(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • याला जीवन ऐसे नाव भाग २४

    पाणी शुद्धीकरण भाग चार

    पाणी शुद्ध करण्यासाठी एक साधी पद्धत ग्रंथकार सांगतात.

    दोन मडकी घ्यावीत. एका मडक्यात अस्वच्छ म्हणजे नेहेमीचे उपलब्ध असेल ते नलोदक वा बोअरचे, विहिरीचे पाणी घ्यावे. ते जरा उंचावर ठेवावे. दुसरे मडके जरा खाली ठेवावे. एक स्वच्छ तलम कपड्याची गुंडाळून एक लांब वात करावी. आणि ती वरच्या मडक्यातील पाण्यात तळापर्यंत बुडेल अशी ठेवावी. ही वात ओली करावी. त्याचे दुसरे टोक बाहेर काढून खालील मडक्यात असे लोंबत ठेवावे की, वरच्या मडक्यातील पाणी थेंब थेंब वातीवरून खाली ठिपकत राहील. दोन्ही मडक्यावर नीट आच्छादन घालावे.

    वरच्या मडक्यातील काही अशुद्धी, वातीमुळे खालील पाण्यात येणार नाही. फक्त वरच्या मडक्यातील तळापर्यंत गेलेल्या वातीच्या पातळीपेक्षा दुसरे टोक आणखी खालील पातळीवर आले पाहिजे, हे पहावे.

    ही वात घसरून खाली येऊ नये यासाठी वरच्या मडक्यात वातीवर एखादी वाटी वजनासाठी ठेवावी.
    टीप टीप बरसा पानी.... सुरू होईल.
    वरच्या मडक्यातील पाणी गाळून आपोआप खालील मडक्यात जमा होईल. वरच्या मडक्यातील पाणी कमी होत जाईल. खालचे मडके भरत जाईल.

    वातीला चिकटलेली धुळ, माती सारखी अशुद्धी आपल्याला उघड्या डोळ्यांनी पहाता येते. कापडाची वात धुवुन वाळवून ठेवली की, पुनः दुसऱ्या दिवशी वापरायला तयार !

    खर्च म्हणाल तर काही नाही. मडक्यामुळे पाणी थंड पण होईल. वरील मडक्यात रोज एखाददुसरे सुगंधीत फूल किंवा पान किंवा बी किंवा वाळ्यासारखे सुगंधी असलेले एखादे मूळ ठेवावे. त्याचा वास, अर्क, आणि काही प्रमाणात सूक्ष्म औषधी गुण पाण्यात येतील.
    दररोज औषधीयुक्त शुद्ध गाळलेले थंडगार पाणी मिळत जाईल.

    करून तर बघा,
    गंमत म्हणून !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    31.12.2016

      December 31, 2016


  • श्रीमंत बाजीराव पेशवे : एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योध्दा

    श्रीमंत बाजीराव पेशवे यांची देशाला ओळख ‘अपराजित योद्धा अशी आहे. बाजीरावांनी त्यांच्या २० वर्षांच्या कारकिर्दीत ४१ लढाया लढल्या आणि त्या सर्वच्या सर्व जिंकल्या. २८ एप्रिल २०१९ ला रोजी बाजीराव पेशवे यांची २७९ वी जयंती साजरी करण्यात आली.

      May 3, 2019


  • मशागत मनाची

    आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस इतका व्यस्त झालाय, की त्याला स्वतःकडे, स्वतःच्या आरोग्याकडे, योग्य आणि पौष्टिक आहाराकडे लक्ष द्यायला वेळच नाही. मग मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणं तर दूरच राहिलं. सध्या तो ज्या प्रकारच्या आयुष्यातून प्रवास करतोय किंवा ज्या प्रकारचं आयुष्य जगतोय, ते त्याला मान्य नसलं तरी ते जगण्याला तो बांधील आहे.

      April 28, 2023


  • मोबाईल – एक खाजगीपण

    मोबाईल – एक खाजगीपण

    काल परवाचीच गोष्ट एकजण एका जुन्या मित्राशी नेहमीप्रमाणे गप्पा मारत असताना तो म्हणाला मला अमुक तमुक अँप वर फोटो टाकता येत नाही. काहीतरी शोधण्यासाठी त्याने त्याचा मोबाईल माझ्या हातात दिला , पण ते अँप मी ओपन करताच घाई घाई ने त्याने माझ्या हातून मोबाईल घेतला.

    हे तुमच्याही बाबतीत किंवा घरात घडले असेल, अगदी नवरा बायको ह्यांच्या बाबतीत देखील.. माझ्या फोन ला हात का लावला वगैरे. मी तर माझा फोन कधीच लॉक करत नाही पासवर्ड ने.

    साला आपली जिंदगी तो खुली किताब हैं.

    बायको मात्र नेहमी ह्या न त्या कारणाने माझा फोन घेते, तिचा फोन मात्र लॉक असतो , मला तिने अनेक वेळेला तिचा पासवर्ड सांगितला पण तो मी विसरतो म्हणा लक्षात ठेवायची गरज भासत नाही.

      July 3, 2025


  • “बोथमची अ‍ॅशेस” आणि “डॉक” (क्रिकेट फ्लॅशबॅक)

    क्रिकेट विश्वातील २ ऑगस्ट

      August 2, 2010


  • माघ शुद्ध सप्तमी अर्थात रथसप्तमी हा सूर्याचा उत्सव

    सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे. भारतात प्रभासपट्टणम, कोणार्क अशी मोजकीच सूर्यमंदिरे आहेत. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात कशेळी गावातील कनकादित्य या सूर्यमंदिराचा त्यात समावेश आहे. रथसप्तमीचा उत्सव मोठय़ा थाटात साजरा केला जातो.
    या मंदिराला ऐतिहासिक पाश्र्वभूमी आहे. मंदिरातील आदित्याची मूर्ती हजार वर्षांपूर्वी सोमनाथनजिकच्या प्रभासपट्टणम क्षेत्रात असलेल्या सूर्यमंदिरातून आणली गेली असावी, असे मानले जाते. या मंदिराबद्दलच्या अनेक दंतकथा प्रचलित आहेत. काठेवाडीतील वेरावळ बंदरातून एक व्यापारी दक्षिणेकडे निघाला होता. त्याच्या जहाजात आदित्याची ही मूर्ती होती. कशेळी गावासमोरून जात असताना ते जहाज एकदम थांबले. अनेक प्रयत्नांनंतरही जहाज पुढे जात नाही हे पाहिल्यावर आदित्याच्या मूर्तीला येथेच स्थायिक होण्याची इच्छा असावी, असा विचार व्यापाऱ्याच्या मनात आला आणि त्याने ती मूर्ती किनाऱ्यावरील काळ्या दगडाच्या खडकातील गुहेत नेऊन ठेवली. ही गुहा आज देवीची गुहा म्हणून ओळखली जाते. गावातील कनकाबाई नावाच्या एका महिलेला या मूर्तीबाबत दृष्टान्त झाला आणि गावकऱ्यांच्या मदतीने तिने ही मूर्ती गावात आणून त्याचे मंदिर बांधले. तेच हे कनकादित्याचे मंदिर.

    कशेळीतील गोविंदभट्ट भागवतांचे कुलोत्पन्न वंजश हे मंदिराचे विश्वस्त आहेत. पन्हाळगडच्या शिलाहार राजाने १११३ साली गोविंदभट्ट भागवतांना हा गाव इनाम दिला होता. त्याची माहिती देणारा ताम्रपटही या मंदिरात आहे. कनकादित्य हे जागृत देवस्थान असल्याची ख्याती सर्वदूर असल्याने मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, बेळगांव, हुबळी, धारवाड, उज्जन, ग्वाल्हेर, इंदूर येथून अनेक भक्तगण दरवर्षी दर्शनासाठी येत असतात. मुंबईचे शिल्पकार कै. नाना शंकरशेठ यांच्याबद्दलची एक आठवणही या मंदिराशी जोडली गेली आहे. शंकरशेठ यांना मूल होत नव्हते. तेव्हा भा. रा. भागवतांच्या आजोबांनी कशेळीला येऊन कनकादित्याला नवस करण्याविषयी सांगितले. त्याप्रमाणे नानांनी नवस केला आणि त्यानंतर त्यांना पुत्राचा लाभ झाला. त्याची आठवण म्हणून नानांनी मंदिरासाठी भव्य, आकर्षक असा सभामंडप बांधून दिला.

    माघ शु. सप्तमी ते माघ शु. एकादशी असे पाच दिवस मंदिरात रथसप्तमीचा उत्सव असतो. त्यावेळी मंदिराचे विश्वस्त कालिकावाडीतील देवीला आमंत्रण देतात. माघ शुद्ध षष्ठीला कालिकावाडीतून कालिकादेवी रात्री नऊच्या सुमारास निघते आणि रात्री बाराच्या सुमाराला कनकादित्य मंदिरात पोहोचते. मग देवीचा मुखवटा कनकादित्याच्या शेजारी ठेवला जातो. दुसऱ्या दिवशी साकळी रथसप्तमीला विधीपूर्वक पूजा करून उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली जाते. या उत्सवात दररोज कीर्तन, प्रवचन, आरती, मंत्रपुष्प, पालखी, प्रदक्षिणा आणि नाटक अशा कार्यक्रमांची रेलचेल असते. उत्सवकाळात या मंदिराला अवश्य भेट द्यायला हवी.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.लोकसत्ता

      January 16, 2017


  • बायकांनी बांगड्या का घालायच्या?

    आपल्याकडे पूर्वी बांगड्या भराययच्या अशी प्रथा होती. स्त्रियांना दर महिन्याला एम् सी म्हणजे पाळी होते. अँक्युप्रेशरमध्ये मनगटावर अंगठ्याचे बाजूला गर्भाशयाचा पाँईंट येतो आणि करंगळीचे बाजूला बीजांड कोशाचा( ओव्हरीचा) पाँईंट आहे. हे दोन्ही हातावर आहेत बांगड्या घातल्या की हे पाँईंटस अपोआप दाबले जातात.

    पाळीचे वेळी पोटात दुखणे, पाळीसाफ न होणे, पाळी रेग्युलर न येणे,टाचा दुखणो ह्या त्रासावर फायदा होतो. म्हणून बायकानी बांगड्या घालाव्यात. हल्ली बांगड्या घालणे सोडले असल्याने बायकाना वर सांगितलेले बरेच त्रास आहेत.

    अरविंद जोशी
    9421948894

      March 10, 2017


  • अतिथी देवो भव

    आपल्या भारतीय संस्कृतीत अतिथी देवो भव म्हणून त्याचे आगत्य केले जाते. आजही ग्रामीण भागात अजूनही जेवायला बसलेले शेतकरी अनोळखी माणसाला देखिल जाणाऱ्या व्यक्तीला या जेवायला पाहुणे असे म्हणतात रामराम करतात. आणि ती व्यक्ती सुद्धा तितकाच प्रतिसाद देताना म्हणतात की घ्या देवाचे नाव रामराम.

      December 31, 2021


  • जानेवारीचे जवाहीर

    ‘जानेवारी मध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या ‘कल्पक, दृढनिश्चयी व नेतृत्वगुणयुक्त’ मानल्या जातात. चालू ‘जानेवारी महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.

      January 20, 2026


  • व्रेडफोर्टचं विवर

    व्रेडफोर्टचं विवर हे पृथ्वीवरच्या ज्ञात विवरांपैकी सर्वांत मोठ्या आकाराचं विवर आहे. तसंच ते अतिप्राचीन विवरांपैकी एक आहे. काळानुसार ते पृथ्वीवरचं दुसऱ्या क्रमांकाचं प्राचीन विवर ठरलं आहे. हे विवर सुमारे दोन अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाल्याचं भूशास्त्रीय संशोधनावरून दिसून येतं. हे विवर इतकं जुनं आहे की, या दीर्घ काळात त्याच्या कडा पूर्णपणे धुपून गेल्या आहेत. त्यामुळे त्या आता अस्तित्वात नाहीत. आता मागे राहिला आहे तो अशनीच्या आघातामुळे विवराच्या मध्यभागी निर्माण झालेला उंचवटा. हा उंचवटा म्हणजेच व्रेडफोर्टच्या परिसरातले डोंगर! या विवराचा व्यास सुमारे १७२ किलोमीटर इतका असल्याचा जो निष्कर्ष काढला गेला होता, तो भूशास्त्रीय पुराव्यावर आधारलेला आहे. तिथल्या जमिनीत सापडलेल्या विविध खनिजांवरून, खडकांच्या स्वरूपावरून हा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

    व्रेडफोर्टचा परिसर म्हणजे एक विवर असल्याचं स्पष्ट झाल्यानंतरच्या काळात, त्या परिसरातील, चुंबकत्व, गुरुत्वाकर्षण, भूशास्त्र, इत्यादींबद्दलची नवी माहिती उपलब्ध होत गेली. या नव्या माहितीवरून या विवराच्या कडा पूर्वी कशा आणि कुठपर्यंत पसरल्या असाव्यात, याची अधिक अचूक गणितं मांडली गेली. त्यानुसार हे विवर म्हणजे पूर्वी एकाभोवती एक असणाऱ्या अनेक कडांनी मिळून तयार झालेली गुंतागुतीची रचना असल्याचं दिसून आलं. या रचनेवरून या विवराचा पसारा सुमारे अडीचशे ते पावणेतीनशे किलोमीटरच्या दरम्यान असल्याचं स्पष्ट झालं. जर हे विवर इतकं मोठं असलं, तर हे विवर निर्माण करणारा अशनीही अतिप्रचंड आकाराचा असायला हवा. अमेरिकेतील रोचेस्टर विद्यापीठातील नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी आता या अशनीचा आकार शोधून काढला आहे. नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन अलीकडेच ‘जर्नल ऑफ जिओफिजिकल रिसर्च’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे.

    नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन गणिती प्रारूपावर आधारलेले आहे. या प्रारूपात त्यांनी या विवराशी संबंधित विविध प्रकारच्या उपलब्ध माहितीचा वापर केला. आघात झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या विवराचं स्वरूप हे अशनीच्या वेगावर, त्याच्या आदळण्याच्या कोनावर, त्याच्या आकारावर, त्याच्या भूशास्त्रीय घडणीवर तर अवलंबून असतंच; परंतु त्याचबरोबर जिथे हा आघात झाला, तिथल्या जमिनीच्या भूशास्त्रीय घडणीवरही ते अवलंबून असतं. आतापर्यंत झालेल्या सर्व संशोधनाचा तपशीलवार आढावा घेऊन, या संशोधकांनी ही सर्व भूशास्त्रीय माहिती जमा केली. यात इथे सापडलेल्या खडकांचे प्रकार, त्यातली खनिजं, इत्यादींचा समावेश होता. या ठिकाणच्या जमिनीत असलेल्या क्वार्टझाइट, ग्रॅनाइट, डुनाइट, कॅल्साइट, अशा वेगवेगळ्या खडकांंच्या थरांच्या जाडीचाही या संशोधकांनी आपल्या संशोधनात वापर केला. जेव्हा एखाद्या अशनीची रासायनिक घडण माहीत नसते, तेव्हा तो अशनी ग्रॅनाइटच्या खडकापासून बनलेला असल्याचं गृहीत धरलं जातं. त्यानुसार हा आघातक ग्रॅनाइटपासून बनला असल्याचं, या प्रारूपात गृहीत धरलं गेलं व ग्रॅनाइटची घनता या प्रारूपातील गणितासाठी वापरली गेली.

    या सर्व माहितीचा वापर करून नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, या प्रारूपाद्वारे कोणत्या आकाराचा अशनी, कोणत्या वेगानं या ठिकाणी आदळल्यास अडीचशे किलोमीटरहून अधिक व्यासाचं विवर तयार होईल हे शोधून काढलं. नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काढलेल्या निष्कर्षांनुसार, अडीचशे किलोमीटरहून अधिक व्यासाचं विवर निर्माण करणाऱ्या या अशनीचा व्यास हा १५ किलोमीटर नव्हे, तर सुमारे २५ किलोमीटर इतका प्रचंड असावा. हा अशनी पृथ्वीवर सेकंदाला सुमारे १५ किलोमीटर वेगानं आदळला असावा. या अशनीमुळे झालेला आघात हा पूर्वीच्या गणितांनुसार केल्या गेलेल्या आघातापेक्षा साडेतीनपटींहून अधिक तीव्र असण्याची शक्यता दिसून आली.

    केंद्रापासून विविध अंतरावरील जमिनीत निर्माण झालेल्या दाबाचं गणितही या संशोधकांनी या प्रारूपाद्वारे केलं आहे. या आघातामुळे निर्माण झालेला, आघाताच्या जवळच्या जमिनीच्या आतला दाब हा वातावरणाच्या दाबाच्या तुलनेत दहा लाख पटींइतका प्रचंड असावा. एखादं खनिज निर्माण होण्यासाठी उच्च तापमानाबरोबरच ठरावीक दाब निर्माण व्हावा लागतो. त्यामुळे आघाताच्या जागेपासून विविध अंतरावर विशिष्ट प्रकारची खनिजं सापडतात. या प्रारूपावरून काढल्या गेलेल्या विविध अंतरावरील जमिनीतील दाब हा, त्या अंतरावर प्रत्यक्ष सापडलेल्या खनिजांच्या निर्मितीला आवश्यक असणाऱ्या दाबाशी जुळणारा आहे. आघातादरम्यान निर्माण झालेल्या या प्रचंड दाबामुळे इथल्या जमिनीचा पृष्ठभाग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात, कमी-जास्त उचलला जाऊन, विवराच्या या गुंतागुंतीच्या रचनेची निर्मिती झाली असावी. या आघातामुळे इथे इतकी उष्णता निर्माण झाली की, जमिनीच्या सुमारे ५५ किलोमीटर खोलीपर्यंतच्या भागाला द्रवस्वरूप प्राप्त झालं. तसंच आघाताच्या जागेपासून सुमारे १३० किलोमीटरपर्यंतच्या पृष्ठभागावर वितळलेले खडक पसरले. द्रवरूप खडक निर्माण होण्यास तापमान किमान अडीच हजार अंश सेल्सिअस असावं लागतं.

    नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनातून आणखी एक नवी गोष्ट स्पष्ट झाली आहे. याचा सबंध रशियातील कारेलिआ इथे सापडलेल्या भूशास्त्रीय अवशेषांशी आहे. सन २०१४मधील एका संशोधनात रशियातील कारेलिआ येथे, काचेच्या गोट्यांसारखे दिसणारे काही मिलिमीटर आकाराचे गोलक सापडले. हे गोलक सुमारे दोन अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाल्याचं आढळून आलं. हे गोलक व्रेडफोर्ट इथल्या आघातादरम्यान दूरवर उडालेले पदार्थ असण्याची शक्यताही दिसून आली. नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधनानुसारही, व्रेडफोर्टवरच्या आघातामुळे तिथले काही पदार्थ सुमारे दोन-अडीच हजार किलोमीटर अंतरावर फेकले गेल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. कारेलिनाचं व्रेडफोर्टपासूनंच अंतर हे सुमारे दहा हजार किलोमीटर आहे. दोन अब्ज वर्षांपूर्वी सर्व खंड हे एकत्र असण्याची शक्यता लक्षात घेता, कारेलिनाचं व्रेडफोर्टपासूनचं तेव्हाचं अंतर खूपच कमी असलं पाहिजे. त्यामुळे नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अपेक्षित असणारी जागा आणि आजची कारेलिना एकच असण्याची एक शक्यता व्यक्त केली गेली आहे.

    सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी आजच्या मेक्सिकोजवळ असणाऱ्या चिक्षुलूब इथे आदळलेल्या अशनीनं पृथ्वीवरची ७५ टक्के जीवसृष्टी नष्ट केली. या महानाशात डायनोसॉर सर्वस्वी नष्ट झाले. हा अशनी सुमारे दहा किलोमीटर व्यासाचा होता. व्रेडफोर्ट इथे आदळलेला अशनी हा तर आकारानं, चिक्षुलूब इथे आदळलेल्या अशनीपेक्षा अडीचपट मोठा होता. या प्रचंड आकाराच्या अशनीमुळे झालेला नाशही तितकाच प्रचंड असायला हवा. परंतु या महानाशाचे पुरावे उपलब्ध नाहीत. कारण या काळात जीवसृष्टी अत्यंत प्राथमिक स्थितीत होती. या काळचे पृथ्वीवरचे सजीव जरी प्रकाशसंश्लेषण करू शकत असले तरी, वृक्षराजी अस्तित्वात आलेली नव्हती. त्यामुळे या आघातानंतर मोठ्या आगी लागण्याचा प्रश्नच नव्हता.

    आघाताच्या काळात जीवसृष्टी जरी प्राथमिक अवस्थेत असली तरी, या आघातामुळे त्याकाळीसुद्धा वातावरणात मोठे बदल झाले असावेत. तेव्हाही प्रचंड प्रमाणात धूळ उडून, सूर्यप्रकाश काही काळासाठी अडवला गेला असावा. परिणामी, तापमान घसरलं असावं आणि सजीवांच्या प्रकाशसंश्लेषणाच्या क्रियेतही अडथळा आला असावा. प्रकाशसंश्लेषण थांबल्यानं, प्रकाशसंश्लेषणावर अवलंबून असलेल्या सजीवांवर याचा मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल परिणाम झाला असावा. या आघातानंतर तापमान खाली आलं असलं तरी, वातावरणात जमा झालेल्या कार्बनडाय ऑक्साइड या हरीतगृह वायूमुळे नंतरच्या काळात तापमानात वाढही झाली असावी. या अतिप्रचंड आघाताच्या वेळी उडालेली धूळ पूर्णपणे खाली बसायला किती काळ लागला हे सांगता येत नाही. हा काळ दहा वर्षांपर्यंतचा दीर्घ असू शकतो. ही धूळ खाली बसल्यानंतरही, पृथ्वीला या आघाताच्या परिणामातून पूर्णपणे सावरायला यापेक्षाही दीर्घ काळ लागला असणार, हे उघडच आहे!

    -छायाचित्र सौजन्य : Lauren Dauphin/NASA Earth Observatory/Landsat
    Pierre Thomas / Planet Terre
    tadpolefarm / Wikimedia

    चित्रवाणीः व्रेडफोर्टचं विवर

      November 26, 2022