(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईचा वर्धापन दिन

    आय आय टी पवई ही संस्था तंत्रज्ञान शिक्षण आणि संशोधन ह्या बाबतीत जगामध्ये पथदर्शी म्हणून ओळखली जाते. येथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या अत्यंत प्रतिभाशाली पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांमुळे ह्या संस्थेकडे देशातील उत्तम विध्यार्थी आकर्षित होतात. संस्थेतील संशोधन व क्रमिक अभ्यासक्रम हा दर्जेदार प्राध्यापकांकडून केला जातो. ह्या पैकी बरेच प्राध्यापक हे जागतिक स्तरावर नावाजलेले आहेत.

      March 10, 2022


  • किचन क्लिनीक – ताकाचे सामान्य व विशेष गुण

    सर्व साधारणपणे ताक हे चवीला गोड,तुरट,आंबट,पचायलाहल्के,
    कफवातनाशक ,शरीर बल वाढविणारे,संडास घट्ट करणारे,भुक वाढविणारे व हृदयाला हितकर आहे.

    पण प्रत्येक पशूच्या दुधापासून बनविलेल्या ताकाचे गुणधर्म हे वेगळे असतात त्यामुळे काही जनावरांच्या दुधापासून तयार केलेल्या ताकाचे गुणधर्म आता आपण पाहूया:

    १)गाईचे ताक:

    भुक वाढविणारे,बुद्धिवर्धक,मुळव्याधीत गुणकारी,त्रिदोषनाशक आहे.

    २)म्हशीचे ताक:

    दाट,कफकर,सूज उत्पन्न करणारे किंवा असल्यास वाढविते,पचायला जड आहे.

    ३)शेळीचे ताक:

    अतिशयस्निग्ध,पचायलाहल्के,त्रिदोषनाशक,
    मुळव्याध,पांडुरोग,सुज कमी करणे ह्यात उपयुक्त.

    आता ताक कोणत्या दोषामध्ये कोणत्या अनुपाना सोबत घ्यावे ते पाहू:

    १)वातविकारात:

    आंबट ताक सैंधव घालून प्यावे.

    २)पित्तविकारात:

    गोड ताक साखर घालून प्यावे.

    ३)कफविकारात:

    लोणी काढलेले ताक सुंठ मिरी घालून प्यावे.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

      February 14, 2017


  • चंदेरी किस्से

    चंदेरी दुनियेत नेहमीच धमाल किस्से घडत असतात.. कधी ते हिरो हिरोईनचे तर कधी तंत्रज्ञांचे असतात. माझे परममित्र, ज्येष्ठ कलादिग्दर्शक सुबोध गुरुजी यांनी गप्पांच्या ओघात सांगितलेले काही किस्से मी इथे सादर करीत आहे..

      February 15, 2024


  • ग्रीसच्या संरक्षणमंत्र्यांची उद्विग्नता आणि अपरिपक्वता !

    दिनांक ११ मार्च, २०१५ दै.प्रत्यक्षच्या ‘आंतराष्ट्रीय’ बातम्यात सर्व जगाला हादरवून टाकणारी आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी “अर्थसहाय्य नाकारले तर युरोपात दहशतवादी घूसवू” हि ग्रीसच्या संरक्षणमंत्र्याच्या धमकीची बातमी वाचण्यात आली.

      March 18, 2015


  • नॅशनल पोटॅटो चिप्स डे

    दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने या बटाटा चिप्सवर ‘अनावश्यक खाद्यपदार्थ’ (non essential food) म्हणून बंदी घातली होती. अर्थात या चिप्सच्या उत्पादकांनी ही बंदी मोडून काढली. म्हणून १४ मार्च हा अमेरिकेत नॅशनल पोटॅटो चिप्स डे म्हणून साजरा केला जातो. बटाटा चिप्स हा अमेरिकन मंडळींचा नंबर वन स्नॅक्स आहे. भारतातली परिस्थिती काही वेगळी नाही.

    उपवासाचे दिवस आणि काही पदार्थ यांचं समीकरण पक्कं आहे. एक काळ उपवासानिमित्त खास घरी रांधल्या जाणाऱ्या पदार्थाचा होता. त्यानंतर रेडीमेड पदार्थाची मागणी वाढली. या पदार्थात सर्वात जास्त डिमांडमध्ये असणारा पदार्थ म्हणजे बटाटा वेफर्स. उपवासच कशाला, साखरपुडा, पूजा, वाढदिवस, बारसं, छोटी मोठी पार्टी या सर्व ठिकाणी संचारी असलेले बटाटा वेफर्स त्यांच्या सहजपणामुळे आवडीचे असले तरी फारसे गंभीरपणे पाहिले जात नाहीत. मुळात हा पदार्थ गंभीरपणे पाहण्याचा नाहीच. क्षणांचा चस्का किंवा तात्पुरतं खाऊ-पिऊ या वर्गातले वेफर्स बाजारपेठेत मोठी उलाढाल घडवतात.
    आज बटाटय़ाशिवाय भारतीय स्वयंपाकघराची कल्पनाच होऊ शकत नाही. पण बटाटा हे कंद आपणा भारतीयांसाठी खूप अलीकडचं आहे. पोर्तुगिजांनी ते स्पॅनिश दर्यावर्दींकडून स्वीकारलं आणि पोर्तुगिजांमार्फत पश्चिम किनाऱ्यावर बटाटा रुजला. त्यानंतर तो भारतभर पसरला. बटाटा हे पोटॅटोचं पोर्तुगीज नाव आपण स्वीकारलं हे मान्य करता येतं पण ब्रिटिशांमार्फत बाकीच्या भारतात पसरताना तो आलू का झाला हे कळत नाही. तर असा हा बटाटा म्हटला तर, खूप अलीकडचा. पण कंद म्हणून त्याने रताळ्याला मागे टाकत उपवासाच्या पदार्थात बाजी मारली.

    बटाटा युरोपात नेहमीच लोकप्रिय राहिलेला आहे. १८१७ मध्ये इंग्लंडमधील विल्यम किचनर्सने त्याच्या द कुक ओरॅकल या पाककृती पुस्तकात एक पाककृती छापली. ज्यात बटाटय़ाचे अगदी पातळ काप करून ते तळण्याविषयी लिहिले आहे. त्या अर्थाने बटाटा वेफर्सचा उद्गाता विल्यम किचनर्स ठरावा. मात्र हे नाव फारसे प्रचलित नाही. युरोपीय देशात बटाटा चिप्सच्या शोधाची कृती अनेकजणांनी जॉर्ज क्रम या प्रसिद्ध शेफशी जोडली आहे. या पाककृतीला तितकीच खमंग एका आख्यायिकेची फोडणी आहे. या जॉर्ज क्रमचं न्यूयॉर्क मधल्या Saratoga Spring नामक शहरात मून लेक हाउस नावाचं रेस्टॉरंट होतं. २४ ऑगस्ट १८५३ रोजी एका गिऱ्हाईकाने फ्राइड पोटॅटोची मागणी केली. जॉर्जने त्याला ते सव्‍‌र्ह केले मात्र गिऱ्हाईकाने त्या बटाटय़ाच्या जाड-जाड कापांबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रख्यात शेफ असणाऱ्या जॉर्जला कदाचित हा अपमान वाटला. त्याने खोचकपणे अतिपातळ काप करून ते खूपच जास्त तळले जेणेकरून ते कडक होतील आणि त्यावर मीठ भुरभुरवले. हेतू होता की त्या ग्राहकाला डिवचता यावे, घे लेका! किती पातळ काप हवेत ते खा ! पण परिणाम उलट झाला. ग्राहक खूश झाला. त्याला ते काप तुफान आवडले आणि अशा प्रकारे बटाटा चिप्सच्या पर्वाला सुरुवात झाली.
    या दोन्ही जन्मकथांकडे नीट नजर टाकता, क्रमच्या बाबतीत घडलेली गोष्ट अतिरंजित वाटू शकते. याचं पहिलं कारण एखाद्या ग्राहकाला धडा शिकवण्यासाठी कोणताही शेफ चुकीच्या अर्थाने पदार्थ खराब करण्याचा प्रयत्न करणार नाही. हा किस्सा नक्की घडला असावा मात्र ग्राहकाला धडा शिकवणे वगैरे खमंगपणाच्या मिषाने जोडले गेले असावे. आता प्रश्न उरतो, मग या किचनर साहेबांच्या पाककृतीचे काय? यावर असं म्हणता येईल की शेफ खूप सारे प्रयोग करत करत एखादा पदार्थ अजमावून पाहतो. पाककृतींच्या पुस्तकातसुद्धा पाहा चित्रविचित्र नावांच्या हजार पाककृती असतात. पण त्या सगळ्याच लोकप्रिय होतात का? शेफ किचनरने पाककृती दिली आणि शेफ क्रमने ती लोकप्रिय केली असा सुवर्णमध्य काढता येईल.

    आपण बटाटा वेफर्स म्हणतो. अमेरिकन मंडळी पोटॅटो चिप्स म्हणतात. तर ब्रिटिशांनी पोटॅटो क्रिस्प हे नाव स्वीकारलं आहे. एक गोष्ट आणखी नमूद करण्यासारखी आहे- ती वॅक्स पेपरच्या वापराची. बटाटा वेफर्सचा प्रचार तर जोरात होत होता, मात्र हवेच्या संपर्कात आल्यावर ते पटकन नरम पडतात हे लक्षात घेऊन लॉरा स्कडर या कॅलिफोर्नियास्थित उद्योजिकेने वॅक्स पेपरबॅग्जमधून वेफर्स विक्री सुरू केली आणि त्यामुळे त्याचा खप वाढला. आज प्लस्टिक बॅग्जमधून हे चिप्स खूप मोठय़ा प्रमाणावर विकले जातात. या चिप्सच्या पाकिटातल्या चिप्सच्या संख्येवर आणि हवेच्या प्रमाणावर होणारे विनोद सुप्रसिद्ध आहेत. वेफर्स कमी आणि हवा जास्त असण्याचं कारण असं की, सध्या या रॅपर्समध्ये वेफर्स, चिप्स जास्त काळ टिकावे याकरता नायट्रोजन गॅस त्या पाकिटात आधी ब्लो केला जातो. त्यामुळे चिप्स मोडत नाहीत व अधिक काळ टिकतात.

    संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर ट्रेनमधून घरी जाईपर्यंत पोटाला आधार म्हणून पाच -दहा रुपयांची बटाटा वेफर्सची पाकिटं घेणाऱ्या चाकरमान्यांपासून ते डब्यात बटाटा वेफर्सच हवेत म्हणून हट्ट करणाऱ्या चिल्यापिल्यांपर्यंत आणि उपवास ना उद्या वेफर्स आणा हां ! म्हणणाऱ्या गृहिणीपर्यंत वेफर्स सर्वप्रिय आहेत. तळलेला बटाटा, त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम, वाढती चरबी यावर सगळेच हिरिरीने बोलतील. पण समोर बटाटा वेफर्सचं पाकीट वा डिश आल्यावर मात्र जास्त नको म्हणता म्हणता सगळी डीश कधी संपते कळत नाही. एक वेफर खाऊन गप्प बसणारी मंडळी साधक असावी. सर्वसामान्य पामर मात्र एक, एकसे भले दो, दो से भले तीन म्हणत बॅटिंग करतात, त्यात त्यांचा दोष नाही. हा पदार्थच असा आहे. त्याचा तो केवडय़ासारखा रंग, गोलसर लांबट आकार आणि कुरकुरीत चव कुणालाही प्रेमात पाडणारी. दोन बोटांच्या चिमटीत पकडून वेफरचा तुकडा मोडावा. अगदी सूक्ष्मपणे उडणारे मिठाचे कण चेहऱ्यावर झेलावे. तेलकट तवंग मुखात पसरावा आणि त्या करमकुरम आवाजाने उगाचच उत्साही वाटू लागावे ही भावावस्था आपोआप निर्माण होते. त्या वेफर्ससारखीच कुरकुरीत.

    -- रश्मि वारंग.

    संकलन: संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      March 14, 2022


  • विश्वकर्मा शिल्पकार: समालोचन

    विश्वकर्मा समाजाच्या सांस्कृतिक अध्ययनात सर्वप्रथम शिल्पकारांच्या अस्तित्वाचा शोध घेतल्या गेला आणि नंतर अन्य पैलुवर विचार करण्यात आला आहे. विश्वकर्मा शिल्पकारांनी आपल्या कला कौशल्याने धर्म, रुढी, परंपरा, श्रद्धा, दैवते, कुलाचार, नैतीकता, शिष्ठाचार, या सर्व मनो व्यापाराना शाश्वत रुप दिले आणि एका पिढीने जतन केलेली सांस्कृतिक ठेव पुढच्या अनेक पिढींपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले. त्यांनी राष्ट्रीय जीवनच समृद्ध करुन नवोन्मेषाने जगण्याची प्रेरणा दिली. पाषाणात प्रेम, शौर्य, हास्य, करुणा किंवा कोणताही भाव मूर्तीमंत (जसाच्या तसा) कोरणे मोठे अबघड काम आहे. पुराण ग्रंथातील प्रसंगाना सुद्धा मूर्त रुप देऊन पाषाणातून सजीव केल्या गेले, त्यामुळे वाचा नसलेले दगडही बोलते झाले; प्रेक्षकांशी संबाद साधू लागले.

      January 17, 2026


  • श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय बारावा – भक्तियोग

    इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी भक्तियोग नावाचा बारावा अध्याय….

      February 17, 2023


  • राग आलाय? शांत होण्यासाठी हे करून पहा

    जर एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही तर कमी अधिक प्रमाणात रागही येतो आणि माणसाला राग येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. पण हा राग जर तीव्र असेल तर काही विपरीतही घडू शकते, भांडणे मारामाऱ्या होऊ शकतात एकूणच काय तर वातावरण बिघडतंच, पण शरीरावरही वाईट परिणाम होतो.

      March 25, 2019


  • मलेरिया – तापाचे अभयत्व विज्ञान ( Immunity )

    काही व्यक्तींना निसर्गतःच मलेरिया विरुद्ध अभयत्व प्राप्त होते कारण त्यांच्या शरीरातील तांबड्या रक्तपेशींना मलेरियाचे परोपजीवी भेदू शकत नाहीत . एका दृष्टीने हे त्या व्यक्तींना मलेरिया रोगमुक्तीचे मिळालेले वरदानच आहे . परंतु अशा व्यक्तींची संख्या फारच अल्प असते . हे अभयत्व प्रामुख्याने खालील दोन गोष्टींमुळे आढळून येते .

    १ ) Duffy Antigen Negativity
    २ ) Sickle Cell Trait

    १ ) Duffy Antigen :
    मनुष्याच्या रक्तातील तांबड्या रक्तपेशींमध्ये ABO रक्तगट प्रणाली असते . तसेच Duffy Antigen ही दुसरी एक प्रणाली सुद्धा असते . नेहमी करण्यात येणाऱ्या रक्तगटाच्या तपासणीत या दुसऱ्या प्रणालीला विचारात घेतले जात नाही . कारण त्याचा दर्जा हा दुय्यम स्वरूपाचा असतो . परंतु Duffy Antigen Receptor for Chemokines ( DARC ) ही तांबड्या रक्तपेशींवरील प्रथिने रक्तपेशींच्या आत शिरण्याकरिता परोपजीवींसाठी दिशा दाखविणारी असतात . त्या प्रथिनाच्या मार्गदर्शनामुळे मलेरियाचे परोपजीवी तांबड्या रक्तपेशींमध्ये सहजपणे आत शिरतात .

    साधारणपणे जगातील बहुसंख्य लोकांच्या तांबड्या रक्तपेशीत हे प्रथिन असते . त्या लोकांना Duffy Positive असे म्हणतात , आणि ह्या कारणामुळेच मलेरियाचे परोपजीवी जास्तीत जास्त लोकांमध्ये सहजतेने प्रवेश करतात .

    परंतु मानवी जनुकात जर जन्मत : काही बदल झाले तर अशा व्यक्तींमध्ये Duffy Antigen ( प्रतिजन ) तयार होत नाही . अशा अल्पसंख्य व्यक्तींना Duffy Negative असे संबोधिले जाते अनुभवावरून असे लक्षात आले आहे की याठिकाणी मार्गदर्शक प्रथिनाचा अभाव असल्यामुळे जी व्यक्ती Duffy Negative असते तिच्या रक्तपेशीत Plasmodium Vivax हे मलेरियाचे परोपजीवी शिरूच शकत नाहीत . त्यामुळे अशा लोकांना P. Vivax Resistant म्हणतात.

    काही अफ्रिकेतील जमातींमध्ये Duffy Negative लोकांचे प्रमाण जास्त आहे . त्यांच्यात P. Vivax होत नाही . या शोधामुळे P. Vivax कोणत्या पद्धतीने तांबड्या रक्तपेशींत पसरला जातो यावर प्रकाश पडला आहे . P. Vivax वरील प्रथिने व Duffy Antigen प्रथिन यांचे संगनमत कोणत्या पद्धतीने होते याच्या अभ्यासातून लस बनविण्याची दिशा मिळू शकेल .

    २ ) Sickle Cell Haemoglobin Trait : ( Hb As )
    काही व्यक्तींच्या बाबतीत जन्मत : जनुकांच्या एका जोडीमध्ये जर दोष असेल तर Sickle Cell Anaemia हा तांबड्या रक्तपेशींमधील रचनात्मक दोष निर्माण होतो . यामध्ये तांबड्या रक्तपेशी विळ्याच्या आकारासारख्या दिसतात . त्यामध्ये Haemoglobin चे प्रमाण कमी असते परंतु जर जनुकाच्या त्या जोडीमधील फक्त एकामध्येच जन्मत : दोष असेल तर तांबड्या रक्तपेशीत रचनात्मक दोष अंशत : च येतो . अशा व्यक्तींना Sickle Cell Trait Carrier म्हणतात . जेव्हा एखाद्या जोडप्यामध्ये पुरुष व स्त्री दोघेही Carrier असतील तर तेथे मात्र त्यांच्या मुलांमध्ये Sickle Cell Anaemia हा दोष आढळतो . असे पाहण्यात आले आहे की Sickle Cell Trait ( carrier ) असलेल्या व्यक्तींमध्ये Plasmodium Falciparum चे परोपजीवी तग धरु शकत नाहीत . त्यामुळे त्या लोकांना Falciparum पासून मलेरिया होत नाही .

    परंतु ज्या लोकांमध्ये Sickle Cell Anaemia असतो त्यांना Falciparum पासून कोणतेही संरक्षण मिळत नाही . Sickle Cell Anaemia व Sickle Cell trait या प्रकारात मोडणाऱ्या व्यक्ती अफ्रिकेमध्ये जास्त प्रमाणात आढळतात . महाराष्ट्रातील चंद्रपूर व गडचिरोली भागातील आदिवासींमध्ये Sickle Cell Anaemia व Trait चे लोक आढळून आले आहेत .

    एकदा मलेरिया झाल्यानंतर त्याच्याविरूद्ध शरीरात तयार होणारी प्रतिबंधकारक शक्ती कायम स्वरूपाची राहत नाही . ( Permanent Immunity ) त्यामुळे एकदा मलेरिया होऊन पूर्णपणे रुग्ण बरा झाला म्हणजे त्याला आता पुन्हा परत कधी मलेरिया होणारच नाही अशी खात्री नसते याउलट बऱ्याच संसर्गजन्य रोगांबाबत असे आढळते की एकदा होऊन गेलेला आजार परत उद्भवतच नाही . अर्थात याला क्वचित अपवादही असू शकतात .

    मलेरियाच्या परोपजीवांच्या अनेक अवस्था ( Stages ) असल्याने व त्या प्रत्येक स्थितीमधील प्रतिजने ( Antigen ) वेगवेगळी असल्याने अनेक प्रकारची प्रतिजने रक्तात फिरत असतात . तसेच P. Vivax आणि P. Falciparum या दोनही प्रकारच्या परोपजीवांमधील प्रतिजन क्षमता वेगवेगळी असते . याखेरीज निरनिराळ्या भौगोलिक विभागात असणाऱ्या मलेरियाच्या परोपजीवांतील प्रतिजनांत असणारा फरक अशा दुहेरी कारणांमुळे त्यांच्या विरुद्ध तयार होणारी प्रतिपिंडे ( Antibodies ) रोगप्रतिबंधाला कार्यक्षम ठरत नाहीत . वारंवार वापरल्या गेलेल्या मलेरिया विरुद्धच्या औषधामुळे परोपजीवांच्या जनुकात आता बदल होत आहेत . ( Genetic Mutation ) त्यामुळे प्रतिबंधक शक्ती निर्माण होण्यावर मर्यादा पडत आहे व त्याचबरोबर हे परोपजीवी नेहमी वापरात असलेल्या औषधांना दाद देत नाहीत . ( Drug Resistant Strains ) या परोपजीवांच्या वाढीचे प्रमाण जबरदस्त असल्याने एका रुग्णातून दुसऱ्या निरोगी व्यक्तीत ते सहजरित्या पसरतात .

    कही वेळा मात्र एखाद्या रुग्णास वारंवर एकाच तऱ्हेच्या परोपजीवांमुळे मलेरिया झाला तर काही महिन्यांनंतर त्यांच्यात प्रतिबंधकारक शक्तीची पातळी चांगली वाढते . परिणामी त्यांच्या रक्तात पुन्हा परोपजीवी आढळले तरी त्यांच्यात तापाचे प्रमाण फारच कमी असते . व या तापाबरोबर येणारी दुसरी काहीही लक्षणे दिसत नाहीत . थोडक्यात त्यांच्या शरीरात त्याच पध्दतीच्या ( Type ) परोपजीवांविरुद्ध प्रतिकारक्षमता वाढते . उदाहरणार्थ - वारंवार P.Vivax होण्याने त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढते परंतु तरीही P. Falciparum विरुद्ध ही क्षमता उपयोगास येत नाही . थोडक्यात अभयत्व एकाच गटाविरुद्ध मिळते .

    माणसात होणाऱ्या मलेरियाच्या परोपजीवांना फक्त मानवाचाच घरोबा आवडतो . ते दुसऱ्या कोणत्याही प्राण्यात तग धरूच शकत नाहीत . त्यामुळे माणसातून माणसाकडे असा त्या परोपजीवांचा प्रवास विनासायास अखंडपणे चालू राहतो व त्यातही लहान मुलांच्या शरीरात मोठ्यांपेक्षा हे परोपजीवी अधिक काळ ठाण मांडून बसत असल्याने मुलांमध्ये मलेरियाचा रोग जास्त रेंगाळतो .

    जगप्रसिद्ध शिकारी जिम कार्बेट याचे भारतात जवळजवळ ६० वर्षे वास्तव्य होते . उत्तर भारतातील बऱ्याच जंगलात पायी फिरत त्याने जंगलांचा सखोल अभ्यास व अनेक प्राणी पक्षांच्या शिकारीही केल्या होत्या . या काळात निरनिराळ्या प्रकारच्या मलेरियाच्या संसर्गामुळे त्याच्या हाताची स्थिरता कमी झाली होती . त्यामुळे शिकार करताना बंदूक नीटपणे सावजावर रोखण्यात त्याला अडचण येत असे . परंतु हळूहळू त्यावर जिम कार्बेटने मात केली होती . डासांचा प्रताप अशा या जगन्मान्य मोठ्या नावाजलेल्या शिकाऱ्यासही भोगावा लागला होता . तो लिहितो , " बऱ्याच जंगलातल्या निरनिराळ्या प्रकारच्या मलेरियाच्या संसर्गामुळे माझ्या हाताची स्थिरता गेली होती . त्यामुळे शिकार करताना बंदूक नीट रोखण्यात काही वेळा अडचण येत असे पण हळूहळू मी त्यावर मात केली होती " . - जिम कार्बेट - जंगल लोअर काळ १९४०

    केस नंबर ५

    श्री . श्रीपाद कुळकर्णी वय वर्षे ८२ , उत्तम तब्येत , मोठा असा कोणताही आजार गेल्या चाळीस वर्षांत त्यांना झालेला नव्हता . गेले काही दिवस म्हणजे जवळजवळ १५ दिवस अजिबात भूक लागत नव्हती . थकवा बराच आला होता , परंतु अंगात ताप नव्हता . थोडीसुद्धा कणकण जाणवत नव्हती . सहज म्हणून केल्या गेलेल्या रक्ताच्या तपासणीत हिमोग्लोबिन फक्त 4.5gm % व P.Vivax चे परोपजीवी सापडले . कोणतीही मलेरियाची लक्षणे नव्हती . असे असूनही मलेरिया विरुद्धच्या औषधांचा पूर्ण कोर्स व त्यासोबत ताकद येण्यासाठी दिली जाणारी इन्जेक्शने दिल्यावर १५ दिवसात तब्येत पूर्ववत झाली . श्रीपादरावांच्या शरीराचे अभयत्व चांगले असावे ज्यामुळे मलेरियाची लक्षणे दिसली नाहीत , परंतु त्यांच्या बाबतीत अॅनेमिया मुळे रोगाचे निदान झाले.

    --डॉ. अविनाश वैद्य

      October 24, 2022


  • कायदा पाळा गतीचा (मार्मिक लेख)

    माधव ज्युलीयन म्हणतात,”कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला.” ह्या ओळी गुणगुणतांना लहानपणी ऐकलेली ससा आणि कासवाची गोष्ट आठवल्याशिवाय रहात नाही.

      December 22, 2019