वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कृष्णविवर म्हणजे आपल्या अतितीव्र गुरुत्वाकर्षणापायी आपल्याकडच्या प्रकाशालासुद्धा बाहेर पडू न देणारी वस्तू. प्रकाशही बाहेर पडत नसल्यामुळे, कृष्णविवराच्या केंद्रापासून ठरावीक अंतरापर्यंत, कुठली घटना घडते आहे, ते आपल्याला बाहेरून दिसू शकत नाही. या अंतराला कृष्णविवराचं ‘घटनाक्षितिज’ म्हटलं जातं. एका दृष्टीनं कृष्णविवराचा हा आकारच! कृष्णविवराचा हा आकार त्याच्या वजनावर अवलंबून असतो. कृष्णविवराचं वजन जितकं जास्त, तितका त्याचा आकार मोठा. जेव्हा दोन कृष्णविवरांचं विलीनीकरण होतं, तेव्हा नव्या कृष्णविवराचं वजन हे दोन्ही कृष्णविवरांच्या एकत्रित वजनापेक्षा कमी असता कामा नये, हे अपेक्षितच आहे. तसंच, विलीनीकरणातून निर्माण झालेल्या या कृष्णविवराचा आकारही, दोन्ही कृष्णविवरं एकत्रित केल्यानंतर अपेक्षित असलेल्या आकारापेक्षा कमी असता कामा नये.
May 5, 2022
व्यावहारिक जगतातील अशा प्रत्येक अनुभवांनी जीवाला समृद्ध करणाऱ्या , सुख प्रदान करणाऱ्या प्रज्ञा रुपी बुद्धीचे कार्य ज्यांच्या शक्तीने चालते त्या भगवान श्रीगणेशांना प्रज्ञापती असे म्हणतात.
February 1, 2022
जेवढ्या वेळा आपण डोळ्यांची उघडझाप करता त्या प्रत्येक वेळी डोळ्यांमध्ये अश्रू तयार होतात. अश्रू हे तेल, पाणी आणि बलगम यांचे मिश्रण आहे. अश्रू डोळ्यांचे रक्षण करतात. डोळ्यांमधील ओलावा टिकवून ठेवतात. पण काही वेळा डोळ्यांतून अश्रू येणे बंदच होऊन जाते. डोळे कोरडे पडतात. डोळ्यांना खाज सुटते. या समस्येतूनच पुढे डोळ्यांना जखम होण्याची आणि त्यातून संसर्ग होण्याची शक्यता असते. जर आपल्याही डोळ्यांना खाज सुटत असेल, डोळे खूप लाल होत असतील, डोळे थकल्यासारखे वाटत असेल तर आपल्याला आय सिंड्रोम हा त्रास होत आहे.
यावर उपाय काय? जाणून घ्या.
डोळ्यांची उघडझाप करा, डोळ्यांचा थकवा कमी होईल.
सतत कंप्युटरवर काम करण्यासाठी अथवा वाहन चालवल्यासाठी एकटक बघावे लागते. खूप वेळ एकटक बघताना डोळ्यांची उघडझाप कमी होते. डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो. डोळ्यांची उघडझाप ही सामान्य प्रक्रिया आहे. हवेसोबत डोळ्यात विविध प्रकारचा कचरा जातो. डोळ्यांची उघडझाप केल्यावर निर्माण होणारे अश्रू हा कचरा साफ करतात आणि डोळ्यांचा ओलावा कायम ठेवतात.
कंप्युटरवर खूप वेळ काम करणे.
कंप्युटरवर खूप वेळ काम केल्यावर डोळे थकल्यासारखे वाटते. सतत एकटक कंप्युटरकडे बघताना डोळ्यांची उघडझाप कमी होते आणि डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो. यावर उपाय म्हणून थोड्या वेळाने काम थांबवून मुद्दाम डोळ्यांची उघडझाप करा.
गाडी चालवताना डोळ्यात धूर, हवा आणि धुलीकण जाणे.
वाहन चालवताना डोळे कोरडे पडण्याची तसेच डोळ्यात कचरा, धूर, धुलीकण जाण्याची शक्यता आहे. धुरामुळे डोळ्यांचा ओलावा कमी होते. अश्रूंचे प्रमाण कमी होते.
वाढते वय आणि हार्मोनमधील बदलांमुळे डोळे कमकुवत होतात. वाढते वय आणि शरीरात होणारे बदल याचा डोळ्यांवर परिणाम होतो.
व्हेरिकोज व्हेन्स आणि मधुमेह.
व्हेरिकोज व्हेन्स आणि मधुमेहासारख्या आजारांनी पीडित असलेल्यांना डोळ्यांच्या समस्या हमखास जाणवतात. अशा मंडळींना डोळे कोरडे पडणे हा त्रास अनेकवेळा होण्याची शक्यता आहे. मधुमेहामुळे तर डोळे कमकुवत होण्याची शक्यता असते. काही वेळा तर थेट दृष्टीपटालवर परिणाम होऊन डोळे कायमचे कमकुवत होण्याची शक्यता असते.
डोळ्यांना पुरेसा आराम देण्यासाठी सोपे आणि प्रभावी उपाय. कंप्युटरवर काम करताना, वाहन चालवताना मुद्दाम थोडा वेळ थांबून डोळ्यांची उघडझाप करा, थोडे इकडेतिकडे बघा आणि पुन्हा आपले काम सुरू करा. आपण आय स्पा वापरुन डोळ्यांचा कोरडेपणा कमी करू शकता. आय स्पा डोळ्यांना सुटणारी खाज, डोळ्यांचा थकवा, डोळ्यांचा कोरडेपणा यावर उपाय करतो. बाजारात विविध चांगले ड्रॉप्स उपलब्ध आहेत.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
November 21, 2016
राष्ट्रीय कॅलेंडरची तारीख दररोज आकाशवाणी व दूरदर्शनवर प्रसारण सुरु होताना सांगितली जाते. प्रमुख वर्तमानपत्रांमध्येही आतल्या पानावर रोजचे पंचांग दिलेले असते. तिथेही भारतीय राष्ट्रीय सौर तारीख दिलेली असते. रिझर्व्ह बॅंकेच्या कॅलेंडरमध्येही या तारखांचा उल्लेख असतो. राष्ट्रीय सौर कॅलेंडरही काही संस्था प्रकाशित करु लागल्या आहेत. आपणही सौर कॅलेंडरचा वापर करु या. सुरुवात स्वतःपासून करु.
May 3, 2019
आजच्या पद्धतीप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातही ‘स्पेशलायझेशन’ विशेष प्रावीण्य असणारे तज्ज्ञ आपल्याला दिसतात. स्त्री रोगतज्ज्ञ स्त्रियांचे आजार, प्रसूतिसंबंधी बाबी बघतात तर नेत्ररोगतज्ज्ञ डोळ्यांचे विकार बघतात. अस्थिरोग, बालरोग, न्यूरॉलॉजी वगैरे विशेष शाखांबद्दल आपण ऐकतो, मात्र आनुवंशशास्त्रतज्ज्ञ किंवा जेनेटिसिस्ट हे नेमक्या कुठल्या प्रकारच्या आजारांचे, कुठल्या अवयवांचे डॉक्टर, हे ध्यानात येत नाही.
May 14, 2023
जगात भाषाच नसती तर? भाषेशिवाय जगाची कल्पनाच होऊ शकत नाही. माणसाला भाषा अवगत नसती तर माणसात आणि जनावरात फरकच उरला नसता…
June 23, 2011
कोणतीही पूर्वसूचना न देता विनायकराव ऊर्फ तात्या भेटायला आले. त्यांच्या अचानक येण्याने मला बऱ्यापैकी आश्चर्य वाटलं. कोणत्या तरी अनामिक कारणामुळे आलेल्या वैफल्याच्या झटक्याने त्यांचा चेहरा झाकोळून गेला होता. चेहऱ्यावरील विषण्णतेचे भाव त्यांना प्रयत्न करूनही लपवता येत नव्हते. अवघं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यागत ते खुर्चीत जवळपास कोसळलेच. हातात घेतलेलं महत्त्वाचं काम बाजूला ठेवून त्यांची समस्या समजावून घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तात्यांनी थोडाही वेळ वाया न घालवता तोंड उघडले.
‘‘या जगात कोणीही विश्वास ठेवण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही. आपल्याला नावं ठेवणारी एकही व्यक्ती या पृथ्वीवर निर्माण होऊ नये यासाठी मी आयुष्यभर काय नाही केलं? स्वत:च्या मतांना तिलांजली दिली, तत्त्वांना मुरड घातली, प्रसंगी स्वत:च्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं, प्रगतीची काळजी केली नाही व अनेकदा आर्थिक झळही सोसली. हे सगळं काही केलं ते केवळ एका गोष्टीसाठी. सर्वांनी मला चांगलं म्हणावं, कोणीही मला नावं ठेवू नये यासाठी. ज्यांच्या भल्यासाठी मी स्वत:चं नुकसान करून घेतलं त्यांच्यापैकीच एकाने आज माझा ‘स्वत:ची मतं नसलेलं बिनबुडाचं भांडं’ असा उल्लेख केलेला ऐकून मला काय वाटलं असेल? या जगात आता जगण्यासारखं काहीही शिल्लक राहिलेलं नाही.’’ तात्या पूर्णपणे खचून गेले होते. त्यांच्याबद्दल कोणाचं वाईट मत असणं ही गोष्ट त्यांच्या कल्पनेपलीकडली होती. ते स्वप्नातही अशा ‘भयंकर’ घटनेचा विचार करू शकत नव्हते. आपल्याबद्दल सभोवतालच्या सर्वांचं मत चांगलंच असलं पाहिजे हा जगावेगळा अट्टाहासच त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू लागला होता.
असे आम्ही कसे? समाजात एखाद्या व्यक्तीबद्दल सर्वांचं एकजात चांगलं मत असणं, टीका करणारी एकही व्यक्ती नसणं, उघड किंवा छुपा एकही शत्रू नसणं हे खरोखरच शक्य आहे का? या गोष्टी मानवीय प्रवृत्तीशी सुसंगत आहेत का? ज्यांना आयुष्यात प्रगती करायची आहे व यशस्वी व्हायचं आहे त्यांना सगळी कामं मिशनरी वृत्तीने पार पाडावी लागतात व हे करीत असताना ते सर्वांना एकाच वेळेस खुश ठेवू शकत नाहीत. कोणत्याही धडपड्या व यशस्वी व्यक्तीला मित्रांपेक्षा शत्रूच जास्त असतात व अशा शत्रूंचं त्या यशस्वी व्यक्तीबद्दल कधीच चांगलं मत नसतं. आपल्याबद्दल शत्रूंचं मत चांगलं नाही म्हणून यशस्वी व्यक्ती प्रगती करणे कधीच थांबवत नसतात.
या जगात सर्वांचं आपल्याबद्दल चांगलंच मत असलं पाहिजे यासाठी अविरत धडपड करणारी तात्यांसारखी माणसं सतत प्रचंड तणावाखाली वावरत असतात व शेवटी अपेक्षाभंगाच्या दु:खाने उद्ध्वस्त होतात. आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल तर लोकांच्या वाईट मतांना भीक घालण्यात अर्थ नसतो. अखेर सगळं जग सलाम करतं ते उगवत्या सूर्याला म्हणजेच यशस्वी व्यक्तीला !
-- श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
October 26, 2016
अर्थात त्यांच्याबरोबर ही कामे करताना माझी खूपच धावपळ व्हायची. कधी कंटाळाही यायचा. मात्र अंक प्रसिद्ध व्हायच्यावेळेस इतका उत्साह असायचा की जणू नवं अपत्यच बघायला मिळणार आहे. त्याची नाकीडोळी म्हणजेच अंतरंग बघून समाधान व्हायचं.
December 18, 2022
महाराष्ट्रामध्ये सरासरी ५० इंच पाऊस पडतो आणि तरीही पाण्याची टंचाई भासते. कारण आपले पाण्याचे व्यवस्थापन चांगले नाही. उपलब्ध होणा-या पाण्यातून ९० टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते. शेतीला पाणी देण्याची प्रवाही पद्धत फार चुकीची आहे. ती बदलली आणि शेतातल्या पिकांना ठिबक सिंचनाने पाणी दिले तर पाण्याची मोठी बचत होणार आहे. २० टक्के पाण्यामध्ये ठिबक सिंचनाने तेवढेच क्षेत्र भिजू शकते आणि पाटबंधारे योजना तसेच विहिरी यातील पाणी यांची मोठय़ा प्रमाणावर बचत होऊ शकते.
July 4, 2018
संधी ही क्षितीज असल्याची जाणीव होते , तेव्हाची गोष्ट !
अर्थात पुन्हा पुन्हा लक्षात ठेवावे असे स्मरण गाथेतील अपयशाचे पान !
' कॉलेजमधून घरी जाताना माळनाक्यावर थांबा . मी तिथे थांबलो आहे .'
ज्येष्ठ नाटककार प्र.ल मयेकर यांचा निरोप आला म्हणून मी काम संपल्यावर थेट माळनाक्यावर गेलो .
प्र .ल. वाट बघत होते .
' आपल्याला हॉटेलवर जायचं आहे . तिथे प्रकाश बुद्धिसागर तुमची वाट बघतोय .'
माझ्या स्कूटरवर बसता बसता ते म्हणाले आणि मी स्कूटरला किक मारायला विसरलो .
' दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर ?'
मी अविश्वासाच्या नजरेतून विचारले .
' एवढा मोठा दिग्दर्शक माझी वाट कशाला बघेल ?'
' ते त्यालाच विचारा .'
त्यांनी विषय संपवला .
आम्ही हॉटेलवर आलो .
रूमवर प्रकाशजी वाट बघत होते .
ओळखदेख झाली आणि मी काही विचारायच्या आत प्रकाशजी म्हणाले ,
' जत्रा दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली तुमची कथा मला आवडली , आपण त्याच्यावर काम सुरू करू या . त्या कथेवर मला तुमच्याकडून दोन अंकी विनोदी नाटक लिहून हवे आहे , व्यावसायिक रंगभूमीसाठी .'
' अहो पण ...'
मला त्यांनी काही बोलू दिले नाही . ते आणि मयेकर माझ्या कथेवर बोलत राहिले . दोघांनीही कथा वाचली होती .
त्यावर्षी जत्रा दीपावली अंकाच्या संपादकांचं पत्र आलं होतं . मी यापूर्वी कधी विनोदी कथा लिहिली नव्हती .
पण त्यांच्या आग्रहाखातर कथा लिहिली होती . कीआणि अनेकांना ती आवडली होती . आणि बुद्धिसागर , मयेकर यांनाही ती आवडली होती .
पण त्या कथेवर नाटक ?
मी अजून धक्क्यातून बाहेर आलो नव्हतो .
प्र ल मयेकर व्यावसायिक रंगभूमीवरचे हमखास यशस्वी नाटककार .
आणि प्रकाश बुद्धिसागर यशस्वी अभिनेते आणि व्यावसायिक रंगभूमीवरील प्रतिभासंपन्न दिग्दर्शक . त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटके मी पाहिली होती .
हे दोघे एकत्र येण्याऐवजी मला उभं करण्यासाठी दोघे एकत्र आले होते .
शेवटी हो ना करता करता मी नाटक लिहायला तयार झालो . त्याअनुषंगाने खूप चर्चा झाली . दोघांनी अनेक बारकावे समजून सांगितले .
एकप्रकारे व्यावसायिक नाटककार होण्यासाठी त्यांनी माझी कार्यशाळाच घेतली .
या काळात माझी संगीत नाटके स्पर्धेत यश मिळवू लागली होती , तो संदर्भ घेऊनच प्रकाशजी आले होते .
त्यानंतर अनेक वेळेला भेटीगाठी झाल्या . संहितेची अनेक वेळेला संस्करणे झाली . चौथ्या वेळी मात्र त्यांना संहिता पसंत पडली . प्र ल आणि प्रकाशजी यांच्यासमोर मी नाट्यवाचन केलं . प्र ल हे मंद स्मित करून दाद देत होते . आणि प्रकाशजी एकदम गडगडाटी हास्याने दाद देत होते .
पुढचे दोन तास मी केवळ त्यांची चर्चा ऐकत होतो .
दिग्दर्शक म्हणून आपण काय काय करणार आहोत , कोणती ट्रीटमेंट देणार आहोत , बिटविन द लाईन्स लाफ्टर मिळवण्यासाठी काय करता येईल या आणि अशा अनेक गोष्टी ते सांगत होते . प्र ल नी दोन अंकात मिळून चार जागा अशा सांगितल्या की तिथे उडत्या चालीची चार गाणी आणखी धमाल उडवू शकणार होती .
' नाटकाचे नाव काय ठेवणार ? '
प्रकाशजीनी विचारलं .
अरे , चल उचल !
' असं मला सुचलंय . पण तुम्ही अनुभवी आहात , तुम्ही सांगा .'
ते क्षणभर विचारात पडले आणि म्हणाले ,
' हेच नाव परफेक्ट आहे . एकदम कॅची आहे . अरे , चल उचल ! आता मुंबईला जातो आणि सुरुवातच करतो कामाला . '
-- आणि असंच ते भरभरून बोलत राहिले . मानधन , स्टारकास्ट , प्रॉडक्शन हाऊस ...अनेक गोष्टी .
'खूप दिवसांनी ही दमदार संहिता हाती लागलीय , धमाल उडवून देऊ , काय ..'
त्यांना मी एक प्रत दिली .
ते त्या रात्री मुंबईला गेले .
नंतर फोनवरून काही दिवस संपर्क चालू होता .
अचानक संपर्क थांबला .
मीसुद्धा व्यग्र होतो .
आणि एके दिवशी प्रलं चा फोन आला .
' प्रकाशची बातमी समजली का ? तो आजारी आहे , त्याला चालता येत नाही , बोलता येत नाही .अर्धांगवायू झाला आहे ...'
मला धक्काच बसला .
अनपेक्षितपणे व्यावसायिक रंगभूमीची संधी आली होती पण ती संधी क्षितिजासारखी दूर गेली होती .
नंतर प्रकाशजी भेटले ते रत्नागिरीतल्या सावरकर नाट्यगृहात . शासनातर्फे माझ्याच हस्ते त्यांचा सत्कार झाला , त्यावेळी आम्ही बोललो . ते महत्प्रयासानं शब्द उच्चारत होते . मला वाईट वाटलं .
त्यांनासुद्धा वाईट वाटत होतं . त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहवत नव्हतं .
पण परिस्थितीपुढं आपण हतबल आहोत हे आम्ही मान्य करून घेतलं .
त्यानंतर त्यांनी आणि मी सुद्धा त्या नाटकासाठी प्रयत्न केले .
पण क्षितीज कधीही हाती आलं नाही . अनेक दिग्दर्शक , निर्माते , स्थानिक संस्था , अनेक जाणकार यांच्याकडे संहिता पाठवून दिली . चर्चा केली . पण त्या संहितेला रंगमंचावरील प्रकाश कधी दिसलाच नाही .
एखाद्या संहितेचं भागधेय असतं.
प्रत्येक वेळी यश लाभतं असं नाही .
पण मी नाराज नाही .
कारण माझी संहिता दमदार आहे .
कथानक वेगळं आणि हसताहसता विचार करायला लावणारं आहे .
दिग्दर्शक आणि कलाकार यांना रंगमंचावर मनसोक्त धुमाकूळ घालायला संधी देणारं आहे .
आणि ... आणि बरंच काही आहे त्या संहितेत .
मी अजूनही पॉझिटिव्ह विचार करतोय .
केव्हातरी अशी संधी नक्की येईल आणि रंगमंचावरून उद् घोषणा होईल ;
"...श्रीनटेश्वर , रंगदेवता आणि रसिकांना अभिवादन करून सादर करीत आहोत दोन अंकी , धमाल विनोदी नाटक , अरे , चल उचल ! "
आणि त्या दिवसाची मी वाट पहात आहे.
- डॉ . श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी.
८९५१९०६७०१
-------
स्मरणगाथा आवडल्यास नावासह सर्वदूर पाठवायला हरकत नाही
August 18, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti