वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
इंग्रजीमध्ये एक एक विद्यार्थी विचारतो, आपल्याकडे गोष्ट आहे. धर्मोपदेशकाला पूर्वीच्या काळी अशी माणसे असायची ज्यांना देवाचा चेहरा दिसायचा. सध्याच्या काळी असे का होत नाही? तो उपदेशक म्हणतो, कारण अलीकडे कोणी खाली वाकत नाही, लवत नाही, वाकून पाहात नाही! वाकणे-लवणे हे शब्द नम्रतेसाठी वापरले आहेत.
August 7, 2023
समर्थांनी मराठी छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांना लिहिलेली दोन पत्रे इतिहासाला ज्ञात आहेत.या पैकी शिवरायांनी जो अभूत पूर्व पराक्रम केला त्याबद्दल त्याची स्तुती करणारे एक पत्र आहे.त्याच प्रमाणे शिवरायांच्या स्वर्गवासानंतर त्याचे सुपुत्र महा पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांना लिहिलेले दुसरे पत्र आहे.पहिल्या पत्रात शिवरायांची स्तुती आहे तर दुस-या पत्रात शिव छत्रपतींच्या गादीवर आरूढ झालेल्या संभाजी महाराजांना उपदेश केलेला आहे.आज आपण समर्थांचे पहिले पत्र पाहूया ----
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांस अधारु |
अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी || 1 ||
परोपकाराचिया राशी, उदंड घडती जयाशी |
जयाचे गुणमहत्वाशी, तुलना कैशी || 2 ||
नरपति हयपति, गजपति गडपति |
पुरंधर आणि शक्ति, पृष्ठभागी || 3 ||
यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत |
पुण्यवंत आणि जयवंत, जाणता राजा || 4 ||
आचारशील विचारशील, दानशील धर्मशील |
सर्वज्ञपणे सुशील, सर्वाठायी || 5 ||
धीर उदार सुंदर, शुरक्रियेसी तत्पर |
सावधपणेसी नृपवर, तुच्छ केले || 6 ||
तीर्थक्षेत्रे ती मोडिली, ब्राम्हणस्थाने बिघडली |
सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला || 7 ||
देवधर्म गोब्राम्हण, करावयासी रक्षण |
हृदायस्त झाला नारायण, प्रेरणा केली || ८ ||
उदंड पंडित पुराणिक, कविश्वर यज्ञिक वैदिक |
धूर्त तार्किक सभानायक, तुमचे ठायी || ९ ||
या भूमंडळाचे ठायी, धर्म रक्षी ऐसा नाही |
महाराष्ट्रधर्म राहिला काही, तुम्हा करीता || १० ||
आणखी काही धर्म चालती, श्रीमंत होउनी कित्येक असती |
धन्य धन्य तुमची कीर्ति, विस्तारली || ११ ||
कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकांस धाक सुटले |
कित्येकांसी आश्रय झाले, शिवकल्याण राजा || १२ ||
तुमचे देशी वास्तव्य केले, परन्तु वर्त्तमान नाही घेतले |
ऋणानुबन्धे विस्मरण जाहले, बा काय नेणु || १३ ||
सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ति, सांगणे काय तुम्हा प्रति |
धर्मास्थापनेची कीर्ति, सांभाळली पाहिजे || १४ ||
उदंड राजकारण तटले, तेथे चित्त विभागले |
प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे || १५ ||
महाराजांची समर्थ शेवटच्या ओवीत क्षमा मागून त्यांना सांगतात कि - "आपण प्रचंड राजकारणात तटले म्हणजे अडकलेले आहात त्यामुळे आपले चित्त अनेक ठिकाणी विभागले गेले आहे तरीही काहीही कारण (प्रसंग ) नसताना मी तुम्हाला हे पत्र लिहिले आहे त्या बद्दल मला क्षमा करावी " ..!
--चिंतामणी कारखानीस
March 3, 2016
सतीश जकातदार, वंदना भाले, दीपक देवधर, प्रभाकर वाडेकर, प्रसन्निकुमार अकलूजकर आणि मुकुंद संगोराम या चित्रपटप्रेमी मंडळींनी एकत्र येऊन १ ऑगस्ट १९८५ रोजी आशय फिल्म क्लबची स्थापना केली. सध्या सतीश जकातदार व वीरेंद्र चित्राव आशय फिल्म क्लबची धुरा सांभाळत आहेत.
August 1, 2021
भल्या पहाटे २७ ऑक्टोबर १९४७ साली, फस्ट शीख बटालीयन नवी दिल्लीहून श्रीनगरला विमानाने आणून उतरवले होते. हे सगळं कशासाठी तर, काश्मीर मध्ये घुसलेल्या, पाक पुरस्कृत टोळीवाल्यांना आणि घुसखोरांना हुसकावून लावायला!!
October 27, 2021
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बहुतांश व्यक्तींना आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी अर्थप्राप्तीच्या पर्यायी मार्गाचाही शोध घेतला जात आहे. जिओमुळे स्वस्त झालेल्या इंटरनेटचा वापर मनोरंजनाबरोबरच माहिती,ऑनलाईन उत्पन्न मिळविण्यासाठी म्हणजेच online earningकरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातोय.त्यासंबंधीचे आकर्षक थंबनेल असलेले युट्यूब व्हिडिओ पाहून अनेकांच्या मनात गैरसमज व अवास्तव अपेक्षा देखील निर्माण झाल्या आहेत.अशावेळी ऑनलाईन उत्पन्नाचे मार्ग, पद्धती योग्यरीत्या समजून न घेता त्या गोष्टी करावयास गेल्याने निराशाच पदरी पडते. अशावेळी तुम्ही ऑनलाईन उत्पन्नाचे पर्याय शोधत असाल तर काही बाबी लक्षात ठेवणे तुमच्या गरजेचे असेल.
September 4, 2020
आपल्यापैकी प्रत्येकजण उपजिविकेसाठी काही ना काही उद्योग-धंदा करतो.. आपल्यालाही कशाची न कशाची तरी आवड असते..
February 13, 2016
संपूर्ण जगाला स्तन्यपानाचे महत्व सर्वप्रथम सांगितले ते आयुर्वेदाने आणि पर्यायाने हिंदुस्थानाने. आज त्याच देशात #BreastfeedIndia असा ट्रेंड ट्विटरवर सुरु आहे.
August 2, 2016
मुख्य बाजारात जाण्याआधी डावीकडे जाणाऱ्या एका रस्त्याने थोडं पुढे आलं की तिथे तीन रस्ते एका ठिकाणी मिळतात . अगदी सकाळी साडेआठ नऊ पासून या जागी त्यांची डेरेदाखल व्हायला सूरवात होते. प्रत्येकीचं अढळपद ठरलेलं असतं. ट्रेनमधून भाजीच्या टोपल्या, बोचकी उतरवून पुढे ऑटोने आपल्या नित्याच्या जागी त्या दाखल होतात आणि आपला भाजीबाजार मांडायला सूरवात करतात. यामध्ये फळभाज्या, पालेभाज्यापासून चिकू , पेरू, जाम (रानफळ) पिवळ्या सालीची केळी, झेंडूची, जास्वंदीची फुलं अशा बऱ्याच गोष्टी असतात.
June 19, 2022
हिमांशू रॉय यांच्या निधनानंतर बॉम्बे टोकीज फुटली शशधर मुखर्जी व अशोककुमार त्यातून बाहेर पडले.तरी देविका डगमगली नाही सहायक दिग्दर्शक अमिया चक्रवर्तीला घेऊन चित्रपट काढले १९४५ साली “ज्वारभाटा” काढला. त्यावेळी चक्रवर्तीने “युसुफ खान”नावाच्या एका फळविक्याला आणले. देविका म्हणाली हे नाव चालणार नाही म्हणून त्याचे दिलीपकुमार असे बारसे केले.
August 11, 2022

मंगळावर अनेक ज्वालामुखी आढळतात. एके काळी जागृत असलेले हे ज्वालामुखी आज मृतावस्थेत आहेत. त्यामुळे मंगळ ग्रह हा भूगर्भीयदृष्ट्या निष्क्रिय ग्रह मानला गेला आहे. मात्र नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनातून, मंगळ वाटतो तसा निष्क्रिय नसल्याचं दिसून आलं आहे. किंबहुना मंगळावर सतत भूकंप होत आहेत, इतकंच नव्हे तर मंगळाच्या पृष्ठभागाखाली शिलारस अस्तित्वात असल्याचंही दिसून आलं आहे.
February 4, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti