वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कधीही कुठेही जायचे झाले की बस मधून जावे लागत असे. तिकीट काढून सगळे जागेवर बसले आणि खात्री करून वाहक दोरी ओढून चला असा संकेत देतात. प्रवासी आपापल्या परीने जेवण. झोप. गप्पा. वाचन. आणि आता मोबाईल फोन वगैरे मध्ये गुंगतात. पण त्याला मात्र एकाच जागी बसून लक्ष केंद्रित करुन अगदी जागरूक पणे जबाबदारी पार पाडावी लागते. आपल्या इच्छित स्थळी प्रवासी उतरतात चढतात. त्यामुळे इथेही तो जागरूक असतो.
May 25, 2022
इकडे दिल्लीत संसदेचे आणि इकडे नागपुरात राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. दोन्हीकडे मुंबईवरील आतंकवादी हल्ल्याचीच चर्चा आहे. हा हल्ला नुकताच घडून गेला असल्याने आणि नेहमीपेक्षा या हल्ल्याची पद्धत आणि विध्वंसक क्षमता अधिक असल्याने या मुद्द्यावर चर्चा होणे तसे अपेक्षितच असले तरी आतंकवाद ही एकच समस्या देशासमोर नसल्याचे लोकप्रतिनिधींनी ध्यानात घ्यायला हवे.
December 21, 2008
रोज वाढणार्या लोकसंख्येचे प्रमाण आणि नैसर्गिक स्त्रोतांचे अल्प प्रमाण यापुढे मागणी-पुरवठ्याचे व्यस्त गणित भूक, कुपोषण आणि प्रदूषणावर मात करण्यास असमर्थ ठरणार आहेत. येणार्या काळात वाढत्या लोकसंख्येला आळा घातला नाही तर माणसाला जीवन जगण्यासाठी पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक स्त्रोत कमी पडतील.
July 6, 2013
कालपासून स्टेट बॅंकेने विजय मल्ल्यांचं ७ हजार कोटींचं कर्ज माफ केल्याची पोस्ट सगळीकडे फिरत आहे..हे कुणीतरी अज्ञानातून अथवा जाणून बुजून जनतेचा बुद्धीभेद करावा यासाठी करतंय अशी दाट शंका येते आणि लोकही किंचितसाही विचार न करता अशा पोस्टवर चर्चा करत बसतात व पुढे पुढे पाठवत राहातात.
November 21, 2016
येवले – औरंगाबाद मार्गावर, म्हणजे येवल्या पासून तेरा मैलावर कोटम हे गांव असून, या ठिकाणी “महालक्ष्मी”, “महासरस्वती” व “महाकाली” या तीन देवींची मंदिरं आहेत.
October 5, 2013
स्त्री आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेत असते पण ज्यावेळेस ही स्त्री काही कारणाने आजारी पङते त्यावेळेस मात्र घरातील लोकांना ह्याचा त्रास सहन करावा लागतो असे मला वाटते, एवढेच काय पण त्यांचे दैनंदिन जीवन ही विस्कळीत होते.
March 13, 2015
August 7, 2016
पूर्वी जेवणाची पंगत घरातील असो किंवा सार्वजनिक समारंभातील असो, त्याचे बरेचसे पैलू हे Eco friendly असत. जेवणासाठी पत्रावळ किंवा केळीचे पान वापरले जाई. पान वाढल्यावर नैवेद्य दाखवताना पानाभोवती दोनवेळा ( मंत्रांसह ) पाणी फिरवले जाई. ( पितृकार्यामध्ये पानाभोवती थोडेथोडे भस्म टाकले जाई ). काहीजण याबरोबरच आपल्या उजव्या हाताला, भाताच्या छोट्याछोट्या राशी, चित्राहुती म्हणून घालत असत. या ” शास्त्रा ” मागील ” शास्त्र आणि अन्य गोष्टी ” पाहू या.
December 23, 2017
हिमालयाच्या पायथ्याशी ते अगदी थेट काश्मीरपर्यंत सफरचंदाची झाडे सापडतात. कोकणात जसे आवळ्याची झाडे प्रत्येक ठिकाणी सापडतात. अगदी त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेत गाजर हे गरीबाचे पूरक अन्न अगदी त्याचप्रमाणे काश्मीर ते हिमाचल प्रदेशापर्यंत सफरचंदाची झाडे पसरलेली असतात. असेच अमेरिकेत लोक आदिवासी जमाती राहात असत अगदी त्याचप्रमाणे भारतीय गरीब लोक सफरचंद खात असत.
January 23, 2024
शेंगभाज्या
आता पर्यंत आपण पुष्कळ फळ भाज्या पाहिल्यात आता आपण एक वेगळा भाज्यांचा गट पाहूयात ज्यांना आपण शेंगभाज्या म्हणतो.
शेवग्याची शेंग
तर प्रथम पाहूयात आपण सर्वांच्याच आवडीची शेंग भाजी ती म्हणजे शेवगा.ह्या शेवग्याच्या शेंगांची भाजी,आमटी,लोणचे असे वेगवेगळे प्रकार केले जातात.कधीकधी ह्या कोवळ्या शेंगा तळून खायला देखील रूचकर लागतात.
ह्या शेंगा शेवग्याच्या भल्या मोठ्या उंच वृक्षावर लागतात.ह्या शेंगा चवीला तिखट,कडू व उष्ण असतात आणी त्या शरीरातील कफ व वात दोष कमी करतात व पित्त दोष वाढवितात.
जसा ह्यांचा उपयोग रुचकर स्वयंपाक करायला होतो त्यांच प्रमाणे ह्याचा वापर घरगुती उपचारात देखील केला जातो.कसा ते पहायचे ना:
१)२ कोवळ्या शेंगा तुकडे करून १/२ लिटर पाण्यात उकळून आटवून १/२ ग्लास शिल्लक ठेवावे त्यात १ चमचा मध व १/४ चमचा सुंठपूड घालावी व हे पाणी सकाळी व संध्याकाळी ४ वाजता प्यावे असे केल्याने सांधेदुखी,ठेच लागून झालेली दुखापत,कंबरदुखी ह्यात आराम मिळतो.
२)अर्धांगवायूचा झटका आलेल्या व्यक्तींच्या जेवणात शेवग्याच्या शेंगांची आमटी अथवा भाजी ठेवावी.
३)मासिक पाळी उशीरा येणे,ओटीपोटात दुखणे,स्त्राव कमी होणे अशा तक्रारी असणा-या स्त्रीयांना शेवग्याच्या शेंगांचा सूप त्यात जिरे घालून द्यावा.
४)कृमिंचा त्रास असणा-या व्यक्तिंना शेवग्याच्या जून शेंगा वाफवून रोज सकाळी ती खायला द्यावी व नंतर त्यावर तासाभराने २५मिली एरंडेल तेल प्यायला द्यावे.
शेवग्याच्या शेंगा खाण्याचा अतिरेक केल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
November 26, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti