वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास मोठा रंजक आहे पण त्याच बरोबर बदलत्या काळानुरुप स्वरुप पालटलेल्या भारतीय चित्रपट सृष्टीचा वर्तमान काळ देखील रंजक म्हणता येईल भारतीय चित्रपट सृष्टीने भारतीय रसिकांसाठी केवळ मनोरंजनाची कवाडे उघडली नाहीत तर समाज प्रबोधनाच्या कार्यासही हातभार लावला आहे.
September 17, 2010
अमेरिका हे एक प्रगत राष्ट्र आहे. म्हणजे डॉलरला जगाच्या बाजारात किंमत आहे. हे जरी खरे असले तरी अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणात काही निर्माण होत असेल असे वाटत नाही. कॅलिफोर्नियासारख्या भागात शेती, द्राक्ष, बदाम, भाजीपाला आणि कोंबड्या, गाई, मेंढ्या, बोकड यांची निपज, वाढ आणि विक्री (त्यासाठी मोठमोठी कुरणं, slaughtering houses) मोठ्या प्रमाणात असली तरी नानाविध लहानमोठे कपडे, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोटारी बहुतेक वेळा परदेशांमधूनच येतात.
January 20, 2024
आजवर चित्रपटगृहातील पांढरा पडदा “दाखवायचा”, काल मी त्याला दोन तास बोलताना पाहिलं. ही किमया साधलीय विधू विनोद चोप्राने ! शरणार्थी (?- हा शब्दच मुळात चुकीचा आहे – कोणाला शरण आलेत ते , जर मुळातून हा देश तुमच्या माझ्या इतकाच त्यांचा आहे.) काश्मिरींनी मूकपणे १९९० पासून जे सोसलंय, जे फारसं कालपर्यंत मलाच माहीत नव्हतं, त्या साऱ्यांच्या वतीने काल त्या पांढऱ्या पडद्याला बोलताना मी पाहिलं. कमल हसन च्या “पुष्पक ” प्रमाणे हा चित्रपट शब्दहीन असता तरी चाललं असतं.
February 27, 2021
सेवानिवृत्ती हा आयुष्यातला एक नवीन टप्पा. येथेच ‘स्व’चा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होते. या आनंदाचा शोध घेत घेत मार्गक्रमण करणे हेच खरे निवृत्तीनंतरचे कार्य.
December 17, 2021
एखाद्या व्यत्त*ीचे निधन झाल्यावर त्याच्या आप्तस्वकीयांना दु:ख होणे स्वाभाविक असते. डोळ््यांतील अश्रूंची वाट मोकळी करून हे दु:ख व्यत्त* केले जाते. दु:खाचा तो स्वाभाविक उद्रेक असतो परंतु बरेचदा असेही आढळून येते की, मृत व्यत्त*ीशी कुठलेही भावनिक संबंध नसलेली माणसेही आपल्या न झालेल्या दु:खाचे अतिरेकी प्रदर्शन करीत असतात.
June 25, 2006
सौभाग्यलेणं यामध्ये सर्व प्रथम पहिला मान किंवा महत्व “हळदी कुंकू” यांस आहे. कुंकुमतिलकाचा अलंकार अगदी लहानपणापासूनच लाभतो. कुंकू हे सौभाग्याचे प्रतिक तर हळद मांगल्याचे प्रतीक मानले जाते.
March 1, 2024
मुंबईतील मराठी माणसांच्या उद्योग-व्यवसायात ९० वर्षांची परंपरा असलेले “दि गिरगाव पंचे डेपो प्रा. लि.” हे दुकान अग्रभागी आहे. मुंबईतील दादरसारख्या मध्यवर्ती भागात असलेल्या या दुकानात मराठी माणूस खरेदीसाठी दूरदूरच्या ठिकाणांहून येतो.
