(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दशश्लोकीस्तुती – १

    भगवान श्रीशंकरांच्या दिव्य वैभवाचे वर्णन करणारे जगद्गुरु आदि शंकराचार्यांचे आणखी एक सुंदर स्तोत्र म्हणजे दशश्लोकीस्तुती. श्लोकसंख्येच्या विस्तारा वरून केलेले हे नामकरण.

      August 25, 2020


  • शेतमालाच्या किमती वाढताच पोटात का दुखते!

    सध्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीत इतर काही मुद्यांसबतच महागाई हा एक प्रमुख मुद्दा आहे. या आधी पंजाब आणि उत्तराखंडच्या निवडणुका झाल्या.

      April 8, 2007


  • वाहिन्यांचे लोकशाहीकरण आवश्यक

    प्रसारमाध्यमे हा भारतीय व्यवस्थेचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रसारमाध्यमांनी प्रत्येक वेळी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या काळात प्रसारमाध्यमांच्या प्रत्येक शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व होते. त्यांनी लोकांमध्ये स्वातंत्र्याबद्दल जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

      May 15, 2024


  • “सहेला रे”- वपुंच्या “पार्टनर”पेक्षा, अमिताभच्या ” बेमिसाल “पेक्षा तरल !

    “सहेला रे” प्रचंड तरल आहे. हा चित्रपटगृहातील पॉपकॉर्न गर्दीत किंवा घरच्या टीव्ही वर परिवारासमवेत पाहण्याचा अनुभव नाही. डोळसपणे निर्मात्यांनी तो “प्लॅनेट मराठी ” वर रिलीज केलाय,जो फक्त आपल्या एकांतातील संगणकावर/लॅपटॉप वर निगुतीने बघावा.

      October 22, 2022


  • फेब्रुवारी १४ : सहाव्या विश्वचषकाची सुरुवात व विश्वचषकातिल सलामिच्या लढतिंचा गोषवारा

    आजवरच्या विश्वचषकांमधील सलामिच्या लढतिंचा तपशिल

      February 20, 2011


  • सवयींचे व्याकरण !

    स्वभावातून सवयीचा उगम पावतो. लहानपणापासून सगळ्यांनाच बऱ्या-वाईट सवयी लागतात. अगदी बालसुलभ म्हणजे अंगठा चोखणे, नखे कुरतडणे, दिसेल ते तोंडात घालण्याची प्रवृत्ती असणे. ! त्यानंतर खोटे बोलणे, भरभर (अथवा हळूहळू) जेवणे, कोठेही (दिलेल्या) वेळेवर पोहोचणे, गोष्टी/ कामे पुढे ढकलणे, सकाळी उशिरा उठणे आणि ही यादी संपता संपणार नाही.

      June 26, 2021


  • कथा ‘अ‍ॅन फ्रँक’ची

    आम्ही युरोपच्या ‘टूरवर’ असताना, नेदरलँड ला उतरलो. ‘अ‍ॅन फ्रॅंक हाऊस ‘ नावाने जागतिक प्रसिद्धी पावलेल्या आणि ऐतिहासिक म्युझियम ला भेट देण्यास निघालो.   तेंव्हा हा रस्ता जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य  पर्यटकांनी फुलून गेला होता. इमारतीच्या दर्शनी भागाच्या समोर उभे राहून शेकडो पर्यटक ‘म्युझिअमचे ‘  फोटो काढून घेत होते.  आम्ही प्रथम तिकीट काढून रांगेत उभे राहिलो आणि जेंव्हा त्या ‘वास्तूत ‘ मी पहिले पाऊल टाकले तेव्हा माझे अंग थरारले.  विशेष लक्षवेधी बाबी म्हणजे अ‍ॅन फ्रॅंक हिचे ‘बोलके मंतरलेले  डोळे’ असणारे चित्तवेधक चित्र आणि प्रवेशद्वारा समोरचा ‘पुतळा’.

      August 8, 2021


  • डिप्रेशन

    दिर्घ श्वासोच्छ्वास करणे हा उपाय सगळे योगा वाले सुचवतात. पाच मिनिटे असे केल्यास बराचसा मोकळेपणा वाटतो असे म्हणतात. मला काही फारसा फरक पडत नाही या मुळे!

    -तुम्ही जे काम करीत आहात, ते एकदम बंद करा , आणि दुसरे काही तरी करणे सुरु करा. मग ते एखाद्या मित्राला फोन करणे, मैत्रिणीबरोबर संध्याकाळची भेट ठरवणे, कट्टा गॅंग बरोबर एखादं गेटटूगेदर ठेवणे असे काही पण असू शकते.

    अगदी काहीही न करणे हा पण एक उपाय बरेचदा मी करतो. थंडी असेल तर मस्त पैकी ब्लॅंकेट मधे गुरफटून एखादे पुस्तक वाचत बसणे ,मस्त उपाय आहे.

    -पायात रेबॉक किंवा नायके चढवा, आणि निरुद्देश फिरणे सुरु करा. तुमच्या बिल्डींग मधून बाहेर पड्ल्या बरोबर जो कोणी समोर येईल त्याच्याकडे पाहून स्मित हास्य करा. शेजारचा कोणी समोर दिसलाच, तर पाच मिनिटे उगाच काही तरी गप्पा मारा, आणि शेवटी काहीच न ठरवता, केवळ रस्त्याने गर्दीचा भाग होऊन कुठे तरी चालत जाणे करून पहा.

    -सृष्टीसौंदर्य न्याहाळत जाणॆ. हे जरी या कॉंक्रिट जंगलात शक्य नसले, तरी पण इतर ” प्रेक्षणीय” गोष्टी बऱ्याच असतात, जर लग्न झालेलं नसेल तर चांगली ’ स्थळं ” असतातच, त्यांचा शोध घ्या.

    आइस्क्रीम, चाट, वगैरे गोष्टी जर आवडत असतील तर उठा, आणि त्या भैय्या कडे जाऊन या. आवडीची वस्तू खायला मिळाली की बराच शांत होतो मी स्वतः.

    -घराजवळ बगिचा असेल तर बगिचा मधे चालत जा. नुसते बगिचा मधे बसलो, तरी पण छान वाटते. एखादी गोष्टीचे रुपांतर बीजांकुर पासून तर फुला- फळापर्यंत झालेले पहाणे हा पण एक मस्त अनुभव असतो.

    -तुम्ही जर एखादी गोष्ट केलेली असेल की जिच्यामुळे तुम्हाला गिल्टी वाटत असेल, (जसे एखाद्या प्रिय व्यक्तीशी खोटे बोलणे), तर तो गिल्ट मनातून काढून टाका. गिल्ट ही कोळ्यांच्या जाळ्या सारखी असते, एकदा तुम्ही त्यात अडकला, की त्यातून बाहेर पडणे शक्य होत नाही.

    -फोटोग्राफी ,ट्रेकिंग, वाचन, पेंटींग, पतंग उडवणे, वगैरे कुठला तरी छंद जोपासा. जास्त डिप्रेशन आले की छंद हा एक मस्त विरंगुळा होऊ शकतो. मी लहान असतांना तास अन तास गच्चीवर पतंग उडवत बसायचो. एखादे म्युझिकल वाद्य वाजवणे, खेळ किंवा इतर काही छंद असू शकतात. जिग सॉ पझल हजार पिसेसचे घेऊन या , मस्त वेळ जातो शांत जागी बसून मेडीटेशन करणे.

    गरम बोर्नव्हिटाचा ग्लास संपवून मस्त पैकी झोप काढा. जस्ट रिलॅक्स! आवडीचे संगीत ऐकणे हा पण मस्त उपाय आहे. शक्यतो हेडफोन लावून गाणी ऐकल्यास लवकर आराम मिळतो. शक्यतो क्लासिकल संगीत जास्त बरे वाटते अशा वेळेस!

    -आपल्याला स्ट्रेस जास्त येण्याचे कारण म्हणजे फायनान्स. आपल्या कुटुंबीयांची काळजी प्रत्येकालाच असते, कधी तरी एकदम आपल्याला जाणीव होते की आपण काहीच करून ठेवलेले नाही. हल्ली पूर्वी प्रमाणे लोकांना पेन्शन पण नसते, त्यामुळे आपल्या अपरोक्ष आपल्या कुटुंबाचे कसे होईल? ह्या गोष्टी मुळे डिप्रेशन येण्याचे प्रमाण फार जास्त आहे. यावर उपाय म्हणजे फायनान्शिअल प्लानिंग व्यवस्थित करून ठेवणे. टर्म पॉलिसी, ज्या मधे कमी इन्स्टॉलमेंट आणि जास्त रिस्क कव्हर असते ती काढणे. एफ डी वगैरे , इनव्हेस्टमेंट प्लानिंग करणे ..

    -आणि सगळ्यात शेवटचे म्हणजे काही तरी लिहा. जे काही मनात येईल ते लिहून काढा, एखादी खास वही, किंवा ऑन लाइन ब्लॉग तयार करा, की ज्यावर तुम्ही आपले मन मोकळे करू शकाल. मनात जे काह येइल ते लिहिलं की मानसिक त्राण कमी होतो, हे मी स्वतः अनुभवले आहे. ज्या गोष्टी कोणाशीच बोलता येत नाहीत, पण मनात येत असतात, आणि मग त्यांच्यामुळेच तुम्हाला डिप्रेशन येत असते. लिहून काढणे हा एक मस्त उपाय आहे-

    असं म्हणतात, की जर एखादा माणूस कायम सिरियस राहिला, स्वतः कधी काही एंजॉय केले नाही, कायम कुठल्यातरी “अमूर्ताच्या शोधात” गुरफटला गेला तर तो स्वतःच्या नकळत वेडा ( सिझोफ्रेनिक ) होऊ शकतो. अशी मानसिक अवस्था आली की आत्महत्येचे विचार मनात येणे सुरु होते. म्हणून हे प्रकर्षाने टाळा.

    -दिवसभरात , स्वतः साठी कमीत कमी एक तास काढून ठेवा. तो तुमचा स्वतःचा स्वतःसाठी दिलेला वेळ असेल. स्वतः बरोबर रहा- बी विथ युवरसेल्फ.’पॉझिटिव्ह थिंकींग” सुरु करा.

    -इंटरनेट मुळे आपले घराबाहेर पडणे बरेच कमी झालेले आहे. स्वतः भोवती एक स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम तयार करा. त्या मधे , पत्नी, मुलं, मित्र, मैत्रिणी, शेजारी, असे अनेक लोकं असू द्या. जितके जास्त लोकं तुमच्या सपोर्ट सिस्टीम मधे, तितके सहज पणे तुम्ही डिप्रेशन मधून बाहेर पडू शकता. दिवसभरात थोडा तरी वेळ काढा, तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्ती सोबत घालण्यासाठी. शक्यतो औदासिन्याच्या अवस्थेत एकटे रहाणे टाळा.

    -- सुषमा मोहिते

      May 19, 2017


  • निरंजन – भाग १३ – दृष्टी तसे दृश्य

    एक सुंदर असे टुमदार एक गाव होते. त्या गावाच्या वेशीवर एक गुरुकुल होते. गुरुकुलामध्ये ज्ञान देणारे एक ॠषीमुनी होते. या गुरुकुलामध्ये नित्यनियमाने शिष्य येत असत. आपल्या गुरुंकडुन ज्ञान घेत असत. गुरुंसोबत गप्पागोष्टी करत असत. असा उपक्रम गुरुकुलामध्ये नित्यनियमाने होत असे.

      June 25, 2020


  • श्री लक्ष्मीनृसिंह संस्थान, वेलींग

    लक्ष्मीनृसिंहाच्या गाभाऱ्यात स्नान करून ओल्या वस्त्रानेच जाता येतं. तात्या(वडील) सकाळी लवकर उठून आंघोळ करून तळ्यातल्या पाण्याची कळशी भरून घेऊन गाभाऱ्यात यायचे. गुरुजींचा अभिषेक सुरू असायचा. देवाच्या मूर्तीवर कळशीतल्या पाण्याचा अभिषेक करायचा. पुढे देवाची साग्रसंगीत पूजा व्हायची. मूर्तीवर चांदीचा मुखवटा चढवून फुलांनी सुंदर सजवलं जायचं. गाभाऱ्याबाहेरच्या जागेत बसून पूजेचा सोहळा पाहाण्याचा आनंद अवर्णनीय असायचा.

      June 15, 2022