(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बाजीराव-मस्तानी आणि मराठी अलंकार

    bajirao-mastani-and-marathi-jewelleryबाजीराव-मस्तानी हा बिग बजेट हिंदी चित्रपट यावर्षीच्या चित्रपटांमधील एक भव्य-दिव्यपणे प्रदर्शित झालेला आहे. यात बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या प्रेमकथेचे चित्रण केले आहे.

    मराठी अलंकार हे या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य आहे. या पेशवेकालीन अलंकारातून त्यावेळच्या संस्कृतीची ओळख होते. या अलंकारांच्या निर्मितीसाठी पुण्याच्या सुप्रसिद्ध “पी एन गाडगीळ अॅन्ड सन्स” यांच्यावर जबाबदारी सोपवली गेली आणि ती त्यांनी सार्थपणे पार पाडली.

    “या चित्रपटासाठी दागिन्यांची निर्मिती करण्यासाठी बरेच संशोधन करावे लागले. हे अलंकार घडविण्यासाठी आम्ही जुन्या काळातील साचे आणि ठसे वापरले. २०० वर्षाहून जुने अलंकारही वापरले. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांनी कधीच बघितले नसतील असे अनेक मराठी अलंकार बघायला मिळाले.” असे पु. ना.गाडगीळ अॅन्ड सन्सचे श्री अजित गाडगीळ सांगतात.

    नेकलेस, कंबरपट्टा, बांगड्या, नथ, कानातके डूल, पैंजण, मंगळसूत्रे, नाकी, अंगठ्या हे सर्व दागिने बनवण्यासाठी भारतातील विविध प्रदेशांतील कारागिरांची फौज सुमारे एक वर्षभर मेहेनत घेत होती.

    या चित्रपटासाठी खास बाजीरावांच्या शिरावील शिरपेच तसेच कडे आणि अंगठ्या बनवण्यात आल्या.

    आता हे सर्व दागिने “पु. ना गाडगीळ अॅन्ड सन्स”च्या विविध ठिकाणांच्या दुकानांमध्येही उपलब्ध होतील.

    -- मराठीसृष्टी व्यवस्थापन

      April 7, 2016


  • श्री भ्रमरांबाष्टकम्- ३

    राजन्मत्तमरालमन्दगमनां राजीवपत्रेक्षणांराजीवप्रभवादिदेवमकुटै राजत्पदाम्भोरुहाम्।
    राजीवायतमन्दमण्डितकुचां राजाधिराजेश्वरीं
    श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।३।।

    राजन्- शोभासंपन्न असलेली,

    मत्तमराल- आपल्याच आनंदात डौलत जाणारा मराल म्हणजे हंस.

    मन्दगमनां - त्याप्रमाणे मंद गती ने गमन करीत असलेली.

    राजीवपत्रेक्षणां- राजीव म्हणजे कमळ. त्याचे पत्र अर्थात पाकळी प्रमाणे, ईक्षणा म्हणजे दृष्टी अर्थात डोळे असणारी.

    राजीवप्रभवादि- राजीव अर्थात कमळातून ,प्रभव अर्थात उत्पन्न झालेले. म्हणजे भगवान ब्रह्मदेव. भगवान श्रीविष्णूंच्या नाभीतून निघालेल्या कमळातून भगवान ब्रह्मदेव प्रगटले आहेत. त्यामुळे ज्यांना राजीवप्रभव असे म्हटले आहे. ते ज्यांच्या अग्रभागी आहेत असा सर्व देवांचा समुदाय म्हणजे राजीवप्रभवादि.

    देवमकुटै- अशा सर्व देवांच्या मुकुटांनी राजत्पदाम्भोरुहाम्- पद म्हणजे पाय, अंभोरूह म्हणजे कमळ. राजत् म्हणजे शोभून दिसणारी. अशा सर्व देवांच्या मुकुटांनी जिचे चरणकमल शोभून दिसत आहेत अशी. या सर्व देवता चरणावर मस्तक ठेवत असल्याने, आईचे पाय दिसतच नाही तर या देवांचे मुकुटच दिसतात अशी सुंदर कल्पना आचार्यश्री करीत आहेत.

    राजीवायतमन्दमण्डितकुचां- राजीव म्हणजे कमळ, आयत म्हणजे फुललेले, मंद म्हणजे हळुवार हलणारे, मंडितकुचा अर्थात वक्षस्थल शोभून दिसणारी.

    आई जगदंबेने गळ्यात फुललेल्या कमळाची माळ घातली आहे. आईच्या मंद श्वासाने आणि हृदयाच्या हळुवार हालचालीने, ती माळ मंद हलत आहे. तिने शोभून दिसणारी.

    राजाधिराजेश्वरीं- सर्व राजांचीही महाराणी असणारी.

    श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये- श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या आई जगदंबा ,श्री भ्रमराम्बेचे मी भजन करतो.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      April 5, 2020


  • संत्रा : विदर्भाचा भाग्योदय होणार का?

    २०१९ च्या सुरवातीला हे संयंत्र सुरु करण्याची मनसुबा पतंजलीचा आहे. मेगा फूडपार्क आणि मेगा ज्यूस संयंत्रामुळे विदर्भातील शेतकर्यांचे भाग्योदय होईल का, या प्रश्नाचे उत्तर काळातच दडलेले आहे.

      August 21, 2017


  • मतपेटीच्या राजकारणामुळे पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरीस मदत

    आपली व्होटबॅंक फुगवण्यासाठी ३० वर्षांपासून डाव्या आघाडीच्या राज्य सरकारांनी आणी तृणमूल काँग्रेसने  मागच्या १० वर्षात पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरी मोठ्या प्रमाणावर  होऊ दिली. बंगालचे बांगलादेशीकरण करण्यासाठी डीजेएमआय व आयएसआयने मिळून गेल्या ४८ वर्षांपासून पश्चिम बंगालच्या लोकसंख्येची प्रतवारी बदलण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालविला आहे. भारतीय नागरिक असल्याची कागदपत्रे, शिधावाटप पत्रिका, मतदार ओळखपत्रे मिळवून बांगलादेशी घुसखोर भारतात स्थायिक झाले आहेत.

      June 27, 2019


  • वैकुंठ चतुर्दशी

    कार्तिक शुक्ल चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी म्हणतात. या दिवशी हरि-हरांचे (विष्णू-शिव) यांचे पूजन करण्यास सांगितले आहे. सामान्यतः शिव पूजनासाठी निशिथ काळ श्रेष्ठ असतो. परंतु या दिवशी निशिथ कालात विष्णूंची पूजा करून अरूणोदयी शिवांची पूजा करण्यास सांगितले आहे.

      October 1, 2023


  • पांडुरंग

    तुझ्या नामी
    पांडुरंग
    आम्ही सारे
    झालो दंग।।१।।

    वारकऱ्या
    सवे संग
    भाव भक्ती
    नाही भंग।।२।।

    गाती सारे
    हे अभंग
    हा अबीर
    घे सुगंध।।४।।

    नाम जप
    हा व्यासंग
    तुझ्या दारी
    मी पासंग।।५।।

    या जगतात
    तू अथांग
    लागे कसा
    तुझा थांग।।६।।

    कशी करू
    सेवा सांग
    नाही फिटे
    तुझे पांग।।७।।

    हरी हरी
    हाच चंग
    भक्तीला नं
    चढे गंज।।८।।

    भजनात
    चढे रंग
    दर्शनास
    लावू रांग।।९।।

    विठू माझा
    सांगोपांग
    चंद्रभागी
    हे अभ्यंग।।१०।।

    i

      November 17, 2019


  • गणेशपञ्चरत्नम् – मराठी अर्थासह

    आदि शंकराचार्यांनी रचलेल्या या श्री गणेशाच्या स्तुतीपर स्तोत्रात पाच श्लोक आहेत. सहावा फलश्रुतीचा आहे. यातील श्लोकांचे / चरणांचे विविध अभ्यासकांनी वेगवेगळे अर्थ लावलेले दिसतात.

      August 22, 2020


  • जेवण एके जेवण

    मुलांनी आणि इतरांनी सुद्धा सारं काही खायला हवं . आयुर्वेदात सांगितले आहे की नित्यनेमाने गोड , आंबट , तिखट , खारट , तुरट आणि कडू या सर्व चवीचे पदार्थ खायला हवेत . आहार आहेच तितका महत्त्वाचा . म्हटलंच आहे –

      November 1, 2022


  • व्हिएतनाम : इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि आधुनिकतेचा अनोखा मिलाफ

    व्हिएतनाम : इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि आधुनिकतेचा अनोखा मिलाफ

    दक्षिण-पूर्व आशियातील अनेक देश पर्यटनासाठी लोकप्रिय आहेत, पण त्यापैकी व्हिएतनाम हा देश विशेष वेगळेपण घेऊन उभा आहे. येथे एकीकडे हिरवीगार भातशेती, उंचसखल डोंगररांगा, मोहक समुद्रकिनारे तर दुसरीकडे आधुनिक शहरे, गजबजलेली बाजारपेठ आणि रंगीबेरंगी संस्कृती पर्यटकांना आकर्षित करतात. भारतीय प्रवाशांसाठी व्हिएतनाम हा तुलनेने किफायतशीर, जवळचा आणि सहज व्हिसा मिळणारा देश असल्यामुळे गेल्या काही वर्षांत येथे येणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

      April 17, 2026


  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ४५

    या आणि या पुढच्या श्लोकात आचार्य श्री भगवान श्रीविष्णूच्या अद्वितीय अशा केशसंभाराचे वर्णन करीत आहेत. त्यासाठी त्यांनी योजलेल्या उपमा एखाद्या महाकवींच्या प्रतिभेला लाजवतील अशा पद्धतीच्या अद्वितीय आहेत. आचार्य श्री म्हणतात,

      January 17, 2021