वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
वे’रुळ व एलोरा किंवा अजिंठा या जगप्रसिद्ध लेण्यांची निर्मिती जरी इ. स. १ ते इ. स. १४ च्या दरम्यान झाली असली तरी त्या आपल्याला आता आता म्हणजे ब्रिटिशांचं राज्य हिंदुस्थानवर होतं त्या काळात जगाला वेरुळ कळाल्या. डोंगररांगांमध्ये ही निर्मिती झाली. जळगावजवळ अजिंठा तीन डोंगरांमध्ये अजिंठा लेण्यांत चित्रकला साकारली. या व अशा प्रकारच्या लेण्या या महान राष्ट्रात… ‘महाराष्ट्रात’ सुमारे एक हजारांवर आहेत.
April 29, 2024
कवी मर्ढेकरांची अतिशय सुंदर मुग्ध प्रणय दर्शविणारी ही कविता. यातील, तरुणीचे, थंडगार हवेत, भल्या सकाळी येणे आणि जाताना, आपला अननुभूत ठसा उमटविणे, सगळेच अप्रतिम. राग ललत हा याच प्रकृतीचा आहे. प्रसन्न, प्रणयी तरीही संयत आणि मुग्ध आणि नवथर हुरहुरीची थरथर दर्शविणारी. अगदी पहिल्या स्वरांपासून रागाचे लडिवाळ स्वरूप आपल्याला दिसायला मिळते.
August 31, 2018
जर्मनी, हा युरोपमधला सर्वात मोठा उद्योगप्रधान देश आहे. भारतामध्ये जे देश गुंतवणूक करतात त्यामध्ये जर्मनी हा आठव्या क्रमांकाचा देश आहे.भारत आणि जर्मनी यांच्यादरम्यानचा सध्याचा व्यापार १६ अब्ज डॉलर्स इतका आहे.तसेच युरोपियन व्यापारी महासंघात असणार्या २८ देशांपैकी भारताचा सगळ्यात मोठा व्यापार भागीदार जर्मनी आहे.
November 17, 2015

१८९० ते १९१० च्या दरम्यान चोवीस तास वा त्यापेक्षा जास्त वेळ प्रवास करण्यासाठीच्या लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू झाल्या. त्यावेळी प्रवासात जेवणाची, खाण्यापिण्याची सोय प्रवासी स्वत:च करत असत. चार ते पाच-कप्पी पितळी वा अॅल्युमिनियम डबे, फिरकीचे तांबे, खुजे अशा जय्यत तयारीनिशी प्रवासी मंडळी दूरच्या प्रवासास निघत. ब्रिटिश उच्च अधिकारी पहिल्या वर्गानं प्रवास करत. त्यांना ताजं जेवण लागत असल्यानं त्यांच्या गाडीला एक वेगळा खानपान बनविण्याचा डबा जोडण्यात येऊ लागला. तिथे बर्फ ठेवण्याचीही सोय असे. पुढे पहिल्या वर्गाचे प्रवासी आपल्या डब्यांतून पॅन्ट्रीकारमध्ये जाऊन नाश्ता व जेवण करत. तिथे बसण्यास हॉटेलसारखी टेबलं-खुा असत. त्या काळात दोन डब्यांतून प्रवाशांना जाण्या-येण्यासाठी जोडणारी व्यवस्था (Vestibule) नव्हती, त्यामुळे या खानपानाच्या डब्यापर्यंत प्रवाशांना पोहोचता यावं म्हणून लांब पल्ल्याची गाडी मधल्या लहान स्टेशनवर तीन ते पाच मिनिटं थांबत असे व प्रवासी तेवढ्या वेळात आपल्या डब्यातून उतरून पॅन्ट्रीकारपर्यंत जात असत. फ्रंटीयर मेल, ग्रँड ट्रंक एक्सप्रेस या अशा गाड्या होत्या. मुंबई-दिल्ली मार्गावर गाडी विरारला थांबे.
हळूहळू जेवणाची मागणी वाढत गेल्यानं, जेवणाची ताटं प्रवाशांच्या जागेवर आणून देण्याची सोय झाली. ज्या गाड्यांना पॅन्ट्रीकार लागत असे त्यांची नोंद टाईम टेबलमध्ये ‘पी.' पॅन्ट्री म्हणून होते, पण पॅन्ट्री डबे सर्व गाड्यांना नसतात; त्यामुळे प्रवाशांच्या जेवणाच्या सोयीसाठी वाटेतील मोठ्या रेल्वे स्टेशनवर रेल्वेची कँटीन्स सुरू झाली. तिथे गाडी २० ते ३० मिनिटं थांबत असे. तेवढ्या वेळात अनेक प्रवासी या कँटीनमध्ये भरभर जात व जेवण उरकत. यामध्ये गाडीचा वेळ फुकट जाऊ लागल्यानं, जेवणाची ताटं ऑर्डरप्रमाणे गाडीच्या प्रत्येक डब्यात पोचवण्याची सोय झाली. या सोयी जरी उपलब्ध होत्या, तरीही घरातून डबे नेण्याचं प्रमाणही बरंच होतं.
अति-लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये अॅल्युमिनियम फॉईलमधून जेवणाची बंद पाकिटं येण्यास सुरुवात झाली. अनेक प्रकारचं व चविष्ट खाणं देण्यासही सुरुवात झाली. राजधानी, शताब्दी, दुरान्तो या गाड्यांमध्ये उत्तम जेवणाची सोय असते आणि त्याचा खर्च तिकिटातच घेतला जातो.
खानपान विषयक रेल्वेची भावी योजना
रेल्वेकडून भारतभर २५० भव्य स्वयंपाकघरं उभारली जाणार आहेत. तिथे दिवसाला जेवणाची व नाष्ट्याची सहा लाख पाकिटं अतिशय आधुनिक पद्धतीनं बनविली जातील. खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर रेल्वेची कडक नजर असेल. स्वयंपाकघरासाठी स्टेशनजवळ एक रुपया चौरस फुटाच्या दरानं कंत्राटदाराला जागा दिली जाईल.
निर्जंतुक आरोग्यदायी अन्नपदार्थ (हायजेनिक) बनविण्याकडे कटाक्षानं लक्ष दिलं जाईल. प्रवासी मोबाईलवरून एस.एम.एस.द्वारा आपल्या आवडीचं जेवण मागवू शकेल व ते त्याला त्याच्या जागेवर मिळेल. रेल नीर'नं (बिसलरी) तर क्रांतीच केली आहे. या योजनेमुळे वर्षाला अंदाजे २००० कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे.
अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत तक्रारी आल्यास कंत्राटदारावर कडक कारवाई केली जाईल. काही काळापूर्वी कोकण रेल्वेवरील मंगलोर येथील कंत्राटदाराला याबाबत एक लाख रुपये दंड ठोठावून तो वसूलही करण्यात आला आहे.
पितळी कप्प्यांचे डबे, फिरकीचे तांबे बघता-बघता इतिहासजमा झाले आणि आता खानपान क्रांतीचं नवं युग आलं आहे. रेल्वे सर्वच बाबतींत अत्याधुनिक होत असल्याचा प्रत्यय खानपान-पुरवठ्याबाबतही येत आहे.
आता-आतापर्यंत डेक्कन क्वीनला असणारा ‘डायनिंग कार' हा डबा नुकताच गाडीला लावणं बंद करण्यात आलं, कारण अशा त-हेचे डबे आता भारतातील कोणत्याच गाडीला जोडले जात नसल्यानं त्यांचं उत्पादन थांबविलं गेलं आहे. पण या गाडीचा तो एक मानाचा डबा होता याची दखल घेत तशा त-हेचा डबा मुंबई रेल्वे वर्कशॉपमध्ये बनविण्यात येणार असून, तो 'डेक्कन क्वीन'ला पुन्हा जोडला जाणार आहे. असे आहे 'दख्खनच्या राणी'चे महत्त्व! डायनिंग कार: डेक्कन क्वीन
-डॉ. अविनाश वैद्य
August 6, 2022
पय म्हणजे पाणी आणि पय म्हणजे दूध देखील !
यांच्यातील काही साम्य.
दोन्ही घटक आहारीय. म्हणजे आहारातील मुख्य. एक बालकांचे एक इतरांचे.
यांच्याशिवाय आहार पूर्ण होतच नाही.
दोघांविषयी जनमानसात प्रचंड गोड गैरसमज.
आणि महत्वाचे म्हणजे मधुमेहाचे हे दोन मोठे मित्र !
मधुमेह होण्यामधे आणि वाढवण्यामधे.
पाणी हे जसे मधुमेह वाढवायला मदत करते तसे ते रक्तदाब वाढवायलाही मदत करते. तसेच दूध हे देखील मधुमेहाला वाढवते.
पाणी आणि दूध दोघे एकमेकामधे असे काही एकजीव होऊन जातात. की पाण्यात दुध की दुधात पाणी समजाणार सुद्धा नाही.
असो.
मोठ्या शहरामधे तर आपल्या घरात येणारे प्लॅस्टिकच्या पिशवीतील दूध, हे दूधच आहे की नाही, हे शोधण्यासाठी फार कष्ट करावे लागतील, अशी परिस्थिती आहे. एकवेळ पाणी शुद्ध करता येईल. पण दूध शुद्ध करणे हे महाकठीण काम. दूध शुद्ध करण्यासाठी गोवंश शुद्ध करण्यापर्यंतचा प्रवास करावा लागेल.
जिथे जिथे दूध असा उल्लेख आयुर्वेदात येतो, तिथे ते गाईचेच वापरावे. हे जेव्हा लिहिले होते त्या काळात गाईमधे "हायब्रीड" हा प्रकार नव्हता. जे दूध उपलब्ध होते, ते सर्व शुद्ध देशी भारतीय वंशाचेच होते.
सरकारी यंत्रणेने दुधाचा महापूर योजने अंतर्गत विदेशी वळू आणून आमच्या अस्सल देशी गाई नासवल्या. खरंतर दुधासाठी नव्हे तर भरपूर मांस मिळवण्यासाठी, विदेशी माजवलेले वळूंचे वीर्य आणले गेले हे खरे सत्य आहे. ( खोटे सत्य असते काय ? हो. भारतात असते. सांगायचे एका कारणासाठी. असते दुसऱ्याच कारणासाठी म्हणजे खोटे सत्य. "सत्य" शब्द देखील असा नासवलाय, की आता तो वापरतानादेखील खुलासा करावा लागतोय. हे दुर्दैव.
आणि आता तर विदेशी गोवंशाचा हैदोसच सुरू आहे. औषधाला देखील देशी गाय उपलब्ध राहिलेली नाही. दूध, दही, लोणी, ताक, तूप या आहारातील सर्वात श्रेष्ठ अश्या दैनंदिन वापरातील पदार्थांविषयी खात्रीने सांगावे असा एकही पदार्थ आज उपलब्ध नाही.
कोणत्या तोंडानी वैद्यांनी सांगावे, दूध प्या म्हणून ? आणि या या अश्या विदेशी गाईचे दूध प्यावे म्हणून? जे अत्यंत विषारी आहे. एकाही मिडीयाने याची दखल घेतलेली नाही. प्रत्येकाचे लागेबांधे कुठेतरी आहेत. दूध हे दुध राहिलेले नाही. जोपर्यंत आपण आपले पूर्ण शुद्धिकरण करत नाही, तोपर्यंत दुधापासून थोडं लांबच राहिलेलं बरं.
नाहीतरी दुध मधुमेहामधे वर्ज्यच सांगितलेले आहे.
एवढं स्पष्ट लिहून देखील काही जण प्रश्न विचारतील, मग आम्ही दूध पण प्यायचे नाही का ?
आता काय सांगावे ?
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
18.01.2017
January 18, 2017
कालचा रविवार हा सोलापूर वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक ठरला कारण होते एका जेमतेम शिकलेल्या पित्याने घेतलेल्या क्रांतिकारी निर्णययाचे, ज्यामुळे चार व्यक्तींना जीवनदान मिळाले!
गणेश उर्फ शिवपार्थ शिवशंकर कोळी हा अवघा 14 वर्षंचा मुलगा फुटबॉल खेळत असताना उष्माघाताने कोसळला,उपचारासाठी दाखल करताच डॉक्टररांनी,मेंदुला जब्बर धक्का बसल्याने त्याचे वाचणे अशक्य आहे हे त्याच्या नातेवाईकांना सांगितले,शेवटचे प्रयत्न करण्यात आले पण शेवटी रुग्णाचा मेंदु मृत झाल्यामुळे अखेर त्याला "ब्रेनडेड" घोषित करण्यात आले.ह्यानंतर जेमतेम दहावी शिकलेले मुलाचे वडील शिवशंकर कोळी यांनी मला माझ्या मुलाच्या आठवणी जपायचा आहेत त्यामुळे अवयव दानाची इच्छा बोलून दाखवली.सोलापूर वैद्यकीय क्षेत्र लगेच कामाला लागले.
शिवपार्थ चे चार अवयव.....हृदय,यकृत,दोन मूत्रपिंड हे काढण्यात आले,हृदय हे हवाई मार्गाने पुण्याच्या रुबी हॉस्पिटलला पाठवण्यात आले (पुण्याच्या इतिहासातील पहिले हार्ट ट्रान्सप्लांट) व एक मूत्रपिंड अन यकृत रुग्णवाहिकेने पुण्याच्या मंगेशकर व नोबेल हॉस्पिटलला पाठवण्यात आले.एका मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण सोलापुरात अश्विनी हॉस्पिटलमध्ये एका engineering शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आले जो 2 वर्षांपासून दोन्ही मूत्रपिंड निकामी असल्यामुळे डायलसीस वर होता.
आता इथे एक जीव गेल्याची खंत तर निश्चितच आहे पण त्याहून समाधान चार जीव वाचल्याचे आहे.......सलाम त्या पित्याला व मातेला ज्यांनी हा क्रांतिकारी निर्णय घेतला.सोलापुरातील डॉक्टरांनी जी तत्परता दाखवली त्याबद्दल त्यांना सलाम!!अवयव घेऊन जाताना ग्रीन कॉरिडॉर करण्यासाठी पोलीस अन सोलापुरातील नागरिकांनी जे सहकार्य केले त्यासाठी सर्वांना सलाम!
शेवटी एवढचं म्हणेन हि घटना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपली विचारसरणी बदलण्यासाठी...........नक्की विचार करा!!!
March 15, 2017
पाव शतकभर न सुटलेला एक प्रश्न निर्माण करणार्या एका प्रतिभावान खेळाडूचा जन्म ४ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. बेसिल लुईस डि ऑलिव्हेराचा जन्म या दिवशी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये झाला.
September 28, 2010
स्वामी `प्रतिवादी भयंकर’ अण्णा रचित मंगलाशासनम् म्हणजे व्यक्तिगत स्वार्थांपासून दूर होऊन अत्युच्च पातळीची भक्तिपूर्ण प्रार्थना जेथे केवळ भगवंताच्याच कल्याणाचा विचार केलेला असतो. मंगलाशासनम् म्हणजे भक्ताची वेंकटेशाबद्दलची सततची वचनबद्धताच होय.
July 5, 2020
साहित्य ,कला , संस्कृती अनादीकालापासून अस्तित्वात असून त्यामधून जीवन मूल्यांची अभिव्यक्ती जाणीव होत असते. त्यामुळे या सर्व कला सदैव अस्तित्वात असणारच आहेत. त्यातून स्वानंद मिळत रहाणार आहे!
January 24, 2022
द्धिमत्ता, पवित्रता, शालीनता, सौंदर्यता, कलात्मकतेचे बळ घेऊन नवे स्वप्न साकारण्यासाठी उगवत्या सूर्याकडे पाहून तुतारी फुंकणारी महिला असे कंपनीचे बोधचिन्ह अजरामर झाले. याच तुतारीच्या निनादाचे बळ घेऊन येथे अयोध्येचा राजा, गोपालकृष्ण, खुनी खंजीर, राणीसाहेब व बजरबट्ट उदयकाल, चंद्रसेना, जुलूम अशा मूकपटाची निर्मिती येथे झाली.
March 29, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti