वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
तुमच्या गरजेनुसार योग्य कॉम्प्युटर कॉन्फिगरेशन (Computer Configuration) निवडण्यासाठी खालील मुद्दे लक्षात घ्या:
April 9, 2026
मतदान न करता राजकारन्याना नावे टेवने आणि पिच्चर न पाहता त्याची स्तुती करणे गैर.
मी दबंग पाहिला नाही.प्रोमोज पाहिले .प्रोमोज सुसह्य आहेत.थ्री इडियट्च्या उत्पन्नाचे उच्चांक मोडले.
आनंद झाला. खूप जणांनी दबंग ला शिव्या पण दिल्या. आमीरची स्तुती केली.दोन पिच्चरची तुलना केली.
एक जण दबंग ला म्हणतो 'लोक आजकाल कचरा पण विकत घेतात... '
काही जण म्हनतात आमीरच्या पिच्चरमधे समाजिक सन्देश असतो.दबंग मधे ते नाही .
बस्स , बस्स , बस्स !!!!!!!!!
फना , गजनी मधे समाजिक सन्देश होता का ?
थ्री इडियट्स आमीर खानचा होता का राजु हिराणी चा?
थ्री इडियट्स मधला आमीर खान खरेच ३५० कोटी कमावन्याएवडा अप्रतिम होता ?
तारे जमीन पर आमीर खानचा होता का अमोल गुप्ते चा?
रंग दे बसंती काय ५० कोटीच कमावन्याएवडा जेमतेम होता?
गझनी त असे काय होते जे दबंग मधे नसेल?
आमीर चा स्क्रीन प्रेजेन्स सलमान इतका रांगडा आणि कॅजुअल आहे का?
सलमान ला अॅक्टिंग येत नाहि का?
कीती स्टार हीरोंना अॅक्टिंग येते?
समाजिक सन्देश वाले सिनेमे आवड्तात तर मग वेन्सडे (नासीर असुन) , ब्लॅक फ्रायडे हाउस फुल्ल का होत नहित?
या प्रश्नांच्या उत्तरातच दबंग च्या उत्तूंग यशाचे कारण असावे.
दबंगला शुभेच्छा.
-- अविनाश
September 17, 2010
विठ्ठल विठ्ठल । भक्तांची माऊली ।माय ती साऊली । पांडुरंग ।।१।। पांडुरंगा भेटी । भक्त करी वारी ।हाती झेंडा धरी । विठ्ठलाचा ।।२।।
July 13, 2019
अम्ल रस हा उत्तम पाचक आहे. त्यामुळे उतारवयात होणाऱ्या मलावष्टंभ व इतर पचनविकारांवर रामबाण. आपल्याकडे पूर्वापार आलं-लिंबू पाचक बनविले जाते ते याचेच उदाहरण. अम्ल रसाची आणखी एक विशेषता म्हणजे, यामुळे एक प्रकारची तरतरी येऊन थकवा दूर होतो. सर्व सरबतं डोळ्यांसमोर आणा, म्हणजे सहज लक्षात येईल. पण याच्या अति सेवनामुळे मात्र स्नायू, यामध्ये शिथिलता येते, तसेच विविध त्वचारोगांचीही उत्पत्ती होते.
April 22, 2023
आपल्या गावात आणि शहरातही अनेकदा वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार बर्याचदा होत असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त होतात. वीजपुरवठा खंडित झाला की, आपण वीज वितरण कंपनीला दोष देऊन मोकळे होतो. वीज का गेली, का जाते, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत नसते. तसेच वीज जाते आणि येते, या मधल्या काळात काय घडते, हे जाणून घेण्याची गरज आहे.
June 18, 2019
अन्नमय आणि प्राणमय कोशा मध्ये वस्तुचे अथवा व्यक्तीचे स्मरण ठेवण्यास तिचे नाम पुन्हा पुन्हा आठवणे अतीशय उपयोगी पडते, म्हणून ज्या वैखरी वाणीने आपण दृष्ट्याशी व्यवहार करतो त्या वाणीने सारखे नाम घेणे हा भगवंताची आठवण ठेवण्याचा प्रथम उपाय आहे.
July 7, 2022
भगवंताच्या अलौकिक सौंदर्याचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, चमचमणाऱ्या रत्नांनी युक्त असणारी कर्ण कुंडले ज्यांनी धारण केलेली आहेत , अशा भगवान श्री विष्णूंना मी वंदन करतो.
October 6, 2020
प्रमेह हा मुख्य आजार. त्याच्या एकुण वीस उपप्रकारामधे एक म्हणजे मधुमेह हा आजार येतो. हा आजार होऊ नये यासाठी काय काय करू नये, (म्हणजे अपथ्य ) सांगितले आहे ते आपण पाहातोय.
व्यवहार आणि ग्रंथ यामधे किती अंतर आहे पहा. पथ्य आणि अपथ्य या शब्दांचे किती चुकीचे अर्थ वापरले जातात.
"मधुमेह एकदा झाला की साखरेचे पथ्य सुरू झाले." असे आपण म्हणतो. म्हणजे साखर बंद करावी लागणार असे आपल्याला सूचीत करायचे असते. खरंतर पथ्य म्हणजे खायला हरकत नाही, असा अर्थ होतो. आणि अपथ्य म्हणजे न चालणारे.
सगळं च उलटं चाललंय, म्हणतो ना मी, त्यातीलच हे एक !
तर पथ्य म्हणजे चालणारे
आणि अपथ्य म्हणजे न चालणारे.
मधुमेहात साखरेचे अपथ्य आहे.
त्यातील दूध आणि दही आपण पाहिले. म्हणजे दुध आणि दह्यापासून बनणारी अन्य सर्व गोड व्यंजने अपथ्यकर आहेत. पण दह्यापासून बनणारे ताक, घुसळल्यामुळे वर तरंगणारे लोणी, लोणी कढवल्यानंतर बनणारे साजूक तूप हे मधुमेहात अपथ्य नाही. तसेच गाईपासून मिळणारे मूत्र आणि शेण हे सुद्धा मधुमेहात पथ्यकर आहेत. हे लक्षात ठेवूया. सर्वसाधारणपणे असं म्हणायला हरकत नाही, की जसजसा अग्निचा संस्कार होत जातो, तसतसा पदार्थ पचायला हलका होत जातो.
स्थिरता आणि गतीमानता हे दोन गुण लक्षात घेतले की, अग्निचा विचार नीट करता येईल. जिथे गती तिथे अग्नी. गती म्हणजे वात. वायु हा अग्नीचा मित्र आहे. म्हणून फुंकर मारली की अग्निवृद्धी होते. बरोबर ना ! स्थिरता म्हणजे पृथ्वी महाभूत. अग्नीच्या विरोधी. अग्नी विझवण्यासाठी वाळू उपयोगी पडते. व्यवहारात जिथे अग्नी खूप असेल आणि तो कमी करायचा असेल तर अग्नीला मिळणारा वारा बंद करून, पृथ्वी महाभूत असलेली माती किंवा वाळु उपयोगी होते.हेच तत्व आरोग्याच्या बाबतीत शरीरात वापरून पहायचे.
प्रमेहामधे अग्नि बिघडलेला असतो. त्याचे बदललेले स्थान कुठे आहे ते ओळखून त्याला परत जागेवर आणून ठेवणे ही चिकित्सा.
आयुर्वेद समजून घेण्यासाठी ही महाभूते खूप उपयोगी पडतात. ही केवळ प्रतिके नाहीत तर व्यवहारात ती आपण वापरतदेखील असतो, पण आपल्या ते लक्षात येत नाही.
एखादी गोष्ट व्यवहारात अनेकदा आपण करीत असतो, पण त्याचा कार्यकारण भाव माहीती नसतो. त्याचे चिंतन मनन करणे, आणि तो शोधून काढणे, नंतर ती गोष्ट जाणीवपूर्वक करणे याला अभ्यास म्हणतात. अभ्यासाची एकदा सवय लागली की, नंतर कठीण गोष्टी समजायला सोप्या व्हायला लागतात. मग ग्रंथ आणि व्यवहार एकच आहेत असे समजायला लागते.
प्रमेह होण्याच्या मुख्य कारणामधे सर्वात प्रथम सांगितलेला शब्द आहे, आस्यासुखम्.
आसन सुख. म्हणजे बसून राहाण्यामधे खूप आनंद वाटायला लागणे. एकाच जागी बसून काम करायला आवडणे. हे स्थिरत्वाकडे जाणारे लक्षण आहे.हालचाली कमी करण्याकडे कल निर्माण होणे, आणि प्रत्यक्षात हालचाली कमी करणे, म्हणजे गतीच्या विरोधात काम करणे, म्हणजे अग्निच्या विरोधात काम करणे.म्हणजे रोगाच्या जवळ जाणे होय.
आळस हेच सुख आहे, असे वाटू लागणे म्हणजे प्रमेहाची सुरवात झाली असे खुशाल समजावे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
31.01.2017
January 31, 2017
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
August 15, 2018
बार्सिलोना तसं म्हणाल तर मुंबई सारखंच खूप मोठ्ठ आणि पसरलेलं Spain मधील एक शहर! त्यामुळे सहाजिकच अफाट लोकसंख्या आणि त्यातूनच निर्माण झालेली उत्कृष्ठ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (Public Transportation)!
February 17, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti