वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
२००८ मध्ये आलेल्या जागतिक मंदीच्या लाटेत अनेक लहान मोठ्या उद्योगांच्या निर्यातीवर विपरीत परिणाम झाला. यात स्वतः थेट निर्यात करणारे सुलम ( सूक्ष्म, लघु व मध्यम ) उद्योग आणि निर्यात प्रधान उद्योगांना पूरक उद्योग म्हणून अवलंबून असणारे जेम्स आणि ज्वेलरी , वस्त्रोद्योग आणि बांधकाम व्यवसायाचे पूरक उद्योग, ऑटो पूरक उद्योग इ. यांचा प्रामुख्याने समावेश होता.
July 14, 2010
आज आपल्या देशात विकलांग चिकित्सा करताना सर्वसाधारणपणे आढळून येणारी बाधा म्हणजे गुडघा या सांध्याचा दाह. स्त्रियांमध्ये या रोगाचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात दिसते. स्थुलता हे एक महत्त्वाचे कारण यामागे आहे. विशेषतः ५५ ते ६० या वयोवर्यादेनंतर अशा व्याधीचा त्रास जाणवू लागतो. वजन पेलणाऱ्या या गुडघ्याच्या सांध्यातील कास्थी झिजतात व सांध्यातील हाडांची टोके एकमेकांवर घासू लागतात.
June 16, 2023
मुंबईची हार्बर रेल्वे लाईन पश्चिम व मध्य रेल्वेवर राहणाऱ्या मुंबईच्या पांढरपेशा समाजाच्या दृष्टिनं काहीशी दुर्लक्षितच..या हार्बर लाईन मुळे आपल्याला दाना-पाण्याची रसद मिळत असते याची जाणीव फार थोड्या मुंबईकरांना असते.
July 29, 2016
कोविड- १ ९ महामारीचा परिणाम व्यक्तिगत , सामाजिक स्तरावर आणि पर्यायाने विविध संस्थांवर झपाट्याने होत आहे वा झाला आहे . जागतिक अर्थव्यवस्थेवर याचा अतिशय विपरीत परिणामही झालेला दिसून येत आहे . सर्वच विस्कळित झाले आहे . एकंदरीत सगळीच अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये .
October 20, 2022
६ ऑगस्ट १९२० साली पहिल्या स्थानिक सेन्सॉर बोर्डची मुंबईत स्थापना झाली. याच बरोबर कलकत्ता, मद्रास, व रंगून स्थानिक सेन्सॉर बोर्डची स्थापना केली गेली.
पहिले सेन्सॉर प्रमाण पत्र गोउमुंट कंपनी ला देण्यात आले.
अमेरिकेत हॉलीवूडमध्ये चलचित्राच्या सेन्सॉरशिपची पहिली घटना घडली १८९७ मध्ये जेव्हा जेम्स कॉर्बेट व रॉबर्ट फिट्झसिमन्स यांच्यातील हेवीवेट वजनी गटातील सामना दाखवायला बंदी घातली गेली होती. १९१५ मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने म्युच्युअल फिल्म कॉर्पोरेशन वि. इंडस्ट्रिअल कमिशन ऑफ ओहायो यांच्यातील खटल्यात सिनेमा हा तद्दन व्यवसाय असल्याने त्यावर सेन्सॉरशिपला विरोध दर्शविला होता. मात्र, १९१५ ते १९५२ या काळात स्थानिक, राज्य व केंद्र सरकारी पातळीवर सेन्सॉरशिप लागू करण्याचे बरेच प्रयोग झाले. अमेरिकन शासनाने सेन्सॉर बोर्ड स्थापन करू नये यासाठी १९२२ मध्ये रिपब्लिकन पक्षाचा वकील व वजनदार अशा विल हेज याच्या नेतृत्वाखाली प्रोड्युसर्स आणि डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन (PDA) ही संघटना स्थापन झाली जिने शासनाने हस्तक्षेप करण्याआधी स्वतःच काही बंधने घालून घेतली. १९३४ साली जोसेफ ब्रीनच्या नेतृत्वाखाली प्रॉडक्शन कोड अॅडमिनिस्ट्रेशन (PCA) या संघटनेने १ जुलै, १९३४ पासून पुढे येणाऱ्या सर्व सिनेमांना प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले. ब्रीनने हा कायदा अतिशय कडक व त्रासदायक केला.
तथाकथित नैतिकता व धार्मिकता पाळणे हे अक्षरशः बंधनकारक केले. पुढे १९५२ साली अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात PCA चा अधिकार खूपच कमी केला. हा निर्णय 'मिरॅकल' या सिनेमाशी संदर्भित खटल्याशी संबंधित असल्याने त्याला 'मिरॅकल डिसीजन' (जादुई निर्णय!) म्हटले जाते. यानंतर 'द मून इज ब्ल्यू' या १९५३ च्या सिनेमात Virgin, Seduce इ. शब्दांचा प्रथमच वापर करण्यात आला. जगभरातील बहुतांश देशांत चित्रपटाच्या सेन्सॉरशिपशी संबंधित कायदे व बोर्ड अस्तित्वात आहेत. भारतात पहिला सिनेमा १९१३ साली आला आणि सेन्सॉर बोर्डाची स्थापना १९२० साली झाली.
सिनेमेटोग्राफ एक्टच्या खाली सेंट्रल बोर्ड ऑफ़ सेन्सॉर ची १९५२ मधे स्थापना झाली. कालांतराने त्यात काही नवे बदल घडवून १९८३ मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ़ सर्टिफिकेशन असं नामकरण करण्यात आलं. आधी फक्त ‘यु’आणि ‘ए’अशी दोनच प्रमाण पत्रे दिली जायची..नंतर ती ‘यु’, ’यु/ए’, ’ए’ आणि ‘एस’ अशी विविध वयोगटानुसार,प्रेक्षकवर्गानुसार देण्यात येतात.मात्र हे देण्यासोबतच काही सीन्स, शब्द, वाक्यांना सेन्सॉर बोर्ड बिनबोभाटपणे कात्री लावते.प्रदर्शनाला बंदी घालते.
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
August 6, 2021
प्रबोधन पर्वात वृत्तपत्रांना खूप महत्त्व प्राप्त झाले. या वृत्तपत्रांनी आणि नियतकालिकांनी समाजमन घडवण्याचे महत्त्वाचे कार्य केले. जाणीव जागृती केली. स्वातंत्र्याच्या आकांक्षाबरोबरच नवप्रेरणा, जिज्ञासा यांचे खुले आकाश समाजासमोर उभे केले. अगदी त्याच प्रकारे मागच्या दहा-पंधरा वर्षात समाज माध्यमांनी नवी क्रांती घडवून आणली आहे.
November 19, 2023
कन्नुदादाशी आणि माझी ओळख कशी झाली, आणि तो आमच्याकडे कधीपासून येऊ लागला हे आता आठवतही नाही. घरात काही मोठं काम करायला काढलं, म्हणजे संपूर्ण घराची स्वच्छता, माळ्यावरचं सगळं जड सामान काढून माळा स्वच्छ करून पुन्हा जागच्या जागी ठेवणे, घरात काही समारंभ असला किंवा लग्नकार्य असलं की सामानाची ने आण करणं अशा कामांसाठी मी त्याला मदतीला बोलावून घेत असे.
May 22, 2022
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
August 12, 2018
व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे एकाच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी, सवयी, मानसिकता हे देखील सर्व भिन्न असतं. या भिन्न विभिन्न मानसिकतेचा विचार करून सकारात्मकता आणि एकता निर्माण करावी लागत असते. यामध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा कस लागत असतो. अंतर्मनाच्या आणि मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून रंग शास्त्राचा खूप मोलाचा वाटा असतो. रंगांचा संबंध थेट अंतर्मनाशी असतो. विविध रंग अंतर्मनाला जाऊन भिडणारे असतात.
February 26, 2022
आज आपण प्रतिकारशक्ती चांगली कशी ठेवता येईल या विषयी थोडी माहिती घेऊ. काही छोटय़ा गोष्टी नियमित केल्या तर आपण आपली प्रतिकारशक्ती त्यातल्या त्यात चांगली ठेवू शकतो.
१) तुळस
रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुळशीची आठ ते दहा पानं रोज चावून खावीत. यामुळे शरीरात जंतूसंसर्गाला अटकाव होतो.
२) तूप
कोणत्याही वयोमानात शरीराचं पोषण करायचं असेल तर अर्धाचमचा तूप आवजरून खावं. तुपामुळे शरीराला वंगण मिळतं. अनेकजण कौतुकानं आपल्या आहारात चीज, बटर असल्याचं सांगतात. पण जी कमाल अर्धा चमच तूप करतं ती या पदार्थाना जमत नाही.
३) आवळा-लिंबू
लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्वं असतं. एक अख्खं लिंबू आपण खावू शकत नाही. पण लिंबाची एक फोड मात्र सहज खावू शकतो. पण लिंबू खावं म्हणजे लिंबूचं खावं. लिंबाचं लोणचं नव्हे.
आवळा हा प्रामुख्यानं हिवाळ्यात मिळतो. पण मुरंबा, मोरआवळा, कॅंण्डी या स्वरूपात वर्षभर आवळा उपलब्ध असतो. रोज थोडा तरी आवळा पोटात गेला तरी आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहण्यास मदत होते.
४) पाणी
आरोग्याच्यादृष्टीनं पाण्याचं महत्त्वं वेगळं सांगण्याची गरज नाही. पाण्याची तहान लागली तर ती पाण्यानंच भागेल याची काळजी घेतल्यास शरीरात योग्य प्रमाणात पाणी जाईल. तहान लागली पाणी नाही म्हणून मिल्क शेक/ नारळपाणी/ज्यूस प्यायलं म्हणून तहान भागत नाही. उलट शरीराची पाण्याची गरज पूर्ण झाली नाही तर पाण्याला पर्याय म्हणून पोटात टाकलेले पदार्थ शरीर उलटवून टाकण्याचीच शक्यता जास्त. पाणी आवश्यकतेपेक्षा कमी प्यायलं किंवा जास्त प्यायलं तरी अपाय होतो.
५) नाचणी सत्वं
दिवसभर शरीरातली ऊर्जा टिकवून धरायची असेल तर रोजच्या न्याहारीत नाचणीचं सत्त्व हवंच. नाचणीच्या सत्त्वामध्ये सर्व मुख्य जीवनसत्त्वं असतात. हे नाचणी सत्त्वं दिवसातून एकदा तरी शरीरात जाणं आवश्यक असतं. नाचणीची भाकरी खावी .
६) बीट
दुपारच्या जेवणात कोशिंबीर असावी. पण ती काकडी, टोमॅटो नाहीतर मुळयाचीच हवी असं नाही. उलट रोजच्या जेवणात बीटाची कोशिंबीर खाल्ल्यास एकाचवेळेस शरीराला जीवनसत्त्वं, खनिजं, अॅंन्टिऑक्सिडंटस मिळतात. बीट हे उत्तम शक्तीवर्धक आहे त्यामुळे वृध्दांच्या आहारात तर बीटाचा समावेश असायलाच हवा.
७) दूध-हळद
रात्री जेवल्यानंतर एक कपभर दुध उकळून त्यात एक चमचा हळद घालावी. आणि ते दूध रोज प्यावं. या दुधात चव म्हणून अनेकजण साखर घालतात. पण तसं करू नये.
लहान मुलांना दूध-हळद ऐवजी दूधात थोडं केशर आणि एखादा बदाम भिजवून, वाटून ते दूध द्यायला हवं. दुधात केशराच्या एक-दोन काडय़ाच वापराव्यात.
८) दही आणि ताक
रोजच्या जेवणात कोणी दही खावं आणि कोणी ताक घ्यावं याबाबतही काही नियम आहेत. प्रौढ स्त्रिया-पुरूष आणि वृध्दांनी रोजच्या जेवणात ताक घ्यावं. ताक म्हणजे दह्यात पाणी घालून घुसळून केलेलं ताक नव्हे. तर लोणी घुसळल्यानंतर शिल्लक राहणा:या अंशाला आहारशास्त्रात ताक म्हणतात. आणि या ताकाच्या सेवनानं शरीराला फायदा होतो. लहान मुलांना ताक देवू नये. त्याऐवजी रोज दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात त्यांना दोन चमचे ताजं दही द्यावं. मुलांना दही देतांना त्यात साखर घातली जाते. त्याऐवजी दह्यामध्ये खडीसाखर घालावी.
९) गुळाचा खडा आणि खडीसाखर.
घरात वृध्द आणि लहान मुलं असले की आपल्या डब्यातला गूळ आणि खडीसाखर कधीही संपू देवू नये. वृध्दांना दिवसभर तरतरी राहण्यासाठी गुळाचा खडा खूप उपयुक्त असतो. शिवाय चक्कर आल्यास, तोल जात आहे असं वाटल्यास, घसा कोरडा पडल्यास गुळाचा खडा किंवा खडींसाखर तात्काळ शरीरात ऊर्जा निर्माण करतं.
लहान मुलं एका जागी कधीच बसत नाही. दिवसभर त्यांच्या अॅक्टीव्हीटी चालूच असतात. यामुळे त्यांच्या शरीराला ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा खडीसाखरेतून मिळू शकते. मुलांना शाळेच्या डब्यात एक छोट्या डब्बीत खडीसाखर घालून आवश्य द्यावी.
आरोग्यम् धनसंपदा
(आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)
April 25, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti