वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
बोटीचे सारे ‘जीवन’ पाण्यातच असते, आणि ते पाण्यालाच वाहिलेले असते. परंतु, समुद्रात बोटीला कधी अपघात झाला, कधी गंजलेला पत्रा बदलायचा असेल, कधी रंगकामासाठी किंवा बोटीच्या तळाला चिकटलेले जीवाणू काढून तळ, बोटीच्या बाजू स्वच्छ करावयाच्या असतील तर ती बोट ‘ड्रायडॉकिंग’ला पाठवावी लागते. याच प्रचंड जबाबदारीच्या प्रक्रियेची ही कथा…
July 13, 2023

‘आफ्रिकेची सिनेसृष्टी’ म्हणजे मुख्यतः स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झालेले चित्रपट. या सृष्टीत स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे व्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचे ठरले. मात्र वर्षाकाठी शंभराच्या वर मराठी व एकूण बाराशेच्या वर चित्रपट निर्मिती करणारी हिंदी सिनेमासृष्टी आफ्रिकेची ‘रोल मॉडेल’ ठरावी. जगात वर्णद्वेशाचा वणवा पेटलेला असतांना औसमन सेम्बीननी ‘ब्लॅक गर्ल’ चित्रपट सादर केला.
तेव्हापासून आफ्रिकन सिनेमात नव्या अध्यायाला प्रारंभ झाला आणि ते ‘आफ्रिकन सिनेसृष्टीचे जनक’ म्हणजे दादासाहेब फाळके ठरले. सध्याच्या चित्रपटात सामाजिक, संघर्ष कथाविषय, रहस्यमय कथाविषय आणि कौटुंबिक कथाविषय मुख्यत्वाने आले. पण वेगवेगळ्या परिमाणांच्या फूटपट्टीने आफ्रिकन व भारतीय चित्रपटसृष्टींच्या तुलनेची चिवडाचिवड कशाला करायची? सर्वसामान्य माणसाला कलास्वादातून फक्त सौख्याचा आणि जगण्याचा मंत्र शोधायचा असतो. यातच त्याचे भाबडेपण प्रतिबींबीत होत असते, त्याच्या मनात असतं, ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे..
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावें’.
– अरुण मोकाशी
परिवहन तज्ज्ञ अरुण मोकाशी यांच्या झांझिबार डायरी या इ-पुस्तकातील लेखाचा हा अंश.
हा संपूर्ण लेख तसेच त्यांचे या पुस्तकातील सर्व २५ लेख वाचण्यासाठी हे पुस्तक खरेदी करा.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
https://marathibooks.com/books/zanzibar-diary/
किंमत : रु.२००/
सवलत किंमत : रु.५०/-
January 2, 2025
श्रीमंत बापाच्या पोटची वाया गेलेली 'कारटी' आपण नेहेमीच बघतो, पण......
६००० कोटींची उलाढाल आणि अब्जाधीश असणाऱ्या सावजी ढोलाकीया यांनी शिक्षण सुरु असतानाच आणि भविष्यात स्वतःचा उद्योग सांभाळायाची जबाबदारी येऊन पडणार आहे अश्या आपल्या मुलाला पाठवले कोचीनला, खडतर जगाचा अनुभव घ्यायला आणि काबाडकष्ट करून स्वतःच्या हिकमतीवर पैसे कमवून जगायला....
जगभरातल्या ७१ देशांमध्ये कारोबार असणाऱ्या सुरत येथील हरेकृष्णा डायमंड एक्सपोर्टसचे मालक असलेल्या सावजी यांनी दोनच वर्षांपूर्वी सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते आणि कारण होते त्यांच्याकडे काम करणाऱ्या तब्बल १२०० लोकांना त्यांनी दिवाळी निमित्त भेट दिलेली घरे आणि कार्स. आज दोन वर्षानंतर चर्चेत आला श्री सावजी यांचा अमेरिकेत बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असलेला आणि भारतात एक महिन्याच्या सुट्टीवर आलेला २१ वर्षीय तरणाबांड मुलगा चि. द्रव्य.
श्री. सावजी यांच्या बिझनेस साम्राज्याची जबाबदारी आता ज्या द्रव्य या त्यांच्या मुलाच्या खांद्यावर थोड्याच दिवसांत पडणार आहे त्या मुलाला सावजी यांनी त्याची ही सुट्टी त्यांच्या कुटुंबाच्या परंपरेप्रमाणे केरळ येथील कोचीन येथे त्याच्या स्वतःच्या पायावर आणि जबाबदारीवर घालवण्यास सांगितले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वतःला पूर्णत: अपरिचित अश्या भारताच्या एखाद्या भागात एक महिना जावून राहणे आणि कुणालाही स्वतःची ओळख न सांगता , अत्यंत साधेपणाने कुठल्याही आलिशान जीवनाचा अंगीकार न करता स्वतःचा उदरनिर्वाह चालवणे अशी श्री सावजी यांच्या कुटुंबाची परंपरा आहे.
"एकदा बारा वर्षांपूर्वी लंडन इथल्या एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये आम्ही सर्व कुटुंबीयांनी गुजराथी पारंपारिक जेवण घेतले. बिल आले होते प्रत्येकी घसघशीत १०० पौंडस. इतके जास्त बिल कसे काय आले असे हॉटेल मालकाला सहजच विचारल्यावर हॉटेल मालक म्हणाला कि तुम्ही जेवणाची किंमत न पाहताच जेवण ऑर्डर केले आहे. इथे आमच्या कुटुंबाचे डोळे उघडले. इथेच आमच्या कुटुंबाने ठरवले कि आमच्या कुटुंबातला प्रत्येक पुरुष यापुढे पैशाची किंमत जाणवण्यासाठी एक महिना खडतर आयुष्य जगेल." द्रव्य म्हणाला.
याच प्रथेस अनुसरून आणि हे आव्हान स्वीकारून २१ जून २०१६ रोजी चि. द्रव्य केरळ येथील कोचीन मध्ये वडलांनी दिलेल्या कपड्यांचे तीन सेट्स आणि ७००० रुपये यांसोबत एक महिना रहायला गेला.
"मी माझ्या मुलाला ३ अटी घातल्या," श्री सावजी टाईम्स ऑफ इंडियाला सांगत होते,"एक , तुला तुझे जगण्यासाठीचे पैसे वेगवेगळी कामे करून स्वतःला कमवायला लागतील. दोन, एका कामाच्या ठिकाणी एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ काम करावयाचे नाही. आणि तीन म्हणजे , तू कुठेही माझे नाव वापरायचे नाहीस, सोबत अगदीच संकटसमयी वापरण्यासाठी दिलेले ७००० रुपये वापरणार नाहीस आणि तुझा मोबाईल फोनही वापरणार नाहीस.
माझ्या मुलाने आयुष्याचे खरे रूप पाहावे, अनुभवावे , गरीब लोकांना आयुष्यात किती खस्ता खाव्या लागतात आणि पैसे कमावण्यासाठी किती खडतर आयुष्य जगावे लागते याची त्याला पुरेपूर कल्पना यावी अशी माझी इच्छा होती. कारण जगातले कुठलेच विद्यापीठ तुम्हाला हे अनुभवांचे जिवंत शिक्षण देऊ शकतच नाही." या एका महिन्याच्या कोचीन येथील वास्तव्यामध्ये द्रव्य याला अनेकानेक आव्हानांचा सामना करावा लागला.
गुजरात मधल्या एका गरीब घरातला बारावीतला मुलगा अशी स्वतःची ओळख देऊन द्रव्य कोचीन येथे राहिला. एका संपूर्णतः अनभीज्ञ अश्या शहरात कुणाच्याही संपर्कावीना असलेला द्रव्य आणि त्यात तेथील मल्याळी भाषाही अजिबातच माहित नसण्याचेही एक मोठे आव्हान त्याच्या समोर उभे होते. "माझे कामही मलाच शोधायचे होते. पहीले पाच दिवस माझ्याकडे काम तर सोडाच राहायला निट अशी जागाही नव्हती आणि त्यामुळे मी भयंकर विमनस्क झालो होतो. काम मिळवण्यासाठी मी जोडे झिझवलेल्या तब्बल ६० ठिकाणाहून मला काम न देताच हाकलून देण्यात आले.
नकार म्हणजे काय चीज आहे आणि या आत्ताच्या दिवसात काम मिळणे आणि त्याहीपेक्षा मिळालेले काम टिकवणे ही किती अवघड गोष्ट आहे हे मला तिथे जवळून अनुभवाला आले. मी माझ्या आयुष्यात आत्तापावेतो कधीच पैशांची चिंता केली नव्हती. वस्तूची किंमत न पाहताच वस्तू खरेदी करणारा मी एका बाजूला आणि कोचीन येथील या वास्तव्यात माझ्या रोजच्या जेवणासाठी ४० रुपये सुद्धा प्रचंड कष्टपूर्वक कमावणारा मी एका बाजूला ही वस्तुस्थिती मी शब्दशः कोचीनला जगलो." अब्जाधीश चि. द्रव्य ढोलाकीया सांगत होता.
चेरनाल्लूर इथे द्रव्यला एका बेकरीमध्ये त्याची पहिली नोकरी मिळाली. पुढच्या आठवड्यात एका कॉल सेंटर मध्ये, त्याच्या पुढच्या आठवड्यात एका चपलांच्या दुकानात आणि सर्वात शेवटी एका मॅकडोनाल्ड आउटलेट मध्ये द्रव्य याने नोकरी केली. या एका महिन्यात चि. द्रव्य कोचीन येथे एका साध्याश्या हॉस्टेलमध्ये यशस्वीपणे राहिला आणि कष्टाची कामे करून त्याने तिथे चार हजार रुपये सुद्धा कमावले.
येत्या ५ ऑगस्टला चि. द्रव्य त्याच्या पुढील शिक्षणासाठी पुन्हा एकदा अमेरिकेतल्या पेस विद्यापीठात दाखल होणार आहे.
(बातमी सौजन्य - टाईम्स ऑफ इंडिया आणि )
August 2, 2016
१ मार्च ही तारीख निवडण्याचे कारण म्हणजे ग्रेगरीयन कालगणनेनुसार उद्यापासून दिवस मोठा होत जातो व २१ जून हा सर्वात मोठा दिवस असतो. आजचा दिवस व रात्र समान असतो. म्हणजे आज १२ तासांचा दिवस व १२ तासांची रात्र आहे.
March 21, 2022
भारतीय संस्कृतीने आपल्याला श्रेष्ठ संस्कारांचा बहुमोल खजाना दिला आहे. पारंपारिक प्रथा, उत्सव, जयंती, उपवास…. ह्या सर्वांद्वारे ईश्वर तसेच आपले पूर्वज, महात्म्याचा आदर करणे, त्यांची कर्मकथा आठवून त्यांच्याकडून काही शिकण्याची समज दिली आहे. त्यांच्यापैकीच एक म्हणजे श्राद्ध.
September 26, 2021
पत्रास कारण की भावनांच आदान-प्रदान करणार पत्र,आज अचानक गायब झाल आहे,कितीतरी जणांचे आयुष्य याचं पत्रांनी घडवलं आहे.पत्र हे संवादाचे उत्कृष्ट माध्यम आहे. यंत्राने माणसाची बोलतीच बंद केली आहे. पत्र नाही मित्र नाही अशा वातावरणात आजची पिढी वाढत आहे.
June 20, 2026
इतक्या मोठ्या प्रमाणावर आतंकी कारवाया ज्या ठिकाणी चालत असतील, तेथे स्थानिक प्रशासन, पोलीस यांना याविषयी माहिती कशी मिळत नाही? कि माहिती मिळूनही पोलीस-प्रशासन त्याकडे कानाडोळा करते कि पोलीसही त्यात सामील असतात? तृणमूलच्या नेत्याच्या घरी झालेल्या स्फोटाच्या प्रकरणात पोलिसांनीच पुरावे नष्ट केले आहेत. बंगलादेशची राजधानी ढाका येथे मोठ्या प्रमाणात रक्तपात घडवून आणण्याची हुजी अतिरेक्यांची योजना असल्याची माहिती आहे व काही राजकीय नेत्यांना, नामवंत व्यक्तींनाही ठार मारण्याची हुजीची योजना होती, असे इतके दिवस झोपलेले पश्चिम बंगालचे पोलिस आता सांगत आहेत.
October 29, 2014
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये डॉ. विजय पांढरीपांडे यांनी लिहिलेला हा लेख
ज्या संस्थेतून मी इंजिनियरिंगची पदवी घेतली ह्या संस्थेचं पूर्वीचं नाव विश्वेश्वरैया रिजनल इंजिनियरिंग कॉलेज असं होतं. २००२च्या सुमारास त्या सर्व रिजनल कॉलेजेसचं रूपांतर नॅशनल इंस्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (एन आय टी) असं करण्यात आलं. अन् ह्या संस्थाना केंद्र सरकारतर्फे अभिमत विद्यापीठाचा (डीम्ड युनिर्व्हसिटीचा) दर्जा देण्यात आला. ही संस्था पूर्णपणे केंद्रीय मनुष्यबळ खात्याच्या (मिनिस्ट्री ऑफ् एच आर डी) अखत्यारीत आली. त्या स्थित्यंतराच्या काळात संस्थेचे प्रिन्सिपॉल होते. डॉ.एम. यू. देशपांडे जे माझे इंजिनियरिंग पदवी काळातले प्राध्यापक होते. पदवी झाल्यानंतर देखील त्यांच्याशी माझे स्नेहबंध टिकून होते. त्यांनी मला फोन करून माझा बायोडेटा पाठवायला सांगितले. एन आय टी च्या पहिल्या वहिल्या (संस्थापक) डायरेक्टरच्या पदासाठी त्यांना ही माहिती हवी होती. त्या वेळी मी उस्मानिया विद्यापीठात बऱ्यापैकी स्थिरावलो होतो. अनेक संशोधन प्रकल्पांवर काम सुरू होतं. एका जागतिक प्रकल्पाचा (World Bank Project) मी समन्वयक होतो. विभाग प्रमुख, चेअरमन बोर्ड ऑफ स्टडीज, डीन ही सर्व महत्त्वपूर्ण प्रशासकीय पदं भूषवून झाली होती. तेव्हा हे स्थित्यंतर स्वीकारावं की नाही ह्या द्विधा मनःस्थितीत होतो. पण डॉ. एम. यूंचा बराच आग्रह पडल्यामुळं मी बायोडेटा पाठवला. ज्या संस्थेत आपण शिकलो त्या संस्थेत सर्वोच्च पद (डायरेक्टर हे पद केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या बरोबरीचे) स्वीकारून त्या संस्थेसाठी, शैक्षणिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण हातभार लावण्याची संधी निश्चितच आव्हानात्मक होती.
यथावकाश दिल्लीला मुलाखती झाल्या. आय आय टी चेन्नईचे डायरेक्टर प्रा. नटराजन निवड समितीचे चेअरमन गव्हर्निंग बोर्ड देखील समितीचे सभासद होते. ते व्ही एन आय टीचेच निवृत्त प्राध्यापक होते.
मुलाखत छान झाली. अपेक्षेप्रमाणे माझी निवड ही झाली. सगळे कसे घाईगर्दीत पार पडले. कुटुंबात अर्थातच आनंदाचे वातावरण.. मुलांच्या शिक्षणाच्या अन् इतर जबाबदाऱ्या नुकत्याच पार पडलेल्या. त्यामुळे कुठंही कसलीही अडचण नव्हती. केंद्र सरकारचाच जॉब असल्याने उस्मानिया विद्यापीठातून लिअन् (सुटी) मिळण्यात कसलीही अडचण नव्हती. मी मागितल्याप्रमाणे दोन जादा इंक्रिमेंट्स देखील मिळाले. आम्ही नागपुरला (तात्पुरते) स्थलांतर करायचे ठरविले. हे पद पाच वर्षासाठीचे होते.
माझ्यासाठी ही खरंच अतिशय अभिमानाची बाब होती. ज्या संस्थेत आपण शिक्षण घेतले त्याच संस्थेच्या सर्वोच्च पदाच्या (काटेरी सिंहासन!) खुर्चीत बसून शिक्षणाला नवी दिशा देणे, नवे अभ्यास क्रम राबविणे, संशोधनासाठी नव्या प्रयोगशाळा उभारणे, मुख्य म्हणजे विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, अधिकारी ह्या सर्वांमध्ये सौहार्दाचे, सुसंवादाचे, वातावरण तयार करून चैतन्य निर्माण करणे अशी मोठी भव्य दिव्य स्वप्नं उराशी बाळगून मी कार्यारंभ केला.
तसे प्रॉब्लेम्स सर्वच ठिकाणी असतात. समस्या नाहीत अशी जागा, संस्था सापडणे कठीण. तसेच ह्या संस्थेचेही होते. तरीही पण सहकारी, शिक्षकवर्ग, विद्यार्थी ह्यांच्या सहकार्याने मी ह्या समस्या सोडवू शकेन असा आत्मविश्वास होता. माझ्या बरोबरच शिकलेले माझे काही मित्र आता तिथेच प्राध्यापक होते. कुणी महत्त्वाच्या पदावर होते. ह्या सर्वांनीच मला सहकार्याचा हात देऊ केला ही जमेची बाजू होती. राष्ट्रीय स्तरावरची, अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त केंद्रीय संस्था म्हणून विद्यार्थ्यांचा दर्जा देखील उत्तम होता.
मला संघर्ष करावा लागला, लढा द्यावा लागला तो वेगळ्याच कारणासाठी. किंबहुना एका व्यक्तीसाठी. ती ही व्यक्ती साधीसुधी नव्हे तर ह्या संस्थेच्या चेअरमनशीच संघर्ष निर्माण झाला. चेअरमनची नियुक्ती मानव संसाधन खात्याच्या केंद्रीय मंत्र्यांनी केलेली. ह्या निवडीत योग्यतेपेक्षा राजकारण जास्त. मंत्री अन् चेअरमन घनिष्ठ मित्र.. एका संस्थेशी निगडित.. जुने सहकारी. चेअरमन ह्याच शहरातले. मुख्य म्हणजे ह्याच संस्थेतले निवृत्त प्राध्यापक. ते स्वत:ला एक स्वघोषित बडे प्रस्थ मानीत होते. विद्यापीठातील राजकारणात त्यांचा दबदबा होता. संस्थेत त्यांचे चमचे होते. विद्यार्थी होते. त्यांच्या भोवती लाळघोटेपणा करणाऱ्या लाचारांची संख्या बरीच होती. त्यात त्यांचे चेले होते. काही जणांना (मी रूजू होण्यापूर्वीच्) त्यांनी महत्त्वाच्या पदांवर बसवून उपकृत केले होते.
अशा व्यक्तीशी संघर्ष करायचा हे सोपे काम नव्हते. केंद्रीय मंत्र्यांची कृपादृष्टी असल्यामुळे आपण काहीही करायला मोकळे आहोत, कसल्याही सोयी सवलती घ्यायला पात्र आहोत, आपल्यालाच सर्व अधिकार प्राप्त आहेत अशी त्यांनी (अर्थातच चुकीची) समजूत करून घेतली होती. संस्थेच्या दैनंदिन कारभारात त्यांची नको तितकी ढवळाढवळ चालत होती. थोडक्यात संस्थेचे चेअरमन हे डायरेक्टर सारखे वागत होते. माझ्या कार्यक्षेत्रात अतीक्रमण करीत होते. नको त्या संबंधात 'ऑर्डर' देत होते! तसे पाहिले तर चेअरमनचे अधिकार मर्यादित असतात. जेव्हा केव्हा बोर्डाची मिटींग असेल तेव्हा तिचे अध्यक्षपद भूषविण्यापुरते.. किंवा हवा असेल तेव्हा (तरच) सल्ला देण्यापुरते किंवा आपत्कालीन स्थितीत घेतलेल्या निर्णयांना चेअरमन ह्या नात्याने संमती देण्यापुरते. राज्यपालांसारखे हे पद तसे शोभेचे पण अर्थात प्रतिष्ठेचे. अर्थात कोणत्याही पदाची प्रतिष्ठा वाढविणे किंवा घालविणे हे त्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीवर, त्या व्यक्तीच्या मानसिक जडण घडणीवर अवलंबून असते.
एकीकडे राष्ट्रीय एकात्मतेचा, चारित्र्य संपन्न संस्कृतीचा, नैतिकतेचा पुरस्कार करायचा, भाषणे ठोकायची, चिंतन शिबिरात बौद्धिकं घ्यायची अन् दुसरीकडे वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचे, स्वार्थी धोरण स्वीकारायचे, सवलती उकळायच्या, बेकायदा लाभ घ्यायचे. असे दुटप्पी धोरण.. अशी नाटकी माणसे संस्थेच्या प्रगतीला, नैतिक अधिष्ठानाला घातक असतात.
ह्या महाशयांचे एकेक प्रताप, त्यांच्या मागण्या त्यांनी जबरदस्तीने घेतलेल्या बेकायदेशीर सोयी सवलती हे जसजसे माझ्या लक्षात यायला लागले, सहकाऱ्यांनी आणून दिले तेव्हा मी सावध झालो.
माझे ह्या कॉलेजवरील, शहरावरील प्रेम हा माझा भावनिक पाया होता. जबाबदारी स्वीकारण्याचा कॉलेजचे ऋण अंशत: फेडण्याची संधी मला गमवायची नव्हती. त्यामुळे मी सावधगिरीने पण ठामपणे जे चुकीचे आहे त्याला विरोध करीत राहिलो. जी अनियमितता मला आढळली ती सर्व कागदपत्रे मी दिल्लीला मंत्रालयात, सचिवांकडे पाठवून दिली. ह्या संदर्भात मी स्वत: कधी ना दिल्लीला गेलो ना मंत्र्यांची किंवा सचिवांची भेट घेतली. माझा विरोध लक्षात आल्यावर चेअरमननी माझ्यावर दडपण आणण्याचा, असहकार पुकारण्याचा प्रयत्न केला. बोर्ड ऑफ गव्हर्नर्सची मिटिंग बोलविणे, त्यांच्याच हातात होते. महत्त्वाचे निर्णय खोळंबून राहण्याची शक्यता होती. तेव्हा मी सचिवांना (केंद्रीय मंत्रालयाच्या) स्पष्ट जाणीव दिली. मंत्रालयाने एकदा काय तो निर्णय घ्यावा. ते किंवा मी कुणीतरी जायला हवे. दोघेही एकत्र राहणे संस्थेच्या हिताचे नाही. प्रगतीसाठी योग्य नाही. मी वैतागून राजीनामा देखील पाठवून दिला. नियमाप्रमाणे तीन महिन्यांची नोटीस देऊन. ह्या दरम्यान चेअरमन, महाशय युरोपचा दौरा करुन आले. संस्थेच्या पैशाने! हे अनियमित होते. परदेशी संस्थाशी करार वगैरे करायचे तर ते काम डायरेक्टरचे. मुळात ते गेले होते जर्मनीतील आपल्या मुलाकडे! तेथील मोबाईलचे बिल देखील त्यांनी संस्थेकडे पाठविले, जे मी नामंजूर केले.
केंद्रिय सचिवांनी माझा राजीनामा स्वीकारला नाही. उलट तुम्ही चेअरमनचे काहीही ऐकू नका, त्यांच्या पत्रांना केराची टोपली दाखवा असा स्पष्ट आदेश दिला. पण संस्थेचा, पेचप्रसंग सुटत नव्हता. चेअरमनच नव्हे तर त्यांच्या भवतीचे चमचे देखील अधुनमधुन कोंडी करीत होते.
अशा संघर्षात एक गंमत असते. लोकांना तुमच्या विषयी सहानुभूति असते. त्यांना तुम्हाला पाठिंबा द्यायचा असतो. पण तशी त्यांची हिंमत नसते. त्यांच्याकडे पुरेसे नैतिक बळ नसते. उद्या आपल्यावरच उलटले तर? अशी भीती असते. त्यामुळे बहुतेक मंडळी तुम्ही पाण्यात गटांगळ्या खात असता तेव्हा किनाऱ्यावर बसून टाळ्या पिटण्यात धन्यता मानतात! हे नग्न कटु सत्य आहे!
मला संस्थेच्या राजकारणात, कुणावर कसली कुरघोडी करण्यात रस नव्हता. माझ्या अल्पशा कालावधीत मला संस्थेतील प्राध्यापकांचे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे भरपूर सहकार्य मिळाले.
माझा तीन महिन्याचा नोटीस पिरियड संपताच मी माझ्या सहकाऱ्याकडे पदभार सोपवून उस्मानिया विद्यापीठात परतलो. आम्ही लवकरच निर्णय घेतो असा निरोप सरकारतर्फे आला देखील. पण तीन महिन्यात जर ते निर्णय घेऊ शकले नाहीत तर वाट पाहून काय उपयोग ह्या विचाराने मी वैतागून परतलो.
आश्चर्य म्हणजे माझा पदभार सोपविल्याचा फॅक्स दिल्लीला पोहचताच दुसऱ्या दिवशी चेअरमनची हकालपट्टी करण्याचा आदेश निघाला. मला दिल्लीहून मंत्रालयातून सचिवांचे सारखे फोन- "आता तुमच्या मनासारखं झालंय ना- आता तुम्ही परत जॉईन व्हा- हे दोन दिवस खास रजेचे समजा...'
मला हे मान्य नव्हते. हीच ऑर्डर दोन
दिवस आधी निघाली असती तर?
उच्च शिक्षण क्षेत्राच्या इतिहासात चेअरमन सारख्या व्यक्तीची हकालपट्टी होण्याचे हे पहिलेच उदाहरण. तो निर्णय (उशीरा कां होईना) केंद्रीय मंत्र्यांनी घेतला त्याचे ही कौतुकच- पण म्हणतात ना- 'बूंदसे गयी वो हौद से नही आती।' आश्चर्य म्हणजे
चेअरमननी नेमलेल्या डायरेक्टरची (जो त्यांचाच चेला होता!) देखील हकालपट्टी करण्यात आली. मला परतण्याचे, एवढे मोठे चालून आलेले प्रतिष्ठेचे पद सोडण्याचे दु:ख नव्हते. पण आपल्या संस्थेसाठी ठरविल्याप्रमाणे मी काही करू शकलो नाही त्याचे मात्र तीव्र दुःख होते.
मला असे वाटते की त्या विशिष्ट काळापुरते, विशिष्ट कार्यापुरते संस्थेतील घाण साफ करण्यापुरते माझे काम होते. मी तिथे गेलो नसतो, लढलो नसतो तर अध्यक्षांच्या मनमानी कारभारामुळे, राजकारणी कटकारस्थानामुळे त्यांच्यासह काही टोळक्यांचा व्यक्तिगत फायदा झाला असता. पण संस्थेचे मात्र फार नुकसान झाले असते. जे काही घडले त्या मागे दैवी संकेत होता असे मला वाटते.
ज्या संस्थेने, पक्षाने ह्या अध्यक्ष महोदयांना मोठे केले, मान दिला त्यांनीही पुढे त्यांना अक्षरश: वाळीत टाकले. पण मेरे मुर्गीकी एकही टांग ह्या मग्रुरीने ते त्या मातृ संस्थेलाच दोष देत बसले!
आज असे कोणतेही क्षेत्र नाहीं, जिथे राजकारण नाही, भ्रष्टाचार नाही. अनेक गोष्टी आपण गृहित धरून चालतो. हे असे चालायचेच म्हणून मूग गिळून स्वस्थ बसतो. म्हणूनच भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळते. मोजक्या स्वार्थी, राजकारणी, लोकांचा फायदा होतो. कावळे स्वत:ला 'राजहंस' समजायला लागतात.देशाच्या कानाकोपऱ्यातली ही घाण, समाजव्यवस्थेला लागलेली कीड दूर करणे. आपल्यापैकी प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी ह्यासाठी वाट बघण्यात अर्थ नसतो. कुणीतरी ती वाजवायचीच असते. मग आपणच कां नाही! अशा चांगल्या कार्याला परमेश्वराची दैवी साथ नेहमीच लाभत असते. आपण संघर्षाची तयारी मात्र ठेवायला हवी.
आपल्याच मातृसंस्थेसाठी उभारलेले कार्य अर्धवट सोडून यावे लागले ह्याची खंत मला नेहमीच वाटते. पण ह्या अल्पावधीत तिथे केलेल्या साफसफाईची नोंद नागपूरच्याच काही सुजाण नागरिकांनी, पत्रकारांनी घेतली ह्याचा अभिमान देखील वाटतो. ह्या कारकीर्दीचा 'परिणाम' म्हणून पुढे नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरु पदासाठी माझे नाव 'कुणीतरी' आपण होऊन रिकमेंड केले होते. राज्यपाल कार्यालयाचे बोलवणेही आले होते. पण तांत्रिक अडचणीमुळे त्यावेळी मला ते पद स्वीकारणे शक्य झाले नाही. ह्या अनुभवाचा फायदा मला पुढे औरंगाबादचे कुलगुरुपद सांभाळतांना निश्चितच झाला. कारण एकदा ठेच लागली की माणूस सावध होतो. शहाणा होतो. आयुष्याच्या संध्याकाळी हे शहाणपण माझ्याच मातृसंस्थेने दिले हे ही नसे थोडके!
-डॉ. विजय पांढरीपांडे
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
July 31, 2022
आजच्या घडीला दिल्ली, चेन्नई,कोलकाता आणि मुंबई ह्या ४ महानगरांमधील प्लास्टिक कचरा दर दिवशी ६१ लाख किलो पेक्षा जास्त तयार होतो. प्रत्येकाने मनातल्यामनात एक शपथ घ्या की आजपासून मी प्लास्टिकचा, विशेषतः प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कटाक्षाने बंद करेन. आणि रोज दोन जणांना ह्याप्रमाणे प्रवृत्त करेन.
August 17, 2017
राम हा पूर्णपुरुष आहे. तो एका वचनाधीन राज्यकर्त्यांचा अज्ञाधारक पुत्र आहे. ज्या कैकयीमुळे त्याला थोडंथोडकं नव्हे तर चौदा वर्ष वनात जावं लागलं अशा आईविषयी कणभरही मनात किंतू, राग न धरणारा मुलगा आहे. तो एकपत्नीव्रत घेतलेला निष्ठावंत पती आहे.
June 23, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti