वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
एका ऋचा ( श्लोक ) मध्ये कितीतरी गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. ह्यांचा सखोल आभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल कि त्या काळातील ऋषी मुनि प्रत्येक विषयाचा किती साकल्याने विचार करीत होतें.
March 7, 2012
अखेर तो सुप्रीम कोर्टाचा मच्-अवेटेड् निकाल जाहीर झाला , की, ‘समलेंगिकता हा गुन्हा नव्हे’ .
( संदर्भ: बातम्या , लोकसत्ता दि. ७ सप्टे. २०१८ . टाइम्स ऑफ् इंडिया ७ सप्टें. २०१८, आणि इतर). आपण अनेकदा बोलतांना-लिहितांना, ‘दि कोर्ट इन इट्स् विज़डम्’ असा शब्दप्रयोग करतो, तो किती यथार्थ आहे, याची पुनश्च एकवार जाणीव झाली.
September 12, 2018
देशात पुरेसा पैसा चलनात असला तर उपभोगासाठी त्याचा वापर करून काही रक्कम बचत केली जाऊ शकते. या बचतीने बँकातील ठेवी वाढतात आणि त्यामुळे बँका अधिक कर्ज देऊ शकतात. उपभोक्ते, उद्योजक, शेतकरी, व्यापारी यांना अधिक कर्ज मिळाल्याने अधिक उत्पादन, अधिक विक्री आणि अधिक निर्यात शक्य होते.आणि त्यातू देशाची आर्थिक प्रगती साधता येते.
January 19, 2022
सध्या १२ लाख कोटी रुपयांचे बनावट चलन भारतीय अर्थव्यवस्थेत घुसले असल्याचा एक अंदाज आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीनुसार, बॅंकेच्या वेगवेगळ्या शाखांमधून चार लाख बनावट नोटा उघडकीस आल्या. २०००-२००१ मध्ये दहा लाखांत तीन बनावट नोटा, असे प्रमाण होते, ते दहा लाखांत आठ इतके वाढले आहे.
January 30, 2014
कालपासून स्टेट बॅंकेने विजय मल्ल्यांचं ७ हजार कोटींचं कर्ज माफ केल्याची पोस्ट सगळीकडे फिरत आहे..हे कुणीतरी अज्ञानातून अथवा जाणून बुजून जनतेचा बुद्धीभेद करावा यासाठी करतंय अशी दाट शंका येते आणि लोकही किंचितसाही विचार न करता अशा पोस्टवर चर्चा करत बसतात व पुढे पुढे पाठवत राहातात.
November 21, 2016
सन १८९९ मध्ये जर्मनीत पहिली हाय स्पीड ट्रेन अर्थात अतिवेगवान ट्रेन सुरू झाली. तेव्हा तिचा वेग ताशी ७२ कि.मी. होता. पुढे १९०३ सालापर्यंत हा वेग ताशी २०६ कि.मी. इतका झाला होता.
१९५७ साली जपानमध्ये ताशी १४५ कि.मी. वेगाची पहिली गाडी सुरू झाली. १९६४ ऑलिंपिकचे औचित्य साधून टोकियो ते ओसाका ही पहिली बुलेट ट्रेन ताशी २१० कि.मी. वेगानं धावू लागली.
फ्रान्समध्ये ताशी ५४० कि.मी. इतका प्रचंड वेग घेणारी जगातील प्रथम क्रमाकांची वेगवान गाडी धावली, पण ती फक्त तंत्रज्ञान तपासण्याकरता वापरली गेली. २००७ पासून फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, या देशांना जोडणाऱ्या अतिजलद गाड्या (२५० ते २७० कि.मी. ताशी) २०० गावांपर्यंत पोहोचल्या आहेत.
स्पेनमध्ये ताशी ३१० कि.मी. वेगाने जाणाऱ्या गाड्यांचं जाळं ३१०० कि.मी. इतकं आहे. जपानमध्ये २३८८ कि.मी., तर तैवान मध्ये ३४५ कि.मी. लांबीचं जाळं आहे.
जगात आज पहिला क्रमांक चीनचा असून १०,००० कि.मी. लांबीच्या रेल्वे जाळ्यावर ताशी २५० ते ४३० कि.मी. वेगाने जाणाऱ्या गाड्या धावत असतात.
-डॉ. अविनाश वैद्य
November 20, 2022
१७ जुलै १९४७ चा तो दिवस. मुंबईहून सकाळी आठ वाजता रेवसकडे जाण्यास निघालेली ‘रामदास’ बोट मुंबई बंदरापासून अवघ्या ९ मैलांवर असलेल्या ‘काश्या’च्या खडकाजवळ प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे कलती होऊन समुद्रात बुडाली. तिच्याबरोबर त्या बोटीने प्रवास करणा-या सुमारे हजारभर प्रवाशांपैकी सुमारे ६२५ जण समुद्रात बुडून मरण पावले. या भीषण दुर्घटनेतून २३२ उतारूंचा सुदैवाने जीव बचावला. त्यात रामदास बोटीचा कप्तान शेख सुलेमान हा होता.
July 17, 2022
October 25, 2016
दत्तगुरूंची हि आवडीची भाजी म्हणून हिचा उल्लेख गुरुचरित्रात देखील आढळते.तसेच गुरुचरित्र वाचनाचे उद्यापन करतात तेव्हा घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य केला जातो.अशी हि भाजी ब-याच जणांना आवडत असली तरी फारशी खाल्ली जात नाही त्यामुळे थोडी उपेक्षितच म्हणावी लागेल.
हि भाजी फार चविष्ट लागते.तशी चवीला तुरट गोड व थंड असून हि शरीरात वात दोष वाढविते व कफ व पित्त दोष कमी करते.
चला हिचे औषधी उपयोग पाहूयात:
१)घसा बसणे कोरडा खोकला ह्यात घेवड्याच्या शेंगांचा रस मध व ज्येष्ठमध घालून प्यायला द्यावा.
२)घेवड्याच्या शेंगांचे सूप करून सर्दी,घसादुखणे अशा तक्रारींमध्ये मिरपुड घालून प्यावा फायदा होतो.
३)आजारपणातुन उठल्यावर तोंडाला रुची नसल्यास घेवड्याची भाजी फुल्क्यांसह खावी.
४)पायदुखणे,गुडघे दुखी,पाय मुरगळणे ह्यात घेवड्याचा पाला व सुंठ एकत्र वाटून गरम करून लेप लावावा.
घेवडा अतिप्रमाणात खाल्ल्यास पोटफुगते व गॅसेसचा त्रास होतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
November 28, 2016
हा वृक्ष २५ ते ३० फुट वाढणारा असून तो आकाराने मोठा आहे. उभ्या व लांबट अशा त्याच्या खपल्या पडतात. त्याची पाने ही ऋतूपर्णी, चामड्यासारखी १३ ते २० से.मी. वाटूळकी व देठाकडे निमुळती होणारी असतात. शेंडे पिवळसर असतात. त्याची फळे ही २.५० ते ५ से.मी. लांब चामड्या सारखी जाड पंख, निमुळती व त्यावर आडव्या रेषा व त्याला पंचाकृती आवरण असते.
August 19, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti