वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
एखाद्या देशात साधारणपणे, ५ वर्षे राहिले की सर्वसाधारण समाजाची कल्पना येऊ शकते. साउथ आफ्रिका, स्पष्टपणे, ४ समाजात विभागाला आहे. १] काळे (मूळ रहिवासी), २] गोरे (जवळपास ३०० हून अधिक वर्षे वास्तव्य), ३] भारतीय वंशाचे (नुकतीच १५० वर्षे पूर्ण झाली!!) ४] कलर्ड ( मिश्र संयोगातून जन्मलेला समाज).
October 1, 2018
नानारत्नविचित्रभूषणकरी हेमाम्बराडम्बरीमुक्ताहारविलम्बमानविलसद्वक्षोजकुम्भान्तरी ।
काश्मीरागरुवासिताङ्गरुचिरे काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥२॥
नानारत्नविचित्रभूषणकरी- संस्कृतचे जे शब्द मराठीत वेगळ्याच अर्थाने वापरले जातात त्यातील एक शब्द म्हणजे विचित्र. मराठीत तो अजब , विक्षिप्त या अर्थाने वापरतात. मात्र संस्कृतमध्ये चित्र म्हणजे विविध रंगांनी आकर्षक. तर त्याला लावलेल्या विशेष या अर्थाच्या उपसर्गाने विचित्र म्हणजे विशेष आकर्षक. अत्यंत सुंदर.
आई अन्नपूर्णा अशा अनेक अत्यंत सुंदर रत्नांनी बनविलेली आभूषणे धारण करते म्हणून तिला नानारत्नविचित्रभूषणकरी असे म्हटले आहे.
हेमाम्बराडम्बरी- हेम म्हणजे सोने. अंबर म्हणजे वस्त्र. आडंबरी म्हणजे झाकलेली. सोनेरी जरकाम केलेले वस्त्र धारण केलेली.
मुक्ताहारविलम्बमानविलसद्वक्षोजकुम्भान्तरी- आई अन्नपूर्णेच्या विश्वक्षुधाशांतीकारक स्तनकुंभांच्या वर तथा मध्यभागात, मुक्ताहार अर्थात मोत्याच्या माळा रुळत असतात.
काश्मीरागरुवासिताङ्गरुचिरे- काश्मीरागरु म्हणजे काश्मीर प्रांतात सापडणारे आगरू नावाचे काळ्या रंगाचे विशेष चंदन. त्यासोबत काश्मिरातील केशर आणि हिमालयाच्या पायथ्याशी मिळणारी कस्तुरी. यांच्या उटीच्या सुवासाने अंग आकर्षक असणारी.
काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी - हे सकल कृपेचा आधार असणाऱ्या माते अन्नपूर्णे ! मला भक्ती ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा दे.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
February 28, 2020
दर वर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष च्या चतुर्थीस करवा चौथ व्रत असते. परंपरेनुसार हिंदी भाषीय विवाहित महिला यादिवशी पहाटेच स्नान करून शिव शंकराला व सूर्याला जल अर्घ्य देवून सकाळ ते रात्री चंद्र दर्शनापर्यंत उपाशी राहून आपल्या पतीच्या लांब आयुष्यासाठी चंद्र देवतेस प्रार्थना करतात. भारतात मुख्यत्वे राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाना, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये हे पारंपारिक व्रत विवाहित महिला दरवर्षी करतात.
October 26, 2017
प्राप्तं पदं प्रथमत: किल यत्प्रभावान्मांगल्य भाजि: मधुमाथिनि मन्मथेन।
मय्यापतेत्दिह मन्थर मीक्षणार्द्धं
मन्दालसं च मकरालयकन्यकाया:।।७।।
प्राप्तं पदं प्रथमत: किल यत्प्रभावान्- पद शब्दाचा अर्थ स्थान. प्राप्त म्हणजे उपलब्ध होणे. प्रथमतः अर्थात पहिल्याच वेळी. किल यत्प्रभावात् अर्थात तिच्या प्रभावामुळे.
मांगल्यभाजि- अर्थात सकलम मंगलाचे पात्र, अधिष्ठान असणारे.
मधुमाथिनि- मधु नावाच्या दैत्याचे मथन अर्थात विनाश करणारे जे भगवान विष्णू त्यांच्यात, अर्थात त्यांच्या हृदयात
मन्मथेन- भगवान कामदेवाने, मदनाने.
ए
कत्रित अर्थ पाहता जिच्या प्रभावामुळे मध्वरी भगवान विष्णूंच्या हृदयात मदनाला पहिल्यांदा स्थान मिळाले अशी.
आई महालक्ष्मी मुळेच भगवान विष्णूंचा मनात प्रथम प्रेमभाव निर्माण झाला अशी.
तिच्या शिवाय अन्य कोणत्याही स्त्रीला भगवान विष्णूच्या हृदयात स्थानच नाही आणि तिच्यामुळे पहिल्यांदाच भगवान विष्णूंच्या मनात प्रेमभाव निर्माण झाला असल्याने पहिले प्रेम रूपात भगवान विष्णूची अत्यंत प्रिय असणारी देवी लक्ष्मी. तिची ती अत्यंत प्रभावशाली दृष्टी, मन्थरम्- वळणदार. इतर वेळा या शब्दाचा अर्थ वाकडी असा होतो. आईच्या नजरेतील कटाक्ष वक्रता येथे अपेक्षित आहे.
ईक्षणार्द्धं- अर्धवट दृष्टी. अर्धोन्मिलित नेत्र कटाक्ष.
मन्दालसं - मंद अर्थात हळुवार. आलस अर्थात जडावलेली.
व्यक्ती जेव्हा भोजनादिक तृप्ती दायक गोष्टींनी तृप्त होऊन आपल्याच आनंदात रममाण असते त्यावेळी तिची दृष्टी अशी मंद आलस युक्त होते. आई महालक्ष्मी परम तृप्त असल्याने तिची दृष्टी अशी आहे. मकरालयकन्यकाया:- मकर म्हणजे मगर. समस्त जलचर प्राण्यांचे प्रतीक. त्यांचे आलय म्हणजे राहण्याचे स्थान अर्थात समुद्र. त्याची कन्या ती मकरालयकन्यका.
तिची ती प्रेमळ दृष्टी
मय्यापतेत्दिह- येथे माझ्यावर वर्षाव करो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 16, 2020
ऑफीसमधील शिष्टाचारांमध्ये योग्य पेहरावापासून स्वत:चे टेबल, कागदपत्रे नीट ठेवण्यापासून सहकार्यांशी बोलणे, वागणे, फोनवरील संभाषण, इ-मेलचा वापर, इतकेच काय दुसर्यांच्या तोंडावर न खोकणे-शिंकणे, व स्वच्छतागृहाचा वापर यांचाही समावेश होतो. आपल्या वागण्या-बोलण्या-राहण्यात टापटीप असली पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्यापासून दुसर्याची काही गैरसोय होऊ नये, मग उपद्रव तर दूरच.
October 18, 2018
घरातील सांप्रदायिक वातावरणामुळे पारमार्थिक संस्कार लहानपणापासून झाले होते. ते अलौकिक बुद्धिमत्तेमुळे विविध विषयांत पारंगत होत होते. रामचंद्रांना संस्कृत विषयात रस होता. एकीकडे त्यांचे आध्यात्मिक विषयांचे वाचन, श्रवण, मनन, निदिध्यास सुरु होते, तर दुसरीकडे त्यांच्या शैक्षणिक जडणघडणीच्या काळात पारतंत्र्याच्या जोखडाखाली सापडलेल्या भारत देशात स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. तरुणाई नवचैतन्याने भारुन गेली होती.
August 11, 2022
आकांत ह्या चित्रपटाचं संपूर्ण कथानक ग्रामीण जीवनातील एक भयावह वास्तव मांडणारं आजही ग्रामीण समाजात किती अनिष्ट प्रथा आणि रुढी प्रचलित आहेत. याच्यावर अगदी नेमकेपणाने भाष्य करणारा पारधी दुर्लक्षित, उपेक्षित समाजावर काही अंशी प्रकाश टाकण्याचे काम “आकांत” मधून रेखाटलय.
March 20, 2013
भाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आवाहित केल्या जाणाऱ्या देवतेस जेष्ठागौरी असे संबोधले जाते. या देवतेचे आवाहन अनुराधा नक्षत्रावर आणि पूजन जेष्ठा नक्षत्रावर तसेच विसर्जन मूळ नक्षत्रावर होते. पुराणात थोडेफार उल्लेख आणि मौखिक परंपरेने चालत आलेली कहाणी इतकीच माहिती जेष्ठागौरीविषयी उपलब्ध आहे.
जेष्ठा नक्षत्रावर ही देवी येत असल्याचे तिला जेष्ठागौरी म्हटले जाते. तसेच लक्ष्मीची जेष्ठा भगिनी अलक्ष्मी हिची पूजा या दिवशी केली जाते. जगात सर्वत्र प्रत्येक गोष्टींना चांगली- वाईट, डावी-उजवी अशा दोन विरोधी बाजू असतात. त्यातल्या डाव्या गोष्टीचा त्याग केल्यास अनवस्था निर्माण होते असे मानतात.
वेद वाड्मयत सुद्धा ‘नमो जेष्ठाच च कनिष्ठाय च’ ‘स्तेतानां पतये नमः’ अशी वचने आहेत. यावरून अनिष्ट गोष्टीबद्दल सुद्धा पूज्यभाव मनात बाळगणे, हे मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीचे द्योतक असल्याचे दिसते.
समुद्र मंथनातून श्रीमहालक्ष्मी आणि त्याची बहीण श्रीअलक्ष्मीचा जन्म झाला. श्रीमहालक्ष्मी म्हणजे(येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी) आणि श्रीअलक्ष्मी (म्हणजे येणारे धन जो खर्च होतो त्या खर्चाला श्रीअलक्ष्मी) असे म्हणतात.
याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहिण ‘अलक्ष्मी’ ही देखील पूजनीय आहे. या संदर्भातील प्राचीन आरण्यका अशी आहे. समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले. साक्षात विष्णूने लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी आपल्या जेष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही, असे श्रीलक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला. पण श्रीअल्क्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला. तेव्हा श्रीअलक्ष्मी अश्र्वत्थवृक्षा खाली रडत बसली.
एकदा विष्णू तिथून जात असता त्यांनी तिला रडताना पाहिले. तिची हकिकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला तीन वरही दिले. पहिला वर, जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे. दुसरा वर, शनिवारी अश्र्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पिडा देऊ नये. तिसरा वर, दरवर्षी भाद्रपद महिन्यात जेष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल, असा होता. तेव्हापासून जेष्ठा गौरीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते. ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे. तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते. कारण श्रीअलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यात असते.
या दोन गौरीमधील एक गौर म्हणजे लक्ष्मी घरातच असते. दुसरी बाहेरून आणतात तीच जेष्ठा गौर घरात आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो. यावेळी जमिनीवर रांगोळीने आठ पावले काढली जातात. प्रत्येक पावलावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो. यामध्ये अष्टलक्ष्मी चा समावेश असतो. गौरीचे आवाहन करण्याच्या अनेक पद्धती निरनिराळ्या प्रांतांनुसार प्रचलित आहेत. काही घरात चांदीच्या किंवा पितळ्याच्या किंवा मातीच्या मुखवट्यावर तर काही जणी सुघट (संक्रांत, घट, मातीचे भांडे), काही घरात वाहत्या पाण्याजवळच्या खड्यांवर तर काही जणी मूर्तीवर गौरीचेआवाहन करतात. काही प्रांतात गौरी म्हणजेच शंकराची पत्नी मानून पूजा करण्यात येते. तर काही ठिकाणी गौरीच्या वनस्पतीची रोपटी पूजेसाठी वापरतात. जेष्ठा गौरी म्हणजे माहेरी आलेली माहेरवाशीणच. या दिवशी सासूरवाशिणींना आपल्या माहेरी विशेष मान असतो. गौरी दिवशी घरी विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवण्याची प्रथा आहे. त्यात प्रामुख्याने भाजी-भाकरीचा, ज्वारीच्या कण्याचा समावेश होतो. संध्याकाळी हळदीकुंकवाचा कार्यक्रम करून रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.
अष्टमीच्या दिवशी गौरीपूजन करून पुरणाचा नैवेद्य दाखविला जातो. जेष्ठा गौरी हे पार्वतीचेच विशिष्ट रूप मानले जाते. तिला वैराग्यलक्ष्मीच म्हणतात. लक्ष्मी प्राप्तीनंतर जो मद मस्त, जो अहंकार जोपासला जातो त्या सर्वांवरील उतारा म्हणजे ‘जेष्ठा गौरी व्रत’ असे मानतात.
गौरी पूजना इतकेच महत्व तिच्या विसर्जनाला आहे. जेष्ठा गौरीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर होणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही गोष्टीचा त्याग मूळ नक्षत्रावर केल्यास त्या गोष्टी पुन्हा वाढीस लागत नाहीत, असे मानतात. विसर्जनाच्यावेळी दहीभाताचा नैवैद्य केला जातो. यावेळी या देवतेवर अक्षता वाहून तिला निरोप दिला जातो..
गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि जेव्हा ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून ज्येष्ठा गौरी असेही म्हणतात.
प्रथेचा प्रारंभ आणि इतिहास
गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे. अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाते असे सांगितले आहे.
पुजन माहिती....
श्रीमहालक्ष्मीचे आवाहन
गौरीचे मुखवटे त्यांच्या मुलांसह सर्वप्रथम अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ ठेवले जातात. तिथून त्यांना वाजतगाजत घरात आणलं जातं.
देवघरात देवापुढे ठेवून त्यांना नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर त्यांना स्टँडवर किंवा मडक्यांची उतरंड रचून उभं केलं जातं. गौरींचे मुखवटे हे प्रामुख्याने प्लॉस्टर ऑफ पॅरीसचे पाहायला मिळतात. त्याचबरोबर काही ठिकाणी ते पितळेचे असतात तर काही ठिकाणी ते कणकेचेदेखील बनविलेले असतात. गौरींना साडी नेसविली जाते. त्याचबरोबर त्यांना दागदागिने चढविले जातात.
गौरी ज्या मखरात उभ्या केल्या जातात तो सजवून गौरींच्यापुढे त्यांचा संसार मांडला जातो. शिवाय त्यांच्यापुढे अनेक धान्याच्या राशी मांडलेल्या असतात.
दुसर्या दिवशी आपल्या घराण्याच्या प्रथेनुसार कोणा कडे सकाळी, दुपारी, किवा संध्याकाळी किवा रात्री महापुजन करतात यात पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळतात, हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात तर नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबीरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा मोठा समारंभ केला जातो.
तिसर्या दिवशी तिला खीर-कानवल्याचा( करंजीचा प्रकार मुरड घालुन करतात, गौर मुरडून परत यावी म्हणून) नैवेद्य दाखवुन तिची पाठवणी (विसर्जन) करतात.
अश्याप्रकारे ही माहेरवाशीण येते, राहाते, आणि डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवते पणं परत येण्याचे वचन मात्र देऊन जाते.
September 8, 2016

“मी तिरंगा फडकावून येईन किंवा तिरंग्यात झाकून मला आणले जाईल!” अशी प्रतिज्ञा सैन्यातील जवान करतात आणि युद्धभूमीवर आपलं शौर्य दाखवतात. त्यांचं शौर्य घराघरात नेण्याचं काम ‘लक्ष्य’ फाऊंडेशन करत आहे आणि ह्या फाऊंडेशनची स्थापना केली आहे सौ. अनुराधा प्रभुदेसाई ह्यांनी. ह्याच अनुराधाताईंना भारताचा सैनिक मावशी नावाने ओळखतो. सैनिकांच्या मावशीचा आणि त्यांच्या कार्याचा वेध घेतला आहे निरेन आपटे ह्यांनी.
March 20, 2026
परिक्षा शुल्क भरायलाही पैसे नाहीत म्हणून शिक्षण सोडून गावाकडे परतणारी शेतकऱ्याची पोरं आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील शेतकरी महाविद्यालयांपुढे रांगा लावून उभे असलेले विद्यार्थी असे विरोधाभासी चित्र सध्या दिसत आहे. कधी काळी डॉक्टर, इंजिनियर व्हायचे स्वप्न पाहणारे डोळे मातीत राबवण्यासाठी कृषी अभ्यासक्रमाकडे कसे काय वळू लागले? प्रवेश फेरीसाठी ९४ टक्के गुणांचा कट ऑफ पर्यंत कशी पोहचली? आमची माती आमचे विद्यार्थी हे चित्र कसे काय दिसायला लागले ही विचार करण्यासारखीच गोष्ट आहे.
राज्यातील १७३ कृषी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी यावर्षी रांगा लागल्या. ६२ हजार अर्ज आले. पहिल्या फेरीचे कट ऑफ गुण होते ९४ टक्के. दुसरीकडे अभियांत्रीकीच्या राज्यात किमान ६० हजार जागा रिक्त राहील्या आहेत. बीएड, डीएड महाविद्यालये बंद पडत आहेत. तर फार्मसीसारख्या विषयाकडे विद्यार्थी वळण्यास तयार नाहीत. व्यावसायिक शिक्षणाकडे विद्यार्थी पाठ वळवत असताना कृषी अभ्यासक्रमाला सोन्याचे दिवस आलेले दिसतात.
कृषी क्षेत्रात करियरच्या संधी मागील काही वर्षात झपाट्याने वाढत आहेत असे दिसून येते. पूर्वी बिएस्सी अॅग्री, डिप्लोमा साठी प्रवेश घेणारा विद्यार्थी ग्रामीण भागातलाच असायचा. घरी शेतीवाडी असल्याने सातबारा दाखवून कमी गुणातही प्रवेश मिळायचा. शहरी पोरे शेतकरी महाविद्यालयाकडे पहायची सुध्दा नाहीत.अगदी चार पाच वर्षापर्यंत शेतकी महाविद्यालयेही विद्यार्थ्यांची वाट पहात असत. कारण शेतकर्याचा मुलगाही मास्तर होण्याला जास्त प्राधान्य देऊ लागलेला. लाखा लाखाने डोनेशन भरुन बीएड, डीएड करायचे. त्यानंतरही शिक्षक म्हणून एखाद्या शाळेवर चिकटण्यासाठी जमीनीचा तुकडा विकावा लागायचा. हेही करण्यास ही मुले तयार होती. काळाच्या ओघात शिक्षक भरतीच बंद झाल्याने हाही मार्ग खुंटला. कृषी महाविद्यालयांचा चांगला पर्याय समोर आल्यानंतर सहाजिकच ग्रामीणच नाही तर शहरीमुलेही या अभ्यासक्रमाकडे वळू लागली. विशेष म्हणजे पहिल्या वर्षापासूनच स्पर्धा परिक्षेची तयारी करायची. शेतातल्या या पायवाटेने सरकारी नोकरीत शिरायचे असा उद्देशही साध्य होत होता. या परिस्थितीचा फायदा घेणार नाहीत ते शिक्षण सम्राट कसले. बीएडची दुकाने बंद करुन त्यांनी शेतकरी महाविद्यालयाची उघडली. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणी आघाडीवर होते. कृषी विभागाच्या विविध योजनांमध्ये आपल्याच महाविद्यालयातील विद्याथ्र्यांची कंत्राटी भरती त्यांनी करुन त्यांनी कमाईचा दुहेरी मार्ग यशस्वी केला.
असे असले तरी कृषी क्षेत्रातील करियरच्या विविध संधीमुळे डॉक्टर, इंजिनियरच व्हायचे ही मानसिकता काही प्रमाणात बदलत आहे हेही काही कमी नाही. कृषी अभ्यासक्रमाच्या विविध शाखा सुरु होत आहेत. प्रक्रिया उद्योग, माती शास्त्र, सिंचन, अर्थशास्त्र, हरितगृह, पूरक उद्योग, बाजार व्यवस्थापन, संधोधन या शिवाय पदव्युत्तरनंतर अभियांत्रिकीच्या अनेक संधी निर्माण झाल्याने शेतकीचे शिक्षण घेणे म्हणजे प्रत्यक्ष नांगर हातात धरुन उत्पन्न वाढवण्यासाठी शेतात विविध प्रयोग करणे एवढ्या पुरतेच हे क्षेत्र मर्यादित राहीलेले नाही. किटकनाशके, खते, बियाणे, अवजारे तयार करण्याNया वंâपन्यांमधून तसेच रुरल फायनान्स, बँका मधूनही कृषी पदवीधाराकांना मागणी असल्याने मातीशी प्रत्यक्ष नाते नसलेल्यांनाही कृषी अभ्यासक्रम खुणावू लागले आहेत.
तथापी दुष्काळामुळे पाण्याचे दुर्भिक्ष, शेतमालाला कवडीमोल भाव, प्रक्रियेत उतरण्याची मानसिकता नसलेला शेतकरी अशी अनेक आव्हाने शेतीत उभी असताना कृषी अभ्यासक्रमांकडे विद्याथ्र्यांचा ओढा हे चित्र आशादायी आहे असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नक्कीच नाही असेच द्यावे लागेल. शेतीचे प्रगत तंत्रज्ञान शिकून घेऊन त्याचा उपयोग स्वतःच्या शेतात करणारे विद्यार्थी बोटावर मोजण्याएवढेच आहेत. प्रत्येकाला या क्षेत्रातल्या नोकर्या खुणावत आहेत. नोकरीचा उपयोग शेतीच्या विकासासाठी करतील तर तसेही नाही.. बीएस्सी अॅग्री करुन सरकारी नोकरी मिळवणाऱ्यानाही कार्यालयातील खुर्ची सोडवत नाही. कृषी विस्तार कार्यक्रमात धडाडीने काम करण्यापेक्षा विस्ताराच्या योजना कागदावर राबवण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. याला काही अपवाद असले तरी कृषी महाविद्यालयांमधील विद्याथ्र्यांची संख्या पाहता अशा कर्मचाऱ्याचे प्रमाण व्यस्तच दिसते. जोपर्यंत पुस्तकात शिकलेले शेतीचे धडे मातीत हात घालून प्रत्यक्षात येणार नाहीत तोपर्यंत मातीत उतरलेल्या या गुणवंतांना काही किंमत मिळणार नाही.
pradnyadeshpande2014@gmail.com
August 27, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti