वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आपल्या संवादातून, लेखनातून, देहबोलीद्वारे आणि विविध क्रिया-प्रतिक्रियांतून आपण व्यक्त होत असतो. व्यक्त न होणाऱ्या व्यक्तीची घुसमट वाढत जाते. मोकळेपणाने मनांतील विषय एखाद्याला सांगितले कि मनावरचा ताण, दडपण कमी झाल्याचे देखील जाणवते. ह्या मोकळ्या होण्यातून आपल्या समस्यांचे निराकरण होत जाते.
February 7, 2022
दिनांक १४ ऑगस्ट २०१७ ला दैनिक प्रत्यक्षच्या राष्ट्रगंगेच्या तीरावर मधील सिद्धार्थ नाईक यांचा ‘हरेकाला हजब्बा यांची शाळा’ आणि निशिगंधा खांबे यांनी लिहिलेला लष्करी शिस्तीचे ‘अटूस’ हे दोन्ही लेख खूप आवडले.
September 19, 2017
काथ्यापासून व मऊशार लोकरीपासून तयार केलेल्या, मध्यमवर्गीयांच्या अवाक्याबाहेरअसलेल्या त्या महागड्या तुकड्यांवर पाऊल ठेऊन त्यांना खराब करण्याआधी शंभरदा विचार करावा लागला असता. ही डोअरमॅट्स खरेदी करणारी मंडळी त्यांना खरंच दरवाज्यात ठेवत असतील की त्यांच्या सौंदर्याने प्रभावित होऊन त्यांचं कौतुकाने शो केसमधे प्रदर्शन मांडत असतील? दैनंदिन जीवनातील एखादी वस्तू इतकी आकर्षक असू नये की तिला वापरण्याची इच्छाच होऊ नये !
August 2, 2017
कामावरून समाजात त्याची हेटालणी होत राहिली तर एक दिवस हे सारे असहय होऊन गुन्हेगारीकडे वळू शकतो हे दर्शविण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केला गेलेला आहे. या चित्रपटात एका डुकराला पकड्ण्यासाठी स्वतःच्या जीवाची काळजी न करता पळापळ करणार्या संपूर्ण कुटूंबाच राष्ट्रगीत सुरू असताना स्तब्ध उभं राहणं जे काही सांगून जात ते केवळ शब्दात व्यक्त करण अशक्य आहे
March 1, 2014

लांब पल्ल्याची गाडी अखेरच्या स्टेशनात म्हणजे मुख्य स्टेशनात आल्यानंतर तपासणीसाठी व इतर छोट्या-मोठ्या दुरुस्तीसाठी ज्या ठिकाणी नेतात ते ठिकाण म्हणजे 'यार्ड'. यार्डात प्रत्येक डब्याची कसोशीनं तपासणी होते, स्वच्छता होते व ती गाडी परत परतीच्या प्रवासासाठी सज्ज होते. या सर्व कामासाठी अनेक कर्मचारी फार कठीण परिस्थितीत यार्डात काम करीत असतात. उदाहरणार्थ, मुंबईतील माझगाव रेल्वेयार्डाच्या प्रसिद्ध झालेल्या समस्यांकडे पाहता येईल. काही वेळा कर्मचाऱ्यांना यार्डात जाण्यास योग्य रस्ता नसतो. ज्या रुळांवरून अनेक गाड्या वेगाने धावत असतात, त्या मार्गावरून जिवावर उदार होऊनच लाईन ओलांडावी लागते. त्यात भर म्हणून पावसाळ्यात वाढलेलं गवत, पाण्यानं भरलेले खड्डे यांचा सामना करावा लागतो आणि रात्रपाळीच्या कामगारांना तर ही सगळी कसरत काळोखातून करावी लागते. मेल व एक्सप्रेस गाड्यांच्या खाली उभं राहून काम करण्यासाठी पुरेशी जागा नसल्यानं सर्व काम वाकूनच करावं लागतं. चाकं तपासण्यासाठी बाजूनं जाण्यासाठी पुरेशी जागाच नसते. या पासून कँटीन फार दूर असल्यानं कँटीनपर्यंत पोहोचण्यासाठी बरंच चालावं लागतं आणि त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दुपारचा डबा अपरिहार्यपणे उन्हात कुठेतरी झाडाखाली बसून खावा लागतो. माझगाव रेल्वेया मध्ये अतिशय गलिच्छ अशी एक छोटीशी पत्र्याची शेड एका गटाराजवळ बांधलेली आहे. अशा परिस्थितीत काम उत्तम त-हेनं करणं अशक्य होत चाललेलं आहे.
मध्य रेल्वेच्या माटुंगा व वाडीबंदर या यार्डात डब्यांची मोठी दुरुस्ती केली जाते. तिथे दिवसेंदिवस सुट्या भागांची फार चणचण भासते आहे. शेवटी ठरावीक वेळात गाडी बाहेर काढणं आवश्यक असल्यानं 'इसकी टोपी उसके सर' या म्हणीप्रमाणे एका गाडीचे पार्ट्स दुसऱ्या गाडीला लावण्यावाचून पर्याय उरत नाही.
मेल व एक्सप्रेस गाड्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून, त्या प्रमाणात सुट्या सामानाचा पुरवठाही होत नाही. तरीही, अजून तरी गाडी रुळांवर येताना तिच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही असं रेल्वे जनसंपर्क अधिकारी ठामपणे सांगतात. हे यश यार्डातील कर्मचाऱ्यांचं आहे.
प्रवासीगाडी पुन्हा उत्तम स्थितीत आणून रुळांवर नेणं यामध्ये रेल्वे यार्डाची फार महत्त्वाची भूमिका असते. त्यामध्ये होणारी लहानशी चूकही प्रवाशांसाठी महागात पडते हेही तितकंच कठोर सत्य आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
July 16, 2022
अक्षय तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे सांगितले जाते. या दिवशी दुसऱ्या युगाला सुरुवात झाली होती.ही समजूत जुनी असली तरीही आपण यातून काही शिकण्यासारखे नक्कीच आहे.केशवसूतांच्या 'जुने जाऊ द्या मरणालागुन' या उक्तीप्रमाणे आपणच घालून दिलेल्या चौकटी, रूढी-परंपरा, रीतीरिवाज वेळोवेळी बदलत्या काळाच्या कसोटीवर तपासून घ्यायचे काम समाजपुरुषाने करायचे असते.त्यामुळे वर्षभर आलेले अपयश झटकून नव्या जोमाने अभ्यासाला लागा.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे.कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे, देशावर नाही. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी समजूत आहे.त्यामुळे विद्यार्थी मित्रहो, आजपासून पुन्हा अभ्यासाला लागा.आज केलेला अभ्यासाला क्षय लागणार नाही.कारण हा सन अक्षय आहे.
अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे.म्हणूनच संकल्प करा आज मी स्वत:ला अभ्यासात रुजवून घेणार आहे.व यंदा यशाची गोड फळे नक्कीच चाखणार आहे.
April 28, 2017
२६ जुलै २०१८ला कारगिल युद्धाला १९ वर्षे पूर्ण झाली. या युद्धानंतर सरकारने कारगिल रिव्ह्यू कमिटी स्थापन केली होती, या कमिटीला या युद्धाआधी झालेल्या चुका आणि त्यानंतर काय तयारी करायला पाहिजे याचे अवलोकन करण्याचे काम दिले होते. १९ वर्षानंतर या कमिटीने दिलेल्या मुद्द्यावर अंमलबजावणी झाली आहे की नाही हे बघणे जरुरी आहे.
July 26, 2018
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये प्रा. पु. द. कोडोलीकर यांनी लिहिलेला हा लेख
तत्कालीन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु आदरणीय डॉ. टी. के टोपे यांच्या शिफारसीमुळं मी वसईत प्राचार्य म्हणून रुजू झालो. त्याकाळी वसईगाव ही ग्रामपंचायत होती. त्यामुळं प्राध्यापकांना नियमाप्रमाणं घरभाडे, अन्य भत्ते मिळत नव्हते. बाहेरील प्राध्यापक इथं आर्थिक अडचण सोसून येण्यास तयार नव्हते. आर्थिक पात्रता असलेले विद्यार्थी मुंबईतील
महाविद्यालयात प्रवेश घेत. मुंबईच्या नामवंत महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी मोठ्या मनानं सहाय्य केले. आपले उत्तम प्राध्यापक दिले. हळूहळू परिस्थिती बदलली. पण प्रारंभी काही वर्षे अडचणींना तोंड देऊन मी महाविद्यालयाला स्थैर्य प्राप्त होण्यासाठी प्रयत्न केले. मी साहित्याचा विद्यार्थी. इंग्रजीचा प्राध्यापक.त्यामुळं मराठी बरोबरच इंग्रजी साहित्याचं मी वेळ काढून वाचन करीत असे. विनोदी वाङ्मय हे इंग्लंडचं खास वैशिष्ट्य! चॉसर पासून ते शेक्सपियर पर्यंत, डिकन्स पासून ते प्रिस्टले, वुडहाऊसपर्यंत या सर्व प्रतिभासंपन्न लेखकांनी विनोदी नाटकं, कादंबऱ्या लिहिल्या. उत्तम, दर्जेदार विनोद निर्मिती एकूण समाजाच्या अभिजात संस्कृतीची साक्ष देते!
मी संभाषणातून अधूनमधून विनोदी बोलतो. त्याचप्रमाणं आपण विनोदी लेखन करावं असं मला राहून राहून वाटतं.
मी कोकण साहित्यपरिषदेच्या कार्यात सहभागी असताना सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. राजा राजवाडे यांच्याशी माझा परिचय झाला. ते खूप विनोदी लेखन करीत. एकदा रत्नागिरी ते मुंबई कारनं प्रवास करताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. दुर्दैवानं त्या अपघातात ते गेले ! प्रत्येक वर्षी ते दिवाळी अंक काढत असत.त्यांच्या अपघाती मृत्युमुळं त्यांच्या पत्नी, त्यांचे सुपुत्र प्राचार्य माधव यांना धक्का बसला. पण त्यांनी आपल्या पित्याच्या दुर्दैवी देहावसानानंतर दिवाळी अंक प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. श्री. राजवाडे यांनी एक विनोदी कादंबरी लिहावयास घेतली होती. पण ती अर्ध्यावरच राहिली. प्रा. माधव राजवाडे यांनी ही अडचण श्री. माधव गडकरी, प्रा. वि.शं. चौघुले याच्यापुढं मांडली. मी समोरच होतो. त्यांना मी ती कादंबरी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. विनोदी लेखन करण्याची संधी सहजच चालून आली होती मी ती कादंबरी पूर्ण केली. सर्वांनीच माझ्या या प्रयत्नाचं कौतुक केलं.
त्यानंतरही मी अधूनमधून विनोदी लेखन करण्याचा प्रयत्न केला. 'मी मुख्यमंत्री झालो तर' या विषयावर विद्यार्थ्यांना लेख लिहायला सांगितले जाते. विद्यार्थी, विद्यार्थिनी आपल्या लेखात आपल्या अधिकाराचा (गैर) वापर करुन आपण संपत्ती कशी कमावणार, आपल्या नातेवाईकांचं कसं भलं करणार याचं वर्णन करतात. 'मन की बात' द्वारे पंतप्रधान जनतेशी संवाद साधतात. एक सामान्य पोलीस 'मन की बात' द्वारे आपल्याला होणाऱ्या त्रासाचं आणि वरिष्ठांकडून होणाऱ्या छळाचं वर्णन करतो. बडे अधिकारी मंत्री सर्वकाही करतात. पण गरीब बिचारा पोलीस मात्र अडकतो. पैशाअभावी तो कोर्टकचेऱ्या, बडे वकील यावर पैसे खर्च करु शकत नाही. ही त्याची 'मन की बात' मी विनोदी पद्धतीनं कथन केली. एक महाविद्यालय. तेथे एक विद्वान उत्तम विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, प्राचार्यासह अनेक प्राध्यापकांना त्याची विद्यार्थी, पालकप्रिय प्रतिष्ठा अस्वस्थ करते. त्यांच्यावर एक प्राध्यापिका अतिप्रसंग केल्याचा आरोप करते. प्रत्यक्ष न्यायालयात कॅमेऱ्यामधील चौकशीत ती प्राध्यापिका रडते आणि सर्वांनी माझ्यावर ‘अतिप्रसंग केल्याचा बहाणा करते.' असा दबाव आणला म्हणून मी खोटे आरोप केले असे न्यायाधीशांना सांगते. मी अशा कथा लिहिल्या. त्या मासिकात प्रसिद्धही झाल्या. विनोदी लेखन करण्याची माझी अजूनही तीव्र इच्छा आहे. माझे लेखन विनोदी आहे की हे विनोदी लेखन म्हणजे एक 'विनोदच' आहे असेही म्हणतील पण विनोदी लेखक म्हणून लिहिण्याची इच्छा मात्र माझ्या मनात शत्रूंवर हल्ला करण्यासाठी लपून बसलेल्या सैनिकांप्रमाणं आजही माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात ही इच्छा दबा धरुन बसलेली आहे. बऱ्याच वेळा शत्रू आसपास आल्याची खबर मिळते. झाडाझुडपात लपून बसलेल्या शत्रूंच्या हालचालीची खबर मिळते. सैनिक गोळीबार करतात. शत्रू सावध होतो. माझ्या विनोदी लेखनाच्या या गंभीर प्रक्रियेत असेही काही घडत राहते. त्यामुळं विनोदी लेखक म्हणून सातत्यानं लेखन करण्याचे मनोरथ आकाशात दाटलेले मेघ सोसाट वाऱ्यानं विखुरले जावे त्याप्रमाणे माझे मनोरथ एक प्रचंड भिंत कोसळावी त्याप्रमाणं अलगद कोसळतात. हे असं का होतं हे माझ्या मनाला समजत नाही. पण त्याची खंत मात्र माझ्या मनाला अस्वस्थ करते. यासाठी मी एखाद्या नामवंत मनोवैज्ञानिकांना माझे मन उघडे करुन माझी ही खंत, मनातील सल स्पष्ट करुन त्यांचा सल्ला, मार्गदर्शन घेण्याचा गंभीरपणे विचार करत आहे!
सध्या समाजात उघडपणे दिसणारी विसंगती मला विनोद लेखन करण्यास अधूनमधून अस्वस्थ करते. राजकीय क्षेत्रात नेते एकमेकांविरुद्ध 'तुम्ही चोर' असे प्रच्छन्नपणे आरोप करण्यात जितके पारंगत आहेत. तितकेच त्यांना वंदनीय असणाऱ्या थोरपुरुषांच्या पुतळ्यांची उंची वाढवण्यात मग्न आहेत! ही विसंगती माझी झोप उडवते.'पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आपले स्थान समाजात अत्यंत गौण आहे' असा नारा नारी मंडळी छेडतात पण त्याच नारी – महिला विवाहानंतर पुरुषांवर वर्चस्व गाजवतात. त्यामुळं आता स्त्रीमुक्ती ऐवजी पुरुषमुक्ती असा नारा देण्यात येईल असे मला वाटतं! सध्या फॅशन्सचे युग आहे. अनेक आकर्षक जाहिराती, चित्रपट, मालिकेमधील अभिनेत्रींच्या केशभूषा, वस्त्रे यांचे (अंध) अनुकरण तरुणी करतात, मग साहजिकच तरुणांची मने विचलीत होतात. पण आता त्यांच्या पोटात 'मीटू' मुळे भीतीचा गोळा उठला आहे! सर्व क्षेत्रांत विसंगतीचे थैमान आहे. विनोदी लेखनासाठी हे विषय मला सतत खुणावतात. पण 'संध्याछाया भिवविती हृदया!' ही माझी आजची शारीरिक आणि मानसिक अवस्था! त्यामुळं विनोदी लेखक होण्याचं काय म्हणतात ते स्वप्न की काय ते अधुरेच राहणार हे नक्की. हीच एक खंत माझ्या मनाला सतत डॉक्टरांच्या इंजेक्शनच्या टोचणीप्रमाणे टोचत राहणार. त्यामुळं काही मिनिटं गुंगी येणार! पण त्याला आता माझा म्हणाल तर ईश्वराचाही इलाज नाही!
-- प्रा. पु. द. कोडोलीकर
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
August 4, 2022
एखाद्या मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत प्रत्येक कर्मचाऱ्याला काम करण्यासाठी हार्डवेअर (संगणक व यंत्रसामुग्री) व सॉफ्टवेअर (आज्ञावली) उपलब्ध करून द्यावी लागते. केवळ प्रत्येकाला संगणक देऊन भागणार नाही तर सॉफ्टवेअर लायसन्स घ्यावे लागेल. जर नवीन कर्मचारी भरती झाला तर पुन्हा त्याच्यासाठी सॉफ्टवेअर व हार्डवेअर घ्यावे लागेल.
September 3, 2023

ह्याचे ०.५-१.५ मी उंच वर्षायू क्षुप असते.काण्ड सरळ असून फांद्या मजबूत असतात.पाने २.५-८ सेंमी लांब किंचित गोल अथवा हृदयाकृती,एकान्तर असतात पत्र धारा दन्तुर असतात.फुले पिवळसर निळे पुष्प दंड मोठा व त्यात १-३० फुले गुच्छात उगवतात.फळ काळे व गुच्छात येते.बीज काळे लहान कोवळे व विशिष्ट उग्रगंधी असते.बीज मगज पांढरा असतो.
बाकुचीचे उपयुक्तांग बीज व बीज तैल आहे.हे चवीला गोड,कडू,तिखट असून उष्ण आहे.तसेच हल्के व रूक्ष आहे.बाकुची कफवातनाशक व पित्त प्रकोपक आहे.
चला आता आपण हिचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)कृमींवर ५ दिवस बाकुची चुर्ण देऊन मग त्यावर एरंडाचे तेल पोटात देतात संडासला पातळ होऊन कृमी पडून जातात.
२)श्वित्र कुष्ठात व जीर्ण त्वचारोगात बाकुचीचा उपयोग होतो.
३)उष्ण असल्याने बाकुची कामोत्तेजक आहे म्हणून ती क्लैब्यात वाजीकर कार्य करते.
४)खरजेवर बाकुचीबी व कारळे गोमुत्रात वाटून लेप लावतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©Dr Swati Anvekar
January 15, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti