वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
नुकतीच बातमी वाचण्यांत आली की बॉम्ब स्फोटामधील तीन आरोपीना न्यायालयाने मृत्युदंडाची (फाशीची) शिक्षा सुनावली. एक विचार चक्र मनांत येऊन मी जे.जे. वैद्यकीय महाविद्यालयांतील वाचनालयांत गेलो. एका थोर जागतीक मान्यवर लेखकांचे पुस्तक न्यायवैद्यक शास्त्र Medical Jurisprudence घेतले. ते बराच वेळपर्यंत वाचले. मृत्युचे प्रकार Mode of death व त्याचे शरीरावर होणारे परिणाम वाचले. त्यावरच्या टिपणी लिहून घेतल्या.
October 17, 2012
अहंकार म्हणजे गर्व, गर्विष्ठपणा, स्वतःच्या श्रेष्ठत्वावर वाटणारा एक उन्मत भाव, एक वाईट स्वभाव, इतरांना कमी लेखणारे विचित्र वागणे. अहंकारामुळे आपण फक्त नातेसंबंध नाही तर आपल्यातली माणुसकी सुद्धा संपवतो. ही कथा आपल्याला शिकविते की कधीही गर्व करू नये. अहंकार बाळगू नये.
June 19, 2020
चांगल्या सवयी, चांगले विचार, चांगले संस्कार, चांगलं वळण हे विद्यार्थ्यांचं पुढील आयुष्य मनोहर करतं. केवळ भौतिक बाबतीत मनोहर नको, तर मानसिकतेतही मनोहर हवं. नाती जपणं ही मनोहरी अवस्था आहे. नाती दुरावली की मन उदास होतं. आपली मुलं परदेशात पैसा कमविण्यासाठी जातात हे मनोहर चित्र असलं तरीही पालकांना आपल्यापासून मुलं दुरावल्याची जाणीव उदास करते.
June 28, 2026
वयाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे नाती बदलतात. मग ती माणसांशी जुळलेली नाती असोत, अथवा वस्तू-वास्तूंशी. प्रत्येक नात्याचा स्वतंत्र विकासक्रम असतो. नातं जन्मतं, उमलतं आणि घडत राहतं. माणूस आणि घर यांचे संबंध घनिष्ट असतात. माणूस घराला घडवतो, घर माणसाला. घर म्हणजे केवळ खांबा भिंतींवर तोललेल्या छताछपरांची इमारत नसते. माणसांना निवारा देणारं ते विश्रांतिस्थान असतं.
July 14, 2023
उन्हाळा म्हटलं की डोळ्यासमोर दिसतो तो गारेगार बर्फाचा गोळा. त्याशिवाय उन्हाळा अपूर्णच वाटतो. काल रस्त्यावर बर्फाचा गोळा विकणारा आला होता. शेजारीन म्हटली, ” घ्यायचा का बर्फाचा गोळा ” ? क्षणभर मनात उत्तर आलं होतं लगेचच ” हो ” म्हणून !! पण मनाला आवर घालत म्हटलं , ” नको !! आता ते येतील इतक्यात. आणि त्यांना नाही आवडत रस्त्यावरचे गोळे किंवा कुल्फी घेतलेली !! ” शेजारीन म्हटली ते यायच्या आत घ्या पटकन खाऊन.
April 8, 2023
बातम्या : * दलितांवरील अत्याचार * स्त्रियांवरील अत्याचार
* स्त्रियांचे समाजातील unequal स्थान
संदर्भ : वृत्तपत्रें व इलेक्ट्रॉनिक मीडियांमधील विविध बातम्या .
• सामाजिक असमानतेच्या व अत्याचारांच्या विविध बातम्या वाचल्या-ऐकल्यानंतर , खरंच आपण २१व्या शतकात आहोत कां, असा मनाला प्रश्न पडतो. कुठे दलितांवर अत्याचार होताहेत, तर कुठे स्त्रियांवर ; तर अनेक मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश नाकारला जातोय. ( या , प्रवेश नाकारण्याबद्दल, व स्त्री-पुरुष असमानतेबद्दल मी आधी एक लेखही लिहिलेला आहे, जो वेबसाइटवर वाचतां येईल).
अशा सततच्या बातम्यांमुळे मनात अतिशय अस्वस्थता येते, आली आहे. म्हणून, ही पोटतिडीक, ही टिप्पणी.
• ध्यानात राहूं द्यावें की, आपण या प्रश्नाचा ऊहापोह, धार्मिक बाब म्हणून करणार नसून, एक महत्वाची सामाजिक बाब या अर्थानेंच करीत आहोत.
• तथाकथित ‘खालच्या’ जातींना ‘सापत्न’ वागणूक देतांना आपण Dignity of Labour चा विचार करत नाहींच ; पण आपण हाही विचार करत नाहीं की, या लोकांनी शतकानुशतकें समाजाला ज्या ‘सेवा’ (services) दिल्या, त्या जर दिल्या नसत्या, तर समाज सुचारु रूपानें चालूं शकला असता कां ? समाजाच्या एका महत्वाच्या भागाला आपण बाजूला ठेवतो, दूर लोटतो आहोत , याचें भान या समाजाला नाहीं कां ?
• बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मपरिवर्तन कां केलें, याचा सखोल विचार आपण कधी करणार ? सुदैवानें त्यांनी बौद्ध धर्मासारखा शांतिपूर्ण धर्म स्वीकारला. बरीच वर्षें मनन-चिंतन करून, राष्ट्राच्या ऐक्याचा विचार करून, त्यांनी हेतुत: हाच धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला, हें आपले भाग्यच ! पण या घटनेपासून आपण कांहीं शिकलो कां ? आपली ‘दकियानूसी’ वृत्ती बदलायचा प्रयत्न तरी केला कां? की आपले, ‘पहिले पाढे पंचावन्न’ ?
• आतां , सएमाजातील घटकांच्या असमानतापूर्ण वर्तणुकीला कंटाळून एका गावातील ३०० दलित कुटुंबें धर्मांतर करायचें ठरवत आहेत. त्यांना कसा दोष द्यायचा ? त्यांच्या स्वत:च्या धर्मातील तथाकथित ‘उच्चवर्णी’, त्यांच्यावर अत्याचार करून, त्यांना ‘खालचे’, दुय्यम ठरवून, त्यांचे न्याय्य अधिकार नाकारत आहेत. या ‘सो-कॉल्ड् उच्चवर्णीयांना’ हें कळत नाहीं की, मध्ययुगात असेच अनेक लोक परधर्मात गेले आहेत. दर वेळी त्यांच्यावर कुणी सक्ती केली असेलच असें नाहीं, दर वेळी धर्मांतरासाठी कोणी त्यांना लालूच दिली असेल असेंही नाहीं. शतकानुशतकें झालेल्या या धर्मांतराचें प्रमुख कारण, स्वधर्मांमधील लोकांची वर्तणूकच होती. याची अनेक उदाहरणें देतां येतील. जिना यांचे पूर्वज (आजोबाच) हिंदू होते, पण त्यांनी सुरूं केलेल्या धंद्यावरून त्याना ‘वाळीत’ टाकलें गेलें होतें ; त्यामुळे त्यांनी धर्म बदलला. नंतर त्यांना पश्चात्ताप झाला, व स्वधर्मात परत येण्याची त्यांची इच्छा होती ; परंतु समाजानें तें होऊं दिलें नाही. (ही सर्व माहिती, जिना यांच्यावरील पुस्तकात सहज उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी ती ज़रूर वाचावी ). या धर्मांतराचा, नंतरच्या काळात किती भयंकर राजकीय परिणाम झाला, हें आपण जाणतोच ! मात्र, यांतून आपला समाज कांहींच शिकत नाहीं, ही खेदाची गोष्ट आहे. सगळे परिणाम लगेत घडतही नाहींत, लागलीच दिसूनही येत नाहींत. मात्र, ते घडतात, तेव्हां कधी कधी फाऽर फाऽर उशीर झालेला असूं शकतो.
• हमीद दलवाई यांनी त्यांच्या लेखनात महत्वाचा मुद्दा मांडला आहे , तो हा की, आज मुस्लिमांमधील अनेक लोक केवळ लहान लहान धंदे करून जेमतेम पोट भरत आहेत. आणि खरं आहे, आपल्या सभोवताली, प्लंबर, विणकर, हातगाडी घेऊन जात असलेला भंगारवाला, फुटलेल्या काचा बसवणारा काचवाला, सायकलीवर चाक बसवून चाकू-सुर्यांना धार लावणारा, असे अनेक धंदे करणारे लोक मुस्लिम आहेत. हे सगळे लोक कांहीं इराण, तुर्कस्थान/ टर्की, अफगाणिस्तान वगैरे देशांमधून येथें आलेले नाहींत, तर ते या देशातील हिंदूंमधीलच विशिष्ट जातींचे लोक आहेत, ज्यांनी मध्ययुगात धर्मांतर केलेलें आहे ; आणि याला प्रमुख कारण अर्थातच हिंदूंमधील तत्कालीन लोकांचे वर्तनच आहे, यात संशय नाहीं.
• पुन्हां एकदा आठवण करून देतो की, येथें आपला दृष्टिकोन धार्मिक नसून फक्त सामाजिक आहे ; धर्माचा उल्लेख केवळ त्या अनुषंगानेंच आहे.
• धर्म ही गोष्ट असावी वा नसावी, एखाद्यानें धर्म मानावा किंवा मानूं नये, ही एक वेगळीच चर्चा आहे, तिच्यात आपण तुर्तास जात नाहीं आहोत. पण, कुठलाच धर्म perfect नाहीं, नसणारच ! मात्र, मुस्लिम धर्मात हिंदूंपेक्षा अधिक समानता practice केली झाते, हें मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलें आहे. मी शाळेत असतांना स्वत: पाहिलेलें आहे की, कांहीं तत्कालीन प्रसिद्ध फिल्मस्टार्सचे नातेवाईक आणि आमच्या हॉस्टेलमधील साधारण नोकर, हे रमज़ानचा रोज़ा एकाच दस्तरख़्वानवर बसून सोडत होते ! हिंदूंमध्ये, ज्ञानेश्वरकालीन संतमंडळ, संत एकनाथ, विठ्ठल रामजी शिंदे, स्वातंत्र्यवीर सावरकार, राजर्षि शाहू महाराज, विवध समाजसुधारक , अशा अनेकांनी प्रयत्न करूनही समता establish झालेली नाहीं, हें कटु असलें तरी सत्य आहे.
• कदाचित थोडेसें विषयांतर होईल. पण या संबंधात, स्वतंत्र्यवीर सावरकर यांची हिंदुत्वाची व्याख्या पहावी. दुर्दैवानें त्याबद्दल अनेक गैरसमज पसरवले गेले. पण ही व्याख्या मूलत: राजकीय-सामाजिक आहे , धार्मिक नाहीं. त्या दिशेनें समाजानें जर विचार केला असता, तर ‘ही जात - ती जात’ असा भेदभाव संपण्याच्या दिशेनें पाऊल पुढे पडलें असतें.
(यावरील माझा लेख वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्थात, हाही एका वेगळ्या चर्चेचा विषय आहे. आत्ता, फक्त प्रस्तुत विषयाच्या अनुषंगानें त्याचा उल्लेख केलेला आहे, इतकेंच ).
• आतां तर, ‘इलेक्टेड डेमोक्रेसी’च्या संदर्भात जातपातींच्या राजकारणाचें महत्व वाढतच आहे ! जातीपातींना आज ‘एकगठ्ठा मतांचा समूह’ असेंच बघितलें जात आहे. आणि, सरकारी फायदे मिळवण्यासाठी लोक, अमुक जातीला अमुकअमुक मागासवर्घीय फायदे मिळायला हवेत, यासाठी आंदोलनें करत आहेत. (त्याच्या योग्यायोग्यतेची चर्चा आपण तूर्तास करत नाहीं आहोत, पण - ) याचा अर्थ असा की, ‘मी भारतीय आहे’ ही भावना कमी महत्वाची ठरून, ‘मी अमुक अमुक जातीचा आहे’ ही गोष्ट priority घेते !
• स्त्रियांच्यावरील अत्याचार ही बाब पुरुषप्रधान संस्कृतीशी संबंधित आहे. हेंही मध्ययुगात वाढत्या प्रमाणात झालें. आजही सुशिक्षित स्त्रियांनाही या प्रॉबलेमला सामोरे जावें लागतें आहे (भारतातच नव्हे, तर पाश्चिमात्य देशांमध्येसुद्धा). ज्या लोकांनी हल्लीच, डेमॉक्रेटिक पार्टीच्या ‘नॅशनल कन्हेन्शन’मधील हिलरी क्लिंटन यांचें भाषण ऐकलें-वाचलें असेल, त्यांना हें कळलेंच असेल की, हिलरींनी सुद्धा या मुद्दयाचा, एक महत्वाचा मुद्दा म्हणून, परामर्श घेतलेला आहे. स्त्रियांना मिळणारी असमान वागणूक हिलरीना अस्वस्थ करते, व त्यासाठी बरेंच कांहीं करण्याचें आश्वासन त्या देतात.
• स्त्रियांना मंदिर-प्रवेश नाकारणारे लोक, त्यासाठी धर्म व परंपरा यांची ‘दुहाई’ देतात. ज्या परंपरा समाजातल्या ५०% भागाला, म्हणजे स्त्रियांना, असमान वर्तणूक देतात, त्या काय कामाच्या?
• ज़रा कल्पना करा, या असमानतेच्या सामाजिक वर्तनाला कंटाळून स्त्रियांच्या समूहांनी जर धर्म बदलायचा असें म्हटलें, तर संपूर्ण समाजातल्या घराघरात हाहा:कार उडेल ! समाजाचें नशीब थोर म्हणूनच केवळ, अजूनतरी स्त्रियांच्या ग्रूप्सनीं असला विचार केलेला नाहीं. पण, तसें उद्या घडणारच नाहीं, याची काय गॅरंटी ?
• दलित असो वा स्त्रिया, त्यांच्यावरील atrocities, समाजाला नुसतें समजावून कमी होतील काय ? तसें जर असतें, तर , समाजसुधारकांच्या प्रयत्नांनंतर संपूर्ण समाजच बदलून गेला नसता कां ? अर्थात, तसें प्रयत्न तर होतच रहायला हवेत, हें खरें आहे ; पण, ‘न-समजून-घेणार्यांसाठी’ कांहींतरी strict उपाय सरकारनें योजायला नकोत कां ?
• दलित, स्त्रिया किंवा अल्पवयीन मुलें यांच्यावर अत्याचार करणार्यांना कठोर शिक्षेची तरतूद सरकारनें केली पाहिजे. उदा. अमेरिकेत तर, अगदी आईवडीलसुद्धा जर आपल्या अल्पवयीन अपत्यांवर अत्याचार करत असले, तर त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊं शकते.
• भारतातही, असा शिक्षेची कांहीं तरतूद आहे, उदा. सासू-सासर्यांनी सुनेवर केलेले अत्याचार.
पण, हें जें कांहीं कायदे आहेत, तें कितीसें पुरेसें पडत आहेत ?
• यासाठी, पार्लमेंटनें नवीन कायदा करून, अशा गोष्टींसाठी –
- स्पेशल, ‘फास्ट कोर्टस्’ स्थापन करून , च्यातर्फे अशा केसेस चालवल्या जाव्यात
- नुसत्या atrocities च नाहीं, तर , अगदी मंदिर-प्रवेश नाकारणार्यांनासुद्धा सज्जड सज़ा ठेवावी, (जसें की ५ वर्षें सक्तमजुरी). Carrot & stick म्हणतात ना, त्यातील, इथें stick चा प्रयोग, किंवा धाक असल्याशिवाय अशा सामजिक सुधारणा होणारच नाहींत.( म्हणतात ना, ‘लातों के भूत बातों से नहीं मानते’ ).
- आजही कांहीं देशांमध्ये, हात तोडणें , रस्यात उभें करून दगडधोंडे फेकून मारणें अशा मध्ययुगीन शिक्षा प्रचारात आहेत. अशा मध्ययुगीन शिक्षांचा मी पुरस्कार करत आहे, असें कृपया कुणी समजूं नये. मात्र, अगदी , सक्तमजुरीच्या शिक्षेची भीती सुध्दा मोठें deterant नक्कीच ठरेल.
• पण, --- आणि , हा मोठा ‘पण’ आहे ---- , असा कायदा केला तर समाजाचा एक भाग सरकारवर खात्रीनें नाराज होणार, हें नक्की. मग, सरकार ही रिस्क घेईल काय ? त्यासाठी, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन, असा कायदा आणायला हवा.
पण आपल्या राजकीय पक्षांची one-up-manship पहातां, असें काहीं घडेल, ही आशा धरावी काय, हा मोठा प्रश्न आहे. म्हणजेच, अशा atrocities चालूंच रहाणार काय ?
म्हणे, २१वें शतक !! आपण कुठे आहोत ? अजूनही मध्ययुगातच आहोत ? आपण कुठे चाललो आहोत ? पुढे जाणें दूरच,पण हा समाज मागेमागें जात आहे काय ?
या प्रश्नांची उत्तरें शोधायला गेलें तर, हातात कांहींच fruitful लागत नाहीं , ही अतिशय खेदाची गोष्ट आहे.
• अखेरीस :
हा असमानतेचा ‘सिलसिला’ शतकानुशतकें चालत आलेला आहे. दुर्दैवानें, लोक अनेकदा short-sightedness च दाखवतात, आपल्या कृतींचे दूरगामी दुष्परिणाम त्याच्या ध्यानातच येत नाहींत; आणि थोडेफार ज़री आलेच, तरी ते त्याकडे दुर्लक्षच करतात.
पण, आपण हे सत्य विसरूं नये की, इतिहास कुणाला क्षमा करत नाहीं .
तेव्हां, इतिहासानें धडा शिकवण्यांआधी, आपणच ज़रा आपल्या मनाला विचारूं या ,
( एका प्रसिद्ध गीताला poaraphrase करून ), की -
‘ये कहाँ जा रहे हम , यूं ही अपनोंको मसलके ?’ ;
आणि, मनाला ही जाणीव करून देऊं या , की -
‘ये ज़माना बढ़ चलेगा , अब हमें ही कुचलके’ .
चला, कांहींतरी concrete करूं या, अजूनही वेळ गेलेली नाहीं !
-- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
August 3, 2016
मराठी माध्यमांच्या अनुदानित शाळांचे ‘कॉन्व्हेंट’ मध्ये रूपांतर करण्याला सरकारने परवानगी दिली आहे, तसे परिपत्रक राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी काढलेले आहे. डबघाईला आलेल्या मराठी अनुदानित शाळांच्या भौतिक साधनांचा आणि मनुष्यबळाचा वापर इंग्रजीच्या अट्टहासासाठी करण्याचा विचारपूर्वक निर्णय घेण्याऱ्या सरकारचे अभिनंदन करावे काय ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा हा छोटासा प्रयत्न.
June 22, 2020
मनाची ग्रहणशक्ती वाढवण्यासाठी ध्यान करणे खुप गरजेचे आहे. ध्यान करुनच मनाची ग्रहणभक्ती वाढते आणि ग्रहण भक्तीतुनच ग्रहण शक्ती प्राप्त होते. ग्रहणभक्ती वाढवण्यासाठी ग्रहणभक्तीध्यान खुप महत्वाचे आहे.
November 18, 2019
जगातली पहिली सेल्फी घेतला गेला होता तो १८३९ साली. अर्थात त्यावेळी सेल्फी हा शब्द रूढ झाला नव्हता. स्मार्टफोनचा जन्म होण्यापूर्वीही हातात कॅमेरा घेऊन स्वतःची छबी टिपण्याचा प्रयत्न अनेकांनी केला होता. उपलब्ध माहिती नुसार जगातील पहिली सेल्फी १८३९ घेतली गेला. फिलाडेल्फिया येथे एका दिव्यांच्या दुकानाबाहेर रॉबर्ट कॉर्नेलिअस यांनी ही सेल्फी घेतली होती.
June 22, 2021
तुळस ही हृदयरोग, उच्च रक्तदाब, कोलायटीस, दमा अशा अनेक रोगांवर गुणकारी आहे. आयुर्वेदाप्रमाणे तुळस ही कफहर, थंडीतापात ज्वरहर, अरुची, जंत, विष, कुष्ठ, मळमळ यांचा नाश करणारी पण उष्ण आणि पित्तकारक आहे.
तुळशीची पाने दातांखाली धरल्यास रक्त येणे थांबून हिरड्यांची सूज कमी होते.
विड्याच्या म्हणजे नागवेलीच्या पानासारखे श्रीलंकेत तुळशीचे पान कात, सुपारी घालून खातात, त्याने तोंडाचे, घशाचे विकार होत नाहीत. मूत्ररोग, पुरुषांचे रोग, उष्णतेचे विकार यामध्ये तुळशीचे बी अत्यंत उपयोगी आहे.
पुरुषाच्या काही विकारात तुळशीचे मूळ देखील अत्यंत उपयुक्त आहे. तुळशीचे बी वापरताना साधारणपणे रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी हे पाणी गाळून टाकून हे बुळबुळीत झालेले बी दुधात साखरे सहित मिसळून घेतल्याने उष्णतेचे विकार बरे होतात.
स्त्रियांच्या विकाराताही तुळशीचे अनेक उपयोग आहेत. गरम पाण्यात लिंबाचा रस, अथवा आल्याचा रस, मुठभर तुळशीची पाने आणि मुठभर पुदिन्याची पाने या सर्वांची वाफ चेहरयावर घेतल्यास चेहऱ्यावरील वांग, काळे डाग वगैरे जाण्यास मदत होते. अगदी महत्वाचे म्हणजे तुळशीच्या मूळ आणि खोडाच्या उगाळून केलेल्या लेपाच्या गंधाने लेपण कपाळावर केल्यास जेनेटिक रोग, आनुवंशिक रोग बरे होऊ शकतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
January 2, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti