वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आडनावाची खरोखर गरज आहे का? आडनावे काय सांगतात? आडनाव सोडले तर काय बिघडते? विवाहानंतर महिलांनी कोणते आडनाव लावावे? सासरचे? की माहेरचे आडनाव सोडूच नये? की सासर-माहेरचे जोड आडनाव धारण करावे?
September 30, 2010
अस्थिर भागात लष्कराने अतिबळाचा वापर करू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असून, यावर निव्रुत्त लष्करी अधिकाऱ्यांनी प्रतिकुल प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मणिपूरमध्ये मागील 20 वर्षांत अनेक बनावट चकमकीची प्रकरणे घडली असून, त्यांचा तपास होणे गरजेचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.
July 19, 2016
“नकारात्मक विचारांची माणसं मला आवडतात” हे वाक्य वाचून जर तुम्हाला मी विचित्र/विक्षिप्त वाटलो तर थोडं थांबा…… आता असा विचार करा, नकारात्मक विचारांचा सुद्धा कित्ती सकारात्मक पद्धतीने विचार केलाय या अवलीयाने…..
September 10, 2018
काश्मीरवर हक्क दाखवण्याची आंतरिक उर्मी पाकिस्तानला स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळेच पाकिस्तान, काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारताबरोबर वारंवार युद्धाची भाषा बोलत आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी राजकारण्यांची “बेबाक बकबक’ नुकतीच गाजली आणि आपण असे बोललोच नव्हतो असा खुलासा करण्याची पाळी नवाज शरीफांवर आली.
December 26, 2013
आज भारतीय प्रजासत्ताक स्थापन होऊन ६७ वर्ष झाली. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचं राज्य. लोकशाहीची मला माहित असलेला अर्थ म्हणजे ‘लोकांनी लोकांसाठी चालवलेलेले लोकांचे राज्य’. ही व्याख्या पूर्वी कधीतरी शाळेत असताना दोन मार्कांसाठी पाठ केलेली अजुनही आठवते. या व्याख्येतल्या अर्थापेक्षाही त्यातील लय आणि तालामुळे ती जास्त लक्षात राहीली.
February 8, 2017
दोन डिसेंबर, १९८४ च्या मध्यरात्री मध्य. प्रदेशातील भोपाळ येथील ‘युनियन कार्बाइड’च्या मेथिल कारखान्यात आयसोसायनाइट ऊर्फ मिक वायू वातावरणात सुटून जो प्रचंड अपघात झाला, तो औद्योगिक क्षेत्रातील जगातला आजवरचा सर्वात मोठा अपघात असे समजले गेले.
February 20, 2023
इथे वापरलेला सम शब्द हा सर्वधर्मसमभाव यामधल्या सम पेक्षा थोडा वेगळा आहे. समभाव हवाच, पण नको त्या ठिकाणी नको. इतर जण जर सम भावाने पाहात असतील, कृती करत असतील तर समभाव आपणही जरूर दाखवावा. नको त्या ठिकाणी समभाव दाखवत गेलो तर अबू चे रूपांतर बाबूत होते आणि नंतर हे डोक्यावर चढून बसतात.
July 30, 2017
हेच ज्यांचे आनन ते गजानन. आनन म्हणजे तो़ड अर्थात ओळख. म्हणजे निर्गुण निराकार अनादि-अनंत परब्रम्ह हीच ज्यांची ओळख आहे त्यांना गजानन असे म्हणतात. “गजमस्तक” चा हाच अर्थ असतो.
September 3, 2019
आज ४ तारिख... चार (४) या आकड्याची आणखी गंमत बघा.....
थोडी कडू थोडी गोड पण जिला नाही तोड अशी ही चौपदरी कथा आहे !
चारची खरी बाजू ' चार ' दिशेत
आहे !
' चार ' खांबांशिवाय घर बांधता येत नाही.
' चार ' गोष्टी शिकल्याशिवाय शहाणपणा येत नाही.
' चार ' चौघात जे बोलू नये ते बोलले की गालावर ' चार ' बोटे उमटल्याशिवाय राहत नाहीत.
' चार ' शब्द सणसणीत सुनावणे म्हणजे कानाखाली ' चार ' आवाज काढण्या सारखेच असते.
चौघे म्हणजे जणू ' चार ' वेद आणि यांनी एकमेकास गुणिले की दुप्पट उपनिषदे होतात.
' चार 'चा 'वर्ग' केला की माणूस तरुण होतो अन सोळाव्या वर्षात पाऊल ठेवतो.
"चार"च्या 'वर्गा'स पुन्हा "चार"ने गुणले की जगातल्या सर्वात 'बुद्धि'मान खेळातले चौसष्ट घरांचे 'बळ' मिळते !
यांची टीका ही ' चौफेर ' असते.
यांचे फटके म्हणजे ' चौकार ' असतात !
चारचे सामर्थ्य देवीच्या ' चार ' भुजांसारखे असते अन पावित्र गाईच्या ' चार ' पावलांसारखे असते...
ज्या विहिरींचे पाणी शेतकरी पिकाला पाजतो ती सुद्धा कमीत कमी ' चार ' परस खोल असावीच लागते.
' चार ' वाफे असल्याशिवाय मातीत बांध घालता येत नाहीत.
' चार ' पाकळ्या असल्याशिवाय फुलाला शोभा येत नाही !
जगातल्या ' चौघां 'चेही असेच असते. यांनी ' चार ' शिव्या दिल्या शिवाय जगाला शहाणपण सुचत नाही.
अन ' चार ' गोष्टी हिताच्या सांगितल्याशिवाय सुख दुःखे उमजत नाहीत.
ज्या घरात आपण राहतो तेदेखील ' चौसोपी ' असल्याशिवाय त्याला रुबाब येत नाही !
चौसोपी घराबाहेर ' चारचाकी ' असली की शान अधिक वाढते !
' चार 'चौघांना विचारल्याशिवाय खरे सत्य समजत नसते.
' चार ' लोकांपासून ' चार ' हात लांब राहिले तर खरे मित्रही कळत नाहीत !
युगे देखील " चार "झाली आहेत. कृत, त्रेता, द्वापार आणि कलीयुग ; यावरून ' चौघां 'चा महिमा जाणावा.
स्वर जरी सात असले तरी सामान्यतः बोलताना ' सारेगम ' कळले म्हणजे संगीत आले असं म्हटले जाते !
आपल्या जीवनाचे आधार देखील ' चार 'च आहेत - दोन हात अन दोन पाय !
वर्ण देखील ' चार ' आहेत. ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य नि शूद्र.
लीप वर्ष देखील ' चार ' वर्षानी येते !
जमीन सुद्धा ' चौरस 'च शुभ समजली जाते.
माणूस हुशार झाला की त्याला ' चौकस ' बुद्धीचा समजलं जातं ...
चारोळीत देखील महाकाव्याचा अर्थ लिहिता येतो, चारोळे खाल्ले की तब्येत सुधारते !
' चार ' ढांगा चालले की मातीचा अंदाज येतो.
' चार ' कडवी वाचली की कवितेची गोडी लागते.
' चार ' संवाद ऐकले की नाटके पहावीशी वाटतात.
' चार ' घास खाल्ले की पोट भरल्यासारखे वाटते.
' चार ' घटका लवंडले की आराम मिळाल्या सारखे वाटते.
' चार ' वाती प्रज्वलित केल्या की मनातला अन घरातला अंधार दूर होतो.
' चार ' पुस्तके वाचल्याशिवाय ज्ञानाची ओढ लागत नाही.
मंगलकार्य साजरे करताना सनई बरोबर ' चौ 'घडे वाजल्याशिवाय रंगत कसली ती येत नाही !!
' चार ' वाईट जर एकत्र आले तर मात्र ती चांडाळ 'चौकडी' होते.
' चार ' चांगले लोक एकत्र आले तर मात्र इतिहास बदलतो.
इतकेच कशाला चितेवर ' चार ' लाकडे ठेवल्याशिवाय चिता पूर्ण होत नाही.
' चौघां 'च्या खांद्यावर गेल्याशिवाय जीवनातला प्रवास पूर्ण होत नाही.
आयुष्याच्या अंती मातीत चिरनिद्रा घेताना सुद्धा ' चार ' फुट खोल खांदावेच लागते , त्याशिवाय शीणलेल्या जीवाला खरा आराम मिळत नाही !
सरते शेवटी असं म्हणेन की जीवनात जीवाला जीव लावणारे
' चार ' मित्र असल्याशिवाय जीवनाचा अर्थ उमगणार नाही, उमजणार नाही !!
September 4, 2016
काल सुप्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू यांचे ‘कार्डियक अरेस्ट’ च्या कारणाने निधन झाले, हे ऐकून सगळ्यांना शॉक बसला. संपूर्ण देशात पुन्हा चर्चा सुरु झाली की, गेल्या काही काळापासून या कारणाने मृत्यु होणाऱ्याच्या संख्येत वाढ होत आहे.
कार्डियक अरेस्ट म्हणजे काय?
कार्डियक अरेस्ट म्हणजे अचानक ह्रदयाचे काम करणे बंद होणे होय. विशेष म्हणजे हा आजार दिर्घ काळाचा नसतो, यासाठी ह्रदयाशी संबंधीत असलेल्या आजारांपेक्षा याला खूपच धोकादायक मानले जाते.
लोक याला ह्रदय विकाराचा झटकाच समजतात, मात्र कार्डियक अरेस्ट ह्रदय विकाराच्या झटक्यापेक्षा वेगळा असतो. तज्ज्ञांच्या मते, कार्डियक अरेस्ट तेव्हा होतो, जेव्हा ह्रदय शरीराच्या चारही बाजूंनी रक्तसंचार करणे बंद करते. मेडिकल नियमांनी म्हटले तर ह्रदय विकार सर्कु लेटरी समस्या आहे आणि कार्डियक अटॅक इलेक्ट्रिक कंडक्शनमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे होतो.
आपल्या छातीत दुखायला लागले की, ह्रदय विकाराच्या झटक्यादरम्यानच याप्रकारचे दुखते असे आपण समजतो, मात्र तज्ज्ञांच्या मते, असे दुखणे हार्ट बर्न किंवा कार्डियक अटॅकच्या कारणानेही होऊ शकते.
कार्डियक अरेस्टमध्ये ह्रदयाचे ब्लड सर्कुलेशन पुर्णत: बंद होते. ह्रदयाच्या आत वेंट्रीकुलर फाइब्रिलेशन निर्माण झाल्याने याचा परिणाम ह्रदयाच्या ठोक्यांवर होतो. यामुळे कार्डियक अरेस्टमध्ये काही मिनिटातच मृत्यु होतो.
कार्डियक अरेस्ट अचानकच होतो. विशेष म्हणजे ज्यांना ह्रदयासंबंधी आजारपण आहे, त्यांना कार्डियक अरेस्ट होण्याची शक्यता जास्त असते.
कधी-कधी कार्डियक अरेस्ट अगोदर छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, पल्पीटेशन, चक्कर येणे, शुद्ध हरपणे, थकवा किंवा ब्लॅकआउट होऊ शकते.
याच्या उपचारासाठी रुग्णास कार्डियोपल्मोनरी रेसस्टिसेशन (सीपीआर) दिले जाते, ज्यामध्ये ह्रदयाच्या गतीला नियमित केले जाऊ शकते. शिवाय या रुग्णांना ‘डिफाइब्रिलेटर’ने विद्युत शॉक देऊन हार्ट बीटला नियमित करण्याचा प्रयत्न केला जातो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 20, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti