(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी -भाग १

    शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये बघीतली असता काही मुलभूत फरक आपणाला दिसले. अगदीच एकदोन अपवाद सोडले तर कोणीही प्राणी निसर्गदत्त नियम मोडत नाहीत, असे लक्षात येते.

    या दोन प्रकारात माणूस कुठे बसतो ? हा प्रश्न आहे.

    काही जण समजत होते, माणूस शाकाहारी.
    काही जण समजत होते, माणूस मांसाहारी. काही मध्यम मार्गी मिश्राहारी या प्रकाराला चिकटून होते. पण "त्याच्या" नियमानुसार, ना माणूस शाकाहारी ना मांसाहारी ना मिश्राहारी.

    मिश्राहारी ही अगदी सोयीस्कर पळवाट झाली.
    म्हणजे उपवासाच्या दिवशी फळाहार पण करायचा आणि वडे भजी पण खायची. तसे झाले.

    त्याच्या डिक्शनरीमधे मिश्राहारी हा हायब्रीड शब्दच नाही.

    माणसाची वैशिष्ट्ये बघूया. म्हणजे त्याला अपेक्षित असलेले माणसाचे नियम आपोआप समजून येतील. .

    शाकाहारी प्रमाणेच पाणी ओठानेच पितो, जीभेने चाटत बसत नाही.

    समुहाने शांतपणे एकमेकांवर डूक न धरता जेवतो.

    रोज आंघोळ करतो. पाण्याची आवड आहे.

    अंगाला घाम येतो आणि शरीराचे तापमान संतुलीत ठेवायला मदतच होते.

    जेवताना अगदी सावकाश जेवतो. मांसाहारी प्राण्यांप्रमाणे वचावचा किंवा शाकाहारी प्राण्यांप्रमाणे भराभरा जेवत नाही.
    खाल्लेले अन्न पुनः पचनासाठी परत तोंडात आणत नाही. रवंथ करीत नाही.

    तोंडातील लाळेचे रासायनिक पृथक्करण केले असता, शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांपेक्षा वेगळे दिसते. आतड्यांची रचना, लांबी पण वेगळीच असते.

    मांसाहारी प्रमाणे माणसाची नखे आत बाहेर करता येत नाही. शाकाहारी प्रमाणे स्थिर आहेत. धारदार टोकदार नाहीत. त्यामुळे नखांनी शिकार करता येत नाही.
    शिकार करण्यासाठी वेगळ्या साधनांचा वापर करावा लागतो. एवढेच नव्हे तर समोरचे मांस खाण्यासाठी भाजणे, जाळणे, तळणे, शिजवणे इ.इ. वेगळ्या संस्काराची आवश्यकता पडते. खाण्यासाठी सुद्धा काटे चमचे सुऱ्या घेऊन जणुकाही लुटुपुटुचे आभासी युद्ध करावे लागते.

    शिवाजी महाराजांना अफजल्ल्याचे पोट फाडण्यासाठी वेगळी वाघनखे वापरावी लागली, आणि हिरण्यकश्यपूला ठार मारण्यासाठी प्रत्यक्ष भगवंताना देखील सिंहनखे धारण करावी लागली. त्यासाठी मानवरूप सोडून नरसिंह अवतार घ्यावा लागला. पण भगवंतांनी पण नियम नाही मोडला.

    इथे प्रत्येकाचे नियम वेगळे. ज्याला जो नियम घालून दिला आहे, तोच नियम प्रत्येकाने पाळावा.

    आणि नियम मोडला तर शिक्षा ही होणारच.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    1.10.2016

      October 1, 2016


  • भाषा, उच्चार आणि बहुभाषिकता

    उच्चाराच्या संदर्भात एका भारतीय व्यावसायिकाची व्यथा: उच्चार हे ज्ञानाचे निकष आहेत का?

      July 29, 2026


  • गाभारा 

    पुस्तकाच्या सुंदरशा पण स्वप्नाळू अशा जगात जगणे म्हणजे स्वप्न पाहण्याचे सार्थकच. कधी कधी जिवलग माणसाजवळ सुध्दा ज्या गोष्टी मन उघड करून बोलता येत नाहीत. त्या या स्वप्नातील जगात अगदी सहजच उलगड़ल्या जातात.

      February 12, 2019


  • जागतिक मुद्रणदिन

    मुद्रण कलेचा जनक असे ज्याला संबोधले जाते तो योहानेस गुटेनबर्ग, त्यांचा जन्मदिन म्हणजे मुद्रण दिन होय… इसवी सनानंतरच्या दुसऱ्या शतकात चीनी लोकांनी मुद्रणाची पद्धत शोधली. त्या पद्धतीत लागणारी उपकरणे म्हणजे कागद, शाई आणि मुद्रणप्रति मुद्रण प्रतिमा ही कोरून तयार केलेल्या पृष्ठाची असे. त्या काळात काही मजकूर (बौद्ध धर्मातील काही विचार) संगमरवरी (दगडी) खांबावर कोरून ठेवलेले असत

      March 1, 2024


  • डिसेंबर ३१ : एल शिवरामकृष्णन

    एल शिवरामकृष्णन आणि भारताचे सर्वात लहान कसोटीपदार्पणवीर

      December 31, 2010


  • आपल्या हृदयाची काळजी कशी घ्याल

    आपल्या हृदयाची काळजी कशी घ्याल

    हृदय शरीराचा अतिशय महत्त्वाचा अवयव. विशिष्ट मांसाने बनलेला. त्याला शुद्ध रक्तपुरवठा करणारे स्वत:चे जाळे असते. या रक्तवाहिन्यांच्या जाळय़ामधून हृदयास साखर, प्राणवायू व इतर आवश्यक घटक प्रत्येक भागात पोहोचतात. ज्या वेळी या रक्तवाहिन्यांची रुंदी कमी होते किंवा पूर्णपणे बंद होते त्या वेळी हृदयाच्या इतर भागात शुद्ध रक्ताचा पुरवठा होत नाही व हृदयाघात घडतो.

      August 14, 2019


  • युरोप ऑन रेल (युरेल) आणि युरो स्टार – भाग ३

    स्वित्झर्लंडला जाणारी पुढील गाडी लिऑन या दुसऱ्या स्टेशनवरून सुटणारी असल्याने संध्याकाळच्या भर गर्दीत ट्यूबनं पॅरिस नॉर्ड येथून सर्व मोठ्या बॅग्ज नेण्यासाठी महा कसरत करावी लागली. मुंबईत याबाबतीत विचार करणंसुद्धा शक्य नाही, परंतु या देशात गाडीतून उतरणं फारच सोपं होतं. लिऑन स्टेशनला अनेक प्लॅटफॉर्मूस, त्यातही इन्डिकेटरवरील गाड्यांची नावं फ्रेंच भाषेत असल्याने आम्हाला ती नीटपणे वाचता येत नव्हती. प्लॅटफॉर्मवर भरपूर गर्दी, शेवटी पॅरिस-जिनिव्हा गाडीचा प्लॅटफॉर्म मिळाला. या गाडीला युरोपातील अनेक देशाच्या महत्त्वाच्या शहरांचे डबे लागलेले होते. त्यातील एका डब्यावर पाटी होती जिनोवा. हे तर इटलीतील प्रसिद्ध नाव. परंतु आमची वाट वेगळी होती. त्यामुळे पुन्हा पुन्हा खात्री करून जिनिव्हा ह्या स्वित्झर्लंडमधील महत्त्वाच्या ठिकाणी जाणाऱ्या जिनोव्हा या डब्यात अखेरीस स्थानापन्न झालो. अशा गाड्यांत बसताना फार काळजी घ्यावी लागते, कारण मध्यरात्री तुमचा डबा अलगदपणे बाजूला केला जातो व दुसऱ्या गाडीला जोडला जातो. सकाळी उठाल आणि बघाल तर दुसऱ्याच देशात असाल. गाडीला जरी गर्दी होती, तरी आमचा रुबाब होता. आम्ही फर्स्टक्लासचे पास होल्डर, त्यामुळे डबा प्रशस्त. अगदी पाय पसरून झोपण्यासारखी मऊ मऊ सीट. गाडी सुसाट वेगाने रात्रभर पळत होती, तरी पण मध्यरात्री उठवून व्हिसा मात्र बघितला जात होता. त्या व्हिसावरील छप्पा बरोबर नसेल तर तुमची खैर नाही!

    सकाळी जाग आली आणि स्वच्छ काचेच्या भव्य खिडकीतून स्वित्झर्लंडच्या स्वर्गभूमीचं दर्शन झाले. हिरव्यागार वेगळ्या वेगळ्या छटांमुळे मोहून टाकणाऱ्या पर्वतरांगा. त्यांच्यावरील हिमाच्छादित शिखरांचं दर्शन झाल्यावर मनात आनंदाची कारंजी थुईथुई नाचू लागली. स्वित्झर्लंडमधील प्रवेशच एका निसर्गरम्य प्रदेशात आल्याची जाणीव करून देत होता. गाडीचा वेग जरी तुफान वाटला, तरी पोटातील पाणी जरासुद्धा हलत नव्हतं. जिनिव्हा स्टेशन कोणालाही प्रेमात पाडणारं आहे. स्टेशनवर उतरताच सुरेल संगीताचे मंद सूर कानांवर पडत होते. आता पुढील चार दिवस येथून सुटणाऱ्या गाड्यांमधून संपूर्ण स्वित्झर्लंडची सहल होणार होती.

    युरोपमधील रेल्वे प्रवासाची एक गंमत म्हणजे वाटेत येणारं स्टेशन फार मोठं असेल, तर प्रशस्त प्लॅटफॉर्मवर गाडी शिरते आणि लगेचच पुढचं इंजिन सुटतं आणि दुसऱ्या बाजूस नवीन इंजिन लागतं. गाडीचा प्रवास आता विरुद्ध दिशेने होतो. विशेष म्हणजे हे सर्व सव्यापसव्य वॉकी टॉकीवर काही मिनिटांत पुरं होतं. प्रवाशांची एकंदर संख्या तुलनेनं फारच कमी असते व तेथील डब्यांचे दरवाजे बंद करण्यासाठी कर्मचारी असतात. ती व्यवस्था पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही. रेल्वेने संपूर्ण स्वित्झर्लंड पाहण्याचं नियोजन आम्ही मुंबईतच केलं होतं. त्याबरहुकूम त्या त्या गाड्या मिळत होत्या. आमचा सखोल अभ्यास कामी आला होता. दिवसाचे १५/१५ तास आम्ही गाडीतून प्रवास करून रात्री झोपण्यापुरते 'पेन्शॉन' मध्ये राहत होतो. वयस्कर जोडपी आपल्या घरांतील एखादी खोली प्रवाशांना उपलब्ध करून देत असतात. त्या जागांना 'पेन्शॉन' म्हणतात.

    आमच्या रेल्वेप्रवासनियोजनात स्वित्झर्लंडला सर्वांत जास्त महत्त्व होतं. या देशातला पहिला मोठा प्रवास जिनिव्हा-स्पिटझ-धुन सरोवर-बर्न- जिनिव्हा रेल्वे ते बोट-ते रेल्वे असा तब्बल पाच तासांचा होता. त्यातही तो युरेल पासमधील नियमात बसणारा असल्यामुळे पैशांची कटकट नव्हती. हा मार्ग म्हणजे निसर्गाच्या विविध रूपांची सतत बदलणारी उधळण होती. आकाशाला भिडणारी आल्प्स पर्वताची हिमशिखरं, संथ, नितळ-निळ्या पाण्याची विशाल सरोवरं, क्षितिजापर्यंत पसरलेली हिरवीगार शेतं, त्यांत बांधलेली आखीव-रेखीव टुमदार घरं, मध्यातून जाणारे मातकट रंगाचे सुरेख रस्ते, घरासमोरील गॅलऱ्यांत गच्च भरलेली फुलझाडं, शेतांत चहूबाजूंनी पाणी उडविणारे पंप, कुरणांत चरणारी धष्टपुष्ट गाईगुरे आणि औषधाला सुद्धा न आढळणारी इतकी कमी माणसे, असा निसर्गसौंदर्याचा बदलता अखंड चलतपट गाडीसोबत पळत होता. डब्याच्या उत्तम काचेच्या मोठ्या आकाराच्या खिडकीतून तहानभूक विसरावयास लावणारा हा निसर्गाचा नजारा पुढे सतत ४ दिवस नेत्रांना सुखवत होता. धुन सरोवराच्या बोटीला वरती मोकळा डेक व इतर अद्ययावत सोयी होत्या. वर स्वच्छ निळं आकाश, मध्येच पांढऱ्या ढगांचे पुंजके, आसमंतात पसरलेली नीरव शांतता... तासभरात निसर्गाच्या या गूढरम्य रूपानं मन विस्मयचकित झालं. मी माझा नव्हतोच. एका नेत्रसुखद दुनियेतील हा प्रवास कधीच संपू नये असं वाटत होतं. या परिसराचं सौंदर्य पाहून हरखून गेलेल्या एका प्रसिद्ध लेखकाने असं लिहून ठेवलं आहे, की 'हा सर्व प्रवास जर तुमचे मन मोहून टाकू शकला नाही तर यापेक्षा अप्रतिम, अद्वितीय दृश्य तुम्हाला जगात दुसरीकडे कुठेही पाहावयास मिळणार नाही; तेव्हा धुन सरोवर पाहून तुम्हाला मनःशांती मिळाली नसेल, तर तुम्ही तुमच्या प्रवासात घेतलेल्या सामानाची वळकटी बांधा व मुकाट्याने आपल्या घरची वाट धरा. हाच एक उपाय आहे.' खरोखरच या स्वप्ननगरीतून पाऊल निघता निघत नाही.

    माऊंट पिलॅटस् हे ७८०० फूट उंचवरील बर्फाच्छादित छान पठार आहे. येथे जाणारी कॉगव्हिल सिंगल कम्पार्टमेंट रेल्वे म्हणजे रेल्वेबांधणी तंत्रज्ञानाचा एक अफलातून आविष्कार आहे. ४०० फूट उंचीवरून सुरू होणारी ही गाडी ७८०० फुटांवर २३ ते ४५ अंश ग्रेडियन्टमध्ये उभीच्या उभी वर आकाशाला भिडत आपला प्रवास ४५ मिनिटांत पुरा करते. गाडीची चाकं रुळांना घट्टपणे पकडू शकतील अशा प्रकारची रुळांची वेगळ्याच पद्धतीची रचना आहे. प्रवासात मधूनच पावसाची सर येत होती. बर्फाचे भुरभुरते कण, मध्येच दाट धुकं, दोन्ही बाजूला गर्द हिरवीगार झाडी, त्यामधून गाईंच्या गळ्यांत बांधलेल्या घंटांचा किणकिण असा मनाला आल्हाद देणारा नाद... आणि आता अगदी एक क्षणात कुशल नर्तकीसारखी आपली गाडी अर्धवर्तुळाकार फिरते, थबकते; आपण पटकन तिच्यामधून उतरतो व तीच गाडी परतीच्या प्रवासाला सज्ज होते. वर पठारावर प्रचंड गार वारे वाहत असतात. बर्फ व धुक्यात प्रवासी दिसतही नाहीत असा भोवताल असतो. थोड्याच वेळाच परतीचा प्रवास चालू होतो. हा अविस्मरणीय रेल्वे प्रवास कायमचा स्मृतीत राहणार याची निश्चिती असते.

    या देशातील रेल्वेचं जाळं हे युरोपमधील सर्वांत उत्तम दर्जाचं आहे. असंख्य गाड्या धावत असतात. त्यामुळे कुठेही प्रतीक्षा करावी लागत नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे या देशातील अगदी कानाकोपऱ्यापासून ते हिमशिखरांपर्यंत सर्वत्र जाण्यासाठी गाड्यांची सोय आहे. काही मार्गांवरील बोगदे ५-५ मैलांचे असून, गाड्यांचा वेग ताशी १५० मैलांपर्यंत आहे. रेल्वेप्रेमिकांनी एकदा तरी स्विस रेल्वे अनुभवायलाच हवी.

    -- डॉ. अविनाश वैद्य

      October 7, 2022


  • कोण म्हणतो भारत गरीब आहे?

    सध्या भारतीय लोकांना कोणत्या प्रश्नाने अस्वस्थ केले आहे, असा प्रश्न कुणी विचारला आणि तुम्ही महागाई, बेरोजगारी, दहशतवाद, भ्रष्टाचार, अन्नधान्य आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई यापैकी एक किंवा हे सगळेच उत्तर पर्याय म्हणून निवडले, तर दोनच गोष्टी सिद्ध होतील आणि त्या म्हणजे एक तर तुम्ही भारतात राहत नसावे किंवा भारतात राहूनही तुम्हाला भारतीय लोकांची अजिबात ओळख पटलेली नसावी.

      June 9, 2010


  • पर्यावरण रक्षणासाठी रेल्वेने आखलेले विविध प्रकल्प

    रेल्वेच्या वातानुकूलित डब्यातील प्रवास अतिशय सुखावह असला, डब्यांची देखभाल नीट ठेवणं हे रेल्वेसाठी महा-डोकेदुखीचं काम आहे. आज भारतीय रेल्वेचे ६ ते ७ हजार वातानुकूलित डबे रोज रेल्वेमार्गांवरून धावत असतात. त्यांतील थंडावा कायम राखण्यासाठी (सी.एफ.सी.१२) हा वायू वापरला जातो, परंतु या वायूच्या वापरामुळे हवेतील ओझोनचं प्रमाण कमी होतं व ते पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. या दृष्टिकोनातून पर्यावरणपूरक एच.एफ.सी.आर. १३४९ हा गॅस वापरावा लागेल व तो वापरण्याकरता वातानुकूलित डब्यांच्या रचनेमध्ये बरेच बदल करावे लागतील. वर्षाला ४७००० किलो गॅसची गरज लागेल. परंतु यामुळे जागतिक हवेचं वाढणारं तापमान खाली आणण्यास मदत होईल. या दृष्टीने आता नवीन वातानुकूलित डब्यांची बांधणी सुरू झाली आहे.

    आज भारतातील खेड्यांत शेकडो हातमागांवर कापड तयार होतं. ते तयार होत असताना पर्यावरणावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. पर्यावरणाचं रक्षण करण्याच्या हेतूने व एक सामाजिक बांधिलकी म्हणून रेल्वे बोर्ड अशा छोट्या औद्योगिक समूहांकडून खूप मोठ्या प्रमाणावर कापड खरेदी करतं, ज्याचा उपयोग वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो. यातून खेड्यातील लोकांना उद्योगही मिळतो व पर्यावरणही सांभाळलं जातं.

    विजेचा वापर कमी करण्यासाठी रेल्वे आपल्या वसाहतींकरता सी.एफ.एल. बल्बज् वापरून १० टक्के वीज बचत करीत आहे. तसंच पवनचक्क्या आणि सौरऊर्जेचा वापर विद्युतनिर्मितीसाठी करून छोट्या स्टेशनांवरील दिवे त्या विजेवर चालविले जातात. पुढील टप्प्यावर गाडीच्या डब्यांतील दिवेही सौर ऊर्जेवर चालविण्याची योजना आहे.

    येत्या काही वर्षांत बायोडिझेलवर चालणारी 'ग्रीन ट्रेन' सुरू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पर्यावरण संतुलन सांभाळले जाईल. हे रेल्वे अधिकाऱ्यांचं स्वप्न आहे, जे प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांची पावलं वेगानं पडत आहेत.

    -डॉ. अविनाश वैद्य

      November 25, 2022


  • देवपूजेतील साधन – पानसुपारी

    देवपूजेतील साधन – पानसुपारी

    देवपूजेचे वेळी देवापुढे नागवेलीची पाने व त्याच्यावर सुपारी ठेवण्याचा कुलाचार आहे. लग्न, मुंज आदी मंगलकार्यप्रसंगी देखील अतिथींना पान सुपारी देण्याची प्रथा आहे.

    नागवेलीच्या पानांना विड्याची पाने व पोफळी झाडाच्या फळाला सुपारी म्हणतात. देठासहित असलेले विड्याचे पान आपल्या हृदयाचे प्रतीक म्हणून समजले जाते. हे पान हिरवेगार असून मनाला अल्हाद देणारे असते. विड्याच्या पानाला त्यात सुपारी व कात टाकून तो विडा भोजनानंतर मुखशुध्दिसाठी खाल्ला जातो. कारण विडा हा वातहारक व जंतनाशक असतो.

    सुपारी ही मांगल्याचे व प्रेमभावाचे प्रतीक मानले जाते. विशेष म्हणजे अखंड सुपारी ही गणपती देवाची प्रतिमा समजून तिची पूजा करतात.

    पत्निचे देहावसान झाले असता पती आपल्या कनवटीला सुपारी लावून धार्मिक कृत्य करतो. कारण सुपारी ही त्याची प्रतिधिनिक स्वरुपातील पत्नी मानली जाते.

    सुपारीचे अनेक प्रकार आहेत त्यांपैकी मसालेदार सुपारी ही सर्वांना आवडते. सुपारी चघळण्यामुळे लाळ रस उत्पन्न होतो.

      March 21, 2016