(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • महात्मा, मुन्नाभाई ते संजू

    महात्मा गांधी आज अनेकांना हवे आहेत, अनेकांना नको आहेत. आऊटडेटेड माणसं व तत्वज्ञान आजच्या परिस्थितीत वापरुन तरुणांना काही संदेश देतांना आजच्या परिस्थितीत relevance, त्याचं दाखवता आलं तरी पुरेसं आहे. महात्मा आज बंदिस्त झाले आहेत. नोटात महात्मा, फोटोत महात्मा, मात्र प्रत्यक्ष जीवनात सगळा खोटाच व्यवहार.

      May 9, 2019


  • धन्य तो पिता

    एक जेमतेम शिकलेला पिता. नांव त्याचं शिवशंकर कोळी. सोलापूर शहरात राहत होते. त्यांना शिवपार्थ नावाचा लहान मुलगा माध्यमिक शाळेत शिकत होता. चुणचुणीत आणि तल्लख बुद्धीचा.खेळाची आवड होती. त्यात तो फुटबॉल खेळण्यात अत्यंत निष्णात. गेल्या काही दिवसापूर्वी शिवपार्थ मैदानात फुटबॉल खेळत होता. रखरखतं ऊन होत. सूर्य आग ओकत होता. खेळता खेळता शिवपार्थ उष्माघाताने कोसळला. उपचारासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी, मेंदूला जबर धक्का बसल्याने त्याचे वाचणे कठीण असल्याचे नातेवाईकांना सांगितले. तरीही शेवटचे प्रयत्न म्हणून सोलापूरचे डॉक्टर त्या लहानश्या जीवाला वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न करीत होते. पण अखेर शिवपार्थला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. खेळायच्या अगोदर ‘ सांग ना आई, मी कसा खेळतो ...!’ विचारले होते. ती धाय मोकलून रडत होती. ममता तडफडत होती. तिचा बाळ रुग्णालयाच्या खाटेवर निजला होता. मोकळं ढाकळ बोलणारा त्यांचा शिवपार्थ त्यांना सोडून गेला होता. त्यामातेची अवस्था कशी झाली असेल. विचार करा. बाप मात्र ती स्थिती बघून हबकला होता. कळवलेले डोळे मूक रडत होते. फक्त चेहर्‍यावर दिसत नव्हते. पण तो बाप त्याचा खोलखोल रुतत चाललेला स्वर दुर्दैवी घटनेचे मनावर प्रहार सहन करीत होता. मुलाच्या सुंदर आठवणींनी मन सैरावैरा धावू लागले होते.

    काय केले रे देवा..! म्हणून समस्त नातेवाईक देखील अश्रू ढाळू लागले होते. रुग्णालय गर्दीने भरले होते. कटू वास्तव्याचे हलाहल पूर्णत: पचविले अन दु;खित अ:तकरणाने बाप जागेवरून उठला आणि रडत असलेल्या बाळाच्या आईला म्हणाला. शिवपार्थच्या आठवणी जपायच्या असतील तर आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. त्याने आपल्या मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय बोलून दाखवला. आईने देखील होकार दर्शविला. डॉक्टरांना निर्णय सांगितला गेला. सोलापूर वैद्यकीय क्षेत्र लगेच कामाला लागले. शिवपार्थचे चार अवयव .... हृदय, यकृत आणि दोन मूत्रपिंड काढण्यात आली. हृदय हे हवाई मार्गाने पुण्याच्या रुबी हॉस्पिटलला पाठविण्यात आले. एक मूत्रपिंड आणि यकृत रुग्णवाहिकेने पुण्याच्या मंगेशकर आणि नोबेल हॉस्पिटलला पाठविण्यात आले. एका मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण सोलापुरात अश्विनी हॉस्पिटलमध्ये एका इंजिनिअरींग शिकत असलेल्या विद्यार्थ्यावर करण्यात आले. जो दोन वर्षापासून दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे डायलिसीस वर जीवन कंठत होता.

    एक जीव गेल्याचे दु:ख नक्कीच पण त्या जीवामुळे चार जीवांना जीवनदान मिळाले ते केवळ शिवपार्थच्या आई वडिलांनी घेतलेल्या क्रांतीकारी निर्णयामुळे. डॉक्टरांची तत्परता दाखविलीच शिवाय अनेक हात या निर्णयासाठी मदतीला पुढे आले. ते पोलीस असो वा समस्त सोलापुरी माणसं. त्यांना सलाम करायला हात उत्सुक आहेत. एक विचारसरणी बदलणारी ही घटना. त्या मायबापावर अकस्मात ओढवलेल्या संकटाने व्यथित होऊनही अन्य चार जणांच्या आयुष्यात आनंद फुलविण्याचा खरा आकार दिला.

    दान ही आपली संस्कृती तर भोग ही प्रकृती. श्रध्देने दिलेले दान किंवा ऐपतीनुसार केलेलं दान. अनेकजण देहाची विटंबना नको म्हणून माघारी परतले असते. असो ... शंभरात एक शूर जन्माला येतो. तर सहस्त्रामध्ये एक ज्ञानी असतो. तर दशसहस्त्रामध्ये एक वक्ता निर्माण होतो. पण शिवपार्थच्या वडिलांसारखा दाता हा क्वचितच लाभतो. दानी म्हटले की, त्या पुरुषाचे हात वर असतात तर याचक याचे हात नेहमीच खाली असतात.

    देशात आजच्या घडीला लाखो हृदयरोगी आहेत. पण हृदयदाते प्रमाण अल्प आहे. तर दीड ते दोन लाख मूत्रपिंडाचे रुग्ण आहेत पण केवळ 5000 शस्त्रक्रिया झाल्याचं निदर्शनास आले आहे. यकृतरोगींचा आकडा 30000 असताना केवळ 1000 यकृत रोग्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे आढळून आले आहे. गरजे इतके दाते आज तरी मिळत नाहीत. याचाच अर्थ ज्याच्यावर शस्त्रक्रिया होत नाहीत ते कसेबसे आयुष्य जगत आहेत. वेळ आली की, जगाचा निरोप घेत आहेत. शिवपार्थच्या बाबांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा मानस नाही. पण त्यांनी दाखविलेले धाडस हे कौतुकास्पद आहे. शिवपार्थच्या देहाचे त्यांनी खरोखर सार्थक केले. त्यासाठी मनापासून त्यांना सलाम करावासा वाटत आहे.

    अशोक भेके

    घोडपदेव समूह

      April 20, 2017


  • विद्वान सर्वत्र पूज्यते

    ‘विद्वान सर्वत्र पूज्यते’ अशी ओळ एका संस्कृत श्लोकात आहे. विद्वानांना सर्व ठिकाणी सन्मान मिळतो असा त्याचा अर्थ. एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास असलेला त्या विषयात विद्वान समजला जातो. विद्वत्ता आणि बुध्दिमत्ता वेगळ्या गोष्टी आहेत. बुध्दिमत्तेला अनेक पैलू असल्याचे लक्षात आले आहे. नुसत्या IQ वरून बुध्दिमत्तेचे मोजमाप होऊ शकत नाही हेही समजले आहे. तसे विद्वत्तेला पैलू आहेत का? विद्वत्ता कशी मोजायची? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. जन्म, शारिरिक व मानसिक वाढ, बालपण, शिक्षण सामान्यपणे झालेली एखादी व्यक्ती एखाद्या विषयात नैपुण्य मिळविते, विद्वान बनते व समाजात प्रसिध्द पावते. पण काही कारणाने मेंदूची नीट वाढ न झालेले व त्यामुळे बालपण, शिक्षण अशा रूढ चाकोरीपासून दूर राहिलेले बालकसुध्दा पुढे एखाद्या क्षेत्रात असामान्यत्व दाखविते. ‘विद्वान’ या शब्दाला Savant असा इंग्रजी शब्द आहे. मानसिक व्यंग असलेले, 70 पेक्षा कमी IQ असलेले पण कुठल्यातरी क्षेत्रात अद्वितीय कौशल्य जे दाखवितात अशा विद्वानांना Savant Syndrome या दुर्मिळ गटातील मानले जाते.

    डॉ. डॅरॉल्ड ट्रेफर्ट हे मानसोपचार तज्ञ या विषयातील संशोधक आहेत. त्यांचे Islands of Genius हे पुस्तक प्रसिध्द आहे.

    Daniel Tammet

    या पुस्तकासाठी उपोद्घात (Foreword) डॅनियल टॅमेट याने लिहिला आहे. टॅमेटची पुढे ओळख होईल. दैनंदिन जीवनात न वापरली जाणारी कौशल्ये (Splinter Skills) या गटातील लोकांमध्ये दिसतात. या प्रकारातील जवळपास निम्मे Autism Spectrum Disorder चे असतात. अशा माणसांमध्ये कुठलेतरी एक वैशिष्ठ्य असते, कोणतीतरी शलाका असते पण ती शोधणे सर्वांच्या बाबतीत शक्य नसते. स्वमग्नतेची (Autism) व्याधी जडलेल्यांपैकी 10 टक्के रुग्ण Savant Syndrome गटात असल्याचे दिसून येते. या लोकांनी ही कला शिकून आत्मसात केलेली नाही हे आपल्याला माहित आहे. मग याचा उगम कसा झाला? हे अजून समजलेले नाही.

    कलाकाराच्या मेंदूतील जोडण्या जन्मजात नसतात, त्या जुळाव्या लागतात. संगीत शिकताना रियाज, चित्र काढताना सराव याशिवाय सर्वसामान्य बुध्दिमत्तेचा माणूस कलाकार होत नाही. रियाज आणि सराव हे मेंदूतील मज्जापेशींच्या जोडण्या घट्ट करण्यास आवश्यक असतात. मग कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय वा रियाजाशिवाय, कोणत्याही अभ्यासाशिवाय वा सरावाशिवाय, Savant Syndrome या गटातील माणसांना ही कला कशी प्राप्त होते? मेंदूविज्ञानापुढील हे प्रश्न आहेत. अशा रुग्णांच्या डाव्या मेंदूला इजा झालेली असते वा त्याची वाढ झालेली नसते. या माणसांची बहुतेक कौशल्ये ही उजव्या मेंदूशी निगडित असतात. संगीत, चित्रकला, बहुभाषिकत्व, कॅलेंडरशी संबंधित तारीख-वाराचे गणित, कालमापन यामध्ये ते पारंगत असतात, पण त्यांना साधे गणित सोडवणे जमत नाही. शास्त्रज्ञ व डॉक्टर संशोधनाद्वारे हे कोडे नक्कीच उकलतील.

    जगप्रसिध्द विद्वान
    आपल्या पाहण्यात मानसिक व्यंग असलेली माणसे असू शकतात. काहींना जन्मजात व्यंग असते तर काहींना नंतरच्या काळात एखाद्या प्रसंगी व्यंग येते. अशांपैकी या काही व्यक्ती जगप्रसिध्द आहेत.

    1) किम पीक (Kim Peek)
    किम पीकच्या मेंदूचा डावा व उजवा हे भाग जोडणारा Corpus Callosum अस्तित्वात नव्हता. त्याला बायबलसह 12,000 ग्रंथ पाठ होते. संगीत, साहित्य, खेळ अशा जवळपास 15 विषयांमधे तो तज्ञ होता. तो डाव्या डोळ्याने पुस्तकाचे डावीकडील पान व उजव्या डोळ्याने उजवीकडील पान वाचून लक्षात ठेऊ शकत असे. (Rain Man या सिनेमातील पात्र ‘ऑटिस्टिक’ दाखविले आहे, पण किम तसा नव्हता)

    2) लेस्ली लेम्के (Leslie Lemke)
    पूर्ण वाढ होण्याआधी जन्म झालेल्या लेस्लीच्या मेंदूला इजा झाली होती. त्याचे डोळे काढावे लागले होते. एकदा सोळा वर्षाच्या लेस्लीने टी.व्ही वर लागलेली पियानोवरील एक धून ऐकली. रात्री झोपेतून उठून त्याने ती वाजवली. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय एकदा ऐकलेले गाणे तो वाजवीत असे. संगीताविषयी रुची असल्याचे तोपर्यंत कोणतेही लक्षण त्याच्यात दिसले नव्हते. पुढे तो जाहीरपणे व टी. व्ही. वर कार्यक्रम करू लागला.

    3) स्टीफन विल्टशायर (Stephen Wiltshire)
    विल्टशायरला Autism Spectrum Disorder ने ग्रासले होते. स्वतःच्या विश्वात रमणारा, बोलू न शकणारा विल्टशायर चित्रांच्या माध्यमातून संवाद साधत असे. त्याला ‘मानवी कॅमेरा’ म्हणून ओळखले जाऊ लागले. एकदा पाहिलेले दृश्य विलक्षण बारकाव्यांसह त्याच्या चित्रात उतरत असे. हेलिकॉप्टरमधून शहराचे दर्शन घेतले की नुसत्या स्मरणातून त्याच्या चित्रात इमारतीच्या मजल्यांसह खिडक्यांची संख्याही जशीच्या तशी दिसे. इ.स. 2005 मधे त्याने काही वेळ हेलिकॉप्टरमधून टोकियो शहर पाहिले व टोकियोचे 10 मीटरचे लँडस्केप अचूकपणे काढले. त्याने रोम, न्यूयॉर्क आणि सिंगापूर या शहरांची चित्रेही काढली आहेत.

    4) डॅनियल टॅमेट (Daniel Tammet)
    डॅनियलला 11 भाषा बोलता येत होत्या. एका आठवड्यात आइसलँडिक (ही खूप अवघड भाषा आहे) भाषा बोलायला शिकण्याची पैज त्याने जिंकली. आइसलँडिक टेलिव्हिजनवर त्याची मुलाखत झाली, अर्थात डॅनियल अस्खलित आइसलँडिकमधे बोलला. तो भाषेतील व आकड्यातील तज्ञ होता. डॅनियलने जेव्हा Pi () ची किंमत 5 तासात 22,514 स्थानांपर्यंत अचूक सांगितली तेव्हा त्याला प्रसिध्दी लाभली. तो संख्या व आकडेमोड ‘पाहू’ शकत असे. पहिले दहा हजार (10,000) अंक आकार, रंग, पोत व स्पर्श यासंकल्पनांद्वारे तो ओळखत असे. या दुर्मिळ क्षमतेला Synesthesia म्हणतात.

    5) एलेन बोद्रो (Ellen Boudreaux)
    एलेन डोळ्यांनी अधू आहे. तिच्या ठायी ‘रडार’ ची क्षमता आहे असे दिसते. ती चालताना पक्षांसारखे काही ध्वनी काढते, वाटेतील वस्तूंवर आदळून परतणार्‍या आवाजाचा अंदाज घेते व न अडखळता चालते. दिवसभरात कोणत्याही वेळी सेकंदापर्यंतची अचूक वेळ आठव्या वर्षापासून ती सांगू लागली. एकदा ऐकलेले गाणे ती जसेच्या तसे वाजवते.
    वरीलपैकी काही जण आज हयात नाहीत.

    पुढील व्यक्ती जगप्रसिध्द नाहीत, पण विद्वान आहेत.

    1. एक मुलगा सात-आठ आकडी संख्या काही क्षणात 24 वेळा दुप्पट करू शकतो.
    2. एक मुलगी 20 फुटापर्यंत अंतरावरील वस्तूच्या आकाराचे मोजमाप अचूकपणे सांगू शकते.
    3. एकाला अनेक भाषा बोलता येतात पण त्या वाक्यांचा अर्थ त्याला समजत नाही.

    अशा कलाकारांना, कसबी व्यक्तींना समाजात इतर लोकांप्रमाणे मान-सन्मान मिळाला तर अनेक कुटुंबे मुख्य समाजाच्या प्रवाहात येतील व त्यांना स्थैर्य लाभेल. या मुलांची आपापल्या विषयातील क्षमता लक्षणीय आहे. पण यांचा IQ 50 हून अधीक नाही व यांना बुटाची नाडीही बांधता येत नाही. मानसिक वाढ नीट न झालेले हे रुग्ण आहेत. मी मात्र यांना ‘विशेष देणगी’ प्राप्त झालेले विद्वान समजतो.

      April 17, 2021


  • श्रीलंका येथील योगायोग विंदा श्रीगणेश

    श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथून १५० मैलावर असणार्‍या काटरगाव सुब्रमण्यम मंदिरात श्री गणेशचे दर्शन घडते. या मंदिरात श्री गणेशाचे स्वतंत्र स्थान असून गजाननाचे पूजन अर्चन वैदिक पद्धतीने केले जाते.

      April 9, 2012


  • मैत्रीची परिभाषा

    तसे पाहिले तर आपण जन्माला एकटे येतो आणि जाणार पण एकटेच असतो. त्यामुळे मैत्री अमर असते, जीवास जीव देणारी असते ह्या सर्व बोलायच्या गोष्टी असतात. कोणाचेच आयुष्य कोणावाचून थांबत नसते. हेच सर्व प्रकारच्या संबंधांना लागू आहे. त्यात कौटुंबिक, सामाजिक, व्यावहारिक आणि व्यावसायिक संबंधातही असे कप्पे करून जगल्यास आयुष्य सुखकर होते.

      September 30, 2019


  • श्रीहरी स्तुति – ७

    भगवंताला ज्या विविध मार्गानी शास्त्रात निर्देशित केल्या जाते त्या विविध उपाधींचे निरूपण प्रस्तुत श्लोकात आचार्य करीत आहेत. ते म्हणतात…

      October 25, 2020


  • श्रीगजानन ज्ञान-विज्ञान

    आपल्या देवांच्या बाबतीत असं दिसतं की त्यांच्या शरीरातला शिराचा (डोक्याचा) भागच वेगवेगळ्या देवांमध्ये वेगवेगळा असतो. उदा. हत्तीचं तोंड असेल तर गणपती, वानराचं तोंड असेल तर मारुती, सिंहाचं तोंड असेल तर नृसिंह, घोड्याचं तोंड असेल तर तुंबरू इ. तर देवांच्या या स्वरूपांमध्ये एक सांकेतिक संदेश आहे आणि तो आपल्या मंत्राशी निगडित आहे.

      September 16, 2023


  • श्री श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ४

    भगवंताच्या प्रत्येक आयुधाला एक स्वतंत्र आणि सुंदर नाव आहे. पहिल्या श्लोकात पांचजन्य नावाच्या शंखाचे, दुसऱ्या श्लोकात सुदर्शन नावाच्या चक्राचे, तिसऱ्या श्लोकात शार्ङ् नावाच्या धनुष्याचे वर्णन केल्यानंतर इथे भगवंताच्या नंदक नावाच्या खड्ग म्हणजे तलवारीचे वर्णन करीत आहेत. त्याचे गुण वैभव सांगताना आचार्य श्री म्हणतात,

      December 7, 2020


  • हवामान बदलाचे गहिरे संकट!

    दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीला अवकळा आली आहे. त्यामुळे बदलत्या पर्जन्यमानाचे स्वरूप लक्षात घेऊन शेती पद्धतीतही बदल करण्याची गरज आहे? नैसर्गिक बदलाचे संकेत समजावून घेऊन त्यावर वेळीच उपाय योजल्या गेले नाहीत तर परिणाम अजून दाहक होण्याची भीती आहे. 

      October 8, 2018


  • कृत्रिम बुद्धिमत्ता: काल, आज आणि उद्या

    १९५० साली मांडलेली कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना आज प्रत्यक्षात आलेली दिसते. आपल्या हातातल्या भ्रमणध्वनीपासून ते मंगळावर जाणाऱ्या यानांपर्यंत आणि खेळ खेळणाऱ्या संगणकांपासून ते विनाचालक वाहनांपर्यंत आज सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता आपली अनिवार्यता पटवून देत आहे. विश्व व्यापून दशांगुळे उरणाऱ्या या कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास, प्रवास आणि भविष्याचा आढावा घेणारा हा लेख…

      January 26, 2024