देवीच्या साड्या हे “गिरगाव पंचे डेपो”चे खास वैशिष्ट्य. याचबरोबर इतरही सूती कपडे, खासकरुन मराठी ग्राहक आणि कुटुंबांमध्ये वापरले जाणारे कपडे यांच्या व्यवसायात “गिरगाव पंचे डेपो” अग्रस्थानी आहे.
९० वर्षांपूर्वी, १९२६ मध्ये स्वर्गिय महादेव यशवंत कुलकर्णी यांनी या उद्योगाची सुरुवात केली. खरंतर त्यापूर्वीपासूनच त्यांनी कोकणातून पंचे वगैरे वस्तू आणून घरोघरी विकण्याचा व्यवसाय सुरु केला होताच. त्याचीच पुढची पायरी म्हणजे सुरुवातील गिरगावात आणि नंतर एका वर्षात, १९२७ मध्ये दादर येथे त्यांनी दुकान थाटले.
त्यानंतर त्यांचे चिरंजीव अरविंद महादेव कुलकर्णी यांनी दुकानाची जबाबदारी सांभाळली. ते महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष होते. सध्या श्री रमाकांत अरविंद कुलकर्णी हे या दुकानाची धुरा सांभाळत आहेत. या कामात त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अर्चना यांची साथ आहे.
आता कुलकर्णी कुटुंबाच्या सदिच्छा व स्वराज या चौथ्या पिढीने या व्यवसायात पदार्पण केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत असलेल्या या पिढीने आता या उद्योगाला ऑनलाईन जगात आणण्यासाठी पाऊल उचलले आहे. लवकरंच “गिरगाव पंचे डेपो”मधील विविध वस्तू ऑनलाईन शॉपींगच्या माध्यमातून घरबसल्या मागवण्याची सोय सुरु होणार आहे.
“देवीच्या साड्यां”नी कुलकर्णींच्या व्यवसायाला भरभराट आणली. त्यामुळे ऑनलाईन व्यवसायाची सुरुवात देवीच्याच साड्या नवरात्रीनिमित्त ग्राहकांपर्यंत पोहोचवून करण्याचा त्यांचा निर्णय अगदी योग्यच आहे.
मराठी ग्राहकाने ज्याप्रमाणे कुलकर्णींच्या तीन पिढ्यांवर प्रेम केले आणि त्यांना साथ दिली तशीच साथ या नव्या पिढीलाही मिळेल याबद्दल रमाकांत आणि अर्चना कुलकर्णींच्या मनात अजिबात संदेह नाही.
<!--घटस्थापनेच्या शूभमुहुर्तावर देवीच्या साड्यांची ऑनलाईन विक्री सुरु झाली आहे.
सर्व साड्यांसाठी घरपोच डिलिव्हरी सेवा मुंबई आणि ठाणे विभागात उपलब्ध.
डिलिव्हरी चार्जेस - रु.७०/- प्रति साडी. डिलिव्हरी ३ दिवसात मिळेल
रंगाच्या निवडीसाठी फोनवरुन संपर्क साधावा व त्यानंतर ऑनलाईन लिंकवर जाऊन पैेसे भरावेत. आपला पत्ता आणि फोन नंबर आमच्याकडे इ-मेलने पाठवावा.
पैसे भरण्यासाठी येथे क्लिक करा
[supsystic-tables id='1']
[supsystic-tables id='2']
-->
पत्ता - ३५४, एन सी केळकर मार्ग, दादर, मुंबई ४०००२८
फोन - 9869007736
इ-मेल - ramakantarchana@gmail.com
September 29, 2016
पानगळ म्हणजे आयुष्याची शेवट असे आपल्याला वाटते. पानगळ आपल्याला जाणीव करून देते शेवटच्या क्षणांची. पण पानगळ होणार म्हणून पानं फुलायची थोडीच थांबतात. विचारांची ही पानगळ असते. सुचतं तेव्हा खूप सुचतं. जेव्हा सुचतं तेव्हा निसर्गातील घटना, सौंदर्य विचार करायला भाग पाडतात. घटना दुःखद असो वा सुखद, मन संवेदनशील असेल तर विचारांचा उत्सव फुलतो. मन निर्विकार असेल तर विचारांची पानगळ ठरलेली असते.
June 17, 2026
विश्वचषकातील पहिला त्रिक्रमवीर चेतन शर्मा.
January 3, 2011
एखाद्याच्या वर प्रभू रामचंद्र प्रसन्न होतात पण त्यासाठी जशी त्याची भक्ती कारणीभूत असते तशी त्याचे पूर्व सुकृत सुद्धा जबाबदार असते. समर्थांच्या बाबतीत त्याचे पूर्व सुकृत प्रचंड होते. त्यांच्या आधीच्या २१ पिढ्या रामाची उपासना करीत होत्या. २१ पिढ्या गेल्यावर प्रत्यक्ष हनुमान त्यांच्या रूपाने पुन्हा रामनामाचा प्रचार करण्यासाठी त्याच्या कुळात प्रगट झाला. अशा या परम पावन कुळात, राम नवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता, जांब या गावात समर्थांचा जन्म झाला. समर्थांच्या रूपाने प्रत्यक्ष हनुमानानेच जणु पुन्हा मानव देह धारण केला. लहानपणापासून वैराग्य वृत्तीचे समर्थ प्रपंचाबद्दल उदासीन होते.
कुठेतरी आडगळीत एकांती बसावे आणि चिंतन करावे असा दिनक्रम चालू असताना एके दिवशी त्यांच्या आईने त्यांना विचारले-बाळ आडगळीत काय करतो आहेस ? समर्थांनी उत्तर दिले "आई, चिंता करतोय विश्वाची". लहानपणापासून त्यांनी विश्वाची चिंता केली आणि ती चिंता सर्वव्यापी होती.
मुलाने प्रपंच करावा म्हणून त्यांच्या आईने त्यांच्या लग्नाचा घाट घातला. समर्थांना प्रपंचात गुंतून राहणे मान्य नव्हते. त्यांनी लग्नाचा मंडप दारात उभा राहत असलेला पाहीला आणि सरळ कुणालाही न सांगता नाशिक जवळील टाकली हे गाव गाठले. (पळून गेले नाहीत ....पण आईला न सांगता गेले ) प्रभू रामचंद्र आणि सीता माई या शिवाय आता कुणीही नाही आणि विश्वाची चिंता कार्यवाहित आणायची तर आपण संसारात आडकणे योग्य नाही म्हणून संसार बंधनात त्यांनी स्वतःला गुंतून ठेवले नाही. समर्थांनी टाकली येथे घोर अनुष्ठान केले. उपासनेशिवाय सामर्थ्य नाही आणि सामार्थ्याशिवाय लोकोद्धार नाही हे त्यांनी जाणिले .
"राम तुज कारणे, जिवलगांचा संग सोडला ...! असे म्हणत त्यांनी १२ वर्षे घोर तप केले. उग्र अनुष्ठान केले. श्री राम प्रभूंनी त्यांना दर्शन दिले आणि त्यांचा जन्म कृतकृत्य झाला. खरे तर प्रभूंच्या दर्शनाने त्यांचा मानव जन्म सफल झाला होता. करायचे असे काहीही राहिले नव्हते परंतु खुद्द हनुमानाने घेतलेले हे मानव रूप काही तरी विशेष करण्यासाठीच होते.
समर्थ प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाल्यावर संपूर्ण देशभर फिरले. अफगाणिस्थान ..पाकिस्थान ...नेपाळ...भूतान या आजच्या देशात समर्थ गेले होते. हिमालयापासून लंकेपर्यंत त्यांनी भ्रमण केले. लोकांचे दुखः पाहीले. धर्माचा ऱ्हास अनुभवला. आणि यवनांच्या अत्याचाराची त्यांना कल्पना आली.
समर्थांनी आपल्या सामर्थ्य बळाने अखिल राष्ट्र संघटीत केले.
-- चिंतामणी कारखानीस
February 23, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti