वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
शेतीमध्ये पारंपरिक ज्ञान व शास्त्रज्ञांच्या शिफारशी यांच्या जोडीला स्वतःची कल्पकताही आवश्यक असते. विविध शेतकऱ्यांच्या उदाहरणांमधून अशा कल्पना सर्वांच्या पुढे येत असतात.
बाबुराव वानखेडे हे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील आमला गावचे एक कल्पक शेतकरी. त्यांनी अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालयात इंटर कॉमर्सपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर स्वतः शेती करण्यास सुरुवात केली. काही वर्षे बाबुराव दर्यापूर पंचायत समितीचे सभापती होते. त्या वेळी सरकारी धोरणाप्रमाणे त्यांना रासायनिक खते व कीटकनाशके यांचा प्रसार करावा लागत असे आणि स्वतःच्या शेतीत त्याचा वापर ते करीत असत.
१९७७-७८ सालापासून ते सेंद्रीय शेती पद्धतीने शेती करतात. आहे. एका वर्षी ते शेतात तूर आणि मूग अशी एकत्रित पिके घेतात. दुसऱ्या वर्षी त्याच शेतात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या डीएचवाय- २८६ या कापसाच्या जातीची लागवड करतात. या जातीच्या पानांवर जास्त दाट लव असते. त्यामुळे नैसर्गिकपणे मावा, तुडतुडे व पांढरी माशी या किडींपासून पिकांचे संरक्षण होते. कीटकनाशके वापरायची गरज पडत नाही. झाडांची उंची ७० -७५ सेमी असल्याने कापसाची वेचणी सहज करता येते. बाबुराव कोणत्याही पिकाला रासायनिक खत देत नाहीत किंवा रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करीत नाहीत. तरीही त्यांच्या पिकांवर किडी आढळत नाहीत. या कापसाच्या शेतात आदल्या वर्षी तूर आणि मूग घेतल्याने या पिकांची पाने शेतात गळालेली असतात. त्या पानांचे खत कापसाच्या पिकाला मिळते. त्यामुळे वेगळे खत देण्याची गरज पडत नाही. बाबुरावांनी काही वर्षे सोयाबीनचे पीक घेतले. या पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव जास्त असतो. शिवाय सोयाबीनच्या पिकाला बाजारभाव कमी मिळतो. त्यामुळे हे पीक घेण्याचे बंद केले.
बाबुराव वानखेडे विदर्भ सेंद्रीय कापूस उत्पादक शेतकरी संघाचे सदस्य असल्यामुळे त्यांच्या कापसाची निर्यात होते आणि भाव जास्त मिळतो.
लेखक : सुरेश खडसे
January 15, 2014
गुरुगीतेमध्ये महेशानी अंबेला सांगितले, “जीवीत तेही समर्पिजे” म्हणजे सर्वस्व जो तुझा जीवात्मा आहे तो देखील तू अर्पण कर. काही शिल्लक ठेऊ नकोस. “जीवात्मा अर्पण केलास कि शिवात्मा प्रगट होणे म्हणजे आत्मज्ञान प्रगत होणे. गुरुगीतेत सांगितल्याप्रमाणे मी तू रहीत होणे म्हणजेच जीवात्मा अविनाशाप्रत अर्पण करणे.
September 16, 2011
कवी यशवंत अुर्फ पेण्ढरकर ‘पुणे ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन’ या संस्थेत नोकरीला होते. त्या संस्थेत ‘गाढवे’ या आडनावाचे अेक शिक्षक होते. विद्यार्थी त्या आडनावाची खूप चेष्टा करायचे म्हणून पेण्ढरकरांच्या मदतीनं त्या शिक्षकानं ‘गाढवे’ हे आडनाव बदलून ‘तारळेकर’ असं आडनाव धारण केलं. कारण ‘तारळे’ या गावचा तो मूळ रहिवासी होता.
June 11, 2016
भारत पाकिस्तान सीमारेषेवर पाक सैन्याकडून जोरदार गोळीबार केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून भारतीय लष्करास ‘पूर्ण पाठिंबा‘ देण्यात आला असून यामुळे पाकिस्तानच्या भूभागामध्ये लष्कराने नेमके जोरदार हल्ले करण्यास प्रारंभ केला आहे. लष्कराने कोणत्याही ‘निर्बंधांशिवाय‘ पाक सैन्यास उत्तर देण्यास सुरुवात केल्यामुळे पाकमधील ठार झालेल्या जवानांची वा दहशतवाद्यांची संख्या अनपेक्षितरित्या वाढली आहे.
September 8, 2014

October 2, 2015
… आणखी दोन वर्षांनंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या विनंतीवरून आंक्रिपने सामन्याचा निकाल बहालीवरून ‘अनिर्णित’ असा बदलला. थांबा. मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या सूचनेवरून (हा क्लब अत्यंत जुना आणि प्रतिष्ठित असून क्रिकेटच्या नियमांवर आजही त्याचेच राज्य आहे) पुढच्याच वर्षात आंक्रिपने सामन्याचा मूळ निकाल पुनःस्थापित केला.
August 20, 2010
तकऱ्यांच्या आत्महत्यांची चर्चा मोठ्या प्रमाणात होते आणि ती व्हायलाही हवी, कारण मुळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारच्या धोरणात्मक नीतीचा परिणाम आहे. सरकार अप्रत्यक्षरीत्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे. हा सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा आहे.
April 20, 2008
प्रकाशन दिनांक :- 13/03/2005
इतरांना शहाणपण शिकविण्याची सवय बऱ्याच लोकांना असते. आपल्याला कळते तेवढे दुसऱ्या कुणालाच कळत नाही, त्यामुळे या दुसऱ्यांना शहाणपणाच्या चार गोष्टी सांगायचा आपल्याला अधिकार प्राप्त झाला आहे, अशा भ्रमात बरेच लोक वावरत असतात. वस्तुस्थिती मात्र अशी असते की, इतरांना शहाणपण शिकविणारे हे लोकच मुळात अज्ञानी असतात.
March 13, 2005
चन्द्रापीडानन्दितमन्दस्मितवक्त्रां
चन्द्रापीडालंकृतनीलालकभाराम् ।
इन्द्रोपेन्द्राद्यर्चितपादाम्बुजयुग्मां
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ३॥
आई जगदंबेच्या या जगन्मोहन स्वरूपाचे अधिक वर्णन करतांना पूज्यपाद आचार्यश्री म्हणतात,
चन्द्रापीडानन्दितमन्दस्मितवक्त्रां- चंद्रापीड अर्थात ज्यांनी आपल्या मस्तकावर चंद्र धारण केला आहे असे, म्हणजे भगवान शंकर. त्यांना आनंद देणारे मंद स्मितहास्य जिचा वदनावर विलसत आहे अशी.
वास्तविक भगवान शंकर म्हणजे योगीराज शिरोमणी. कोणाच्याही व्यावहारिक सुखात, आकर्षणात ते अडकणारच नाहीत. पण त्यांनाही आनंद देणारे , आकर्षित करणारे असे आईचे हास्य आहे. किती सहज शब्दात आचार्यश्री आई जगदंबेचे लोकोत्तर स्वरूप वर्णन करीत आहेत. सामान्य माणूस आकर्षित झाला तर आश्चर्य काय? वैराग्य शिरोमणी असणारे भगवान शंकर आपली सहजसमाधी अवस्था सोडून आईच्या हास्याचा आनंद घेतात. वेगळ्या शब्दात आईचे हास्य समाधीच्या आनंदाच्या समतुल्य आहे.
चन्द्रापीडालंकृतनीलालकभाराम् - आईने देखील आपल्या, मस्तकावर चंद्र धारण केला आहे. त्या चंद्राने जिने आपल्या नीलवर्णीय अलकभार म्हणजे केश संभाराला अलंकृत केले आहे केले आहे अशी.
स्निग्ध अर्थात तेल लावलेल्या, काळ्याशार केसांवर अत्यंत तेजस्वी असा पांढरा शुभ्र प्रकाश पडला तर त्या काळ्या रंगाच्या ऐवजी तेथे किंचित निळी छटा पसरते. आचार्य श्रींचे हे सूक्ष्म निरीक्षण किती मनोहारी आहे.
इन्द्रोपेन्द्राद्यर्चितपादाम्बुजयुग्मां- इंद्र म्हणजे देवराज इंद्र. उपेंद्र म्हणजे भगवान विष्णू. आदी म्हणजे अन्य सर्व देवतांच्या द्वारे जिच्या चरणकमलांची अर्चना केली जाते अशी.
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे - अशा कमलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या त्या जगदंबा गौरीचे मी स्तवन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 30, 2020
कवठ हा वृक्ष मूळचा दक्षिण भारतातला आहे. कवठ हा काटेरी व पानझडी प्रकारचा वृक्ष आहे. भारतासहीत पाकिस्तान, श्रीलंका, जावा, ब्रह्मदेश, बांगला देश इ. प्रदेशांत कवठाचे वृक्ष आढळतात. हे फळ दक्षिण महाराष्ट्रात खूप प्रमाणात आढळते. सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात या वृक्षाची उपस्थिती लक्षणीय प्रमाणात आहे. त्यामुळेच औदुंबर, नरसोबावाडी येथे मिळणारी प्रसिद्ध कवठ बर्फी दुसरीकडे मिळत नाही.
May 4, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti