वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मनुष्यजीवन सर्वस्वी या श्वास पद्धतीवर अवलंबून आहे. नियंत्रित श्वास हा अतिशय आवश्यक असा विचार आहे.श्वास नियंत्रणाने आपण हवे ते साध्य करु शकतो आणि श्वासावरचे नियंत्रण सुटले तर आयुष्याची माती सुद्धा होवू शकते.
August 2, 2017
शाळेत जाताना पाण्याच्या बाटल्या किती पालकांनी नेल्या आहेत ? मला तर आठवतच नाही. कधी न्यावीच लागली नाही. शाळेत स्टीलचे पिंप ठेवलेले असायचे. खेळून झाले की, धावत पहिल्यांदा जाऊन पिंपातले पाणी पिण्याची मजा काही औरच होती.
December 4, 2016
रक्तदाब कमी होण्याच्या समस्येकडे हायपरटेंशन ( रक्तदाब वाढणे) इतके लक्ष दिले जात नसले तरीही त्यातून आजाराची गुंतागुंत वाढण्याची शक्यता अधिक असते. रक्तदाब कमी झाल्यास मरगळ / निस्तेज वाढणे, मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षण आढळतात. अचानक रक्तदाब कमी झाल्यानंतर नेमके काय करावे हे अनेकांना सुचत नाही.
अचानक डोळ्यांसमोर अंधार येणे, गरगरल्या सारखे वाटल्यास ताबडतोब पाठीवर झोपा. काहीवेळ डोळे बंद करून शांत पडून रहा.
ओरल रिहायड्रेशन सॉल्ट (ओआरएस ) शरीराला पुन्हा रिहायड्रेट करायला मदत करतात. तसेच मीठ आणि इलेक्ट्रोलाईट्सचा पुरवठा करतात. बाजारात मिळणारी ओआरएसची पाकीट जवळ ठेवा. व त्याप्रमाणे मिश्रण बनवून प्या. मात्र मधूमेहींनी तयार ओआरएस पावडर पाण्यात मिसळून पिणे टाळा. यामध्ये साखरेचादेखील समावेश असतो.
तुमच्याजवळ ओआरएस नसल्यास पाणी प्या. त्यामध्ये चिमुटभर मीठ आणि चमचाभर साखर मिसळा. मीठातील सोडीयम रक्तदाब सुधारेल. तर साखर ग्लुकोज वाढवायला मदत करेल.
रक्तदाब कमी झाल्यास मीठ चाखणे किंवा खारी बिस्किटं खाणं हा उपाय अनेकजण करतात. यामुळे रक्तदाब सुधारण्यास मदत होते. यासोबत तुम्ही साखर-मीठाचे पाणी पिऊ शकतात. पण हे अति करू नका. यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.
रक्तदाब स्थिरावल्यानंतर तसेच तुम्हांला सामान्य वाटत असले तरीही डॉक्टरांना त्वरीत भेटा. तसेच नेमके कशामुळे रक्तदाब कमी झाला हे जाणून घ्या. अनेकदा ही समस्या लहान स्वरूपात असताना त्याकडे दुर्लक्ष करतात आणि अचानक त्रास वाढल्यास डॉक्टरांचा धावा करतात. रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्यास नियमित ते तपासून घ्या. 110/60 mm Hg पेक्षा कमी झाले तरीही अनेकदा त्याची लक्षण आढळून येत नाहीत. त्यामुळे त्रास जाणवत असल्यास स्वतःची औषाध स्वतः निवडण्यापेक्षा डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१७३३
January 5, 2017
झोपण्यापूर्वी पुनः एकदा दंतधावन करावे, असे फक्त आजचेच विज्ञान सांगते असे नाही तर भारतीय संस्कृती सुद्धा सांगते.
रात्री झोपताना कोणत्याही घरगुती अथवा कंपनीमेड दंतमंजनाने दात जरूर घासावेत. खळखळून चुळा भराव्यात आणि परत काहीही तोंडात न टाकता झोपावे.
February 10, 2018
प्रकाशन दिनांक :- 30/01/2005
महाराष्ट्रासह संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वतयारीत मग्न असतानाच सातारा जिल्ह्यातील वाईजवळ असलेल्या मांढरदेव काळुबाई यात्रेत मात्र मृत्यूने आपले तांडव दाखवायला सुरुवात केली होती. अखेर अडीचशेपेक्षा अधिक बळी घेऊनच हे तांडव शांत झाले. चेंगराचेंगरीत इतक्या मोठ्या प्रमाणात जीवहानी झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रावर दु:खाचे सावट पसरले.
January 30, 2005
गुन्हेगाराकडून सत्य वदवण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. या पद्धती वेगवेगळ्या तत्त्वांवर आधारलेल्या आहेत. काही पद्धती रसायनांचा वापर करतात, तर काही पद्धती इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. प्रत्येक पद्धतीचे फायदे-तोटे आहेत, तसेच प्रत्येक पद्धतीला स्वतःच्या मर्यादा आहेत. सत्याचा शोध घेऊ पाहणाऱ्या या विविध प्रचलित पद्धतींची थोडक्यात ओळख करून देणारा हा लेख…
February 18, 2024
१५ नोव्हेंबर, २०१६. पुण्याहून सकाळी ६ वाजता निघून सातारा–कोरेगाव– खटाव–वडूज अशी मजल दरमजल करीत चार तासांच्या प्रवासानंतर ‘कलेढोण’ नावाच्या खटाव तालुक्यातील एका छोटयाशा गावात माझ्या ‘स्वयंसिध्द शेतकरी’ या कार्यशाळेसाठी दाखल झालो. प्रवासादरम्यान शेतकऱ्यांना भेटणे व त्यांच्या समस्या समजावून घेण्यासाठी त्यांच्याशी गप्पा मारणे या जुन्या सवयीमुळे सभोवतालच्या शेतांमध्ये शेतकऱ्यांना शोधण्यासाठी माझी नजर भिरभिरू लागली आणि नेहमीपेक्षा आजचा दिवस वेगळा आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली. आज शेतकरी शेतात नव्हते तर आमच्या दोनशे कि.मी.च्या प्रवासातील प्रत्येक गावात सकाळी आठपासूनच ते विविध बँकांसमोर रांगा लावून उभे होते. ११ वाजता सुरु होणाऱ्या कार्यशाळेचं भवितव्य मला दिसू लागलं. १ वाजेपर्यंत काहीही घडलं नाही कारण सभागृहात केवळ तीन शेतकऱ्यांनी हजेरी लावली. गेल्या वीस वर्षांमध्ये असं कधीही घडलं नव्हतं. पण आज नोटांपेक्षा कोणताही विषय महत्त्वाचा नव्हता. आजची कार्यशाळा नेहमीपेक्षा खूप उशीरा सुरु होण्याची शक्यता असल्यामुळे बँकांच्या समोर रांगा लावलेल्या शेतकऱ्यांच्या मनाचा कानोसा घेण्याची सुवर्णसंधी माझ्यासाठी चालून आली होती.
सभागृहाच्या शेजारीच स्टेट बँक असल्यामुळे मी थोडाही वेळ वाया न घालवता रांगेत ताटकळत असलेल्या शेतकऱ्यांना भेटायला गेलो. “माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही व मी पत्रकारही नाही. मीही तुमच्यासारखाच शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे जुन्या नोटा बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांवर काय परिणाम झाला आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हा सर्वांना भेटायला आलो आहे.” असं त्यांना सांगताच ते मोकळेपणाने बोलू लागले.
१. राज्य सहकारी बँकांवर बंधनं आल्यामुळे आम्ही खूप अडचणीत आलो आहोत.
२. भामटेगिरी करणाऱ्या नेत्यांच्या गडगंज काळ्या पैशाची काही तासांमध्ये अक्षरशः रद्दी झाली म्हणून आम्हाला प्रचंड आनंद झाला आहे.
३. जनतेला कितीही त्रास झाला तरी सरकारने काळा पैसा जमा करणाऱ्यांच्या विरुध्द आणखी कडक उपाय योजायला पाहिजेत असं आम्हाला वाटतं.
४. राजकीय नेते व मोठ्या उद्योगपतींनी आपल्या देशाला लुटून जो त्रास दिला आहे त्याच्या तुलनेत दिवसभर रांगेत उभे राहण्याचा त्रास काहीच नाही.
५. खरा त्रास आम्हाला नाही तर ज्यांच्याजवळ प्रचंड काळा पैसा आहे त्यांना होतो आहे आणि म्हणूनच ते सरकारच्या नावाने ठणाणा करत आहेत.
६. नविन नोटांच्या वितरणाचं व्यवस्थित नियोजन केलं असतं तर आपला देश सरकारला डोक्यावर घेऊन नाचला असता.
सर्वांचा निरोप घेऊन निघत असताना एक वयोवृध्द शेतकरी म्हणाला “रांगेत तासनतास उभे राहण्याचा त्रास होतो म्हणून तक्रार करण्यात काय अर्थ आहे? लवकरच जन्माला येणाऱ्या गोंडस बाळाची स्वप्नं बघायची की पोट दुखतं व कोरडया वांत्या होतात म्हणून रात्रंदिवस तक्रार करायची?” आपल्या देशातील प्रत्येकाला अंतर्मुख होण्यास भाग पडणाऱ्या त्या वयोवृध्द शेतकऱ्याचे शब्द डोक्यात घोळवतच सभागृहात परतलो. कार्यशाळेत शेतकरी येण्यास सुरवात झाली होती !
श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
November 18, 2016
होय आता ते अगदी शक्य आहे !
सात दिवसासाठी काही नियम
सतत उकळून आटविलेले गरम पाणीच प्यावे. शरीरातून विषारी घटक बाहेर पडण्यासाठी ८-१० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
आहारामध्ये चवीनुसार आले, पुदिना, लसुन, काळे मिरे, धने, जिरे लिंबु यांचा भरपुर वापर करावा.
या शिवाय त्रिफळा पावडर, चित्रक, नागरमोथा, मुलतानी माती, कुळीथ, वावडींग, अर्जुन, सारिवा, मंजिष्ठा यां पावडरचे मिश्रण करुन कोरडे पावडर अंगावर घासणे म्हणजे उद्वर्तन होय. या पावडरच्या मालीश ने वजन कमी होताना त्वचेवर होणारे दुष्परीणाम कमी होतात. नियमित मालिशने त्वचेवर सुरकुत्या पडत नाही, त्वचेचा टोन टिकुन राहतो, त्वचेचा रंग उजळ्तो. दररोज आंघोळीच्या वेळेस या पावडरची अंगावर ३० मिनिटापर्यंत मालिश करावी.
रात्रीचा आहार सुर्यास्तापुर्वी घेण्याचा काटेकोर प्रयत्न करावा
खालील आहार वेळापत्रकासोबत नियमित वेळेस कमी साखरेचा चहा, दुध, कॉफी घेऊ शकता.
दिवस पहिला :- पाचक आहार जवळपास सर्वांना सोमवार ते रविवार पर्यंत एखाद्या तरी उपवासाची सवय असते. दिवसभर उपाशी राहणे, रात्री एकदा जेवण करणे अशी सर्वसाधारण आपली पध्दत असते. त्याच पध्दतीने आमच्या वेळापत्रकानुसार व आयुर्वेदानुसार पहिल्या दिवशी आपणास दिवसभर फक्त ताज्या दह्याचे ताक पिऊन राहायचे आहे, ताक पातळ असावे, चांगले घुसळून लोणी काढून घ्यावे. ताकामध्ये लसुन, आद्रक, पोदीना, काळेमिठ हे चरबीचे शोषण करणारे व अन्नाचे पाचन करणारी औषधी द्रव्ये योग्य मात्रेत घालावीत, याच पध्दतीने २ थेंब तेल, कडीपत्त्ता, कोथींबीर , हिरवी मिर्ची, लसुन यांची फोडणी दिऊन बनविलेला मठ्ठा देखील चालतो. सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत ८ ते १० ग्लास या प्रमाणात आपण ताक किंवा मठ्ठा घेऊ शकता. रात्री मात्र आपण विनातेल तुपाची एक किंवा अर्धी भाकरी - चपाती व हळद-बेसन, लसुन -आद्रक घालुन बनविलेली पातळ दह्याची कढी दोन वाटी या प्रमाणात घ्यावे. आहे ना गंमत उपाशी राहणे ही नाही व पोटभरुन खाणे ही नाही.
दिवस दुसरा:- व्हिजीटेबल डायट दुसऱ्या दिवशी आपणास पालेभाज्यांचे रस किंवा सुप्स घ्यायचे आहे. पालक सुप, टोमॅटो सुप, गाजर रस, पत्तागोभी रस, बीट ज्युस, कद्दु किंवा काकडीचे रस सकाळ पासून संध्याकाळपर्यंत पोट भरुन घेऊ शकता. मात्र पालेभाज्या वाफवुनच त्यांचे सुप बनवावे किंवा रस काढावे. दुसरे महत्त्वाचे प्रत्येक रस किंवा सुप मध्ये पोदीना, आद्रक, लसुन, कडीपत्ता, कोथिंबीर, मेथीदाना, धने, जिरे, मोहरी आवश्यकते नुसार भरपुर प्रमाणात घ्यावी. रात्री भुक लागल्यास एक-दिड वाटी भात व आद्रक- लसुन घालुन बनविलेले पातळ मुगाचे किंवा तुरीचे वरण घेऊ शकता.
दिवस तिसरा:- फ्रुट डायट ताजी गोड फळे किंवा फळांचा रस. सफरचंद, डाळींब, संत्रा, मोसंबी, टरबुज, पपई ही फळे आपण पोटभरुन खाऊ शकता. आयुर्वेदिक नियमाप्रमाणे फळावर काळेमिरे पावडर घेण्याचे विसरु नका. मध्यंतरी भुक लागल्याची संवेदना झाल्यास नारळ पाणी प्यावे, किंवा बिनासाखरेचे लिंबु पाणी व काळे मीठ प्यावे. यामुळे भुक कमी होते व शरीरात उर्जा टिकून राहते.
सरासरी तिसरया दिवशी शरीरात हल्के पणा जाणवु लागतो, सुस्ती-आळस कमी होतो, उत्साह वाढतो. वजन दिड ते दोन किलो ने कमी झालेले जाणवायला लागते.
दिवस चौथा:- प्रोटिन डायट. सकाळी --- मांसाहारी असाल तर पिवळा भाग काढून एक उकडलेले अंडे, किंवा १ वाटी वाफवलेले मोड आलेले मुग किंवा मटकी, सोयाबीन किंवा चने सोबत चवीनुसार आद्रक, लसुन, मेथीदाना , कडीपत्त्ता, कोथीबीर, धने, जीरे.
दुपारी :- उकडलेले मुग किंवा मुग-तुरीचे पातळ वरण
संध्याकाळी :- एक ते दोन वाटी मुगाचे घट्ट वरण
दिवस पाचवा:- फळभाज्या कॉम्बी डायट सकाळी :- पोट भरुन कोशींबीर. आद्रक, लसुन, पोदिना, काळेमिरे पावडर घ्यायला विसरु नका.
दुपारी :- सफरचंद, अननस, पपई, टरबुज, डाळींब, संत्रा यापैकी कोणतेही एक ताजे गोड फळ किंवा नारळ पाणी. किंवा अननस ज्युस. पण साखर नको.
संध्याकाळी :- भरपुर पालेभाज्या-मुग डाळ - तांदुळ, लसुन , आद्रक घालुन बनविलेली एक वाटी खिचडी व सोबत दोन वाटी लसुन , आद्रक घालुन बनविलेली पातळ कढी .
आज बघा आपले २ ते ३ किलो वजन सहज कमी झालेले दिसून येइल. कपडयांची फिटींग सैल झाली आहे हे लक्षात येईल.
दिवस सहावा:- ग्रीन ब्लड डायट सकाळी :- एक कप बिनासाखरेचे गोड दुध, दुधामध्ये आद्रक-हळद-तुळस घालून उकळून प्यावे. सोबत २-३ मारी बिस्किट घेऊ शकता.
दुपारी : - वाफवलेल्या पालेभाज्यांचा रस
संध्याकाळी :- पालेभाज्यांचे सुप किंवा एक ज्वारीची पातळ भाकरी व एक वाटी मुगाचे किंवा तुरीचे पातळ वरण खावे.
दिवस सातवा:- प्रोटिन व्हिजिटेबल डायट सकाळी :- सोललेल्या मुगाचे घट्ट वरण १-२ वाटी त्यास दोन थेंब तेलाची, मोहरी-आद्रक-लसुनाचीघालुन बनविलेली पातळ कढी .
संध्याकाळी :- पालेभाज्यांचे सुप
सात दिवस संपले आठव्या दिवशी सकाळी आपले वजन बघा.
या पध्दतीने वजन कमी केल्यानंतर आपला चेहरा आकर्षक, शरीर साचेबध्द दिसेल. शरीरातील सुस्ती, मरगळ, आळस निघून जाईल. नियोजित पार्टी मध्ये आपणच आकर्षण राहाल. कोठेही उपाशी राहायचे नाही , तेल-भातासारखे पदार्थ बंद करायचे नाही, आयुर्वेदाचे आहाराबद्दल सर्व नियम पाळायचे मग निश्चितच तुमचे वजन कमी होईल. शरीराची प्रोटिन, क्यॉलशियम, लोहाची ही गरज भागते अन वजनही सहज कमी होते, दुष्परीणाम ही काही होत नाही.
* संजीव वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ. डॉ. पवन एस. लड्डा
September 29, 2016
जगातील कोणत्याही कायद्याने ही बाल कामगार व्यवस्था बंद पडणार नही . मग अतिरेकी कायदे करण्या पेक्षा या बाल कामगारांना कायद्याने कामगार हक्क देऊन त्यांची ताकद वाढविण्याची गरज आहे. या करता मालकांना बाल कामगारांच्या शिक्षणाची जबाबदारी देण्यात यावी.या मुलांचा सरकारी शिक्षणाचा आर्थिक भार या मालकांवर टाकावा. शाळे मध्ये आई-वडिलांच्या नावा बरोबर या मालकांचे जबाबदार पालक म्हणून नाव टाकावे. मुलांचे कामाचे तास शाळेच्या तासा बरोबर नियमित करावे. संघटीत कामगारा चे हक्क या बहाल करणे. अश्या व्यवस्थित नियमावली करून या बालकांच्या श्रम शक्तीला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देऊन देशाच्या या भावी नागरिकांना सशक्त बनविणे हीच काळाची गरज आहे. नाही तर समाज कंटक , गुन्हेगारांच्या, शुद्र राजकारण करणाऱ्या नेत्यान च्या सापळ्यात अलगद सापडून ही पिढी बरबाद होईल , आणि याचे गुन्हेगार तुम्ही आम्ही सगळेच असुत. हे ध्यानात घ्या.
April 20, 2010
नात्यांनी,जवळीकेने आजकाल चकीत व्हायला होतं – जी नाती कधी रुजतच नाहीत, ती जवळ आल्यावर धसकल्यासारखं होतं आणि दूर गेली की सुस्कारा सोडल्यासारखं हायसं वाटतं.
May 5, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti