वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
प्रकाशन दिनांक :- 20/02/2005
र्ीकाम करून घेणे’ ही संकल्पना अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात रूढ झाली आहे. एवढेच नव्हे तर काम करून घेण्याची कला आत्मसात करणे हीच यशाची एकमेव गुरुकिल्ली ठरू पाहात आहे. अर्थात केवळ वाच्यार्थाच्या दृष्टीने विचार केल्यास त्यात वावगे असे काहीच दिसत नाही, परंतु ‘काम करून घेणे’ या संकल्पनेमागील लक्षार्थ मात्र बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित करून जातो.
February 20, 2005
आज नरकचतुर्दशी. या दिवशी अंगाला तेल-उटणे लावून मग अंघोळ करण्याची पद्धत आहे. यालाच 'पहिली अंघोळ' असंही म्हटलं जातं. 'पहिली' अंघोळ असं म्हणण्यामागे काय कारण असेल बरं? कारण असं आहे की; या दिवसापासून रोज नित्यनेमाने अभ्यंग करायचा आहे. याकरता 'पहिली'. आपण मात्र वर्षातला पहिला आणि शेवटचा अभ्यंग एकाच दिवशी करत असतो!!
अभ्यंग:
संपूर्ण अंगाला कोमट तेल लावणे म्हणजे अभ्यंग. हा अभ्यंग दररोज नित्यनेमाने करावा असे आयुर्वेद सांगतो. निरोगी व्यक्तींनी दैनंदिन वापरासाठी तिळाचे तेल कोमट करून वापरावे. संपूर्ण शरीराला वरून खालच्या दिशेने तेल लावून जिरवावे. तेल वापरताना कंजूसपणा करू नये. चांगला थपथपून 'तेल्या मारुती' करावा. सुमारे दहा मिनिटांत सर्वांगाला तेल लावून होते.
नियमित अभ्यंग केल्याने त्वचा उत्तम राहते, अकाली वळ्या-सुरकुत्या पडण्यासारखे त्रास होत नाहीत, श्रमहरण होऊन ताजेतवाने वाटते, झोप उत्तम लागते आणि शरीराला पुष्टी प्राप्त होते. विशेषतः डोके, कान आणि तळपाय यांना अभ्यंग आवर्जून करावा. तळपायांना अभ्यंग केल्याने दृष्टी उत्तम राहते.
अभ्यंग कोणी टाळावा?
कफाचे विकार असणारे, स्थूल, अजीर्ण झालेले वा भूक नीट लागत नाही असे तसेच नुकतेच पंचकर्म झाले आहे अशा व्यक्तींनी अभ्यंग करू नये असे आयुर्वेद सांगतो.
अभ्यंगानंतर व्यायाम करावा असेही आयुर्वेदाला अपेक्षित आहे. केवळ आरामात अंग चोपडून घेऊन ऐषाराम करणे हा आयुर्वेदाचा उद्देश नाही. व्यायाम हा आयुर्वेदानुसार 'निराग्नि स्वेद' असून अभ्यंगात जिरवलेले तेल त्वचेत अधिक मुरण्यासाठी; तसेच घाम येऊन शरीरातील मेदाचा क्षय होण्यास त्याचा उपयोग होतो. आजही कित्येक आखाड्यांत हीच पद्धत अवलंबली जाते हेही लक्षात घेण्यासारखे आहे.
उद्वर्तन:
उद्वर्तन म्हणजे उटणे लावणे. त्रिफळा, नागरमोथा, कचोर वगैरे विविध आयुर्वेदात वर्णन केलेल्या वनस्पतींच्या चूर्णांच्या मिश्रणातून उटणे बनते. उटणे बनवताना आपल्या वैद्यांचा सल्ला अवश्य घ्या. ते तुमच्या प्रकृतीनुसार योग्य मार्गदर्शन करतील. बाजारातून तयार उटणे विकत घेताना त्याचा दर्जा अवश्य लक्षात घ्या. उगाच २-५ रुपयांची उटण्याची पाकिटे घेऊन किती स्वस्त मिळालं यावर खूष होण्याऐवजी त्यात नेमकं काय घातलं असेल याचा विचार करा!!
उटणे लावताना घालून वरच्या दिशेने लावावे. या उटण्यामुळे आधी लावलेल्या तेलाचा बराचसा स्निग्धांश शोषला जातो. त्याचप्रमाणे विशेष करून मेदाचा नाश होतो. स्थूल व्यक्तींनी तेल न लावताच केवळ कोरडे उटणे लावावे. उटणे लावल्याने त्वचेचे आरोग्य उत्तम राहते; तसेच कफ आणि मेदाचा नाश होतो.
आयुर्वेदोक्त अभ्यंग आणि उद्वर्तन यांचा अनुभव घेऊन त्यांनंतर गरम पाण्याने स्नान करून आजच्या दिवसाची सुरुवात करा आणि येणाऱ्या हेमंत व शिशिर या दोन्ही ऋतूंत सर्व दिवसांची अशीच सुरुवात करून आपले आरोग्य उत्तम राखा!!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
October 29, 2016
भरपूर जेवल्याने भरपूर ताकद येते हा जसा गैरसमज आहे, तसा कमी जेवल्याने ताकद कमी होते, हा पण गैरसमजच आहे. विशिष्ट वयात विशिष्ट आजार होणं, हे सर्वसामान्य आहे पण, तरूणांचे अकाली आजार आणि अकाली मृत्यु चटका लावून जातात. वृद्धत्व आणि मृत्यु लवकर येऊ नये असे प्रत्येकाला वाटते. हे चुक नाहीच. वृद्धत्व सुद्धा अनुभवले पाहीजे.
August 21, 2016
विदर्भातल्या पुलगावमधल्या सेंट्रल ॲम्युनिशन डेपो (केंद्रीय दारूगोळा भांडार, सीएडी) मध्ये ३१ मेला मोठा स्फोट होऊन आगीचा डोंब उसळला. हा भारतातला सगळ्यात मोठा आणि आशियातला दुसऱ्या क्रमांकाचा डेपो होय. बंदुकीच्या गोळ्या, ८१ मिलिमीटर बाँब, १५५ मिलिमीटर गन शेल्स, टॅंक शेल्स, हॅंड ग्रेनेड्स, भूसुरुंग, ब्रह्मोस व इतर विद्ध्वंसक क्षेपणास्त्रं आणि इतर अमाप दारूगोळा या डेपोमध्ये असतो. या स्फोटाच्या निमित्ताने एकूणच दारुगोळा सुरक्षा यंत्रणेबाबत घेतलेला एक आढावा…
June 7, 2016
रामसेतूबाबत अनेक भ्रम पसरलेले आहेत. लोकांमध्ये व्याप्त भ्रम दूर करण्यासाठी वाल्मिकी रामायणानुसार श्री रामांनी समुद्रावर सेतु कसा बांधला त्याचे हे वर्णनवाल्मिकी हे ऋषी होते. त्यांनी तटस्थ राहून रामायणाचे लेखन केले होते. त्यांना असत्य लिहिण्याचे काही कारण नव्हते. श्री रामांची जीवन कथेचे वर्णन करताना, सत्य काय तेच निष्पक्ष पणे मांडले होते.
दोन्ही बाजूंचे म्हणणे सत्य आहे. पण ते पूर्ण सत्य नाही. मला तर वाटते अधिकांश लोकांनी वाल्मिकी रामायण वाचण्याचे कष्टही केले नसावे. रामसेतुचे चित्र पाहिल्यावर सामान्य माणसालाही सहज कळते कि या सेतुचा किमान ३०% टक्के भाग आजही समुद्र पातळीच्या वर आहे. ५०-६० हजार वर्षांपूर्वी समुद्राची पातळी आजच्यापेक्षा बरीच खाली होती. त्यावेळी हत्ती, बिबट्या सारखे जंगली जनावरेही भारतातून या प्राकृतिक संरचने वरून चालत जाऊन श्रीलंकेत पोहचले असतील. काही भारतीय इतिहासकारांच्या मते रामायण हे ७५०० हजार वर्षांपूर्वी घडले होते. त्या वेळी समुद्र पातळी आजपेक्षा निदान २० फूट खाली असेल. त्या वेळी या प्राकृतिक संरचनेचा ७०-७५% भाग टक्के भाग समुद्राच्या वर असेल. उथळ समुद्र असला तरीही कित्येक ठिकाणी समुद्राची खोली १०-१५ मीटर खोल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्या परिस्थितीत प्रकृती निर्मित पुलावरून श्रीरामांच्या वानरसेनेला शस्त्र-अस्त्र आणि शिदोरी घेऊन श्रीलंकेला जाणे अशक्यच होते.
आता विचार करू श्रीरामांची वानर सेना समुद्र तटावर पोहचली. २०-२५ हजारांचे सैन्य निश्चित असेल. एवढ्या मोठ्या सैन्याला समुद्र पार करायचा असेल तर शेकडोंच्या संख्येने नौका निर्मित करावी लागली असती. त्यात पुष्कळ वेळ ही लागला असता. पण समुद्र उथळ आणि खडकाळ असल्यामुळे नावेतून पार करणे एक अवघड कार्य होते. खालील चित्रावरून स्पष्ट आहे, आज ही समुद्र पार करताना नौका मार्ग (ferry) रामसेतु पासून पर्याप्त दूर आहे.
वाल्मिकी रामायणात युद्धकाण्डातल्या २२व्या सर्गात ५४-७३ या वीस श्लोकांत समुद्रावर पूल बांधण्याचे वर्णन केले आहे. यात रामनाम लिहिले दगड पाण्यावर तरंगले असे काहीच लिहिलेले नाही. वाल्मिकी रामायणानुसार, सहस्त्रो वानर जंगलात गेले. अर्जुन, बेल, अशोक, साल, बांबू, नारळ, इत्यादी अनेक जातींचे वृक्ष मुळापासून किंवा कापून समुद्र किनार्यावर घेऊन आले. या शिवाय गवत, लता इत्यादी सुद्धा. बलिष्ठ वानर मोठ्या-मोठ्या शिळा आणि पर्वतांना उपटून यंत्राद्वारे समुद्र किनार्यावर घेऊन आले. किनार्यावर कोलाहल व्याप्त होता - कोणी वानर माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता. गवत आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते. अश्या रीतीने केवळ पाच दिवसात वानरांनी हा पूल पूर्ण केला. श्रीरामाच्या सैन्याने या सेतुवरून समुद्र पार केला म्हणून या सेतुला लोक रामसेतु म्हणून ओळखतात.
वृक्ष, लता आणि दगडांचा उपयोग करून वीस पंचवीस हजारांच्या सैन्याला उथळ समुद्रावर रामसेतु निर्माण करणे सहज शक्य होते. हा पूल कामचलाऊ असल्यामुळे काही वर्षांतच नष्ट झाला असेल. आजच्या घटकेला अर्थात ७५०० वर्षानंतर रामसेतुचे अवशेष सापडणे अशक्यच. पण हे मात्र निश्चित श्रीरामांनी समुद्रावर सेतु बांधला होता. कालांतरानी श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन कवींनी आपापल्या परीने सेतु बांधण्याचे प्रसंग रंगविले.
टीप: वाल्मिकी रामायणातील सेतु बांधण्याचे कार्य कसे संपन्न झाले, युद्ध कांडातील, २२व्या सर्गातील काही श्लोक:
ते नगान् नागसंकाशाः शाखामृगगणर्षभाः ।
बभञ्जुः पादपांस्तत्र प्रचकर्षुश्च सागरम् ॥ ५५ ॥
ते सालैश्चाश्वकर्णैश्च धवैर्वंशैश्च वानराः ।
कुटजैरर्जुनैस्तालैः तिलकैस्तिमिशैरपि ॥ ५६ ॥
बिल्वैश्च सप्तपर्णैश्च कर्णिकारैश्च पुष्पितैः ।
चूतैश्चाशोकवृक्षैश्च सागरं समपूरयन् ॥ ५७ ॥
हस्तिमात्रान् महाकायाः पाषाणांश्च महाबलाः ।
पर्वतांश्च समुत्पाट्य यंत्रैः परिवहन्ति च ॥ ६० ॥
संक्षिप्त अर्थ: विशाल वानर जंगलात केले. तेथे जाऊन त्यांनी साल, अर्जुन, साल, अशोक, बांबू, नारळ इत्यादी अनेक मोठ्या मोठ्या वृक्षाना मुळासकट किंवा तोडून समुद्र किनार्यावर आणले. हत्ती समान विशाल वानरांनी मोठे मोठे पाषाण तोडून यंत्राद्वारे समुद्र किनार्यावर आणले.
समुद्रं श्रोक्षोयामासुः निपतंतः समंततः ।
सूत्राण्यन्ये प्रगृह्णन्ति व्यायतं शतयोजनम् ॥ ६२ ॥
दण्डानन्ये प्रगृह्णन्ति विचिन्वन्ति तथा परे ।
वानरैः शतशस्तत्र रामस्याज्ञापुरःसरैः ॥ ६४ ॥
मेघाभैः पर्वताभैश्च तृणैः काष्ठैर्बबंधिरे ।
पुष्पिताग्रैश्च तरुभिः सेतुं बध्नन्ति वानराः ॥ ६५ ॥
संक्षिप्त अर्थ : कोणी वानर माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता. सर्वत्र कोलाहल होता. गवत आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते. ॥इति॥
December 10, 2015
समर्थ रामदासांनी त्यांच्या एका समासात दासबोध ग्रंथात म्हटलेलं आहे की, पतीला पत्नी आणि पत्नीला पती उत्तम गुणाचे मिळणं ही पूर्वजन्म पुण्याईच असते.’ अगदी त्याच भावनेतून आजच्या प्रत्येक व्यक्तीला निःस्पृह, निःस्वार्थी वगैरे शब्द सोडा, परंतु वाजवी दरात औषधोपचार करणारा डॉक्टर मिळणं हीदेखील पूर्वजन्माची पुण्याईच म्हणावी लागते. असा डॉक्टर अनुभवायला मिळाला तर खरंच त्याला कलियुगातील ईश्वरच म्हणावेसे वाटते. असाच एक डॉक्टर… डॉ. प्रताप सी. रेड्डी.
August 28, 2024
‘जुलै’ महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या शिस्तबद्ध व सुनियंत्रित असल्याचे मानले जाते. चालू ‘जुलै’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.
August 7, 2025
संसारात अन् परमार्थात आपल्याला काही साध्य करायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या मनाची एकाग्रता साधणे अतिशय आवश्यक आहे.मन स्थिर नसेल तर आपल्या अभ्यासाचा किंवा साधनेचा काही उपयोग होत नाही. भक्तगणांची ही अडचण ओळखून परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी साक्षात दत्तगुरूनांच चित्त स्थिर करण्यासाठी ह्या स्तोत्रातून साकडे घातले आहे.
April 30, 2020
शब्दांच्या पलीकडे जायचे असेल तर सूर तुम्हाला सहज नेतात. काही माणसें विचारात असतात, काही माणसें रक्तात असतात, काही माणसे श्वासात असतात. लता रसिकांच्या नसानसात आहे. आमच्या रसिकांच्या दृष्टीने लता मंगेशकर म्हणजे मैलाचा दगड. संगीतातलं एक परिमाण आणि परिणाम. एकेका पिढीचं दैवत माणसेंच असतात. एका पिढीचे तुम्ही दैवत आहात. काही गोष्टीला पर्याय नसतो त्यापैकी तुम्ही आहात.तुमचा काळजाला भिडणारा,हेलावून सोडणारा, अंतर्मुख करणारा, डोळ्यातून अश्रू वाहायला लावणारा आवाज, हीच तुमची शक्ती आहे. तुम्ही व्याख्येत न मावणारी स्वरसम्राज्ञी आहात..तुम्ही काहीजणांचे दैवत आजात. तुम्हीअनेकांच्या भिंतीवरील फोटो प्रेम आहात. मनाच्या चौकटीतील एक सुंदर चित्र आहात .एकच गीत अनेक जण गातात, पण हसवायचे, रडवण्याचे सामर्थ्य काही जणांमध्ये असतं, त्यापैकी एक तुम्ही. तुम्ही असे चुंबक आहे,जिथे सर्व विशेषणे आपोआप चिकटतात. गाणं अजरामर करणं तुमच्याडून शिकायला हवं. ये मेरे वतन के लोगो ऐकल्यावर डोळ्यात पाणी येते. पंडित नेहरूंच्या डोळ्यात व आमच्या डोळ्यात पाणी आणलत.
June 28, 2026
बँकींग व्यवहार मोबाईलद्वारे करण्याचे म्हणजेच ‘मोबाईल बँकिंग’चे प्रमाण नोटबंदी झाल्यापासून झपाट्याने वाढले आहे. बँकांनी देखील वेगवेगळ्या अँड्रॉईड अँपद्वारे मोबाईल बँकींग सुलभरित्या करण्याची सोय उपलब्ध करून दिली. सरकारने देखील यूपीआय सारखी सुरक्षित आणि जलदरीत्या फंड ट्रान्स्फर करणारी सुविधा उपलब्ध करून दिली. असे असले तरी एखाद्या अँपमधील आणि सुविधेमधील त्रुटींचा (loopholes) शोध घेऊन त्याचा आणि इतर मार्गांनी मिळविलेल्या माहितीचा वापर करून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.त्यासाठी मोबाईल बँकिंग करताना ते सुरक्षितरित्या करणे आवश्यक असते.
March 22, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti