(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १८

    भवान्यै भवायापि मात्रे च पित्रे
    मृडान्यै मृडायाप्यघघ्न्यै मखघ्ने |
    शिवांग्यै शिवांगाय कुर्मः शिवायै
    शिवायांबिकायै नमस्त्र्यंबकाय ‖ १८ ‖

    शिवशक्ती हे अभिन्न ऐक्य. अर्धनारीनटेश्वर स्वरूपात त्यांचे एकरूपत्व वंदिले जाते. भवं भवानीसहितं नमामि ! अशा स्वरूपात आपण या युगुलाला वंदन करतो. प्रस्तुत श्लोकात आचार्यश्री देखील असे युग्मवंदन करीत आहेत.
    हे वंदन करीत असताना देखील आचार्यश्री दोघांच्याही बाबतीत समान स्वरूपाची विशेषणे वापरत आहेत. जणूकाही त्यातूनही ते या दोघांच्या एकरूपत्वाचेच निर्देशन करीत आहेत.
    भवान्यै भवायापि - आई भवानीला आणि भव असणाऱ्या आपणाला,
    मात्रे च पित्रे - मातेला आणि पितृ स्वरूप आपल्याला,
    मृडान्यै मृडायापि- मृडाणीला आणि मृड असणाऱ्या आपणास, भगवान शंकरांना मृडअसे म्हणतात. या संस्कृत धातूचा अर्थ संतुष्ट करणे असा आहे. संपूर्ण विश्वाला संतुष्ट करणारी भगवान शंकर मृड तर देवी पार्वती मृडाणी रूपात वंदिली जाते.
    अघघ्न्यै मखघ्ने - अघ म्हणजे पापाचा, कलंकाचा विनाश करणाऱ्या आईला आणि मख म्हणजे यज्ञाचा विनाश करणार्‍या आपल्याला, भगवान शंकरांनी दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा विनाश केला होता. त्या पौराणिक कथेचा येथे संदर्भ आहे.
    ते दक्षयज्ञाचा विनाश करणारे आहेत असे वर्णन केल्यामुळे समानता दाखवण्यासाठी आई जगदंबेच्या पाप विनाशक रूपाला आचार्य वंदन करतात.
    शिवांग्यै शिवांगाय- जिचे अंग,शरीर म्हणजे मूर्ती अतीव शिव म्हणजे पवित्र आहे अशा शिवांगी आणि शिवांग अशा आपल्याला,
    शिवायै
    शिवाय- शिव म्हणजे मंगल,पवित्र असणाऱ्या,
    अंबिकायै त्र्यंबकाय - अंबिका जगज्जननी ला आणि त्र्यंबक अशा आपणाला हात,
    नमस्कुर्म:- आम्ही वंदन करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 27, 2020


  • लाईटबोर्ड उर्फ लर्निंग ग्लास

    जेव्हा आपण मुलांकडून दिवसाचे चार तास ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करायची अपेक्षा करतो तेव्हा विविध गोष्टींचा वापर करून आपली लेक्चर्स जास्तीत जास्त इंटरेस्टिंग कशी होतील याची जबाबदारी प्रत्येक लेक्चररची असते. गुगल मीट किंवा झूम वर घेतलेली त्याच त्याच प्रकारची लेक्चर्स कंटाळवाणी ठरू शकतात.

      March 5, 2021


  • बाळक्रीडा अभंग क्र.१८

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      August 29, 2018


  • श्री अर्ध गणेश… कर्नाटक मधील !

    एखादी मूर्ती भंगली तर ते अशुभ मानून अशा मूर्तीचे तात्काळ विसर्जन केले जाते. परंतु येथे मात्र या अर्ध्याच मूर्तीची रोज वर्षानुवर्षे यथासांग पूजा केली जाते.

      January 19, 2018


  • गावाकडची अमेरिका – पार्श्वभूमी – १

    भारतीयांना, निदान मध्यमवर्गीय, उच्चविद्याविभूषित भारतीयांना आता अमेरिका काही नवीन राहिलेली नाही. आज अमेरिकेत राहणार्‍या भारतीयांची संख्या सुमारे २७.७ लाख आहे. एकूण अमेरिकन लोकसंख्येच्या जरी ही केवळ ०.९% असली, तरी ह्या वाढीचा वेग लक्षणीय आहे. सन २००० मधे अमेरिकेतील भारतीयांची संख्या सुमारे १७ लाख होती, आणि केवळ पाच वर्षांत, सन २००५ मधे ती २३ लाखांच्या पुढे गेली होती. ३८% वाढीचा हा वेग, सर्व एशियन लोकांमधे सर्वात अधिक होता. अमेरिकेत बाहेरून येणार्‍या लोकांमधे, केवळ हिस्पॅनिक (मध्य आणि दक्षिण अमेरिकेतल्या विविध देशांतून येणारे स्पॅनिश भाषिक लोक) लोकांची संख्या यापेक्षा वेगाने वाढते आहे. आज अमेरिकेमधे असलेल्या एशियन लोकांमधे चायनीज (३५.३%) आणि फिलिपिनो (३०.५%) लोकांखालोखाल भारतीयांचा नंबर लागतो.

    अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाणं किंवा तिथे नोकरीसाठी H1B व्हिसा मिळवणं हे दिवसेंदिवस भारतीयांच्या अंगवळणी पडत चाललंय. नुसतं उच्च शिक्षणाचा विचार करायचा म्हटलं तर, ‘यु एस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन’ या संस्थेचा २००८ सालचा अहवाल पाहणं उद्बोधक ठरेल. ही संस्था अमेरिकेतील सुमारे ३००० प्रथितयश शिक्षणसंस्थांचा आढावा घेऊन आपला अहवाल तयार करते. या अहवालानुसार, २००७-२००८ साली अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांपैकी तब्बल ६१% विद्यार्थी एशियन देशांमधून आलेले होते. सर्वाधिक विद्यार्थी पाठवणार्‍या ५ देशांमधले – ४ देश एशियन होते – { भारत(९४,५६३ विद्यार्थी), चीन (८१,१२७ विद्यार्थी), साउथ कोरिया (६९,१२४ विद्यार्थी), जपान (३३,९७४ विद्यार्थी) आणि कॅनडा (२९,७५१ विद्यार्थी)}. विशेष म्हणजे, गेली सात वर्षे सातत्याने सर्वाधिक विद्यार्थी पाठवून, या यादीत भारताने पहिला नंबर पटकावला आहे. परंतु २०१० साली मात्र, चीनने १२७,६२८ विद्यार्थी (एकूण परदेशी विद्यार्थ्यांच्या १८%) पाठवून, भारताला (१०४,८९७ विद्यार्थी - एकूण परदेशी विद्यार्थ्यांच्या १५%) दुसर्‍या स्थानावर ढकलले आहे.

    दरवर्षी दिल्या जाणार्या ६५,००० H1B व्हिसांपैकी सर्वात जास्त पदरात पडतात ते देखील भारतीयांच्याच. २००९ साली, ४८ % H1B व्हिसा भारतीयांना मिळाले होते तर दुसर्या नंबरवर असलेल्या चायनीजना मिळाले होते केवळ १०%.

    अमेरिकेतील भारतीय ढोबळ मानाने दोन गटांत मोडतात. एका गटातले लोक उच्चविद्याविभूषित असून विविध क्षेत्रांमधे आपल्या कर्तृत्वाने नाव कमावत आहेत. आजमितीला अमेरिकेतील डॉक्टरांपैकी सुमारे ३८% डॉक्टर्स भारतीय आहेत. NASA मधले ३६% कर्मचारी भारतीय आहेत. विविध शैक्षणिक, संशोधन संस्थांमधे १२% शास्त्रज्ञ भारतीय आहेत. सिलिकॉन व्हॅलीमधे तर भारतीयांचे योगदान डोळे दिपवून टाकणारे आहे. मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, गुगल, इंटेलसारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांमधे २५ ते ४०% कर्मचारी भारतीय आहेत. अनेक भारतीयांनी सिलीकॉन व्हॅलीमधे स्वत:च्या कंपन्या सुरू करून त्या यशस्वी करून दाखवल्या आहेत. सिटी ग्रूपचे विक्रम पंडीत आणि पेप्सीच्या इंद्रा नूयी ही अमेरिकेतील विविध क्षेत्रातील सर्वोत्तम कंपन्यांमधे सर्वोच्च स्थान आज भारतीय भूषवीत असल्याची ठळक उदाहरणे म्हणून दाखविता येतील. ह्युलेट पॅकार्डचे राजीव गुप्ता, पेंटीयम चिप तयार करणारे विनोद धाम, हॉटमेलचा निर्माता सबीर भाटीया, ए टी ऍंड टी बेल लॅबचे अरुण नेत्रावल्ली ही पटकन आठवणारी काही ठळक नावं.

    दुसर्‍या गटातले भारतीय म्हणजे व्यावसायिक. हे बहुदा मोटेल किंवा गॅस स्टेशन्स चालवणारे. पण एकंदरीत भारतीय म्हणजे सुशिक्षित, मेहनती, शिक्षणाला महत्व देणारे, पैशाचा विनियोग विचारपूर्वक करणारे. याच्याच जोडीला इंग्रजी भाषेवरचे प्रभुत्व हे भारतीयांच्या भात्यातील अमोघ अस्त्र. इंग्रजी भाषेवरच्या प्रभुत्वामुळे भारतीय, इतर देशांतून येणार्‍या लोकांवर सहज मात करू शकतात. या सार्‍या जमेच्या बाजूमुळे, आज अमेरिकेतल्या इतर वंशीयांमधे भारतीयांचा आर्थिक स्तर सर्वोच्च आहे.
    आपापल्या क्षेत्रातील कर्तबगारी व त्या अनुशंगाने आलेली आर्थिक सुबत्ता आणि स्थैर्य मिळवल्यावर साहजिकच पुढचे पाऊल म्हणजे सामाजिक योगदान आणि समाजकारण / राजकारणातील सहभाग. येथे येउन यशस्वी झालेल्या अनेक नामवंत भारतीयांनी सामाजिक तसेच राजकीय मंचावर देखील आपली छाप पाडली आहे. या क्षेत्रातील काही नामवंत मंडळी म्हणजे श्रीमती स्वाती दांडेकर (आयोवाच्या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटीवमधे २००२, २००४ आणि २००६ साली आणि स्टेट सिनेटमधे २००८ साली निवड), श्री बॉबी जिंदल (लुइसियाना राज्याचे गव्हर्नर), आणि श्रीमती निक्की हेली (साऊथ कॅरोलायना राज्याच्या गव्हर्नर).

    थोडक्यात म्हणजे शिक्षण, व्यवसाय, करिअर अशा वेगवेगळ्या निमित्ताने आज भारतीयांची रीघ अमेरिकेकडे सुरू आहे. अनेकांची मुलं अमेरिकेत स्थिरस्थावर झालेली आहेत. त्यांना भेटण्याच्या निमित्ताने किंवा केवळ पर्यटनाच्या हेतूने कैकजण अमेरिका दर्शन करून येत आहेत. अर्थात बहुतेक भारतीय उच्चविद्याविभूषित असल्यामुळे आणि वैद्यकीय, अभियांत्रिकी (engineering), कंप्युटर, मॅनेजमेंट, बॅंकिंग अशा क्षेत्रात असल्यामुळे त्यांचे वास्तव्य सहसा औद्योगिकदृष्टया प्रगत अशा राज्यांमधे किंवा मोठमोठया शहरांमधे असते. त्यामुळे अमेरिकेतील भारतीयांचे काही ठरावीक राज्यांमधे किंवा शहरांमधे मोठया प्रमाणावर एकत्रीकरण झालेले आढळून येते. सर्वाधिक भारतीय असलेली अमेरिकेतील राज्ये म्हणजे कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, न्यूजर्सी, टेक्सास आणि इलिनॉय. या राज्यांच्या तुलनेने थोडे कमी भारतीय असलेली राज्ये म्हणजे पेनसिल्व्हेनिया, फ्लोरिडा, मिशीगन, मेरीलॅंड, व्हर्जीनीया, जॉर्जीया आणि ओहायो. भरपूर भारतीय असलेली शहरे म्हणजे न्यूयॉर्क (शहर) , सॅन फ्रॅन्सिस्को- सॅन होजे- ओकलॅंड, सॅन डिऍगो, लॉस एंजेलीस , वॉशिंग्टन- बाल्टीमोर, फिलॅडेल्फिया, बॉस्टन, डेट्रॉइट, ह्युस्टन, डल्लास- फोर्टवर्थ, शार्लट आणि अटलांटा.

    तात्पर्य म्हणजे बहुतांशी भारतीयांचे अमेरिकेतील वास्तव्य अमेरिकेच्या अतिप्रगत, अद्ययावत आणि सधन अशा भागांमधे असते. त्यांना भेटायला येणारे, कॉन्फरन्सेस किंवा बिझिनेस मिटींगच्या निमित्ताने येणारे, किंवा केवळ पर्यटनाच्या हेतूने येणारे लोक देखील या मोठमोठया अद्ययावत शहरांमधेच वावरतात. त्यामुळे अमेरिका म्हटलं की सर्वसाधारणपणे आपल्या डोळ्यांसमोर एक अद्भूत आणि मोहमयी जादूनगरीचं चित्र तरळून जातं. गगनचुंबी इमारती, स्वच्छ रस्ते, खंडप्राय देशाच्या कानाकोपर्यांना जोडणारे हायवेज आणि त्यावर सुसाट वेगाने धावणार्‍या मोटारी, भव्य शॉपिंग मॉल्स, प्रचंड मोठी दुकाने, आलिशान घरं, लहान गोष्टींचे देखील झालेले यांत्रिकीकरण (automation), सिलीकॉन व्हॅली आणि नासाचं माहेरघर, हॉलिवूड आणि डिस्नेवर्ल्डची स्वप्नमयी दुनिया, मॅक्डॉनल्ड आणि पिझ्झा हट सारख्या जगभर पसरलेल्या फास्टफूड चेन्सचं उगमस्थान, हे असं सगळं वाचून, ऐकून, प्रत्यक्षात किंवा हॉलिवूडच्या चित्रपटांतून बघून आपल्या डोक्यात अगदी पक्क बसलेलं असतं.

      May 30, 2015


  • चिकू

    चिकू मुख्यत्वे करून महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल या प्रदेशात होतो. पूर्व महाराष्ट्रात फक्त ठाणे, रायगड जिल्ह्यात समुद्रकिनारपट्टीत लागवड करतात. वास्तविक पाहता चिकूचे झाड अमेरिकेतून आपल्याकडे आलेले आहे. आपल्याकडे झाडाचा उपयोग केवळ फळासाठी करतात पण काही देशात त्यांच्या पांढऱ्या शुभ्र व घट्ट चिकाचा उपयोग च्युईंगमसाठी करतात.

      December 8, 2023


  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ३१

    भगवान श्रीविष्णुच्या वक्षस्थळावरील श्रीवत्स चिन्हाचे आणि कौस्तुभ मण्याचे सौंदर्य वर्णन केल्यानंतर आचार्य श्रींची दृष्टी तेथे असणाऱ्या अत्यंतिक वैभवसंपन्न अशा वैजयंती माले कडे जाते. त्या अम्लान अर्थात कधीही न कोमेजनाऱ्या माळेचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,

      January 3, 2021


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग एकोणऐशी

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग 36

    नैवेद्यम् समर्पयामी - भाग दहा

    नैवेद्याचे पान कसे वाढावे याचेदेखील एक शास्त्र आहे. हे नैवेद्याचे पान वाढताना मीठ वाढायचे नसते. कारण हे समुद्रातून आलेले असते. बाजारातून आलेले असते. धुतलेले नसते. जंतुसंसर्ग झालेला असतो, म्हणून कदाचित त्याचे मानाचे स्थान गेले असावे. पण समुद्री मीठाऐवजी सैंधव मीठ किंवा सेंदेलोण किंवा उपवासाचे मीठ चालते. हे मीठ खनिज प्रकारातील आणि औषधी गुणांनी भरपूर असते.

    शक्यतो केळीच्या पानावर नैवेद्य वाढायचा असतो. आदर्श वाढलेले पान कसे असावे, याचे प्रात्यक्षिक म्हणजे नैवेद्याचे पान होय.
    याचे वर्णन मागे एका टीपेमधे केलेले आहे.

    सर्वसाधारणपणे आजच्या भाषेत ही राईसप्लेट असते. पण त्यावर वाढलेल्या अन्नपदार्थांचे प्रमाण तुलनात्मक किती असते, ते महत्त्वाचे आहे. पानाची डावी बाजू उजवी बाजू या संतुलीत असतील तर वेगळे प्रोटीन व्हिटामिन्स मोजत बसण्याची आवश्यकता नाही. लिंबामधे कितीही व्हिटामिन सी असले तरीही, नैवेद्याच्या पानावर, डाव्या बाजूला एका लिंबाच्या आठ फोडींपैकी एकच फोड घ्यायची असते. कोशिंबीरीमधे कितीही फायबर असले तरीही कोशिंबीर फक्त दोन चमचेच. दही पण चमचाभरच असते, पापड पण एकच. लोणच्याची एकच फोड. भजी दोन चिकोडी कुरडया प्रत्येकी एकेक. चटणी चमचाभर. उजवीकडे दोन मूद भात, त्यावर वरण तूप. एक मूद मसालाभात, एखादा गोड पदार्थ, आमटी, उसळ, सुकी भाजी, पुरी किंवा भाकरी,
    एवढे आदर्श प्रमाण आपल्याला या नैवेद्याच्या पानातून मिळत असते. खरंतर तेवढीच गरज असते. नंतरचे असतात ते जीभेचे चोचले ! हे जास्त खाल्लेले अन्न पचविण्यासाठी जास्त हालचाली, जास्त श्रम करावे लागतात. नाहीतर हे अन्न तसेच साठून राहते आणि अंगाखांद्यावर नाचू लागते.

    हा नैवेद्य सेवन करून म्हणा, आपल्या सर्व देवी देवतांची शरीरयष्टी किती आखीव रेखीव असते ना ! एकही देवता बेढब नाही. (लंबोदराचे उदर लंब आहे कारण त्याने एका दैत्याला पोटात धारण करून ठेवले आहे. मोदक खाऊन नव्हे, किंवा गणेशजी नरमांसभक्षक होते, असा विकृत विद्रोह कुणी करू नये, प्राकृत डोक्यात असं काही येणार नाही, पण आहेत काही टाळकी, त्यांच्यासाठी हा खुळासा खुलासा. )

    नैवेद्य प्रोक्षण करण्यासाठी तुळशीची मंजिरी वापरतात. गायत्री मंत्र म्हणत, वाढलेल्या सर्व पानावर तुळशीच्या मंजिरीने पाणी शिंपडून घेतात. हे पान तुळशीचेच का तिथे कडूनिंब किंवा आंब्याचे पान का नाही ? यामागे देखील शास्त्र असेल, फक्त आमचा शास्त्र शोधण्याचा दृष्टीकोन प्राकृत नसल्यामुळे उलगडा होत नाही. देवाच्या षोडशोपचार पूजेमधील स्नानाचे अभिमंत्रित जल आंब्याच्या पानानी उडवले जाते. तिथे तुळस नाही वापरली जात. किंवा औषधी गुणांनी भरलेला असला तरी कडूनिंबाची पाने नाही वापरली जात. कडूनिंब गुढीच्या वेळीच गुढीला बांधावा, तिथे तुळस नाही बांधत. आंब्याची पाने तोरणासाठी, आणि विष्णुला सहस्त्र तुलसीदलेच वाहातात.

    या केवळ रूढी परंपरा नाहीत, यामागे विशिष्ट ज्ञान किंवा शास्त्र आहे. आयुर्वेद हा असाच आहे. विज्ञानवादी शास्त्रोक्त !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    02362-223423.
    29.06.2017

      June 29, 2017


  • राष्ट्रीय युद्ध स्मारक राष्ट्राला समर्पित

    राष्ट्रीय युद्ध स्मारकाची निर्मिती करण्याबाबत १९६८ मध्ये चर्चा झाली होती. मात्र, प्रत्यक्षात २०१५ मध्ये या स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात झाली.राष्ट्रीय युद्ध स्मारकात चार वर्तुळ असून, त्यांना ‘अमर चक्र’ ‘वीरता चक्र’ ‘त्याग चक्र’ आणि ‘रक्षक चक्र’ अशी नावे देण्यात आली आहेत.

      February 27, 2024


  • नमस्कार – भाग ९

    नमस्कारानंतर करायची प्रार्थना. या पूजेमधे माझे काही चुकले असेल तर देवा मला क्षमा कर. क्षमा मागण्यात कोणताही कमीपणा नाही. प्रत्येक धर्मात या प्रार्थना आहेत. प्रार्थनेमधे मोठी शक्ती आहे. सामुहिक प्रार्थनेत तर आणखी जास्त शक्ती मिळते. येथे शक्ती हा शब्द शब्दशः अर्थाने वापरायचा नाही.

      July 23, 2017