वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
महाराष्ट्रातील निवडणूकांवर टाकलेला हा एक दृष्टीक्षेप
July 2, 2014
झटपट गुण देणाऱ्या या पॅथीला समाजामधे लवकर मान्यता मिळाली. घी देखा लेकीन बडगा नही देखा. झटपट गुण दाखवणारी औषधे तेवढ्या झटपट अवगुण दाखवत नाहीत. पण उशीरा का होईना, अवगुण हे दिसणारच.
January 31, 2018
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद ४-७ ओक्टोबर भारत दौर्यावर होत्या. आपल्या संसदीय निवडणुकीनंतर त्यांची ही पहिलीच भारतभेट होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत दौऱ्यावर आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांची भेट घेतली. दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने आपण सुवर्णअध्याय लिहू या, असे मोदी यांनी हसिना यांना बंगाली भाषेत सांगितले.
October 20, 2019
अहंकार हा माणसाचा स्थायी गुणधर्म आहे असे मला वाटते.आपण उपजतच अहंकारी असतो हे सत्य स्वीकारायला हवे.तसाही थोडाफार अहंकार असायलाच हवा.
February 27, 2024
आपल्याकडे तिखट म्हणजे फक्त मिरचीच असा समज आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत, जे तिखट आहेत जसे सुंठ, मिरी, पिंप्पळी, आले, इ.इ.
सर्व तिखट पदार्थ हे तेज म्हणजे अग्निमहाभूत प्रधान द्रव्य असतात.
आपल्याकडे म्हणजे भारतात दोन प्रकारचे मसाले आढळतात.
गोडा मसाला आणि यातच मिरचीपूड घातली की बनतो, तिखट मसाला. प्रदेशानुसार यांची नावे कदाचित बदलतील.
भारतीय आहारात पंधरावीस प्रकारचे मुख्य पदार्थ मसाला बनवण्यासाठी वापरले जातात. मुख्यत्वेकरून मिरी, दालचिनी, लवंग, बडिशेप, खसखस, तमालपत्र, जायफळ, जायपत्री, धने, मोहोरी, हिंग, हळद, यासारखे सुके पदार्थ वापरले की सुका मसाला आणि कांदा, लसूण, नारळ, शेंगदाणे वापरून केलेला ओला मसाला होतो.
मसाल्यातील एक दोन पदार्थ कमी जास्त केले की, मसाल्याचा स्वाद बदलत जातो. जिरे जास्ती वापरले की तो पावभाजीचा मसाला होतो, धनेपावडर जास्त वापरली की सांभार मसाला होतो. त्यामुळे प्रत्येक तिखट पदार्थ कमी जास्त प्रमाणात आपले परिणाम दाखवतात.
गंमत अशी आहे, हे मसाल्याचे पदार्थ तर सर्वच गृहिणी वापरतात, पण हे सर्व मसाल्याचे पदार्थ, आयुर्वेदीय औषधी आहेत, त्यांचे वेगवेगळे गुणधर्म आहेत, त्यांचा युक्तीने वापर केला तर आपला आहार हेच परिपूर्ण औषध होऊ शकतो, हे ज्या गृहिणींना समजले, त्या सुगृहिणी !
या प्रत्येक मसाल्यामधे एकतरी उडनशील तेल असते, जे त्या पदार्थाला विशिष्ट सुगंध, आणि विशिष्ट चव देते. हे तेल औषधी असते, औषध म्हणून पोटात जाणे अपेक्षित आहे.
पण जीभेच्या चोचल्याच्या मागे लागून आपण खमंगपणा वाढण्यासाठी मसाले भाजून वापरायला सुरवात केली आणि मूळ औषधापासून, आहार लांब होत गेला.
काही औषधी बनवताना भाजावी लागतात, शिजवावी लागतात, तळावी लागतात, त्यातील काही पदार्थांचे गुण वाढवायचे असतात तर काहींमधले दोष काढावयाचे असतात, जसे हिंग हा तुपात भाजून वापरावा, मोहोरी तेलात तडतडल्यावर शुद्ध होते. म्हणजे त्यातील उष्णतीक्ष्ण गुण थोडे कमी होतात.
त्यामुळे हा अग्निसंस्कार करणे आवश्यक असते. पण काही ठिकाणी मात्र हे मसाले औषध पूर्ण तयार झाल्यावर कच्च्या स्वरूपात वरून घालायला सांगितले आहे. याला आयुर्वेदीय औषधांच्या परिभाषेतमध्ये प्रक्षेप म्हणतात.
मसाल्याचे पदार्थ भाजले की त्यातील उडनशील तेल उडून जाते, जे पोटात जाणे अपेक्षित असते, त्यामुळे मसाला न भाजता आहारात वापरला तर आपले जेवणच औषधी होईल. म्हणजेच युक्ती वापरली तर आहार हेच औषध बनते.
"आम्हाला वगळा गतप्रभ जणु होतील तारांगणे" च्या धर्तीवर हे मसाल्याचे पदार्थ वापरायचे नाहीत, असे ठरवले तर जेवणातील औषधी भाग जवळपास संपूनच जाईल.
तिखट खाऊच नका, असे म्हणण्यापेक्षा युक्तीने तिखट खा, असे म्हणणे जास्त गोड वाटते ना !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
11.11.2016
November 11, 2016
आपल्या तोडीचंच किंवा थोडा वरचढ सेन्स ऑफ ह्यूमर असणारं फ्रेंड सर्कल असणं ह्यासारखं दुसरं भाग्य नाही आणि आपण मारलेला एखादा पंच समोरच्याला समजावून सांगायची वेळ येणे ह्यासारखं दुर्भाग्य नाही.
समोरासमोर नसतानासुद्धा गप्पा मारताना टाईप केलेल्या वाक्यांमधून हवा तो अर्थ पटकन पटकन समजून, त्याचा अजून तिरका अर्थ काढून बोललेलं वाक्य तिसरीकडे नेऊन ठेवणे ह्यातली मजा अवर्णनीय आहे. वयाच्या बंधनाला अमान्य करून वाह्यातपणा चालू ठेवला की, बुद्धी ताजीतवानी राहते आणि मेंदू अखंड क्रिएटिव्ह राहतो.
"अरे तुझं वय काय, बोलतोयस काय?" हा प्रश्न ज्याला पडतो ती माणसं अकाली वृद्ध होतात. येता जाता केलेला फालतूपणा हा आपले हॅप्पी हार्मोन्स अबाधित ठेवतात,
एखादी गोष्ट सिरियसली न घेता अतिशयोक्ती वगैरे करून त्याची पार वाट लावणं ज्याला जमतं तेच खरे मित्र!
एकमेकांच्या वरचढ कोटी करून विनोदाची हद्द गाठणे, हेच खरं जीवन! बाकी सब मोहमाया!!
June 8, 2017
मोहन वाघला नानांनी नवीन नाटक दिलं नाही, पण यादरम्यान मोहन तोंडवळकर यांच्या कलावैभवला मात्र एक नवीन नाटक दिलं. विषय होता सत्यभामा आणि पारिजात. आणि नाव होतं ‘पारिजात फुलला’. ‘शिवाजी मंदिर’ला प्रयोग पहायला गेलो. प्रयोग संपल्यावर नानासाहेबांना भेटायला आत गेलो. इकडची तिकडची बोलणी झाल्यावर कसं काय चाललंय यावर एकमेकांच्या आगामी कार्यक्रमाविषयी बोलणं निघालं.
July 11, 2026
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
September 19, 2018
ध्वनी प्रदूषण हा जागतिक पातळीवरचा प्रश्न असून तो गंभीर बनत चालला आहे. सर्वच प्रकारची गर्दी असणाऱ्या मोठ्या महानगरांमध्ये या प्रश्नाची तीव्रता अधिक जाणवते. सतत मोठा आवाज कानावर आदळत असेल तर माणसाला बहिरेपणा किंवा बधीरपणा येतो. ध्वनी प्रदूषणामुळे हृदयरोग, ब्लडप्रेशर, अल्सर, कोलेस्टेरॉल, श्वसन आणि पचनाचे विकारही जडतात.
August 6, 2014
आपल्या देशातील लोकसंख्येची स्थिती समुद्रातल्या हिमनगासारखी आहे. त्याचा एक दशांश भाग पाण्यावर असतो आणि नऊ दशांश भाग पाण्याखाली असतो. पाण्याबाहेरचा भाग म्हणजे इंडियात राहणारे लोक आणि पाण्याखालील नऊ दशांश भाग म्हणजे हिंदूस्थानात राहणारे लोकं
December 6, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti