वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी धोकादायक ई-कचऱ्याची निर्मिती महाराष्ट्रात सर्वाधिक होते. दर वर्षी राज्यात सुमारे ५० हजार टना हून अधिक ई-कचरा तयार होतो.
October 14, 2021
तोंडात हात जाण्यापूर्वी काय करावे, काय विचार करावा, कसा विचार करावा आणि का करावा, याचे थोडे चिंतन व्हावे.
या संदर्भातील अशीच आणखी एक छान रचना (कवि अज्ञात)
वदनी कवळ घेता
नाम घ्या मातृभूचे l
सहज स्मरण होते
आपुल्या बांधवांचे l
कृषिवल कृषिकर्मी
राबती दिनरात l
श्रमिक श्रम करोनी
वस्तु त्या निर्मितात l
करुनी स्मरण तयांचे
अन्न सेवा खुशाल l
उदरभरण आहे
चित्त होण्या विशाल ll
किती अर्थपूर्ण आणि व्यावहारीक आहे ना.
आपण अनेक वेळा अनेक श्लोक, आरत्या, स्तोत्र नुसते पोपट होऊन म्हणत असतो. त्यात नेमकं काय सांगितलंय, कोणासाठी सांगितलंय, काऽऽही लक्षातच घेत नाही.
भोजन करताना शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक विचारांबरोबर सामाजिक विचारही तेवढाच महत्वाचा आहे. जी स्पंदने ईश्वरापर्यंत पोचतात, तीच स्पंदने शेतकरीवर्गापर्यंत पण पोचतात.
आपण आहारातून घेत असलेल्या प्रत्येक कणामागे, ती जमिन नांगरणारा, तो कण पेरणारा, जमिनीला पाणी पुरवठा करणारा, उन्हात घाम गाळून त्याचे रक्षण करणारा, त्यांच्या वाढीमधे अडथळा निर्माण करणार्या तणाला दूर करणारा, त्याची योग्य वेळी कापणी करणारा, कचरा पाखड दूर करणारा, ते धान्य पोत्यात भरणारा, ते ओझे पाठीवरून वाहून नेणारा, चारचाकीने एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहाणारा, दुकानामधे साठवून ठेवणारा, विक्री करणारा, आपल्या घरापर्यंत आणणारा, इ.इ. असंख्य लोकांचा सहभाग असतो. या सगळ्यांचे श्रम यामागे कारणीभूत असतात, तेव्हा तो दाणा आपल्या ताटात नंतर पोटात जात असतो. याचे भान प्रत्येक कणाला स्पर्श करताना व्हायला हवे.
एवढेच नव्हे तर ते अन्न आपणाला ज्या माऊलीने शिजवून, सुपाच्य होईल, असे बनवून सुग्रास वाढले आहे, तिच्याबद्दल आदर कधी व्यक्त करतो का ? ( मीठ कमी पडले असेल, किंवा जरा तिखट कमी जास्त झाले की फक्त तिच्या नावाचा अगदी गजर सुरू होतो.)
या सर्व लोकांचे ज्ञात अज्ञात चेहेरे डोळ्यासमोर आणले की मग अन्नाची नासाडी केली जाणार नाही, ताटात वाया दवडले जाणार नाही. त्याची किंमत कळेल.
विशेषतः पुढील पिढीला अन्नाची किंमत कळायला हवी. ज्या पिढीसमोर पाश्चात्यांचाच आदर आहे, त्यांना अन्न निर्मितीची साखळी प्रत्येक घासाला आठवली पाहिजे. तिचे विस्मरण कदापि होता नये.
अन्नाची नासाडी करणे, केक, पिझ्झा एकमेकांवर फेकणे, हा फेकाफेकीचा संस्कार भारतीय नाही.
ओषधिभ्यो अन्नम्
अन्नात् पुरूषः
अन्नात् भूतानि जायन्ते
जातानि अन्नेन वर्धते
अन्नं भूतानां श्रेष्ठं
अन्नम् न निंद्यात
अन्नं ब्रह्म इति व्यजानात्
तैत्तिरीय उपनिषदामधे अन्नाचे आलेले हे वर्णन अन्नाचे सर्व महात्म्य सांगून जाते.
आहार हेच औषधस्वरूप आहे.
मनुष्यजन्मासाठी अन्नाच्या आधारेच आत्मा शरीरात प्रवेश करतो,
अन्य जीवांची उत्पत्तीदेखील अन्नामुळे होते.
समस्त जीवांचे पोषण अन्नानेच होत असते.
म्हणून सर्व सजीवात अन्न श्रेष्ठ आहे.
केवळ श्रेष्ठ नाही तर ते उत्पत्ती स्थिती आणि लय यांचे कारण आहे.अन्नच ब्रह्म आहे. त्याची कधीही निंदा करू नका.
अन्नाचा आदर ठेवा, अन्नाचा कणही वाया घालवू नका. म्हणूनच
गोपाळकाला झाल्यानंतर, काला खाल्ल्यावर हाताला लागलेले आपले उष्टे अन्नकण ( आणि त्यातून मिळणारे पुण्य, चोरून सुद्धा इंद्रादि देवांना मिळू नये म्हणून ) हात धुताना ते कण सुद्धा पाण्यात जाऊ नये. इतके हात चाटून पुसून स्वच्छ करा. असे सांगण्याचा प्रघात आहे.
किमान अन्नाची निंदा करू नका. पुढच्या वर्षी पर्यंत एवढी बुद्धी तरी दे, एवढे मागणे त्या बुद्धीदात्याकडे करायला हरकत नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
06.09.2016
September 6, 2016
हृदयाशी संवाद साधणे म्हणजे नेमके काय? हृदयाशी संवाद साधणे म्हणजे दोन गोष्टी तपासणे. एक तर तांत्रिकदृष्ट्या आपले हृदय आणि त्याचे कार्य उत्तम स्थिती मध्ये आहे का हे तपासणे. आणि दुसरे म्हणजे भावनिक तसेच मानसिक दृष्ट्या दैनंदिन जीवनातील घडामोडींना सामोरे जाताना त्या घडामोडींचा आपल्या मनावर म्हणजेच नकळत आपल्या हृदयावर आपण कितपत परिणाम करून घेतोत?
October 19, 2020
राजकारण तुम्हाला आश्चर्यचकित करतं. राजकारण तुम्हाला धक्काही देतं आणि राजकारणात काहीही घडू शकतं..’ असं राजकारणाचं वर्णन नेहमी केल्या जातं. त्यातील सत्यता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळतेय. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून पंधरवडा उलटला तरी अद्याप राज्यातील सत्ताकोंडी फुटलेली नाही.
November 11, 2019
'अरे आमच्या घरी काय कमी आहे . . सांगच तू मला . . काजू बदामाचे डबे भरलेले आहेत . . रोज सलाड , ज्यूस आमच्यात असतातच , फूड च्या बाबतीत कुठंच 'कॉम्प्रमाइज ' करत नाही आम्ही . . . तरी आमच्या अंगी का लागत नाही ?? ''
वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना वरील संवाद नवा नाही . अंगी लागत नाही ही समस्या सर्वत्र आहे . . अनेक रिपोर्ट्स नॉर्मल असतात पण खाल्लेले अंगी मात्र लागत नाही . आता हे अंगी लागणे म्हणजे काय ?? तुम्ही बॅंकेत 1000 रुपये भरले की काही वेळाने तुम्हाला ते 1000 रुपये खात्यात दिसतात . . आपण काय म्हणतो ? पैसे खात्यात जमा झाले . . हाच नियम शरीराला लावा . . तुम्ही खाल्लेले अन्न त्याचे व्यवस्थित पचन झाल्यानंतर तुमच्या शरीरावर दिसते . . लोक सुदृढ दिसतात . . 'खात्या पित्या घरातला/घरातली दिसत आहे '' हे याच प्रकारातले . . पण खाल्लेले अंगावर दिसतच नसेल तर ?? भरपूर ड्राय फ्रुट्स , ज्यूस , सलाड , कॉर्न फ्लेक्स ह्याव त्याव खाऊन पण गाडी पाप्याचं पितर असेल तर काय करावे ??
ब्लड टेस्ट्स ? सप्लिमेंट्स ?? चीज ? अरे हो . . . थांब जरा !!
शंकराचार्य म्हणतात '' जितं जगत्केन ? मनोहि येन । '' ज्याने आपले मन जिंकले त्याने जग जिंकले . . आपली परिस्थिती उलटी आहे . . आपण जग जिंकतो पण मनाचे काय ?? ते सैराट असते . . . त्यात ना शांतता , ना समाधान , ना स्थैर्य . . . जगभरातील तत्ववेत्त्यांचे विचार डोक्यात असतात पण आचरणात शून्य . . अशा मनस्थितीत जेवण केले तर अंगी कसे लागेल भाऊ ?? आमचे आचार्य चरक म्हणतात -
''प्रसन्न चेतसा भुञ्जीत । '' म्हणजे प्रसन्न मनाने जेवावे . . .
असं होतं का ?? नाही होत . . . . जगाच्या चिंता डोक्यात घेऊन , प्रगती करणाऱ्याला चार शिव्या हासडत , घरातील कलहात डोकं आपटत केलेले जेवण कधीच अंगी लागत नाही . त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी आहारात काय ठेवू ?? हा प्रश्न मला विचारला तर मी सांगेन '' आधी प्रसन्न मन ठेव . . . मग बाकीचे बघू ''
वैयक्तिक अनुभवावरून सांगतो , जेवण करत असताना टीव्ही बंद करून , शास्त्रीय -नाट्य संगीत ते शक्य नसेल तर नामस्मरण इत्यादी केल्याने जेवण केल्याची तृप्ती येते . . ज्या दिवशी हे नाही जमत त्या दिवशी जेवण सुद्धा ' जॉब डन ' या वर्गात टिक मार्क केल्या सारखे होते . . . तुमचा काय अनुभव ??
वैद्य अंकुर रविकांत देशपांडे
9175338585
आयुर्वेद कोश (https://web.facebook.com/aarogyakosh/ )
(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)
-- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन
May 16, 2017
कदंबवनवासिनीं कनकवल्लकीधारिणीं,
महार्हमणिहारिणीं मुखसमुल्लसद्वारुणींम् |
दया विभव कारिणी विशदरोचनाचारिणी,
त्रिलोचन कुटुम्बिनी त्रिपुर सुंदरी माश्रये ॥२||
परांबा त्रिपुरसुंदरीच्या अलौकिक वैभवाला विशद करताना आचार्यश्री म्हणतात,
कदंबवनवासिनीं- कदंब वृक्षाला स्वर्गीय वृक्ष, कल्पवृक्ष असे म्हणतात. अशा वृक्षांच्या वनामध्ये निवास करणारी.
कल्पवृक्षाच्या वनातच निवास केल्यावर कोणतीही इच्छा क्षणात पूर्ण होणार. मग उरलेल्या वेळेचे करायचे काय? तर शास्त्र सांगते साहित्य संगीत आणि कलेमध्ये समय सत्कारणी लावावा. त्यानुसार, कनकवल्लकीधारिणीं- कनक अर्थात सोन्याची. वल्लकी अर्थात वीणा धारण करणारी.
महार्हमणिहारिणीं- महार्ह अर्थात अत्यंत सुयोग्य. मणि म्हणजे रत्न. हारिणी अर्थात अशा रत्नांच्या माळा धारण करणारी. मुखसमुल्लसद्वारुणींम् - मुखामध्ये आनंदाने वारुणी धारण करणारी. वारूणी शब्दाचा आपल्याला केवळ एकच अर्थ माहिती असतो.
वारुणी शब्दाचा दुसरा अर्थ आहे मध मिश्रित पाणी.
योगशास्त्रानुसार ब्रह्मरंघ्रामधून पाझरत असणाऱ्या अमृताला वारुणी असे म्हणतात. त्या दिव्यरसाने आत्मानंदात निमग्न.
दया विभव कारिणी- शरणागत भक्तांवर दया करणारी आणि त्यांना वैभव प्रदान करणारी.
विशदरोचनाचारिणी- विशद म्हणजे मोठ्या प्रमाणात, विशाल आकारात, रोचना म्हणजे कुंकुम धारण करणारी. भव्य तिलक धारिणी.
त्रिलोचन कुटुम्बिनी- भगवान शंकरांची पत्नी .
त्रिपुर सुंदरीमाश्रये- आई त्रिपुरसुंदरीला मी शरण जातो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 3, 2020
जे जे स्कूल ऑफ आर्टस मध्ये असताना मला 1984 ला अंतरराज्य फोटोग्राफी स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले. दिल्ली येथे माझी फोटोग्राफी प्रदर्शनासाठी महाराष्ट्र राज्याने खास निवड केली. दिवस होता 28 ऑक्टोबर 1984 प्रदर्शनाचा विषय होता प्रौढ शिक्षा. या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी आल्या होत्या त्या वेळेच्या माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी. त्यावेळी प्रत्येक राज्यातून आलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरव केला गेला. त्यात माझा समावेश होता
June 16, 2026
महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले माहूरगड हे ठिकाण नांदेड जिल्ह्यात आहे. प्राचीन काळी माहूरचे जंगल ‘ अमलीवन ‘ म्हणून प्रसिद्ध होते .माहूर हे प्राचीन किल्ल्याचे ठिकाण, रेणुकामाता, दत्तात्रेय, अनसूयामाता या तीन डोंगरावरील मंदिरांना सामावणारा माहूरचा हा डोंगरकिल्ला गौंड या आदिवासी राज्याचा एकेकाळी सत्तेचे केंद होता. या परिसराला सुमारे ६ मैल तटबंदी आहे, किल्ल्यावर हत्तीदरवाजा, ब्रह्माकुंड, कारंजी, हौद यांचे अवशेष त्याचे गत वैभवाची साक्ष देत उभे आहेत, १४२७ मध्ये आदिवासी गोंडराजाचा पराभव करून अहमदशहाने माहूरगड जिंकून घेतला . तेव्हा येथील मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली, पुढे किल्लेदार जयसिंग ठाकूर याने रेणुकादेवीचा सभामंडप बांधला .
या सभामंडपवजा मंदिरात प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे पुढे देवीची बैठक असुन देवीच्या बैठकीवर सिंहासन कोरलेले आहे या बैठकीवर ५ फूट उंच व ४ फूट रुंद असा रेणुकादेवीचा तांदळा आहे.
या ठिकाणा विषयी अनेक कथा प्रचलित आहेत.
भागीरथीच्या तीरावार कान्यकुब्ज नावाची नगरी होती. त्या नगरीत इश्वाकू राज्याचा पुत्र रेणू राजा राज्य करीत होता रेणू राजाने कन्याप्राप्तीसाठी. शंकर-पार्वतीला प्रसन्न करून कन्याप्राप्तीसाठी यज्ञ केला. त्या यज्ञकुंडातून रेणुका प्रगटली. यथावकाश भागीरथीच्या तीरावर रेणुकेचे स्वयंवर झाले व ती तपस्वी जमदग्नीची रेणुका भार्या झाली. ते भागीरथी तीरावरील महोदय या नगरीत राहू लागले. त्यांचे सोबत स्वयंवरात इंद्राने दिलेली कामधेनू हि होती, रेणुकेला वसू, विश्वासू, बृहद्भानू, बृहत्कन्न आणि परशुराम ही मुले झाली.
रेणुका एकदा नदीवर गेली असता स्त्रियांसह मदनाचे रूप धारण करणाऱ्या गंधर्वाला पाहून तीचे मनात कामूक भाव येतात ही गोष्ट जमदग्नीला कळते तेव्हा ते क्रोधीत होतात व रेणुकेला मृत्युदंडाची शिक्षा देतात व पुत्रांना तिची हत्या करण्यास सांगतात. एकामागून एक चारही पुत्रांनी रेणुकेचा वध करण्याची पित्याची आज्ञा नाकारताच जमदग्नी त्यांना शाप देऊन ठार करतात.
पाचवा पुत्र परशुरामास आज्ञा करतात,पितृ आज्ञा म्हणून परशुराम तत्काळ आपल्या परशुने रेणुकामातेचे शीर धडावेगळे करतो. जमदग्नी प्रसन्न होतात. पितृवचनाचे पालन केल्यामुळे परशुरामास वर मागण्यास सांगतात. मातृभक्त परशुराम आपल्या मातेला व भावंडांना पुन्हा जिवंत करण्याची विनंती करतात. त्यांना क्रोधाचा पश्चाताप होतो व ते रेणुका व पुत्रांस पुन्हा जिवंत करतात. व आपला क्रोध त्यागतात. पुढे राजा सहस्त्रार्जुन जमदग्नी आश्रमात येतो. त्याला तेथे असणार्या कामधेनू व तिच्या चमत्काराबद्दल कळते. तो जमदग्नीकडे कामधेनूची मागणी करतो; .पण जमदग्नी कामधेनू देण्यास असमर्थता दर्शवितात. तेव्हा राजा आश्रमावर हल्ला करतो. सर्वांची हत्या करून रेणुकेला जखमी करून कामधेनूला घेऊन जातो नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला. घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली . पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पाथिर्व व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले . रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर पोहचला . तिथे असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले .या पाण्याने स्नान घालून व तेथेच दत्तात्रेयांचे पौरोहित्या खाली परशुरामाने जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. त्यानंतर परशुरामाला रेणुकेची खूप आठवण येऊ लागली . तो शोक करत होता , तोच आकाशवाणी झाली . ‘ तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल .फक्त तू मागे पाहू नकोस .’ परंतु त्याने मागे वळून बघितले . त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते . तेवढेच परशुरामाला दिसले. त्या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते . परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ठिकाणाला मातापूर नाव मिळाले पुढे त्याचे माहूर झाले.
या परिसरात महाकाली आणि महालक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. खालील बाजूस परशुराम मंदिर, गणपती मंदिर, पांडवतीर्थ , औदुबर झरा, अमृतकुंड, बोधतीर्थ, मातृतीर्थ, रामतीर्थ , ऋणमोचनतीर्थ ही स्थळे आहेत.
-- निखिल आघाडे
October 7, 2016
हिताकारणे बोलणे सत्य आहे | हिताकारणे सर्व शोधूनि पाहे |
हिताकारणे ब्ंाड पाखांड वारी | तुटे वाद संवाद तो हीतकारी ||111||
जनी सांगता ऐकता जन्म गेला | परी वादवेवाद तैसाचि ठेला |
उठे संशयो वाद हा दंभधारी | तुटे वाद संवाद तो हीतकारी ||112||
जनी हीत पंडीत सांडीत गेले | अहंतागुणे ब्रहमराक्षस जाले |
तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे | मना सर्व जाणीव सांडूनि राहे ||113||
फुकाचे मुखी बोलता काय वेचे | दिसेंदीस अभ्यंतरी गर्व सांचे |
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे | विचारे तुझा तूंचि शोधून पाहे ||114||
तुटे वाद संवाद तेथे करावा | विवेके अहंभाव हा पालटावा |
जनी बोलण्यासारिखे आचरावे | क्रियापालटे भक्तीपंथेचि जावे ||115||
बहू श्रापिता कष्टला अंबऋषी | तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी |
दिला क्षीरसिंधू तया ddऊपमानी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||116||
धुरू लेकरू बापुडे दैन्यवाणे | कृपा भाकिता दीधली भेटि जेणे |
चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||117||
गजेंदू महासंकटी वाट पाहे | तयाकारणे श्रीहरी धांवताहे |
उडी घातली जाहला जीवदानी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||118||
अजामेळ पापी तया अंत आला | कृपाळूपणे तो जनी मुक्त केला |
अनाथासि आधार हा चक्रपाणी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||119||
विधीकारणे जाहला मत्स्य वेगी | धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी |
जना रक्षणाकारणे नीच योनी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||120||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
January 12, 2016
सिद्धीचा अर्थ आहे भव्यदिव्य अश्या अलौकिक शक्त्या आणि दात्री म्हणजे दाता, प्रदान करणारी… भव्यदिव्य शक्त्या प्रदान करणारी ही देवी सिद्धिदात्री माता…. सिद्धिदात्री माता म्हणजेच साक्षात आदिमाया…
November 8, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti