(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ऐतिहासिक नालंदा विद्यापीठ – भाग 2

    विद्यापीठाचा प्रमुख भिक्षू असे. त्याला बुद्धिमता, वारिष्टता नुसार निवडले जाई. त्याच्याकडे विद्यापीठाची संपूर्ण प्राशासनिक,शैक्षणिक  सूत्रे असत.

      August 6, 2023


  • असे घडले पुणे…

    पुणे शहराच्या इतिहासावर एक नजर टाकणारा लेख शेअर करतोय...


    सन 754 : पुण्याचे नाव होते 'पुण्य-विजय'

    सन 993 : 'पुनवडी' हे पुण्याचे नाव पडले.

    सन:1600 मुळच्या वस्तीला 'कसबा पुणे' हे नाव होते.

    सन 1637 : पुणे शहाजीराजांच्या अंमलाखाली - सोमवार व रविवार पेठा वसवल्या गेल्या.

    सन 1656 : पुणे शिवाजी महाराजांचे अधिपत्याखाली होते.

    सन 1663 : मंगळवार पेठ वसली.

    सन 1703 : बुधवार पेठ वसली.

    सन 1714 : पुण्यावर पेशव्यांची सत्ता सुरू.

    सन 1721 : बाजीराव पेशवे यांचेकडून पुण्याची पुर्नबांधणी सुरू.

    सन : 1730 : शनिवारवाडा बांधून पूर्ण झाला.

    सन 1734 : पहिल्या बाजीरावाने शुक्रवार पेठ वसविली

    सन 1749 : पर्वती वरील देवालय बांधले.

    सन 1750 : वेताळ पेठ वसविली,कात्रज तलाव व वेशी बांधण्यात आल्या.

    सन 1755 : नागेश पेठ वसविली.पर्वती तळे बांधले.

    सन 1756 गणेश व नारायण पेठा वसविल्या.

    सन 1761 : लकडी पूल बांधण्यात आला.

    सन 1769 : सदाशिव व भवानी पेठा वसविल्या गेल्या.

    सन 1774 : नाना,रास्ता व घोरपडे पेठा वसविल्या.

    सन 1790 : फडणवीस वेस उभारण्यात आली.

    सन 1818 : इंग्रजी अंमल सुरू.खडकी कटक स्थापना.पेशव्यांचा भीमा कोरेगाव येथे पराभव

    सन 1856 : पुणे मुंबई लोहमार्ग सुरू झाला

    सन 1857 : पुणे नगरपालिकेची स्थापना.

    सन 1869 : सर डेव्हिड ससून रूग्णालय कार्यान्वित

    सन 1875 : संगम ( वेलस्ली) पूल वाहतुकिस खूला

    सन 1880 : खडकवासला धरण बांधून पूर्ण

    सन 1881 ते 1891: मुठा उजवा कालवा खोदण्यात आला.

    सन 1884 : डेक्कन कॉलेजची स्थापना.

    सन 1885 : फर्ग्यसन महाविद्यालयाची स्थापना

    सन 1886 : पुणे-मिरज लोहमार्ग सुरू झाल

    सन 1915 : आर्यन चित्रपटगृह सुरू झाले

    सन 1916 : नगरपालिकेने नगररचनेचे काम हाती घेतले.

    सन 1915 ते 1925 : लक्ष्मी व टिळक रस्ता तयार व त्यांची सुधारणा.

    सन1919 : पुण्यात भुयारी गटारांची योजना हाती घेण्यात आली.

    सन 1921 : पुण्याला वीजपुरवठा सुरू.नव्या पुलाचे बांधकाम

    सन 1941 : सिल्व्हर जुबिली मोटर ट्रान्सपोर्ट तर्फे नागरी बससेवा सुरू.

    सन 1950 : पुणे महानगरपालिकेची स्थापना.पी.एम.टी.ची विनोदी बससेवा सुरू

    सन 1952 : पुणे विद्यापीठाची स्थापना.

    सन 1953 : पुणे आकाशवाणी केंद्र सुरू

    सन 1961 : पानशेत धरण फुटले.

    सन 1973 : सिंहगडावर टी.व्ही.टॉवर सुरू झाला.पुण्यात दूरदर्शन दिसू लागला.

    -- संकलन : अशोक साने
    फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.

      June 11, 2017


  • श्री कनकधारा स्तोत्रम् – १२

    नमोऽस्तु नालीकनिभाननायै नमोऽस्तु दुग्धौदधिजन्मभूम्यै ।
    नमोऽस्तु सोमामृतसोदरायै
    नमोऽस्तु नारायणवल्लभायै।।१२।।

    आई जगदंबा महालक्ष्मीला वंदन करताना जगद्गुरु श्री आदि शंकराचार्य स्वामी महाराज विविध विशेषणांचा उपयोग करीत आहेत.
    त्यातून आई जगदंबेच्या विविध गुणांचे वैभव विशद करीत आहेत.

    आचार्य श्री म्हणतात,

    नमोऽस्तु नालीकनिभाननायै- नालीक शब्दाचा अर्थ आहे कमळ. नाल म्हणजे पोकळ दांड्यावर ते फुलत असल्यामुळे त्याला नालीक असे म्हणतात. निभ अर्थात प्रमाणे, सारखे तर आनन म्हणजे मुख.
    अर्थात जिचे मुख कमळाप्रमाणे अतीव आकर्षक आहे अशी.
    तिला नमोऽस्तु अर्थात नमस्कार असो.

    नमोऽस्तु दुग्धौदधिजन्मभूम्यै- दुग्ध म्हणजे दूध. उदधि म्हणजे सागर. दुधाचा सागर अर्थात क्षीरसमुद्र ही जिची जन्मभूमी आहे अशी.
    समुद्रमंथन कथेचा संदर्भ यात घेतलेला आहे. उद म्हणजे पाणी आणि धी म्हणजे साठा या अर्थाने सागराला उदधी म्हणतात. पृथ्वीवर आढळणाऱ्या सामान्य पाण्याच्या समुद्राप्रमाणे पुराणात दुग्धसागर,दधिसागर इक्षुसागर,मधुसागर यांचेही वर्णन आहे.
    यापैकी क्षीर म्हणजे दुधाच्या सागरातून समुद्रमंथन प्रसंगी महालक्ष्मी प्रगटली आहे. त्यामुळे सागर ही तिची जन्मभूमी.

    नमोऽस्तु सोमामृतसोदरायै- याच सागर मंथनातून सोम म्हणजे चंद्र आणि अमृत निघाले असल्याने त्यांची सोदरा अर्थात एकाच उदरातून जन्माला आलेली, बहीण.

    नमोऽस्तु नारायणवल्लभायै- भगवान श्री नारायण यांची वल्लभा अर्थात प्रियतमा असणाऱ्या आई महालक्ष्मीला नमस्कार असो.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      March 21, 2020


  • श्री गणेश अवतारलीला ७ – श्री चतुर्भुज अवतार !

    सामान्यत: श्रीगणेशांचे अवतार देवतांच्या संरक्षणासाठी होतात. पण राक्षसांच्या संरक्षणासाठी झालेला अवतार आहे चतुर्भुज अवतार.

      September 8, 2019


  • पहिला भक्षक?

    सजीवाच्या शरीराचं स्वरूप, हा प्राणी आजच्या जेलिफिशसारख्या, छत्रीसारखा आकार असणाऱ्या आणि शुंडक धारण करणाऱ्या सागरी प्राण्यांच्या, मेडूसोझोआ या प्रकारचा प्राणी असण्याची शक्यता दिसून आली आहे. याचा शोध लावणाऱ्या संशोधकांनी या सजीवाला ‘ऑरालुमिना अ‍ॅटेनबरोई’ हे जीवशास्त्रीय नाव दिलं आहे. या नावातील पहिला भाग असणारा ‘ऑरालुमिना’ हा लॅटिन शब्द म्हणजे पहाटेची मशाल. जीवसृष्टीच्या उत्क्रांतीच्या पहाटेच्या काळात अस्तित्वात आलेल्या, मशालीसारखा आकार असणाऱ्या या सजीवाला पूरक असं हे नाव आहे. या नावातला ‘अ‍ॅटेनबरोई’ हा दुसरा शब्द प्रख्यात निसर्गअभ्यासक डेव्हिड अ‍ॅटेनबरो यांच्या गौरवार्थ वापरला आहे.

      August 18, 2022


  • कुळीथ (हुलगे)

    कुळीठास हुलगे असेही म्हणतात. याचे इंग्लिश नाव आहे हॉर्स ग्रॅम (horse gram) कुळीथ हे शहरांमध्ये फारसे वापरले जात नाही. खरंतर स्थूल व्यक्‍तींसाठी हे फायद्याचे कडधान्य आहे. सर्व कडधान्यांच्या तुलनेत कुळथांमध्ये सर्वांत कमी चरबी आहे व त्याचबरोबर त्यातील चोथ्याचे प्रमाण अधिक आहे.

    आयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्‍तींसाठी पथ्यकारक मानले आहे. तसेच लघवीच्या विकारांमध्ये कुळथाच्या काढ्याचा वापर सांगितला आहे. ताकात शिजवलेले कुळथाचे कढण आजारी व्यक्‍तींना देण्याची प्रथा आहे. पूर्वी बाळंतिणीना कुळथाचा काढा दूध वाढण्यासाठी दिला जायचा.

    आयुर्वेदामध्ये कुळीथ डोळ्यांना हितकर सांगितलेले आहेत. पण डोळ्यांवर थेट याचा उपयोग करू नये, तर पोटातून घेण्यासाठी याचा उपयोग करावा. कुळीथ हे वातघ्न, कफघ्न आहेत. कुळीथाचे सार रोगी माणसास पथ्यकर आहे. सुजेवरही त्याचा उपयोग होतो.
    उन्हाळ्यात, शरद ऋतूत आणि पितप्रकृतीच्या माणसांनी याचे सेवन करू नये.

    कुळथामध्ये कॅलशियमचे प्रमाण चांगले आहे. परंतु यातील काही घटकांमुळे (oxalates) यातील कॅलशियमच्या शोषणाला अडथळा निर्माण होतो. ज्या व्यक्‍तींना calsium oxalates असलेले मुतखडे आहेत अशांनी कुळीथ खाऊ नये.

    * कुळीथाचे गरम कढण तापामध्ये घाम आणण्यासाठी उपयुक्त आहे.
    * शरीरातील मेद कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.
    * कुळीथाचे गरम कढण किंवा कुळीथाच्या पिठाचे उद्वर्तन (उटणे) लावल्यानेही चरबी कमी होते.
    * अंगाला खूप घाम येत असल्यास त्यावर भाजलेल्या कुळीथाचे पिठाचे उद्वर्तन (उटणे) लावल्याने खूप चांगला उपयोग होतो.
    * मूतखडा असल्यास इतर आयुर्वेदिक औषधांबरोबरच कुळीथाचा वापर करावा. त्याचे सूप मूतखड्यामध्ये होणारी पोटातली वेदना (रीनल कोलीक) कमी करण्यासाठी वापरतात.
    * पोटात वात धरणे, पोट दुखणे, फुगल्यासारखे वाटणे यावर कुळीथाचा चांगला उपयोग होतो.
    * पोटातील जंतांवरही याचा उपयोग होतो.
    * खोकला, सर्दी, कफ यावर कुळीथाचा वापर करावा.

    कुळीथ हा प्रकार तसा प्रत्येकालाच माहीत असतो.बऱ्याच जणांच्या जेवणात ह्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो.तसे हे कडधान्य रूचकर लागते.ह्याची उसळ,पिठी,मेथकुट असे वेगवेगळे प्रकार स्वयंपाकामध्ये केले जातात.

    कुळीथ चवीला गोड तुरट असून उष्ण असतात व पचायला हल्के असतात.ते शरीरामध्ये वात व पित्त दोष वाढवितात व कफ दोष कमी करतात.
    १०० ग्रॅम कुळिथामधील पोषक तत्त्वे -
    २२ ग्रॅम प्रथिने
    ०.५ ग्रॅम स्निग्ध पदार्थ
    ३.२ ग्रॅम खनिज
    ५.३ ग्रॅम तंतुमय पदार्थ
    ५७.२ ग्रॅम कर्बोदके
    ३२१ किलो कॅलरी ऊर्जा
    २८७ मि.लि. ग्रॅम कॅल्शिअम
    ३११मि.लि. ग्रॅम फॉस्फरस
    ८.४मि.लि. ग्रॅम लोह
    ७१मायक्रोग्रॅम कॅरोटीन (जीवनसत्त्व "अ'चे पूर्वरूप)
    ०.४०मिलिग्रॅम थायमिन (जीवनसत्त्व "ब')
    ०.२० ग्रॅम रायबोफ्लेवीन (जीवनसत्त्व "ब2')
    १.५ मि.लि. ग्रॅम निआसीन (जीवनसत्त्व "ब3')
    १मि.लि. ग्रॅम जीवनसत्त्व "क'
    (संदर्भ - Nutritive Value of Indian Foods - NIN, ICAR, Hyderabad).

    तसा कुळीथ हा सूज,पाईल्स,उचकी,पोट फुगणे,कृमी,मुतखडा,दमा,खोकला,जुनाट सर्दी,स्थूलपणा ह्या तक्रारींमध्ये पथ्यकर आहे.

    आता कुळीथाचे वेगवेगळे प्रकार आपण स्वयंपाकामध्ये करतो त्याचे शरीरावर होणारे परिणाम पाहूयात:

    १)कुळीथ+भात खिचडी:
    चवीला गोड,तुरट,रूक्ष,उष्ण,तृप्तीदायक,भुक वाढविणारी,पचायला हल्की,वातकफ नाशक व पित्तकर असते.

    २)कुळीथ कट:
    चवीला गोड,तुरट,उष्ण,वातपोटातून पुढे सरकवणारा,वात कफ नाशक,भुक वाढविणारा,मेदाचा नाश करणारा,लघ्वी सुटायला मदत करतो तसेच किडनी स्टोन मध्ये घेतल्यास पथ्यकर आहे.

    ३)कुळीथ सूप:
    तुरट,वातनाशक,कफनाशक,पित्तकर,शुक्रधातू नाशक,रक्तवाढविणारा,पचायला हल्का,उष्ण असतो.

    ४)कुळीथ पीठले:
    पचायला हल्के,वातकफनाशक,पित्तकर,वात पुढे सरकवणारे,भुक वाढविंणारे,उष्ण असून चवीला तिखट,तुरट असते.

    ५)कुळीथाची गोड पिठी:
    पचायला जड,वातनाशक,कफ व पित्त वाढविंणारी,उष्ण,शक्तिवर्धक,धातुवर्धक,तृप्तीदायक,चवीला तुरट गोड असते.
    कुळीथ अतिप्रमाणात खाल्ल्यास रक्तपुष्प होते व अॅसीडीटी होते.
    कुळीथ खाऊन अजीर्ण झाल्यास खडीसाखर खावी.

    १) कुळीथ हे फेरूलीक, क्‍लोरोजेनिक, कॅफिइक, व्हॅनिल आम्ल जेनेस्टीअन आणि माल्वीडीन वनस्पतिजन्य रसायनयुक्त आहे. यामुळे कुळीथ स्निग्ध पदार्थांना अटकाव करतो आणि वजन कमी करण्यात याची मदत होते.

    २) कुळीथ रात्रभर पाण्यात भिजवून प्यायल्यास हे एक नैसर्गिक मूत्रल द्रवासारखे उपयोगी आहे. मूतखडा बाहेर घालविण्यास मदत होते. मूत्रपिंडाच्या कार्यात सुधारणा होते, सूज कमी करते.

    ३) अंगातील ताप कमी करते. सर्दी-पडसे झाले असता छातीतील कफ बाहेर टाकण्यास कुळिथाची भुकटी पाण्यासोबत घेतल्यास मदत होते.

    ४) कुळिथाच्या नियमित सेवनाने कोलेस्टेरॉलचे प्रमाण घटवून अथेरोस्केलरोसिस, हृदयविकाराचा झटका इ. धोके टाळता येतात.

    ५) या कडधान्यातील तंतुमय पदार्थामुळे शौचास साफ होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता टळते. कुळिथामधील शर्करा त्वरित रक्तामध्ये वाढल्यामुळे तृप्ती वाढते. पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार खाल्ले जात नाही, त्यामुळे वजनही वाढत नाही, मधुमेहींनाही उपयोगी आहे.

    संकलक : प्रमोद तांबे

      May 19, 2017


  • मालवणचा “सुवर्णगणेश” !

    गणपती आणि गाणपत्य संप्रदायाचा चालताबोलता विश्वकोश म्हणजे कै. जयंतराव साळगावकर ! त्यांनी हे सुवर्णगणेशाचे सुंदर मंदिर मालवणमध्ये बांधले आहे.

    येथे गणपतीचा थाट पूर्णपणे वैभवशाली आहे. गणपतीची मूर्ती विलोभनीय आहे. रिद्धी सिध्दीही नेहेमी पाहायला मिळतात त्यापेक्षा वेगळ्या आहेत . गणपतीच्या दोन्ही बाजूंना मूषक जोडी, दोन बाजूंना लामणदिवे,अत्यंत देखणी प्रभावळ आणि राजेशाही चौरंग ही आणखी काही वैशिठ्ये ! गाभारा प्रशस्त आहे.

    त्यामानाने मंडप लहान आहे पण ८ खांब, त्यावरील विविध रूपातील गणेशमूर्ती, विविध दिवे आणि प्रवेशद्वारातील २ हत्ती इत्यादींमुळे तो खूप प्रसन्न आणि आकर्षक वाटतो. भविष्यात येथे येणाऱ्या भक्तांची संख्या अमाप वाढू शकते. त्यादृष्टीने मात्र मोठ्या वाहनांसाठी वाहनथांबा, शिस्तबद्ध दुकाने, प्रसाधनगृहे, थोडे रुंद रस्ते यांचे नियोजन आत्ताच करायला हवे.

    इतके सुंदर मंदिर आपण अवश्य पाहायला हवे.
    -- मकरंद करंदीकर

      April 13, 2017


  • बांगलादेशीं घुसखोरी झालेल्या राज्यांत ‘एनआरसी’ची प्रक्रिया राबवावी

    बांगलादेशी घुसखोरांनी पश्चिम बंगाल, आसामसह महाराष्ट्र-मुंबई, ठाण्यातही बस्तान बसवल्याचे अनेकदा उघड झाले आहे.केंद्र सरकारने जास्त घुसखोरी झालेल्या राज्यांत ‘एनआरसी’ची प्रक्रिया राबवावी, बांगलादेशी घुसखोरांना हुडकून काढावे आणि त्यांच्याविरोधात ठोस कारवाई करावी.

      October 1, 2019


  • उफराटा प्रवास!

    ‘असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय’, अशी वेदातील प्रार्थना आहे. असत्याकडून सत्याकडे, अंधकारातून प्रकाशाकडे, मृत्यूकडून अमरत्वाकडे आम्हाला घेऊन चल असा त्या प्रार्थनेचा ढोबळ अर्थ. वेदातील प्रार्थना असो, उपनिषदातील तत्त्वज्ञान असो, पुराणाचे सार असो किंवा परंपरेने चालत आलेले विचारप्रवाह असो, आमच्या पूर्वसुरींचे समस्त चिंतन मनुष्याच्या उन्नतीला एक निश्चित दिशा देणारे होते.

      October 2, 2005


  • सकारात्मक ऊर्जा देणारे गणपती निवास

    प्रत्येक व्यक्तीच्या मनात घराच्या बाबतीत एक स्वप्न ‘घर’ करून राहिलेलं असतं. घर लहान असो वा मोठे, स्वप्न खरे झाले तर त्याच्या मनाला शांतता व समाधान मिळून त्याला त्याचा आनंद मिळतो

      October 4, 2023