(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • काश्मिर

    ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकरांचा काश्मिर प्रश्नावरील हा लेख शेअर करत आहे...


    गेल्या दहाबारा वर्षात हळुहळू काश्मिरचा कधी पॅलेस्टाईन होऊन गेला, तेच आपल्या लक्षात आलेले नाही. वीसपंचवीस वर्षापुर्वीचे पॅलेस्टाईनचे फ़ोटो कुठे मिळाले तर मुद्दाम शोधून बारकाईने तपासा. मग त्याची प्रचिती येईल. यापुर्वी निदान काश्मिरमध्ये हुर्रीयत व फ़ुटीरवादी निवडणूकीवर बहिष्कार वा अधूनमधून सार्वत्रिक बंदचे आवाहन करीत. पण कुठे लष्करावर हल्ले झाले किंवा दगडफ़ेक झाली, असे प्रसंग चारपाच वर्षापुर्वीही आपल्याला बघायला ऐकायला मिळत नव्हते. पण आजकाल असे प्रसंग वारंवार घडू लागलेले आहेत. त्याची कार्यप्रणाली म्हणूनच तपासून बघता येईल. पॅलेस्टाईनच्या राजकारणात ज्याला चार दशकापुर्वी इंतेफ़ादा असे नाव दिले गेले त्याची ही भारतीय पुनरावृत्ती आहे. म्हणजे असे, की काही पॅलेस्टाईनी शांततेचे नाटक रंगवणार आणि इस्त्रायलच्या भागात रोजंदारीसाठी जाणार. त्यापैकी कोणी तिथे घातपात करणार. मग त्याला पकडले वा गोळी लागून मारला गेला, तर धुमाकुळ सुरू करायचा. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर हे युद्ध छेडले जात असे. म्हणजे असे, की अशा घटना घडल्या, मग बाजूचा लेबेनॉन तोच मुहूर्त साधून इस्त्रायलवर हल्ले सुरू करायचा. युद्धाची स्थिती निर्माण करायचा. म्हणजे पॅलेस्टाईनचा पश्चीम किनारा व बाजूच्या अरब राष्ट्राकडून एकाच वेळी इस्त्रायलच्या सीमेवर हल्ले सुरू व्हायचे. एकीकडे लेबेनॉन सशस्त्र हल्ले करणार आणि पॅलेस्टाईनचे तरूण किरकोळ बॉम्ब वा दगडफ़ेकीने इस्त्रायली सेनेवर हल्ले करणार. मग जगभरच्या पुरोगामी माध्यमांनी त्याचा हलकल्लोळ करून टाकायचा. पॅलेस्टाईनमध्ये कसे निरपराध नागरिक मारले जात आहेत, त्यावरून मानवतावादी संघटनांनी रान उठवायचे. ही एक मोडस ऑपरेन्डी बनून गेलेली होती. आजकाल पाकिस्तानी सेना व काश्मिरातूल फ़ुटीरवादी तशीच काहीशी रणानिती संयुक्तपणे राबवित आहेत.

    या संदर्भात ज्यांना अधिक तपशील हवा असेल, त्यांनी इंटरनेटवर इंतेफ़ादा शब्दाचा शोध घेऊन तपशील मुद्दाम वाचले पाहिजेत. काही फ़ुटीरवादी जिहादी नेमका तोच शब्द काश्मिरातही वापरत असतात. कारण स्पष्ट आहे. आता तीच रणनिती योजनाबद्ध रितीने इथेही वापरली जात आहे. मग त्यावरून काहुर माजले, की भारतातले मानवतावादी पाकिस्तानशी बोलणी करा म्हणून टुमणे लावणार. किंवा काश्मिरात सैनिकी कारवाईत बळी पडलेल्यांचे उदात्तीकरण करणार. फ़ारूख अब्दुल्ला यांची भाषा व पॅलेस्टाईनचे नंतर अध्यक्ष झालेले यासर अराफ़त यांची भाषा किती जुळतीमिळती आहे, त्याचाही जिज्ञासूंनी अभ्यास करायला हरकत नाही. आज काश्मिरात काय चालले आहे, त्याची ओळख इंतेफ़ादा समजून घेतल्याशिवाय होऊ शकत नाही. इंतेफ़ादा ही रणनिती आहे. कुरापत काढायची आणि त्यातून लष्करी कारवाईचा बडगा उगारला, मग अमानुष म्हणून सत्तेच्या विरोधात गळा काढायचा. अशी ही रणनिती आहे. यात प्रत्येक पात्राला त्याची भूमिका ठरवून दिलेली आहे. त्यात दिर्घकाळ जिहादी घातपाताचे कृत्य करण्यासाठीच प्रसिद्ध असलेल्या यासर अराफ़त, यांच्याशी इस्त्रायलने बोलणी केली आणि त्यांच्या पॅलेस्टाईन प्रदेशाला स्वायत्त म्हणून मान्यता दिली. पण अशा स्वायत्ततेला आपले सैन्य उभारण्यास मोकळीक दिलेली नव्हती. आपल्या काश्मिरात यापेक्षा काहीही वेगळे नाही. पण आपल्यावरचा जिहादी कलंक पुसला गेल्यावर आराफ़त यांनी, आडोश्याने अन्य जिहादी पुढे करून तोच उद्योग चालू ठेवला होता. आराफ़त त्यात सक्रीय नव्हते. पण जे कोणी घातपात करीत होते, त्या हमास संघटनेच्या हिंसाचाराला पाठीशी घालत, त्याचे उदात्तीकरण आराफ़तच करीत होते. आज फ़ारूख अब्दुल्ला काय वेगळे करीत आहेत? हा सगळाच संगनमताने चाललेला तमाशा नाही काय?

    फ़रक इतकाच आहे, की इस्त्रायल अन्य कुठल्या मानवतावादी संघटना वा त्यांच्या जागतिक नेत्यांना दाद देत नाही. हल्ले वा घातपात झाले, मग इस्त्रायली सेना लगेच प्रतिहल्ला चढवते आणि युद्धपातळीवर परिस्थिती हाताळू लागते. त्यात पॅलेस्टाईन भागातून जिथे कुठे घातपाती अड्डे आहेत, त्यांच्यावर क्षेपणास्त्रे डागून विध्वंसक प्रतिहल्ला केला जातो. जिथे सैनिकी कारवाईत निदर्शक म्हणून दगडफ़ेके समोर येतात, त्यांना घातपाती ठरवून गोळीबारही केला जातो. त्याचवेळी पॅलेस्टाईनचे नेते म्हणून पोपटपंची करणार्‍यांनाही आपल्या घरातून बाहेर पडता येणार नाही, इतका हलकल्लोळ त्याही भागात केला जातो. एकदा तर आराफ़त यांचे वास्तव्य असलेल्या कंपाऊंडवरही बॉम्बफ़ेक करण्यात आली होती. काही दिवस त्यांना काळोखात काढावे लागले होते. तिसरी आघाडी लेबेनॉनसारखे शेजारी लढवत असतात. उघडपणे लेनेनॉन कधी इस्त्रायलशी लढाईत उतरत नाही. पण तिथे हिजबुल्ला नामक जिहादी संघटना आहे, तिच्यामार्फ़त इस्त्रायलवर सैनिकी हल्ले केले जातात. आपल्याकडे काश्मिरात तोयबा वा मुजाहिदीन नावाने तसेच हल्ले पाकभूमीत बसलेले पाक सैनिक करीत असतात. हा सगळा प्रकार अगदी लेबेनॉनसारखा आहे. उरी येथे असा हल्ला झाल्यावर आपण त्याला सर्जिकल स्ट्राईकने उत्तर दिले होते. त्याचे आपल्याला मोठेच कौतुक आहे. पण असे प्रतिहल्ले इस्त्रायल इतके खोलवर करते, की त्यानंतर अनेक महिने लेबेनॉनच्या हिजबुल्ला संघटनेला डोकेही वर काढता येत नाही. हवाई हल्ले व क्षेपणास्त्रे सोडून इस्त्रायलने अनेकदा लेबेनॉन बेचिराख करून टाकला आहे. त्यात शेकड्यांनी नागरिकही मारले गेले आहेत आणि सैनिक तर त्याहूनही अधिक मारले जातात. असे होऊ लागले, मग जागतिक नेते मध्यस्थी करतात आणि इस्त्रायलही युद्ध संपल्याची घोषणा करून टाकतो. पण केव्हा?

    इस्त्रायलची ही रणनिती आपण गंभीरपणे अभ्यासली पाहिजे. एकदा असा इंतेफ़ादा सुरू झाला, मग इस्त्रायल सर्व पातळीवर आणि सर्वच आघाड्यांवर युद्धाचा पवित्रा घेऊन टाकते. त्यात जागतिक नेत्यांनी हस्तक्षेप करण्यापर्यंत एकदोन आठवड्याचा कालावधी निघून जातो. परिणाम असा होतो, की इस्त्रायलच्या सीमेपलिकडचा प्रदेश पुर्णपणे होरपळून निघतो. शेकड्यांनी लोक जखमी होतात, तितकेच मारले जातात. हजारो घरे व इमारती जमिनदोस्त होऊन जातात. सहाजिकच अशा नागरी वस्तीत आडोसा घेऊन बसलेल्या हिजबुल्ला वा अरबी सेनेचा कणा पुर्णपणे मोडून काढला जातो. त्यांनी कष्टपुर्वक उभारलेली गनिमी युद्धाची रचना व सामुग्री अशी उध्वस्त करून टाकली जाते, की इस्त्रायल कितीही गाफ़ील राहिला तरी पुढले कित्येक महिने कुणाही जिहादीला कुरापत काढणेही अशक्य होऊन जाते. भूकंपातून सावरासावर करावी, तशी त्यांची दुर्दशा होऊन जाते. जिहादी लढवय्ये सोडाच. त्यांचे पालनपोषण करणारी कुटुंबे व वस्त्याही पुरत्या नष्ट होऊन जातात. त्यातून अगोदर नित्यनेमाने जगण्याच्या सुविधा पुन्हा उभारण्याचे काम हाती घ्यावे लागते. नागरी जीवन रुळावर आल्याखेरीज इस्त्रायलची कुरापत काढण्याचा विचार इंतेफ़ादा पुकारलेल्यांच्या मनात येऊ शकत नाही. सहाजिकच वर्ष दिडवर्ष इस्त्रायलला शांततापुर्ण जीवन जगत येते. मग तो कालावधी उलटला, की पुन्हा पॅलेस्टाईनी व लेबेनॉनच्या हिजबुल्लाला लढायची खुमखुमी येते. पुन्हा इंतेफ़ादा सुरू होतो. पुन्हा इस्त्रायल आधीच्याच रणनितीचा अवलंब करते. हा घटनाक्रम आता जगाच्याही अंगवळणी पडला आहे. हळुहळू भारतालाही काश्मिर व पाकिस्तानातील त्यांच्या पाठीराख्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी इस्त्रायली युद्धनितीचाच अवलंब करावा लागणार आहे. कारण आपण ज्याला आझादीची लढाई समजून बसलो आहोत, तो प्रत्यक्षात काश्मिरातील पॅलेस्टाईनी इंतेफ़ादाच आहे.

    --- भाऊ तोरसेकर

    -- संकलन : शेखर आगासकर
    सोशल मिडियातून येणारे चांगले लेख जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा उपक्रम.

      June 8, 2017


  • महानगरातील महिला सुरक्षा: एक वेगळा विचार..

    गेल्या काही वर्षातील घटनांवर नजर टाकली तर देशातील महानगरात महिलांवर बस-रिक्शा-टॅक्सी चालकांकडून होणाऱ्या अत्याचारांत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून येते. आज महानगरातील जीवनमान लक्षात घेता स्त्रियांना नोकरी-व्यवसायानिमित्त दिवस-रात्र घराबाहेर राहणे गरजेचे झाले आहे.

      January 5, 2015


  • सुरक्षित बँकिंग

    //

    बँकिंग व्यवसाय आधुनिक झाला आणि त्याचबरोबर त्यातील फसवाफसवीचे प्रमाण वाढू लागले. याविषयी अधिक माहिती जाणून घ्या. दयानंद नेने यांनी फेसबुकवर शेअर केलेली ही पोस्ट. अतिशय वाचनीय.

      March 29, 2016


  • तिकीट तपासनीस (तिकीट चेकर)

    रेल्वेमधला तिकीट तपासणीस अर्थात टी.सी. हा एक स्वतंत्र विषयाचा मामला आहे. या टी.सी.नावाच्या व्यक्तीबद्दल प्रवाशांच्या मनात नेहमीच थोडीशी भीती असते आणि आतून सुप्त राग खदखदत असतो. 'प्रसंगी दंडाची रक्कम यांच्या हातांत पैसे दाबून टाळता येते', 'ते लाचखाऊ असतात' असाही एक अपसमज जनसामान्यांमध्ये ठसलेला असतो.

    प्रवाशांवर वचक ठेवणारे आणि स्वत:विषयीचे समज-गैरसमज सोबत घेऊन काम करणारे हे टी.सी. (मेल, एक्सप्रेस गाड्यांचे) नेहमी वकिलांसारख्या काळ्या कोटात असतात. स्टेशनच्या मुख्य दरवाजावरील व लोकलवरील टी.सी. मात्र बऱ्याच वेळा साध्या कपड्यात असतात. अचानक धाडीची मोहीम असेल, त्यावेळी प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी अनेक टी.सी. साध्या कपड्यांत शांतपणे उभे असतात. प्रवासी उतरताच त्यांना घेराव घालून ते आपले काम पार पाडतात. मुंबईत पूर्वी लोकलगाडीत चढणाऱ्या टी.सी.ना 'मामा' म्हटलं जाई.

    या तिकीट तपासनिसांची मुख्य कामं अशी असतात:

    १. प्रवाशांची तिकिटं तपासून ती योग्य आहेत किंवा नाही ते पाहणं.

    २. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडणं, त्यांच्याकडून दंड वसूल करणं, व पैसे नसल्यास रेल्वे पोलिसांच्या मदतीनं त्यांना तुरुंगात टाकणं. असे प्रवासी शोधून काढणं हे कौशल्याचं काम तर असतंच, परंतु यामध्ये काही वेळा मारामारीच्या प्रसंगांनाही तोंड द्यावं लागतं.

    ३. जमा झालेली रक्कम, तिकिटं, पासेस, कार्यालयात सुपुर्द करायचे असतात.

    ४. रेल्वेतील जुने, नवे असे लाखो कर्मचारी पासवर प्रवास करीत असतात.

    ते सर्व व्यवस्थितपणे पडताळून पाहावं लागतं.

    ५. शाळा, कॉलेजेसमधील विद्यार्थ्यांना पासवर मिळणारी सूट, ५ वर्षांखालील मुलामुलींचं अर्धं तिकीट यांवर नजर ठेवावी लागते.

    ६. मेल व एक्सप्रेस गाड्यांतील प्रवासी आरक्षण यादीप्रमाणे आहेत किंवा नाहीत हे पाहणं, रिकाम्या अनारक्षित (बर्थवर) प्रवाशांची भाड्याचे पैसे भरून घेऊन सोय करून देणं, ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखपत्रांवरील वय तपासून घेणं.

    ७. लोकसभा-सदस्य प्रवास करत असताना त्यांचा वेगळा फॉर्म भरून घेणं.

    ८. अनेकदा तिकिटं काढलेल्या दिवसानंतर तिकिटांच्या दरात वाढ होते. त्यावेळी जास्तीचे पैसे प्रवाशांकडून गोळा करावे लागतात आणि हे काम तर तिकीट तपासनिसांची परीक्षा पाहणारं असतं.

    ९. साधू, भटकी मुलं, गरीब स्त्रिया व मुलं अनेकदा तिकीट न काढता जागा अडवितात, त्यांना गाडीतून बाहेर करावं लागतं.

    १०. जागेवरून प्रवाशांत होणारे तंटे ताबडतोब मिटविणं.

    ११. प्लॅटफॉर्म तिकिटं तपासणं.

    १२. स्त्रियांसाठीच्या डब्यांत तिकिटांची तपासणी.

    लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये या तिकीट तपासनिसांना झोपण्यासाठी एक बर्थ ठेवलेला असतो; परंतु या प्रवासात मध्यरात्री, भल्या पहाटे वाटेतील येणाऱ्या स्टेशनांवर एखादा प्रवासी उतरणार असेल तर त्याला उठवण्याची (जागेवरून त्यांच्या उतरण्याच्या स्टेशनावर उतरवण्याची जबाबदारी टी.सी.वरच असते. प्रत्येक स्टेशनवर नव्यानं चढणाऱ्या प्रवाशांची सोय पाहणं हेही टी.सी.लाच बघावं लागतं.

    बारा ते चौदा तासांची ड्युटी व त्यात स्वत:च्या घरी जाण्यास होणारा विलंब, यांमुळे त्यांना घराकडे लक्ष देता येत नाही. राजकारणी लोक प्रवासात असताना त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते असतात. अशाप्रसंगी लक्ष पुरविताना टी.सी. मंडळींची अगदी दुहेरी पातळीवर दमछाक होते; कारण, ते कार्यकर्ते सर्व नियम धाब्यावर बसवितात व त्यांच्याविषयी इतर प्रवासी तक्रारी करतात. रेल्वे खातं हे आपल्याला वेळी अवेळी होणाऱ्या झोपण्याच्या गैरसोईबद्दल व शिव्या खाण्यासाठी पगार देत' अशी टी.सी. कर्मचाऱ्यांची तक्रार असते.

    मनुष्यस्वभावाप्रमाणे व परिस्थितीनुसार काही तिकीटतपासनीस संधीचा फायदा घेऊन खाबुगिरी करीतही असतील, परंतु बरेच टी.सी. कामात दक्ष असल्यामुळे दर महिन्याला विनातिकिटाच्या दंडातून कोट्यवधी रुपये जमा करतात. २०१४ या वर्षात व्ही.टी. स्टेशनवरील धर्मेंद्रकुमार या तिकीटतपासनिसानं एका महिन्यात १२ लाख रुपये एवढी रक्कम निव्वळ दंडामधून वसूल केली होती. हा एक विक्रम आहे. तरीही, मनुष्यस्वभावातील फसविण्याची वृत्ती वाढतच आहे व रेल्वेला आपली टी.सी.ची फौज वाढवावी लागते आहे.

    डॉ. अविनाश वैद्य

      July 23, 2022


  • महादेवाच्या पिंडीचे रहस्य

    भगवान महादेवाच्या पूजेबद्दल काही महत्त्वाची माहिती……..

      November 5, 2016


  • सरसकट ची झाली कटकट..

    आदर्श परिस्थितीत प्रत्येक शैक्षणिक धोरण चांगलेच असते, त्याचा निकाल लावणे हे राबविणारऱ्यांच्या हातात असते. आता सरसकट पास करण्याचे धोरण बंद होणार. केंद्र सरकारने शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणा साठी शालेय विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचे धोरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

      December 28, 2024


  • वलयांकितांच्या सहवासात – पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन

    ‘ऋतुरंग’च्या अरुण शेवते यांनी मला सांगितलं की २००३ च्या दिवाळी अंकासाठी तुम्ही उस्तादजींच्या जडणघडणीविषयी त्यांची मुलाखत घ्या व तिचं शब्दांकन करता येईल का ते बघा. माझं ते पहिलं शब्दांकन असणार होतं. मी रवीकाकाला सांगितलं, निर्मला बाछानी म्हणून झाकीरकाकाच्या सचिव आहेत, त्यांना सांगितलं आणि झाकीरकाका मुलाखतीला तयार झाला. शब्दांकनकार होण्यासाठी मला पहिला आशीर्वाद मिळाला तो उस्ताद झाकीर हुसेन यांचा.

      May 10, 2020


  • मला भेंटलेला रिक्शावाला व त्याच्या नजरेतून मुसलमान समाज

    मुंबईच्या उपनगरांतील रस्त्यावर दिवसाचे १२-२५ तास आपल्या तिन चाकांच्या रिक्शांवर मेहेनत करणारे रिक्शावाले माझ्या अखंड कुतुहलाचा विषय आहेत. बऱ्याचदा नडेल, अडेलतट्टू, उर्मट असंच यांचं वागणं असतं. प्रवाश्याला हवं त्या ठिकाणी न येणं हा तर त्यांचा व्यवसायसिद्ध हक्क आहे की काय अशी शंका यावी असंच यांचं वागणं असतं.

      February 25, 2017


  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे – भाग आठ

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे चौदा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    आप्तोपसेवीच....
    या शब्दाचा अर्थ आप्तांची सेवा असा होतो. आता आप्त कोण ? आणि सेवा म्हणजे काय ? आणि त्यांचा आरोग्याशी असलेला संबंध शोधायचा.

    ग्रंथकार म्हणतात, वयोवृद्ध, तपोवृद्ध, आणि ज्ञानवृद्ध म्हणजे आप्त. आप्त म्हणजे आपलं हित जाणणारे. जे वयाने, तपाने, ज्ञानाने मोठे आहेत ते !

    ही व्यक्तीच पाहिजे असे नाही, एखादा ग्रंथदेखील आपला आप्त होऊ शकतो.

    अनुभवाने शहाणपण येते ते इथे. ज्यांनी चार पावसाळे जास्त पाहिले आहेत, अशा काहीना जीवनाचा अनुभव नक्कीच जास्त मिळालेला असतो. त्याचा फायदा करून घ्यावा.

    अर्थात वयाचे बंधन ज्ञानाला येत नाही, म्हणूनच आदि शंकराचार्य, ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती संभाजी महाराज, आम्हाला वंदनीय आहेत. त्याच आदराने आम्ही मार्क झुकेरबर्ग किंवा जॅन कौम यांच्याकडेदेखील पाहायला शिकले पाहिजे. व्यक्तीच्या वयापेक्षा त्याने केलेल्या तपाला हे वंदन आहे.

    अगदी आजोबांना वाॅटसॅप शिकवणारा त्यांचा नातू हा आजोबांसाठी आप्त होईल. सासुला पिझ्झा करायला शिकवणारी सून ही, सासुबाईसाठी आप्तच असेल,
    आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या वर्क मॅनेजरला, एमबीए झालेला एखाद्या कंपनीचा तरूण वयाचा डायरेक्टर हा आप्त होईल.

    पण कधी तरी अनुभवाचा, आणि वयाचाही विचार करायचा असतो. कधीतरी तपाचा तर कधी ज्ञानाचा. हे तारतम्य प्रत्येकाजवळ असेलच, असे नाही. पण ते अंगी आणावे लागेल. हेच ग्रंथकाराना सांगायचे आहे.

    पाट्या वरवंट्यावर वाटणे आणि मिक्सरमधून वाटणे या साध्या क्रिया वाटतात, पण आप्तांनी सांगितलेले ऐकले तर चवीत पडणारा फरक समजतोच ना. वरवर पाहाता दोन्ही पद्धतीने तयार झालेली चटणी किंवा वाटप, यातील सूक्ष्म फरक अनुभवानेच समजतो.

    चांगले आरोग्य मिळवण्यासाठी या आप्तांचा सल्ला शिरसावंद्य मानावा. भक्तीने विश्वास ठेवावा, ज्ञानाने त्यातील विज्ञान शोधून काढावे तर तपाला तपासून कर्म करावे. हेच खरे !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    ०३.०८.२०१७

      August 3, 2017


  • आनंदाचे उगमस्थान

    आपल्यापैकी प्रत्येकालाच सुखाची आकांक्षा असते. सुख-साधने सर्वांनाच हवी. असतात, परंतु सर्व सुखसाधने सर्वांनाच कुठे ‘मिळतात? याचे कारण एकच असते ते म्हणजे आनंदाचा उगम कुठे आहे, हेच आपणास ठाऊक नसते. एखादी वस्तू कुठे मिळेल हेच माहीत नसेल तर ती मिळणार तरी कशी? आनंदाच्या शोधात आपण इकडे-तिकडे भटकतो.

      August 2, 2023