(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • हेल्दी वूमन वेल्दी फॅमिली

    स्त्री आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेत असते पण ज्यावेळेस ही स्त्री काही कारणाने आजारी पङते त्यावेळेस मात्र घरातील लोकांना ह्याचा त्रास सहन करावा लागतो असे मला वाटते, एवढेच काय पण त्यांचे दैनंदिन जीवन ही विस्कळीत होते.

      March 13, 2015


  • हुकले रे ते….

    अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये डॉ. मोहिनी वर्दे यांनी लिहिलेला हा लेख


    रस्त्यावर पडलेला रूमाल त्या दिवशी मी सहज उचलला चार बाजूंनी लेस विणलेली कोपऱ्यात दोन पक्षी एकमेकांच्या चोचीत चोच घालून;... एक आवंढा गिळला. कुठे गेले ते दिवस? तो रोमान्स? स्वप्नांच्या थरकत्या पुलावरुन पैलतीर गाठण्याचा दिवस कोणाकोणाच्या आयुष्यात येतो? त्यांच्या? माझ्या?

    तसं पाहिलं तर जीवनात काही मिळवलं नाही असं नाही. घर संसार तर आहेच. मुलं बाळं, नातवंड! लेखन केलं थोडं फार नाव मिळवलं कधी स्फूर्तीसाठी अडून बसले, तर कधी सहज सुचत गेलं. तेव्हा वाटायचं हे आपण लिहीत नाही कोणीतरी आपल्या हातून लिहून घेतंय.

    साळुंकी ती कैसी बोले मंजुळवाणी।

    बोलविता धनी वेगळाची ।।

    पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला तेव्हां श्री. वसंत शिरवाडकर (कुसुमाग्रज यांचे बंधू) यांनी संपादकांना लिहिलेलं एक पत्र संपादकांनी मला वाचायला दिलं.

    “स्त्रियांनी लिहिलेले कथासंग्रह परीक्षणासाठी पाठवू नयेत असं मी आपल्याला लिहिलं होतं. पण ही नवी लेखिका कथेच्या माध्यमातून जीवनाची जाणीव वाढवू पाहात आहे. संग्रह वाचनीय आहे.” अभिप्राय वाचला आणि पोस्टकार्ड संपादकांकडून मागून घेतलं. जपून ठेवलं. आपोआप वाट निश्चित झाली. लेख, परीक्षण लिहिता लिहिता कथा सुचू लागल्या. इकडे कॉलेजमध्ये मराठीची प्राध्यापिका म्हणून थेट बी.ए. आणि नंतर पी.एच्.डी केल्यानंतर एम.ए. च्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मिळाली. मान मिळाला. खूप वाचन केले. व्यवसायाकरिता ते आवश्यक होते.

    मी लहानपणापासून नाटक- सिनेमा खूप पाहिले. घरात आईवडिलांना आवड होती. पूर्वी गिरगावात केळेवाडी येथे साहित्य संघ मंदिरातर्फे वर्षातून एकदा नाट्यमहोत्सव होत असे. त्यात आठदहा नवी जुनी नाटकं सादर केली जात. वडील त्या काळातील संगीत नाटकातील अनेक अभिनेत्यांना ओळखत असत. त्या वेळी दहा बारा वर्षांची असताना रंगमंचाच्या मागच्या बाजूला नटांना भेटण्यासाठी मी देखील वडिलांबरोबर जात असे. रंगमंचावरचा कृष्ण मागच्या बाजूला फुर् फुर् चहा पितांना पाहिलं तेव्हा धक्काच बसला. आदल्या दिवशी पाहिलेला एखादा नट मंचावर धोतर नेसून बंडी घालून वावरताना पाहिलेला तो एकदम शर्ट-पँटमध्ये सिगरेट ओढताना दिसला, नऊवारी फाटक्या लुगड्यातली 'एकच प्याला' मधली सिंधू बॉब केलेल्या केसात बघितल्यावर माझे डोळे खोबणीतून बाहेर पडतात की काय असं वाटायला लागलं. मनात यायचं की हे अॅक्टर लोक एका जन्मात मरणाविना किती जन्म भोगतात? मजाच आहे.

    मी कथा लिहीत राहिले. माझ्या पहिल्याच संग्रहातील 'देवकी' ही क्रांतिकारी म्हणा किंवा अपारंपारिक कथा आहे. आपले प्रत्येक बाळ कंसाच्या क्रूर सूडभावनेपोटी मारले जाते आहे हे पाहून देवकीच्या मनात विचारांचे वादळ उठते. आपले बाळ वाचवणे आपल्या हातात नाही. पण होऊच दिले नाही तर? ती वसुदेवाच्या जवळ जाण्यास घाबरते. अशीच एक त्या काळातील म्हणजे १९७६ मधल्या संग्रहातील कथा आहे. आमच्या लांबच्या नात्यातील सीतामावशी आणि त्यांचा भाऊ अविवाहित. खूप वृद्ध झाले. भाऊ वारला. तेव्हा मी त्यांच्यावर कथा लिहिली.

    सीतामावशींनी स्वत: अंत्यविधी केले, पिंडदान केले. मग स्त्रियांनी अंत्यसंस्कार करायचे नाहीत म्हणून कुणातरी लांबच्या नात्यातल्या पुरुषाला बोलवायचे, किंवा परक्याकडून अंत्यविधी करवून घ्यायचे हे त्यांच्यासारख्या परंपरा जपणाऱ्या, कर्मकांड मानणाऱ्या सीतामावशींना का वाटले असावे? माणसाच्या मनाचा ठाव लागत नाही. प्रत्यक्षात सीतामावशींनी काय केले हे महत्त्वाचे नाही. पण माझी कथा अशी जन्माला आली. एका प्रसिद्ध कंथाकाराने मला कथेवर नाट्य उत्तम रीतीने व्यक्त करता येते आणि माझे संवाद सहज प्रगट होतात असे मला सांगितले. एकंदरीत मी नाटक लिहिले नसले तरी
    नाट्यात्मक संवाद चांगले जमत होते. कुठेतरी माझ्या नकळत नाटक माझ्यात घर करून होते.

    नाटक चित्रपट यांची समीक्षा करणे हा छंद लहानपणापासून होता. त्या वेळी मी काही पाक्षिकातून नियमित लिहीत असे. थोडी प्रगल्भता, आल्यावर समीक्षेचे दोर आवळून, साहित्य आणि नाटक, किंवा 'प्रयोगशील कला, त्यातील त्रुटी आणि संभाव्य फायदे यावरील व्याख्याने कॉलेजविश्वात, इतर कॉलेजात जाऊन देत असे. जसे आम्हाला आमच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम (सांस्कृतिक) आयोजित करावे लागत तसे इतर कॉलेजमध्ये त्यांची आवश्यकता होती. एकूण असे साटेलोटे असायचे. तरीही नाटकाची साहित्यिक मूल्यांच्या आधारे चर्चा करीत असताना नटाच्या अभिनयामुळे आपण अधिक प्रभावित होतोअसे वाटायचे.

    नाटक, चित्रपटांच्या निमित्ताने, अभिनेत्यांना भिन्न भिन्न भूमिकांमध्ये पाहाताना एक विलक्षण अननुभूत आनंद मला मिळतो. आपल्या मनाचा कल असेल तसे नाटक सिनेमा पाहातांना हव्या त्या भूमिकेत स्वत:ला कल्पून प्रसंगात (सिचुएशन) मध्ये हवे तसे बदल करून स्वप्नरंजनाचे सुख मी सतत घेत असते. नाटक संपले प्रेक्षागृहातून बाहेर जायची वेळ आली तरी मी नायक किंवा नायिकेच्या भूमिकेमध्ये गुंतलेली असते.
    .
    लहानपणापासून पोहायला जाण्याची आम्हा दोघी बहिणींना सवय होती. एकदा असा प्रसंग आला की स्वतःमधल्या देवत्त्वाची नकळत प्रचीती आली. पूर्वी पुणे, नाशिक, नागपूर या शहरांची आजच्यासारखी भरमसाठ वाढ झाली नव्हती. नाशिक शहराबाहेर गंगापूर धरणाच्या परिसरात गोदावरी नदीला एके ठिकाणी रुंद धबधबा निर्माण झाला होता. आज हा परिसर पूर्ण बदलेला आहे. आमच्या ओळखीच्या एका श्रीमंत बाईंनी आम्हाला दोघींना सोबतीला नेले. त्यांना पोहोण्याची हौस होती. त्या आणि त्यांचा दोघी मैत्रिणी नदीत पोहायला उतरल्या. शांती नावाची त्यांची न पोहता येणारी मैत्रीण काठावर बसली. नदीला पाणी कमी होते. त्यामुळे काठावरचे खडक उघडे पडले होते. जणू काळ्या पाठीचे अजस्त्र प्राणी काठावर तणावून निद्राधीन झाले होते. मी शांतीला सोबत करीत होते. शांती मला पुन्हा पुन्हा सांगत होती. “तू जा. तुला पोहोता येतंय तर मजा कर."

    मी देखील बसून बसून कंटाळले. पाण्यात उतरले, मुख्य सांगायचं म्हणजे आम्ही सर्व साडी नेसून पोहत होतो. स्विमिंग सूट असा उघड्यावर घालण्याची कल्पना देखील कोणी करू शकत नव्हते. पाण्याचा थंडगार अमृतस्पर्श दुपारच्या टळटळीत उन्हात सर्वांगाला सुखावून गेला. इतक्यात “भाभी ! भाभी ! बचावो ऽऽ!”

    अटीतटीचे काकुळतीचे शब्द कानावर पडले. शांती प्रपाताखाली नदीच्या प्रवाहाच्या मध्यावर मध्येच तिचे डोके पृष्ठभागावर दिसे आणि पुन्हा गायब होई. मी प्राणपणाने तिच्यापर्यंत जाऊन कशी पोहोचले, तिला बळजबरीने माझी कंबर घट्ट पकडायला कशी लावली तिचा भार अंगावर झेलून किनाऱ्याला कशी आले. काही उमगले नाही. होती ती
    केवळ ईशकृपा. हातून पुण्य घडायचे होते किंवा पूर्व संचिताने पुण्य घडवून आणले होते.

    असे कुठेतरी खोल खोल रूतलेले जाणिवेतून निसटलेले नेणिवेत मंद हेलकावे खाणारे. रंग उधळणारे, काळोख पसरवणारे, आपल्याशी झगडणारे, जवळच्या माणसांच्या कायमच्या विरहाने पोळणारे, विजयोन्मादाने वाऱ्यावर फडफडणारे, खरेपणाचे, खोटेपणाचे, समुद्राची लाट वाळूच्या किनाऱ्यावर फेसाची नक्षी कोरून ओसरते, नव्याने सरसावते नवी नक्षी कोरते. आठवणी जाग्या होतात. तेव्हा ते खरे वर्तमान असते.

    मी कथा कादंबऱ्या लिहिल्या त्यात 'टीझर' ही एका स्टड फार्मवरच्या घोड्यावरची वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी लिहिली पण दुर्दैवाने समीक्षकांनी माझी घोड्याविषयच्या अभ्यासपूर्ण कादंबरीला लेखणीच्या एका फटकाऱ्याने कर्जाऊ माल असल्याचे जाहीर केले. ही कादंबरी मूळ इंग्रजीवरून घेतली असावी असा आरोप केला. चिखलफेक करणं सोपं असतं. नवनिर्मिती ह्या जिवाला लागलेल्या कळा असतात. त्यांचे व्रण खोलवर जातात.

    मोटर चालवायला शिकणे हा मी माझा एक पराक्रम मानते माझ्या नवऱ्याने मला मोटार चालवण्याची शिकवणी देण्याचे ठरवले. माझे जरा काही चुकले की आरडाओरड करीत. ब्रेक दाब, ब्रेक दाब म्हणता म्हणता स्वतःच व्हील हातात घ्यायचे, मी ब्रेक दाबला आणि गाडी थांबली की यांचा संताप, झाडून टाकायच्या झुरळाकडे बघणारी नजर माझ्याकडे लागायची. मग मी सरलाबेन लोहाणा या प्रेमळ शिक्षिकेकडून ड्राइव्हिंगचे धडे घेतले. तिने मस्त शिकवलं आणि मी मस्त शिकले. परमनंट ड्राइव्हिंग लायसन्स मिळवलं. पण हे गाडीत असले की माझ्या चुका व्हायच्या.

    “कोणी मूर्खाने हिला ड्राइव्हिंग शिकायला सांगितलंय? ” असं म्हटलं की मी मनात म्हणायची 'तुम्हीच' !

    माझे पुस्तक प्रसिद्ध करणाऱ्या एका प्रकाशकांना मी नेहमी स्वहस्ते केलेले लाडू, चिवडा, भजी वगैरे देत असे. त्यातून माझे स्वयंपाकावरचे 'स्वादिष्ट कृती' पुस्तक प्रसिद्ध झाले. त्या वेळी माझ्या मैत्रिणीची नुकतीच लग्न झालेली मुलगी अमेरिकेला गेली होती तिला त्या पुस्तकाचा खूप उपयोग झाला. ह्या गोष्टी १९७७/७८ सालच्या.

    आजच्यासारखे त्या वेळी खाजगी जीवन सार्वत्रिक झाले नव्हते. आपल्या स्वतःबद्दल कुटुंबाबद्दल सर्व सगळ्याना कळावे इतके खाजगी आयुष्य स्वस्त झाले नव्हते. 'फेसबुक' चा आज इतका प्रचंड प्रसार झाला आहे की 'फेसबुक' म्हणजे आई, बाप, बंधू, भगिनी सगळे आप्त. जे फेसबुकवर नाहीत ते मागासलेले. इतके सगळे खूप काही, कधी महत्त्वाचे कधी निरुपयोगी कधी वायफळ काही बाही केले. वाचन, लेखन, कला, साहित्य हा एक जीवनाच्या उभारीचा स्तंभ. त्यावर आयुष्य तोलून धरले. चरित्र लेखन हा माझा पिंड असावा. “डॉ. रखमाबाई एक आर्त' या चरित्राचा बोलबाला झाला. पारितोषिके मिळाली. 'टीझर' लाही पारितोषिक मिळाले.'बालगंधर्व' या अभिजात नटसम्राटाचे चरित्र लिहिले. नाटके वाचली, पाहिली, शिकवली पण प्रत्यक्ष रंगभूमीवरचे नाटक जगून पाहायचे राहून गेले. नाटक दुरून भोगले पण नाटकात भूमिका करण्याचा योग आला नाही. कशी दिसले असते मी रंगमंचावर?

    शाळेत असतानाची शाळेच्या रंगमंचावरची एकच आठवण. त्या काळात 'टॅब्लो' बसवत असू. मी मुमताज महाल झाले होते. आईची शॉकिंग पिंक रंगाची बहारदार चंदेरी नऊवारी साडी नेसलेली मुमताज आणि भाऊ पांढरा लेंगा झब्बा घातलेला शहाजहान. मी त्याच्या मांडीवर डोके टेकून पडले होते.

    असे माझे पहिले आणि शेवटचे रंगमंचावरचे अस्तित्व. बेछूट! बहारदार ! बेदरकार !

    अखेरीस नाटकात काम करण्याचे राहूनच गेले.

    'हुकली ती संधी हुकली!'

    -डॉ. मोहिनी वर्दे
    (अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)

      July 28, 2022


  • अमेरिकेतील ऋतुचक्र – भाग ३

    सारा उंचसखल भाग असल्यामुळे ठिकठिकाणहून वहात येणार्‍या पाण्याने रस्त्याच्या दोहोबाजूस ओहोळ झालेले असतात. ते पाणी वाहून, बर्‍याच ठिकाणी रस्त्याची सोबत करत, दोन्ही बाजूंना खोलगट पन्हाळी तयार झालेल्या असतात. पावसात त्यातून डोंगरावरचे तांबडे मातकट पाणी वहात असते. इतर वेळेला पन्हाळीत ओल टिकून रहाते. त्या ओल्या मातीत, गवताच्या साथीनं रामबाण उगवलेले असतात. रंगीबेरंगी फुलं, गवताची डुलणारी पाती, रामबाणाचे जागोजागी उगवलेले पेव आणि त्यांवरची असंख्य फुलपाखरं, किडे, चतुर यांनी, रस्त्याकडेच्या या पन्हाळी नुसत्या गजबजून गेलेल्या असतात.

    रस्त्याकडेच्या घरांपुढे लोक आपापल्या बागांमधे काम करताना दिसायला लागतात. विविध प्रकारच्या फुलांचे ताटवे बागांची शोभा वाढवायला लागतात. एप्रिल मे हा tulip फुलांचा सिझन. अनेक घरांपुढे ट्युलीपच्या रंगी बेरंगी फुलांची पखरण झालेली दिसते. Daffodils देखील खूप दिसतात. थंडी कमी झाल्यामुळे लोकं घराबाहेर अधिक पडायला लागतात. चांगलं ऊन पडलं असलं तर जॉगिंग करायला, सायकलिंग करायला बाहेर पडलेले लोक दिसतात. पण इथे सायकलिंग म्हणजे आपल्यासारखं पायजम्यामधेच सायकलवर टांग मारली असा प्रकार नसतो. सायकल चालवणार ते देखील हेल्मेट, टाइट शॉर्टस्, गॉगल्स, पाण्याची बाटली, शूज असा सरंजाम हवाच! संध्याकाळी रस्त्याकडेच्या ग्राउंड्सवर कुठे कुठे गावातल्या मुलांचा बेसबॉलचा खेळ रंगात आलेला असतो. त्यांचे आई, वडील गाड्या, पिकअप ट्रक्स पार्क करून गप्पा मारत उभे असतात.

    शेतांत आधीच्या हंगामात कापलेल्या मक्याचे खुंट तसेच राहिलेले असतात. ते हारीने उभे असलेले खुंट, सुकून पिवळे पडलेले असतात. त्या सुकलेल्या खुंटांच्या मधली सगळी जमीन पावसाच्या आगमनासरशी हिरव्या तणांनी, गवताने भरून जाते. मे च्या सुरवातीस नांगरणी सुरू होते. शेतांतून ट्रॅक्टर्स फिरताना दिसायला लागतात. काळीभोर माती पुन्हा नवीन बीज स्वीकारण्यासाठी उतावीळ होऊन जाते. नांगरलेली काळीभोर शेतं आणि चराऊ गवताची हिरवीगार कुरणं असा संमिश्र बाज माळरानांवर पसरतो. कुरणांत गवत पुरेसं वाढलं की गायींना आणि वासरांना बाहेर चरायला सोडलं जातं. टेकड्यांच्या हिरव्यागार उतारांवर काळ्या पांढर्‍या गायींचे कळप अधाश्यासारखे चरू लागतात.

    जूनच्या मध्यापर्यंत पेरणी संपून मक्याच्या रोपांची टोकं मातीतून वर यायला लागलेली असतात. दिवस चांगलाच मोठा झालेला असतो. रात्री ९-९॥ वाजता देखील चांगला प्रकाश असतो. सूर्य मावळून गेला तरी मावळतीचं आकाश चांगलंच प्रकाशमान असतं. सूर्याचा परावर्तित प्रकाश आसमंतात भरून राहिलेला असतो. कधी कधी रात्री लॅबमधून परत येताना पूर्वेकडे चंद्र उगवत असतो आणि मावळतीला बुडालेली सूर्याची किरणं अजून आपला प्रभाव सोडायला तयार नसतात.

    सूचिपर्णी वृक्ष जरी वर्षभर हिरवेगार दिसत असले तरी निरखून बघितल्यावर त्यांच्यावर देखील वसंताचा हात फिरल्याचं जाणवतं. ज्युनीपरच्या हिरव्यागार फांद्यांमधून पोपटी रंगाचे नाजुक बड्स उगवलेले दिसतात. सारं झाड या पोपटी बड्सनी भरून जातं आणि एखाद्या ख्रिसमस ट्री वर रंगीत दिव्यांच्या माळा लावाव्यात तसं वाटायला लागतं. झाडाच्या जुन्या सुया गर्द शेवाळी रंगाच्या असतात. या सुयांच्या टोकाला निळसर हिरव्या रंगाच्या नव्या सुया वसंतात येतात त्यामुळे सारं झाड ही दोन रंगांची रंगसंगती अंगावर वागवतं - झाडांच्या बुंध्यांजवळचा फांद्यांचा रंग गर्द शेवाळी तर परीघाजवळ फांद्यांचा रंग निळसर हिरवा!

    जुलै ते सप्टेंबर म्हणजे उन्हाळा, मोठे दिवस, बर्‍यापैकी सूर्यप्रकाश, मधून मधून पडणारा पाऊस, हिरव्या रंगाचं एकछत्री साम्राज्य! पशु, पक्षी, किटक, फुलपाखरं सार्‍यांची लगबग जाणवण्या इतपत वाढलेली. रान आता सहस्र कंठांनी बोलायला लागलेलं असतं. दिवसा मधमाश्या आणि फुलपाखरं आणि रात्रीच्या वेळी काजवे (fire flies) भरपूर दिसतात.

    ओढ्यांच्या काठांवर झाडाझुडपांची गर्दी झालेली असते. झाडांच्या सावल्यांनी पाणी झाकोळून गेलेलं असतं. बालकवी ठोंबरे यांच्या कवितेतल्या औदुंबरासारखी काही झाडं जळात पाय सोडून बसलेली असतात. जुन्या मोडून पडलेल्या फांद्या ओढ्यातल्या दगडांत, चिखलात रुतून बसलेल्या असतात, आणि त्यांची वेडीवाकडी धडं पाण्याबाहेर डोकावत असतात. अशाच एखाद्या ओढ्यात, वरच्या झाडांची सावली शोधून, एखादी बदकीण आपला पोरवडा सांभाळत, किडे शोधत पाण्यात डुबक्या मारत असते.

      August 7, 2015


  • पेट्रोरसायनांची गरज केव्हापासून पडू लागली?

    माणूस हा निसर्गाचे बालक आहे. त्यामुळे तो सर्वस्वी | निसर्गावर अवलंबून आहे. त्याला शेती करायला लागून जेमतेम ८-१० हजार वर्षे झाली आहेत. पण त्या आठ-दहा हजार वर्षापूर्वीपासून ते अगदी ५०-१०० वर्षापूर्वीपर्यंत शेतीतून मिळणारी धान्ये, कापूस, रबर, इंधनासाठी लाकूड या सगळ्या गोष्टी त्याला पुऱ्या पडत भारताची असत.

      March 12, 2023


  • भारतात रंगीत दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात

    २५ एप्रिल १९८२ रोजी भारतात रंगीत दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात झाली. १९८२ मध्ये भारतात झालेल्या ‘एशियाड’ या आशियायी क्रीडा स्पर्धेमुळे भारतातले क्रीडाप्रेम किती वाढीला लागलं हे माहीत नाही; मात्र त्यानिमित्तानं रंगीत झालेल्या टीव्हीचं प्रेम मात्र झपाट्यानं वाढत गेलं हे नक्की !

      April 27, 2021


  • श्री गणाधिप स्तोत्रम् – भाग ३

    प्रकाशितात्मतत्वक- साधकांच्या आत्मतत्वाला प्रकाशित करणारे. त्यावर पडलेला मायेचा मळ दूर करणारे.
    अशा भगवान गणाधिपांना मी वंदन करतो.

      January 24, 2020


  • कुठलंही काम, तुमच्या जीवापेक्षा मोठं नाही

    तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या, आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही.
    कृपा करून जमेल व झेपेल एवढंच काम हातात घ्या; त्यासाठी आग्रह धरा.
    प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका.
    खर्च आटोपशीर ठेवा.
    तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काहीही नाही, याचं भान ठेवा.
    कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देते.
    स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवा.
    कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा.
    तुमच्या जीवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही, याबद्दल खात्री बाळगा.
    ज्यांच्या सगळ्या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई-वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचा हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा.

    हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं. तरीही आपण धावतो- ऊर फुटेस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही....
    त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडी-निवडी जपा, स्वतःसाठी थोडातरी वेळ काढा.
    संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इ. चा उपयोग करा.
    सुट्टीचा आनंद आपल्या प्रियजनांसोबत लुटा...

    सर्वेपि सुखिनः सन्तु।
    सर्वे सन्तु निरामयः।
    सर्वे भद्राणि पश्यन्तु।
    मा कश्चिद दुःख माप्नुयात॥

    आज ७ एप्रिल,
    जागतिक आरोग्य दिन…
    आपण आणि आपल्या प्रियजनांना निरोगी व आनंदी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा…!

      April 7, 2017


  • बेगमबर्वे’ या नाटकाचा पहिला प्रयोग

    बेगम बर्वे (१९७९) हे अनेकार्थांनी मराठी रंगभूमीच्या इतिहासातील एकमेवाद्वितीय नाटक आहे. सामान्यतः एकत्र वा विभक्त कुटुंबातील व्यक्तींचे परस्परसंबंध व त्यातून उत्पन्न होणारे ताणतणाव मराठीतील अनेक नाटकांच्या केंद्रस्थानी असतात. या नाटकात योजून चार व्यक्तिरेखा आहेत. त्यांचे एकमेकांशी रक्ताचे नाते नाही. अनाम पण दृढ भावबंधांनी या व्यक्ती परस्परांशी जोडल्या गेल्या आहेत असेही दिसत नाही. नाटकात रूढ अर्थाने नायक-नायिका नाहीत. चौघांपैकी जावडेकर, बावडेकर व शामराव हे तिघेजण मध्यमवयीन पुरुष आहेत. बर्वे बाह्यत: पुरुष आहे परंतु अंतर्यामी तो स्त्रीचे जीवन जगतो.

      March 19, 2022


  • बदलती भारतीय कटुंब पद्धती

    कुटुंबाचे हे वास्तव आजकाल दिसून येते. आपल्याला गरज आहे ती आपल्या परिवारतील सदस्यांना समजून घेण्याची त्यांना मोठ्यांकडून मिळत असलेल्या मार्गदर्शनाची, प्रेमाची आणि एकत्र राहण्याची.

      May 1, 2024


  • युरोप ऑन रेल (युरेल) आणि युरो स्टार – भाग ४

    जर्मनीमधील ट्युबिन्गन या छोट्या गावात जाण्याकरता स्वित्झर्लंडमधील झुरीक या स्टेशनवरून छोटी, धुराच्या इंजिनाची गाडी होती. दोन तासांचा प्रवास सुखाचा होता. जर्मन सरहद्दीवरील एका स्टेशनवर पाटी लिहिलेली वाचली आणि क्षणभर धडकीच भरली. 'तंबाखू व तत्सम पदार्थ बाळगण्यास बंदी असून तसे आढळल्यास कायदेशीर इलाज केला जाईल.' मुंबईहून निघताना आमच्या एका मित्राने जर्मनीतील एका मैत्रिणीस भेट म्हणून अस्सल भारतीय तंबाखूचं भलं मोठं पाकीट दिलेलं होतं. जर्मन शिस्तीबद्दल लहानपणापासून बरंच वाचलेलं होतं. ताबडतोब सामानातून पाकीट काढून गाडीतून दूर फेकलं. नशीब, कोणी पाहिलं नाही! आम्ही जिथे जाणार होतो ते ट्युबिन्गन स्टेशन अगदी तळेगावसारखं छोटेखानी होतं, पण व्यवस्था व स्वच्छता उत्तम होती, गावात जाण्यासाठी बाहेर बसेस उभ्या होत्या. भाषेची अडचण बरीच जाणवत होती. पण अखेरीस मित्राच्या घरी डेरेदाखल झालो. ९ महिने पत्रांद्वारे केलेली आखणी फलद्रूप झाली होती. आमच्या आनंदाला उधाण आलं होतं.

    जर्मन रेल्वे व हिटलर यांचं अजोड नातं होतं. त्याच्या अमदानीत जर्मन रेल्वे ही जगातील सर्वोत्कृष्ट रेल्वे म्हणून प्रसिद्ध होती. दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या अतिजलद इंटरसिटी एक्सप्रेस या प्रथम जर्मनीमध्ये सुरू झाल्या होत्या.

    ट्युबिन्गनहून थेट बर्लिन गाठावं म्हणून रात्री स्टेशनवर आलो. तो दिवस होता शनिवार शनिवार व रविवारी ही गाडी बर्लिनला जात नाही. पण हे आमच्या लक्षातच आलं नव्हतं. टाईमटेबलच्या अभ्यासातील मोठी चूक प्रथमच झाली, पण त्यामुळे आमचं बर्लिन पाहणं हुकलं याची हुरहूर मनाला कायम राहिली. हिटलरची कर्मभूमी बघावी असं अनेक वर्षे मनातून वाटत होतं, पण योग नव्हता व तो परत येण्याची शक्यताही नव्हती. कार्यक्रमात ताबडतोब बदल करून स्टुटगार्डमार्गे पहाटे चार वाजता म्युनिकला उतरलो. रात्री गाडीत छान झोप लागत होती, परंतु साखरझोपेतून उठावंच लागलं कारण, गाडी शेवटी तेथेच थांबणार होती. रविवार पहाट. सुनंसुनं भव्य रेल्वे स्टेशन. भयाण शांतता. आम्ही तिघे विश्रामगृहात पेंगत होतो. एक वृद्ध प्रवासी बाजूला पेंगत होता. उजेड होण्याची वाट पाहत. बाहेर रस्त्यावर तर अस्वस्थ करणारी सामसूम होती. फक्त एखादी ट्राम जाताना दिसे. अर्धातास पायपीट करून अखेर आम्ही 'पेन्शॉन' शोधलं.

    रेल्वे टाईमटेबलमध्ये युरोपमधील काही अविस्मरणीय ठरतील असे प्रवासमार्ग मुद्दामहून नमूद केलेले होते. त्यांतील म्युनिक-साल्सब्रुग-इन्सब्रुक असा साधारण तीन तासांचा प्रवास म्हणजे स्वर्गभूमी ऑस्ट्रियाचा प्रवास होता. स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया या दोन देशांच्या पदरी निसर्गानं सौंदर्याचं माप भरभरून घातलं आहे. संपूर्ण गाडीचा रंग लालचुटूक व पांढरा आणि आमचा पहिल्या वर्गाचा डबा तर एखाद्या महालासारखा वाटत होता. डब्याच्या एका बाजूला आरामात उभं राहता येईल असा कॉरिडॉर, त्या बाजूला खिडक्यांच्या उत्तम, पारदर्शक, अतिशय लांब-रुंद काचा, मध्यात कसलाच अडसर नाही. तिथे उभं राहिल्यावर आपण डोंगरदऱ्यांतच उतरलो आहोत असा आभास होत होता. बसण्यासाठी उत्तम कुशन सीट्स होत्या आणि तिथे बसून दुसऱ्या बाजूचा निसर्गसुद्धा दिसत होता. त्यातही दोन्ही बाजूंकडील निसर्गपट इतका वेगळा, की प्रत्येक बाजूकडे नजर भिरभिरत होती. काही वेळा गाडीचा डबा डोंगरकपारीच्या इतका जवळून जात असे, की कपारींमधून उसळणारे पाण्याचे ओहोळ काचेवर धडकत. वाटेत अनेक लहान-मोठे बोगदे होते. त्यांमधून बाहेर आल्यावर क्षितिजापर्यंत पसरलेली हिरवीगार कुरणं दिसत होती. निसर्ग इथे अगदी शांतपणे पहुडलेला होता. गाडीही तितक्याच शांतपणे मार्ग आक्रमत होती. मध्येच गाडीची लय वाढे आणि एखाद्या खिंडीतून जाताना कानांवर पडणारा आवाज अंतर्मनापर्यंत भिडत राही. आम्ही तिघेही इतके मंत्रमुग्ध झालो होतो, की एकमेकांशी बोलूही शकलो नाही. निसर्गाची नानाविध रूपं मनावर लाटांसारखी स्वार होत होती. तीन तास कधी संपले हे कळलंच नव्हतं. त्याच गाडीने परतीच्या प्रवासात पुन्हा तितकाच भरभरून आनंद दिला होता. मन स्तब्ध झालं होतं. शब्दांना जागाच नव्हती.

    जर्मनीतील अतिशय वेगवान इंटरसिटी एक्सप्रेसचा प्रवास म्हणजे जर्मन रेल्वेची शान आहे. ह्या गाडीने प्रवास करणं केवळ युरेल पासमुळे शक्य झालं मध्य-जर्मनीतील मॅनहाईम व हायडेलबर्ग ही दोन अतिशय जुनी शैक्षणिक केंद्रांची शहरं म्हणून प्रसिद्ध आहेत. तिथे जाण्यासाठी थेट म्युनिकपासून ही गाडी होती. मॅनहाईम येथील हॉस्पिटलमध्ये काही दिवस मी उच्च शिक्षण घेण्याचं पत्रोपत्री पक्कं केलेलं होतं, परंतु तिथे पोहोचण्याच्या तारखा काही कारणाने बदलाव्या लागणार होत्या. तेव्हा त्या जागी प्रत्यक्ष जाऊनच आधी एकदा भेटावं असं विचाराअंती ठरविलं. निव्वळ युरेलचा पास व तेथील अति-जलद गाडीमुळे हे शक्य होणार होतं. म्युनिकहून सकाळी साडेसहा वाजता निघालो ते थेट २५० मैलांवर असलेल्या मॅनहाईम येथे साडेतीन तासांत पोहोचलो. गाडीत अनेक प्रवासी सुटाबुटांत, ऑफिसला कामासाठी निघालेले. आपल्या कामात मग्न. दहा वाजून दोन मिनिटांनी गाडी पोहोचणार असणार असेल, तर अक्षरश: त्या मिनिटाला तिथे हजर होती. वाटेत जर्मनीतील अनेक कारखाने, छोटी टुमदार गावं मागे पडत होती. आतून गाडीच्या वेगाची कल्पनाच येत नव्हती. मॅनहाईमधील सर्व कामं आटोपून, भरपेट जेवण घेऊन माझी स्वारी परतीची गाडी घेऊन थेट म्युनिकला संध्याकाळी साडेसहापर्यंत पोहोचली. चांगलं ५०० मैलांचं अंतर पार केलं होतं. थकवा तर अजिबात नव्हता. धूळ हा प्रकार विसरावयास झाला होता.

    -- डॉ. अविनाश वैद्य

      October 9, 2022