(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • द्वेष म्हणजे तिरस्काराची भावना

    मानवी जीवन म्हणजे एक कोडेच म्हणावे लागेल. मानवी मनाचा थांग पत्ताच लागत नाही असे अनेकवेळा म्हटले जाते एव्हढेच नव्हे तर तशी प्रत्यक्ष प्रचिती देखील जीवन जगताना येते. मानवी मन हे गुणअवगुणांचा महासागर आहे. इथे चांगुलपणा आहे वाईटपणा देखील आहे.

      May 2, 2023


  • श्री गणेश भुजंगस्तोत्रम् – भाग ३

    भगवान गणेशांचा आवडता रंग लाल आहे आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे.पण लालच का असे म्हटले तर?

      January 15, 2020


  • श्री कनकधारा स्तोत्रम् – १०

    गीर्देवतैति गरुड़ध्वज सुंदरीति शाकम्भरीति शशिशेखर वल्लभेति।
    सृष्टि-स्थिति-प्रलय केलिषु संस्थितायै तस्यै ‍नमस्त्रिभुवनैकगुरोस्तरूण्यै ।।१०।।

    आई आदिशक्ती परांबेचे कार्य तीन प्रकारे चालत असते. या तीन पद्धतींनाच त्रिगुण असे म्हणतात. सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांच्या द्वारे कार्य करणाऱ्या आदिशक्तीच्या तीन रूपांना महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती असे म्हणतात.
    या तीन रूपात कार्य करणाऱ्या तीन शक्तींचे वर्णन येथे आचार्यश्री करीत आहेत.

    गीर्देवतैति- गीरा म्हणजे वाणी. त्या वाणीची देवता ती गीर्देवता. अर्थात आई सरस्वती.

    गरुड़ध्वज सुंदरीति - गरुडध्वज म्हणजे भगवान विष्णू. त्यांच्या रथाच्या ध्वजावर गरुडाचे चित्र काढलेले असते. त्यांची सुंदरी अर्थात प्रियतमा. म्हणजे आई जगदंबा महालक्ष्मी.

    शाकम्भरीति - जगदंबेचे एक नाव शाकंबरी असे आहे. कधीकाळी प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी सर्व ऋषी-मुनींनी प्रार्थना केल्यामुळे आई जगदंबा प्रगट झाली. सगळ्या भक्तांच्या उदरभरणाची सोय व्हावी म्हणून तिने सर्वत्र शाक अर्थात भाज्या निर्माण केल्या. याच्या आधारे भक्तांचे भरणपोषण केल्यामुळे हे नाव रूढ झाले.

    शशिशेखर वल्लभेति- शशि म्हणजे चंद्र. त्याला शेखर म्हणजे मस्तकावर धारण करणारे. अर्थात भगवान श्री शंकर. त्यांची वल्लभा अर्थात प्रियतमा. म्हणजे देवी पार्वती.

    सृष्टि स्थिति प्रलय केलिषु संस्थितायै- या तीन स्वरूपात, त्या त्रिदेवांसह, सृष्टी निर्मिती, स्थिती अर्थात पालन आणि लय अर्थात विनाश या तीनही केली म्हणजे लीलांमध्ये आधारभूत स्वरूपात विद्यमान असणाऱ्या,

    तस्यै ‍नमस्त्रिभुवनैकगुरोस्तरूण्यै- त्या त्रिभुवनैकगुरू अर्थात त्रैलोक्यातील सर्व श्रेष्ठ तत्व असणाऱ्या भगवान विष्णूंची तरुणी अर्थात सुंदरीला नमस्कार असो.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      March 19, 2020


  • अस्थिसच्छिद्रता (ऑस्टिओपोरोसिस)

    हा एक चयापचयाचा रोग आहे. यात हाडाची घनता कमी होते व बाह्यकाची जाडी कमी होते. हाडाची झीज आणि भर ही सतत चालणारी प्रक्रिया असते. तिशीपर्यंत हाडाचा बाह्यक (कॉर्टेक्स) कठीण होत जातो. नंतर हाडाची झीज व भर समतोल झाल्यास हाडाचा कठीणपणा तसाच राहतो; पण त्यात, तफावत पडून झीज जास्त झाली तर हाडात सच्छिद्रता येऊन कठीणपणा कमी होतो. पाठीच्या कण्यात, खुब्यात, हाताच्या रेडियस हाडात जाळीदार भागाची झीज होते, पुरुषांच्यात याचे प्रमाण २० ते ३०%, तर स्त्रियांत ४० ते ५०% असते.

      April 1, 2023


  • मी विजेता होणारच

    प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकपणे पाहण्याची सवय मनाला केवळ असून चालत नाही. शरीराला सुद्धा मनाची साथ द्यावी लागते. मी विजेता होणारच या पुस्तकाची शंभरावी आवृत्ती केवळ निघाली नाही तर अनेकांना यशाची पायवाट दाखवणारे उमेश कणकवलीकर यांनी अनेकांच्या जीवनात अमुलाग्रह बदलही केला आहे.

      June 30, 2025


  • लग्नातल्या अक्षता तांदूळाच्याच का?

    आपण लग्नात अक्षता वापरतो. अक्षता फक्त तांदूळाच्याच बनवतात. दुसरे कोणतेही धान्य त्यासाठी वापरले जात नाही.

    याची खालील दोन महत्वाची कारणे-

    तांदूळ हे एकच धान्य असे आहे की जे आतून कधीच किडत नाही...त्याला आतून कीड पडत नाही...म्हणूनच शुद्ध चारित्र्याला/ शुद्धतेला धुतलेल्या तांंदुळाची उपमा दिली जाते !

    दूसरे म्हणजे तांदुळाचे पेरल्यावर जे रोप येते ते काढून पुन्हा दुसरीकडे लावायला लागते...तेव्हा ते खरे बहरते.....! त्याचप्रमाणे मुलगी लग्नाअगोदर वाढते एकीकडे....पण लग्नानंतर दुसऱ्या घरी जाते आणि तिथे ती बहरते....यासाठी म्हणूनही अक्षता मांगल्यरूपी ....असेच तिने बहरावे म्हणून वापरल्या जातात....

    आपल्याकड़च्या प्रथा खूप विचारपूर्वक केलेल्या आहेत....

      May 4, 2016


  • सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षण संबंधी निर्णय

    मराठा आरक्षणप्रकरणी सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकार झटका दिला आहे. मराठा आरक्षणावर स्थगितीचा उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टानंही कायम ठेवला आहे. त्यामुळं मराठा आरक्षण देणारच अशी घोषणा करणारं राज्य सरकार अडचणीत सापडलं आहे.

    सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षण संबंधी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली याचिका फेटाळली व मुंबई हायकोर्ट च्या अंतिम निर्णयाची सरकारने वाट पाहावी अशी समज सरकारला दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे अलर्ट सिटिज़न्स फोरम ऑफ इंडियाने स्वागत केले आहे.

    महाराष्ट्र सरकारच्या मराठा आरक्षणा संबंधी याचिकेवर सुनावणी करण्या अगोदर अलर्ट सिटिज़न्स फोरम ला या विषयात आपले मत नोंदवण्याची संधी द्यावी असे निवेदन श्री दयानंद नेने यांनी 8 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात दिले होते.

    मागील महिन्यात मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. याविरोधात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.

    सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं ?

    मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय अंतरिम आहे. त्यामुळं आधी उच्च न्यायालय याच्यावर काय निर्णय देतं हे स्पष्ट होऊ दिले पाहिजे. त्यानंतर राज्य सरकारच्या याचिकेवर सुनावणी होऊ शकते असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

    त्यामुळं राज्य सरकारची याचिका ही सर्वोच्च न्यायालयानं कुठलाही निर्णय न देताच फेटाळली आहे. उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येण्याआधीच सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं वेगळा कुठला निर्णय न देता उच्च न्यायालयाची स्थगिती कायम ठेवली आहे.

    हायकोर्टानं काय म्हटलं होतं?

    हायकोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती देताना काही मुद्दे नोंदवले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र सरकार 50 टक्के एकुण आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही असं कोर्टानं नोंदवलं आहे.

    अनेक अहवालांच्या निष्कर्षानुसार मराठा समाज मागासलेला नाही असं स्पष्टपणे दिसतं. त्यामुळं नारायण राणे समितीचा अहवालात अनेक त्रुटी आढळत असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे.

    आतातरी सरकारने जागे हावे व केवळ राजकीय हेतूनी प्रेरित असलेला हा निर्णय बदलावा असे आवाहन श्री दयानंद नेने यांनी केले आहे.

    -- दयानंद नेने.
    December 18, 2014

      December 18, 2014


  • कोकण प्रांतातील औद्योगिक वाढ

    हवाई वाहतुकीसाठी मुंबईला आंतरराष्ट्रीय आणि डोमेस्टिक विमानतळाबरोबर नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळ, रत्नागिरी येथील थोड्याच कालावधीत सुरू होणारा विमानतळ व सिंधुदुर्ग येथील चिपी-परुळे विमानतळ जोडले जातील. संपूर्ण भारतात ही हवाई वाहतूक आणि सागरमाला उपलब्ध होणार येत्या काही वर्षात! याचाच अर्थ माल वाहतूक त्वरेने भारतभर किंवा जगभर होऊन भारतात तयार होणाऱ्या नाशिवंत मालाला विस्तृत बाजारपेठ उपलब्ध होणार!

      February 14, 2023


  • स्मार्ट सिटी नागपूर

    काल प्रख्यात टीव्ही चॅनलचे आमंत्रण आले म्हणून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सभागृहात गेलो. विषय नागपूरमध्ये होणाऱ्या नगरपालिका निवडणुका होता. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वतंत्र विदर्भ, व बसपा यांचे मातब्बर नेते आपली बाजू मांडत होते, तसेच दुसऱ्या पक्षाने या शहराची कशी वाट लावली, हे सांगण्याचा त्यांचा प्रत्येक वाक्यात भर होता.

    भाजप आम्ही मेट्रो या शहरात आणली, तसेच आता इथेनॉल वर चालणाऱ्या 50 बसेस आणणार आहोत, असे सांगत होते. त्याला उत्तर देताना काँग्रेस नेते म्हणाले आम्ही आमच्या सत्तेच्या काळात 300 बसेस या शहराला दिल्या, सरासरी या बसेसचे आयुष्य 15 वर्षे असायला पाहिजे, परंतु 8-9 वर्षांतच त्यातील जवळपास 200 बसेस मोडकळीस आल्या, आणि फक्त 95-100 चालू स्थितीत आहेत, याला सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे.

    गोष्ट अगदी बरोबर आहे, जवळपास 200 बसेस मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहेत हे मान्य करावेच लागेल. त्या का नादुरुस्त अवस्थेत आहेत याची करणे दिल्यास, हे सर्वाना लक्षात येईल कि, सामान्य जनता या सुविधा देण्याच्या लायकीचीच नाही, हे शब्द जरी कठोर असतील, पण हे सत्य आहे, कि या लोकांना कोणतीही चांगली वस्तू द्या त्याची वाट लावण्यातच या लोकांना आनंद मिळतो.

    नागपूरमध्ये सिटीबस ला स्टारबस या नावाने ओळखले जाते, यातील ज्या गाड्या नादुरुस्त आहेत त्याच्यावर नजर फिरवलीतर लक्षात येईल, कि बहुतेक गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहेत, हे कृत्य नतद्रष्ट लोकांनी दगडफेकीत केलेले आहे, तसेच सर्व गाड्यांच्या सीट्सचे फोम फाडून त्यातील स्पंज प्रवासी लोकांनी गायब केलेला आहे, तसेच सीट च्या फ्रेम वाकवलेल्या आहेत. काही बसेस जळलेल्या आहेत, ह्या कुणी जाळल्या, हे पहिले तर लक्ष्यात येईल, कि झोपडपट्टीतील, किव्वा शहरातील काही भाग जिथे असामाजिक माणसे जगतात, त्या भागात दंगल अथवा खून झाला कि, त्याचा राग सरकारी वहानांच्यावर निघतो, आणि ती जाळण्यात येतात. आजपर्यंत ज्या लोकांनी हि कृत्ये केली त्यातील एकही तुरुंगात खडी फोडण्यास गेला नाही, कारण यांना वरील उपस्थित कोणत्या ना कोणत्या पक्षाचे पाठबळ मिळालेले असते, आणि म्हणूनच हे मग्रूर लोक असे कृत्य करून ताठ मानेने समाजात फिरत आहेत. काही वर्षातच सुरु होणाऱ्या मेट्रोच्या डब्यात लोक खर्रा खाऊन, थुंकून कोपरे लाल करतील, सीट फाडतील, तसेच काचा फोडतील असे झाल्यास नवल वाटायला नको.

    स्वच्छ नागपूर या विषयावर चर्चा करताना पक्ष कार्यकर्त्यांनी सभागृहाचे भान न ठेवता बाचाबाची, सुरु केली, आणि कार्यक्रम जवळजवळ बंदच करण्याची वेळ आली. स्वच्छ भारत अंतर्गत पंतप्रधानांनी मागेल त्याला संडास देण्याचे कबूल केले, आणि तसे देण्यास सुरवातही केली, यासाठी मी कार्यक्रमात शासनाला मदत करण्याचा प्रयत्न केला, यात जी वस्तुस्थिती माझ्या समोर आली, त्याची कथा वाचल्यास सुजाण नागरिकांच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही.

    जनधन योजनेअंतर्गत प्रत्येक दारिद्र्य रेषेखालील लोकांचे शून्य पैसे भरून खाते उघडण्यात आले, या खात्यात, ज्यांना संडास हवे असतील त्यांच्याकडून आधार कार्ड, पासबुक यांची प्रत मागवून त्यात सरकारने रु 8000, पहिला हप्ता म्हणून भरले, अट हि कि, त्यांनी संडास बांधावेत, व संडास पूर्ण बांधून झाल्यावर उरलेले 8000 दुसऱ्या हप्त्यात जमा होणार. 85 टक्के लोकांनी हलकट वृत्ती दाखवत, पहिल्या हप्त्याचे जनधन खात्यात भरलेले रु 8000 खाऊन टाकले, वरती सरकारी अधिकाऱ्यांना तोंड वर करून सांगत होते कि, आम्हाला माहीतच न्हवते संडास बांधण्यासाठीचे हे पैसे आहेत. याना हे सर्व शिकवणारे अर्थात बोलावते धनी वेगळेच होते हे सांगायची गरज नाहीच.

    नागपूर महानगरपालिकेने मग निर्णय बदलून, स्वतःच संडास बांधून देण्याचे ठरवले, त्या प्रमाणे फायबर (FRP) चे बनवलेले संडास लाऊन देण्याचे ठरले, व टेंडर पद्धतीने असे संडास लावण्याच्या निविदा काढल्या. हे संडास लागले, परंतु पुढच्या दोन दिवसात सर्व शौचगृहांचे दरवाजे रात्रीत तोडून गायब करण्यात आले, संडासच्या छिद्रात दगडे, विटा टाकण्यात आल्या. किती नतद्रष्टेपणा या लोकांच्यात ठासून भरलेला आहे याची हि उदाहरणे आहेत, आज परत ही सर्व मंडळी लोटा घेऊन रस्त्याकडेला, किव्वा रानात जातात. सर्वात प्रथम हंटरने याना फोडून काढले पाहिजे, हेच लोक समाजातील मुख्यप्रवाहात सामील होण्यास तयार नाहीत, असे लोक आर्थिक मागासलेले नाहीत, कारण बहुतेकांच्या घरात टीव्ही आहे, डिश अँटेना अनेक घराच्या छतावर दिसतात, मोटरसायकल आहे, तर मानसिक दिवाळखोरीत जगत आहेत, त्यांना तसेच राहण्यातच समाधान आहे. नागपूर हे एक उदाहरण आहे, अश्या घाणेरड्या वृत्तीची लोक भारताच्या प्रत्येक शहरात ठासून भरलेले आहेत, त्यामुळे सगळीकडची परिस्थिती कमीअधिक प्रमाणात सारखीच असणार आहे.

    मुळात आपल्या देशात सुजाण, सुसंकृत, पिढी तयार करण्यासाठी प्रयत्नच होत नाहीत, हेच खरे दुर्दैव आहे. या देशात जवळ जवळ सर्व जातीचे लोक, आम्ही कसे मागास, उपेक्षित, गरीब, दुबळे आहोत, हे सांगण्यात एकमेकांवर कुरघोडी करताना दिसतात, असा देश प्रगत होण्याची चिन्हे येणाऱ्या पन्नास वर्षातही दिसणार नाहित.

    सकाळी लोट्या सोबत स्मार्ट फोन घेऊन लोक वावरात जातील, यालाच स्मार्ट सिटी/शहर, म्हणायचे का?

    -- विजय लिमये

      December 25, 2016


  • चित्तरंजन प्रकल्प – रेल्वे इंजिन कारखाना

    चित्तरंजन प्रकल्पामुळे रेल्वेला लागणाऱ्या सर्व तांत्रिक बाबींत भारत स्वावलंबी झाला. परदेशी गंगाजळीत मोलाची भर पडली आणि एक आदर्श, नव्याने बांधलेलं अद्ययावत शहर म्हणून चित्तरंजनची भारतभर ख्याती झाली.

      September 3, 2022