(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • साउथ आफ्रिका – भाग ५

    कालपर्यंत, मी व्हाईट लोकांच्या एका विशिष्ट राहणीबद्दल लिहिले. वास्तविक सगळे गोरे काही श्रीमंत नसतात. मी तर किती तरी गोरे लोक, रस्त्यावर भीक मांगताना पहिले आहेत. एक गोष्ट मात्र विशेषत्वाने लिहायची व ती म्हणजे, त्यांच्या रक्तातच गुण आहे की त्यांचे वेगळे रसायन आहे, ते कळणे अवघड आहे, पण एकूणच बहुतेक सर्व गोरे फार अभिमानी आणि गर्व राखणारे असतात.

      August 27, 2018


  • प. पू. आईंचे भजन-चिंतन

    प. पू. माता कलावती या थोर महिला संत ज्या प. पू. सिद्धारुढ महाराजांच्या कृपांकीत होत्या. प. पू. महाराजांनी त्यांना वेदांताचे तत्त्वज्ञान शिकवले आणि सर्वसामान्य अज्ञजन महिलांसाठी कीर्तनसेवेतून उद्धार करण्याच्या परिस्थितीतून त्यांनी स्वतःचा एक शिस्तपूर्ण भजन संप्रदाय निर्माण केला. आज देश विदेशात लाखो भक्त त्यांच्या आज्ञेनुसार सामुदायिक भजनोपासना तसेच बालकांसाठी बालोपासना करत आहे. श्रीगुरूतत्त्वाची अनुभूती ही घेत आहेत. भजनात त्यांच्या स्वतःच्या काही रचना आहेत. प. पू. आईंच्या एका रचनेचे चिंतन करू या.

    उठा उठा हो भाविकजन। गंगेमाजी करा स्नान।
    विश्वनाथाचे घ्या दर्शन। त्रिविधताप निवतील।।१।।

    स्मरता सदाशिव मायबाप । जाय चित्ताचा संताप।
    आनंद होय अनुप । विघ्नसंकटे हरतील ।।२।।

    कृष्णा वेणा तुंगा नर्मदा। भीमा तापी शरयु गोदा।
    येती शिवदर्शना सदा। त्या पावन करतील।।३।।

    गंगा यमुना सरस्वती। घटप्रभा नेत्रावती।
    सांब दर्शनासी येती। तुम्हा सहज भेटतील।।४।।

    पाहोनी माध्याह्न समय। स्नाना ये गुरुदत्तात्रय।
    हर्षे डोले गंगामाय। कलिमल दूर होय म्हणूनी ।।५।।

    श्री सद्गुरु हेच भक्तांचे खरे दैवत सत्चिदानंदघन श्रीगुरु हेच ज्ञानदाते-मोक्षदाते हा पूर्ण विश्वास प. पू. आईंचा होता. म्हणूनच प. पू. महाराजांचे वाक्य हे त्यांच्यासाठी प्रमाण वाक्य होते. त्याच महाराजांचे चरणी त्या अनन्य भावे विनंती करतात आणि म्हणतात.

    "गुरुदेवा! आपण करुणा सागर आहात. आपल्याच कृपाकटाक्षाने माझा उद्धार होणार आहे. तेव्हा माझ्या उद्धाराचा सत्संकल्प आपल्या चित्ती उमटू द्या. मला आपल्या शिवाय कोण आहे? शिष्यांसाठी व्यवहारातील सर्वच नाती श्रीगुरुचरणी विरुन जाताच तो त्याच आश्रयाने आधाराने राहतो.

    ।। ॐ नमः शिवाय ।। हा मंत्र आहे प. पू. आईंचा. या मंत्राचे दैवत शिव शंकर आहे. शंकरोतिस: शंकर:। सर्वांचे हीत करणारा-पावन करणारा तोच शंकर याचेच एक नाव विश्वनाथ हा नावाप्रमाणे संपूर्ण विश्वाचा नाथ म्हणजे पिता-आश्रयदाताआहे. गंगातटी याचे वास्तव्य असते. यासाठी आपल्या भक्तांना प. पू. आई म्हणतात, “भक्तजनहो ! जागे व्हा " आत्महितासाठी जागृत व्हा गंगा जी पापहारक आहे. तिच्यात स्नान करा मग
    विश्वनाथाचे दर्शन घ्या. यांनी तुमचे अध्यात्मिक (शारीरिक), आधिभौतिक (जगतातून येणारे) व अधिदैविक (जे ताप आपल्या हाती नाहीत) हे सारेच नष्ट होतील.

    गंगा ही प्रवाहरूपाने भक्तीचे प्रतिक आहे. शिवतत्त्व जोवर जीवाच्या अंतरी असते तोवर सारेच पवित्र असते, पण शिवाने देहाचा आश्रय त्यागला की त्याचेच "शव" होते असा हा शिव विश्वाचा अंतबार्ह्य व्याप्त आहे.

    हे शिव तत्व नित्य पवित्र पावन आहे. म्हणूनच तो सदासर्वकाळ सदाशिव आहे. याचे मस्तकी गंगा वाहते. प्रत्येक जीवाचा मस्तकी ज्ञानगंगा असतेच. तिच प्रवाहित झाली पाहिजे. ही ज्ञानगंगा प्रवाहित होताच जीवाचे क्रोधादि विकार चित्तातून निघुन जातात. जीव भक्तीरसात डुंबला की अंतरी विकार राहणार कसे? अंतरातून विकार गेले की अंतरंग भगवंत प्रेमाने परिपूर्ण भरते. परमात्मा कसा आहे? तर “आत्मा अरे रसो वै सः।" हा प्रेमरसाने भरला आहे. अंतरी प्रेमाचा झरा वाहू लागला की भक्ताला अमाप आनंद होतो. तो निष्काम होतो. लौकिकात त्याचेवर संकटे विघ्ने आली तरी त्यातले संकटत्व हरलेले असते. भक्तांसाठी ती केवळ एक घटना असते.

    पुढील ठिकाणी अनेक पवित्र नद्यांची नावे आहेत. या नद्यांच्या काठी तीर्थक्षेत्रे आहेत या नद्यांत सुस्नात होण्यासाठी संतमहंत येतात. देवदेवता सुद्धा येतात. त्यांच्याच चरण स्पर्शाने नद्या पावन होतात. अशा या तीर्थक्षेत्री तुम्ही आलात तर तुम्ही सुद्धा पावन व्हाल, असा दिलासा प. पू. आई देतात.

    पण भक्तासाठी सर्व नद्यांचे तीर्थे म्हणजे श्रीगुरुदेवांचे चरणच असतात. गोरक्षनाथ आपल्या एका रचनेत म्हणतात.

    "गंगा ना न्हाऊ जी मै जमूना ना न्हाऊ जो मै ।
    ना कोई तीरथ न्हाऊ जी । अडसठ तीरथ है घर भीतर ।
    ताही में मल मल न्हाऊ जी..."

    याच देहाच्या उपाधित अडसठ तीर्थ आहेत. तीच विचाराने, साधनाने मी स्वच्छ-पवित्र करीन परिणामी सदाशीवाचे दर्शन नित्य याच देहमंदिरात घेता येईल.

    पुढे गंगा यमुना सरस्वती यांचा त्रिवेणी संगमाचा उल्लेख आहे. गंगा भक्तीचे, यमुना कर्माचे तर सरस्वती ज्ञानाचे प्रतिक आहे. कर्म भक्ती ज्ञान याच क्रमाने भक्त हळूहळू विकसीत होत जातो. आणि अद्वैत तत्वात प्रवेश कर्ता होतो. तेव्हा देहाच्या घरात चैतन्याची प्रभा असतेच याची जाणीव त्याला होते. परिणामी नेत्रातून तो जे काही पाहतो, तेव्हा त्याला तत्वदर्शन सहज घडते. "अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी" या म्हणी प्रमाणे आत ओतप्रेत भरलेला शिव-सांब बाहेर सर्वत्र आहे, याचे तत्वदर्शन घडते या दर्शनाला सहजता आली की भक्त भक्तिच्या प्रांगणात स्थिरावतो. व जीवनमुक्तीच्या प्रवासाकडे सरकतो.

    याच पवित्र नद्यांमध्ये माध्यांन्ह समयी जगताचे आद्य गुरु श्री दत्तात्रेय दररोज स्नानासाठी येतात. श्रीगुरुदत्तात्रेयांचा अवतार हा नित्य-शाश्वत अवतार आहे. युगानयुगे ते आहेतच. ज्ञानप्रचार-प्रसार हेच त्यांचे प्रमुख कार्य आहे. त्यांच्याच चरण स्पर्शाने गंगा माता सुखाने-आनंदाने डोलू लागते. कारण दत्तात्रेयांच्या संस्पर्शाने तिच्यातील कली (कलह) मळ (निषिद्ध कर्माची इच्छा) हे दोन दोष निघून जातात.

    भक्तीच्या गंगेत राहणाऱ्या-डोलण्याऱ्या भक्ताला, जे तत्त्व परमात्याने दिले ते “दत्त" शाश्वत याची जाण येते, हे तत्त्व ज्ञानस्वरूप-आनंदस्वरूप-निरंजन असल्याने, भक्त सुद्धा भगवंतासारखाच होतो. त्याचे अंतरीची पापवासना क्षय पावते, द्वैतभाव विरू लागतो त्यामुळे कलह भांडण-वाद कलीचा प्रवाह कमी होत जातो. अंतकरणाच्या तळाशी रुतलेला “मल" दोष जो निषिद्ध-नको तो कर्म करणे हा सुद्धा नाहिसा होतो - दुर जातो. भक्ताला खऱ्या अर्थाने भगवंत दर्शनाची तळमळ लागते. याच तळमळीने जेव्हा भक्त भजन करतो तेव्हा तो भगवंत तत्त्वापासून भिन्न रहातच नाही “शिव भत्वा शिवं भजेत्” यानुसार तो रजन रतो होतो. श्री सद्गुरु कृपेने भजनाच्या माध्यमातून “मजन रती" या अवस्थे पर्यंतचा अंतरीचा प्रवास आई येथे प्रगट करतात.

    क्षेत्र म्हाणजे शरीर तर क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा होय. तीर्थ हे पावित्र्य दर्शवते शुद्ध भक्तीने, भावाने भजन केले नामानसंधान ठेवले तर देहाचेच तीर्थ होणे संतांना अपेक्षीत आहे. जीवापासून तार्थक्षेत्राचा प्रवास भजनाच्या माध्यमातून प. पू. आई घडवतात भजनम्हणजे केवळ गाणे म्हणणे नव्हे भजू हा धातू आहे. यात परमात्म्यतत्त्व स्वीकारणे हे आहे. प्रथम बुद्धीने स्वीकारणे नंतर भजनाच्या साधनाने साध्याची प्राप्ती करून घेणे.

    भजनातून अंतरी उतरणे अन् शिव-दत्त दर्शनाने कृतार्थता प्राप्त करुन घ्यावी हेच प. पू. आईंना या भजनातून सांगायचे आहे.

    हे चिंतनरुपी पुष्प प. पू. माता कलावतींचे चरणी समर्पीत करून शब्दांना विराम देते.

    --सौ. अलका मुतालिक, डोंबिवली.

    सौजन्य: गुरुतत्व मासिक, वर्ष २ रे, अंक १० वा.

      August 1, 2022


  • असामान्य व्यक्ती – डॉ. स्टीफन हॉकिंग

    १६४२ मधे गॅलिलीयो मृत्यू पावला त्याच वर्षी न्यूटन जन्मला. ज्या तारखेला (८ जानेवारी) गॅलिलीयो मृत्यू पावला त्याच तारखेला हॉकिंग जन्मला, ३०० वर्षाच्या अंतराने १९४२ मधे. हॉकिंग याचा उल्लेख योगायोग असाच करतात. जे विश्वाच्या उत्पत्तीचा शोध घेत आहेत ते अशा घटनांना नियमात कसे बसवतील?

      March 14, 2019


  • भाषांचं आकलन

    सायमा मलिक-मोरालेडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनातून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. भाषा कोणतीही असो. तिचं आकलन होण्यासाठी मेंदूतले काही ठरावीक भागच सक्रिय होत असतात. हे सक्रिय भाग मेंदूतील पुढच्या, वरच्या तसंच खालच्या भागात वसले आहेत. किंबहुना सक्रिय होणाऱ्या भागांबद्दलचे हे निष्कर्ष अपेक्षितच होते.

      August 11, 2022


  • श्री आनंद लहरी – भाग २

    भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी आई जगदंबेच्या गुणांचे वर्णन करण्याचा संकल्प तर केला. पण त्यांची पंचाईत झाली आहे की हे वर्णन करावे तरी कसे?

      February 6, 2020


  • अशी असेल २०२५ ची “ई-दिवाळी”

    आजच आपण पोस्टात फिरकत नाही. पण २०२५ मध्ये पोस्ट ऑफिस अस्तित्वात नसल्याचीही आपल्याला सवय झाली असेल. बँकांचे बरेच व्यवहार ऑनलाईन होत आहेत. आगामी काळात तर धनादेशही इतिहासजमा होतील. ब्रिटनमध्ये २०१८ पर्यंत धनादेशांचा वापर बंद करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.

      January 26, 2024


  • दयाघना नको आता पुन्हा येरझार

    दयाघना नको आता पुन्हा येरझार।।धृ।।

    ध्यास! केवळ आता तव दर्शनाचा
    सुखावला या जन्मी जीव हा अपार
    भोगले भोग, सारेसारे गतजन्मांचे
    जगन्नाथा! नको आता पुन्हा येरझार।।१।।

    सांगशील कां ? तूं रे जगतनियंत्या
    सत्य! तुजविण दूजे कोणते सुंदर?
    धावलो संसारी सदैव मृगजळापाठी
    जगन्नाथा! नको आता पुन्हा येरझार।।२।।

    सत्य त्रिलोकी! तुझीच सत्ता केवळ
    सृष्टीतही साक्षी, तुझेच रूप निरंतर
    अविरत स्मरण, तुझेच या स्पंदनात
    तुझ्या नामात सुखावतो जीव चिरंतर।।३।।

    मुक्ती, मोक्ष, स्वर्ग सारे तुझ्याच ठाई
    या युगी भौतिक सुखात दंगले चराचर
    वोखटी! प्रीती, भक्ती, वात्सल्य सारे
    उबगलो इथे आता, नको पुन्हा येरझार।।४।।

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र.१४६.

    ९ - १२ - २०२१.

      December 14, 2021


  • कल्याणवृष्टिस्तव – १६

    ह्रींकारत्रयसंपुटॆन महता मन्त्रॆण संदीपितं
    स्तोत्रं यः प्रतिवासरं तव पुरॊ मातर्जपॆन्मन्त्रवित् ।
    तस्य क्षॊणिभुजॊ भवन्ति वशगा लक्ष्मीश्चिरस्थायिनी
    वाणी निर्मलसूक्तिभारभरिता जागर्ति दीर्घं वयः ॥ १६ ॥

    कल्याणवृष्टिस्तवाच्या या शेवटच्या श्लोकात फलश्रुती वर्णन करतांना आचार्यश्री म्हणतात,

    ह्रींकारत्रयसंपुटॆन- तीन ह्रींकार संपुटित.

    कोणत्याही मंत्राच्या मागेपुढे एखादी गोष्ट लावले जाते तेव्हा त्याला संपुट असे म्हणतात. ह्रीं या बीजाक्षराच्या आधी ओंकार आणि नंतर श्री लावला जातो. अशा संपुटाने त्याला मंत्रत्व प्राप्त होते.

    आई जगदंबाच निर्गुण-निराकार परब्रह्म आहे आणि तीच परमशक्ती आहे.हे सांगण्यासाठी आधी ओंकार आणि पुढे श्री लावला जातो. त्याचवेळी हे तिन्ही जणु काही एकच आहे ते सांगण्यासाठी ह्रींकारत्रय म्हटले.

    महता मन्त्रॆण संदीपितं- ॐ ह्रीं श्रीं या महान मंत्राने संपादित असणारे, युक्त असणारे.

    स्तोत्रं यः प्रतिवासरं तव पुरॊ मातर्जपॆन्मन्त्रवित् - हे स्तोत्र, हे आई जगदंबे ! जो रोज तुझ्यासमोर मंत्राप्रमाणे जपतो.
    त्याला मिळणारे दिव्यलाभ सांगताना आचार्यश्री म्हणतात,

    तस्य क्षॊणिभुजॊ भवन्ति वशगा- क्षोणी म्हणजे पृथ्वी तर भुज म्हणजे उपभोग घेणारा. अर्थात राजा. स्तोत्र वाचणाऱ्याला राजाही वश होतो. लक्ष्मीश्चिरस्थायिनी- स्थिर संपत्ती प्राप्त होते. संपत्ती इतरवेळा चंचल असते. पण आईचा कृपेने ती देखील स्थिर राहते. अर्थात लोकविलक्षण लाभ होतात.

    वाणी निर्मलसूक्तिभारभरिता- सुंदर सुभाषितानि अलंकृत असलेली वाणी प्राप्त होते.

    जागर्ति दीर्घं वयः- दीर्घकालिक आयुष्य प्राप्त होते.

    जय जगदंब !

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      April 27, 2020


  • २०१८ मध्ये प्रथमच !!

    भारतात २०१८ मध्ये काही घडामोडी असा असणार आहेत की त्या भारतात पहिल्यांदाच होत आहेत…

      February 11, 2018


  • पर्यावरण रक्षणासाठी रेल्वेने आखलेले विविध प्रकल्प

    रेल्वेच्या वातानुकूलित डब्यातील प्रवास अतिशय सुखावह असला, डब्यांची देखभाल नीट ठेवणं हे रेल्वेसाठी महा-डोकेदुखीचं काम आहे. आज भारतीय रेल्वेचे ६ ते ७ हजार वातानुकूलित डबे रोज रेल्वेमार्गांवरून धावत असतात. त्यांतील थंडावा कायम राखण्यासाठी (सी.एफ.सी.१२) हा वायू वापरला जातो, परंतु या वायूच्या वापरामुळे हवेतील ओझोनचं प्रमाण कमी होतं व ते पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. या दृष्टिकोनातून पर्यावरणपूरक एच.एफ.सी.आर. १३४९ हा गॅस वापरावा लागेल व तो वापरण्याकरता वातानुकूलित डब्यांच्या रचनेमध्ये बरेच बदल करावे लागतील. वर्षाला ४७००० किलो गॅसची गरज लागेल. परंतु यामुळे जागतिक हवेचं वाढणारं तापमान खाली आणण्यास मदत होईल. या दृष्टीने आता नवीन वातानुकूलित डब्यांची बांधणी सुरू झाली आहे.

    आज भारतातील खेड्यांत शेकडो हातमागांवर कापड तयार होतं. ते तयार होत असताना पर्यावरणावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. पर्यावरणाचं रक्षण करण्याच्या हेतूने व एक सामाजिक बांधिलकी म्हणून रेल्वे बोर्ड अशा छोट्या औद्योगिक समूहांकडून खूप मोठ्या प्रमाणावर कापड खरेदी करतं, ज्याचा उपयोग वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो. यातून खेड्यातील लोकांना उद्योगही मिळतो व पर्यावरणही सांभाळलं जातं.

    विजेचा वापर कमी करण्यासाठी रेल्वे आपल्या वसाहतींकरता सी.एफ.एल. बल्बज् वापरून १० टक्के वीज बचत करीत आहे. तसंच पवनचक्क्या आणि सौरऊर्जेचा वापर विद्युतनिर्मितीसाठी करून छोट्या स्टेशनांवरील दिवे त्या विजेवर चालविले जातात. पुढील टप्प्यावर गाडीच्या डब्यांतील दिवेही सौर ऊर्जेवर चालविण्याची योजना आहे.

    येत्या काही वर्षांत बायोडिझेलवर चालणारी 'ग्रीन ट्रेन' सुरू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पर्यावरण संतुलन सांभाळले जाईल. हे रेल्वे अधिकाऱ्यांचं स्वप्न आहे, जे प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांची पावलं वेगानं पडत आहेत.

    -डॉ. अविनाश वैद्य

      November 25, 2022