वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष डॉ. हेलन टाऊसिग या बालहृदयरोजतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होत्या. जन्मतःच हृदयात दोष असणार्या बालकांवर हृदयशस्त्रक्रिया करून त्यांचे आयुष्यमान उंचावणारी शल्यचिकित्साडॉ. ब्लॅलॉक यांनी प्रथमतः यशस्वी केली व त्यानंतर त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले.
May 14, 2019
भवद्गौरवं मल्लघुत्वं विदित्वा
प्रभो रक्ष कारुण्यदृष्ट्यानुगं माम् |
शिवात्मानुभावस्तुतावक्षमोऽहं
स्वशक्त्या कृतं मेऽपराधं क्षमस्व ‖ १९ ‖
भगवंताच्या चरणी शरण जाताना परिपूर्ण शरणागती प्राप्त होण्यासाठी स्वतःच्या अहंकाराचा विलय होणे ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. त्यासाठी आपल्याजवळ कोणतीही पात्रता नाही याचे वारंवार चिंतन उपयोगी ठरते. अर्थात हे चिंतन हवे. कथन नाही. नाहीतर नुसते म्हणण्यापुरते होईल.
वास्तविक विचार केला तर खरेच आपल्या जवळ कोणतीच योग्यता नाही. आचार्यश्री समान अद्वितीय विभूती जर हे म्हणत असेल तर आपली अवस्था काय? याचा विचारच केलेला बरा.
आचार्य श्री म्हणतात,
हे भगवान शंकरा !
भवद्गौरवं - आपल्या मोठेपणाला, आपल्या विश्वनाथ अवस्थेला, दीनानाथ भूमिकेला,
मल्लघुत्वं - माझ्या अल्प स्वरूपाला, दीनत्वाला,
विदित्वा- जाणून कारुण्यदृष्ट्या- कारुण्यपूर्ण दृष्टीने
अनुगं माम् - आपला अनुयायी असलेल्या माझे,
प्रभो रक्ष - हे प्रभू माझे रक्षण करा.
मी आपला अनुयायी आहे. मी दीन आहे. आपण दीनानाथ आहात. आपल्याशिवाय माझे रक्षण करणार तरी कोण?
शिवात्मानुभाव- हे भगवान शिवशंकरा ! आपण आत्मानुभावी आहात. अर्थात आपल्याला सर्व समजते.
स्तुतावक्षमोऽहं- मी स्तुती करण्यास देखील असमर्थ आहे.
स्वशक्त्या - आपण आपल्या शक्तीने
कृतं मेऽपराधं क्षमस्व - मी केलेल्या अपराधांना क्षमा करा.
मला स्तुती कशी करायची? इतकेही ज्ञान नाही. पण असे असले तरी मला समजो की न समजो , हे भगवंता माझ्यासाठी काय योग्य आहे? हे तुला तर समजते ना?
ते देणे देखील तुझीच शक्ती आहे. मग मी मागण्याची वाट का पाहतोस?
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 28, 2020
रोजचे संगणकावरचे काम हे आता जवळपास कुणालाच न टाळता येण्यासारखे आहे. सतत संगणकावर काम करुन करून अनेकांना मानदुखी आणि पाठदुखीचा त्रास होतो. काहींचे डोळेही दुखतात. संगणकासमोर सक्तीने बसावे लागण्याचे तोटे आणि त्यावरचे काही सोपे उपाय.
मानदुखीची कारणे अनेक असू शकतात. पण संगणकासमोर घालवलेला वेळ जितका जास्त, तितकी मानदुखी अधिक असे एक साधे समीकरण आहे. या मानदुखीसाठी संगणकासमोर बसण्याची आपली पद्धत कारणीभूत ठरते. अनेकदा संगणकाचा ‘मॉनिटर’ डोळ्यांच्या सरळ रेषेच्या तुलनेत वरच्या किंवा खालच्या पातळीवर ठेवलेला असतो. मॉनिटरकडे पाहण्याची आपल्याला इतकी सवय झालेली असते की तो असा वर किंवा खाली आहे हेही लक्षात येत नाही. मॉनिटर नेहमी डोळ्यांच्या समोर सरळ रेषेतच हवा. तो काही मिलिमिटर वर किंवा खाली चालू शकेल, पण मॉनिटरकडे पाहताना वर किंवा खाली पाहावे लागू नये अशी त्याची जागा असावी. संगणकासमोर काम करताना काही जणांना एकदा की- बोर्डकडे आणि एकदा मॉनिटरकडे असे सतत खाली आणि वर पाहावे लागते. सहसा कागदपत्रे वाचून ती टाईप करताना असे होते. हे देखील मानदुखी वाढवणारे ठरते. अनेकदा की- बोर्ड आणि मॉनिटर यांच्या जागांचा काही मेळच नसतो. एकीकडे की- बोर्ड आणि त्याच्या समोर नव्हे तर थोडासा दूर तिरक्या रेषेत मॉनिटर अशी परिस्थिती असते. यात नुसते वर-खालीच नाही तर उजवीकडे- डावीकडे असेही सारखे पाहावे लागते आणि मानेच्या स्नायूंवर वाढीव ताण येतो.
संगणकासमोर बसल्यावर मॉनिटरवरील मजकूर वाचण्यासाठी खुर्चीतून पुढे वाकावे लागू नये हा पहिला नियम. त्यामुळे खुर्ची सहजपणे पुढे किंवा मागे हलवता यावी. काही खुच्र्याना हाताचे कोपर टेकवायला जागाच नसते. माणसाची उंची अधिक असेल तर की-बोर्ड वापरताना कोपरे सतत हवेत लटकल्यासारखी राहतात. असे करताना खांदे वर उचललेले राहतात आणि मानेच्या बाजूला असलेला स्नायू सतत दाबला जातो. यामुळे काही वेळाने मान दुखायला लागते. त्यामुळे खुर्चीच्या दोन्ही बाजूंना कोपर टेकवायला आधार असणे गरजेचे आहे. इतकेच नव्हे तर खुर्चीच्या हातांची उंची कमी-जास्त करण्याची सोय असलेली खुर्ची निवडल्यास उत्तम. की- बोर्डवर टाईप करताना कोपरांना आधार मिळाला तर खांद्यांवर ताण येत नाही. पाठदुखी टाळण्यासाठी खुर्चीला चांगला ‘लंबर सपोर्ट’ असायला हवा. खुर्चीची पाठ सहसा केवळ पाठीला आधार देण्यापुरती असते. पण हा आधार खांद्यांपर्यंत मिळणे गरजेचे असते. खुर्चीची पाठ तुमच्या खांद्यांपर्यंत असेल तर संपूर्ण पाठीला आधार मिळेल. अशी खुर्ची वापरल्यास पाठदुखीबरोबरच मानदुखीलाही प्रतिबंध करता येऊ शकतो. सातत्याने संगणकावर काम करायचे असेल त्यांनी काही वेळ गेल्यावर पाठ आणि मानेच्या स्नायूंचे साधे व्यायाम करावेत. हे व्यायाम अगदी साधे, कार्यालयात देखील करण्यासारखे असतात. आपल्या डॉक्टरांकडून ते जरूर शिकून घ्यावेत. या हालचालींमुळे पाठ, कंबर आणि मानेवरचा ताण हलका होतो. काहींना तासा- दोन तासांनी ब्रेक घेतलेला पुरेल तर काहींना दर अध्र्या तासाने ‘विश्राम’ स्थितीत यावे लागेल. ब्रेक घेणे म्हणजे काम थांबवून पुन्हा संगणकावरच फेसबुक किंवा तत्सम काहीतरी करणे नव्हे! ब्रेक घेतल्यावर ती पाच मिनिटे तुम्ही संगणकापासून दूर राहायला हवे. या काळात उभे राहून पाठीचे व्यायाम करा किंवा कार्यालयात या टोकापासून त्या टोकापर्यंत चक्कर मारून या.
चष्म्याचा क्रमांकही तपासून घ्या.
नेहमी संगणकावर काम करणाऱ्यांनी आपला चष्म्याचा नंबर बरोबर आहे ना हे ठराविक काळाने तपासून घेतलेले बरे. चष्म्याचा नंबर बदललेला असला तर डोळ्यांवर वाढीव ताण येतो. मानदुखी आणि डोकेदुखीसाठीही हे कारणीभूत ठरू शकते. चाळिशीनंतर बहुतेक जणांना वाचताना चष्मा लागतो, पण ही मंडळी चष्मा घालायचे टाळतात. त्यामुळे आपल्याला चष्मा असेल तर संगणकावर काम करताना तो घालायचे विसरू नका. चष्मा असताना तो न वापरणे हे देखील मान दुखण्याचे एक कारण ठरू शकते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- संपदा सोवनी / सकाळ
January 18, 2017
शेवटी १ नोव्हेंबर १९५८ रोजी सीमाप्रश्नावर सत्याग्रह करण्याचा संयुक्त महाराष्ट्र समितीने निर्णय घेतला. भाई माधवराव बागल यांनी पहिल्या सत्याग्रहाच्या तुकडीचे नेतृत्व केले. तो शनिवारचा दिवस होता. बेळगावात बाजाराचा दिवस असतांनाही सत्याग्रहाला अभुतपूर्व पाठिंबा मिळाला. विशेष म्हणजे बेळगावातील कन्नड भाषिकांनीही आपले सर्व व्यवहार बंद ठेऊन समितीच्या आंदोलनाला एक प्रकारे पाठिंबाच व्यक्त केला होता.
July 17, 2021
राज्यात उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान आहे. मार्चपासून सुरु होणारा, अंगाची लाहीलाही करणारा उन्हाळा जूनच्या सुरुवातीला पाऊस घेऊन येतो. पावसाळ्यातील हिरवळीत लपेटलेले आल्हाददायी वातावरण, ऑक्टोबरच्या त्रासदायक वातावरणानंतर येणार्या हिवाळ्यात टिकून राहते.
May 16, 2017
नोटाबंदीचा सर्वात मोठा परिणाम लघु उद्योगांवर झाला, नोटबंदीपूर्वी बहुतांशी उद्योगांमध्ये रोखीने व्यवहार होत होते. नोटाबंदीच्या काळात या उद्योगांमध्ये रोखीने व्यवहार होणे बंद झाले, रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांचे उद्योग ठप्प झाले. परंतु पुढील काळात परिस्थिती सुधारली.
December 29, 2022
‘आमीर खानने माफी मागावी’ अशी मागणी करणाऱ्या डॉक्टरांनी, फसवेगिरी करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाही करण्याची मागणी कधी केली काय ? लोकांचा जनआक्रोश ओढवून घेईपर्यंत डॉक्टरांनी हे प्रकरण ताणू नये, अन्यथा त्याचे परिणाम निश्चितच भोगावे लागतील. यापूर्वी योगगुरु स्वामी रामदेवबाबांनीही वैधकीय व्यवसायावर वारंवार कोरडे ओढले, आणि सत्य जगासमोर मांडले आहे.
June 10, 2012
निरगुडी किंवा निर्गुंडी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. विविध रोग व दुखण्यांवर गुणकारी असणाऱ्या काही थोड्या वनस्पतींमध्ये निरगुडीचा समावेश होतो
May 4, 2024
समर्थावर सन्त एकनाथाच्या वाग्मयाचा प्रभाव असल्याने प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला. आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहिले. हिंदुस्थान बलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले.
January 22, 2022

अमिनो आम्लं ही पृथ्वीवरच्या जीवसृष्टीची अविभाज्य घटक आहेत. या अमिनो आम्लांपासूनच आपल्या शरीरातली विविध प्रथिनं तयार होतात. ही अमिनो आम्लं म्हणजे एक प्रकारची नायट्रोजनयुक्त आम्लं आहेत. पृथ्वीवरच्या जीवसृष्टीची सुरुवात होत होती, तेव्हा ही आम्लं अमोनिआ, मिथेन, हायड्रोजन सायनाइड, पाणी यासारख्या साध्या रसायनांच्या मिश्रणापासून निर्माण झाली असावीत. ही निर्मिती आकाशात कडाडणाऱ्या विजेच्या मदतीनं झाली असण्याची एक शक्यता, पूर्वीच्या संशोधनातून दिसून आली आहे.
December 17, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti