वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आज ११ ऑगस्ट ! परदेशात हा दिवस ‘राष्ट्रीय मुलगा व मुलगी दिन’ (National Son and Daughter Day) म्हणून साजरा केला जातो. आपण पाश्चात्य संस्कृतीचं खूप अनुकरण करतो. आज हा दिवस उद्या तो दिवस मग कधीतरी आजचा दिवसपण चांगला साजरा करू. इतर दिवसांप्रमाणे हा दिवससुद्धा तितकाच प्रसिद्ध करू.
August 11, 2020
‘बालपणीचा काळ सुखाचा’ आठवला की हरवून जातं मन. आठवणींची झुंबड उडते मनात. दिवाळीचे व गणपतीचे दिवस, गोकुळाष्टमीचे व होळीचे दिवस, सुट्ट्यांचे व सहलीचे दिवस आठवतात. प्रत्येक सण वा प्रसंग हे आपल्याला भरभरून देत असतात. असे खास दिवस साजरे होण्यापूर्वी तयारी करण्यात वेगळीच गंमत असते, तर ते खास दिवस पार पडल्यानंतर येणारी ‘पोकळी’ ही देखिल आयुष्याच्या चक्राविषयी नकळत शिकवीत असते.
May 31, 2020
प्रत्येकाला स्वतःमधील कोणीतरी असा “स्वतः “घडविता आला पाहिजे, ज्याचा इतरांना अभिमान वाटेल, स्वतःची मान गर्वाने उन्नत करता येईल आणि जे डोळ्यापुढे असेल, ते हाताच्या आवाक्यात आणता येईल. त्या वाटेवरील काही पायऱ्या….
June 30, 2021
जगात आढळणार्या कॅन्सरपैकी कोलोरेक्टल कॅन्सर हा तिसरा क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कॅन्सर आहे. फक्त 1.4 दशलक्ष कोलोरेक्टल कॅन्सरची प्रकरणे एकट्या 2012 साली निदान करण्यात आली होती. आत्ताच्या परिस्थितीवरून असा निष्कर्ष काढला जातोय की 2035 सालापर्यंत 2.4 दशलक्ष प्रकरणे प्रतिवर्षी कोलोरेक्टल कॅन्सर चे निदान केली जातील. 1.08 दशलक्ष स्त्रियांमध्ये व 1.36 दशलक्ष पुरुषांमध्ये हे प्रमाण जास्त झालेले आढळेल.
व्यक्तीच्या आहारावर त्या व्यक्तीला कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका निर्माण होईल का नाही हे अवलंबून असते. साहित्य पुनरावलोकनानुसार शाकाहारी भोजन कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात तर जास्त प्रथिने व जास्त फॅटयुक्त आहार ह्या कॅन्सरचा धोका वाढवतात. तसेच आशा प्रकारचा आहाराचे सेवन तुम्ही किती काळ केले ह्यावर ही कॅन्सरचा धोका अवलंबून असतो.
कॅलिफोर्नियातील Loma Linda विद्यापीठात 70,000 लोकांच्या खाण्याच्या सवयीचं विशलेषण केले. ह्या लोकांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका आहे का नाही आणि असल्यास तो किती आहे हे तपासण्यासाठी शाकाहारी भोजन घेणार्या व्यक्तींची तुलना मांसाहार घेणार्या व्यक्तीबरोबर केली असता शाकाहारी भोजन घेणार्या व्यक्तींमध्ये 22% कॅन्सरचा धोका कमी झालेला आढळला जेव्हा ह्याच व्यक्तींची तुलना मासे खाणार्या व्हेजिटेरिअन लोकांबरोबर केली असता हा धोका 43%पर्यंत कमी झालेला आढळला. मासे व इतर सीफूड घेणार्या व्हेजिटेरिअन लोकांच्या आहाराला pesco-vegetarian डाएट असे संबोधले जाते. वरील शोधप्रबंधाची माहिती JAMA Internal medicine ह्या नियतकालिकेमध्ये प्रसिद्ध झाली आहे.
The Adventist Health Study 2 (AHS_2) हया प्रयोगात 96354 लोकांचा सहभाग होता. ह्या सर्व व्यक्तींचा पाठपुरावा 7.3 वर्ष केला असता 380 व्यक्तींना Colon cancer व 110 व्यक्तिंना rectal कॅन्सरचा धोका निर्माण झालेला आढळला तसेच शाकाहार घेणार्या व्यक्तींमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका कमीच आढळला. जेव्हा मांसाहार विरूद्ध Pesco-vegetarian आहाराशी तुलना केली असता Pesco-vegetarian आहार घेणार्या व्यक्तींमध्ये तो धोका कमी झालेला आढळला. हा शोधप्रबंध JAMA Intern.Medicine 2015; 175 (5):767 - 776 ह्या नियतकालिकेमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
शाकाहार कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका का कमी करताना दिसतात?
• Insulin and insulin like growth factor कोलोरेक्टल कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात असे निदर्शनास आले आहे आणि शाकाहारी जेवणामुळे ह्या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण येते आणि म्हणूनच वेस्टर्न आहाराच्या तुलनेत शाकाहारी जेवणामुळे हा त्रास कमी होत असेल.
• फोलेट, कॅल्शियम, फायबर ह्या सारखे महत्वपूर्ण अन्नघटक जे कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका टाळण्यास मदत करतात ते शाकाहारी पदार्थातून मिळतात.
• बर्याचदा ज्या पद्धतीने मटण, रेडमीट शिजवले जाते त्यामुळेही कॅन्सरचा धोका वाढतो असे प्रयोगात आढळले आहे, आणि हेच मटण प्रक्रिया केलेले असेल तर हा धोका दुप्पटीने वाढताना दिसतो.
कॅन्सरचा धोका किती कालावधीत बदलू शकतो?
कॅन्सरचा धोका किती कालावधीत बदलू शकतो ह्यावर US - BRITISH ह्यांच्या एकत्रित संशोधनात फक्त 2 आठवड्यातच खाण्या पिण्याच्या सवयी बदलीचा कॅन्सरच्या धोक्यावर परिणाम झालेला आढळला.
Imperial College London आणि The University of Pittsburgh ह्या मधील शास्त्रज्ञांनी 20 अफ्रिकन अमेरिकन आणि 20 ग्रामीण साउथ अफ्रिका भागांतील लोकांची प्रयोगासाठी निवड केली. ह्या दोन्ही गटातील लोकांना त्यांच्या प्रयोग शाळेत ठेवले. ह्या दोन्ही गटातील लोकांच्या जेवणात वापरण्यात येणारे जिन्नस व त्याची पदार्थ शिजवण्याची पद्धत वापरून त्यांच्या साठी विशेष जेवणाची निर्मिती केली आणि ते पदार्थ त्यांना खाण्यास दिले. African American लोकांना rural African लोकांचा आहार खाण्यास दिला व rural African लोकांना African American लोकांचा आहार खाण्यास दिला. Rural African लोकांना जेव्हा पाश्चात्य पद्धतीचा आहार दिला गेला तर African American लोकांना जास्त फायबर असलेला ज्यात बीन्स डाळी कडधान्य असलेला आहार खाण्यास दिला.
प्रयोग सुरु होण्याआधी व नंतर colonoscopy, bacterial samples आणि कॅन्सरशी निगडित असलेले बाकीचे इतर महत्वाचे biomarkers ह्यांचा तपास केला. ह्या तपासात सुरवातीला असे दिसले की अर्ध्या अधिक अमेरिकन व्यक्ती मधे पॉलीप्स (polyp) दिसून आले ज्यामुळे पुढे जाऊन कॅन्सरचा धोका निर्माण होण्याची शक्यता बळावते. परंतु एकाही अफ्रीकन व्यक्ति मध्ये हा धोका आढळला नाही पण ज्यावेळेस जेवणात अदलाबदल केली तेव्हा मात्र अमेरिकन व्यक्ती मधे अंतर्गत सूजेचे पातळी कमी आणि इतर biomarkers मध्ये लक्षणीय रित्या घट झालेली आढळली आणि अफ्रीकन गटात कॅन्सरचा धोका नाट्यमय रित्या वाढलेला आढळला.
ह्या वरून असे स्पष्ट होते की कमी दिवसातच आहारातील बदल कॅन्सरचा धोका वाढवतो आणि म्हणूनच केव्हाही अगदी ह्या क्षणापासूनही बदल केल्यास तुमचा कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो. प्रयोगात असे दिसून आले आहे कि कॅन्सरचा धोका लवकरात लवकर निदर्शनास आल्यास कोलोरेक्टल कॅन्सर बरा होण्यास किंवा टाळण्यास एकदम सोपे आहे आणि त्यासाठीच वेळच्या वेळी तपासणी करणे उपयुक्त ठरू शकते. Continuous Update Project नुसार खाण्या पिण्याच्या सवयी हेल्दी केल्यास, स्मोकिंग बंद केल्यास, दररोज शारीरिक व्यायाम केल्यास, आणि उंची साठी योग्य वजन राखल्यास लोकांचा कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका साधारणतः 47% पर्यंत कमी होतो.
June 2, 2015
उन्हाळी असो वा हिवाळी; सर्दी ही सर्दी असते. असा विचार स्वाभाविकपणे आपल्यापैकी काहींच्या मनात येईल. आयुर्वेदानुसार मात्र तसे नसते. विविध ऋतूंत होणारी सर्दीदेखील विविध कारणांमुळे होत असते आणि या कारणांनुसारच तिचे उपचारदेखील बदलत असतात.
December 29, 2017
नव्या जमान्यातील नवीन इलेक्ट्रॉनिक साधनांपैकी ज्याने वॉकमनसारख्यांची सद्दी संपवली त्यात आयपॉड हे एक आहे. आयपॉड हा एक पोर्टेबल म्हणजे सहजगत्या कुठेही नेता येईल असा डिजिटल मीडिया प्लेयर आहे. पहिला आयपॉड हा अॅपल कंपनीने तयार केला. २३ ऑक्टोबर २००१ रोजी तो बाजारात आला.
September 20, 2023
एका मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्या नंतर तिच्या घरच्यांवर वर दुःखाचा डोंगर कोसळतो आभाळ फाटत. जणू एकाचा नाही तर पूर्ण परिवाराचा जीव जातो. आणि हे सर्व फक्त काही क्रुरांची भूक भागवण्यासाठी.
December 1, 2021
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 6
आवाहनानंतर आसन हा उपचार येतो. पाहुणे घरात आले की त्यांना जसे बसायला खुर्ची अथवा आसन देतो, तसे देवताना बसायला आसन कल्पिलेले आहे. घरात आलेला पाहुणा हा देवाप्रमाणे आहे, त्याची उठाबस देवाप्रमाणे व्हायला हवी.
आईवडिलांच्या सेवेत खंड पडू नये म्हणून, दारात उभ्या असलेल्या पांडुरंगाला, उभे राहाण्यासाठी वीट हे आसन म्हणून देणाऱ्या भक्त पुंडलिकाचे आम्ही वंशज आहोत. आणि आमचा पांडुरंग देखील हेच आसन घेऊन भक्तासाठी अठ्ठावीस युगे, त्या निस्सीम भक्ताची आठवण म्हणून, अजूनही तस्साच वीटेवरी उभा आहे.!
प्रवासाने दमल्यावर, रसक्षय झाल्यावर, घटकाभर का होईना तेवढीच विश्रांती घ्यावी, म्हणजे पुनः ताजेतवाने होऊन काम करता येते, हे सांगणारे हे आसन !
हे "आसन" विसरून कसे चालेल ?
आतिथ्य स्विकारल्यानंतर त्या पाहुण्यांना
खुशाली विचारावी, आरोग्य कसे आहे, काही पथ्यपाणी आहे का याची विचारपूस करावी. त्याच्या आरोग्याची काळजी देखील आपणच वहायला हवी.
यालाच अतिथी देवो भव संस्कृती म्हणतात.
नंतर हात पाय धुवायला पाणी द्यावे आणि सांगावे, "हात पाय धुवून घ्या !" सांगितल्याशिवाय समजणारच नाही. म्हणून हा उपचार. हल्ली सांगून देखील कोणी ऐकत नाही, हा भाग वेगळा !
बाहेरून जेव्हा घरात येतो, तेव्हा अनेक प्रकारचे जीवजंतु आपण आपल्या सोबत, आपल्याच अंगाखांद्यावरून, आपल्याच घरात, आणत असतो. हे जीवजंतु घराबाहेरच रहावेत, यासाठी खरंतर आंघोळ करूनच घरात यायला हवे, गुडघेस्नान तरी व्हावे. म्हणजे निदान हात पाय तरी धुवावेत, गेल्या वीस एक वर्षापूर्वी पर्यंत ही प्रथा, अनेक कर्मठ घरात सुरू होती. यासाठी घराच्या उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला न्हाणीघर असायचे. पण बदलत्या काळाचा महिमा म्हणत, ऑर्थ्रोडाॅक्सचे लेबल लावीत, ही अत्यंत चांगली आरोग्यदायी प्रथा नष्ट होत चालली आहे. भारतीय संस्कृतीतील, या प्रथेमागील विज्ञान शोधून काढून ते पुढील पिढीला सांगणे योग्य नव्हे काय ? ( विज्ञान हा शब्द देखील संस्कृती रक्षकांनी वापरायचा नाही म्हणे, तो फक्त बुद्धिवादी लोकांनीच वापरायचा, असे काही नाही. )
चांगले शिकले सवरलेले बुद्धीवादी लोकच जर घरात बाहेरून येऊन, तसेच बूट घालून अगदी थेट स्वयंपाकघरापर्यंत वावरू लागले तर, आरोग्य तरी कसे घरात राहील ?
आंग्ल भाषेत एक म्हण आहे. "प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर." म्हणजे सावध तो सुखी. रोग झाल्यावर उपचार शोधत बसण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून काळजी घेणे केव्हाही चांगलेच. पाय धुवून घरात यावे, म्हणजे अनेक रोगजंतुपासून आपला बचाव होतो, असे सांगितले तर कदाचित पटेल. यासाठीच अनेक देवालयामधे, गुरुद्वारांमधे प्रवेश करताना, पाय पाण्यात बुडवून जावे लागते.
"स्वस्थवृत्त" म्हणजे रोग होऊ नये म्हणून घ्यायची काळजी आणि "रोगनुत" म्हणजे रोग झाल्यावर करायचे उपचार, असे दोन मोठे भाग, आयुर्वेद शिकत असताना पुरेपुर अनुभवता आले, अभ्यासता आले.
हेल्थ मॅनेजमेंट इज फ्री अॅण्ड एन्जाॅएबल, बट डिसीज मॅनेजमेंट इज व्हेरी काॅस्टली अॅण्ड पेनफुल !
सैराट झाल्यापासून आंग्ल भाषेमधे सांगितले तर लवकर कळते.
खरं आहे ना ?
मग बाहेर नाचून घरात आल्यावर, फक्त एका तांब्याभर पाण्याने हातपाय धुणे हा देवपूजेतील उपचार स्वतःतल्या ईश्वराच्या आतिथ्यासाठी योग्य होणार नाही काय ?
चला, पुनः सुरवात तर करू !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
01.06.2017
June 1, 2017
आम्ही ना धड शेतीला न्याय देऊ शकलो, ना धड उद्योगांना. कायमच्या दुर्लक्षामुळे शेती कोलमडून पडली आणि दिशाहिन नियोजनामुळे उद्योगांचे तीन-तेरा वाजले. त्याचा परिणाम आज दिसून येत आहे.
June 1, 2008
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात निष्टी हे गाव आहे. या गावातील मासेमारी करणा-या ११५ कुटुंबांनी रेशिम विभागाच्या ६०० हेक्टर जमिनीवर रेशिम व्यवसाय सुरु केला आहे. तेथील ऐन व अर्जुन झाडावर कोष तयार करणार्या अळीचे पालन करुन रेशिम शेती व्यवसायात त्यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे.
February 6, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti