(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कुणाच्या खांद्यावर, कोणाचे ओझे?

    आज प्रत्येकालाच आपल्या घरात सगळ्या सुखसोयी अशाव्यात असे वाटत असते आणि ते योग्यच आहे परंतू आर्थिक ओढाताण करून सगळ्या गोष्टी विकत घेणे कितपत योग्य आहे? अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आणि आवड आहे. काहींना कर्ज काढून वस्तू विकत घेतल्या की काहीतरी विशेष केल्यासारखे वाटते आणि पैश्याची बचत केल्याचा आनंद होतो. असो. एका बाबांची कैफियत मांडण्याचा छोटासा प्रयत्न !

      July 11, 2011


  • अकड़..

    आत्म्याने आत्म्याचा केलेला आदर म्हणजे मर्यादा. ती आपल्या कामात, व्यवहारात, राहणीमानात असायला पाहिजे. मर्यादा हि सृष्टीने दिलेली संस्कृती आहे, ती सर्वांनी पाळायलाच पाहिजे…..

      September 3, 2019


  • डीएनए आणि अमिनो आम्ल

    डीऑक्सिरायबोज, एक फॉस्फेट आणि एक नत्रयुक्त घटक यांच्या मिळून बनणाऱ्या एका रेणूला न्युक्लिओटाइड म्हणतात. असा बनतो डीएनए साखळीचा एक मणी. डीएनए हा पेशीतील अतिशय महत्त्वाचा आणि अति कार्यरत असा बहुआयामी रेणू आहे. पेशीतील प्रथिनांच्या बांधणीत याचा मोठा सहभाग असतो.

      October 21, 2023


  • व्रेडफोर्टचं विवर

    व्रेडफोर्टचं विवर हे पृथ्वीवरच्या ज्ञात विवरांपैकी सर्वांत मोठ्या आकाराचं विवर आहे. तसंच ते अतिप्राचीन विवरांपैकी एक आहे. काळानुसार ते पृथ्वीवरचं दुसऱ्या क्रमांकाचं प्राचीन विवर ठरलं आहे. हे विवर सुमारे दोन अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाल्याचं भूशास्त्रीय संशोधनावरून दिसून येतं. हे विवर इतकं जुनं आहे की, या दीर्घ काळात त्याच्या कडा पूर्णपणे धुपून गेल्या आहेत. त्यामुळे त्या आता अस्तित्वात नाहीत. आता मागे राहिला आहे तो अशनीच्या आघातामुळे विवराच्या मध्यभागी निर्माण झालेला उंचवटा. हा उंचवटा म्हणजेच व्रेडफोर्टच्या परिसरातले डोंगर! या विवराचा व्यास सुमारे १७२ किलोमीटर इतका असल्याचा जो निष्कर्ष काढला गेला होता, तो भूशास्त्रीय पुराव्यावर आधारलेला आहे. तिथल्या जमिनीत सापडलेल्या विविध खनिजांवरून, खडकांच्या स्वरूपावरून हा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

    व्रेडफोर्टचा परिसर म्हणजे एक विवर असल्याचं स्पष्ट झाल्यानंतरच्या काळात, त्या परिसरातील, चुंबकत्व, गुरुत्वाकर्षण, भूशास्त्र, इत्यादींबद्दलची नवी माहिती उपलब्ध होत गेली. या नव्या माहितीवरून या विवराच्या कडा पूर्वी कशा आणि कुठपर्यंत पसरल्या असाव्यात, याची अधिक अचूक गणितं मांडली गेली. त्यानुसार हे विवर म्हणजे पूर्वी एकाभोवती एक असणाऱ्या अनेक कडांनी मिळून तयार झालेली गुंतागुतीची रचना असल्याचं दिसून आलं. या रचनेवरून या विवराचा पसारा सुमारे अडीचशे ते पावणेतीनशे किलोमीटरच्या दरम्यान असल्याचं स्पष्ट झालं. जर हे विवर इतकं मोठं असलं, तर हे विवर निर्माण करणारा अशनीही अतिप्रचंड आकाराचा असायला हवा. अमेरिकेतील रोचेस्टर विद्यापीठातील नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी आता या अशनीचा आकार शोधून काढला आहे. नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन अलीकडेच ‘जर्नल ऑफ जिओफिजिकल रिसर्च’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे.

    नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन गणिती प्रारूपावर आधारलेले आहे. या प्रारूपात त्यांनी या विवराशी संबंधित विविध प्रकारच्या उपलब्ध माहितीचा वापर केला. आघात झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या विवराचं स्वरूप हे अशनीच्या वेगावर, त्याच्या आदळण्याच्या कोनावर, त्याच्या आकारावर, त्याच्या भूशास्त्रीय घडणीवर तर अवलंबून असतंच; परंतु त्याचबरोबर जिथे हा आघात झाला, तिथल्या जमिनीच्या भूशास्त्रीय घडणीवरही ते अवलंबून असतं. आतापर्यंत झालेल्या सर्व संशोधनाचा तपशीलवार आढावा घेऊन, या संशोधकांनी ही सर्व भूशास्त्रीय माहिती जमा केली. यात इथे सापडलेल्या खडकांचे प्रकार, त्यातली खनिजं, इत्यादींचा समावेश होता. या ठिकाणच्या जमिनीत असलेल्या क्वार्टझाइट, ग्रॅनाइट, डुनाइट, कॅल्साइट, अशा वेगवेगळ्या खडकांंच्या थरांच्या जाडीचाही या संशोधकांनी आपल्या संशोधनात वापर केला. जेव्हा एखाद्या अशनीची रासायनिक घडण माहीत नसते, तेव्हा तो अशनी ग्रॅनाइटच्या खडकापासून बनलेला असल्याचं गृहीत धरलं जातं. त्यानुसार हा आघातक ग्रॅनाइटपासून बनला असल्याचं, या प्रारूपात गृहीत धरलं गेलं व ग्रॅनाइटची घनता या प्रारूपातील गणितासाठी वापरली गेली.

    या सर्व माहितीचा वापर करून नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, या प्रारूपाद्वारे कोणत्या आकाराचा अशनी, कोणत्या वेगानं या ठिकाणी आदळल्यास अडीचशे किलोमीटरहून अधिक व्यासाचं विवर तयार होईल हे शोधून काढलं. नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काढलेल्या निष्कर्षांनुसार, अडीचशे किलोमीटरहून अधिक व्यासाचं विवर निर्माण करणाऱ्या या अशनीचा व्यास हा १५ किलोमीटर नव्हे, तर सुमारे २५ किलोमीटर इतका प्रचंड असावा. हा अशनी पृथ्वीवर सेकंदाला सुमारे १५ किलोमीटर वेगानं आदळला असावा. या अशनीमुळे झालेला आघात हा पूर्वीच्या गणितांनुसार केल्या गेलेल्या आघातापेक्षा साडेतीनपटींहून अधिक तीव्र असण्याची शक्यता दिसून आली.

    केंद्रापासून विविध अंतरावरील जमिनीत निर्माण झालेल्या दाबाचं गणितही या संशोधकांनी या प्रारूपाद्वारे केलं आहे. या आघातामुळे निर्माण झालेला, आघाताच्या जवळच्या जमिनीच्या आतला दाब हा वातावरणाच्या दाबाच्या तुलनेत दहा लाख पटींइतका प्रचंड असावा. एखादं खनिज निर्माण होण्यासाठी उच्च तापमानाबरोबरच ठरावीक दाब निर्माण व्हावा लागतो. त्यामुळे आघाताच्या जागेपासून विविध अंतरावर विशिष्ट प्रकारची खनिजं सापडतात. या प्रारूपावरून काढल्या गेलेल्या विविध अंतरावरील जमिनीतील दाब हा, त्या अंतरावर प्रत्यक्ष सापडलेल्या खनिजांच्या निर्मितीला आवश्यक असणाऱ्या दाबाशी जुळणारा आहे. आघातादरम्यान निर्माण झालेल्या या प्रचंड दाबामुळे इथल्या जमिनीचा पृष्ठभाग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात, कमी-जास्त उचलला जाऊन, विवराच्या या गुंतागुंतीच्या रचनेची निर्मिती झाली असावी. या आघातामुळे इथे इतकी उष्णता निर्माण झाली की, जमिनीच्या सुमारे ५५ किलोमीटर खोलीपर्यंतच्या भागाला द्रवस्वरूप प्राप्त झालं. तसंच आघाताच्या जागेपासून सुमारे १३० किलोमीटरपर्यंतच्या पृष्ठभागावर वितळलेले खडक पसरले. द्रवरूप खडक निर्माण होण्यास तापमान किमान अडीच हजार अंश सेल्सिअस असावं लागतं.

    नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनातून आणखी एक नवी गोष्ट स्पष्ट झाली आहे. याचा सबंध रशियातील कारेलिआ इथे सापडलेल्या भूशास्त्रीय अवशेषांशी आहे. सन २०१४मधील एका संशोधनात रशियातील कारेलिआ येथे, काचेच्या गोट्यांसारखे दिसणारे काही मिलिमीटर आकाराचे गोलक सापडले. हे गोलक सुमारे दोन अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाल्याचं आढळून आलं. हे गोलक व्रेडफोर्ट इथल्या आघातादरम्यान दूरवर उडालेले पदार्थ असण्याची शक्यताही दिसून आली. नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधनानुसारही, व्रेडफोर्टवरच्या आघातामुळे तिथले काही पदार्थ सुमारे दोन-अडीच हजार किलोमीटर अंतरावर फेकले गेल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. कारेलिनाचं व्रेडफोर्टपासूनंच अंतर हे सुमारे दहा हजार किलोमीटर आहे. दोन अब्ज वर्षांपूर्वी सर्व खंड हे एकत्र असण्याची शक्यता लक्षात घेता, कारेलिनाचं व्रेडफोर्टपासूनचं तेव्हाचं अंतर खूपच कमी असलं पाहिजे. त्यामुळे नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अपेक्षित असणारी जागा आणि आजची कारेलिना एकच असण्याची एक शक्यता व्यक्त केली गेली आहे.

    सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी आजच्या मेक्सिकोजवळ असणाऱ्या चिक्षुलूब इथे आदळलेल्या अशनीनं पृथ्वीवरची ७५ टक्के जीवसृष्टी नष्ट केली. या महानाशात डायनोसॉर सर्वस्वी नष्ट झाले. हा अशनी सुमारे दहा किलोमीटर व्यासाचा होता. व्रेडफोर्ट इथे आदळलेला अशनी हा तर आकारानं, चिक्षुलूब इथे आदळलेल्या अशनीपेक्षा अडीचपट मोठा होता. या प्रचंड आकाराच्या अशनीमुळे झालेला नाशही तितकाच प्रचंड असायला हवा. परंतु या महानाशाचे पुरावे उपलब्ध नाहीत. कारण या काळात जीवसृष्टी अत्यंत प्राथमिक स्थितीत होती. या काळचे पृथ्वीवरचे सजीव जरी प्रकाशसंश्लेषण करू शकत असले तरी, वृक्षराजी अस्तित्वात आलेली नव्हती. त्यामुळे या आघातानंतर मोठ्या आगी लागण्याचा प्रश्नच नव्हता.

    आघाताच्या काळात जीवसृष्टी जरी प्राथमिक अवस्थेत असली तरी, या आघातामुळे त्याकाळीसुद्धा वातावरणात मोठे बदल झाले असावेत. तेव्हाही प्रचंड प्रमाणात धूळ उडून, सूर्यप्रकाश काही काळासाठी अडवला गेला असावा. परिणामी, तापमान घसरलं असावं आणि सजीवांच्या प्रकाशसंश्लेषणाच्या क्रियेतही अडथळा आला असावा. प्रकाशसंश्लेषण थांबल्यानं, प्रकाशसंश्लेषणावर अवलंबून असलेल्या सजीवांवर याचा मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल परिणाम झाला असावा. या आघातानंतर तापमान खाली आलं असलं तरी, वातावरणात जमा झालेल्या कार्बनडाय ऑक्साइड या हरीतगृह वायूमुळे नंतरच्या काळात तापमानात वाढही झाली असावी. या अतिप्रचंड आघाताच्या वेळी उडालेली धूळ पूर्णपणे खाली बसायला किती काळ लागला हे सांगता येत नाही. हा काळ दहा वर्षांपर्यंतचा दीर्घ असू शकतो. ही धूळ खाली बसल्यानंतरही, पृथ्वीला या आघाताच्या परिणामातून पूर्णपणे सावरायला यापेक्षाही दीर्घ काळ लागला असणार, हे उघडच आहे!

    -छायाचित्र सौजन्य : Lauren Dauphin/NASA Earth Observatory/Landsat
    Pierre Thomas / Planet Terre
    tadpolefarm / Wikimedia

    चित्रवाणीः व्रेडफोर्टचं विवर

      November 26, 2022


  • माल्टा

    पुन्हा एकदा एमीरेट्सच्या विमानाने मुंबई एअरपोर्ट वरून टेकऑफ घेतला होता. दुबई वरून माल्टा या भूमध्य समुद्रात असणाऱ्या बेटावरील बंदरात जहाज जॉईन करायचे होते. चेक इन काउंटर वर दोन्ही फ्लाईट करिता नेहमी प्रमाणे विंडो सीट साठी रिक्वेस्ट केली. मुंबई दुबई प्रवासात विंडो सीट मिळाली नाही पण दुबई ते माल्टा या प्रवासात विंडो सीट मिळाली.

      October 30, 2019


  • छत्रपती संभाजी महाराजांचा ‘झंझावात’

    माझ्या मावळ्यांनो, प्रजाजन हो, गेली ३४३ वर्षे दाबून ठेवलेल्या मनातील काही गोष्टी आज सांगाव्याशा वाटतायत् ! आम्हाला माहित आहे “आत्मा बोलतो” यावर आजच्या बुध्दिवादी लोकांचा विश्वस बसणार नाही.पण जे काही तुम्ही ऐकणार आहात ते ऐकून पूर्ण झाल्यावर तुम्हाला त्यातील सुसूत्रता पटेल आणि लक्षांत येईल की आम्ही जे बोललो तो गेल्या ३९३ वर्षांतील म्हणजेच आमच्या जन्मापासून ते आमच्या शारीरीक निर्वाणा पर्यंतचा घटनाक्रम अर्थात् इतिहास आहे आणि इतिहास कधी खोटा असेल काय हे तुम्हीच ठरवा !
    त्याआधी आम्ही तुम्हांस ३४४ वर्षे मागे नेतो…..

    आज चैत्री पौर्णिमा – रामभक्त हनुमानाची जयंती – म्हणजे तुमच्या आजकालच्या “इंग्रजा”ळलेल्या भाषेत ३-एप्रिल ! गेल्या अकरा दिवसांत आम्ही आसन्नमरण अवस्थेत आहोत आणि आज वैद्यराजांच्या औषधाच्या मात्रा पण पोटात ठरत नाहियेत.अंगाची नुसती काहिली होत्येय.सभोवताली काय चाललंय काही कळत नाही , अंतर्मनात जाणवत्येय ती फक्त गोमाजीबाबा पानसंबळ, महादेव आणि मनोहारी या सेवकांच्या डोळ्यांतील आर्त भाव ! राजाराम तर गेल्या अकरा दिवसांपूर्वीच स्वतःला “पोरका” समजू लागलाय ! शेवटी त्यांनाही महाराणींचे आणि रायगडावरील विषवल्लींचे फुत्कार ऐकू गेले असणारच !

      June 10, 2024


  • Different waves New Waves

    Different waves New Waves

    लेखिका मानसोपचार तज्ञ म्हणून ३० वर्षांहून अधिक काळ कार्यरत. व्यवसायमार्गदर्शक, मूल्यांकन व समुपदेशन प्रशिक्षक.

      July 12, 2022


  • नमस्काराचे महत्व

    जर प्रत्येक घरात वडिलधाऱ्या मंडळीना दररोज नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील, तर त्या घराघरात वितंडवाद सहज टाळता येऊ शकतात. असे घर स्वर्ग बनू शकते. मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे कवच आहे की, ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही.

      November 28, 2017


  • माहितीयुद्धा’त जबाबदार भारतीय म्हणून वागण्याची गरज

    देशभक्त नागरीक म्हणून आज सर्वांनी स्वतःवर सेल्फ सेन्सरशिप लादून आपण एक जबाबदार भारतीय म्हणून कार्य करण्याची अपेक्षा आहे. आज बदलत्या काळात अपप्रचार हीदेखील एक युद्धनीती झालेली आहे. त्यामुळेच या माहितीयुद्धामध्ये अत्यंत सजगतेने वर्तन करण्याची अपेक्षा प्रत्येक भारतीयाकडून आहे. ही वेळ जबाबदार नागरिकांची एकजूट दाखवण्याची आहे.

      March 17, 2019


  • अवचित…

    भरून आलंच होतं , पडणार हे वाटलंच होतं पण पुण्यांतला मे मधला पाऊस एखाद्या सिग्नल प्रमाणे पडतो फार फार तर मोठ्या चौकातल्या १८० सेकंदाच्या सिग्नल प्रमाणे ; त्यामुळे आडोशाला थांबलेले निघण्याची तयारी करण्यासाठीच थांबलेले असतात. पण आजचा नूर वेगळाच होता. तयारी तब्येतीत कोसळण्याची होती. पावसाची पहिली सर ओसरली की नंतर तो कसा पडतो ह्यावर तो किती वेळाचा आहे हे साधारण कळतं. आजचा खेळी मोठी असणार हे स्पष्टच होतं. अगदी जूनच्या ३० किंवा जुलैच्या २३ ला पडावा तसा मुरलेला पाऊस होता. कडाडणं थोडं कमीच पण लयीला ठेहराव होता.

    शरणागती पत्करून समीर आणि कैवल्यने बाईक बाजूला घेतली आणि बंद शटरच्या पायऱ्यांवर येऊन डोकं आणि हात पुसले. पुंडलिकही सायकल लावून पायरीवर येऊन बसला. रोहन जिमहुन घरी जात होता तोही शटरजवळ डफल ब्याग टाकून बसला. पाव बाटली पाणी गटागटा पिऊन रिकामी केली आणि पडणाऱ्या पाण्याकडे "याचा मला काय फायदा ?" अशा आविर्भावाने कटाक्ष टाकला.

    समीर-कैवल्यच्या दिवसभराच्या मीटिंग्स सुदैवाने पार पडल्या होत्या आणि जूनच्या अंकाला अपेक्षित जाहिरातदारांशी गाठीभेटी होऊन त्यातून समाधानकारक असे निष्पन्न झाले होते त्यामुळे आजची संध्याकाळ तशी शांतच असणार होती.

    पावसाचा जोर पाहून ,"आपल्याला मिळालेली आडोशाची जागा चांगली आहे म्हणून बरं ! ". असे उद्गार कैवल्यने काढले आणि दोघंही पायऱ्यांवर बसले.

    कैवल्यने कॅन्डी क्रशायाला सुरुवात केली. त्यातल्या आवाजाने पुंडलिकने त्याचाकडे पाहिलं आणि रबर बँडने एकत्र धरून ठेवलेला ,अतिजीर्ण झालेला मोबाईल खिशातून बाहेर काढला. त्याचीही कामे आज लवकर आटोपली होती. कुरिअर मुक्कामी पोचती करून, मुलांची गाईड-पुस्तके घेऊन ,सायकलचे पेडल बदलून तो आता घरी निघाला होता.

    शटरसमोरच रस्त्यापलीकडे ABN बँकेची शाखा होती. पायरीवरच्या सिक्युरिटी डेस्कवर सखाराम बसला होता. खिदळण्याचा आवाज ऐकून त्याने वर पाहिलं. गौरी , समिरा ,रेश्मा ABN बँकेच्या पायऱ्यांवर धावत-पळत पोहोचल्या होत्या. त्यांच्या लगबगीतून त्यांची उडालेली तारांबळ सखाला जाणवली. "पाउस लय लागलाय…", सखानं रस्त्याकडे पहात तिघींना उद्देशून म्हटलं. ब्यागा बँकेच्या बाहेरील काचेला लावून ठेवत गौरी - समिराने स्कार्फ काढला आणि केस मोकळे केले. भिजल्याने असह्य झाले होते त्यामुळे त्या लगेचच सखासाठी लावलेल्या Standing Fan समोर उभ्या राहिल्या. रेश्माने ब्याग उघडून Tab आणि Laptop चेक करून पुढच्या कप्प्यातल्या प्लास्टिक ब्यागेत गुंडाळून परत ठेवले.

    पावसाचा जोर कायमच किंबहुना वाढतंच होता. वाळलेली झावळी बँकेच्या कार पार्कींग मधील प्लास्टिक शेडवर पडली, सखा ती बघायला गेला.

    समीर "जिंदगीss..कैसी ये पहेली हाएss…" गुणगुणत असतानाच सेल्फ़ि घ्यायला ओलेत्या उभ्या राहिलेल्या गौरी-समिरा त्याला दिसल्या आणि त्याने "ये रात भिगी - भिगी…ये मस्त हवांएss…" या गाण्याला सुरुवात केली. रेश्माला ऒढुन आणून गौरीने सेल्फ़ि घेतला आणि त्यानंतर ४- ५ पोझेस देऊन स्वतःचे फोटो काढुन घेतले.

    लास्ट सेमचा अभ्यास, प्रोजेक्ट सबमिशन्स आणि पुढच्या इंटरव्यूजची तयारी यात पार गुंतलेल्या तिघी या अवचित पावसाने वेळापत्रक विसरल्या होत्या. बाहेर पडून कामाला जाणं शक्यच नव्हतं त्यामुळे त्यांनी राहिलेली कामं उद्यावर टाकली आणि निश्चिंत झाल्या. उडणारे तुषार आणि मधेच टपकणाऱ्या पागोळयांमुळे ड्रेस ओले झाले होते. एकीकडे असह्य पण मे च्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावल्याने आल्हाददायक अशी मनस्थिती झाली होती. शेवटी न राहून समिरा बँकेच्या बाईक पार्कींगमध्ये ; जिथे जरासे पाणी आता साचू लागले होते, त्यात जाऊन उभी राहिली आणि हात फैलावून तिने वर पाहत एक गिरकी घेतली. गौरी - रेश्माच्या चेहऱ्यांवरचं आश्चर्य सरून हसू उमटतं न उमटतं तोच समिराने ओंजळीने त्यांच्यावर पाणी उडवले. दोघींनीही धावत येउन तिथे गिरक्या घेतल्या आणि मनसोक्त भिजत राहिल्या.

    समीरने फेसबुक wallवरून ४-५ वेळा खालीवर केले. पोस्ट्स, फोटोज्, शेअर्स, स्टेटसेस काहीच नवीन नव्हते. whatsapp ग्रुप्स मधील अपडेट्स मात्र आज पहायच्या राहून गेल्या होत्या. 'मॉडर्न कॉलेज १९९७ बेच' चा सब्जेक्ट "HBD सुमंत नार्वेकर" असा ओझरता पाहिला आणि एकदम सेकंड ईअर च्या आंतर महाविद्यालयीन एकांकीकेतला सुमंत डोळ्यांसमोर उभा राहिला. मग अजूनही काही आठवणी जाग्या झाल्या. ह्या आठवणींच्या चल्लचित्रपटामुळे समीरला सुमंतशी बोलावेसे वाटले. पटकन ग्रुपमधून नंबर शोधून फोन केला. हलो,Mr. Sumant Narvekar ? (सुमंत एका MNC मध्ये मोठ्या पदावर आहे हे समीरला LinkeIn वरून कळलेच होते.) Yes..Speaking….Hi Sumant…I am Sameer !...Sameer Deshmukh…!!

    Reference जोडायला सुमंतला एक क्षण लागला पण त्यानंतर तो उडालाच. कॉलेजच्या मित्राशी तो तब्बल १८ वर्षांनी बोलत होता. सुमंतलाही बऱ्याचशा गोष्टी क्षणात आठवल्या. त्यानंतर कॉलेज ग्रुपमधील सगळ्यांबद्दल गप्पा झाल्या. कोण कुठे असतात , काय काय करतात… एकेकजणाबद्दल बोलताना त्यांना बऱ्याचशा गोष्टी आठवल्या आणि कॉलेजच्या आठवणींचा अल्बम चाळला गेला. नक्की भेटू… असं म्हणून समीरने फोन ठेवला पण अंगावरचा शहारा अजून तसाच होता. पावसाच्या पाण्याबरोबरच आठवणींच्या गुलाब पाण्याने त्याला अजूनच फ्रेश वाटू लागलं.

    पुंडलिकच्या फोनमध्ये सकाळचा missed call अजून तसाच होता. विलासने, त्याच्या मामेभावाने ४ वेळा फोन केला होता. पुंडलिकने call केला. विलास वाटच बघत होता. त्याला फवारणी यंत्राचा स्पेअर पार्ट काही केल्या मिळत नव्हता आणि पुण्यात तो खात्रीशीर मिळेल अशी जागा त्याला कळली होती. त्याने पुंडलिकला ते काम सोपवले आणि मामाच्या औषधाच्या गोळ्या आणायलाही सांगितले.

    रोहनला सर्फिंग करताना Battery Low चा मेसेज आला. तो फोन बंद करणार इतक्यात त्याला बहिणीने सांगितलेले काम आठवले. घाईने त्याने App उघडले आणि बहिणीच्या पुस्तकाचे shopping केले.

    आता तास - सव्वा तासानंतर पावसाचा जोर जरा कमी झाला होता. मंडळींनी निघायचा निर्णय घेतला आणि एकेक करून सगळे जण निघाले. बँकेसमोरून मुलींनीही निघण्याची तयारी सुरु केली होती.

    एकूणच अवचित पावसाने सगळ्यांची गैरसोय झालीच होती पण त्यामुळे त्यांना आप्तांसाठी अमुल्य असा वेळही मिळाला होता. टपटप पडणाऱ्या आणि भिजवणाऱ्या पागोळ्यांवर आता कुणाचाच राग उरला नव्हता. दाटलेल्या ढगांतही सर्वांना मोकळेपणा जाणवत होता.

    Rohit

      February 15, 2023