(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गणिताची भीती

    गणित हा अवघड विषय आहे ही भीती आजच मनातून काढून टाका आणि पूर्ण आत्मविश्वासाने या विषयाला सामोरे जा.

      December 28, 2017


  • शेतीचे सामूहिक व्यवस्थापन

    अमरावतीतील निमखेडच्या रौंदळे कुटुंबीयांनी शेती व्यवस्थापन योग्य पद्धतीने राबवत सामूहिक पद्धतीने शेती कशी करावी, याचा एक वस्तुपाठ इतरांसमोर ठेवला आहे. सुरुवातीला रौंदळे कटुंबियांकडे फक्त ३३ एकर शेती होती. शेतीत मिळणाऱ्या उत्पन्नातूनच त्यांनी टप्प्याटप्प्याने शेती जोडली. आता त्यांच्याकडे १३३ एकर शेती आहे.

      November 9, 2016


  • सुधींद्र कुलकर्णींना अनावृत्त पत्र

    आज दै. सकाळच्या सप्तरंग पुरवणीत आपला लेख “इस्राईल चे दोन चेहरे” वाचला. सदर लेख तुम्ही वस्तुनिष्ठ राहून न लिहिता, स्वतःची मते घुसडत, इस्राईल व पॅलेस्टाईन वादात ज्यांचा काडीमात्र संबंध नाही अशा हिंदू लोकांना व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना, तुम्हाला हवे त्याप्रमाणे गुंतवण्याचा प्रयत्न केला आहे, जो निंदनीय आहे, म्हणूनच तुमचा सदर लेख दुर्लक्ष करण्यायोग्य आहे. तथापी हा लेख दै सकाळ मध्ये प्रसिद्ध झाला असून दै सकाळचा वाचकवर्ग हा बुद्धिजीवी व विचारवंत आहे, त्यांचे मत कलुषित होऊ नये यासाठी हा पत्रप्रपंच !

      May 25, 2021


  • बीटरुट

    बीट हेसुद्धा पोषक कंदमूळ आहे. एक अत्यंत औषधी तसेच सर्वांना अगदी मनापासून आवडणारे फळ म्हणजे बीट. वास्तविक बीटरूट हा सेंट्रल अमेरिका येथून झाला.

      December 2, 2023


  • सामूहिक दायत्वाची गरज!

    करोना संसर्ग रोखण्यासाठी आता आपल्याला एकजुटीने उभं राहायचं आहे..करोना विषाणू सोबत युद्धाचा बिगुल वाजला आहे.. सरकार, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा धीरोदत्तपणे मुकाबल्यासाठी उभी आहे. मात्र, लोकसहभागाशिवाय हे युद्ध जिंकताचं येणार नाही.. त्यामुळे, आपण सगळे या लढाईतील सैनिक आहोत.. ही लढाई आपल्याला रणांगणावर नाही तर घरात बसून प्रतिबंधात्मक उपायांच्या शास्त्राने लढावी लागणार आहे..‘एकमेका साह्य करू…’ या भूमिकेतून करोना संसर्गाचा मुकाबला केला करोनाची आपल्यासमोर काय ‘औकात’ आहे?

      March 21, 2020


  • ऑपरेशन सनराइज – एक यशस्वी मोहिम

    भारतीय सैन्याने तिसरा सर्जिकल स्ट्राइक म्यानमारमध्ये केला ही बातमी १५ मार्चला मीडिया मध्ये दाखल झाली. परंतु देशांमध्ये चाललेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत मध्ये मीडियाने या महत्त्वाच्या ऑपरेशनला काहीच महत्त्व दिले नाही. हे ऑपरेशन का महत्वाचे होते? यानंतर ईशान्य भारताला सुरक्षित करण्याकरता आपल्याला अजून काय करावे लागेल या सगळ्यावर  चर्चा गरजेची आहे.

      April 9, 2019


  • महामयी देवी

    अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथील प्रवरा नदीच्या काठावर महामयी मातेचं देवस्थान वसलेलं आहे; या देवीच्या स्थापनेचा इतिहासात डोकावल्यास असं आढळलं की मोगलांच्या काळात या परिसरात अनेक वेळा आक्रमण होत

      October 5, 2013


  • आपली लोकशाही कुठे चाललीय?

    आपली लोकशाही कुठे चाललीय?

    आपल्या देशात बहुपक्षीय पद्धतीची संसदीय लोकशाही आहे. गेली ७० वर्ष लोकशाहीचा हा गाडा चाललाय. लोकशाहीत दोन महत्वाचे भाग असतात. एक सत्ताधारी पक्ष आणि दुसरा विरोधी पक्ष. किंबहूना विरोधी पक्षाची भुमिका लोकशाहीत जास्त महत्वाची असते. सत्ता हा विषयच असा आहे की, ती मिळाल्यावर स्खलन होण्याची शक्यता जास्त असते, मग सत्तेवर कुणीही असो.

      March 27, 2019


  • उच्च प्रतीचा कागद

    रासायनिक गुणधर्म या दोन शब्दांबरोबर आम्लधर्मी की आम्लारिधर्मी हे गुणधर्म डोळ्यासमोर येतात. कोणत्याही पदार्थातील आम्लधर्म किंवा ओळखण्यासाठी साधी चाचणी असते. या आम्लारिधर्म चाचणीला सामू तपासणे असे म्हणतात. या चाचणीमध्ये कागदाचे खूप बारीक तुकडे करून ते शुद्ध पाण्यात उकळतात. नंतर हे द्रावण गाळतात.

      February 26, 2023


  • पुनर्नवा

    पुनर्नवाचे रोप पावसाळयात सर्वत्र रान कसे उगवते.घरगुती उपचारात पुर्वीच्या काळी ह्याचा बराच वापर केला जायचा.हि वनस्पती आजी बाईच्या बटव्यातील आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

    ह्याचे बहुवर्षायू प्रसरणशील क्षुप असते किंवा वेल असते.पाने २.५-४ सेंमी लांब व गोल किंवा अंडाकार असतात ती मांसल व मृदू व रोम युक्त असतात.मागच्या बाजूस हे पान पांढरे असते.फुले लहान पांढरी किंवा गुलाबी असतात.मुळ मोठे बळकट,पांढरे व वाळल्यावर त्याला पीळ पडतो.

    ह्याचे उपयुक्तांग बी,पाने व पंचांग अाहे.
    आता आपण हिचे गुणधर्म पाहूयात:
    पांढरी पुनर्नवा चवीला तिखट,गोड,कडू,तुरट असते.हि उष्ण असून हल्की व रूक्ष असते.
    तांबडी पुनर्नवा चवीला कडू व थंड गुणाची व हल्की असते.

    पांढरी पुनर्नवा त्रिदोषशामक असून लाल पुनर्नवा वात वाढविणारी व पित्तशामक आहे.

    चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:

    १)जखमेवर पुनर्नवाचा लेप लावतात.

    २)सुज आली असता पुनर्नवाच्या पानाने शेकतात.

    ३)हि लघ्वी साफ व्हायला मदत करते त्यामुळे शरीरातील क्लेद बाहेर टाकला जातो.

    ४)पुनर्नवा शरीरातील सर्व धातूंचे पोषण करून रसायन कार्य करते.

    ५)शरीरात रक्त कमी असल्यास पुनर्नवा यकृताचे कार्य सुधारून रक्त वाढिला सहाय्य करते.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      August 22, 2017