वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ग्रामीण भागातील शेतकरीदेखील या देशाचा सन्मान्य नागरिक आहे, त्याचे हित जपणे सरकारची जबाबदारी आहे. सरकारला हे शक्य नसेल किंवा हे शक्य नाहीच, तर किमान सरकारने बियाणे आणि खताच्या पुरवठ्यातून जन्माला येणार्या काळ्या बाजाराला मूठमाती देण्यासाठी हा प्रकारच बंद करावा. सरकारने या संपूर्ण व्यवहारातून आपले लक्ष काढून घ्यावे. कोणतीही गोष्ट सुचारूपणे चालायची असेल तर त्यात पहिली अट हीच असते, की सरकारची त्या गोष्टीत कोणतीही दखलअंदाजी नको, जिथे सरकारी हस्तक्षेप आहे तिथे सगळ्याचा सत्यानाश आहे, हे आतापर्यंत वारंवार सिद्ध झाले आहे.
June 14, 2011
फक्त १०% जीवन हे आपल्या सोबत काय घडलंय यावर आहे, आणि ९०% जीवन हे त्यावर आपल्या प्रतिक्रियावर अवलंबून आहे. जे घडतंय त्या १०% वर आपला काहीही ताबा नसतो.
उदा. गाडी बंद पडणे, ट्रेन, विमान, बसला उशीर होणे, मुलांना यायला उशीर होणे, अचानक काहीतरी घडणे, आधीच उशीर झालाय आणि आपण जाण्या आधीच लाल सिग्नल पडणे वगैरे वगैरे.
या १०% गोष्टींसाठी आपण काहीही करू शकत नाही. पण आपण त्यावर कसे वागतो यावर पुढचं ९०% अवलंबून आहे.
उदाहरण द्यायचे तर, तुम्ही कामावर जाण्यासाठी पेहराव करून बसलात आणि चहा देण्यासाठी कन्या आतून आली, तिला ठेच लागली आणि कपातला चहा तुमच्या शर्टावर सांडला.
हे फक्त १०% झालं.
यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल यावर पुढचं ९०% रामायण अवलंबून आहे.
तुम्ही चिडलात, तिला ओरडलात, ती दुःखी झाली, रडायला लागली. आता तुम्ही तुमचा मोर्चा पत्नीकडे वळवलात, "हे सगळं तुझ्या लाडामुळे झालंय, मुलांना अजिबात वळण लावलं नाहीस" असं म्हणून पत्नीलाही ओरडलात. तसंच घसरणारा ट्रे विकत आणतांना लक्ष दिलं नाही म्हणून तिला ऐकवलेत.
तुम्ही बेडरूम मध्ये जाऊन कपडे बदललेत. नंतर परत हॉल मध्ये आलात तर, मुलगी अजूनही रडतेच आहे. आत्तापर्यंत तिने न्याहारी करून शाळेला जाण्यासाठी तयार व्हायला हवे होते. उशीर झाल्यामुळे तिची स्कुलबस निघून गेली.
तुमच्या पत्नीलाही ताबडतोब कामावर जायला हवे.
तुम्ही कार बाहेर काढलीत आणि मुलीला शाळेत सोडायला गेलात. उशीर झाल्यामुळे तुम्ही गाडी वेगात चालवताय. नियम तोडल्यामुळे पोलिसांना दंड देऊन तुम्ही १५ मिनिटे उशिरा शाळेत पोहोचलात.
तुमची मुलगी तुम्हाला टाटा न करताच शाळेत पळत गेली.
२० मिनिटे उशिराने ऑफिसला पोहोचल्यावर बॅग घरीच विसरल्याचं तुमच्या लक्षात आलं.
तुमचा दिवस असा ताण तणावाने सुरू झाला.
दिवसभरात अशाच अजून काही घटना घडल्या आणि त्यामुळे संध्याकाळ पर्यंत वातावरण अजून वाईट झाले.
आता तुम्ही घरी आलात. घरात आल्यावर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली, ती म्हणजे तुमच्या पत्नीशी आणि मुलीशी असलेल्या नात्यात थोडी दरी निर्माण झालीय.
का?
कारण तुमचा सकाळचा प्रतिसाद.
तुमचा दिवस वाईट का गेला?
• त्याला कारण कॉफी होती?
• त्याला कारण मुलगी होती?
• त्याला कारण पोलीस होते?
• त्याला कारण तुम्ही स्वतः होता?
उत्तर
तुम्ही स्वतः
कॉफी चं काय झालं यावर तुमचं कसलंही नियंत्रण नव्हतं. त्या ५ सेकंदात तुमचा जो प्रतिसाद होता त्यामुळे तुमचा दिवस खराब गेला.
काय करायला हवे होते?
कॉफी तुमच्या शर्टावर सांडली, तुमची मुलगी घाबरून रडू लागली.
तुम्ही म्हणाला असतात "बेटा, आत्ता असुदेत. पुढच्या वेळी असं होऊनये यासाठी लक्ष दे" आणि तुम्ही शर्ट बदलला असतात तर, तुमच्या मुलीला शाळेत जातांना हसतमुखाने तुम्हाला निरोप देता आला असता.
मुलीनेही नेहमीप्रमाणे हसतमुखाने निरोप घेतला असता.
तुम्हीही ५ मिनिटे आधी ऑफिसला पोहोचला असतात.
फरक पहा
दोन वेगवेगळे प्रसंग. दोन्ही एकाच गोष्टी मुळे सुरू झाले. शेवट मात्र वेगवेगळा.
खरच, काय घडतंय त्या १०% प्रसंगांवर आपला काहीही ताबा नसतो. उरलेलं ९०% मात्र आपण त्यावर काय प्रतिसाद देतो त्यावर अवलंबून असतं.
९०/१० तत्वज्ञान कसे वापरावे?
• जर कुणी तुमच्याबद्दल वाईट बोललं तर तुम्ही ते मनावर घेऊ नका, पालथ्या पातेल्यावर पाणी पडले तर काय होते, त्याप्रमाणे वागा. त्यांच्या वाईट बोलण्याचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका. तुम्ही चांगला प्रतिसाद देऊन तुमचा दिवस चांगला जाऊ द्या. चुकीचा प्रतिसाद दिल्यास शब्दाला शब्द वाढेल आणि त्यामुळे मित्र किंवा जवळची व्यक्ती गमावू शकते.
• रस्त्यात कुणी आपल्या गाडीच्या आडवी गाडी मारली किंवा कट मारला किंवा चालतांना तुमच्या पुढे कुणी गेले किंवा तुमच्या कुणी आडवे गेले तर तुम्ही काय करता? तुम्हाला राग येतो? तुम्ही दात ओठ खाता? स्टीअरिंग वर जोरजोरात हात आपटता? मुठी आवळता? भांडायला जाता? तुमचा श्वासोत्वास वाढतो?
तुम्ही २-५ मिनिटे उशिरा पोहोचलात तर काय फरक पडणार आहे?
९०/१० तत्वज्ञान आठवा आणि सोडून द्या. त्या प्रसंगा आधी जसे होतात तसेच आनंदी रहा.
तुम्ही उद्यापासून कामावर येऊ नका असे बॉसने तुम्हाला सांगितले, किंवा तुमची हक्काची ऑर्डर तुम्हाला न मिळता दुसऱ्याला गेली आहे असे तुम्हाला कळले तर?
• मन अशांत करून झोपमोड करून घेऊ नका
• तुमची काळजी घेणारी शक्ती कामाला लावा आणि तिचा दुसरे काम शोधण्यासाठी वापर करा.
बस, कॅब, विमान, रेल्वे उशिराने येणार आहे असे तुम्हाला कळले
• संबंधित कर्मचाऱ्यांना ओरडून काहीही होणार नाही कारण जे घडलंय त्यावर ते काहीही करू शकत नाहीत.
• पण तुमच्या दिवसाच्या नियोजनात त्यानुसार बदल करता येणार आहे
• वाट पाहण्यातला वेळ वाचनात, महत्वाची कामं फोनवर करण्यात घालवा
• आजूबाजूला असलेल्या माणसांच्या ओळखी करण्यात घालवा
९०/१० तत्वाचा वापर करून आपण आपले जीवन ताणतणाव मुक्त जगुया
-- आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपवर आलेले पोस्ट
September 13, 2017
काल परवा कुणीतरी मराठी भाषा मरणाच्या उंबरठ्यावर...... मराठी मराठी करणारांच्या नाकाला मिरच्या झोम्बाव्यात असे वादग्रस्त विधान करून खरं तर मराठीविषयी परखड मत मांडले. आपल्याला मराठी सही करण्याची देखील लाज वाटणारांनी मराठी भाषा अस्तित्वात राखण्याऐवजी व्यवहारशून्य भाषा अशी अवहेलना करण्याचे धारिष्ट्य दाखविले आहे.
महाराष्ट्र शासन व्यवस्था इंग्रजीच्या आहारी गेलेली आहे. अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थीची यादी इंग्रजीतून प्रसिध्द केलेली आहे. पोट भरण्याची मारामार, गरीब, गरजू आणि ग्रामीण भागातील ज्यांना साधं मराठीचं ज्ञान अवगत नाही.त्यांना इंग्रजीचा आधार घेऊनच सुविधा प्राप्त होणार असतील तर आपले सत्ताधारी मराठीच्या नावाने २७ फेब्रुवारीला ज्येष्ठ साहित्यक, नाटककार, व कविश्रेष्ठ वि वा शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्ताने मराठी भाषा दिन साजरा करतील .’जय हो’ चा उद्घोष करीत मराठीचा गुलाल या दिवसापुरता सर्वत्र उधळेल.
आम्ही मराठी माणसे इंग्रजीच्या इतके आहारी गेलेलो आहोत की, मराठी भाषा लिहिणे ,वाचणे, बोलणे वा तिच्या अभ्यासासाठी आणि जीवन व्यवहारासाठी माध्यम म्हणून उपयोग करणे यात आपल्याला अभिमान किंवा गौरवास्पद वाटण्यापेक्षा कमीपणा वाटत आहे. संत ज्ञानेश्वरांनी “ती अमृतालाही जिंकणारी भाषा आहे “ हे मराठीला दिलेले सुवर्ण रत्नजडित प्रशस्ती पत्र.
एखाद्या “शिंपी कामाचे दुकान’ या ऐवजी ज्ञानेश्वर अथवा तुकारामासारख्या संताचे नाव देऊन टेलरिंग फर्म अस्तित्वात येते. इंग्रजी भाषा हि जगातील एक समर्थ, सुंदर, संपन्न,महत्वाची रसाळ भाषा आहे. या बद्दल दुमत नाही. त्या भाषेचा मत्सर करण्याचे कारणही नाही. इग्रजीशिवाय जगात ज्ञान मिळत नाही. इंग्रजी ज्ञानभाषा आहे.हे आपण बहुतेक जन सांगताना आढळतात, इतर सर्व भाषा अज्ञानभाषा आहेत का....? पण अवास्तव महत्व देण्याचे कारण काय....?
कुटुंबातील आईची जागा हि आईचीच आणि मावशीचीच जागा मावशीला हे अलिखित सूत्र आहे त्या प्रमाणे भाषेबाबतही असले पाहिजे. मुंबई शहरात मराठींच्या शाळा ओस पडताहेत. इंग्रजी शाळा अव्वाच्या सव्वा देणगी, फी आकारून गब्बर होत आहे. श्रमजीवी, कष्टकरी समाजाला दोन वेळेच्या अन्नाची भ्रांत तरी देखील पोटाला चिमटा काढून पालक पाल्य इंग्रजीत शिकला पाहिजे हा अट्टाहास का करताहेत...? हि स्पर्धा महाराष्ट्रातील शेतमजुराला,कामगारांना परवडणारी नाही. इंग्रजी शिडीचा आधार घेऊन गरीबांचा फायदा तर नक्की नाही. मुंबई शहरात मराठी शाळा आहेत. त्यामध्ये इंग्रजीचे अध्ययन होत आहे. या शाळांमध्ये गरीब वा अशिक्षित पालकांच्या मुलांना थारा नाही. पाल्याच्या प्रवेशापूर्वी पालकांची मुलाखत घेऊन त्यातून प्रवेश ठरविला जातो. जे पालक मुळात अशिक्षित आहेत त्यानी कधी शाळा कॉलेज पाहिले नसेल त्यांना, त्यांच्या मुलांना उच्चभ्रू वस्तीतील शाळा प्रवेश नाकारून नेमके काय साध्या करतात......? मराठी बरोबर इंग्रजीचा उत्तम अभ्यास आजच्या तरुण पिढीने करावा. पण इंग्रजी माध्यमात मराठीला दुजाभाव देऊन नाही.
कवी सुरेश भट यांच्या खालिल रचनेतून आपणास बरेच काही उमजले असेलच.
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी !
आपुल्या घरात हाल सोसते मराठी !!
मराठीची महती आपण गातो, प्रसार करतो. मराठीचा ठसा सर्वत्र उमटविण्याचा प्रयत्न करतो. पण शासन याबाबत किती उदासीन आहे. महापालिका , नगरपालिका मराठी संदर्भात किती बेफिकीरीने वागतात. मंत्री,आमदार, खासदार, नगरसेवक अन्य लोकप्रतिनिधी चे इंटरनेटवर ईमेल आहेत. किती तरी लोक त्यावर त्यांच्याशी सर्व सामान्य विषयावर मराठीतून हितगुज करू पाहतात. समस्यांचा उहापोह करू इच्छितात . समस्या निवारणाचा हेतू असतो. पण कोणता प्रतिनिधी त्याची दखल घेतो ? आता पर्यंत त्यांनी कुणाला उत्तरे दिली आहेत. आम्ही आपल्या प्रश्नावर कार्यवाही करू ….! कुणी तरी कळवीत आहे का....? संगणक प्रणाली वरून जर लोकप्रतिनिधीना लोकांशी सुसंवाद साधण्याचे साधन उपलब्ध झाले असेल तर काय हरकत आहे. मराठी पत्रे आली तर त्या संगणकांवर त्या प्रकारचा font असावयास हवा. आपण इतके गांभीर्याने का घेत नाही . मंत्रालयातील मुख्यमंत्री असो वा मंत्री साधी पोहच पावती देणे देखील जीवावर येते.
मी मराठी आणि माझा महाराष्ट्र मराठ्यांचा …छे इतके मराठी संदर्भात गंभीरतेने घेतले असते तर मात्र आपण मराठी भाषेच्या प्रगतीत मागासलेले नसतो. “पिकते तेथे विकत नाही” असे म्हणतात . तसेच महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचे महत्व जाणवत नाही. आई समोर असताना आईचे महत्व जाणवते का...? आपण तिच्या पासून दूर जातो तेव्हा तिचे महत्व कळते. माणसाच्या जीवनात मातेचे स्थान जेवढे परमोच्च असते तेवढेच मातृभाषेचे असावयास हवे. पण आज आपल्या मातृभाषेसंदर्भात जे चित्र दिसत आहे ते दुर्दैवाने फार वेगळे आहे.
आपल्याच प्रांतात आपल्याच भाषेचे वर्चस्व असले तर इतर आपल्याशी नमून वागतील. हेच जर तुम्ही दक्षिणेत तुमच्या मातृभाषेत अथवा राष्ट्रभाषेत विचारले तर ते त्यांचा खाक्या काय असतो ते दाखवितात की नाही. अहो...! सध्या जन्मलेल्या मुलांना आई ऐवजी मम्मीचे ढोस पाजणारे संस्कृतीदर्शन मराठी भाषा संवर्धनासाठी उपयुक्त नाही. मराठी भाषा हे संवाद आणि सांस्कृतिक देवान घेवाणीचे माध्यम. आपल्या मुलांवर आपल्या भाषेचे संस्कार जितके अधिक विकसित करू तितक्या सहजतेने मुले ज्ञान ग्रहण करतील. आपल्या भाषेविषयी आपण मराठी बांधवांचे हित, खऱ्या अर्थाने येथील संस्कृती, भाषा यांचा वारसा जपण्यासाठी, स्वाभिमान दर्शविण्यासाठी माझ्या माय मराठीला सर्वोच्च स्थान मिळविण्यासाठी आग्रह धरला पाहिजे.
जगाच्या कानाकोपरयात मराठीला घेऊन जाणे मुश्किलीचे नाही आणि नसणारही. फक्त इच्छा हवी ती आपल्या राज्यकर्त्याकडे नाही. काही झाले तरी सर्व स्तरावर मराठीचा अभ्यास व्हायला पाहिजे. इंग्रजी प्रमाणे मराठी भाषेची अत्यंत निकड आहे. जेव्हा मातृभाषेवर प्रभुत्व असेल तेव्हाच परकीय भाषेवर प्रभुत्व मिळविता येते. मातृभाषा, राजभाषा हेच खरे राष्ट्राचे मानदंड . लोकभाषा लोकशाहीचा कणा. भाषिक विद्वानांना परिचित आहे. पण शासन प्रणालीला हे कोणी सांगायचे...!
-- श्री अशोक भेके,
घोडपदेव
March 16, 2017
स्वीडनमध्ये आता लोकांना टॅब्लेट, संगणक आदी तांत्रिक, डिजिटल उपकरणांचा कंटाळा आल्यामुळे मुलांचे डिजिटल शिक्षण बंद होण्याच्या मार्गावर आहे. या ऐवजी आता पुन्हा वही व पेन म्हणजे लिहिण्याला प्रोत्साहन देण्याची याच शैक्षणिक सत्रापासून सुरुवात झाली आहे.
December 11, 2023
एकदा सदगुरु आणि देव असे दोघे एका शिष्याच्या घरी येतात तेव्हा शिष्य पहिल्यांदा देवांच्या पायाजवळ नमस्कार करायला जातो, देव त्याला म्हणतात , "तु पहिले सदगुरूंना नमस्कार केला पाहिजेस".
जेव्हा शिष्य हा सदगुरूंच्या पायापाशी जातो तेव्हा सदगुरु म्हणतात "मी देवाला तुझ्या घरी आणले आहे त्यामुळे पहिला देवाला नमस्कार कर."
शिष्य परत देवाच्या चरणाजवळ येतो, तेव्हा देव म्हणतो "तुझ्या सदगुरुंनी देवाला तुझ्या आयुष्यात आणले आहे, त्यांनी माझा लाडका भक्त होण्याचा मार्ग तुला सांगितला त्यामुळं पहिला सदगुरूंच्या चरणांपाशी जा."
जेव्हा भक्त सदगुरूंच्या चरणांजवळ जातो तेव्हा सदगुरु म्हणतात, मी तुला फक्त भक्तीचा मार्ग सांगितला *पण् देवाने तुला निर्माण केलय,नाही कां ?त्या मुळे जा आणि पहिला देवाच्या चरणाशी नतमस्तक हो. त्यानंतर तो भक्त देवाच्या चरणाजवळ गेला तेव्हा देव म्हणाले थांब हे सगळं बरोबर आहे . पण आता मी तुला देवाची आणि गुरूंची प्रमुख तत्व सांगणार आहे.
देवाच्या तत्वात - : माझ्या कडे न्याय व्यवस्था आहे. जर कां तु चांगलं कार्य केलंस तर तुला त्याचं चांगलंच फळ मिळेल, चांगलं आयुष्य मिळेल आणि मुक्ति मिळेल.
पण जर कां तु वाईट कर्म केलीस तर तुला तर त्याचे वाईटच फळ मिळेल. तुला शिक्षा होईल . तु या मायाजालात अडकशील आणि त्यात बुडुन जाशील आणि तुझा आत्मा संघर्ष करीत राहील.
आता तुला गुरूंची तत्वे सांगतो. : जेव्हा तुम्ही सदगुरुकडे जाता तेव्हा ती प्रेमळ शांत मूर्ति असते. तुम्ही कसेही असाल, कसेही वागत असाल तुमची कर्मे कशीही असली तरीही ते आपल्या शिष्याला प्रेमाने आपल्या कुशीत घेतात. ते आपल्या शिष्याला शुद्ध करतात आणि मग माझ्या चरणाशी आणतात.
त्यामुळे सदगुरु कधीही कोणालाही स्वतःहून आपल्या पासून दूर लोटत नाहीत. तर उलट ते आपल्या शिष्यात हिऱ्या प्रमाणे पैलू पाडतात त्याला शुद्ध करून मग माझ्या चरणाशी आणतात.
त्या मुळे मी नेहमी पृथ्वीवर सदगुरूच्या रूपातच येतो.
June 14, 2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 30
नैवेद्यम् समर्पयामी-भाग चार
आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. त्याच्यासाठी मस्त स्वयंपाक तयार केलेला आहे. पाने घेऊन ठेवलेली आहेत. पण पाहुणेच आलेले नाहीत, तर पाने उगाच वाढून ठेवायची काय ?
देवाच्या पूजेची सर्व आरास तयार झालेली आहे. पूजेला दाखवायचा नैवेद्य तयार आहे. सर्व पूजा साहित्य तयार आहे. यजमान तयार आहेत, पण देवाची प्रतिष्ठापना जर झाली नसेल तर नैवेद्य दाखवून घ्यायचा का ? आणि मखरात देवच नसेल तर नैवेद्य दाखवायचा तरी कुणाला ?
नैवेद्य कधी दाखवायचा ?
देव आला असेल तर.
अहं वैश्वानरो भूत्वां प्राणीनाम् देहमाश्रितम, म्हणजे पोटातील भूक, वैश्वानर, जाठराग्नी, तो मीच, असं प्रत्यक्ष भगवंत सांगताहेत. याचाच अर्थ असा की, पोटात देव उपस्थित झाल्याशिवाय त्याला नैवेद्य दाखवायचा काय ?
सरळ सरळ सांगायचे तर, भूक लागल्याशिवाय अजिबात जेवू नये. देव प्रकट झाल्याशिवाय नैवेद्य तरी कोणाला दाखवायचा ना ? पाहुणे आल्याशिवाय वाढायचे तरी कोणाला ?
नैवेद्याचे हे साधे सोपे सूत्र लक्षात ठेवले तरी बास आहे. ज्याला जसे समजून घ्यायचं असेल तसं समजून घ्यावे समजून घ्यायचंच नसेल तर सोडून द्यावे. इथे फुकटचा निरर्थक वाद घालायला वेळ आहे कोणाला ?
देवाला समजून घेण्यासाठी मुळात एक वेगळी दृष्टी, काही वेगळी समज असली पाहिजे. देव का सांगितला गेलाय, देव कुठे असतो, तो कुणाला दिसलाय का ? सगुण रूपातला देव समजला की नंतर निर्गुणातला समजून घ्यायचा असतो. सगुण निर्गुण एकु गोविंदु रे, असं माऊली म्हणतात. पण सगुण समजून घेतला की नंतर निर्गुण समजणे सोपे होते.
काही गोष्टीमधे आपल्याला "क्ष" गृहीत धरावा लागतो, ते उत्तर मिळेपर्यंत. ते उत्तर एकदा मिळाले की नंतर हा गृहीत धरलेला "क्ष" विसरून जायचा असतो. हा " क्ष" म्हणजेच आमचा देव.
ज्यांना अभ्यास करायचा आहे, त्यांनी कोणत्याही मार्गाने शिकावे. सगुण रूपात भक्ती योगाने जाणून घ्यावा, ज्यांना कर्मयोगाने समजून घ्यायचा असेल तर तसा समजून घ्यावा. ज्यांना ज्ञानमार्गाने जाणून घ्यायचा असेल तर तसा निर्गुण रूपातील अभ्यासावा. पण कुत्सित बुद्वीने देव म्हणजे बुवाबाजी, देव मानणे म्हणजे समाजाला काही वर्षे मागे नेणे असले आरोप करून केवळ शाब्दीक बुडबुडे काढणे म्हणजे शक्तीचा अपव्यय आहे.
देवपूजा वगैरे सगळं बामनाचं काम. त्यांनी समद्या जन्तेला फशीवलंय. येड्या देवाच्या नादी लावलंय, समाजाला मागे नेण्याचं काम केलंय, वगैरे ज्यांना बोलायचं असेल ते खुशाल बोलू द्यावे. देव ही संकल्पना समजून घेण्यासाठी तशी शुद्ध वैज्ञानिक बुद्धी हवी, ते येरागबाळ्याचे काम नव्हे. आज कोणीही उठतो, देवाची निंदा नालस्ती करतो.
देवाला नैवेद्य अर्पण करायचा तेव्हा मनात भाव असा हवा की मी जणुकाही सगुणरूपातील देवाला घास भरवतो आहे. भाव जर नामदेवांचा असेल तर देव जेवल्याशिवाय राहात नाही, ही उच्चकोटीची भक्ती आहे. ही तळमळ, तो भाव आपण निर्माण करू शकत नाही, म्हणून देव आपल्या हातून जेवत नाही. भाव तसा देव असतो, हे समजून घ्यायचे असते. बुद्धिवादी नास्तिक लोकांना ही भक्ती म्हणजे बुवाबाजी वाटते. ढोंग वाटते. आणि मनात विकल्प येतात. चार दोन बड्या लोकांनी देवाला नावे ठेवली, त्यांचे आपण अनुयायी आहोत, समाजसुधारक आहोत, असे वाटणे हा निव्वळ भ्रम आहे.
जर विज्ञानाचा तिसरा डोळा उघडला तर भक्तीमागील कर्मयोग आणि ज्ञानयोग दोन्ही दिसू लागतील.आणि त्यामागे लपलेले आरोग्य सूर्याप्रमाणे स्पष्ट दिसू लागेल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
23.06.2017
June 23, 2017
भारतीय विद्वानांचा विचार असा आहे कि जर सर्व नियम शिथिल केले पारदर्शकता ठेवली आणि ती लोकां पर्यंत पोहचली, तसेंच शिक्षेची योग्य अंमलबजावणी ह्या गोष्टी केल्या तर भ्रष्टाचार थांबविणे शक्य होईल.
November 15, 2010
पुण्यातील एक नामवंत उद्योगपती चंदू चव्हाण यांचा व्यापारी अनुभवावर आधारीत हा लेख, भावनांच्या डोहात डुंबणाऱ्या देशप्रेमी लोकांना विचार करायला लावणारा हा लेख.. फेसबुकवरुन आला तसा शेअर केलाय. वाचा आणि प्रतिक्रिया लिहा.
खुळचट राष्ट्रवादी penny wise pound foolish आहेत.ती त्यांच्या अभिमान cum फुकाचा गर्व या समर्थ रामदासांनी सांगितलेल्या मूर्खपनाच्या लक्षणाला साजेसं वर्तन आहे.
असो या लेखाचा उद्देश आपण जो देश म्हणूंन आर्थिक/सामाजिक/राजकीय मुर्खपणा करतो आणि त्यामुळे आपल्या देशाच्या वस्तुंच्या किमती जास्त आहेत त्याबद्दल आहे.
चांगल्या वस्तू स्वस्त बनवण्यासाठी गरज आहे इकॉनॉमी मध्ये efficiency of capital असण्याची. कशाने येते हि efficiency of capital?
मी चीन मध्ये 45 दिवस राहिलो, शेतकऱ्यांच्या घरी राहिलो, 10000 पेक्षा जास्त किलोमीटर passenger train ने प्रवास केला. युनिव्हर्सिटी च्या प्राध्यापकांना भेटलो, शेकडो लोकांना भेटलो.एवढच जाणून घ्यायचं होतं की 1950 साली भारतापेक्षा मागासलेला असलेल्या देशाने एव्हडी सामाजिक आणि आर्थिक प्रगती कशी केली?
काही कारणं सांगतो जी महत्वाची आहेत. मूलभूत प्रश्न सोडवल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.
1) कंमुनिस्ट क्रांतीने स्त्रियांना मुक्त केलं, जबरदस्तीने का होईना शर्ट पॅन्ट घालायला लावली, केस कापायला लावले आणि कामाला लावलं.चीन च्या आणि भारताच्या GDP मधला फरक समजून घ्यायचा असेल तर फक्त पडद्यात आणि बुरख्यात असलेल्या स्त्रियांचं उत्पन्न (जर त्यांनी काम केलं असतं तर) gdp मध्ये जमा करा आणि 65 वर्षाचं compounding करा. चीन शी स्पर्धा करायची असेल तर पाहिलं काम स्त्रीमुक्ती चं करा.
एका बाजूला कोट्यवधी बालमजूर शाळेत जात नाहीत आणि दुसऱ्या बाजूला कोट्यवधी स्त्रिया चूल आणि मूल यात अडकवून ठेवण्याविषयी तुम्ही काही करत नसाल तर तुमची देशभक्ती नपुंसक आहे. तुम्हाला त्याची लाज वाटली पाहिजे
कारण देश म्हणजे देशातील माणसे असतात
2) कंमुनिस्टांनी धर्म संपवला, आता बौद्ध मंदिरात फक्त पर्यटक जातात.
धर्मांच्या मठात आणि ट्रस्ट मध्ये राष्ट्रीय बचत चीन मध्ये अडकली नाही ती productive use मध्ये येऊन capitalism चा विकास चिनी कंमुनिस्ट पार्टी च्या नियंत्रणाखाली झाला.
भारतात प्रचंड पैसा धर्मामुळे unproductive कामासाठी मंदिर/मशीद/चर्च मध्ये ब्लॉक झाला आहे
आज भारतात जवळपास 30 टक्के deposit हे तिरुपती/शिर्डी/मशीद/चर्च सारख्या धार्मिक ट्रस्ट/सोसायटी/क्लबचे आहेत,
त्यांना बँका 10 टक्के व्याज देतात त्यामुळे उद्योगांवर कर्जावरील व्याजाचे दर 13-14 टक्के आहेत. चीन मध्ये हेच व्याजाचे दर उद्योगांसाठी 6 टक्के आहेत,
म्हणजे आपण तिरुपती आणि त्यासारख्या मंदिरांना संपत्ती ब्लॉक करायची. त्या संपत्तीला 10 टक्के व्याज द्यायचं आणि आपल्या उद्योजकांना सांगायचं वस्तू स्वस्त द्या.
कसं शक्य आहे?
बाकी 50 टक्के deposits गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेट्स चे आहेत, गरीब/मध्यमवर्गीय जनतेचे deposits फक्त 20 टक्के आहेत.
रिटेल loans जी लोकांनी घेतली आहेत ती जवळपास 30 टक्के आहेत त्याला व्याजाचे दर अजून जास्त आहेत, ढोबळमानाने असं म्हणता येईल की 50 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज सामान्य जनता भरते
हि व्याजरूपी लूट कोणाच्या बोडक्यावर टाकली जाते-साईबाबा/तिरुपती/मंदिर/मशी
हाऊसिंग/education/शेती या साठी लोन एक टक्क्याने देता येतील. आणि उद्योगांसाठी 5-6 टक्क्याने. मग इथले उद्योजक वस्तू स्वस्त बनवू शकतील.
धर्म नष्ट करा ती सर्वात मोठी देशभक्ती होईल.
चिनी वस्तू आपोआप महाग आणि भारतीय वस्तू स्वस्त होतील. धार्मिक मूर्खपणामुळे efficiency of capital कमी होते
3) चीन मध्ये जमिनीची मालकी राष्ट्राची असल्यामुळे सगळ्या जमिनीवर शेती होते, सगळ्या तळ्यात मत्स्य शेती होते, त्यामुळे अन्न धान्य/ फळं/मास मच्छी हि खूप स्वस्त आहे. त्यामुळे लोकांचं जीवनमान चांगलं आहे.
भारतातल्या 40 टक्के शेतीयोग्य जमिनीवर शेतीच होत नाही. जमिनीच्या मालकांना शेतीत इंटरेस्ट नाही आणि मजुरांकडे शेती नाही.
तळ्यात मत्स्यशेती तर नगण्य होते, त्यामुळे अन्नधान्याच्या किमती खूप जास्त आहेत. या व अनेक धार्मिक कारणांमुळे भारत in general कुपोषित आहे. Business हे देखील युद्ध असतं, कोट्यावधींना कुपोषित/वंचित ठेवून तुम्ही ते जिंकू शकत नाही. इतिहासात तसं केल्याने आपण खूप वेळा हरलो आहोत.
हे बदला धर्माना जमिनीत गाडा .ती खरी देशभक्ती, चिनी वस्तूंवरील बंदी तुम्ही करू पन शकत नाही आणि ते करणं मुर्खपणा आहे
चीन ची भांडवलशाही यामुळे ही अमेरिकेपेक्षा efficient आहे. आज अमेरिकेपेक्षा पेक्षा चीन ची अर्थव्यवस्था PPP बेसिस वर मोठी आहे. हि जादू त्यांनी कॅपिटलीसम आणि कंम्युनिसम चं त्यांच्या देशाला योग्य मिश्रण ठेवून आणि धर्म संपवून केलेलं आहे. चीन ला शिव्या घालणारे आणि वस्तूंवर बहिष्कार टाका म्हणणारे माझ्या मते अभ्यास नं केलेले आहेत. त्यांना आग सोमेश्वरी असताना बंब रामेश्वरी पाठवणारे मूर्खच म्हणायला लागेल. हे मूर्ख आम्ही मुतून एक गवताची आग कशी विझवली यात यात खुश आहेत.
असो शेवटी मुखशुद्दी साठी
"गोरा सोजीर मज समक्षच माझ्या भार्येशी कुकर्म करीत असतांना, मी सुद्धा त्याच्यावर धरलेली आपल्या हातातली छत्री मधुनमधून किंचित् कलती करून त्यास उन्ह लागेल असें करून त्या दुष्ट सोजीरावर सूड उगवत होतो."
चिल्लर चिनी चीजवस्तुंवर चिंधीचोर राष्ट्रवाद्यांनी घातलेल्या "कडक" बहिष्काराच्या निमित्ताने, अनेक वर्षांपूर्वी वाचलेलं (बहुधा चिं.वि.जोशी?) हे वाक्य आज सहज आठवलं.
October 25, 2016
लांब पल्ल्याच्या प्रवासीगाड्यांचं नियोजन
मेल, एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, दुरांतो एक्सप्रेस, अशा बारा तासांपासून अगदी ऐंशी ते पंच्याऐंशी तासांचा प्रवास करणाऱ्या निरनिराळ्या गाड्या आहेत. या गाड्यांना लांब पल्ल्याच्या गाड्या म्हणतात. त्यांचं नियोजन विविध विभागांमार्फत होत असतं.
इंजिनड्रायव्हर्स, गार्ड, हेल्पर, तिकीट तपासनीस, या सर्वांच्या एकत्रित काम करणाऱ्या गटाला 'क्रू' म्हणतात. या सर्वांची ड्यूटी साधारणतः आठ ते दहा तासांनंतर समाप्त होते. यासाठी रेल्वेमार्गावरील ज्या स्टेशनवर 'क्रू' बदलला जातो ते स्टेशन सर्व सोयींनी परिपूर्ण असावं लागतं. त्या कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीच्या जागा ठीकठाक असाव्या लागतात. महत्त्वाचं म्हणजे इंजिनाची तत्परतेनं करावी लागणारी तपासणी, प्रत्येक डब्याची तांत्रिक तपासणी, डब्यातील पाणीपुरवठा व स्वच्छता, खानपानाची सोय, ह्या सर्व गोष्टी दहा मिनिटांत पूर्ण कराव्या लागतात. पूर्वीच्या काळी अशा जंक्शनस्टेशनवर गाडी अर्धा तास थांबत असे, परंतु आजकाल गाडी लवकरात लवकर स्टेशनातून बाहेर काढावी लागते. या गाड्यांचे इंजिनड्रायव्हर्सही सहा ते आठ तासांनंतर बदलले जातात.
प्रत्येक इंजिनमध्ये एक जड लाईन बॉक्स ठेवलेली असते, ज्यामध्ये संपूर्ण मार्गाचं तपशीलवार टाईम टेबल, ट्रॅकची सखोल माहिती, आवाज करू शकणारे व उजेड पाडणारे छोटे बॉम्बस्, सुटे दिवे व इतर छोटी-मोठी आयुधं असतात. ही पेटी जड असून, रेल्वेपोर्टर एका इंजिनामधून दुसऱ्या इंजिनात तिची ने-आण करतात.
इंजिनड्रायव्हरना गाडी सुटण्याच्या वेळेआधी तासभर यार्डात जाऊन इंजिनाची तपासणी करून ते प्लॅटफॉर्ममधील उभ्या असलेल्या गाडीला लावावं लागतं. राजधानी एक्सप्रेससारख्या अति-महत्त्वाच्या गाडीचे ड्रायव्हर त्यांच्यावरील जोखमीचे काम करताना पूर्ण दक्षता घेतात. इंजिनड्रायव्हरजवळील वर्किंग टाईम टेबल हे सर्वांर्थानं परिपूर्ण असतं. त्यामध्ये सर्व लेव्हल क्रॉसिंग्ज, छोटी गेट्स, वळणं, पूल, नद्या, मार्गाची चढण, उतार, संपूर्ण मार्गावरील सिग्नल्सच्या जागा, तत्काळ वैद्यकीय केंद्रं, या सर्वांची पूर्ण माहिती दिलेली असते. काही ठिकाणी तांत्रिक थांबे असतात, जे प्रवासी टाईम टेबलमध्ये नसतात.
प्रत्येक गाडीला Booked Maximum Speed, Commereial Speed आणि Maximum Permitted Speed यांचं कोष्टक आखून दिलेलं असतं. काही कारणाने गाडी उशिरा धावत असेल, तर अशा वेळी गाडी वरील कोष्टकाप्रमाणे वेगाने जाऊन वेळ भरून काढते. डबे ओढण्याची प्रत्येक इंजिनाची किती क्षमता आहे हे निश्चित केलेलं असतं. त्यानुसार अगदी जरूर पडल्यास पुढील बाजूस दोन इंजिनं जोडली जातात. २५०० कि.मी. प्रवास झाल्यानंतर प्रत्येक इंजिनाची कसून तपासणी होते. ३० ते ३५ दिवसांनी आयए, आयबी, आयसी अशा श्रेणीत तपासणी होत असते. प्रत्येक इंजिन कोणत्या शेडमध्ये तपासणीसाठी पाठवायचं हे ठरलेलं असतं. त्याप्रमाणेच ते गाडीला लावण्याचा क्रम आखला जातो.
'ट्रेन सुपरिटेंडन्ट' हा एक महत्त्वाचा अधिकारी राजधानी एक्सप्रेस, दुरान्तो एक्सप्रेस, अशा काही खास गाड्यांसाठी नेमलेला असतो. गाडीतील संपूर्ण अंतर्गत व्यवस्थाप्रमुख म्हणून त्याचा हुद्दा असतो. सर्व प्रवाशांची झोपण्याची, जेवणाखाण्याची व्यवस्था, तसंच त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास तत्परतेनं त्यांना मदत करणं ही या अधिकाऱ्याची जबाबदारी असते. या विशेष गाड्या रेल्वेमंत्र्यांच्या आधिपत्याखाली असतात. अनेक परदेशी प्रवासी अशा गाड्यांनी प्रवास करतात. त्यामुळे गाडीतील व्यवस्थापनाचा दर्जा उत्तमच राहील याकडे अधिकाऱ्यांचा नेहमीच कटाक्ष असतो. गाडी संपूर्ण प्रवास बरोबर वेळेवर करत आहे किंवा नाही हे पाहण्याकरता मार्गावर १५० ते २०० कि.मी. अंतराचे 'कंट्रोल सेक्शन' असतात. ते सर्व एकमेकांशी टेलिफोननं जोडलेले असतात. या सर्व विभागांवर एक मुख्य नियंता असतो. गाडीच्या वेळापत्रकावर काटेकोरपणे लक्ष ठेवलं जातं. समजा, अपघात झाला, तर तत्काळ आपत्कालीन यंत्रणेचा उपयोग करण्याची जबाबदारी मुख्य नियंत्यावर असते.
मुख्य व अतिमहत्त्वाच्या स्टेशनवरील कंट्रोल रूममध्ये भव्य कंट्रोल पॅनेल असतं, ज्यावर धावणारी प्रत्येक गाडी टिंबांच्या स्वरूपात दाखविली जाते. तांबडा ठिपका म्हणजे मेल व एक्सप्रेस गाड्या, निळा रंग पॅसेंजर गाडीचा, तर काळा रंग मालगाडी दर्शवितो. काही कारणाने गाडी मध्येच थांबून राहिली असेल तर ती ठळक जाड रेषेत दाखविली जाते.
'केबिन कंट्रोल क्रू' हे सर्व रेल्वेमार्गावरील सांधे, सिग्नल व त्यांची इंटर-लॉकिंग अरेंजमेंट या सर्व गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष देतात, ज्यामुळे गाडी सुरक्षितपणे स्टेशनात शिरते व बाहेर पडते. गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर घ्यायची हे मुख्य स्टेशनमास्तर ठरवितो. महत्त्वाच्या गाड्यांचे, जेथून गाडी सुरू होते व ज्या ठिकाणी शेवटचा थांबा असतो तेथील, प्लॅटफॉर्मस ठरलेले असतात. छोट्या स्टेशनात स्टेशनमास्तरना ही जबाबदारी एकट्याने सांभाळावी लागते.
मालगाड्या एकदा मुख्य यार्डातून निघाल्या, की त्यांना मधल्या स्टेशनचे थांबे नसतात. त्यामुळे अशा पट्ट्यात त्या वेगाने जातात. जलद मालगाडी-सेवा (मुंबई ते दिल्ली) घेऊन जाणाऱ्या मालगाड्यांना प्रथम प्राधान्य दिलं जातं, परंतु इतर मालगाड्यांना मात्र पक्कं वेळापत्रक नसतं.
एखाद्या वेळी तांत्रिक कारणामुळे डबे जोडण्यास विलंब होतो व त्यावेळी गाडी सुटण्यासच उशीर होतो. हे सर्व सांभाळणं म्हणजे एक कसरतच असते.
-– डॉ. अविनाश वैद्य
October 21, 2022
चिकुनगुनियाचा ताप हा डेंगीच्या तापाप्रमाणे असला तरीही त्याची मुदत मात्र काही महिन्यांची असते. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात या तापाने अनेकांना जेरीस आणले. गर्भवती महिलांमध्येही या तापाची लागण होण्याची शक्यता असते. हा ताप बरा झाला तरी त्याचे दुष्परिणाम काही काळाने पुन्हा दिसू शकतात..
चिकुनगुनिया हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप (CHIKV) विषाणूंमुळे होतो. हा आजार जडला की दिवस आणि आठवडेच नव्हे तर काही महिन्यांपर्यंत तो रुग्णाची पाठ सोडत नाही. चिकनगुनियाची लक्षणे जरी डेंग्यूसारखी असली तरीही haemorragic fever ची अवस्था मात्र या रोगात जवळजवळ कधीच दिसत नाही.
लक्षणे:
ताप येणे, तोंड, पाठ, पोट येथे पुरळ उठणे ही चिकुनगुनियाची लक्षणे आहेत. या रोगाचा संसर्ग झाल्यास सांधे प्रचंड दुखतात. त्यामुळे रुग्णांना हालचाल करताना त्रास होतो, सांध्यांना सूज येते. रोग बरा झाला, तरी ही लक्षणे कमी होण्यास काही आठवडे लागतात. काही रुग्णांमध्ये दीर्घ संधिवाताची लक्षणे दिसतात. स्नायू, कंबर, डोके दुखण्याची लक्षणेही आढळून येतात. चिकुनगुनियाचा डास चावला की सुमारे १२ दिवस त्याची सर्वसाधारण लक्षणे दिसत नाहीत. मात्र, अनेकदा सांधेदुखी जाणवते. याचबरोबर पहिल्या १२ दिवसांत डोळ्यात लाली आणि प्रखर उजेडाकडे बघण्यास त्रास जाणवू शकतो.
हात-पायांवर रॅशेस येतात. मात्र, चिकनगुनियाचे निदान करण्याचा खात्रीदायक मार्ग म्हणजे रक्ताच्या नमुन्याची चाचणी. सर्वसाधारण तीव्र ताप आणि सांधेदुखी एकत्र आली की तात्काळ ही चाचणी करून घेण्यास सांगितली जाते. आरटी-पीसीआर नेस्टेड प्राईम ही रक्तचाचणी यासाठी घेतली जाते. यामध्ये या विषाणूमुळे रक्तातील काही घटकांचे विघटन होऊन त्याच्या गुठळ्या बनल्याचे आढळतात आणि चिकुनगुनियाचे निदान होते.
आजाराचे परिणाम
तरुण रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती अधिक असल्याने ५ ते ८ दिवसात हा आजार बरा होतो मध्यमवयीन रुग्णांमध्ये २-३ महिने या आजाराचा त्रास होऊ शकतो तर वृद्धत्वाकडे झुकलेल्यांना वर्षभर या आजाराच्या दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते.
तातडीने रक्तनिदान करुन घेणे.
डॅाक्टरांनी दिलेल्या औषधांचा कोर्स पथ्यांसह पूर्ण करणे
आजाराची लागण पुन्हा होऊ नये म्हणून पहिली दोन वर्षे दर सहा महिन्यांनी रक्ततपासणी करणे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 6, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti