(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वाहतो ही दुर्वांची जुडी या नाटकाचा पहिला प्रयोग

    अभिनेत्री आशा काळे, गणेश सोळंकी व सुभाष हे पात्र अजरामर केलेले बाळ कोल्हटकर यांनी त्या काळात दोन हजाराच्या वर प्रयोग केले होते.

      June 19, 2022


  • गोष्ट “अशी” संपायला नकोय !

    ११ जानेवारीला अल्वार हून पंतनगर च्या वाटेवर असताना, मित्राने व्हाट्सअपवर कळविले – ” लता मंगेशकर आय सी यू त -कोरोनाची बाधा !” व्हाट्सअप विद्यापीठावर मी शक्यतो विश्वास ठेवत नाही म्हणून घरी पत्नीला तातडीने फोनलो – ” टीव्ही वर काही वृत्त आहे का बघ आणि कळव. “

      January 24, 2022


  • देवपूजेतील साधन – अक्षता

    देवपूजेतील साधन – अक्षता

    सर्व धान्यामध्ये तांदुळाला महत्त्वाचे स्थान असून तांदुळापासून केलेला भात हे उदर भरणाचे साधन आहे.

    क्षत म्हणजे भोक पडणे. ज्या धान्याला भोक पडत नाही ते धान्य म्हणजे तांदूळ असून त्याला अक्षता म्हटले जाते. पूजेच्यावेळी देवांवर आणि लग्नप्रसंगी वधूवरांवर कुंकूमिश्रित अक्षता टाकल्या जातात. याचे कारण असे की देवाने आपल्यावर कृपा करावी व वधूवरांचे जीवन सुखी व्हावे हा त्यामागील हेतू असतो.

    मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी मूर्तीच्या खाली अक्षता ठेवूनच मूर्तीची स्थापना केली जाते. कारण मूर्तीचा क्षय होऊ नये.

    झोपताना उशीच्या खाली चारसहा अक्षता पुडीत बांधून ठेवल्यास झोप शांत लागते. अणि चित्त, मन व बुध्दी स्थिर राहुन त्याला बाधा येत नाही.

    ओंकाराच्या आज्ञेनुसार ब्रम्हदेवाने अक्षतांची निर्मिती केली त्यामुळे प्रसन्न होऊन सर्व मंगलकार्यात अक्षतांना प्राधान्य दिले जाईल असा वर ओंकाराने ब्रम्हाला दिला अशी कथा पुराणात असल्यामुळे अक्षतांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

    स्त्री-पुरुषांचे भाळी कुंकूम तिलकावरही अक्षता लावल्या जातात ज्यायोगे त्यांना प्रत्येक कार्यात यश प्राप्त व्हावे.

      March 22, 2016


  • श्री कनकधारा स्तोत्रम् – २

    मुग्धा मुहुर्विदधती वदने मुरारेः प्रेमत्रपा-प्रणहितानि गताऽऽगतानि।मालादृशोर्मधुकरीव महोत्पले या सा मे श्रियं दिशतु सागरसम्भवायाः ॥२॥

    मुग्धा - अत्यंत शुद्ध,निर्मल, सरल, निष्पाप, अबोध. आई महालक्ष्मीची दृष्टी अशी आहे.

    मुहुर्विदधती वदने मुरारेः- ती दृष्टी वारंवार भगवान मुरारी अर्थात मुर राक्षसाचे शत्रू भगवान श्रीहरींच्या मुखकमलावर जात असते.

    गताऽऽगतानि- जात राहते .येत राहते. ही आचार्यश्री ची रचना मोठी सुंदर आहे. आईची दृष्टी भगवंताच्या मुखावर जाते .परत येते. पुन्हा जाते. पुन्हा येते. यामध्ये तिच्या चांचल्य गुणाचा भाग आहे तसाच सौंदर्याचा देखील.

    ती दृष्टी स्थिर का नाही? याचे नितांत सुंदर वर्णन करताना आचार्य श्री कारण देतात,
    प्रे
    मत्रपा-प्रणहितानि- ची दृष्टी प्रेम आणि लज्जा यांनी भरलेली आहे. श्रीहरींवर उत्कट प्रेम असल्याने ती दृष्टी भगवंताच्या मुखकमलाकडे जाते आणि दृष्टादृष्ट होताच त्रपा लज्जेने आईची दृष्टी खाली वळते. असे नितांत रमणीय दृश्य आचार्य वर्णन करीत आहेत.
    त्याच सौंदर्याला उपमा देताना ते म्हणतात,

    मालादृशोर्मधुकरीव महोत्पले या- एखाद्या महोत्पल म्हणजे पूर्णप्रफुल्लित कमळावर मधुकरींची रांग यावी तशी. वास्तविक येथे फक्त आई लक्ष्मीचीच दृष्टी आहे. पण तीच वारंवार जाणे-येणे करत असल्याने जणू काही रांग वाटत आहे. सातत्याने त्या दृष्टीचे आवागमन एखादा दृष्टीचा समुदाय असल्यासारखे वाटत आहे.

    सा मे श्रियं दिशतु सागरसम्भवायाः- सागर संभवा अर्थात समुद्रातून जन्माला आलेली. समुद्रमंथनाच्या दिव्य प्रसंगात समुद्रातून जी चौदा रत्ने प्रगटली यामध्ये आई महालक्ष्मी चे वर्णन आहे. त्याचा संदर्भ वापरत आचार्य श्री म्हणतात ,समुद्रातून प्रकट झालेल्या आई महालक्ष्मीची ती दृष्टी मला वैभव प्रदान करो."

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      March 11, 2020


  • उर्जेचा एकच स्त्रोत, फक्त्त अणुउर्जा का?

    उर्जेचा प्रश्न सोडविण्याच्या नादात स्थानिकांचे दैनंदिन जीवन भकास आणि उजाड होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत जरुरीचे आहे. अणुऊर्जानिर्मिती प्रक्रियेत हवा, पाणी, आणि पर्यावरण प्रदूषणासकट काही वेळा वैचारिक प्रदूषण होऊन स्थानिकांस व पोटापाण्याच्या व्यवसायास बाधा पोहोचार नाही याचा विचार होणे गरजेचे आहे. जपानसारखी परिस्थिती निमार्ण झाल्यास त्याला कसे तोंड देणार? ह्यासाठी प्रकल्पा नजीकच्या नागरिकांचे जीवन सुरक्षित असणे गरजेचे आहे.

      June 8, 2013


  • रोड टू संगम – ही पण बाजू !

    साधारण हीच सकाळची वेळ ! ब्रेकफास्ट आटोपून दुसऱ्या चहाची वाट पाहात असताना सहज टीव्ही च्या रिमोटची खुंटी पिरगाळली. स्टार गोल्डवर ” रोड टू संगम ” पाटी दिसली. नांव न ऐकलेले पण ओम पुरी व परेश रावल (सोबतीला काही मराठी नांवे – राजन भिसे, स्वाती चिटणीस वगैरे) !

      March 4, 2021


  • ये है मुंबई मेरी जान

    मुंबईचे आकर्षण इतर लोकांसारखेच मलापण पहीलेपासुन होते. मुंबईबद्दलच्या अनेक गोष्टी लहानपणापासुनचं मनावर बिंबवल्या गेल्या आहेत.

      July 29, 2023


  • कार्पेट एरिया, बिल्टअप एरिया आणि सुपर बिल्टअप एरिया यात फरक काय?

    आपण एखादे घर नव्याने विकत घेतो तेव्हा या संज्ञांचा आपल्याला विचार करावा लागतो. कारण या संज्ञा घराच्या क्षेत्रफळाशी निगडीत आहेत. संख्येबाबत विचार करता कार्पेट एरिया ही इतर दोन एरियांच्या तुलनेत सगळ्यात कमी असते. त्याचा खरा अर्थ असा की संपूर्ण घरातील सर्व खोल्यांच्या (हो, संडास, बाथरूम धरून) सगळया भितीना चिकटेल (वॉल टू वॉल) अशी सतरंजी (कार्पेट) अंथरली तर तिचे जे क्षेत्रफळ भरेल ते म्हणजे एकाद्या घराचा कार्पेट एरिया. घराच्या भिंती वजा करून मोजलेला एरिया.

      January 11, 2023


  • संवाद.. की द्विवाद..?

    तर आजचा आपला विषय आहे, ‘मुलांचं एकमेकांसोबत खेळणं’. मुलांचं मानसशास्त्र सांगतं की, मुलांची सामाजिक जाणीव एक ते तीन वर्षांच्या दरम्यान सुरू होते. प्रत्येक मुलाची ही समज, आणि जाणिवेची पातळी वेगवेगळी असते, आणि तशीच ती identical जुळ्यांचीसुद्धा असते.

      March 14, 2022


  • सुप्रसिद्ध क्रिकेटपटू विजय मांजरेकर

    विजय मांजरेकर खेळताना अक्षरशः चौफेर फटकेबाजी करत असत. कोणतेही फटाके मारताना खऱ्या कसलेल्या फलंदाजाप्रमाणे त्यांच्याजवळ भरपूर वेळ असायचा त्यांची बॅट चेंडूवर कधीच उशीरा यायची नाही.

      August 31, 2021