वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
संसारात अन् परमार्थात आपल्याला काही साध्य करायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या मनाची एकाग्रता साधणे अतिशय आवश्यक आहे.मन स्थिर नसेल तर आपल्या अभ्यासाचा किंवा साधनेचा काही उपयोग होत नाही. भक्तगणांची ही अडचण ओळखून परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी साक्षात दत्तगुरूनांच चित्त स्थिर करण्यासाठी ह्या स्तोत्रातून साकडे घातले आहे.
April 30, 2020
निवडणूकांना आता फक्त वर्ष राहीलंय. मतदारांना फितवण्याचे आणि भडकवण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. तरी डोकं शांत ठेवा. तुमच्या जीवावर पोळी भाजायचा सर्वांचा कावा लक्षात घेऊन, या निवडणूकीत तुमचा पक्ष कोणता असं कुणी विचारलं, तर ‘देश आणि देशहित’ हाच आमचा पक्ष असं ठणकावून सांगायला कचरू नका..
April 6, 2018
मी इंजिनीअर असल्याने ब्रिजवर किंवा तिथल्या कामाचा फारसा संबंध नसतो त्यामुळे तिथे येणेजाणे सुद्धा फारच कमी असतं. डेक ऑफिसर हे कॅप्टनच्या नेतृत्वात नेव्हिगेशनल ब्रिज सांभाळतात तर सर्व इंजिनीयर चीफ इंजिनियरच्या नेतृत्वात इंजिन रुम सांभाळतात. इंजिन रूम मध्ये जनरेटर, मेन इंजिन आणि इतर अनेक मशीनरी असतात.
September 30, 2019
"गॅसवर तुमच्याकडे काही परमनंट औषध आहे काहो ? "
90% पेशंटचा 100 % विचारला जाणारा एकमेव भाबडा प्रश्न. ज्यावर डाॅक्टरांची विकेटच पडते. आता या प्रश्नाचे उत्तर एका ओळीत, एका शब्दात, आणि एखाद्या औषधांनी, कसं काय देता येणार ?
अख्खं वर्ष हेच समजावून सांगण्यात गेलंय, की रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा होऊ नये यासाठी सावधानता बाळगणे, केव्हाही चांगलेच ना !
दर दोन चार तासांनी खा खा खाल्ले तर पचन करायला वेळ कधी देणार ? मग वात बिघडणारच. आपल्याच कर्मानी विकृत झालेला हा वात म्हणजे आजच्या काळातील 'गॅस' होय.
आपल्यासाठी हा वात वाढवणारे पदार्थ कोणते ते शोधून बंद करणे हे आपणच शोधायचे. कारण आपण काय खातोय यापेक्षा कसे पचवतोय हे जास्ती महत्त्वाचे आहे. खाल्लेल्याचे पचन होणे, त्यावर अग्निची प्रक्रिया होणे महत्त्वाचे ! अग्निच्या जे जे विरोधात ते ते सर्व वात वाढवणारे. जसे पाणी. अतिरिक्त प्रमाणात, चुकीच्या वेळी घेतलेले, पाणी हे वात वाढवते.
आंबोळी इडलीच्या सुक्या पीठात पाणी घातल्यानंतरच आंबायला सुरवात होते ना ! पाणी घातल्यानंतरच पीठ फुगते, दुप्पट होते, पीठाची चव बदलते, स्वरूप पालटते, पीठ बुडबुडेयुक्त दिसते, हे सर्व बदल पीठामधे कोणी केले ? एका पाण्याने केले. म्हणजे इडली डोसा पाव पिझ्झा यासारख्या आंबवलेल्या पदार्थात गॅस मुळातच जास्ती असतो, म्हणजे आंबवलेल्या पीठाचे सर्व प्रकार गॅस वाढवतात.
पण क्वचित प्रसंगी हे पदार्थ खावेच लागणार असतील तर याच पीठाचे खमंग, कुरकुरीत डोसे करून खावेत, खाल्ले तरी ते दिवसाचेच खावे आणि ते पचेपर्यंत दुसरे काहीही खाऊ नये, ही युक्ती आहे. हा पर्याय आहे. सोयीस्कर अर्थ काढू नयेत.
जेवणामधे कच्चे तेल आणि सर्व प्रकारचे कच्चे मसाले वापरले तर गॅस कमी होतो.
सूर्यास्तापूर्वी घेतलेले जेवण, गरम गरम जेवण, गोड, आंबट, खारट चवींनीयुक्त जेवण, वाताचा म्हणजे गॅसचा नाश करते. जेवणात सहा चवी आवश्यक आहेत. एखादी चव जरी कमी पडली तरी गॅस होणार.
पाणी, तेल आणि अन्नपचन या विषयावरील मागील सर्व टीपा पुनः वाचाव्यात. नाहीतर पुनरूक्ती दोष उत्पन्न होईल.
नियमितपणे मलप्रवृत्ती साफ राहील, असे पहावे. जेव्हा मलप्रवर्तन करावेसे वाटेल, तेव्हा "त्याचे" लगेचच ऐकावे. आणि मलमूत्र विसर्जन करून यावे. यासाठी आतून "तो" काय सांगतोय, यावर सतत लक्ष ठेवावे, म्हणजे गॅस होणार नाही.
जे अन्नपाणी साठवलेले असते, ते गॅस वाढवणारे असते. अन्नपाणी कुजल्यावर त्यामधे गॅस तयार होतो. पालेभाज्या, कच्ची खाल्ली जाणारी आणि मोड आणून पचायला जड बनवलेली कडधान्ये, खूप पिकलेली फळे, फ्रीजमधील अन्नपदार्थ ( ते सर्व शिळेच होतात. ) रात्र उलटून गेलेला तयार आहार, गॅस वाढवतो.
पोटात अवकाश न ठेवता ठासलेले, बकाबका खाल्लेले, बळेबळे भरवले जाणारे, मनाविरुद्ध खाल्लेले अन्न देखील गॅस वाढवणारे असते.
जसे गाडीचे अग्निस्थान म्हणजे कार्बोरेटर आणि अतिरिक्त वायुवाहक पुंगळी म्हणजे सायलेन्सर साफ असेल, तरच गाडीचे अॅव्हरेज वाढते, हे खरे आहे ना ?
-- वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
01.04.2017
April 1, 2017
घर सुंदर दिसण्यासाठी आपण वेगवेगळे शो-पीस, एंटिक पीसचा वापर करतो. पण ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या कार्यालयामधील वातावरण आनंदी वाटावे असे वाटत नाही का? कारण कार्यालयामधील कामकाजाचा कर्मचाऱ्यांच्या कामावर परिणाम होत असल्याचे ऑफिस कल्चर संबंधित केलेल्या अध्ययनानुसार नुसतेच समोर आले आहे. त्यामुळेच कार्यालयामधील वातावरणात बदल व्हावा, असे वाटत असेल तर आपल्या डेस्कला आवडीनुसार लूक द्या.
१. डेस्कवर विखुरलेल्या वस्तू नीट लावून ठेवा. कोणते पेपर्स आवश्यक आहेत व कोणते नाहीत हे नियमित पडताळा जेणेकरून अनावश्यक वस्तूंचा उगाच भरणा होणार नाही.
२. महत्त्वपूर्ण कागदपत्र फाईलमध्ये व्यवस्थित लावून ठेवा, फाईलला नंबर द्या. त्याच्या डिटेल्सची नंबरनुसार लिस्ट बनवा जेणेकरून गरज असेल तेव्हा कागदपत्रे व फाईल वेळेवर मिळतील.
३. कामाबद्दल नियोजन करा. नंतर गोंधळ होण्याऐवजी एक डेस्क प्लॅनर तयार ठेवा. यामध्ये कामांची सूची व वेळ लिहून ठेवा. महत्त्वपूर्ण शेड्युल्स हायलाईट करा, ज्यामुळे विसरायला होणार नाही.
४. डेस्कच्या जवळपास कुटुंबाचा किंवा आपल्याला आवडेल असा फोटो ठेवा.
५. कार्यालयाची परवानगी असेल तर डेस्कजवळ एका छोट्या कुंडीत झाड लावा जेणेकरून काम करताना प्रसन्न वाटेल.
-- पूजा प्रधान
October 10, 2016
१९२२ साली ‘ऑल इंडिया रेल्वेमन्स फेडरेशन’ची स्थापना झाली. तिच्यात १२ ते १५ विविध रेल्वे संघटनांचा समावेश होता, व जवळजवळ २ लाख कर्मचारी सभासद होते. १९२२ सालापासून ते १९४७ सालापर्यंत विविध प्रदेशांत रेल्वेचे ४८ संप झाले होते. त्यांतले काही एक दिवसाचे, तर काही महिनाभर चालले होते.
November 30, 2022
अमेरिकेत एप्रिलमध्ये “ड्रायव्हिंग आणि टेक्स्टिंग वीक (driving and texting week)” पाळला जातो. यासंबंधी मुलाने माहिती दिली ती फार उद्बोधक असल्याने आणि मी ती आपल्यापर्यंत पोहोचवावी असे त्याने सुचवल्याने इथे लिहीत आहे.
January 18, 2024
आरोग्याच्या बाबतीत अमुक एक नियम करून चालत नाही. मागे अनेक वेळा सांगितल्या प्रमाणे देश, प्रकृती, सवय, मनाची अवस्था, आवडनिवड, उपलब्धता इ. अनेक गोष्टींवर आरोग्याचे मापदंड बदलत असतात. प्रत्येकाला एकाच तराजूत तोलता येणारे नसते. एखाद्याच्या प्रकृतीतला नेमकेपणा, आवश्यकता, गरज, योग्य पथ्यापथ्य हा जाणकार वैद्यच सांगू शकतो. त्याहीपेक्षा अचूकपणे फॅमिली डाॅक्टर / वैद्य सांगू शकेल. कारण त्या वैद्याला जन्मापासूनच त्याची सर्व माहिती असते. त्यामुळे निदान करायला किंवा अपथ्य, चिकित्सा सांगायला सोपे होते.
मी असं सांगतो, एकच नियम पाळावा, की (वैश्विक नियम सोडून) कोणताच नियम पाळू नये. वैश्विक म्हणजे युनिव्हर्सली अॅक्सेप्टेड. जगन्मान्य !
आपण आता सर्वसामान्य जगन्मान्य नियम काय असतात ते पाहू.
1. पाणी कधी प्यावे ?
तहान लागेल तेव्हा. गरज असेल तेव्हा.
2. पाणी किती प्यावे ?
तहान भागेपर्यंत. गरजेपुरते.
याला म्हणतात, वैश्विक नियम. जगात कुठेही जा. हाच नियम पाळायचा. म्हणजे कोणताही शास्त्राधार शोधण्याची आवश्यकताच पडणार नाही.
एवढे साधे प्रश्न आणि एवढी साधी उत्तरे असताना, आपण नियम करून खूप गोंधळ निर्माण करून ठेवतो. जे सोप्पं आहे ते, अवघड करून सांगितले, तरच ते शास्त्र आणि ते जाणणारा कोणीतरी मोठ्ठा विद्वान वगैरे वाटतं. असं काही जणांना वाटतं म्हणून जरा अघळपघळ करून सांगितले तर ऐकणाऱ्यालाही जरा बरे वाटते ना !
ताप आहे असं सांगण्याऐवजी पायरेक्झिया ऑफ अननोन ओरीजीन, वगैरे भाषेत सांगितले तर रूग्णालापण आपणाला कोणता तरी मस्त मोठा आजार झालाय असे वाटते. मग नंतर बिल भरताना फार कटकट वाटत नाही. असो.
पाणी पिण्याचे हे दोन नियम मोडले नाहीत, तर पाण्यापासून होणारे रोग निकाली निघतील. (आणि हे एवढ्या पटकन, समजले तर ही लेखमाला पण लवकर बंद होईल.)
याला शास्त्राधार काय ? असंही कोणाच्या तरी मनात येईल. त्यालाही उत्तर देतो.
ही गरज कोण ठरवणार ?
तहान लागली की नाही, हे कसं समजणार ?
सोप्प आहे.
यासाठी त्याला काही काळ गृहीत धरावा लागेल. उत्तर मिळेपर्यंत वाट पहावी लागेल. नंतर वाटलं तर विसरून जायचं. गणितामध्ये नाही का आपण एक्स गृहीत धरंत. तसं. एक्सचं उत्तर मिळालं, की त्याला विसरून जायचं.
आपली तहान भूक, झोप, ढेकर,जांभई, अश्रु, मलमूत्र विसर्जन इ. क्रियांची जाणीव आपणाला कोण करून देतो ? जर त्याने ही जाणीव करून दिली नसतीच तर ? म्हणजे तो आतून काहीतरी सांगतोय, हे असं कर. हे तू असं केलंस तर बरं वाटेल, वगैरे.
कोण आहे तो?
तोच तो निर्गुण निराकार...... आत्मा !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
09.12.2016
December 9, 2016
रंजन दास हे SAP या मल्टी नॅशनल कंपनीचे CEO होते. भारतातल्या सर्व CEO पैकी सगळ्यात तरुण होते. वयाच्या फक्त बेचाळिसाव्या वर्षी ते ‘ही’ अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडत होते. प्रचंड हुशार, वक्तशीर आणि ‘हेल्थ कॉन्शियस’ म्हणून त्यांची ख्याती होती.
September 12, 2023
भारत हा सुपरपॉवर असल्यासारखा वागत असून अण्वस्त्रधारी पाकिस्तानला स्वतःचे रक्षण कसे करायचे हे चांगले माहित आहे असे विधान पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र धोरण व सुरक्षा विषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी आताच केले. पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांना भारतातील गुप्तचर यंत्रणा रॉचा पाठिंबा असल्याचे पुरावेही आमच्याकडे आहेत
September 2, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti