वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पूर्वीच्या काळात चार आण्याला आगपेटी मिळायची. अजूनही ती मिळते पण आता तिचा वापर फारसा होत नाही, कारण घरोघरी गॅस पेटवण्यासाठी आपण गॅस लायटरचा वापर करतो.
February 4, 2023
महर्षी योगी अरविंदांच्या समकालीन वासुदेव बळवंत फडके होते. दोघांनाही देशाच्या पारतंत्र्याबद्दल अतीव दुःख होते. पण योगी अरविंदांना झालेल्या गुरु आज्ञेप्रमाणे स्वातंत्र्य मिळायला अजून अवकाश असल्याने इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र बंड पुकारण्याची ही योग्य वेळ नाही, हे जाणून महर्षींनी शस्त्र त्याग केला आणि स्वतःची साधना वाढवली.
January 29, 2018
श्रीविद्यां शिववामभागनिलयां ह्रींकारमन्त्रोज्ज्वलां
श्रीचक्राङ्कित बिन्दुमध्यवसतिं श्रीमत्सभानायकीम् ।
श्रीमत्षण्मुखविघ्नराजजननीं श्रीमज्जगन्मोहिनीं
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ ३॥
श्रीविद्यां- आई जगदंबेच्या तात्त्विक स्वरूपाचे निरूपण करणाऱ्या शास्त्राला श्रीविद्या असे म्हणतात.
शिववामभागनिलयां- भगवान शंकरांच्या अर्ध्या डाव्या भागामध्ये निवास करणारी.
स्त्री आणि पुरुषाच्या शरीराचा विचार करताना शास्त्रात पुरुषाचे उजवे तर स्त्रीचे डावे अंग पवित्र स्वरूपात वर्णन केले आहे. पुरुष सामान्यतः बुद्धिप्रधान असतो तर स्त्री सामान्यत: भावनाप्रधान.
अर्धनारीनटेश्वर स्वरूपात उजवे अंग भगवान शंकरांचे तर डावे अंग आई जगदंबेचे असते. दोघांचाही पवित्र भागाचे एकत्रीकरण. परमपवित्र असे हे स्वरूप.
ह्रींकारमन्त्रोज्ज्वलां- ह्रीं या मंत्राने प्रकाशित असणारी. त्या स्वरूपात विश्वाला मार्गदर्शन करणारी. त्याच्या आधारे साधकांना दर्शन देणारी.
श्रीचक्राङ्कित बिन्दुमध्यवसतिं- श्रीयंत्र याच्या मध्यभागी असणाऱ्या बिंदूवर निवास करणारी, श्रीमत्सभानायकीम् - श्री म्हणजे वैभव. त्याने युक्त असल्यामुळे भगवंताला श्रीमत्, श्रीमान असे म्हणतात. त्यांची सभा अर्थात हे संपूर्ण विश्व. या जगाची नायिका ती श्रीमत्सभानायकी.
श्रीमत्षण्मुखविघ्नराजजननीं- सहा मुख असल्यामुळे त्यांना षण्मुख असे म्हणतात ते कार्तिकेय, स्कंद. विनायक अर्थात भगवान शंकर पार्वती च्या घरी झालेले श्री गणेश अवतार. यांची जननी.माता.
श्रीमज्जगन्मोहिनीं- संपूर्ण जगाला आकर्षित करणाऱ्या,
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् - कारुण्याचा जणू काही महासागर असणाऱ्या, आई जगदंबा मीनाक्षीला मी सतत वंदन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 12, 2020
आताशा जाहिराती ह्या भावनिक आवाहन करताना दिसतात. बऱ्याचदा कळतच नाही नेमके काय सांगायचेय. नुकतीच एक जाहिरात पाहिली वृद्ध आजी आपल्या नातीला उचलून घेताना अवघडते, आणि मग मुलगी आपल्याला aware करते की वेळीच कॅल्शिअम supplements चालू करा म्हणजे म्हतारपणात आपल्याला सांधेदुखी होणार नाही......हे आणि अशा अनेक प्रकारचे भावनिक आवाहन आणि osteoporosis चा बागुलबुवा आपली बुद्धी गहाण ठेवण्यास मदत करतात.
हाडांच्या स्वास्थ्यासाठी एकच एक गोष्ट बिंबवली जाते ती म्हणजे calcium!! जन्माला आलेले तान्हे मुल असो अथवा गरोदर बाई ,बाळंत झालेली बाई आणि ४० च्या टप्प्यातील बाई, किंवा साठीच्या घरातील वृद्ध स्त्री या सगळ्यांना calcium supplements साठी अत्यंत गरजू म्हणून ठरवले जाते. Porous म्हणजेच हाडे आतून पोकळ होणे,कोरडी पडणे त्यामुळे सहजच तुटणे अथवा त्यांचे कार्य क्षीण होणे ! हे सगळे कशामुळे फक्त कॅल्शिअम कमतरतेमुळे?? याच्या जोडीला मग कॅल्शिअम शरीरात शोषून घेणारा विटामिन D सुद्धा कमी झालाय म्हणून त्याचेही supplement दिले जाते, अगदी लहान मुलांपासून मोठ्यान पर्यंत !!
आता वास्तव बघुयात ........
शरीराची एक खूप समर्पक व्याख्या आहे, झिजते ते शरीर......एका ठराविक वयोमर्यादेनंतर शरीर झिजत जाणारच, निसर्गाचा नियमच आहे तो. या झिजत जाणाऱ्या शरीराची need फक्त कॅल्शिअम च असते का? आणि वाढीच्या महत्वाच्या टप्प्यातही फक्त ca च हवे असते का??? आणि गमतीचा भाग म्हणजे अशा प्रकारची supplements घेऊनही कुणाला काही फायदा होत नाही. सांधे दुखायचे ते दुखतातच आणि हाडे मोडायची ती मोडतातच !!!
उसने घेतलेले हे ca पोहोचते का हाडांपर्यंत ?? रक्तात त्याची पातळी वाढलेली दिसते फक्त आणि मग आपल्या मनाला समाधान वाटते की वाह वाढले आपले कॅल्शिअम.!!! आयुर्वेदिक कॅल्शिअम वगैरे सुद्धा एक myth आहे. मुळात या शास्त्राचे सिद्धांताच वेगळे आहेत.आमच्या कुठल्याही ग्रंथात कॅलशिअम चा उल्लेख नाही. मग हाडांचे स्वास्थ्य कळलेच नाही आयुर्वेदाला असे वाटू शकेल पण सांध्यांच्या अथवा हाडांच्या तक्रारी एक वैद्य जितक्या जास्त चांगल्या दूर करू शकतो तितके कुणीच नाही !!! कारण आयुर्वेद शास्त्र मुलभूत सिद्धांतांवर काम करणारे शास्त्र आहे......
नुकत्याच झालेल्या एका American research मध्ये असे निष्कर्षास आले की “theory of Ca supplement improving bone health is a myth “ अमेरिकेने सांगितलेय म्हणजे मग विश्वास ठेवायला हरकत नाही असा ट्रेंड असल्यामुळे मुद्दाम उल्लेख केला . आणि गमतीचा भाग म्हणजे US,CANADA या सारख्या highest calcium supplement घेणाऱ्या देशात Osteoporosis चे प्रमाण सर्वात जास्त आहे ( आहे न गम्मत ,पण हे कटू सत्य आहे).
तुम्ही जे calcium supplement घेत आहात, ते Coral Ca, Oyster Shell Ca, Calcium Citrate, or Calcium Carbonate यापैकी कुठलेही असो, त्याचे आपल्या शरीरात metabolism नीट होत नाही आणि वेगवेगळ्या soft tissue मध्ये ते साचून राहते ( deposition).असे साचून राहिलेले उसने घेतलेले कॅल्शिअम मग urine stone आणि वेगवेगळे blockages तयार करण्याच्या कामी येते.
खरी काळजी घ्यायचिये आपल्या हाडांची ??
या सांगाड्यावर आपला संपूर्ण देह उभा आहे. घेतलेल्या अन्नापासून हाडांचे पोषण टप्प्याटप्प्याने होणार आहे. त्यामुळे अन्नाचे परिणमन योग्य होतेय की नाही हे बघणे आवश्यक आहे. हाडांमध्ये कुठेही कोरडेपणा येणार नाही याची काळजी घ्या.योग्य व्यायाम केल्याने मांस अथवा muscles मजबूत होतात आणि हाडांना मजबूत करतात. त्यामुळे हाडांमध्ये पोकळपणा येत नाही. घरी बनवलेले साजूक तूप, थंडीत आईने केलेले डिंकाचे लाडू असा पोषक आहार हाडांना मजबूत ठेवते. रात्री ची नियमित जागरणे, सतत चिंता करणे, सतत स्ट्रेस खाली राहणे तुमच्या शरीरातील स्निग्धता कमी करतात. स्निग्धता कमी झाल्याने शरीरातील हाडेच नाही तर सर्वच घटकांची झीज होते. अगदीच जागरूकतेने निसर्गाकडे पहिले तर ओले लाकूड सहजासहजी तुटत नाही आणि कोरडे लाकूड मात्र पटकन मोडते.......
.गर्भिणी मातेने जर परिपूर्ण स्निग्धता युक्त आहार घेतला ,आणि प्रसूती झाल्यानंतर सुद्धा आहारातून डिंक खाणे, साजूक तूप, खाण्यात शुद्ध तिळाचे तेल, नियमित अभ्यंग या गोष्टी तुमच्या ,आणि तुमच्या बाळाच्या हाडांना खऱ्या अर्थाने सुदृढ बनवतात.एकदा का तुम्ही गर्भिणी झालात की आयर्न आणि कॅल्शिअम ९ महिन्याचा सोबती होतो आणि अर्थात बालान्तपणानंतर ही ! आई आणि बाळाच्या शरीरात फक्त हे दोनच घटक असतात??? यांचीच वाढ होणे गरजेचे असते ?? आणि तीही अशीच supplement घेऊन???
म्हणून Calcium ची तपासणी करून ते कमी झालाय म्हणून उगाचच supplement घेण्यापेक्षा हाडांना सुदृढता द्या. उद्या असेही होईल की इतर प्रगत(?) देशांना अजून काही दिवसानी हाडांचे खरे स्वास्थ्य कळेल आणि आपलीच philosophy ते आपल्यालाच सांगतील आणि तेव्हा तुम्ही म्हणाल हे तर आमचे Ancient Wisdom !!!!!
So wake up think logically and follow ancient wisdom!!!
- वैद्य ज्योत्स्ना पेठकर©
March 12, 2017
भगवान श्रीविष्णूंच्या चरणतलाचे वर्णन केल्यानंतर आता आचार्यश्री त्या चरणाला असणाऱ्या अनुपमेय अंगुलींचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,
December 18, 2020
लाळघोटेपणाचे पालन (किंवा हलकीसलकी कामे करण्याची रीत), सततचा खोटारडेपणा, सदैव वितंडवादाची सवय, इतरांबद्दल नित्य वाईट विचार, अशा माझ्या गुणसमुच्चयाची ख्याती ऐकून ऐकून तू सोडून दुसरे कोणी क्षणभर तरी माझे तोंड पाहील काय?
February 27, 2020
हे व्रत सौभाग्य व समृद्धीसाठी आणि संतानप्राप्तीसाठी करण्यात येते. या व्रता दरम्यान, सूर्य, सूर्यपुत्र यम व त्याची बहिण षष्टी हिचे पूजन केले जाते.
November 10, 2021
विश्व शब्दाचा अर्थ आहे पसरलेले. या अनंत कोटी ब्रह्मांडाच्या पसाऱ्याचे स्वामी असल्यामुळे भगवंताला विश्वनाथ असे म्हणतात.
August 7, 2020
…हे पुत्ररत्न पुढे जाऊन भारतातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आणि कॅरिबींच्या भूमीत ‘सार्डीमॅन’ म्हणून प्रसिद्धीस आले. (सार्डीन हा एक माशाचा आणि सागरी खाद्याचा प्रकार आहे – गोव्याच्या भूमीलाही ‘सार्डीमॅन’ चपखलपणे लागू होते!)
August 7, 2010
हिमोग्लोबिनमधला हिम हा भाग फुफ्फुसातील ऑक्सिजनचे परिवर्तन ऑक्सिहिमोग्लोबिनमध्ये करतो. उतीमध्ये पोहोचल्यावर ऑक्सिजनचा दाब जिथे कमी असेल व कार्बनडाय ऑक्साईडचा दाब वाढला असेल तिथून तो ऑक्सिजनबरोबर मुक्तक होतो. त्यानंतर कार्बनडाय ऑक्साईडबरोबर संयोग होऊन फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो व कार्बनडाय ऑक्साईड वेगळा होतो आणि उच्छ्वासाद्वारे शरीराबाहेर पडतो. हिमोग्लोबिनमार्फत ऑक्सिजन घेणे आणि सोडणे ही प्रक्रिया सतत सुरू असते.
बोनमॅरोमधील रंगपेशींना लोह आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणारे रंगद्रव्य म्हणजे हिमोग्लोबिन. याचा रंग लाल असतो. हिमोग्लोबिन म्हणजे प्रथिनांचे एक जटील रूप आहे. ज्यामध्ये 96 टक्के ग्लोबिन आणि 4 टक्के हिम असते.
हिमोग्लोबिनचे कार्य
फुफ्फुसांतून उतींना ऑक्सिजन पुरवणे आणि उतींमधून कार्बनडाय ऑक्साईड फुफ्फुसामध्ये पोहोचवणे हे हिमोग्लोबिनचे महत्त्वाचे कार्य आहे. हिमोग्लोबिनमधला हिम हा भाग फुफ्फुसातील ऑक्सिजनचे परिवर्तन ऑक्सिहिमोग्लोबिनमध्ये करते. उतीमध्ये हे ऑक्सिहिमोग्लोबिन पोचल्यावर ऑक्सिजनचा दाब जिथे कमी असेल आणि कार्बनडाय ऑक्साईडचा दाब वाढला असेल तिथून ऑक्सिजन मुक्त होतो. त्यानंतर कार्बनडाय ऑक्साईडबरोबर संयोग होऊन फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो त्यानंतर कार्बनडाय ऑक्साईड वेगळा होतो आणि उच्छ्वासाद्वारे शरीराबाहेर पडतो. हिमोग्लोबिनमार्फत ऑक्सिजन घेणे व सोडणे ही प्रक्रिया सतत सुरू असते.
हिमोग्लोबिनशी निगडित समस्या
सामान्यपणे रक्तागल्पता, पोषण कमी, रक्त.वाहिन्यांच्या समस्या, ट्यूमर आदी समस्या हिमोग्लोबिनच्या पातळीशी निगडित असतात.
रक्ता्ल्पता हा हिमोग्लोबिनशी निगडित रोग सामान्यपणे पाहायला मिळतो.
रक्ता्मधील हिमोग्लोबिनचे प्रमाण
पुरुष : 14 ते 17 ग्रॅम प्रति 100 मिली
स्त्री : 13 ते 15 ग्रॅम प्रति 100 मिली
लहान मुले : 14 ते 20 ग्रॅम प्रति 100 मिली
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी दिवसाकाठी एक सफरचंद खाल्ल्यास हिमोग्लोबिनचे प्रमाण कायम राहते. लीची हे फळ आरोग्यास अतिशय लाभदायक आहे. लीचीमध्ये बीटा कॅरोटीन, राईबोफ्लेबिन, नियासीन आणि फॉलिक अॅ सिड किंवा ‘बी’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तनपेशी वाढतात तसेच पचनही सुलभ होते. लाल रक्तबपेशींच्या वाढीसाठी ही जीवनसत्त्वे शरीरास मिळणे अत्यावश्यक आहेत.
आहारात बीटाचा समावेश अवश्य करावा त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते. त्यात फॉलिक अॅासिड, आयर्न, तंतुमय पदार्थ आणि पोटॅशिअमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लाल रक्त पेशींची संख्या वाढते. त्याशिवाय डाळिंबामध्येही लोह आणि कॅल्शियमसह प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि तंतूमय पदार्थ यांचे प्रमाण जास्त असते. घरात वापरला जाणार गूळ हादेखील हिमोग्लोबिन वाढवण्याचा उत्तम उपाय आहे. गुळामध्ये लोह आणि फॉलिक अॅळसिडसह इतरही ‘बी’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लाल रक्त पेशींचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढते. नियमित व्यायामामुळे शरीर स्वतःच हिमोग्लोबिनची निर्मिती करते. कॉफी, चहा, कोकाकोला, वाईन, बीअर यांच्यामुळे शरीरात लोह शोषण्याचे प्रमाण कमी होते. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल तर या पदार्थांचे सेवन कमी करा. ‘क’ जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर हिमोग्लोबिनची पातळी खालावू शकते. कारण ‘सी’ जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर लोह शोषले जात नाही. त्यामुळे ‘सी’ जीवनसत्त्व असणाऱे पदार्थ खाल्ल्यास हिमोग्लोबिनच्या पातळीत वाढ होते. आपल्या आहारात पोषण तत्त्वांची कमतरता असल्यास हिमोग्लोबिनच्या पातळीत झपाट्याने घट होते. त्यासाठी प्रथिने आणि लोह हे घटक असणार्याा पदार्थांचे सेवन करावे. अंडे, डाळ, ज्यूस यांचे नियमित सेवन केल्यास रक्तातल्पता कमी होते. धूम्रपान आणि दारू पिणे या गोष्टींपासून दूर राहिल्यास हिमोग्लोबिनची पातळी राखता येते. सकाळच्या ताज्या स्वच्छ हवेत व्यायाम केल्यासही आरोग्य चांगले राहते. वजनाच्या प्रमाणात माणसाच्या शरीरात लोहाचे प्रमाण हे तीन ते पाच ग्रॅम असते; पण हे प्रमाण कमी झाले तर शरीराला हिमोग्लोबिनची कमतरता भासते. त्यामुळे शरीरातील पेशींना मिळणारा ऑक्सिजन कमी होतो त्यामुळे शरीराराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे व्यक्तीा अॅसनिमियाग्रस्त होते. त्याशिवाय बी-12 जीवनसत्त्वाची कमतरता आणि फॉलिक अॅुसिडची कमतरता असल्यासही व्यक्तीम अॅतनिमियाग्रस्त होते.
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अॅानिमियाचे प्रमाण जास्त असते. लवकर थकवा येणे, चक्कतर येणे, त्वचा पिवळी पडणे, सततची डोकेदुखी ही अॅ निमियाची लक्षणे असतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. डॉ. रोहिणी भगत
January 11, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti