(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सांगावसं वाटलं म्हणून , त्या भाजीविक्रेत्या

    मुख्य बाजारात जाण्याआधी डावीकडे जाणाऱ्या एका रस्त्याने थोडं पुढे आलं की तिथे तीन रस्ते एका ठिकाणी मिळतात . अगदी सकाळी साडेआठ नऊ पासून या जागी त्यांची डेरेदाखल व्हायला सूरवात होते. प्रत्येकीचं अढळपद ठरलेलं असतं. ट्रेनमधून भाजीच्या टोपल्या, बोचकी उतरवून पुढे ऑटोने आपल्या नित्याच्या जागी त्या दाखल होतात आणि आपला भाजीबाजार मांडायला सूरवात करतात. यामध्ये फळभाज्या, पालेभाज्यापासून चिकू , पेरू, जाम (रानफळ) पिवळ्या सालीची केळी, झेंडूची, जास्वंदीची फुलं अशा बऱ्याच गोष्टी असतात.

      June 19, 2022


  • आकुर्डीत वन्यजीवांच्या देहांचे जतन

    भारतीय प्राणी सर्वेक्षण विभागाच्या पश्चिमी प्रादेशिक केंद्रातील पथकाने ताडोबा, भीमाशंकर, मेळघाट या ठिकाणी सर्वेक्षण केले आहे. महिनोनमहिने केलेल्या या सर्वेक्षणात विविध जातींच्या वन्यप्राण्यांचा, कीटकांचा अभ्यास करुन त्यांचे वर्गीकरण केले आहे.

      September 3, 2015


  • चहा घेणार का?

    पुणेकरांवरती विनोद करताना त्यांच्या या प्रश्नाला सगळेच हसून दाद देतात. मात्र बुद्धीवादी पुणेकराचा हा प्रश्र्न एकशे एक टक्के बरोबरच आहे. म्हणजे या प्रश्नातून तो अनेक शक्यतांचं समाधान करुन घेतो.

      January 24, 2023


  • चक्कर येत असल्यास कोणते उपाय करावेत

    मेंदूला होणार्‍या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यास चक्कर येणे, भोवळ येणे अशाप्रकारचा त्रास होतो. चक्कर येण्यामागे इतरही अनेक कारणं असू शकतात. पण अशावेळेस काही उपचार तात्काळ मिळणे गरजेचे आहे.

      August 18, 2019


  • रमेश गणेश देशपांडे

    रमेश गणेश देशपांडे (१९३४-१९९४) यांनी पुणे विद्यापीठातून एमएस्सी केले. लगेच ते मुंबईच्या भाभा अणू संशोधन केंद्रात (BARC) समस्थानिक (Isotope) विभागात रुजू झाले. बीएआरसी तेव्हा नुकतेच सुरू होत होते. आणि अशा प्रकारच्या प्रकल्पात कोणतीही परदेशी तांत्रिक मदत मिळत नसल्याने प्रत्येक शास्त्रज्ञाला अगदी मुलभूत काम करून उपकरणे बनवायला लागत व आपले नेहमीचेही करावे काम लागे.

      October 4, 2023


  • अमेरिकेतील ऋतुचक्र – भाग ८

    माझा जायचा यायचा रस्ता पूर्व पश्चिम असा आहे. डोंगरातून जाणारा रस्ता असल्यामुळे, काही ठिकाणी रस्ता छोट्या छोट्या खिंडींमधून जातो. त्यामुळे खिंडीची एक भिंत उत्तराभिमुख असते तर दुसरी दक्षिणाभिमुख. हे ठिकाण बरेच उत्तरेला असल्यामुळे हिवाळ्यामधे सूर्य नेहमी दक्षिण दिशेलाच दिसत असतो. त्यामुळे बरेचदा सूर्यप्रकाश पडला, की दक्षिणाभिमुख भिंतीवरचे बर्फ वितळून जाते, तर उत्तराभिमुख भिंतीवर सूर्यकिरणे न पडल्यामुळे, तिथले बर्फ तसेच साचलेले रहाते. त्यामुळे रस्त्यावरून जाताना, खिंडीची एक बाजू बर्फाच्छादित तर दुसरी बाजू उन्हात झळकणार्‍या काळ्या कातळांची, असं मोठं मजेशीर दृश्य दिसतं.

    बर्फाची रूपं देखील वेगवेगळी. सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकणारं डोंगरमाथ्यावरचं सोनेरी बर्फ बघितलं, की अमेरिकेत असल्याचा विसर पडतो. हिमालयाशी तुलना करणाचा प्रश्नच नाही, पण कधी काळी भल्या पहाटे उठून बघितलेला हिमालयातला सूर्योदय आठवत रहातो. कैलास पर्वतावर खरोखरच शंकराचं जागृत स्थान असेल की नाही कोणास ठाऊक, पण सकाळच्या किरणांत चमकणारी बर्फाच्छादित शिखरं बघितली की, दैवी सौंदर्याचा साक्षात्कार मात्र होतो - मग ती हिमालयातील असोत की अमेरिकेतली! सकाळच्या कोवळ्या उन्हातली बर्फावरची नारिंगी छटा वेगळी आणि संध्याकाळच्या सरत्या उन्हातली बर्फावरची गुलाबी, किरमिजी छटा वेगळी! लख्ख उजेडातला, उन्हात चमकणारा आणि डोळे दिपवून टाकणारा दिवसाचा बर्फ वेगळा आणि रात्री, चंद्राच्या मंद प्रकाशात, रुपेरी वाळूच्या अथांग किनार्‍यावर उभं असल्याचा भास करणारा बर्फ निराळा !

    हिवाळ्यात ओढे, डबकी, नद्यांची रूपं बदलतात. ओढ्या, नद्यांचं पाणी आपला खळाळता प्रवाह विसरून संथ वहायला लागतं. थंडीच्या वाढत्या कडाक्याबरोबर साचलेल्या तलावांत, रस्त्याकडेच्या डबक्यांतील पाणी थिजून जातं. वहात्या पाण्यात मधे मधे थिजलेल्या पाण्याची बेटं तयार व्हायला लागतात. सस्कुहाना नदीच्या पात्रातून छोटे छोटे हिमनग वहात जाताना दिसतात. तापमान फारच खाली गेलं की नद्या, ओढ्यांची पात्र पूर्णपणे बर्फाच्छादित होऊन जातात. पुढे मग जेंव्हा पाणी पुन्हा वहातं व्हायला लागतं, तेंव्हा पात्राच्या मधला पाण्याचा पट्टा प्रथम वहाता होतो. पाण्यावर साठलेलं बर्फ वहात्या पाण्याच्या प्रवाहामुळे, नदीच्या काठांकडे लोटलं जातं. नदीचं पात्र दोहोकडून अशा बर्फाच्या पांढर्‍या शुभ्र किनारीवाल्या साडी सारखं दिसायला लागतं.

    माझ्या जायच्या यायच्या रस्त्यावर टेकड्यांच्या उतारावर आणि नदीच्या काठाकाठाने अस एक मोठं गॉल्फ कोर्स आहे. हिवाळ्यात ते पूर्णपणे बंद असतं. त्याच्या प्रशस्त उतारावर साचून राहिलेला शुभ्र बर्फ, महिनेन महिने तसाच पडून राहिलेला असतो. ना त्यावर कुणाच्या पाऊलखुणा उमटतात ना कुणी तो इतस्तत: सरकवायचा प्रयत्न करतं. त्या गॉल्फ कोर्सवर अधे मधे लावलेल्या सूचिपर्णी वृक्षांच्या लांबच लांब काळ्या सावल्या तेवढ्या त्या अनाघ्रात बर्फाला साथ देत उभ्या असतात.

    रानावनाला पडलेला बर्फाचा वेढा ३-४ महिने तरी कायम असतो. झाडांच्या मोडून पडलेल्या फांद्या, सुकलेल्या काटक्या, वाळलेली पानं, पिवळं पडलेलं गवत, या सर्वांवर बर्फाने आपली रुपेरी मोहर बसवलेली असते. झाडांच्या फांद्यांवरचं बर्फ अर्धवट वितळून, फांद्यांचा वरचा भाग पांढरा तर खालचा भाग काळसर झालेला असतो. शेतांत, मळ्यांत, सुकलेल्या गवताची आणि मक्याच्या कापलेल्या खुंटांची टोकं बर्फाच्या आवरणाखालून डोकावत असतात. त्यात कधी कधी टर्कीचा थवा किडे वेचताना दिसतो.

    मार्चच्या सुरवातीपासूनच येणार्‍या बदलाची चाहूल लागायला लागते. नद्या ओढ्यांचं पाणी पूर्ववत खळाळतं व्हायला लागतं. अचानक त्या पाण्यात बदकं अवतरतात. हिवाळ्यात कुठे दडून बसलेली असतात कुणास ठाऊक! पण रस्त्याकाठच्या ओढ्यांमधे बदकिणी आणि त्यांची पिल्लं, पाणी वहातं व्हायला लागल्याची जाणीव करून देतात.

    असंच एखाद्या दिवशी आकाशातून दूरवरून ओळखीचा असा गीज (geese) चा आवाज येतो. वर बघावं तर खूप उंचावरून गीज चा थवा आपल्या ठरावीक इंग्रजी ‘V’ अक्षरासारख्या आकारात उडत असतो. स्थलांतर करून हे पक्षी आता आपल्या उत्तरेच्या प्रवासाला लागलेले असतात. पुढचा महिनाभर, दिवसा रात्री, आपल्या आवाजाने लक्ष वेधत आणि निसर्गाचा अचंबित करून टाकणारा एक चमत्कार दाखवत, हे पक्षी ऋतुचक्राचे एक आवर्तन पूर्ण करत असतात.

      August 16, 2015


  • बाजारहाट, मन भरून येणारी सैर

    ही क्रिया मला फार आवडतेच, आणि त्याहूनही ती एकट्याने करायला मनापासून आवडते. पूर्वी मला दादरच्या भाजीबाजारात किंवा फुलबाजारात फिरायला फार आवडायचं. हल्ली तिथे एक एक पाऊल उचलणं कठीण झालंय. असो, तर घरून निघताना हिने मला चार पाच वस्तू आणायला सांगितलेल्या असतात आणि त्यासोबतच सूचना सुध्दा अलवारपणे येत असतात,

      April 14, 2023


  • प्रेमाचा ओव्हरडोस

    मी आज ज्याविषयी लिहीणार आहे ते वात्सल्य किंवा ममता या सदरातील पालकांचे आपल्या मुलांवर असलेले प्रेम या बाबत आहे. जगातील प्रत्त्येक व्यक्ती आपल्या मुलांवर जीव तोडून प्रेम करत असते. पण सध्या आसपास जर पाहिले तर या प्रेमाचा ओव्हरडोस किंवा अतीरेक होतोय का याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे असे वाटते.

      August 12, 2018


  • बाळक्रीडा अभंग क्र.१३

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      August 24, 2018


  • महागाई केवळ शेतमालाचीच का दिसते ?

    प्राध्यापकांचे आजचे वेतन 60 ते 80 हजारांवर गेले आहे. निखळ उत्पादक मूल्याचा विचार केला तर शिक्षक किवा प्राध्यापकांच्या तुलनेत शेतकरी कैकपटीने सरस ठरतो. परंतु मिळकतीच्या संदर्भात मात्र हाच शेतकरी कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत भिकारडा ठरतो. हा अन्याय आहे, असे कुणालाच वाटत नाही. आपल्या पोळीवर तुप ओढून घेताना आपलाच अन्नदाता उपाशी मरत आहे, याचा विचार कुणी करत नाही आणि आज कृषीमालाच्या किमतीत थोडी वाढ झाली तर काय थयथयाट मांडल्या जात आहे.

      July 30, 2010