(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बांगलादेशातील अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व देण्याची गरज

    बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील गैर-मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व देण्याच्या उद्देशाने मांडण्यात आलेले नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक २०१९, लोकसभेत मंजुर करण्यात आले आहे. या विधेयकावरून लोकसभेत विरोधकांनी गदारोळ केला. मात्र, तरीही ते अखेर मंजूर झाले आहे.

      February 4, 2019


  • किचन क्लिनीक – मोहरीचे तेल

    किचन क्लिनीक – मोहरीचे तेल

    मोहरीचे तेल हे बंगाल,व उत्तर भारतामध्ये स्वयंपाका करिता वापरले जाते.हे तेल चवीला कडवट,उष्ण असते व ते भुक वाढविते,पचायला हल्के,तीक्ष्ण गुणाचे,कफ व वातनाशक,पित्त वाढविणारे,संडासला बांधुन ठेवणारे अर्थातच घट्ट करणारे,लघ्वीचे प्रमाण कमी करणारे आहे.हे तेल शरीरातील मेदाचा नाश करते.ह्या तेलाचा गरजे पेक्षा जास्त वापर केल्यास शरीरातील शुक्रधातू नष्ट होतो.

    त्वचेला खाज येणे,कोड,तसेच काही कफ वात प्रधान त्वचाविकारात ह्या तेलाचा आपण वापर करू शकतो.

    मोहरीचे तेल हे अत्यंत उष्ण असल्याने थंड हवामान असलेल्या प्रदेशांत हे तेल लोकांना सहज पचते.पण हेच मोहरीचे तेल जर आपण देशावर किंवा कोकण गोवा प्रांतात वापरू लागलो आपणच काय पण बंगाली किंवा युपी स्थित लोक जरी ह्याच तेलाचा वापर भरपूर प्रमाणात आपल्या स्वयंपाकात करू लागले तरी त्यांच्या अंगात पित्त दोषाची फाजील वाढ होऊन त्यामुळे पित्ताचे व रक्ताचे विकार त्यांना सतावतील ह्यात दुमत नाही.

    म्हणूनच कोणतेही तेल वापरताना देश अर्थात आपण रहात असलेल्या प्रदेशाचा विचार होणे अत्यंत गरजेचे आहे.शक्यतो तेलाचा वापर करत असताना आपल्या प्रदेशात कोणत्या तैल बिया पिकतात ह्याचा विचार करूनच त्यांच बियांचे तेल वापरावे.कारण त्या तेलबियांचे पासुन काढलेले तेल आपल्याला आपल्या प्रदेशाचा वापरायला चांगले असते.जसे कोकण,गोवा खोबरेल,देशावर शेंगदाणा,उत्तर भारत,बंगाल सरसों का तेल अर्थात मोहरीचे तेल.

    मोहरीचे तेल वापरण्याचा अतिरेक केल्यास पित्ताचा त्रास वाढेल.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      January 6, 2017


  • द्वादशलिंग स्तोत्रम् – ४

    देवांचे खजिनदार असणाऱ्या भगवान कुबेरांनी भगवान श्री शंकराची उपासना केल्यानंतर त्यांच्या आनंदा करता भगवान शंकरांनी निर्माण केलेला जलप्रवाह म्हणजे नर्मदेची उपनदी कावेरी.

      September 7, 2020


  • फेब्रुवारी २७ : ग्रॅएम पोलॉकचा जन्म आणि विश्वचषकातील सचिनची एक अविस्मरणीय खेळी

    केवळ ब्रॅडमनचीच कसोटी सरासरी ज्याच्यापेक्षा चांगली आहे त्या ग्रॅएम पोलॉकचा जन्म आणि १९९६ च्या विश्वचषकातील तेंडल्याची डॉन ब्रॅडमनलाही आनंदित करणारी खेळी.

      February 27, 2011


  • आनंदाची अनुभूती

    सुखाची अनुभूती हीच आनंदाची अनुभूती असतें. अंतर बाह्य बदलल्या शिवाय सुख व आनंद मिळत नाही.अनेकांना सुख कळले पण वळले नाही. सुख म्हणजे नक्की काय असतं ?याचे उत्तर प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. अनेकांना सुख कळले पण सुखाच्या पायवाटा नाही कळल्या. सुख मिळवण्याची प्रत्येकाची धडपड असते.

      July 1, 2026


  • भारतीय स्त्रिया – आर्थिक क्षेत्र – अरुंधती भट्टाचार्य

    अरुंधती भट्टाचार्य या  सेल्सफोर्स, इंडियाची अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत . त्या निवृत्त भारतीय बँकर आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी अध्यक्षा देखील आहेत. त्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा असलेल्या पहिल्या महिला आहेत.

      September 5, 2025


  • नॉस्ट्रडेमसची भविष्यवाणी

    नॉस्ट्रडॅमसने सांगितलेली बरीच भविष्य खरी ठरली आहेत.. त्याच्यामध्ये फ्रेंच राज्यक्रांती, लेडी डायनाचा मृत्यू, ग्रेट फायर ऑफ लंडन, हिटलरचा उदय, अणुबॉम्‍बचा शोध, दुसरे महायुद्ध,अमेरिकेतील 9 11 चा हल्ला, यांसारख्या घटनाबाबत नॉस्ट्रडॅमसची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरल्याचे दिसून आले आहे.

      March 30, 2020


  • अजूनही “लिटील” च !

    मागील आठवड्यात गाजावाजा झालेला लिटील चॅम्प्स बघितला. पंचरत्न म्हणून पुढे महाराष्ट्रात नावाजली गेलेली मुग्धा, कार्तिकी, आर्या, रोहीत आणि प्रथमेश आता वेगळ्या भूमिकेत दिसली. आणि त्यांना ते काम अजिबात जमत नव्हतं. एकतर त्यांची गायक म्हणूनच अद्याप कारकीर्द मोठी नाही, रियाझ /साधना पूर्ण झालेली नाही आणि लगेच त्यांना इतरांचे मूल्यांकन करायला सांगणे?

      July 12, 2021


  • देवपूजेतील शुभकारक साधने

    आपण आपल्या घरात नित्यनेमाने देवपूजा करत असतो. या देवपूजेमध्ये आपण अनेक वस्तूंचा उपयोग करत असतो. ही सर्व साधने आपल्या घरात असतात मात्र त्याविषयी जास्त माहिती बहुतेकांना नसते.

    देवपूजेत आपण हमखास वापरतो त्या वस्तू म्हणजे ताम्हण, घंटा, निरांजन, समई, फुले, नरळ, हळद-कुंकू, पळी-पंचपात्र वगैरे. याशिवाय फुले, अक्षता, गंध, शंख, कलश, भस्म, अगरबत्ती, रुद्राक्ष, विविध प्रकारची पत्री यांचाही देवपूजेत वापर होतो.

    देवपूजेत वापरल्या जाणार्‍या प्रत्येक साधनाला काहीतरी महत्त्व आहे. ही सर्व साधने अत्यंत पवित्र आहेत. या सर्व साधनांच्या वापरामुळे जी फलप्राप्ती होते त्याविषयीही आपल्याला बर्‍याचदा माहित नसते.

    सध्या वास्तुशास्त्र आणि फेंगशुईचे प्रस्थ वाढलेले आहे. त्यामध्ये देलेल्या वस्तूंपासून लाभ होतो असा अनेकांचा समज आहे. काही प्रमाणात हे खरेही आहे. मात्र आपल्या भारतीय संस्कृतीतील देवपुजेच्या विविध साधनांमुळेही आपल्याला अनेक प्रकारचे लाभ होतात हे आपण लक्षात घेत नाही आणि उगीचच चायनिज वस्तूंच्या मागे लागतो. आपल्याच घरातील या शुभ साधनांचा श्रद्धापूर्वक वापर केल्यास आपल्याला सुख, समाधान, शांती आणि समृद्धी लाभेल यात शंकाच नाही.

    शुभ गोष्टींची सुरुवात आपण ॐकाराने करतो. ॐ हे ब्रम्ह आहे. ॐ हे अक्षर संपूर्ण विश्वाचे प्रतिक आहे. ओम हा परब्रम्हाचा संकेत असल्यानें ब्रम्हाच्या सर्व रुपांचा म्हणजेच `व्यक्त आणि अव्यक्त', `कालाधीन आणि कालातीत', `दृश्य आणि अदृश्य' रुपांचा वाचक आहे.

    अध्ययनाला प्रारंभ करताना ॐ म्हणून "मला ब्रम्हप्राप्ति होवो" असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे देवपुजेची सुरुवातही ॐकाराने केली जाते.

    `देवपूजेतील साधने' या खास लेखमालेच्या माध्यमातून आपल्याला ओळख करुन दिलेय या सगळ्या पवित्र साधनांची. पौराणिक माहितीव्यतिरिक्त ऐतिहासिक आणि वैज्ञानिक माहितीही देण्याचा प्रयत्न इथे केलाय.

    -- मराठीसृष्टी व्यवस्थापन

      December 28, 2015


  • हिंद महासागर भारताच्या सामरिक हिताकरता महत्वाचे क्षेत्र

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ११-१४ मार्चचा सेशेल्स, मॉरिशस आणि श्रीलंकेचा दौरा, प्रदीर्घ काळापासून उपेक्षित हिंदी महासागरातील देशांशी संबंध वाढविण्याचे पाऊल आहे. सेशेल्सची एकूण लोकसंख्या ८७ हजार आहे.११५ लहान-लहान बेटांनी बनलेल्या सेशेल्सचे एकूण भौगोलिक क्षेत्र ४५५ वर्ग किलोमीटर आहे.

      March 23, 2015