(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नैवेद्य भाग ५

    अकाल मृत्युहरणम
    सर्वव्याधिविनाशनम,
    विष्णु पादोदकं तीर्थं
    जठरे धारयाम्यहम् ।।

    तीर्थ ग्रहण करताना हा मंत्र म्हणतात. मंत्र म्हटलेलं पाणी आणि साधं पाणी यांचं केमिकल अॅनालेसिस कदाचित एकच येईल. पण आपण या एचटुओ मधे श्रद्धा निर्माण केली की, पाण्याचंच तीर्थ बनतं.
    त्यासाठी आपला विचार भारतीय हवा. देवावर श्रद्धा हवी आणि मुख्य म्हणजे स्वतःवर विश्वास हवा.

    तसेच
    अच्युतानंद गोविंद
    नामोच्चरण भेषजात ।
    नश्यन्ति सकला रोगाः
    सत्यम् सत्यम् वदाम्यहम् ।।

    हा श्लोकदेखील म्हणतात.
    अन्न असो वा औषध, देवाचं नाव घ्यावं आणि निश्चिंत व्हावं.
    मी परत परत खात्रीनं सांगतोय, असं श्लोककर्ता वारंवार बजावून सांगतोय, पण नाही पटत.

    औषधं सर्व रोगानाम्
    श्रद्धया हरिसेवनम असं वाग्भटाचार्यदेखील म्हणतात.

    काही गोष्टींची कारणमिमांसा केली तरी बुद्धीच्या स्तरावर उत्तरे मिळत नाहीत. अनेक औषधे तयार करत असताना काही विशिष्ट श्लोक, स्तोत्र, मंत्र म्हणावेत, म्हणजे औषधाची कार्यकारी क्षमता वाढते.
    याला अनुभवाशिवाय दुसरा वैज्ञानिक पुरावा काय देता येणार.

    मी घेत असलेले अन्न किंवा औषध हे ईश्वरीय इच्छेने घेत आहे, माझे कर्तृत्व शून्य आहे. अशी मनाला सम किंवा शून्य स्थितीत आणून ठेवणारी अवस्था निर्माण करून जेव्हा अन्न वा औषध सेवन केले गेले तर त्याचे परिणाम सकारात्मक दिसतात, असे आजचे मानसोपचार तज्ज्ञ देखील म्हणतात.

    हे केवळ भारतीय लोकच म्हणतात, असंही नाही, होमीयोपॅथीमधे पण आय ट्रीट, ही क्युयर्स असंच म्हणतात ना !
    अगा म्या नाही केले असे माऊलींचे शब्द आहेत. असो.

    अन्न सेवन करत असतानाची भावना महत्वाची असते. म्हणून अन्नसेवन करण्यापूर्वी देवाला नैवेद्य दाखवावा.
    यात आणखी एक भाव असतो, तुझेच तुजला अर्पण !
    तूच तुझ्या शक्तीने तयार केलेले, तुझे अन्न मी तुला अर्पण करतो.

    ज्यांचा देवावर विश्वास नाही, देवाला आम्हीच बनवले आहे, आम्हीच निवृत्त केले आहे, अश्या विचारसरणीच्या मंडळींनी देखील त्या अज्ञात शक्तीला शरण जावे, आपण घास घेण्यापूर्वी हा विचार जरूर मनात निर्माण करावा.

    आता नैवेद्यातील कर्मकांड.
    वाढलेल्या पानाभोवती पाणी हातात घेऊन, ताटाभोवती डावीकडून ऊजवीकडे गोलाकार फिरवावे. आणि ताटातील चार सहा शीते बाहेर काढून ठेवावीत. पाण्याची ही गोलाकार रेषा ही ताटात येणाऱ्या सूक्ष्म जीवांसाठी जणुकाही लक्ष्मणरेषा तयार झाली. आता बाहेरील जीव ताटात येणार नाहीत, पण त्यांना सुद्धा आपल्यातील अन्नाचा भाग मिळावा, पाण्याच्या काढलेल्या रेषेवरून, अन्न शोधत येणार्‍या जंतुना पटकन अन्न मिळावे. म्हणून चित्राहुती.
    असंही असू शकेल.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    11.09.2016

      September 11, 2016


  • बसू दे थोडा चटका !

    ऊन किती तापलंय म्हणत तुम्ही तुमच्या मुलांना बाहेर पडूच देत नसाल, तर मोठेपणी त्यांचे दात लवकर पडणार आणि जाता-येता हाडं मोडणार, हे नक्की. - हे असं का?

    उन्हाळा पेटला की, भडकलेल्या सूर्यापासून बचाव कसा करावा? याचे किमान हजार उपाय आणि पर्याय सुचवले जाऊ लागतात.

    उन्हाळा असो वा नसो, एकूणच तापत्या उन्हापासून दूर राहावं आणि लहान मुलांना तर उन्हात अजिबात फिरकूच देऊ नये, असं मानणारी एक भलती जीवनशैली रुजू लागली आहे.

    सूर्याला आपल्या आयुष्यातून असं हद्दपार करणं आणि उन्हात जायची वेळ आलीच तर डोक्यावर टोपी, त्यावर स्कार्फ, डोळ्याला गॉगल असा जामानिमा करूनच बाहेर पडणं यातून आपण काय कमावतो?

    तर ‘ड’ जीवनसत्त्वाची जीवघेणी कमतरता.

    वनस्पती अन्नाच्या बाबतीत स्वावलंबी असतात. त्या त्यांचे अन्न तयार करू शकतात. त्यांच्या देहात हरितद्रव्य असते. या हरितद्रव्याच्या आधाराने, पाणी आणि कार्बन डायॉक्साईडवायू हे मूळ घटक वापरून सूर्याच्या उपस्थितीत वनस्पतींना कर्बोदके बनवता येतात. वनस्पतींनी बनवलेले हे अन्न खाऊन इतर प्राणी जगतात. आपण माणसेही तसेच करतो. अन्नाप्रमाणेच जीवनाला अतिशय अल्प प्रमाणात लागणारी जीवनसत्त्वेही आपण वनस्पतींकडूनच मिळवतो.

    जीवनसत्त्वांचा शोध लावणार्‍यांनी त्यांना रासायनिक नावे दिली. मात्र ती लक्षात ठेवायला अवघड म्हणून त्यांना जीवनसत्त्व अ, ब, क, ड, ई, के इत्यादि नावे दिली. एवढंच नाही तर त्यांच्यापैकी कोणाच्या अभावामुळे शरीराला कोणत्या प्रकारचा त्रास होतो याचीही माहिती संशोधन करून मिळवली आणि आपल्याला सांगितली.

    जीवनसत्त्वे शरीराला आवश्यक असतील तर ती शरीर स्वत:च का निर्माण करत नाही? ती इतरांच्या जीवावर का अवलंबून ठेवली आहेत? एका जीवाने दुसर्‍या जीवाला पुष्ट करावे असे निसर्गाला वाटते? अर्थात निसर्गाने सर्वच जीवांना परावलंबी केलेले नाही आणि सर्वच बाबतीत परावलंबी केलेले नाही.
    आपण माणसे कोणत्या जीवनसत्त्वांत्या बाबतीत स्वावलंबी आहोत? केवळ दोन जीवनसत्त्वं अशी आहेत ज्यांच्याबाबतीत माणूस स्वावलंबी आहे. जीवनसत्त्व ‘ब’ मधील काही प्रकार आणि जीवनसत्त्व ‘ड’ आपल्या शरीरात तयार होतात. त्यापैकी जीवनसत्त्व ब मधील काही प्रकार आपल्या पचनसंस्थेत सुखानं राहणारे आपले मित्र जीवाणू तयार करतात. मात्र जीवनसत्त्व ‘ड’ आपलं आपणच तयार करतो.

    जीवनसत्त्व ड तयार होण्यासाठी – कोलेस्टेरॉल – कच्चा माल म्हणून लागते.कोलेस्टेरॉलमुळे शरीराला आवश्यक असणारी अनेक विकरे किंवा हार्मोन्स बनतात. त्या शिवाय सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पित्तरस. यकृतात कोलेस्टेरॉलचा वापर करून पित्तरस बनतो. हा पिवळसर हिरवा रंग असणारा पित्तरस लहान आतड्यात अन्न पचविण्याचं काम करतो. आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल बनलेच नाही तर आपल्याला अनेक शारीरिक क्रिया करताच येणार नाहीत. कोलेस्टेरॉल आपला शत्रू नाही तर जन्माचा जोडीदार आहे.हे कोलेस्टेरॉल सूर्यप्रकाशाच्या मदतीनं त्वचेच्या वरच्या स्तरात ‘ड’ जीवनसत्त्व तयार करतं, उन्हात जायचं ते त्यासाठी ! सूर्यापासून प्रकाश मिळतो त्यात विविध प्रकारच्या प्रकाश लहरी असतात. त्यांपैकी अतिनील - ब किंवा अल्ट्राव्हायोलेट- बी (290 ते 320 नॅनोमीटर ) प्रकारच्या तरंगलहरी ड जीवनसत्त्व बनण्यासाठी उपयुक्त असतात. सूर्य उगवताना तांबूस दिसतो कारण सूर्य आणि आपल्यामध्ये हवेचा थर जाड असतो. त्यातून येताना बाकीचे तरंग इतस्तत: फेकले जातात आणि तांबड्या रंगाच्या लहरीच आपल्यापर्यंत पोचतात. सूर्य वर चढेल तसतसा सूर्य किरणांना पार करायला लागणारा हवेचा थर कमी कमी होत जातो. अधिक तरंगलांबीच्या लहरी आपल्यापर्यंत पोचतात. मग सूर्याचा प्रकाश पांढुरका आणि प्रखर दिसायला लागतो. अशा प्रकाशात अतिनील ‘ब’ किंवा अल्ट्रा व्हॉयोलेट बी प्रकारच्या तरंगलहरी असतात. त्या ‘ड’जीवनसत्त्व तयार करण्यासाठी आवश्यक असतात. कोलेस्टेरॉलपासून ‘ड’ जीवनसत्त्व बनतं ते आपल्या त्वचेच्या वरच्या स्तरात. जितकी त्वचा सूर्यप्रकाशाला उघडी असेल तितक्या प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्वाचे कच्चे रेणू तयार होतात. हे काम अगदी कोवळ्या उन्हात होऊ शकत नाही. सूर्य साधारण क्षितिजापासून पंचेचाळीस अंश वर आला की, हे काम सुरू होतं. सकाळच्या म्हणजे कोवळ्या नव्हे; पण चटका बसणार्‍याही नव्हे अशा उन्हातच आपलं शरीर ‘ड’ जीवनसत्त्व बनवू शकतं. (25 ते 30 मिलीग्रॅम प्रती चौरस सेंटिमीटर). आधुनिक जीवनशैलीत उन्हा-तान्हातले कष्ट आणि सूर्य यांना हद्दपार करण्याला ‘विकसित’झाल्याचं मानलं जातं. ती कल्पना लवकरात लवकर दूर केली पाहिजे. कारण न वापरल्यानं माणसाची शेपूट गेली. तसेच न वापरल्यानं शरीराची ‘ड’ जीवनसत्त्व निर्माण करणारी यंत्रणा संपायला नको.

    ऊन, घाम, अंघोळ आणि साबण !

    उन्हात त्वचेवर बनलेले ‘ड’ जीवनसत्त्वाचे कच्चे रेणू शरीराच्या आत जायला साधारपणे दोन तास घेतात. यासाठी उन्हातून फिरून आल्यावर लगेचच अंघोळ करू नये. उन्हातून फिरून आल्यानंतर अंघोळ करताना उघड्या त्वचेवर साबण लावणं टाळावं. उघड्या त्वचेवरील ‘ड’जीवनसत्त्वाचे कच्चे रेणू तयार झालेला भाग साबणात विरघळतो आणि अंग घासताना अंगावरून पडून गटारीत वाहून जातो. या अंघोळीच्या वेळेला झाकलेल्या जागी काखेत, जांघेत साबण लावायला हरकत नाही.

    उन्हात फिरल्यानंतरचे अठ्ठेचाळीस तास !

    सकाळच्या उन्हात फिरण्याला आपण सूर्यस्नान म्हणू. सूर्यस्नानात तयार झालेले ‘ड’ जीवनसत्त्वाचे कच्चे रेणू नंतर शरीरात यकृत या अवयवात जातात. तिथे त्यांचे रेणू थोडे पक्केहोतात. त्यानंतर ते मूत्रपिंडाकडे नेले जातात. तिथे त्यांचे पक्के ‘ड’जीवनसत्त्व होते. त्यालाच डॉक्टरी भाषेत ‘कोलेकॅल्सिफेरॉल’ म्हणतात. या प्रक्रियेला अठ्ठेचाळीस तास लागतात.

    ‘ड’ जीवनसत्त्व मूत्रपिंडात तयार झालं की, त्याचं सर्वात महत्त्वाचं कार्य सुरू होतं... ते म्हणजे शरीरातून लघवीवाटे बाहेर पडणार्‍या कॅल्शिअमला पकडून परत शरीरात कार्यरत करणं. आपल्या शरीरात कॅल्शिअमची कमतरता निर्माण झाली तर शरीर हाडातून-दातातून हाडं पोखरून कॅल्शिअम काढून घेतं. (आपल्याला घर बांधणीसाठी दगड लागतात ते आपण गावाच्या आसपासच्या टेकट्या, डोंगर पोखरून मिळवतो. पोखरलेले डोंगरही पावसापाण्यामुळे कोसळू शकतात.) पोखरलेली हाडं ठिसूळ बनतात. अशी हाडं मोडण्याची शक्यता वाढते.

    स्कार्फ आणि सनस्क्रीन लावण्यापूर्वी..

    उन्हामुळे त्वचा काळवंडते म्हणून घराबाहेर पडल्यावर अनेक मुली-स्त्रिया विशेषत: वाहन चालवताना चेहरा झाकून घेतात, हातपायही झाकून घेतात. त्यांच्यात ‘ड’जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण होऊ शकतो. त्वचा उजळ करण्याचे दावे करणारी क्रीम्स शिवाय ‘सनस्क्रीन’ लावतात. त्यातील रसायनं त्वचेच्या आत ऊन जाऊ देत नाहीत. कितीही‘माइल्ड’ क्रीम असलं तरी ते अतिनील ‘ब’ किरणांना त्वचेच्या आतल्या भागापर्यंत पोचू देत नाही. त्यामुळेच ‘ड’जीवनसत्त्व तयार होण्यास मज्जाव होतो.

    सतत ऊन टाळत राहिलात तर..

    आपल्या शरीरात एक मिलिलिटर रक्तात ५0 ते ७0 नॅनोग्राम इतक्या प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्व असावंच लागतं. इतकंसं ‘ड’ जीवनसत्त्व आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ३000 जनुकांना कार्यरत ठेवतं. ही जनुकं कार्यरत राहिली नाहीत तर शरीरात अनेक व्याधी आणि आजार निर्माण होऊ शकतात.
    ड जीवनसत्त्वाचा अभाव ओळखण्याची सर्वात सोपी परिक्षा म्हणजे – छातीचे हाड अंगठ्याने दाबा.
    दाबल्यावर कळ आली किंवा दुखले तर ड जीवनसत्त्वाचा अभाव असू शकतो.

    ड जीवनसत्त्वाअभावी

    ऑस्टिओपोरोसीस म्हणजे हाडांमध्ये पोकळ्या वाढतात. पुढे मन दडपलेले असणे, मधूमेह, लठ्ठपणा, सोरायसीस, दुभंगलेली मनोवस्था, स्तनाचा, गर्भाशयाचा, प्रोस्टेटचा कर्करोग अशा अनेक विकारांची पायाभरणी होऊ शकते.

    इतकी पाळी कशाला येऊ द्यायची ?
    त्यापेक्षा उन्हात थोडे उघड्याने फिरून –बसू दे थोडा चटका!

    लेखक - विनय र.र.
    स्रोत :मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग

    संकलन - #ज्ञानभाषामराठी

    (आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)

      April 25, 2017


  • जाडेपणा – एक समस्या…

    आपल्या देशात सौंदर्याच्या ज्या परिभाषा आहेत त्याच मुळात चुकीच्या आहेत. त्या परिभाषेतूनच परीचा जन्म झालेला असावा. सुंदर स्त्री म्हणजे सडपातळ ! आणि जाडी स्त्री म्हणजे कुरूप आणि म्हणता येणार पण दुर्लक्षित करावी अशी. सध्या हा विषय ऐरणीवर आलाय त्याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत.

      February 10, 2021


  • निरंजन – भाग २५ – शैलपुत्री

    दुर्गामातेचा पहिला अवतार आहे, माता शैलपुत्री….. शैलपुत्री नावामधील शैल चा अर्थ आहे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या. शैलपुत्री म्हणजे हिमालय पुत्री…. आता आपण पाहूया माता शैलपुत्रीच्या जन्मावताराची कथा….

      October 20, 2020


  • हमने तुमको देखा

    संपूर्ण “खेल खेल में ” महाविद्यालयीन जोशाने भरलेला ! हा, नीतू आणि राकेश रोशन – रॅगिंग , स्टेजवरील धमाका , थोडीशी रहस्य फोडणी , ” आजा मेरी बाहो में आ ” वाली अरुणा . बाहेर आलो तेव्हा खऱ्या अर्थाने तरुण झाल्यासारखं वाटलं.

      May 7, 2022


  • सोनोग्राफी

    मानवी शरीरातील नेहमी तपासता न येणाऱ्या भागाचे निरीक्षण करण्यासाठी आपल्या कानांना ऐकू न येणाऱ्या म्हणजे अल्ट्रासाउंड ध्वनी लहरींचा वापर केला जातो. क्ष-किरणांप्रमाणेच या ध्वनिलहरी हव्या त्या भागावर केंद्रित करता येतात.  अल्ट्रासाऊंड म्हणजे श्राव्यातील ध्वनी लहरींचा उपयोग करून शरीराची तपासणी करण्याच्या तंत्राला सोनोग्राफी असे म्हणतात.

      November 1, 2022


  • जागतिक मानसिक आरोग्य दिन

    मानसिक आजारातून पुन्हा लोकांना आपल्या पायांवर खंबीरपणे उभे राहता यावे यासाठी वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ ही संस्था काम करते.

      October 10, 2021


  • सती सावित्री

    ( अर्थात वटपौर्णिमा व्रत )

    स्त्री जातीचा मुकुटमणीं महासती मान मिळोनी
    धन्य झाली जीवनीं पतीव्रता सावित्री //१//

    ब्रह्मा लिखित अटळ ह्या सूत्रीं केला बदल
    हे तिच्या तपाचे फळ सावित्रीने मिळविले //२//

    जरी येतां काळ चुकवावी वेळ
    बदलेल फळ हेच दाखविले तीने //३//

    समजण्या धर्म पतिव्रता ऐकावी सावित्री कथा
    मनीं भाव भरुनी येतां आदर वाटे तिच्या परीं //४//

    मद्रदेशाचा नृपति नांव तयाचे अश्वपति
    कन्या त्याची सावित्री प्रेम करी तिजवर //५//

    कन्या होती उपवर धाडीले शोधण्या वर
    राजा करी कदर कन्येच्या इच्छेची //६//

    फिरुनी सर्व देशी न मिळे कुणीही तीजशी
    आली एका आश्रमापाशी दृष्टीस पडला एक युवक //७//

    नजर त्यावरी पडूनी स्तंभित राजकन्या होऊनी
    रुप लागली न्याहाळूनी सत्यवान युवकाचे //८//

    तेजोमय युवक पाहूनी भान जाय हरपूनी
    राजकन्येने वरिले मनोमनी संकल्प लग्नाचा करी //९//

    राजपूत्र होता सत्यवान पिता जाई राज्य गमावून
    अंधत्व पित्याचे त्यास कारण वनवासी झाले सारे //१०//

    सावित्री परतूनी घरीं सर्व हकीकत कथन करी
    आवड तिची सत्यवानापरी मनीं त्यास वरिले //११//

    चर्चा करीत समयीं नारदाचे आगमन होई
    आनंदी भाव भरुनी येई पुता पुत्रीचे //१२//

    वंदन करुनी देवर्षीला कन्येचा संकल्प सांगितला
    आशिर्वाद मागती लग्नाला सावित्री सत्यवानाच्या //१३//

    नारद वदले खिन्न होऊनी लग्न संकल्प द्यावा सोडूनी
    विचार काढावा मनातूनी सत्यवानाविषयी //१४//

    दुर्दैवी आहे सत्यवान त्याची आयुष्यरेषा लहान
    एक वर्षांत जाईल मिटून जीवन त्याचे //१५//

    हे आहे विधी लिखीत म्हणून होत निश्चीत
    कोण करील बदल त्यांत प्रभूविना //१६//

    ब्रह्मा लिखीत अटळ झडप घालीतो काळ
    न चुके कधी ही वेळ हीच निसर्ग शक्ती //१७/

    थर्रर्र कापला नृपति चकीत झाली सावित्री
    ऐकून भयंकर भविष्याती सत्यवानाच्या //१८//

    सावरोनी स्वतःशी विचार करी मनासी
    वदू लागली नारदासी निश्चयीं स्वरानें //१९//

    प्रथम दर्शनी वरिले मनोंमनीं पती मानिले
    सर्वस्वी अर्पिण्या संकल्पले कशी त्यागू मी त्याना //२०//

    काया वाचा मन सत्यवाना अर्पून
    पतिठायी त्याना वरुन ह्रदयीं बसविले //२१//

    निवड करता पतीची मनीं बसवुनी प्रतिमा त्याची
    कल्पना न यावी दुजाची हाच स्त्रीधर्म //२२//

    सप्त-पावली हा उपचार होण्या सर्व जगजाहीर
    धार्मिक विधी एक प्रकार राहीला असे //२३//

    स्त्रीचा असता हा धर्म कां सुचविता अधर्म
    सांगा यातूनीच मार्ग सावित्री विनवी नारदासी //२४//

    पतिव्रता ही श्रेष्ठ शक्ति करोनी पति भक्ति
    ईश्वर मिळविण्याची युक्ती सांगू लागले नारद //२५//

    पतिभक्ति करुन तपसामर्थ्य येइल महान
    तेच नेईल उध्वरुन पावन होता प्रभू //२६//

    बघूनी सावित्रीचा निश्चय नारद आनंदी होय
    आशिर्वाद देऊनी जाय नारायण नाम घेत //२७//

    दृढ निश्चयाची शक्ति सावित्रीस चेतना देती
    माहित असून भविष्याती उडी घेई जीवनयज्ञांत //२८//

    राजकन्या सावित्री सत्यवानासंगे वनाती
    लग्न करोनी राहती संसार करण्या //२९//

    पतीसी समजूनी देव त्याचे ठायीं आदर भाव
    मनीं बसवी त्यांचे नांव अवरित //३०//

    नामात असते लय लयांत एकाग्रता होय
    एकाग्र मनी ईश्वरी भाव परमेश्वर सान्नीध्याचा //३१//

    पति हाच परमेश्वर न पूजे दुजा ईश्वर
    सावित्री त्याचे चरणावर अर्पण करी सेवा //३२//

    सेवेत असते तप शक्तीचा तो दीप
    प्रज्वलीत होईल आपोआप तपः सामर्थ्य वाढता //३३//

    सोडूनी काळजी काळाची पर्वा नव्हती वेळेची
    अंतरीक इच्छा समर्पणाची पतीच्या अल्प अयुष्यी //३४//

    वर्षा अखेरचा दिवस भयाण घेत विश्रांति सत्यवान
    वटवृक्षाखाली होता झोपून सावित्री देत मांडीचा आसरा //३५//

    आयुष्याची रेखा संपता जीवन दोर जाई तुटतां
    प्राणज्योत नेई यमदुता त्याक्षणीं //३६//

    फांस घेऊन यमदूत नेण्या सत्यवान प्राणज्योत
    टाकले फांस गळ्यांत सत्यवानाच्या //३७//

    सावित्रीची तपशक्ति देई तिज दिव्य दृष्ठी
    सोडून फास गळ्याभोवती देई दूर फेकून //३८//

    यमदूत जाई घाबरुन हतबल झाले ते बघून
    सावित्रीची शक्ति जाणून रिक्त हस्तें गेले यमपूरीं //३९//

    यमराज मृत्युदंडाधिपती संतापून ते येती
    नेण्या प्राणज्योती सत्यवानाची //४०//

    यमराज प्रभूचे दिक् पाळ मृत्युरुपी ते महाकाळ
    अपूर्व त्यांचे बळ राज्यकरीं यमपूरी ///४१//

    नेवून मानव प्राणज्योत कर्माप्रमाणे शिक्षा देत
    पाठवूनी नविन देही परत जीवन गाडा चालवी //४२//

    रेड्यावर बैसूनी यमराज आले धाऊनी
    हातीं फांस घेऊनी प्राण नेण्या सत्यवानाचे //४३//

    बसूनी सत्यवाना शेजारीं पतीधर्माचे ध्यान धरीं
    रक्षण कवच उत्पन्न करी पती पत्नी भोवती //४४//

    तपाची दिव्य शक्ति यमराजासी येण्या रोकती
    फांस त्याचे न पोहोंचती सत्यवाना पर्यंत //४५//

    बघूनी ते तेजोवलय यमराज चकीत होय
    शोधूं लागला उपाय सत्यवानाची नेण्या प्राण ज्योत //४६//

    पतीकडून पाणी मागवून सावित्रीस दूर सारुन
    प्राण ज्योती घेई काढून सत्यवानाची //४७//

    यमराज निघाला स्वर्गी सावित्री त्याच्या मागे मार्गी
    पतिव्रता शक्ति तिचे अंगीं चेतना देई मार्गक्रमण्यास //४८//

    मनीं तिच्या पतिभक्ति बघून अपूर्व शक्ति
    यमराज प्रसन्न होती सांगतले वर मागण्या //४९//

    श्वशुराचे अंधत्व गेले राज्य तया परत मिळाले
    वडीलांस पुत्र प्राप्त झाले सावित्री मिळवी तीन वर //५०//

    न पावली समाधान पाठलाग चालूं ठेवून
    यमासी ठेवीत झुलवून चर्चुनी विषय निराळे //५१//

    शेवटचा मी वर देईन परी तू जावे परतून
    मानव देहा स्वर्ग कठीण कसे राहशील तूं तेथें ? //५२//

    जीवन आतां माझें व्यर्थ न उरे जगण्या अर्थ
    एकटेपणा ठरेल अनर्थ माझ्या आयुष्यीं //५३//

    इच्छा माझी व्हावे माता सानिध्य मुलाचे मिळतां
    एकटेपणाचा भाव न राहता उर्वरीत जीवनामध्यें //५४//

    पाठलाग घेण्या सोडूनी तथास्तू म्हटले यमानी
    मान्य तिची विनंती करुनी वर देई तिला //५५//

    तथास्तू म्हणतां क्षणी धरती गेली हादरुनी
    भयंकर विजा चमकोनी निसर्ग उत्पात माजला //५६//

    मान्य केले मातृत्व नसता जीवित पितृत्व
    शक्य कसे हे अस्तित्व चुक उमगली यमराजा //५७//

    निसर्गाच्या नियमाला तथास्तूने धक्का दिला
    नियतीचा डाव उलटला सावित्रीच्या शक्तिनें //५८//

    जसा सुटावा बाण तसा शब्द जाऊन
    यमराज पेचांत पडून हारला सावित्रीपूढे //५९//

    सोडून देई प्राणज्योत सत्यवान जीवदान मिळत
    अखंड सौभ्याग्यवती वरदान मिळाले सावित्रीला //६०//

    वटवृक्षाखालती पाऊनी सतीशक्ति
    जीवदान मिळती सत्यवाना //६१//

    ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला स्त्रीया पूजती वटवृक्षाला
    अखंड मिळण्या सौभाग्याला सावित्रीप्रमाणे //६२//

    पतिपत्नीतील प्रेमभाव समजोनी मनाचा ठाव
    एकमेका आदरभाव हीच दिर्घायुष्याची गुरु किल्ली //६३//

    // शुभंभवतु //

    डॉ. भगवान नागापूरकर
    १३- २५११८३

      January 13, 2018


  • सत्यनारायण नको जनता जनार्दन प्रसन्न करा

    हे काम सुद्धा भाजपा सरकारनेच केले आहे. या सरकार मध्ये सुद्धा काही कट्टर पंथीय आहेत. पण त्यांचा विरोध जुगारून जर हि कामे होत असतील तर मी या सरकारचे मना पासून अभिनंदन करतोय. अजूनही लोकांना धर्माची खऱ्या अर्थाने जाणीव करून देण्याची गरज आहे. भाजपा सरकारने ती करावी हीच अपेक्षा आहे.

      January 22, 2017


  • आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग ३

    Specialization चं पुढचं पाऊल म्हणजे फार्म्स, एकाच प्रकारच्या जनावरांचे, त्यांच्या जन्मापासून ते कत्तलखान्यात जाईपर्यंत संगोपन करण्याऐवजी, त्या संपूर्ण प्रक्रियेतला केवळ एखादाच टप्पा करतात. त्यामुळे वय किंवा वजनाच्या एकेका टप्प्यानुसार, या वाढणार्‍या जनावरांची रवानगी वेगवेगळ्या specialized फार्मसवर केली जाते. डेअरी फार्म्सवर हा प्रकार कमी दिसतो. बहुतेक डेअरी फार्म्सवर स्वत:च्या फार्मवर पैदा झालेल्या कालवडी वाढवल्या जातात, भविष्यकालीन गायी म्हणून त्यांची काळजी घेतली जाते. बहुतेक डेअरी फार्म्सवर स्वत:पुरतं थोडंफार तरी धान्य स्वत:च्या जमिनीवर उगवलं जातं आणि फार्मवरचं दूध किंवा निरुपयोगी जनावरं विकायचं काम देखील स्वत:च केलं जातं. परंतु बीफ, वराहपालन आणि पोल्ट्रीच्या व्यवसायात मात्र, जनावरांच्या/पक्षांच्या वाढीच्या/वयाच्या टप्प्यानुसार, वेगवेगळ्या फार्म्सवर केलं जाणारं संगोपन, ही अगदी नित्याची बाब झाली आहे. त्यामुळे एखाद्या फॅक्टरीतल्या conveyor belt वरून सरकणार्‍या मालाप्रमाणे, ही जनावरे एका फार्मवरून दुसर्‍या फार्मवर पाठवली जातात.

    जस जसे फार्म्स मोठे होऊ लागतात आणि त्यांची उत्पादकता वाढू लागते, तसंतसं त्यांचा दर एकका (unit) मागचा उत्पादन खर्च कमी होऊ लागतो. त्यामुळे मोठ्या फार्म्सना अधिक मोठं होण्यासाठी उत्तेजनच मिळतं. या उलट, लहान फार्म्स या मोठ्या फार्म्सच्या तुलनेत आपला उत्पादन खर्च तेवढा कमी करू शकत नाहीत. ही आर्थिक विषमता वाढतच जाते आणि मग छोट्या फार्म्सना एक तर या उद्योगातून बाहेर पडावं लागतं किंवा एखाद्या खास वैशिष्ट्य असलेल्या मार्केट (niche market) चा शोध घ्यावा लागतो. असाच एक जाणवण्यासारखा फरक म्हणजे, जरी बहुतांशी फार्म्स कौटुंबिक मालकी हक्काचे असले तरी, वाढत जाणार्‍या फार्म्सच्या आकारमानामुळे आणि तरूण पिढी शेती/ पशुपालनापासून दुरावत चालल्यामुळे, फार्म्सवर काम करण्यासाठी घरातील माणसांऐवजी पैसे देऊन बाहेरून मदत घेणं वाढत चाललं आहे.

    एकंदरीत पशुसंवर्धनाच्या क्षेत्राला एका मोठ्या जाळ्याचं (network) रूप येत चाललं आहे. “एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ” हे ब्रीदवाक्य इथे लागू पडल्यासारखं वाटतं. पूर्णपणे स्वावलंबी फार्मची संकल्पना मागे पडून, परस्परांना पूरक असे फार्म्स, एकमेकांच्या सहाय्याने आपापल्या वाटणीचा कार्यभाग पार पाडताना दिसतात. जनावरांसाठी धान्य उगवणारे फार्म्स, पशूखाद्य बनवणार्‍या कंपन्या, जनावरांची ने आण करणार्‍या ट्रक्सच्या कंपन्या, वेगवेगळ्या वयोगटातील जनावरांचे संगोपन करण्यात विशिष्ट नैपुण्य मिळवलेले फार्म्स, जनावरांची विक्री - लिलाव करणारी केंद्रे, कत्तलखाने, या सार्‍यांचे पाय एकमेकात गुंतलेले असतात. फार्म्सच्या वाढलेल्या आकारामुळे प्रत्येक घटकाची जबाबदारी आणि आर्थिक गुंतवणूक देखील खूपच मोठी असते. त्यामुळे एकंदर सारा कारभार परस्परांमधल्या स्नेहसंबंधांपेक्षा, रुक्ष आणि कोरड्या करार मदारांवर (contracts and agreements) आधारलेला असतो.

    डॉ. संजीव चौबळ

      November 18, 2015