वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना श्री स्वामी समर्थांना केलेली ही एक विनंती…
January 3, 2019
प्रकाशन दिनांक :- 06/02/2005
भौतिक सुखांची जिथे रेलचेल आहे त्या अमेरिकेतील अर्धी जनता आज झोपेच्या गोळ्या घेते. केवळ मन:शांतच्या शोधात ड्रग्जच्या आहारी जाणाऱ्या तरुणांची संख्या अमेरिकेत प्रचंड आहे. 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर तर संपूर्ण अमेरिकन जनमानस एका अज्ञात दहशतीच्या छायेखाली जगत आहे.
February 26, 2005
आज नेदरलँड्स प्रिंस ऑफ ऑरेंज म्हणजेच राजा विल्यम अलेक्झांडर यांचा वाढदिवस किंग्ज डे म्हणून साजरा केला जातो.
डच लोक त्यांच्या राजाचा वाढदिवस साजरा करतात तेव्हा किंग्ज डे असतो. राजा विल्यम अलेक्झांडर यांचा जन्म २७ एप्रिल १९६७ रोजी झाला. विल्यम अलेक्झांडर हे क्वीन बीट्रिक्स आणि प्रीन्स क्लॉस यांचा मोठे चिरंजीव होत. विल्यम अलेक्झांडर हे त्यांच्या तरुण वयात ‘रॉयल नेदरलँड्स नेव्ही’त काम करत होते. पुढे त्यांना लेफ्टनंटची पदवी मिळाली. विल्यम यांना पायलट बनण्याची इच्छा होती. एका मुलाखती दरम्यान त्यांनी सांगितले होते की ‘मी जर राजा नसतो तर पायलट नक्कीच झालो असतो.’ते २० वर्षांपासून छंद म्हणून के.एल.एम मध्ये पायलट म्हणून काम करत होते. के.एल.एम पूर्वी ते 'मार्टिन एयर'साठी अतिथी पायलट म्हणून काम करत असत. तेथे विल्यम नेहमी मुख्य पायलटच्या सहाय्यकाची भूमिका बजावत असत. त्यांनी मेडिकल रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशनमध्येही काम केले आहे. ऐंशीच्या दशकात, विल्यम अलेक्झांडर यांनी केनियामधील आफ्रिकन मेडिकल रिसर्च एज्युकेशन फाउंडेशनतही काम केले आहे. यानंतर त्यांनी केनिया वाइल्ड लाइफ सर्विस साठी काही दिवस काम केले आहे. विल्यम अलेक्झांडर जल व्यवस्थापन तज्ञ पण आहेत.विल्यम अलेक्झांडर २०१३ मध्ये नेदरलँड्सचे राजे झाले. विल्यम अलेक्झांडर नेदरलँड्सच्या इतिहासातील चौथे राजे आहेत. विल्यम अलेक्झांडर हे १८९० साला नंतर (१२२ वर्षे) नंतर पहिले राजे होत. याच्या आधी बिएट्रिक्स (१९८० ते २०१३), त्यांची आई जूलियाना (१९४८ ते १९८०) आणि आजी विल्हेल्मिना ( १८९० ते १९४८) या नेदरलँडच्या राण्या होत्या.
राजा विलेम-अलेक्झांडर यांनी राणी मॅक्सिमा सोबत २ फेब्रुवारी २००२ मध्ये लग्न केले. त्यांची पत्नी मॅक्सिमा अर्जेटिनामध्ये बँकर होती. विल्यम अलेक्झांडर यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये सपत्नीक भारताला भेट दिली होती.
नेदरलँड्स प्रिंस ऑफ ऑरेंज म्हणजेच राजा विल्यम -अलेक्झांडर हे स्वत: आपल्या कुटुंबा समवेत दर वर्षी नेदरलँड्स मधील एका शहराला भेट देतात. या वर्षी ते आइंडहोवनला भेट देणार आहे.
या दिवसा सोबतच नेदरलँड्स मध्ये दरवर्षी ३० एप्रिलला क्वीन डे म्हणून साजरा केला जातो.
डच भाषेत Fijne Koningsdag! म्हणजेच हॅपी किंग्ज डे (Happy King’s Day!)
April 27, 2022
समस्तलोकशङ्करंनिरस्तदैत्यकुञ्जरं !
दरेतरोदरं वरं वरेभवक्त्रमक्षरम् !!
कृपाकरं क्षमाकरं
मुदाकरं यशस्करं !
मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् !! ३!!
समस्तलोकशङ्कर- शम् म्हणजे कल्याण. ते कल्याण जे करतात ते शंकर. समस्त लोक अर्थात सर्व लोकांचे किंवा सर्व विश्वाचे कल्याण करतात म्हणून मोरयांना समस्तलोकशङ्कर असे म्हणतात.
निरस्तदैत्यकुञ्जर- कुंजर म्हणजे हत्ती. दैत्यकुंजर अर्थात हत्तीप्रमाणे अत्यंत बलशाली असणारे दैत्य.
भगवान श्रीगणेश आणि आपल्या विविध अवतारात देवांतक- नरांतक, सिंधू, सिंदुर, कमलासुर इ. अनेक राक्षसांचा निःपात केला. त्यामुळे त्यांना निरस्तदैत्यकुञ्जर असे म्हणतात.
दरेतरोदर- दर शब्दाचा अर्थ आहे घट्ट. मजबूत. परिदृढ. त्याचा इतर म्हणजे विपरीत अर्थात लवचिक, परिवर्तनीय ते दरेतर. असे ज्यांचे उदर अर्थात पोट ते दरेतरोदर.
भगवान श्री गणेशांना लंबोदर असे म्हणतात. त्यांच्या उदराततून ही अनंत कोटीब्रह्मांडे उत्पन्न होतात आणि शेवटी त्यातच लय पावतात. त्यामुळे त्यांना लंबोदर म्हणतात. भगवान गणेश असे लंबोदर असल्याने त्यांचे उदर सगळ्यांना सामावून घेणारे लवचिक आहे म्हणून ते दरेतरोदर.
वर म्हणजे सर्वश्रेष्ठ.
वरेभवक्त्रमक्षर- वर म्हणजे श्रेष्ठ. इभ म्हणजे गज अर्थात निर्गुण निराकार. असे निर्गुण-निराकार तत्व आहे ॐ कार ब्रह्म. त्याला अक्षर असे म्हणतात. तेच ज्यांचे वक्त्र अर्थात मुख ते वरेभवक्त्रमक्षर.
मुख ही आपली ओळख आहे. चेहऱ्यावरूनच आपण एकमेकांना ओळखतो. निर्गुण, निराकार ॐ कार हीच मोरया ची ओळख म्हणून मोरया,वरेभवक्त्रमक्षर.
कृपाकर अर्थात भक्तांच्या जीवनात कृपेचा अखंड वर्षाव करणारे.
क्षमाकर अर्थात प्रार्थना करणाऱ्या, क्षमा याचना करणाऱ्या भक्तांच्या चुकांना माफ करणारे.
मुदाकर अर्थात भक्तांच्या जीवनात सर्वोत्तम आनंद निर्माण करणारे.
यशस्कर- अर्थात उपासकांना त्यांच्या मन इच्छित कार्यात यश प्रदान करणारे.
नमस्कृतां मनस्कर- अर्थात धर्म संमत रीतीने वागणाऱ्यांच्या, श्री गणेश चरणावर नत असणाऱ्या सर्व भक्तांच्या मनात येणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण करणारे.
अशा भास्वर अर्थात परम तेजस्वी भगवान गणेशांना मी नमस्कार करतो.
-- -- प्रा. स्वानंद गजानन पुंड
January 3, 2020

समाजजीवनात किंवा वैयक्तिक पातळीवरसुध्दा या नियमाचा प्रत्यय आपण घेतच असतो. आता हेच बघा, भौतिक क्षेत्रात म्हणजेच विज्ञानात मानवाने प्रगतीची शिखरे पादाक्रांत केली आहेत. गेल्या शे-दीडशे वर्षात आपण विज्ञानात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतल्यास शे-दीडशे वर्षापूर्वीचे जग आणि आताचे जग यामध्ये तुलनाच होऊ शकत नाही. परंतु त्याचवेळी हा प्रश्नदेखील उपस्थित होतो की, विकासाचे घोडे वैज्ञानिक प्रगतीच्या दिशेने चौखूर उधळत असताना विरोध विकास बलाने नेमके कोणत्या दिशेने कार्य केले असावे? या प्रश्नाचे उत्तर फारसे कठीण नाही.
November 10, 2002
पानिपत हे ठिकाण गेल्या सहस्त्रकात फारच गाजलेले आहे. इथे लढल्या गेलेल्या तीनही लढायात स्थानिक राज्यकर्त्यांची अपरिमित हानी झाली आणि परकीय आक्रमकांचे विजय झाले. त्यामुळे पानिपतची रणभूमी ही परधार्जिणी आहे असे म्हटले जाते.
January 14, 2022
भौतिक सुखे असे साध्या शब्दात म्हणता येईल मिळवण्यासाठी आपली सारी उर्जा खर्च करतो. आता आपण आपले श्रेयस, म्हणजे भौतिक सुखापलीकडचे असे काही तरी, जे आपल्या आत्म्याला परमानंद देईल
November 16, 2022
पूर्वीच्या कचेऱ्या ब्रिटिशकालीन बांधणीच्या असल्यामुळे त्यांचं छत फार उंच असायचं. उंचावरून लोंबत पंखा तोलणारे लांबच लांब पोकळ लोखंडी पाइप आणि त्यांना लावलेले पंखे काचेऱ्यांत जागोजागी लटकलेले असायचे. बरं हे पंखे, जेवण जड झाल्यासारखे दिसायलाही तुंदीलतनू आणि त्यांची पातीही जाड आणि जड अंतःकरणाने फिरल्यासारखी फेरे घ्यायची. वेगाच्या अगदी वरच्या नंबरवर ठेवला तर कुठे खाली बसणाऱ्याना थोडीफार हवा लागायची झालं.
August 31, 2022
सोळावे वर्ष हे असे वर्षे असते जिथे विद्यार्थ्यांच्या मन आणि शरीरात अमुलाग्र बदल होत असतात. सोळावे वर्ष हे आपण तारुण्याच्या पदार्पनाचे वर्ष मानतोत. शाळेच्या कडक शिस्ती मधून विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या मुक्त जीवनामध्ये प्रवेश केलेला असतो. जिथे बारावीला उत्तम मार्क घेऊन पुढील आयुष्याच्या दिशा ठरवायच्या असतात त्याच क्षणी या वयात विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी भुरळ घालण्याचा प्रयत्न करत असतात.
July 31, 2020
चित्रपटांच्या उदयाच्या कालखंडातही संगीत नाटकांचा प्रेक्षक कायम ठेवून सर्वोत्तम सादरीकरणाचे व्रत त्यांनी अखंड जोपासले. त्यामुळे, गंधर्व नाटक मंडळीचा दबदबा राज्यासह इतर भागांतही पसरला होता. नेपथ्य, सजावट, वेशभूषा, रंगभूषा, पात्रयोजना, साथीदार आणि त्यांची वाद्ये अशा संगीत नाटकासाठी पूरक स्वतंत्र विभागांच्या रचनेस गंधर्व नाटक मंडळीपासूनच सुरुवात झाली.
July 5, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti