(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • निरंजन – भाग २ – आत्मविश्वास भक्ती

    मी हे करु शकते, मला हे जमेलच किंवा हे असच घडेल, अशी अंतर्मनातुन येणारी शाश्वती म्हणजेच आपल्या आतुन येणारा आवाज….आपल्या अंतर्मनातल आत्मविश्वास….क्रूती घडवण्याआधी निकालासाठी रचलेला सकारात्मक द्रुष्टिकोन…….म्हणजेच आत्मविश्वास.

      October 15, 2019


  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? भाग ५

    आयुर्वेद म्हणजे काही केवळ पाळेमुळे नव्हे. हे जगण्याचे शास्त्र आहे. जीवन म्हणजे काय ? का जगावे ? कोणासाठी जगावे ? किती वर्षे जगावे ? कसे जगावे ? या सगळ्याची उत्तरे या शास्त्रात मिळतात, एका ओळीत सांगायचं तर, आयुर्वेद म्हणजे सगळ्यांचा बाप आहे. आता पिताश्री म्हटलं तर तत्वज्ञान ऐकून घेणं, ओघानं आलंच ना. !

      July 31, 2017


  • श्री कनकधारा स्तोत्रम् – ५

    बाह्वन्तरे मधुजित: श्रितकौस्तुभेया हारावलीव हरि‍नीलमयी विभाति।कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला
    कल्याणमावहतु मे कमलालयाया:।।५।।

    बाह्वन्तरे- बाहू म्हणजे हात. त्यांच्या अंतरे म्हणजे आत मध्ये. दोन हातांच्या आत असणारा अवयव म्हणजे छाती.

    मधुजित:- मधु नावाच्या राक्षसाला जिंकणारे. भगवान श्रीविष्णु.

    विश्व रचनेच्या आरंभी भगवान श्रीविष्णूच्याच कानातून निघालेल्या मळा च्या दोन थेंबांमधून मधु आणि कैटभ या नावाचे दोन राक्षस जन्माला आल्याची कथा आहे. त्यांच्याशी युद्ध करून श्रीविष्णूंनी त्यांना मारले.

    श्रितकौस्तुभेया- कौस्तुभ हे भगवान विष्णूच्या गळ्यातील रत्नाचे नाव. त्याने अलंकृत.

    एकत्रित अर्थ पाहता, मधू राक्षसाचे विनाशक भगवान श्रीविष्णूंच्या वक्षस्थलावर रुळणाऱ्या कौस्तुभ मण्याने अलंकृत.

    आई जगदंबेची दृष्टी वारंवार भगवान श्रीहरीच्या हृदयावर जात असल्याने तेथे असणाऱ्या कौस्तुभमण्याने ती दृष्टी अलंकृत होते असा भाव.

    हारावलीव हरि‍नीलमयी विभाति- हरी म्हणजे हिरवा तर नील म्हणजे निळा. हिरवे रत्न पाचू तर निळे रत्न नीलम. महालक्ष्मी चे डोळे तसे हिरवट निळे आहेत. जणु त्या मण्यांची माळ तयार केली तर ती जशी दिसेल तशी आईची कटाक्ष मालिका विभाति म्हणजे शोभून दिसत आहे.

    कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला- भगवंताला देखील जी काम म्हणजे प्रेमभावना प्रदान करते अशी ती कमलालयाया:- कमळामध्ये निवास करणाऱ्या आई महालक्ष्मीची कटाक्षमाला- वारंवार टाकलेले कटाक्ष यांची जणू माला.

    कल्याणमावहतु मे - मला कल्याण प्रदान करणारी होवो."

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      March 14, 2020


  • सिद्धेश्वरयात्रा म्हणजेच गड्डायात्रा

    सोलापूरात श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर हे मंदिर प्रसिद्ध आहे.दरवर्षी १२ जानेवारी रोजी मल्लिकार्जुन मंदिरापासून यात्रेस सुरुवात होते.श्री सिध्दरामेश्वराच्या योग दंडाचे प्रतिक म्हणून नंदीध्वज उभारले जातात. चार दिवस चालणाऱ्या या यात्रेस महाराष्ट्रसह कर्नाटक,आंध्रप्रदेश येथून लोक येतात. यात्रेत सहभागी होणारे भक्त हे पांढरे वस्त्र परीधन केलेले असतात, यास बाराबंदी असे म्हटले जाते.

    १२ जानेवारीला सिध्दरामेश्वरानी स्थापन केलेल्या ६८ लिंगांना तेलाभिशेक केला जातो.१३ जानेवारीला अक्षता सोहळा पार पडला जातो आणि नंतर पुन्हा ६८ लिंगांना प्रदक्षिणा घातले जाते. १४ जानेवारी रोजी रात्री होम मैदानवरील होमकट्टा येते होमविधी सोहळा संपन्न केला जातो.१५ जानेवारी रोजी किंक्रांत असून या दिवशी रात्री शोभेच्या दारूकामाची आतषबाजी होते. १६ जानेवारी रोजी रात्री मालीकार्जुन मंदिरात नंदीध्वजाच्या वस्त्रविसर्जनाने (कप्पडकाळी) यात्रेतील धार्मिक कार्यक्रमाची सांगता होते.

    सिध्दरामेश्वर हे १२व्या शतकातले एक युग पुरुष होते.एके दिवशी कुंभार कन्येने सिध्दरामेश्वर यांना तिचा मानस सांगीतला कि ती सिध्दरामेश्वर याबरोबर विवाह करू इच्छिते, सिद्धरामेश्वर यांनी तिला सागितले कि मी ब्रम्हचारी आहे , माझे विवाह महादेवाशी झाले आहे.तरीही ती कुंभार कन्या ऐकली नाही,त्यावर सिद्धरामेश्वर तिला बोले की तू या माझ्या योगदांडा सोबत विवाह कर पण तुला विवाहाच्या दुसऱ्या दिवशी तुझा देह त्याग करावा लागेल.१३ जानेवारीला विवाह झाला आणि १४ जानेवारीला कुंभार कन्याने तिचा देह त्याग केला.

    यंदा करोना मुळे सोलापुरातील सिद्धेश्वर यात्रेतील नंदीध्वज मिरवणूक रद्द करण्यात आली असून यात्राकाळात भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

    संकलन: संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      January 12, 2022


  • श्रीहरी स्तुति – ३८

    भगवंताच्या चरणी विलीन होण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. हे शास्त्राने सुस्पष्टरीत्या सांगितले आहे. त्यागाच्या या रचनेत शब्दच सर्वस्व असा आहे. यात प्रथम सर्व गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्यानंतर स्व चा देखील त्याग करावा लागतो. त्याच वेळी परमात्म तत्त्वाची प्राप्ती होते. हीच प्रक्रिया उलगडून दाखवताना आचार्य श्री म्हणतात,

      November 28, 2020


  • संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – (२) – (ब) /११

    भाग – (२) – (ब)

    • ईशान्य भारत :

    निखिल जोशी यांनी ईशान्य भारताचा उल्लेख केलेला आहे. त्यांचा असा समज दिसतो की, या भूभागाशी संस्कृत व संबंधित-संस्कृती यांचा कांहीं संबंध नाहीं. पण प्रत्यक्षात तसें नाहीं.

    (कदाचित, निखिल जोशींना, बोडो, नागा इत्यादी टोळ्या अभिप्रेत असतील. पण, मध्य-भारत व पूर्व-भारतातील ऑस्ट्रो-एशियाटिक , म्हणजे मुंडा ; किंवा ईशान्येकडील इंडो-चायनीज वंशाच्या टोळ्या, हा एक संपूर्णपणें वेगळा विषय आहे. आपण फक्त भूभागांसंदर्भात पाहूं या).

    • इरावती कर्वे यांनी असें analysis केलेलें आहे की, पुरातन कालीं, पूर्वेकडून ब्रह्मदेश (म्यानमार) व चीन भागातून लोकसमूह भारतात आले, व इथें स्थायिक होऊन भारताचा भाग बनून गेले. या वंशाचे लोक आसामपासून बंगालपर्यंत (आणि बंगालच्या थोडे पश्चिमेस व थोडे दक्षिणेस ) पसरलेले आहेत. अर्थात्, इथल्या स्थानिक लोकांशी सांस्कृतिक व लग्नसंबंध आल्यामुळे तेथील लोक mixed वंशाचे झाले. म्हणजेच, जसें शक, कुषाण, हूण व भारतात-वसलेले-ग्रीक यांचें झालें, तसेंच पूर्वेकडेही झालेलें आहे ; ते पूर्णपणें भारतीय संस्कृतीत मिसळून गेले आहेत, तिचा अविभाज्य भाग झालेले आहेत.
    • *बंगालबद्दल सहसा कोणी कांहीं शंका घेत नाहीं, कारण त्याबद्दल आपल्याला कांहीं माहिती असतेच. *इतिहास जाणणार्‍यांना, राजा खारवेल व उडीसाबद्दलही माहिती असते.

    *(तरीही आपण त्या दोन्ही भूभागांबद्दल नंतर पाहूंच).

    • आसाममधील ‘अहोम’ राजवट ही ब्रह्मदेश-सीमेवरील भागातून मध्ययुगात आलेल्या लोकांची आहे. तरीही , त्या काळातही आसाम भागाचा व संस्कृत-संस्कृतीचा संबंध आहे.
    • आसाम, त्रिपुरा व उडीसा या भागांवर बंगालची छाप आहे, हें निश्चित. त्रिपुरा तर अगदी ब्रह्मदेशाच्या सीमावर्ती प्रदेशात आहे, म्हणजे आसामच्याही पलिकडे. तेथें बंगाली चालते. त्यामुळे, जे बंगालला लागू होतें, तेंच भाषा व संस्कृतीच्या संदर्भात त्रिपुरालाही.
    • म्हणजेच, फक्त ईशान्य भारताचाच वेगळा, separate, विचार करून उपयोगी नाहीं; तर, ईशान्य भारत व पूर्व भारत यांचा एकत्रित विचार करायला हवा.
    • आसाम भागाचा महाभारकालीन उल्लेख ‘प्राग्ज्योतिष’ असा आहे ; तर नंतरच्या, गुप्तकालात, आसाम व बंगालचा कांहीं भाग यांचा उल्लेख ‘कामरूप’ असा आहे.

    याचा अर्थ स्पष्ट आहे की, या भूभागाचा संबंध पुरातन ‘मध्यदेश’ (पश्चिम यू.पी.) व मगधाशी होता.

    • आसाममधील हरिहर विप्र यानें रामायण व महाभारत या दोन्हींवर आधारित रचना केलेल्या आहेत. माधव कंदाली यानेंही रामायणावर आधारित रचना केलेली आहे. आसामसाठी एवढी उदाहरणें पुरेशी आहेत.
    • उडियामध्येही, सरल दास यानें महाभारतावर आधारित रचना केलेली आहे. (संदर्भ : ‘The Mahabharata Revisited’, Edited by R.N. Dandekar).
    • जयदेवाचें गीतगोविंद हें सुप्रसिद्ध संस्कृत काव्य आहे. त्याचें जन्मस्थान उडीसात, किंवा बंगालमध्ये, किंवा मिथिला भागात मानले जाते. याचा अर्थ, या भूभागांचा संस्कृतशी व संस्कृत-संस्कृतीशी नक्कीच होता.
    • ब्रह्मवैवर्त पुराण बंगालच्या परिसरात निर्माण झालेलें आहे. (संदर्भ : नरहर कुरुंदकर) . बंगालमधील चंडीदास, चैतन्य महाप्रभू यांच्या रचना संस्कृत-संस्कृतीच्या परंपरेशी जोडलेल्या आहेत. उदा. कुरुंदकर सांगतात की, इ.स. च्या ९व्या शतकात राधेची परंपरा (संस्कृतमधून) आलेली आहे.
    • ‘संस्कृत ही व्यवहारात निरुपयोगी भाषा’ ( इति निखिल जोशी ) . तसें आहे काय ? -

    मी संस्कृतचा वृथाभिमानी नाहीं, आणि संस्कृत ही भारताची राष्ट्रभाषा ‘व्हायलाच’ हवी असा माझा आग्रह नाहीं. मात्र, निखिल जोशी यांची statement मला योग्य वाटत नाहीं. आज प्रादेशिक भाषा बोलल्या जातात व साहित्यही त्यांच्यात निर्माण होतें, हें खरें. परंतु, संस्कृत निरुपयोगी कशी ?

    • आजच्या काळात बरेच प्रश्न आहेत, व ते सोडवायला हवेत, हें मान्य ; पण पुरातन साहित्य-संस्कृतीच्या अभ्यासानें नक्कीच आपलें व्यक्तिमत्व समृद्ध होतें, mature होतें, व आपण society ला त्याचा फायदा करून देऊं शकतो. आणि, हें समाजातील सगळ्या लोकांनी करायला हवें असें नाहीं. पूर्वीही सगळीच्या सगळी जनता, across-the-board, संस्कृत व संस्कृतीचा विचार व अभ्यास करत नसे, व आजही सर्वांनी तसें करायची आवश्यकता नाहीं.
    • पण त्याहीपेक्षा अधिक महत्वाचे मुद्द्दे पुढे आहेत.
    • पहिलें उदाहरण : बडोद्याचे multi-disciplinary विद्वान प्रा. दिनेश माहुलकर यांच्याकडून मला मिळालेल्या महत्वाचा माहितीचा मी इथें उल्लेख करत आहे.

    माहुलकर हे, इंग्रजी-भाषा, भाषाशास्त्र, संस्कृत, गणित वगैरे विविध विषयाचें ज्ञान असलेले बहुआयामी विद्वान होते. त्यांचे, ‘वृद्धि:’ , ‘Pre-Paninian Grammer’ हे महत्वाचे ग्रंथ आहेत. पाणिनीच्या आधीच्या , म्हणजे आर्ष-संस्कृतबद्दलचा त्यांचा ग्रंथ आधुनिक काळातील एक महत्वाचा ग्रंथ आहे. अगदी उतारवयातही माहुलकर , शिमला / देहरादून येथील एका संस्थेचे consultant म्हणून कार्यरत होते. ही संस्था संस्कृतच्या आधारानें महासंगणकाची आज्ञावली ( software) तयार करूं पहात होती. त्या संस्थेचें व माहुलकारांचेंही म्हणणें असें की, संस्कृत ही अगदी compact भाषा आहे, आणि, महासंगणकाच्या आज्ञावलीसाठी ती ideal आहे. प्रत्यक्ष या आज्ञावलीचें काय झालें / होणार , याची मला कल्पना नाहीं, माहुलकरही आतां हयात नाहींत. पण, वरील गोष्टीवरून, संस्कृतच्या, आजच्या काळातही असलेल्या महत्वाची कल्पना येईल.

    - दुसरें उदाहरण : श्री. द.मा .लेले हे ‘दाते पंचांगा’त पावसाचें भविष्य लिहीत असत. त्यांनी १९८५ मध्ये भरलेल्या हवामान परिषदेत, ‘वृष्टिविचार’ या नांवाचा प्रबंध वाचला होता. त्यात त्यांनी, कृषि-पराशर, वराहमहिराची बृहद्-संहिता इत्यादी पुरातन ग्रंथांचा उपयोग करून, वर्षा-ऋतूत किती व कधी पाऊस पडेल याचें पूर्वानुमान कसें करायचें, हें स्पष्ट केलें होतें. विशेष म्हणजे, इस्रोचे कांहीं शास्त्रज्ञही लेले यांचा पावसाच्या पूर्वानुमानाच्या बाबतीत सल्ला घेत असत. (संदर्भ : ‘कृषिज्ञानकोश’ चे संपादक श्री. अशोक माहदेव जोशी यांचा, २०.३.२०१६ च्या लोकसत्तातील लेख ).

    -तिसरे उदाहरण : आजच्या काळात ऍलोपथीचें खूप महत्व आहे यांत वाद नाहीं. पण कांहीं वेळा, ऍलोपथीपेक्षा, उपचाराच्या अन्य पद्धती अधिक-उपयुक्त व कमी-हानिकारक ठरतात. त्यामुळे हल्ली ‘Alternate Medicine’ या क्षेत्राला पुन्हां महत्व येऊं लागलें आहे ; आणि त्यातील एक महत्वाची पद्धति आहे आयुर्वेद. (तिबेटी चिकित्सापद्धतीतही आयुर्वेद आहेच, कारण तिच्यात आयुर्वेद व चिनी चिकित्सापद्धतीचें मिश्रण आहे ) .आयुर्वेदाचें खरें ज्ञान हवें असेल तर, चरक-सुश्रुत-वाग्भट इत्यादींचे संस्कृत ग्रंथ वाचायलाच हवेत. मला एक केरळीय आयुर्वेदिक प्रॅक्टिशनरनें सांगितलें की, केरळमध्ये, आयुर्वेद शिकणार्‍यांसाठी संस्कृत भाषेचें शिक्षण अनिवार्य होतें / आहे, आणि अर्थातच, संस्कृतमधील आयुर्वेदीय ग्रंथाचा अभ्यासही.

    (पुढे चालू )

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.

    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126

    eMail : vistainfin@yahoo.co.in

    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

      September 16, 2016


  • जळू , जळवा (Leech, Hirudinea)

    मित्रहो, पावसाळ्याचे दिवस आहेत. पाण्यात पाय टाकताना काळजी घ्या. पाण्यात “जळू” असू शकतो

      July 24, 2017


  • प्रत्येकाची आनंदाची व्याख्या निराळी

    दैनंदिन जीवनांत आपण काहीतरी शोधत असतो. हा शोध नेमका कशाचा असतो ह्याचा अंदाज काहीवेळा येत नाही. खरं तर हा शोध आनंद प्राप्तीचा असतो. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या जशी निराळी असते, तशीच अनुभूती देखील वेगवेगळी असते. आपापल्या अनुभूती आणि प्रचीतीनुसार आपली आनंदाची व्याख्या तयार होत असते. आनंद आपल्या अंतरंगात निर्माण होत असतो.

      March 2, 2022


  • अमेरिकेतील थॅंक्सगिव्हींग सेल – भाग ५

    बर्‍याच दुकानांमधे या सेलसाठी दुकानाची नेहमीची व्यवस्था (arrangement) बदललेली असते. काही दरवाजे बंद केलेले असतात. काही isles देखील बंद केलेल्या असतात. त्यामुळे लोकांचा लोंढा एका ठरावीक दिशेने आणि ठरावीक ठिकाणी वळवता येतो आणि एकंदर गोंधळ थोडा कमी होतो. शिवाय सेलमधल्या सर्व वस्तू एक दोन दिवस आधीपासूनच मांडून ठेवलेल्या असतात. प्रत्येक दुकानामधे विविध कंपन्यांच्या सेल मधे लावलेल्या वस्तू देखील मर्यादित प्रमाणातच असतात. बरेच लोक सेलच्या एक दोन दिवस आधी वेगवेगळ्या स्टोअर्समधे फिरुन आपल्याला हव्या असलेल्या वस्तू नेमक्या कोणत्या isle मधे, कोणत्या शेल्फवर, कुठे ठेवल्या आहेत, ते प्रत्यक्ष बघून येतात. त्यामुळे या अशा अनुभवी व जाणकार लोकांकडे काय काय घ्यायचे आहे त्याची पक्की यादी असते, कोणत्या दुकानात कोणी किती वाजता जायचं याचं प्लॅनिंग असतं आणि प्रत्येक स्टोअरची अंतर्गत मांडणी आणि आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंची नेमकी ठिकाणं असलेला नकाशा असतो. वर्षानुवर्षांचा अनुभव असलेली बुजुर्ग मंडळी अशा जय्यत तयारीनिशी, पहाटेपासून एखाद्या मंदिराच्या दाराशी भाविकांनी भक्तीभावाने गर्दी करावी, तशी थंडी वार्‍याची पर्वा न करता तिष्ठत उभी असतात. मग सहा वाजता स्टोअर्सची दारं उघडली, की ‘हर हर महादेव’ असं ओरडून मावळे जसे किल्याची दारं फोडून मोगलांवर तुटून पडायचे, तसे हे खरेदी बहाद्दर सेलच्या वस्तूंवर तुटून पडतात.

    मला आजूबाजूला काय होतंय ते समजायला दोन तीन मिनीटे लागली. तोपर्यंत लोकांनी shopping carts घेऊन, आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या शेल्फसपर्यंत धाव घेऊन, आपल्याला हव्या त्या वस्तूंनी आपापल्या carts भरायला सुरुवात केली होती. कुठे भांबावण्य़ाचा, अडखळण्याचा, कुणाला काही विचारण्याचा प्रश्नच नव्हता. सगळा नकाशा आणि strategy प्रत्येकाच्या डोक्यात पक्की होती. माझ्यासारखे व देशमुखांसारखे त्या स्टोअरमधे पहिल्यांदाच प्रवेश करणारे फारच थोडे असावेत. मी कशी बशी एक shopping cart मिळवली आणि electronics चा विभाग शोधत निघालो. लोकांची गर्दी आणि त्यांच्या carts नी isles भरून गेल्या होत्या. त्यातून वाट काढता काढता, दादर स्टेशनच्या ब्रीजवरून, ऐन गर्दीच्या वेळी गाडी पकडायला चालल्याचा भास होत होता. आपल्या देहयष्टीला न शोभणारी आणि भौतिकशास्त्राचे नियम खोटे पाडणारी चपळाई दाखवत, माणसं शॉपिंग करता करता पळत होती (किंवा पळता पळता शॉपिंग करत होती).

    सगळी माणसं एकमेकांना शह, काटशह दिल्याप्रमाणे, एकमेकांना चकवत इकडून तिकडे पळत होती. सगळी धावपळ आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंपर्यंत इतरांच्या आधी लवकरात लवकर पोहोचण्याची होती. सुदैवाने मला एक सेल्सगर्ल लगबगीने बाजूने जाताना दिसली आणि त्या गोंधळात तिचे लक्ष वेधून घेऊन, “DVD players कुठे ठेवले आहेत”, हे विचारण्यात मी यशस्वी ठरलो. तिला लगेच ‘पावनं दुसर्‍या गावचं दिसंतय’ हे लक्षात आलं. दुकानाची दारं उघडून पूर्ण पाच मिनिटं झाली आणि तरीही माझी cart अजूनही रिकामीच आहे, हे बघून तिला बहुतेक माझी दया आली आली असावी. तिने चक्क त्या गर्दीतून वाट काढत, मला DVD players ठेवलेल्या शेल्फपर्यंत पोहोचवलं. तिचे आभार मानून मी उरलेल्या DVD players मधून मला हवा असलेला DVD player उचलला. नंतर पुढच्या दहा पंधरा मिनीटांत आणखीन हव्या असलेल्या दोन तीन वस्तू शोधल्या. देशमुखांचा पत्ता नव्हता. एवढया मोठया दुकानात आणि एवढया गर्दीत त्यांना शोधणं सोपं नव्हतं.

    माझं त्या दुकानातलं शॉपिंग संपलं होतं. त्यामुळे मी check out करण्यासाठी एका काऊंटर पुढच्या रांगेत जाऊन उभा राहिलो. एवढयात मला निसर्गाच्या हाकेला ओ देण्याची वेळ आली. पहाटे तासभर थंडीत कुडकुडत उभं राहिल्यामुळे मला आता rest room ला जाण्याची आवश्यकता वाटू लागली होती. त्यामुळे check out रांगेमधला माझा नंबर सोडून मी rest room शोधायला निघालो. इकडे तिकडे शोधता शोधता आणि गर्दीतून माझी cart ढकलत मार्ग काढता काढता, पुन्हा एकदा एक सेल्समन देवदूतासारखा समोर आला. मी त्याला थांबवून, rest room ला जाण्याचा रस्ता विचारला. आजूबाजूची पाच दहा माणसं आपली धावपळ विसरून उभी राहिली आणि त्यांनी आश्चर्याने आपादमस्तक मला न्याहाळून घेतलं. ‘हा कोण अडाणी आता शॉपिंग सोडून rest room शोधत फिरतोय’, असा भाव त्यांच्या चेहर्‍यावरून उतू जात होता. एखादी पूर्ण दिवस भरलेली आणि प्रसुतीच्या वेदना सुरू झालेली बाई देखील अशा वेळी शॉपिंग सोडून हॉस्पिटलमधे जायला तयार होणार नाही, याबद्दल माझी खात्री पटली.

    दोन चार मिनिटे मी त्या गोंधळात rest room शोधायची खटपट करून पाहिली. शेवटी तो नाद सोडून मी पुन्हा check out च्या रांगेमधे उभा रहायला गेलो आणि मला माझी चूक समजली. तेवढया त्या चार पाच मिनिटांत माझ्यापुढे जवळजवळ वीस पंचवीस लोकांची रांग तयार झाली होती. असे बारा check out काउंटर्स होते आणि प्रत्येका पुढे अशाच मोठमोठाल्या रांगा लागल्या होत्या. म्हणजे दुकान उघडल्यापासून मोजून पंधरा वीस मिनिटांच्या आत carts भरभरून शॉपिंग करून लोक check out करायला लागले होते. एवढा जीवाचा आटापिटा करून शॉपिंग संपवून बाहेर पडायचं कारण म्हणजे दुसर्‍या दुकानात जाऊन शॉपिंगचा पुढचा टप्पा सुरू करायचा होता.

    – डॉ. संजीव चौबळ

      March 30, 2016


  • बालसाहित्यिकांच्या प्रेरणेची भरारी

    बालसाहित्यिकांच्या प्रेरणेची भरारी

    पुण्यात काही दिवसापूर्वी एका बाल साहित्य महोत्सवाचे उद्घाटन भावार्थ व संवाद तर्फे आयोजित केले होते.आराध्या नंदकर, साक्षी भांड व पालवी मालुंजकर या तीन मुलींनी उद्घाटन केले होते. राजीव तांबे यांनी या तीनही मुलींची साहित्यिक म्हणून मुलाखत घेतली. अनेक बाल साहित्य संमेलनातूनही मुलांची पुस्तके प्रसिद्ध होत आहेत.असे उपक्रम प्रेरणेचे वारंवार घडायला हवेत. पुस्तक प्रदर्शनातही आता मुला मुलींचे साहित्यिक म्हणून पुस्तकें स्टाॅल वर ठेवली जातात.मुले लिहीत आहेत ती केवळ प्रेरणेमुळेच. समृद्ध माणसांचा राबता घरात असण्याबरोबरच पुस्तकांचाही राबता घरात असेल तर मुले वाचू लागतात, लिहू लागतात.

      June 27, 2025