वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
एखादी पाक कृती करताना त्यासाठीच्या फोडणीत कढीपत्ता घालतात त्यामुळे त्या डिशला अप्रतिम चव येते. उदा: कांदापोहे. या डिशमद्धे कढीपत्ता नाही ही कल्पनाच आपण सहन करू शकत नाही. त्यामुळे तर पोह्याच्या डिशला सुंदर चव येते. परंतु आपण पोहे खाताना प्रथम कढीपत्त्याची पाने डिश मधून काढून टाकतो. कारण त्याचे महत्व आपणास माहित नसते.
June 13, 2025
८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री ८ च्या सुमारास विद्यमान पंतप्रधान माननीय श्री . नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी चलनात असणाऱ्या ५०० आणि १००० रुपयांच्या चलनी नोटांची त्या मध्यरात्री पासून कायदेशीर मान्यता संपुष्टात येईल असे जाहीर केले . आणि ती संपुष्टात आलीही . नंतरच्या काळात आधी अस्तित्वात नसलेल्या २००० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या .
March 21, 2017
१९७१ ची रोमांचक युद्ध गाथा हे श्री सुरेन्द्रनाथ निफाडकर यांचे, नचिकेत प्रकाशन, नागपूर यांनी प्रकाशित केलेले, १९७१ चे भारत-पाक युद्ध आणि बांगलादेशच्या निर्माणाची रोचक कथा सांगणारे सुबोध आणि रसाळ पुस्तक आहे.
१९७१ ची रोमांचक युद्धगाथा
लेखकःसुरेन्द्रनाथ निफाडकर
पृष्ठसंख्याः 112 ; किंमतः 100 रू.
नचिकेत प्रकाशन, नागपूर
December 5, 2011
वेळेअभावी ज्यांना पुस्तके वाचणे जमत नाही ते पुस्तकातील आशय ऑडिओ स्वरूपात ऐकू शकतात. नेत्रहीनावांसाठी सुद्धा ऐकून ज्ञान मिळवता येते. पण सगळाच आशय ऑडिओ स्वरूपात उपलब्ध नसतो. नेत्रहीनांसाठी अशी खास व्यवस्था प्राची गुर्जर यांनी त्यांच्या ‘यशोवाणी’ या स्वयंसेवी गटामार्फत गेल्या पंधरा वर्षांपासून दृष्टिबाधित व्यक्तींसाठी ध्वनिमुद्रित वाचनसेवा विनामूल्य देशभर पुरवली आहे.
July 10, 2025
भगवान श्रीविष्णुंच्या चरणकमलांचे अलौकिकत्व वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, भगवान श्रीविष्णु जगत पालक असल्याने त्यांना देव आणि दैत्य दोन्ही आपले आहेत. कोणत्याही एका समूहावर ते कधीच अन्याय होऊ देत नाहीत.
December 16, 2020
गणेशचतुर्थीला आजही घराघरातून गणपतीची प्राणप्रतिष्ठा, पूजा, आरती, अभिषेक, अथर्वशीर्ष पठण, नैवेद्य अशा गोष्टी अतिशय श्रद्धापूर्वक आणि धर्मिकपणे केल्या जातात.
पण काही घरगुती गणेशोत्सवामध्ये आणि अनेक सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये आता खूप बदल होताना दिसतात. उत्सवी मांडवांमध्ये कोंबडी, पोपट, मैना, म्हावरा, चिमणी, लुंगी, दांडा, रिक्षा, झिंगाट अशा अनेक वैविध्यपूर्ण शब्दांवरील गाणी आपल्या कानांच्या, भक्तीच्या आणि मराठी संस्कृतीच्या चिंधड्या उडवत असतातच ! पण आपल्या गणपतीच्या आरत्या हा सुद्धा आता धार्मिक कार्यक्रम राहिलेला नसून तो आता एक Reality show किंवा Performing show होत चालला आहे.आपण कुठल्या आरत्या म्हणतोय, काय शब्द म्हणतोय, चाल कुठली लावली आहे अशा गोष्टींकडे लक्ष न देता केवळ एक उपचार म्हणून तो दणक्यात पाळला जातो.
आपल्या विविध संतांनी रचलेल्या, शेकडो वर्षे जुन्या आरत्यांना ( मग त्यात "शेंदूरलाल चढायो अच्छा गजमुखको " ही हिंदी आरतीही आली) त्या संतांच्या अपार भक्तीची पार्श्वभूमी लाभली आहे. काही मराठी आरत्या आणि गणपती पूजेनंतर "गणपती बाप्पा मोरया " हा मराठीतला जयजयकार तर अगदी अमेरिकन, ब्रिटीश, जपानी, कोरियन मंडळीही ( तेथे स्थाईक मराठी किंवा भारतीय मंडळी नव्हेत ) मराठीतूनच करताना ( युट्युबवर) पाहायला मिळतात .
पण आपल्याला मात्र त्या आरत्या आता जुन्या, कालबाह्य , out of fashion वाटायला लागल्या आहेत. आपल्यापैकी अनेकांना संत कवींच्या या आरत्यांऐवजी ... देवा हो देवा गणपती देवा, जय गणेश, जय गणेश, जय गणेशदेवा, देवा श्रीगणेशा देवा श्रीगणेशा ,ओम जय जगदीश हरे .... अशी व्यावसायिक गीतकारांनी रचलेली सिनेमातील गाणी ह्याच आरत्या वाटायला लागल्या आहेत.
येई गे विठ्ठले माझे माउली ये आणि आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रम्ह या आरत्या तर खूप ओरडूनच म्हटल्या पाहिजेत अशी आपली पारंपारिक समजूत आहे. सर्वात विडंबन म्हणजे आरतीनंतर म्हटले जाणारे "देवे " म्हणजेच मंत्रपुष्पांजली ! हे खरेतर एक आद्य राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. अतिशय सुंदर रचना आणि मंत्रमुग्ध करणारे हे मंत्र , अनेक ठिकाणी मात्र सामूहिकपणे देवावर खेकसत , --देवाच्या अंगावर धावून जात, त्याला खडसावून काही विचारतोय अशा तऱ्हेने म्हटले जातात. दोन शब्दांमधले अवग्रह ( म्हणजे SSS चिन्हांकीत लांब आकार ) कितीही वेळ ताणून धरून एकमेकांकडे पाहत जुगलबंदीचा आनंद घेतला जातो.
भरकटत चाललेली ही मराठी सांस्कृतिक चाल आपणच सावरायला हवी. अधिकाधिक मंडळींनी , गणपतीची पूजा - आरती ही जास्तीतजास्त योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायला हवा. बाकीचा उत्सव हा मनोरंजनासाठी असतोच ना ?
-- मकरंद करंदीकर
अंधेरी ( पूर्व ), मुंबई ४०००६९
August 27, 2017
मोदी सरकारने परराष्ट्र धोरणावर भर देऊन जागतिक संबंध सलोख्याचे व्हावेत, यासाठी प्रयत्न चालविले आहेत. मोदींच्या दोन दिवसांच्या बांगलादेश दौर्यामुळे जे वातावरण बांगलादेशमध्ये पाहावयास मिळाले, ते दोन्ही देशांच्या संबंधांना अधिक मजबूत करणारेच आहे.
June 13, 2015
आता आपण खोबरेल तेलाचे घरगुती उपयोग पाहूयात:
१)खोबरेल तेल व चुन्याची निवळी हे मिश्रण घोटून केले मलम केसांना लावल्यास केस गळणे थांबते.
२)थंड हवेशी संपर्क आल्याने त्वचा फुटते ह्या करीता खोबरेल तेल व लोणी हे मिश्रण समभाग मिसळून त्वचेवर लावावे.
३)खोबरेल तेल अंगाला नियमीत चोळल्यास मांसपेशी व स्नायू पुष्ट होतात.
४)संडास करताना व नंतर गुदद्वाराची आग होत असल्यास खोबरेल तेलाचा फाया गुदद्वारात ठेवावा.
५)लहान मुलांची टाळू भरायला खोबरेल तेल टाळूवर लावावे.
६)बोटांना होणाऱ्या कोरी बऱ्या होण्सासाठी त्यावर लोखंडी न गांजलेली सुरी तापवून त्यावरून खोबरेल तेल सोडावे.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती.)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 26, 2016
आपला भारत देश श्रेष्ठ संस्कृतीचा धनी आहे. तसेच भारत देशाला ‘माता ‘ ह्या नावाने संबोधले जाते. ज्या मातेने अनेक जाती, धर्म, पंथ ह्यांना सामावून घेतले आहे. तसेच ‘वसुवैध कुटुम्बकम’ ची भावना जागृत राहावी, सर्वांनी एकत्र येऊन आनंदोस्तव साजरा करावा ह्या उद्देशाने अनेक सण , उत्सव ह्याची निर्मिती केली गेली. प्रत्येक सणां पाठीमागे काही आध्यात्मिक रहस्य दडली आहेत. अनेक सणापैकी एक सण आहे ‘नवरात्री उत्सव’. जो संपूर्ण भारतामध्ये आनंदाने साजरा केला जातो.
October 7, 2021
हाजी अलीच्या दर्ग्याचं स्थान मोठ रमणीय आहे त्यामुळे इथे सहज म्हणून फिरायला जाणाऱ्यांची संख्याही मोठी असते.
November 21, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti