(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • हजार तोंडांचा रावण – एक झलक !

    डायनासोरहून कितीतरी पटीने मोठा भीमकाय भ्रष्टाचार धावताधावता थांबला. तरी तो बराच पुढे आलेला होता. त्याच्या पायांना लाखो अश्वांचा वेग मिळालेला होता, तर अनेक हत्ती सामावतील एवढे मोठे पोट झालेले होते. स्वतःला आवरायला, सावरायला त्याने बराच वेळ घेतला. नंतर जागच्या जागी उभे राहून मोठ्या कष्टाने त्याने मान वळवली.

      August 27, 2023


  • किचन क्लिनीक – पिकलेली पपई

    किचन क्लिनीक – पिकलेली पपई

    पिकलेली पपई हि चवीला गोड,थंड असून पित्तनाशक असते.

    आता पिकलेल्या पपईचे घरगुती उपचार पाहूयात:

    १)जेवणानंतर काही वेळाने पिकलेल्या पपईच्या १-२ फोडी खाल्ल्याने अन्न पचन सुलभ होते.

    २)बाळंतीण बाईला जेवणानंतर पपई खायला दिल्यास तिला भरपूर दुध येते.

    ३)ज्या स्त्रीयांना मासिक पाळीच्या वेळी स्त्राव कमी होतो त्यांनी पपई खावी व ओटी पोटाला एरंडेल तेलाने मालीश करावे.

    ४)पपईच्या बियांचे चुर्ण १-२ चमचे गरम पाण्यासह दीर्घ काळ सेवन केल्याने कृमिंचा प्रादुर्भाव कमी होतो.

    ५)प्रसुतीनंतर गर्भाशय संकुचित होऊन रक्तस्राव थांबावा म्हणून पपईच्या बियांचा रस काढुन प्यावा व ओटीपोटाला देखील हा रस + एरंडेल तेल हे मिश्रण चोळावे.

    पपई हि गरोदर स्त्रीने खाऊ नये कारण पपई मध्ये गर्भाशय संकोच करण्याचा गुण असल्याने त्यामुळे गर्भपात होऊ शकतो.

    तसेच पपईचे अतिसेवन केल्यास बायकांना मासिक पाळीच्या वेळेस अतिरक्तस्त्राव होऊ शकतो.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      December 21, 2016


  • जागतिक विद्यार्थी दिन

    भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचा २०१० मध्ये संयुक्त राष्ट्राने त्यांचा सन्मान करत त्यांचा ७९ वा वाढदिवस हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून जाहीर केला होता.

      October 15, 2021


  • घरचा वैद्य

    कुटुंबव्यवस्था हे भारताचे बलस्थान आहे. आपल्या संस्कृतीमध्ये जे जे काही चांगले, पवित्र, उदात्त आहे ते सर्व स्त्रियांच्या सहभागानेच साध्य झाले आहे. सांस्कृतिक मूल्यांची जोपासना स्त्रियांनीच जास्त प्रमाणात केली. भारतीय स्त्रीकडे पाहिले की अष्टभुजा देवीची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.

      September 9, 2023


  • जानेवारी ०२ : गावसकरचा दोन शतकांचा त्रिक्रम

    सामना : भारत वि. वेस्ट इंडीज. १९७८-७९ च्या हंगामातील तिसरी कसोटी.

    मानकरी : सुनील गावसकर (भारतीय कर्णधार).

    पराक्रम : कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये शतक काढण्याची कामगिरी तिस‍र्‍यांदा केली !

      January 2, 2011


  • माझ्या मामाचं पत्र “हरवलं”

    “कुठे नेऊन ठेवलीय आमची शिक्षण व्यवस्था ” असं त्राग्याने म्हणणारे माझे मन क्षणार्धात शांत झाले. आज विषण्णपणे, उद्वेगाने हे आठवलं कारण १९८४ पासून शिक्षण क्षेत्रात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काम करीत असल्याने त्या क्षेत्राची सतत घसरगुंडी होत असल्याचे अनुभवत आहे.

      August 27, 2022


  • सुलम उद्योगासाठी “ अच्छे दिन ” सुपर फास्ट….

    केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र सरकार आले आणि “मेक इन इंडिया ” च्या गीतात मिले सुर मेरा तुम्हारा झाले. 2030 साली लोकसंख्येचा भारतीय भस्मासुर चीनच्या ड्रॅगनासूराला मात देत १४६ कोटीची उड्डाणे करणार. यातील 100 कोटी हात “ कार्यासज्ज ” म्हणजे 16 ते 59 वयोगटातील असतील. म्हणजे भारत उत्पादनाचे जागतिक केंद्र बनेल. प्रगत राष्ट्रांच्या गुंतवणुकीचा धबधबा भारतावर कोसळू लागेल. अशी स्वप्ने पण पडू लागलीत.भारतात गुंतवणुकीसाठी आव्हान करण्यासाठी मोदीजीचे परदेश दौर्‍यांची मालिका सुरू झाली॰

    एवढ्यात एक कटू सत्य ध्यानात आले एसेस्सी “ड्रॉप आऊट ” चा दर बघता यातील 60 कोटी हात “अल्पशिक्षित” आणि “कौशल्य हीन” असतील. यावर उतारा शोधण्यासाठी नीती आयोगाचे विचार मंथन झाले आणि दोन स्तरांवर अॅक्शन घेण्याचा निर्णय झाला. एक कौशल्य विकासासाठी “स्कीलिंग इंडिया” आणि उद्योगांच्या वाढी साठी पोषक वातावरण तयार व्हावे म्हणून ब्रिटिश काळच्या कायद्यांचे सुलभीकरण म्हणजे “ ईझ ऑफ डूइंग बिझिनेस ”.

    कौशल्य विकासाठी गरज आहे औद्योगिक प्रशिक्षण सौंस्थांची – त्यासाठी लागणार जमीन, यंत्रसामुग्री, प्रशिक्षक आणि या सर्वांसाठी लागणारे भांडवल.भांडवल आणले तरी यातील कुठलीच गोष्ट एका रात्रीत आणता येण्यासारखी नाही.

    मात्र हे प्रशिक्षणाचे अकुशलाला “ रोजगार योग्य ” बनविण्याचे “राष्ट्रकार्य ”लघु उद्योजक सहज करीत आहेत. कुठलेही ITI प्रशिक्षित तरुण लघु उद्योगाकडे येत नाहीत. त्यामुळे आठवी नापास, तिसरी नापास अशा तरुणांना अकुशल कामगार म्हणून घ्यायचे, प्रशिक्षित करायचे, अनुभव द्यायचा आणि शेवटी अशा कुशल कामगाराच्या वेतन वाढीच्या अपेक्षा परवडत नाही सोडून गेला की पुनश्च हरी ओम. पुन्हा नवीन चौथी नापास तरुणाला कामावर घ्यायचे..... हा “ प्रशिक्षण यज्ञ ” वर्षानुवर्षे अव्याहत चालू आहे.

    आज सुलम मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सुमारे 5 कोटी लघु उद्योजक 11.5 कोटी हातांना रोजगार देत आहेत.तसेच यापैकी फक्त 3.6 लाख उद्योग EMII नोंदणी घेणारे आहेत. म्हणजे सुमारे 4.95 कोटी उद्योगातून काम करणारे सुमारे 10 कोटी कामगार केवळ “ व्हाउचर ” वर रोजगार घेऊन काम करतात व त्यांना कुठलेही कायद्याचे किंवा अपघातपासून विमा संरक्षण नाही. याचे मुख्य कारण सुलम उद्योगांना जाचणारी “इन्स्पेक्टर राज” ची साधार भीती.

    केंद्राने लहान लहान अधिसूचना काढून बरेच सुलभीकरण केले पण कामगार ब्रिटिश काळच्या कायद्यात करावयाचे आमुलाग्र बदल केल्या शिवाय “इन्स्पेक्टर राज” पासून मुक्ति मिळणे शक्य नाही. केंद्रीय कामगार मंत्री मा. बंडारू लक्ष्मण यांनी रजिस्टर्स आणि रिटर्न्स सुलभीकरण कायदा 2011 ची अधिसूचना, व स्माल फॅक्टरीज बिल 2014, वेज कोड, कामगार संबंध कोड अशी तीन कायदे सुधार त्रिसूत्रिची प्रारूपे सर्व भागधारकांसमोर म्हणजे कामगार संघटना, व्यवस्थापन संघटना व सरकार अशा त्रिपक्षीय चर्चेला आणली. आपल्या कामगार चळवळीची धार बोथट होईल या भीती पोटी, भाजप प्रणीत भारतीय मजदूर संघा समवेत सर्व कामगार संघटनांनी कुठल्याही बदलाला सरसकट आणि तीव्र विरोध दर्शविला॰ त्यामुळे सुलभीकरणाच्या प्रक्रियेला खीळ बसली.

    मात्र महाराष्ट्र सरकारने राजस्थानच्या धरतीवर कुठलेही आमुलाग्र बदल न करता कायद्याच्या चौकटीत राहून अनेक लहान अधिसूचना काढून सुलभी कारण जोरात पुढे नेले.कारखाना बंद करण्यासाठी परवानगीची मर्यादा 300 वरुन 100 वर आणणे,सुलम उद्योगांना जाचक माथाडी कायद्यातून मुक्ति, पर्यावरण विषयक अडसरांचे सुलभीकरण, काल मर्यादेत परवानगी, एकंदर परवानग्यांची संख्या 76 वरुन 40 वर आणणे, स्वप्रमाणित विवरणपत्रे इ. अनेक बदल अधिसूचित करून “मैत्री” या संकेत स्थळावर पारदर्शक पद्धतीने टाकलेत हे खरोखरी स्तुत्य आहे.तसेच या निर्णयांचे परिणाम जमिनीवर दिसू लागले आहेत.

    परंतु कौशल्य विकास व सुलभी करण यांची सांगड घालण्यासाठी एक अत्यंत प्रभावी पण सोपा उपाय म्हणजे – सुलम उद्योगाला प्रशिक्षण संस्थेचा दर्जा देत त्यांच्यातील सुप्त विभवाचा वापर करणे. या साठी 15 ते 20 वर्षे वयाच्या अकुशल – अल्पशिक्षित ( एसएससी ड्रॉप आऊट ) तरुणांची आधार कार्डा वरून “प्रशिक्षणार्थी” म्हणून नोंदणी करणे. सुलम उद्योगांना त्यांच्या कर्मचारी संख्येच्या 30 % नोंदणीकृत प्रशिक्षणार्थीना तीन वर्षासाठी, किमान वेतनाच्या अनुक्रमे 70, 80 व 90 टक्के स्टायपेंड व अपघात विमा करून कामावर घेण्याची मुभा देणे. या शिवाय शिकण्याची इच्छा असलेल्या प्रशिक्षणार्थीना “नरेगा” योजनेतून महिना रु. 3000 शिष्यवृत्ती देऊन औद्योगिक संघटनांच्या मदतीने त्यांच्या आवडीच्या व्यवसायाचे संबंधित व्यवसायचे तंत्रशुद्ध शिक्षण द्यावे व एनसीटीव्हीटी परीक्षेला बसवावे. तीन वर्षा नंतर व्यवस्थापनाला प्रशिक्षणार्थीना कायमस्वरूपी कामावर घेणे बंधनकारक नसावे. यामुळे सुलम उद्योगाची, कामगार संख्या वाढून फॅक्टरी अॅक्ट लागू होण्याची व प्रशिक्षणार्थी कसाही असला तरी त्यास कामावर कायम करावे लागण्याची अनामिक भीती नाहीशी होईल. तसेच अनेक असंघटित सुलम उद्योगात अकुशल तरुण कामगारांना अपघात विमा संरक्षण,व्यावसायिक प्रशिक्षण, औद्योगिक अनुभव व NCTVT प्रमाणपत्राची खात्री अशी बहुआयामी संधि उपलब्ध होईल.

    सर्वघटकीय लाभ असणारी ही सूचना अमलात आणल्यास अच्छे दिन “ सुपरफास्ट ” ची “हायपर फास्ट ” होण्यास वेळ लागणार नाही हे निश्चित.

    पुरुषोत्तम आगवण
    राष्ट्रीय उपाध्यक्ष
    चेंबर ऑफ स्माल इंडस्ट्री असोसिएशन्स
    भ्र.ध्व. ९८२००८९३११

      December 9, 2015


  • संत महिपती महाराज – परिचय

    समाजात संतांचे कार्य निश्चितच फार मोलाचे आहे. ईश्वर भक्ती व पारमार्थिक जीवनातील तत्वज्ञान उपदेश, ओवी, अभंगाद्वारे त्यानी वेळोवेळी व्यक्त केलेले आहे. प्राचीन मराठी साहित्यात संत परंपरेचा अभ्यस करताना संत महिपती महाराज रचित ‘भक्ती विजय’ व ‘संतलीला मृत’ या ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो.

      November 7, 2020


  • श्री गणाधिप स्तोत्रम् – भाग ५

    या जीवनात जीवाला त्रस्त करणार्‍या अनेकानेक गोष्टी उपलब्ध आहेत. प्रारब्धवशात या सगळ्यांशी संघर्ष करताना माणसाला येणाऱ्या श्रमाला ज्यांच्या उपासनेने शांती प्राप्त होते असे.

      January 26, 2020


  • लढा सीमेचा – लढा अस्मितेचा !! (भाग ३)

    १ नोव्हेंबर १९५६ ….! तत्कालीन म्हैसूर (कर्नाटक) राज्याचा स्थापना दिवस ! कन्नडीगांच्या जीवनात आनंद घेऊन आला, परंतु मराठी माणसाचा कर्दनकाळ ठरला. परकीयांची सत्ता गेली नि स्वकीयांच्या गुलामगिरीत जगण्याची वेळ ‘मराठी’वर आली. म्हैसूर राज्यात स्थापना दिवसाचा जल्लोश सुरू झाला. ऐन दिवाळीतल्या या दिवसामुळे कन्नडीगांचा आनंद व्दिगुणीत झाला. परंतु माय महाराष्ट्रापासून दूरावलेल्या मराठी माणसाच्या मनात पोरकेपणाची भावना निर्माण झाली.

      June 11, 2021