वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ह्याचा २० मीटर उंच वृक्ष असतो,बुंध्याची साल पांढरी व काण्ड त्वचा धुरकट असते.जुनी झाल्यावर साल फिकट रंगीत तुकड्यानी सुटते. पाने १०-२५ सेंमी लांब,८-२० सेंमी रूंद असून पर्ण वृन्त ५-१५ सेंमी लांब असतो.त्याच्या टोकाशी गाठी असतात.त्याची पाने देठा जवळ हृदयाकृती तर शेंड्या जवळ पातळ व टोकदार असतात.फुल तांबूस पिवळे एक फुट लांबीच्या मंजिरी स्वरूपात असते.ती अडुळशाच्या फुलांप्रमाणे दिसतात.फळ बकुळीच्या फळा सारखे अंडाकृती व पिवळ्या रंगाचे व गोड तुरट वासाचे असते.फळात १-२ बिया असतात.
ह्याचे उपयुक्तांग आहे मुळ व फळ.ह्याचे मुळचवीला कडू,तुरट,गोड असून उष्ण गुणाचे व जड असते.तर फळ चवीला गोड असून थंड गुणाचे व जड आणी स्निग्ध असते.ह्याचे मुळ वात कफ नाशक तर फळ वातपित्त नाशक असते.
चला आता गंभारीचे औषधी गुणधर्म पाहुयात:
१)गंभारीची पाने स्निग्ध व थंड असल्याने तापा मध्ये व डोके दुखीत त्यांचा लेप डोक्यावर करतात.
२)शरीरात पित्तवाढून तहान लागली असल्यास व शोष लागत असल्यास चंदन,वाळा व साखरे सह गंभारीच्या फळाचा फांट देतात.
३)गंभारीचे पिकलेले फळ थंड गुणाचे असल्याने रक्त व पित्तशामक असून रक्तपित्तात उपयुक्त आहे.
४)गंभारीचे फळ हे गर्भाशयास बल देते व गर्भपात होण्याचा धोका टळतो.
५)लघ्वीच्या त्रासामध्ये गंभारीच्या पानांचा रस गाईच्या दुध व साखरे सह देतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
November 28, 2017
आरशांचा उल्लेख रामायण-महाभारतातही आढळतो. ग्रीक, रोमन, आपली सिंधु संस्कृती यांच्या भरभराटीच्या कालखंडातही आरशांचा उपयोग होत असल्याचे पुरावे मिळालेले आहेत. संथ जलाशयाच्या पाण्यात डोकावून पाहताना आपणच आपल्याकडे पाहत असल्याचं दिसल्यापासून ही जादू आपल्या घरच्या घरीच हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू झाले.
June 24, 2011
हे फळ सगळ्यांना आवडते.दिसायला आणी खायला देखील सुरेख.साधारण अक्टोबर महिन्यात सुरूवातीला हि फळे बाजारात येतात.ह्याचे १०-१२ फुट उंच झाड असते व फळ ४-५ इंच व्यासाचे असते.बाहेर काळपट हिरवी साल असते व आत पांढरा सुगंधी गर व काळी बी असते.
हे चवीला गोड थंड व पित्तनाशक असून वात व कफ दोष वाढविते.
आता ह्याचे घरगुती उपचार पाहूयात:
१)व्यवसाया निमित्त उष्णतेशी संपर्क येत असणाऱ्या व्यक्ती ज्यांना घसा कोरडा होणे,वारंवार तहान लागणे ह्या तक्रारी असतात त्यांनी सीताफळ अवश्य खावे.
२)मुलास दुध पाजत असणाऱ्या स्त्रीने सीताफळ खावे भरपूर दुध येते व थकवा देखील कमी होतो.
३)तळपाया व हात ह्यांची आग होत असल्यास सीताफळ खावे व साल तळव्यांना बांधावी.
४)गळवे पिकायला कच्च्या सीतांफळाचे पोटीस त्या गळूवर बांधावे.
५)सीतांफळाचे बियांचे चुर्ण हे केस धुवायला वापरल्यास कोंडा कमी होतो व केसांचे आरोग्य सुधारते.
सीताफळ खायचा अतिरेक केल्यास सर्दी खोकला होऊ शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 21, 2016
रेल्वेच्या संबंधातील विषयांची व्याप्ती फारच मोठी आहे. इतिहास, रेल्वे बांधणी, विविध मार्ग, गाड्या, प्लॅटफॉर्मस, वेटिंग रुम्स, स्टेशनांच्या इमारती, तांत्रिक माहिती…. खरंतर या जंत्रीला शेवटच नाही, या सर्वांमधून मिळणारी माहिती शोभादर्शकातून म्हणजेच `कॅलिडोस्कोप’ मधून दिसणाऱ्या रंगीत काचेच्या तुकड्यांच्या क्षणचित्रांसारखी रंजक आहे.
October 30, 2018
सुनीता बाईंशी मी दोनदाच फोनवर बोललो आहे- वालचंद ला असताना आम्ही ” तुझे आहे — ” बसविले होते. मी त्यांत “आचार्य ” ची भूमिका केली होती. मनाच्या एका तारेत पुलंना पत्र लिहिलं – ” तुमच्या या मानसपुत्राला आशीर्वाद द्या.” उत्तर आलं नाही. फोन लावला, पलीकडून सुनीताबाईंचा आवाज – ठाम नकार आणि फोन कट !
April 30, 2021
केवळ पुस्तके वाचूनच ज्ञान मिळतं असं नाही. काही वेळा पुस्तके बोलतातही. ‘बोलकी पुस्तके’ हा असाच उपक्रम दशरथ पाटील ही राबवीत आहेत. पण नेत्रहीनांसाठी वेगवेगळ्या वयोगटांसाठी, वेगवेगळ्या आशयाचा मजकूर ऑडिओ स्वरूपात सादर करून त्यांना ऐकवण्याचं काम प्राची गुर्जर करतात.
July 12, 2026
हा हू करताहेत, डोळ्यातून, नाकातून पाणी येतंय, पण तरीही मिरची, तिखट पदार्थ चवीनं खात आहेत, असे अनेक जण आपल्या अवतीभवती सापडतील. खरं तर तिखट ही चव नव्हे, तर तोंडाचा दाह आहे. मिरची कुळातील वनस्पतींत कॅप्सायसायनॉइड प्रकारची संयुगं असतात. त्यापैकी ‘कॅप्सायनिन’ हे संयुग आपल्या वापरातील मिरच्यांत आढळतं.
November 2, 2023
मुंबईच्या आदर्श गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना तातडीने राजीनामा देण्यास सांगितले. त्यामळे पुढे काय होणार याकडे सार्यांचे लक्ष लागले होते. पण एकूण राजकीय घडामोडी लक्षात घेता चव्हाणांची गच्छंती लांबणीवर पडल्याचे दिसते. या प्रकरणी नेमलेल्या समितीला चौकशीसाठी लागणारा वेळ आणि ओबामांचा मुंबई दौरा लक्षात घेऊन चव्हाणांना तूर्तास मुदतवाढ मिळाली आहे.
November 3, 2010
संग्रहालयांची संकल्पना, संग्रहित केलेल्या ठेव्याची महिती, नागरिकांना इतिहासातील घडामोडीची व ऐतिहासिक संशोधकांना अभ्यासपर माहिती मिळावी या उद्देशाने इंटरनॅशनल काऊन्सिल ऑफ म्युझियम यांनी १८ मे १९७७ हा दिन जागतिक संग्रहालय दिन म्हणून साजरा करण्यास आरंभ केला.
May 18, 2022
"आम्हाला हे असं लवकर जेवणं अजिबात शक्य नाही, हो!" असं सांगणाऱ्या करीता खास टीप....
सक्काळी सकाळी उठायचं, भराभरा आवरायचं डब्बा बनवायचा, पोरांना शाळेत हाकलायचं, नवरा कामाला पाठवलं की कसाबसा चहात पाव बुचकळून खायचा, म्हणजे झाला नाश्ता. वर पाणी ढोसायचं, आपला डबा करायचा, धावधाव करीत ऑफीस गाठायचं, बाॅसची बोलणी खायची, परत घरी येताना मार्केट मार्गे खरेदी करून, येऊन कंबर कसून परत कामाला लागायचं, टीव्ही समोर बसलेल्यांना तिथे नेऊन चहा बिस्कीट खायला द्यायची, कपबशासुद्धा आपणच घरात न्यायच्या. रात्रीच्या जेवणाचं बघायचं, हे करत असताना, तू आज कशी चुकलीस, हे समोर खुर्चीवर ढेंग टाकून निवांत बसलेल्याकडून निमूटपणे ऐकून घ्यायचं. तोंडातून एकही अवाक्षर न काढता, जेवणाचा कार्यक्रम पार पाडायचा, आपणच डाॅक्टरकडे जाऊन आणलेल्या गोळ्या आपणच घ्यायच्या आणि कधी एकदा पडता येतंय याची वाट बघायची ......
हे सर्व कशासाठी करताय ?
दोन घास सुखानं खाता यावेत म्हणून ना.....
खाल्लेलं अंगाला लागण्यासाठीच ना.....
पण जरं या व्यस्त दिनचर्येतून जर शेवटच्या दोन ओळी साध्य होणार नसतील तर ? सगळा खटाटोप कशासाठी करताय ?
कशासाठी ? पोटासाठी !
एकच बदल करून पहा,
फक्त जेवणाची वेळ बदला...
आता असं करता येतं का बघा.
सकाळचा नाश्ता कॅन्सल.
नाश्त्याऐवजी थेट पोटभर जेवण.
दुपारचं जेवण / डबा कॅन्सल.
सायंकाळी घरी आल्यावर पोटभर जेवण.
( जे सातला घरी पोचू शकत नाहीत, त्यांनी सायंकाळचा डबा सोबत न्यावा.)
दोन वेळा जेवण बनवायचंच नाही. फक्त सकाळी एकदाच जेवण बनवण्यात वेळ खर्च करायचा. एक पदार्थ फक्त सायंकाळी नवीन करायचा. बाकीचे तीन प्रकार सकाळचेच.
सूर्य असल्यामुळे सकाळचे तयार अन्न सायंकाळ पर्यंत नासत नाही. सायंकाळी बनवलेले मात्र सकाळी फुकट जाते.
दुपारचा डबा अगदी भुकेपुरताच. सायंकाळच्या भूकेची जाणीव ठेवणारा.
दुसरे मुख्य जेवण सायंकाळी सात वाजता.
बाकी जेवणात कोणतेही पथ्य करायचे नाही.
सूर्योदय ते सूर्यास्त सगळं खायचं, पोटभर खायचं, मनसोक्त खायचं.... कावळ्यासारखं !
पथ्य एकच ....
खाताना भीती न बाळगता खायचं. आणि खाल्ल्यानंतर खाल्लेलं सगळं विसरून जायचं. खाल्लेलं आठवायचं नाही, मनात साठवायचं नाही.
बायकांचा स्वयंपाकघरात जाणारा आणि "रांधा वाढा उष्टी काढा" मधे खर्च होणारा वेळ वाचेल.
सायंकाळी साडेसातनंतर स्वयंपाकघर बंद.
सहकुटुंब सहपरिवार कुठेतरी शाॅपिंग, देऊळ, बाग.... थोडं मोकळे वाटेल.
स्वयंपाकघरातला वेळ वाचेल,
फॅमिली लाईफ एन्जाॅय करता येईल, हौस, मौज करता येईल.... आणि बरंच काही...
मुख्य म्हणजे निरर्थक औषधांशिवाय, निरामय जीवन जगत सगळं जेवण घेता येईल.
नाहीतर......
डोंबिवली फास्ट पकडत, दिवसभर धांगड धिंगा करत, ज्या पोटात आहार टाकल्यानंतर त्याचे रूपांतर उर्जेमधे होते, त्याऐवजी, त्याच पोटात रोज न चुकता, जन्मभर पुरणारी औषधं टाकायची आहेतच...
आणि डाॅक्टरच लिहून देतात हल्ली...
वरील सर्व औषधे पांडुरंगाच्या चरणी विलीन होईपर्यंत सुरू ठेवावीत......
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
06.03.2017
March 6, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti