण्यात आलेले आहे. ज्ञानपीठ पुरस्कारासाठी नावाची छाननी करण्यासाठी प्रत्येक भाषेची तीन सदस्यांची एक समिती असते. तिला एल.ए.सी. म्हणजेच लोकल अॅणडव्हायझरी कमिटी म्हणतात. ही समिती आपल्या भाषेतील एका समर्थ साहित्यिकाच्या नावाची एकमुखाने शिफारस ज्ञानपीठ व्यवस्थापनाला करते. नंतर मध्यवर्ती निवड समितीत एकाच साहित्यिकाच्या ग्रंथाची निवड केली जाते.
ज्ञानपीठ पुरस्कारात 'पुरस्कार-पत्र', 'वाग्देवीची प्रतिमा' आणि 'अकरा लाख रुपयांचा धनादेश' यांचा समावेश असतो. ज्ञानपीठ पुरस्कारात दिली जाणारी वाग्देवीची प्रतिमा ही माळवा प्रांतातील धार येथील सरस्वती मंदिरातील एका मूर्तीची प्रतिकृती आहे. या सरस्वती मंदिराची निर्मिती राजा भोज याने १३०५ साली केली होती. वाग्देवीची ही मूर्ती सध्या लंडन येथील ब्रिटिश म्युझियममध्ये आहे. १९७४ साली वि. स. खांडेकर, १९८७ साली वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि २००३ साली विंदा करंदीकर व २०१४ साली ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे या मराठी लेखकांचा ज्ञानपीठ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
आजवर भारतीय भाषांमधीलच साहित्यिकांना ज्ञानपीठ दिले जात होते. तीन वर्षांपूर्वी ज्ञानपीठसाठी भारतीय इंग्रजी साहित्याचाही विचार होऊ लागला आणि या वर्षी ५४ वा ज्ञानपीठ पुरस्कार इंग्रजी कादंबरीकार अमिताव घोष यांना जाहीर झाला आहे.
संजीव_वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
June 5, 2022
राज्यात उसाच्या लागवडक्षत्रात वरचेवर वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन कारखान्यांना गाळपाचे आव्हान पेलावे लागणार आहे. त्याचबरोबर सरकारने लेव्ही रद्द करणे, साखरेच्या निर्यातीसाठी पावले उचलणे आदी प्रयत्नांवर भर द्यायला हवा. शेतकंर्यांनीही प्रगत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन उत्पादनखर्चात बचत करायला हवी. या पार्श्वभूमीवर आपल्याकडील शेतकर्यांनी ब्राझीलमधील शेतीचे तंत्र समजून घ्यायला हवे.
September 25, 2010
चौदाव्या शतकात कॅमेरा आबस्कुरा किंवा कॅमेरा ल्युसिडा हा कॅमेरा लिओनार्दा दा विंची याने वापरला, हे सर्वज्ञातच आहे. पुढे अठराव्या शतकात कॅमेरा आबस्कुराचा उपयोग त्यावेळचे चित्रकार देखावे चित्रित करण्यासाठी करत असत.
August 19, 2021
जेंव्हा मी या शहराचा विचार करतो तेंव्हा, काही गोष्टी लगेच ठळकपणे ध्यानात येतात. पहिला विचार – या शहराचा विस्तार!! मुंबई जेंव्हा डोळ्यासमोर येते तेंव्हा त्याच्या समोर, हे शहर प्रचंड मोठे आणि विस्तारलेले आहे. दुसरे म्हणजे, मुंबईची लोकसंख्या आणि त्यामुळे झालेली परवड. तसा प्रकार या शहरात झालेला नाही.
October 15, 2018
दर महिन्याला किमान दोन ते तीनवेळा चिनी सैन्याने भारतात घुसखोरी करणे ही नेहमीच बाब झाली आहे.प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून चिनी सैनिक अनेकदा लडाखमध्ये भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या भागातच वारंवार घुसखोरी करते आणि त्यावर आपले प्रेमळ सरकार फक्त चर्चा करुन त्यांना परत जाण्यास सांगतात.
February 6, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti